Prema, your color is new ... - 14 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 14

प्रेमा तुझा रंग नवा... - 14

हॉस्पिटल मध्ये.....

निखिल चे डॅड आश्र्चर्यचकित होत " व्हॉट....😳..."

निखिल " हो पप्पा हे खरं आहे...."

निखिल चे डॅड " हे तू मला आधीच का नाही सांगितलं , लपवून का ठेवलं हे सत्य माझ्यापासून... एकदाही मला सांगण्याचा विचार नाही आला का..."

निखिल " सॉरी पप्पा मला तुम्हाला टेन्शन मध्ये नाही ठेवायचं होत... त्यादिवशी तुम्हाला हार्ट अटॅक आला होता तेव्हा किती घाबरलो होतो... परत तुम्हाला त्रास होताना नाही बघायचं आहे... आणि ते विश्वनाथ राव हे एक वर्ष झाले जेल मधून सुटलेत... आरोही पण यात फसली आहे..."

निखिल डॅड ना आतापर्यंत काय काय झाल होत ते सर्व सांगून टाकतो... आरोही बद्दल पण सांगतो , कसं त्यांनी तिला तिच्या वडिलांनपासून वेगळं केलं आणि ती कशी एकटी राहते , कुठे राहते सर्व सांगतो....

निखिल चे डॅड रागात " ओह नो कसले नीच लोक आहेत हे यांना तर कडक शिक्षा व्हायला पाहिजे... मी तर म्हणतो हे लोक या जगात नसलेलेच बरे..."

निखिल " पप्पा कंट्रोल होईल त्यांना शिक्षा , असं हातातून निसटून जाऊ नाही देणार मी... "

निखिल चे डॅड " हो...आणि त्या आरोही ची पण काळजी घे खूप गुणी मुलगी आहे ती... मला माहित आहे ती आपल्या कंपनी मध्ये काम करते , एम्प्लाॅयी ची काळजी घेणे हे आपल कर्तव्य आहे..."

निखिल " हो पप्पा मी सिक्युरिटी ठेवली आहे तिच्यासाठी आणि कंपनीतल्या प्रत्येक एम्प्लाॅयी वर पण नजर असेल... "

निखिल चे डॅड " गूड..."

निखिल " 😊..."

निखिल चे डॅड " चल झोप आता आम्ही आहोत बाजूच्या रूम मध्ये आणि लवकर बरे व्हा राजे..."

निखिल " हो..."

निखिल चे डॅड झोपण्यासाठी दुसऱ्या रूम मध्ये निघून जातात... इकडे निखिल ला पण गोळ्यांमुळे लवकर झोप लागते...

तीन चार दिवस असेच निघून निखिल हळू हळू रिकव्हर होत होता...
आज चार दिवसांनी निखिल ला डिस्चार्ज भेटणार असतो....

निखिल आणि त्याचे आई बाबा हॉस्पिटलच्या फॉर्मलिटी पूर्ण करून घरी येतात...

निखिल घरी आल्या आल्या " मॉम पप्पा मला उद्या ऑफिस ला जावं लागेल , खूप काम आहेत ती पूर्ण करायची..."

निखिल चे डॅड " अरे तू आताच बरा झाला आहेस अस लगेच कामाला आणखी त्रास होईल तुला , कामाचं मी बघतो काय ते तू आराम कर पूर्ण बर झाल्यावर च ये..."

निखिल ची मॉम " हो बाळा हे बरोबर बोलत आहेत , आरामाची गरज आहे तुला... "

निखिल " मॉम पप्पा मी एकदम ठीक आहे , मला काही होणार नाही आणि पप्पा तुम्ही सगळ बघणार तर तुम्हाला जास्त त्रास होईल प्लीज मी करतो ना हॅण्डल.... मला थोड्या दिवसांनी काश्मीर ला जायचं आहे तिथे एक मिटिंग आहे , आरोही पण येईल ती या प्रोजेक्ट मध्ये आहे... आणि मॉम पप्पा मला काही नाही होणार कारण रक्षक आहेत माझे रक्षन करण्यासाठी...."

निखिल चे डॅड " तू काही ऐकणार नाहीस , ठीक आहे जा...."

निखिल ची मॉम " अहो..."

निखिल चे डॅड " जाऊ दे त्याला ठीक आहे तो बऱ्यापैकी , त्याला काही झाल तर त्याचे रक्षक आहेतच..."

निखिल ची मॉम " ठीक आहे मग निक बाळा काळजी घे... "

निखिल " हो... थँक्यू पप्पा 🤗 थँक्यू मॉम 🤗...."

निखिल त्यांच्याशी बोलून आपल्या रूम मध्ये निघून जातो आणि ते दोघं पण आपल्या रूम मध्ये निघून जातात....

निखिल रूम मध्ये येताच आरोही ला कॉल करतो...

आरोही तीन चार रिंगने फोन उचलते...

आरोही " हॅलो.... "

निखिल " हॅलो.... तू फ्री आहेस , काम असेल तर मी नंतर करतो कॉल..."

आरोही " नाही फ्री आहे मी आताच काम झाल माझं बसले आता... "

निखिल " ठीक आहे , सो आरोही तीन चार दिवसांनी आपल्याला काश्मीर ला जायचं आहे माहीत आहे ना... तर तयारी करून ठेव..."

