Prema, your color is new ... - 8 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 8

प्रेमा तुझा रंग नवा... - 8

तेच सामान घेताना आरोही कोणालातरी धडकली.... ती त्या माणसाला काही बोलणार तर त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही आलेलं.... रिया ची पण सेम रेअँक्शन होती....
दोघी एकदाच आश्चर्य आणि रागाने " तू....😳😡"
तो राक्षसी हसू आणत " हो मी.... काय मला बघून आश्चर्य वाटलं का.... 😈"



पुढे......

आरोही रागात " तू बाहेर कसा आलास.... जेल मध्ये होता ना...."

तो " हो.... होतो आता बाहेर आलोय , तू कितीवेळा पण जेल मध्ये टाकशील तरी मी सहज बाहेर निघू शकतो...."

आरोही " इम्पॉसिबल सगळे पुरावे तुझ्या बाबतीत होते....
तुझ बाहेर निघणं कठीण आहे...."

तो " पुरावे इतकेही हार्डली नव्हते ना 😈😈😈.... सो आता दुसर उपाय शोध परत जेलमध्ये टाकण्यासाठी....की मी मदत करू तुला...😂😂😂"

आरोही " यू रक्षित 😡😡( आता रक्षित कसा बाहेर निघाला हे नंतर समजेल....) सोडणार नाही मी तुला मारून टाकेन...."
ती त्याला मारायला जाणार तर रीयाने तिला पाठून पकडले...

रिया " अग काय करत आहेस , वेडी आहेस का.... शांत हो , रिलॅक्स..."

आरोही " कशी शांत होऊ , हा माझ्या डोक्यात गेला आहे हा.... याला सोडणार नाही मी मारून टाकेन 😡😡😡...." आरोही रिया च्या हातून सुटून रक्षित समोर उभी राहिली....

रक्षित " ओह इतका राग... ( छातीवर हात ठेवून ) हाये ये तेरी अदा 💖💖.... " अस बोलून त्याने तिचा हात धरला....

रक्षित ने अस बोलल्यामुळे आणि तिचा हात पकडल्यामुळे आरोही ला खूपच राग आला.... रिया तिला शांत करत होती तरी ती शांत होत नव्हती.... तेवढ्यात पाठीमागून धारधार आवाज आला....

" आरोही....😡"
आरोही आणि रिया आवाजाच्या दिशेने बघितलं तर त्या माणसाला बघून आरोही आश्चर्य , भीती आणि डोळ्यात अश्रू असे समिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर आले....
आणि...
आरोही सगळ जीव एकटवून भीतीनेच रडवेल्या आवाजात " बाबा तुम्ही....🥺" ( हो ते आरोहीचे बाबा होते... त्यांना अस समोर बघून आश्चर्य तर वाटणारच आणि इतक्या दिवसांनी त्यांचा चेहरा बघितलं तर रडू कोसळणार च )

आरोहीचे बाबा रागातच " हो.... मी.... का इथे नको होतो का मी आणि तुझ अजूनही याच्याशी ( रक्षित कडे बघत...) आहेत... मला वाटल आता पर्यंत सुधारली असेल , म्हणून मी तुला बघायला आलो होतो पण नाही....तुला अस बाहेर हाकलून च खूप मोठी चूक केली , घरातच बंद करून ठेवल असत तर हे आता बघायला भेटल नसत....आता तू आमची मुलगी नाही , अनोळखी आहोत आजपासून आणि मी तुला ओळखत पण नाही.... आजपासून तुझ्यासाठी घराचे दार बंद आणि इथून पुढे तुझ तोंडही नको दाखवू ..... "

आरोही च्या बाबांनी अस बोलल्याने ती सैरभैर झाली , डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.... बाबा तिथून जातच होते की लगेच आरोही ने त्यांचा हात पकडुन थांबवलं...
आणि...
भरल्या डोळ्यांनी त्यांच्याशी बोलू लागली " बाबा... बाबा... अस नका करू प्लीज मी आई आणि तुमच्याशिवाय नाही राहू शकत.... तुम्ही जी शिक्षा द्याल ती मंजूर आहे पण अस सोडून नका जाऊ..."

आरोही चे बाबा " तू आमची कोणी नाही आहे... मी तुला नाही ओळखत सोड माझा हात...."

आरोही " नाही बाबा.... मला माफ करा अस नका वागू 🙏😭..."

