Prema, your color is new ... - 20 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 20

प्रेमा तुझा रंग नवा... - 20

निखिल चेअर वर बसत मनात " आरु कुठे आहेस तू लवकर भेट , खूप आठवण येत आहे तुझी...."

मनात बोलत असताना नकळत तो भूतकाळात जातो.....

पुढे...

भूतकाळ....

निखिल आरोही आणि रिया ला सोडून घरी आलेला....

निखिल घरी पोहोचल्यावर फ्रेश होऊन जेवण जात नसतानाही थोडस जेवून आपल्या बेड रूम मध्ये येतो....

निखिल ला अस थोड जेऊन गेलेलं बघून त्याची आई सुमित्रा सारंग ला " निखिल ला काय झालं आहे , अस थोडस जेवून गेला तो...."

सारंग निखिल चे बाबा " नाही माहीत मला , घरी आल्या पासून त्याचा चेहरा उतरल्यासारख दिसत आहे...."

सुमित्रा " हो मलाही तसचं वाटत आहे...."

सारंग " काळजी नको करू बोलतो मी त्याच्याशी...."

सुमित्रा " हो...."

दोघ चर्चा करून , जेवून तेथून निघून जातात....

निखिल ची रूम...

निखिल विचार करत असताना त्याच्या दारावर टकटक होते , तसा निखिल भानावर येतो आणि दरवाज्याकडे बघतो तर त्याचे बाबा सारंग असतात....

निखिल " डॅड‌ तुम्ही या ना आत...."

सारंग " तुला काही काम असेल तर येतो...."

निखिल " नाही काम झाली माझी फ्री आहे मी , या ना आत काही झाल आहे का ?.... काही बोलायचं होत का तुम्हाला ?...."

सारंग आत येत निखिल च्या बाजूला बसत निखिल ला " हो , बोलायचं होत थोड... खर सांगत असशील तर बोलतो मी...."

निखिल " डॅड , मी आजपर्यंत कधी खोट बोललं आहे का ?.... "

सारंग " नाही बाळा कारण तुझ्या चेहऱ्यावरून तस वाटत आहे की तू सांगशील की नाही ते...."

निखिल " नाही डॅड अस काहीच नाही आहे.... तुम्हाला अस का वाटत आहे...."

सारंग भुई उंचावत " कारण तू घरी आल्यापासून तुझा चेहऱ्यावर बारा वाजले होते आणि जेवण पण थोड केलस..... बोल काय झाल आहे...."

निखिल नजर चोरत कनसून हसत " नाही अस काही झाल नाहीये...."

सारंग निखिल चा चेहरा आपल्याकडे वळवून " हेच माझ्या डोळ्यात बघून बोल...."

निखिल उसासा सोडत " डॅड...."

सारंग " हम , ऐकतोय मी सांग पटकन काय झालं....."

निखिल " आरोही...."

निखिल पुढे काही बोलणार तर सारंग त्याला मध्येच अडवून निखिल ला " आरोही तिला काय झाल ?.... बरी आहे ना ?.... माझ्याशी शेवटची बोलली तेव्हा तर चांगलीच होती.... तिला ताप वैगरे आला आहे का ?.... आजारी आहे का ?.... आजारी आहे तर तू इथे काय करत आहेस तुला तिच्या जवळ असायला पाहिजे ना असा कसा रे तू...."

सारंग ची एक्सप्रेस बडबड ऐकून निखिल ने डोक्यावरचं हात मारून घेतला....

निखिल सारंग चे दोन्ही खांदे पकडुन त्यांना हलवत " डॅड... डॅड.... भानावर या किती बडबड करत आहात , मला तरी बोलू द्या...."

सारंग भानवर येत " सॉरी बोल...."

निखिल " आरोही ला काही झाल नाही आहे , ती आजारी जरी असती तर मी आलोच नसतो घरी... ती मैत्रीण आहे काळजी आहे मला तिची.... तर झाल अस की...."

निखिल सारंग ला सगळ सांगतो की आरोहीचे बाबा तिच्या सोबत कस वागत आहे ते....

