Prema tujha rang nava - 2 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 2

प्रेमा तुझा रंग नवा... - 2

आरोही ला ते एका रुममध्ये घेऊन येतात तिथे तिला घालण्यासाठी चे कपडे याची अगोदरच तयारी करून ठेवलेली. रियाने तिला फ्रेश आणि तयार होऊन बाहेर हॉलमध्ये ये असं बोलून निघून गेली 🚶🚶🚶

आरोही रुमध्ये आली समोर बेडवर तिला घालण्यासाठी लाईट निळ्या रंगाचा ड्रेस , मॅचींग कानातले, बांगड्या ठेवलेले दिसले . ती ते बघून आपुसक तिच्या चेहऱ्यावर गोड smile आली 😊 आणि फ्रेश व्हायला गेली

फ्रेश होऊन आरोही बाहेर हॉलमध्ये आली तिला बघून सगळे दंग झाले ती दिसतच तशी होती लाईट निळ्या रंगाचा ड्रेस एका साईड ने ओढनी घेतलेलं तिच्या गोऱ्या शरीरावर खूपच छान दिसत होता , मॅचिंग कानातले , बांगड्या , होठांना स्किन कलरची लिपस्टिक, डोळ्यांना लायनर, आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप ती इतकी सुंदर दिसत होती की कोणीही हैपनोटाइज होईल.

आरोही समोरच दृश्य बघून दंग झाली. भान हरपून ती बघत होती.
समोर पूर्ण हॉल वेगवेगळ्या फुलांनी सजवलेल कारण आरोहीला निसर्गाची खूप आवड होती आणि त्यात फुल तिला खूप आवडायची त्या हॉल मध्ये फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता आणि खाली सगळा हॉल फुग्यांनी भरला होता, वर कागदाचे तोरण एका लाईन मध्ये चिटकवलेले. खूप छान असा हॉल सजवलेला
तेवढ्यात सगळ्यांच्या आवाजाने आरोही भानावर आली
सगळे " Happy birthday aarohi di "
आरोही डोळे भरून सगळ्यांना थँक्यू बोलते
हो आज आरोहीचा वाढदिवस होता तिचा स्पेशल डे ती या डेला दरवर्षी बीच वर जायची आजही गेलेली पण एकटी , दरवेळी तिच्यासोबत तिच्या जवळची एक व्यक्ती असायची आणि त्या व्यक्तीमुळे च तिला बीच वर जायची आवड निर्माण झाली मग ती दरवर्षी तिच्या वाढदिवसाला जाऊ लागली आणि प्रत्येक वाढदिवसाला ती व्यक्ती सोबत असायची. तीच एक व्यक्ती होती जी आरोहीने त्याकडून अपेक्षा ठेवलेली की हाच मला लहानपणी घडलेल्या घटना मधून बाहेर काढेल तीच लहानपण हरवलेलं ते परत आणेल जगातली सगळी सुख देऊ शकतो मला पाहिल्यासारखं बनवू शकतो कधीच डोळ्यातून अश्रू नाही येऊ देणार
तिने अजूनपर्यंत कोणाला त्या घटनेबद्दल सांगितलं नव्हत ती एकटीच त्या संकटांशी झुरत होती तीच लहानपण हरवलेलं कुठेतरी
पण
पण
पण
त्यांच्यात असा विरह आला की आरोहीला वाटल की सगळ संपल्यासारख वाटल तोच एक दुवा तिच्या जगण्याचा, पण ती कधीही कोणाला न घाबरणारी त्या व्यक्तीला घाबरु लागली . त्याच्यामुळे तिचा परिवार तिच्यापासून लांब झाला होता आणि ती या आश्रमात राहायला आलेली.

सगळ्यांनी तिला विष केलं मधे एका टेबलावर आरोहिचा फेवरेट चॉकलेट केक ठेवला आणि त्यावर कँडल्स लावून दिलं मग आरोहिने ते कॅंडल्स विझवून तो केक कापायला सुरुवात केली आणि इकडे सगळे birthday song म्हणायला लागले
" Happy birthday to you
Happy birthday aarohi"
आरोहीने केक कापून सर्वात आधी परीला भरवला मग रियाला आणि नंतर बाकीच्यांना. केक भरवून झाल्यावर सगळ्या लहान मुलांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. मूले डान्स करत होती आणि आरोही बाजूला त्यांना बघून आपुसक तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली.😊😊😊 तिच्या बाजूला रिया बसलेली तिने आरोहीला बघितल आणि तिला एक कल्पना 😇😇😇😇 आली मग रियाने उठून सगळ्यांना शांत केलं
आरोहीने मुलांना रियाने शांत केलेलं बघून तिला विचारल
आरोही " रिया काय झाल यांना का थांबवलं? "
रिया " तू थांब मी सांगते "
आरोही "ok"
रिया " सो guys थांबवलं यासाठी माफी असावी, तर तुम्हाला थांबवण्याचा हा हेतू आहे की आरोही एक गाणं गाणार आहे 😊😊😊"
हे ऐकुन आरोहीला शॉक लागला
आरोही " काय ?😨 मी नाही मला नाही येत गायला नो ☹️"
रिया " हे नाही काय गाणार आहेस तू , तुला येत गाणं मी ऐकले आहे गाताना तुला गुपचूप गायच समजल का नाही तर बघ 🤨🤨🤨"
आरोही " मला धमकी 🙄😤 मला नाही गायच आहे 😢"
रिया काही बोलणार तेवढ्यात सगळे ओरडू लागले
सगळे " प्लीज गा.... प्लीज गा...."
सगळ्याचा गोंधळ बघून आरोही गायला तयार झाली
आरोही " ओके ओके गाते शांत व्हा सगळे 😊😊😊"
सगळे " ये 😀😀😀😀😀😀"
आरोही "😊😊😊😊😊"