बाबा " सोड बोललो ना....😡😡"

आरोही रडतच नाही मध्ये मान हलवत बोलली आणि तशीच त्यांना पकडत उभी राहिली.... मग शेवटी तिच्या बाबांनी रागातच आपल्या हातातून तिचा हात सोडवून तिच्याकडे न बघताच सरळ तेथून निघून गेले...
ते गेले त्या दिशेने ती बघतच राहिली आणि धपकन खाली गुडघ्यावर बसून हुंदके देत जोरजोरात रडत होती , तिला बाबांचं अस वागणं बघुन खूपच वाईट वाटत होत .... रिया पण तिच्या बाजूला बसून तिला मिठीत घेत शांत करत होती .... रियालाही खूपच वाईट वाटल होत तिच्या बाबांचं वागणे... आजूबाजूच्या लोकांच्या कुजबुजण्याने रियाने आरोही ला तेथून उठवून एका साइडला उभ केल....
रिया " आरु बाळा नको रडूस , सगळ नीट होईल.... बी पोसिटिव....."

आरोही रडतच " काही नीट नाही होणार संपल सगळ , मी जो बाबांच्या नजरेत विश्वास निर्माण केला होता... तो पूर्णपणे हिरावला , आता बाबा कधीच नाही भेटणार कधीच नाही 😭😭.... आता मला जगण्याला कुठलाच अर्थ नाही राहिला...."

रिया " प्लीज अस नको बोलू , होईल सगळ नीट एक ना एक दिवस तू अशीच खचली तर काहीच नाही होणार आता हिमतीने लढायची वेळ आली आहे.... हीच जीवनाची खरी परीक्षा आहे अस समज... आश्रमातील आहेत ना तुझ्यासोबत तुला इतकं प्रेम देऊ की आई बाबांची आठवणच नाही येणार..... "
त्या दोघींचं बोलण चालू होत की रक्षित मध्येच बोलायला लागला " सो जान तुझे बाबा तर गेले तुला सोडून आता एकटीच काही करू शकत नाही... मग तू माझ्यासोबत राहा मी तुला रणीसारख ठेवेल , पण माझी एक अट आहे तुला जे मी बोलेन ते करावं लागेल..."

रक्षित च बोलणं ऐकून रियाला राग आला आणि ती
रागातच रक्षित ला बोलायला लागली " झाल तुझ समाधान हेच हवं होतं ना तुला.... अरे तुला लाज नाही वाटत का अस वागताना , तीच आयुष्य तर तू कठीण केलं.... पण तुही तुझ्या नजरेत खूप वाईट आहेस ...... आई वडीलांना हीच्यापासून दूर करून तुला काय भेटणार आहे 😡😡..... आणखी काही राहील आहे का जे तू इथे उभा आहे , जाऊ शकतो तू इथून 🙏....."

रिया त्याला जायला सांगणार तर मध्येच आरोही बोलली " मी तयार आहे... जे तू बोलशील ते करायला...."
आरोही च अस बोलण रियाला धक्काच बसला...
रिया " आरोही...."
ती काही बोलणार आरोही ने तिला हातानेच गप्प राहायला सांगितलं...
आरोही " बोल काय करायचं आहे...."
रक्षक " आता कसं वठणीवर आली , अगोदरच माझं ऐकले असते तर ही वेळ आली नसती.... मी तुला नंतर सांगेन वेळ आल्यावर काय करायचं ते .... सो नंतर भेटू आपण बाय...."
आरोही " हम्म "
रिक्षित गेल्यावर रिया आरोही ला " तू वेडी आहेस का करतेय हे.... "

आरोही गूढपणे " नाही....😊 अगर सिधी उंगली से बात ना बने तो ऊंगली टेढ़ी करनी चाहिए 😄......"

रिया " म्हणजे तू काय करणार आहेस नक्की...."

आरोही " अभी तो शुरुआत होनी बाकी हैं आगे देखो क्या करती हूं में 😊😄😄..... आणि बाबांचा पण गैरसमज दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन....."
आरोही च अस पोसिटिव होण रियाला बर वाटल....

रिया " दॅट्स माय गूड गर्ल... असच राहा हिम्मत नको हारू मी आहे तुझ्यासोबत प्रत्येकवेळी ....... चल आता खूप लेट झाला आहे , आश्रमातील वाट बघत असतील आपली...."

आरोही " हो... चल लवकर...."

आरोही आणि रिया राहिलेलं सामान घेऊन दोघी आश्रमाच्या दिशेने निघून गेल्या....





