Prema tujha rang nava - 3 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 3

प्रेमा तुझा रंग नवा... - 3

आरोही " तो......तो......तो..... परत...आला नाही सोडणार मला तो
रिया " कोण तो? "




पुढे.....

आरोही " रक्षित😭😭 "
रिया " what 😳😧 रक्षित त्याला कस समजल तू इथे आहेस ते " ( तुम्ही म्हणाल हिला कसं माहिती तर आरोही ने रियाला तिचा पास्ट अगोदर सांगितला आहे जेव्हा ती इथे राहायला आली )
आरोही " मी जेव्हा ऑफिस मध्ये होते तेव्हा त्याचा मेसेज आलेला 😭

फ्लॅशबॅक......
बॉसला वेलकम करून झाल तेव्हा सगळे आपापल्या डेस्कवर येऊन बसले आरोही पण येऊन बसलेली आणि काम करू लागली थोडा वेळ गेल्यावर तिचा सहज फोन ब्लींक झाला आणि आरोहीच लक्ष गेलं पहिलीच ओळ वाचल्यावर तिने पटकन फोन हातात घेऊन नोटिफिकेशन वाचायला सुरुवात केली
" हॅलो जान मी रक्षित ओळखलं का 😂😂 बरोबर ओळखत असशील तू मग मी तुला किती महिने शोधतोय शेवटी तू भेटलीस अजुन किती पळणार माझ्यापासून हाच विचार करत आहेस ना की कसं शोधल ते तर हे सोहमच्या डाव्या हाताचा खेळ आहे तू कुठेही जा मी शोधूनच काढेल आणि हो जर जास्त नखरे केले तर माहीत आहे ना एक वर्षापू्वी काय केलेलं आय नॉ की तुझ्या बरोबर लक्षात असेल 🙄😊 सो चल मग भेटू पुन्हा बाय 😊😊"
हा मेसेज वाचून आरोही खूप घाबरलेली सारखं सारखं फोन बघत होती तिचे हात पाय थरथरत होते काहीच समजत नव्हते तिला सारखं सारखं फोन मध्ये बघत होती, की जे वाचलं ते खरं आहे का?
तेवढ्यात ऑफिस सुटायचा टाईम झालेला मग तिने पटापट आपल आवरलं आणि आपली पर्स घेऊन झपाझप पावले टाकत ऑफिस बाहेर . पटकन रिक्षा पकडून आश्रमात जायला निघाली मध्येच तिला सारखं सारखं फोन वरच्या मेसेज वाचून भीती वाटत होती आणि रडायला पण येत होत.
विचार आणि भीती यामध्ये आश्रम आलं तिने रिक्षावाल्याला पैसे देऊन धावतच आश्रमात शिरली आणि लगेच रियाच्या रूममध्ये आली.

वर्तमान.....
रिया " रक्षित तो का परत आला आहे ?"
आरोही " त्याने काय केले होते माहीत आहे ना मी सांगितलं होतं तुला कसे कृत्य केले होते . मी कुठेही असू दे तो शोधून च काढेल मला "
रिया " अग तू अशी घाबरून राहते तर त्याला आणखी चांस भेटतो तुला घाबरवण्याचा , तू त्याला चांस नको देऊ मग तो तुला आणखी त्रास देणार माहीत आहे मला त्याने काय केले ते आता तू अशी खचून बसलीस तर पुढे अजुन संकट येईल आणि त्याचा परिणाम आपल्या आसपासच्या लोकांत येईल चालेल का तुला ( आरोही नाही अशी मान हलवते ) नाही ना मग तुला स्वतःसाठी लढावं लागेल त्याला शिक्षा द्यावी लागणार"
आरोही " पण तो समोर आल्यावर भीती वाटते तोंड उघडायची हिम्मत नाही होत अगोदर सारखा नाहीये तो 😭"
रिया " तुला स्ट्रोंग बनावं लागेल बाळा पुढे जर कुठल्या मुलीला त्रास दिला तर त्याने , पुढच्या पिढीसाठी तरी, तुझं स्वप्न माहीत आहे ना काय आहे नाही तर ते स्वप्न कसं पूर्ण होणार अशी घाबरून राहिलीस तर , तुला त्याच्याशी लढावं लागेल "
आरोही डोळे पुसत " हो मी त्याच्याशी लढायला तयार आहे 😇आणि मी माझं स्वप्नही पूर्ण करेन "
रिया " आता कसं 😃😇 I am so happy for you अशीच strong रहा 😊😊 जा आता फ्रेश होऊन ये जेवायला चेहरा बघ कसा केला आहे रडकी "
आरोही " ये मी रडकी नाही तू असशील रडकी "
रिया "😳 मी कशी, मग आता कोण रडत होत तू रडकी नाही तर 🙄🙄"
आरोही " 😂😂😂😂"
तिला हसताना बघून रियाला समाधान वाटल आणि देवाला अशीच हिला नेहमी सुखी ठेव हे मागणं मागितलं 😊😇
आरोही रियाला बाय बोलून आपल्या रूममध्ये येते. फ्रेश होऊन ती जेवायला जाते , सगळ्यांसोबत जेऊन थोडे गप्पा मारून ती परत रूममध्ये येते आणि बेडवर झोपी जाते पण काही केल्या तिला झोपच येत नव्हती सतत तिच्या डोक्यात रक्षितच्या मेसेज चा विचार येतो की त्याने मला कसं शोधून काढले हे बघावं लागेल.
पण अचानक मध्ये तिला ऑफिस मधला प्रसंग आठवतो
आरोही मनात " त्यांनी जेव्हा मला शेक हॅण्ड केलं तेव्हा माझं ह्रदय येवढं जोरजोरात का धडधडत होतं काय झाल होत मला त्यांच्या डोळ्यात इतकी का हरवून गेले होते मी नो आरोही हे काय केलंस तू काय विचार करतील सर आता नजर कशी मिळवू त्यांच्याशी 😣😣 जाऊ दे उद्या च उद्या बघता येईल आता झोपते आता या रक्षित वर लक्ष ठेवावं लागेल सोडणार नाही त्याला आता त्याला त्याची लायकी दाखवेल ही आरोही . अब देखना मेरा कमाल रक्षित बाबू " आरोही गुढपणे 😊 हसत झोपी गेली......


क्रमशः

©® भाग्यश्री परब


🥰Stay tuned 🥰
😍Stay happy 😍
💖 Take care 💖

Rate & Review

Rahul Jadhav

Rahul Jadhav 2 months ago

poonam Nawale

poonam Nawale 9 months ago

uttam parit

uttam parit 1 year ago

Bhagyashree Parab
Prakash Gonji

Prakash Gonji 2 years ago