आरोही गायला सुरुवात करते 😇😇😇😇

हर घड़ी बदल रही हैं रूप ज़िंदगी
छॉंव हैं कभी, कभी हैं धूप ज़िंदगी
हर पल यहां जी भर जियो
जो हैं समॉं कल हो न हो

हर घड़ी बदल रही हैं रूप ज़िंदगी
छॉंव हैं कभी, कभी हैं धूप ज़िंदगी
हर पल यहां जी भर जियो
जो हैं समॉं कल हो न हो

चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वो मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वो ही सबसे हसीं है

उस हाथ को तुम थाम लो
वो मेहरबॉं कल हो न हो

हर पल यहां जी भर जियो
जो है समॉं कल हो न हो

हो पलको के ले के साये
पास कोई जो आये
लाख सम्भालो पागल दिल को
दिल धड़के ही जाये

पर सोच लो
इस पल है जो
वो दास्तां कल हो न हो

हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छॉंव हैं कभी, कभी हैं धूप ज़िंदगी
हर पल यहां जी भर जियो
जो हैं समॉं कल हो न हो

हर पल यहां जी भर जियो
जो है समॉं कल हो न हो

जो है समॉं
कल हो न हो

आरोहीला हे गाणं गाताना रडू येत होत पण सगळे समोर होते म्हणून अश्रू आतमध्ये च लपवले
आपल्या धुंदीत असताना टाळ्यांच्या आवाजाने ती भानावर आली
रिया "खूप छान गायल तू एकदम मस्त क्या बात है मानना पडेगा 🥰😘😍🤩"
आरोही " काहीही काय गप्प बस😊"

सगळे धमाल मस्ती करून आपापल्या रूममध्ये गूड नाईट विष करून आणि आरोहिला परत एकदा birthday wish करुन झोपायला गेले, आरोही पण गूड नाईट विष करून आणि थँक्यू म्हणून आपल्या रूममध्ये झोपायला गेली ती खूप थकली होती आणि तशीच झोपून गेली उद्या लवकर उठून ऑफिसलाही जायचं होतं बॉस च्या welcome साठी.
.....................
सकाळी
आरोही सकाळी लवकर उठून पटापट नाष्टा करून ऑफिसला जायला निघाली ती रिक्षा भेटली तशीच बसून ऑफिस साठी रवाना झाली.
ती finally ऑफिसच्या बाहेर पोहोचली आत जाऊन tally apartment तिच्या डेस्क वर काम करत बसली आजूबाजूला बॉसच्या वेलकम साठी खूप गडबड चालू होती.
शेवटी गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने बॉस आल्याची चाहूल लागली. सगळे department त्याच्या स्वागता साठी एकत्र उभे राहिले
तेवढ्यात समोरून NG group of Industry च्या मालकाची एन्ट्री झाली तो दिसायला खूप हँडसम चार्मिंग दिसत होता. बोलके डोळे, चेहऱ्यावर थोडी बिअर्ड त्याने तो खूपच छान दिसत होता, जिमने कमावलेली बॉडी, जेलने सेट केलेले केस यात तो एकदम dashing दिसत होता, सगळ्या मुली त्याच्यावर लट्टू झालेल्या आपली आरोही पण त्याच्या डोळ्यांत हरवून गेलेली पण आपली कंडीशन लक्षात घेऊन स्वःताला सांभाळलं.
सगळ्यांनी त्याला पुष्गुच्छ देऊन त्याचं स्वागत केलं आणि तो सगळ्यांना ग्रिट करत पुढे जात होता, तेवढ्यात आरोहीच्या हाताचा स्पर्श त्याला झाला आणि त्याच्या मनात हुरहूर आली कोण आहे हे बघण्यासठी त्याने चेहरा समोर केला आणि तिच्या पाणीदार डोळ्यात हरवून गेला पण आजुबाजूच लक्षात घेऊन तो लगेच भानावर आला आणि आपला हात तिच्या हातातून काढून घेतला आणि पुढे निघून गेला. आरोहीची पण कंडीशन सेम तशीच होती.