जीवनश्री फार्महाऊस........
सूर्याची किरणे चेहऱ्यावर आल्याने निखिल ला जाग आली.... त्याने डोळे किलकीले करून घड्याळाकडे बघितल तर ऑफिस ला जायला फक्त एकच तास बाकी होता.... तो पटकन उठून पटापट आवरून खाली येऊन लवकर नाष्टा करत होता...

नीकची आई त्याला पटापट नाष्टा करताना बघून " बाळा हळू खा घश्यात अडकेल एवढी कसली घाई आहे तुला.... ऑफिस ला लेट गेलं तरी चालत तू मालक आहेस कंपनी चा..."

निखिल " आय नौ मॉम बॉसच जर असा लेट गेला तर एम्प्लाॅयी पण तसच वागतील मग कंपनी कशी पुढे जाईल 😊......"

निकची आई " किती समजुदार आहे माझं बाळ.... आय एम प्राउड ऑफ यू बेटा....😊"

निखिल " 😊 चल मॉम मी जातो खूप लेट होईल...."

आई " हो जा.... आणि लवकर घरी ये बाळा...."

निखिल " हो.... "

निखिल आईला बाय करून ऑफिस साठी निघून गेला.... आणि आई डायनिंग टेबलवर च्या नाष्ट्याची प्लेट किचन मध्ये ठेवून हॉल मध्ये पेपर वाचत बसल्या.....



आश्रमात.......
रिया आणि आरोही पार्टीच सामान घेऊन आश्रमात आल्या..... आरोही आल्या आल्या ऑफिस ला जाण्यासाठी तयार व्हायला आपल्या रूम मध्ये निघून गेली....कारण तिला ऑफिस ला जाण्यासाठी लेट होत होता.... तीच तिने पटकन आवरलं आणि नाष्टा करून जातच होती की रियाने तिला थांबवलं....

रिया " आरु आज जरा लवकर ये , माहीत आहे ना पार्टी आहे ती...."

आरोही " हो येईल लवकर... आणि हो मला काम जास्त असेल तर यायला लेट होऊ शकतो मग तुम्ही पार्टी करून घ्या 😊..... "

रिया " नाही... तू लवकर येण्याचा प्रयत्न कर लेट होत असेल तर आम्ही थांबतो.... तुझ्याशिवाय मज्जा नाही येणार पार्टीत...."

आरोही " हो प्रयत्न करते.... चल खूप लेट होईल नाहीतर येते..."

रिया " हो....आणि बाबांचा जास्त विचार नको करू , होईल सगळ नीट.... ओके...."

आरोही " हो....."

आरोही पण रियाला बाय बोलून ऑफिस साठी निघून गेली.....


ऑफिस मध्ये......
आरोही आपल्या डेस्क वर काम करत असताना तिच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा त्याचा फोनवरचा संवाद ऐकू येत होता.....
ती व्यक्ती " हो बाबा काळजी नका करू मी बरी आहे.... किती काळजी करता हो तुम्ही..."
त्या व्यक्तीच्या फोन मधल्या पलिकडची व्यक्ती " .............. "
ती व्यक्ती " हो माहिती मला मी तुमची लाडकी आहे , माझी खूप काळजी आहे ती..... चला बाबा मी फोन ठेवते नाही तर बॉस ओरडेल..... लव्ह यू बाबा 😘...."

त्या व्यक्तीच्या संवाद ऐकून आरोही ला आपल्या बाबांची आठवण येत होती.... सकाळी बाबा कसे वागले ते बघून तिला खूप रडायला ही येत होत पण कासबस तिने अश्रू थांबवले.... आणि शून्यात नजर ठेवून ती विचारात हरवली.....
ती इतकी विचारात हरवली की डेस्क वर चा फोन वाजतोय तेही समजल नाही....
वैतागून बाजूच्या डेस्क वरच्या व्यक्तीने तिला भानावर आणल.....
बाजूची व्यक्ती " अग फोन कधीपासूनचा वाजतोय तुझा बघ..."
आरोही भानावर येत " हो... बघते...."
आरोही फोन उचलून " हॅलो....."

क्रमशः

©® भाग्यश्री परब

🙋🙋🙋🙋....
यात काही चूक असल्यास माफी असावी.....🙏🙏🙏

😘 Stay tuned 😘
🤗 Stay happy 🤗
🥰 Take care 🥰

Rate & Review

Prakash Gonji

Prakash Gonji 2 years ago

I M

I M 2 years ago