आरोही " ओके सर... बट सर तुम्ही आत्ताचं बरे झाला आहात अस अचानक जाण तुम्हाला त्रास होईल..."

निखिल " आरु ( ती एवढी काळजी करते म्हणून साहेब हवेत होते , त्या नकळत त्याचा तोंडून गोड नाव निघालं... नंतर लक्षात आल्यावर ओशाळून...) सॉरी आरोही मी एकदम ठीक आहे काळजी करण्यासारखं कारण नाही मॉम पप्पा ने पण परमिशन दिली आहे जायला... सो डोन्ट वरी रिलॅक्स..."

आरोही " ठीक आहे सर..."

निखिल " हो... आणि मला सर वैगरे नको बोलू ते ऑफिस मध्ये बोल बाहेर फ्रेंड आहोत तर नावाने बोल..."

आरोही " आता ऑफिस च कामाबद्दल बोलत आहोत..."

( या तीन चार दिवसात या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती , आरोही मध्ये मध्ये निखिल ला भेटायला यायची आणि हळू हळू या दोघांची मैत्री फुलू लागली... आता आरोही पण निखिल शी फ्रीली बोलत होती...)

निखिल " माझी फिरकी घेऊ नकोस मी तुझा बॉस आहे समजल..."

आरोही " आता तर तुम्ही स्वतः बोलत आहात , मग काय करावं या गोड , निरागस , सोज्वळ मुलीने..."

निखिल " ओह... किती तो भोळेपणा..."

आरोही " 🤭😂..."

निखिल " हसू नकोस तयारी करून ठेव शॉपिंग वैगरे पैसे कमी पडत असेल तर सांग एक मित्र म्हणून मदत करेल..."

आरोही " नको आहेत माझ्याकडे..."

निखिल " नक्की..."

आरोही " हो..."

निखिल " ओके... चल बाय मी रेस्ट करतो थोड..."

आरोही " हो... बाय टेक केअर..."

निखिल कॉल कट करून निद्रादेवीच्या अधीन होतो...

इकडे आरोही निखिल ने फोन ठेवल्यावर ती रिया ला भेटायला तिच्या रूम मध्ये जाते...

आरोही रूम मध्ये येताच...

रिया " या या लवकर उगवलात तुम्ही..."

आरोही " हं...मी झाड आहे का उगवायला , आणि आता उगवली म्हणजे मी रोपट होते का अगोदर..."

रिया तिला विचित्र पणे बघत " काय ? 😳 तुला दुसर कोणी नाही भेटल का डोकं खायला..."

आरोही " काय आहे ना मेरी जान बाकी सगळ्यांचे डोकं खाल्ले आहे फक्त तू बाकी होती , बाकीच्या डोक्यांची टेस्ट तर चांगली नव्हती... तर आता तुझी बघत होती पण मज्जा नाही आली एवढी..."

रिया " तू ना विचित्र आहेस... "

आरोही " हा... वो तो है , थँक्यू हा माझी स्तुती करण्यासाठी... मी त्याबदल्यात तुझी पण स्तुती केली असती पण आता नको चांगला मुहूर्त नाही सो चांगल्या मुहूर्ताची वाट बघ..."

रिया " 🤦 तुझ काही होऊ शकत नाही... "

आरोही " 🤭😁😅..."

रिया " अशीच खुश रहा... मग तयारी झाली का काश्मीरला जाण्याची..."

आरोही " ओ नो तुझ्याशी मस्ती करायच्या नादात विसरले बघ , हा तर मी इथे यासाठी आली होती माझ्या सोबत चल शॉपिंग ला प्लीज..."

रिया " अग रिक्वेस्ट काय करतेस मी तर तुझ्यासोबत कुठेही यायला तयार आहे , ओके पाच मिनिट थांब मी आले रेडी होऊन..."

आरोही " हो... मी बाहेर आहे लवकर ये रेडी होऊन..."

रिया " हो..."

आरोही बाहेर जाते आणि रिया तयार होण्यासाठी वाॅशरूम ला...


थोड्यावेळाने या दोघी मॉल मध्ये येतात आणि शॉपिंग करायला लागतात...

पण आरोही ने रिया च पक्क डोकं खाल्ल असत...

आरोही " हा नको दुसरा..."

रिया " आरु नक्की तुला कोणत्या प्रकारचे ड्रेस हवेत..."

आरोही " तुला आवडेल तो..."

रिया " मी दाखवत आहे तर तुला आवडत नाही आहे , मी काय करावं..."

आरोही " फक्त माझ्याकडे लक्ष दे...."

रिया " मी तुझ्याकडेच लक्ष देत आहे बाळा... हे बघ ( तिला एक लाँग ड्रेस दाखवत...) हे कसं आहे..."

आरोही " मला तिथे साफसफाई करायला नाही जायचं आहे... मला कंफर्टेबल वाटेल अस बघ...."

रिया " ओके..."

त्यांनी हो नाही करता करता शॉपिंग केली आणि नाष्टा वैगरे करून त्या आपल्या घरी म्हणजे आश्रमात गेल्या...

क्रमशः

©भाग्यश्री परब🥰Stay tuned 🥰
🤗 Stay happy 🤗
😘 Take care 😘

Rate & Review

Prakash Gonji

Prakash Gonji 2 years ago

I M

I M 2 years ago