तो आपल्या केबिन मध्ये येऊन chair वर बसून विचारात हरवला मनात " मला कधी असं नाही झाल पण तिला बघून मला का मनात हुरहूर आली आणि ते तिचे पाणीदार डोळे त्यांच्यात का हरवलो मी मला काय होतंय समजत नाही आहे आकर्षण असू शकते हे जाऊ दे एवढा विचार न केलेला बरा"
एका आवाजाने त्याची तंद्री उडाली
सारंग ( त्याचे वडील ) " काय राजकुमार कसं वाटत आहे इकडे जमत आहे ना "
तो " हो पप्पा जमतंय 😊😊"
सारंग " ठीक आहे " ( काहीतरी आठवून ) मग निखिल लग्नाचा विचार केला आहे की नाही तुझी मॉम तर माझ्या पाठी हात धुवून लागली आहे तुला लग्नासाठी मनवायला कोणी मनात असेल तर सांग "
( तर हा आहे आपला कथेचा हीरो निखिल घाणेकर हा Delhi वरुण आपली स्टडी कंप्लीट करून NG Industry मध्ये त्याच्या वडिलांच्या business मध्ये जॉईन झाला, निखिल खूप प्रेमळ स्वभावाचा जर एकादी गोष्ट लिमिट च्या बाहेर गेली तर समोरच्याच काही खरं नाही इतका राग त्याच्या नाकावर असतो आणि नेहमी सगळ्यांच्या मदतीला खंबीरपणे उभा असतो त्याचे वडील सारंग घाणेकर आणि त्याची आई सुमित्रा घाणेकर यांचं अरेंज मॅरेज होत सारंग यांनी खूप कष्ट करून या इंडस्ट्री ला टॉप फ्लोअर वर आणली होती... ते आता त्यांचा मुलगा निखिल सांभाळत आहे याच्या फॅमिली मध्ये फक्त हे तिघेच राहत होते याचं पुण्याला farmhouse आहे ते तिकडेच राहतात )
निखिल " ( त्याच्या पप्पांनी तस बोल्यावर आरोहीचं चेहरा त्याच्यासमोर आलेला पण त्याने ते विचार झटकले) काय पप्पा तुम्ही पण मी अजुन matured नाही आहे मला माझ विश्व तयार करायचं आहे मगच मी लग्न करेन. आताच तर मी ऑफिस जॉईन केला आहे थोडे दिवस जाऊ द्या मग मी विचार करेन यावर
सारंग " ठीक आहे बेटा तशी तुझी इच्छा फोर्स नाही करणार "
निखिल "😊😊😊"
सारंग निखिल ला बेस्ट ऑफ लक बोलून केबिन बाहेर निघून गेले तर निखिल त्यांना थँक्यू बोलून आपल्या कामाला लागला
निखिल खुर्चीवर बसून लॅपटॉप मध्ये मेल चेक करत बसला होता तर त्याचं लक्ष सहजच आरोहिवर गेलं तसं लक्ष गेलं तर त्याला आरोही खूप घाबरलेली दिसली आणि सारखं फोन मध्ये बघत होती त्याला काहीच समजत नव्हते की ही एवढी का घाबरत आहे त्याला तिला विचारण्याचा मोह झाला पण त्याने तो मोह आवरला अस डायरेक्ट कोणाला विचारणार आणि कुठल्या नात्याने.
तेवढ्यात ऑफिस सुटायचा टाईम झाला होता तर त्याला तिथे आरोही दिसली नाही त्याने इकडेतिकडे बघितले त्याला ती कुठेच दिसली नाही मग तो नाद त्याने सोडून दिला आणि निघायची तयारी करू लागला .
................
आश्रमात

आरोही रडत रडत आश्रमात येऊन तडक रियाच्या रूम मध्ये गेली आणि तिला बिलगून अजुन जोरात रडू लागली
रिया " काय झाल एवढी का रडत आहेस आणि इतकी का घाबरली आहेस सांगणार आहेस का?🥺🥺🥺"
आरोही स्वताला सांभाळून तशीच रियाला "तो......तो......तो....परत..आला..आहे...नाही सोडणार मला तो नाही सोडणार....
रिया " कोण तो?".............

क्रमशः


©® भाग्यश्री परब


Hello guys 😊😊😊
कसे आहात चांगलेच असतील नसतील तर स्वतःची काळजी घ्या तर मी हे सांगत होते की या स्टोरी चे किती पार्ट असतील सांगू नाही शकत आणि मला जस वेळ मिळेल तस मी पोस्ट करत जाईन सॉरी 😊😊😊
तर यात काही चुकल तर माफी असावी 🙏🙏🙏🙏🙏
मग भेटू nekt पार्ट मध्ये

🥰Stay tuned 🥰
🤩Stay happy 🤩
😍Take care 😍