निखिल सगळ सांगून झाल्यावर सारंग ला " डॅड , पण मला काही तरी चुकीचं वाटत आहे.... जर ते आरोही चा तिरस्कार करत असेल तर ते जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी का होत , मी बघितल होत त्यांच्या डोळ्यात पाणी.... मला डाऊट येतोय ते काही तरी लपवत आहे , नाही तर कोणत्या मुलीचे वडील असे वागतील...."

सारंग " मग आता तेच सांगतील की नक्की काय आहे ते आरोही शी अस वागत आहे...."

निखिल " हम... हो...."

सारंग " मग काय ठरवलं आहेस तू ?...."

निखिल " मी उद्या च जाऊन त्यांना भेटणार आणि त्यांच्या कडून सगळ खर जाणून घेईन...."

सारंग " ठीक आहे... पण सांभाळून जबरदस्ती नको करू...."

निखिल " हो...."

सारंग " चल मी जातो आता झोपायला.... तू नीट जेवलास नाही आहे त्यामुळे मी दूध मागवलं आहे ते पिऊन घे आणि टेन्शन न घेता शांत झोप...."

निखिल " हो डॅड.... गूड नाईट डॅड...."

सारंग निखिल च्या डोक्यावरून हात फिरवत " गूड नाईट बाळा...."

सारंग निखिल ला गूड नाईट विष करत तिथून निघून जातात...

सारंग गेल्यावर निखिल मनात " आरोही ला तिच्या वडिलांचं प्रेम मिळवून द्यायला हवं , खूप हर्ट होत आहे ती... आरोही हसताना च छान दिसते... ती जागी असेल का आता कॉल करू ( निखिल फोन हातात घेत नंबर डायल करणार तर....) नको ती नाराज आहे अश्या मध्ये मोकळ नाही बोलणार.... उद्या करतो सकाळीच कॉल... तोपर्यंत सावरेल ती...."

निखिल मनात बोलून , अंगावर ब्लँकेट घेऊन झोपी जातो....




सकाळी अलार्म च्या आवाजाने त्याला जाग येते....

निखिल उठून जिम मध्ये जातो , नंतर थोड्या वेळाने जिम मधून आल्यावर फ्रेश होण्यासाठी निघून जातो....

फ्रेश होऊन आपली तयारी करून मोबाईल हातात घेत मनात " मे बी आरोही आता सावरली असेल करतो कॉल..."

निखिल नंबर डायल करत आरोही ला कॉल लावतो....


इथे अर्चना आश्रम.....

मोबाईल रिंग च्या आवाजाने आरोही ची झोप मोड होते....

आरोही थोडी जागी होऊन टेबलवर असलेला फोन हातात घेऊन नंबर न बघता फोन उचलते....

आरोही फोन उचलल्यावर झोपेतच " हॅलो , कोण ?...."

पलीकडून निखिल कपाळावर आठ्या पाडत " हॅलो , आरोही मी निखिल... आर यू ओके ना ? , कालचा परिणाम डोक्यावर तर नाही ना झाल , ठीक नसेल तर डॉक्टर कडे जाऊ मी येतो आता लगेच आश्रमात...."

निखिल च्या आवाजाने आरोही भानावर येते आणि मग फोन वरच बघत , त्याच बोलण ऐकून डोक्यावर च हात मारते.... पण तिला निखिल च बोलण ऐकून खूप च हसू येत होत....

आरोही हसू दाबत " हो निखिल साहेब मी काही विसरले वैगरे नाही आणि नाही कालचा परिणाम डोक्यावर झाला आहे.... तुमची काळजी अती होतंय हा...."

निखिल हसत च " अती काळजी तर घ्यावीच लागेल , काय करणार एकुलती एक मैत्रीण आहे.... "

निखिल ने अस बोलल्यावर आरोही जोर जोरात हसायला लागली....

आरोही " काहीही..."

आरोही सोबत निखिल ही हसण्यात शामिल झाला....

हसून झाल्यावर निखिल सिरीयस होत आरोही ला " आरोही ते काल तुझे बाबा , तू ठीक आहेस ना ?.... सॉरी ते माझ्यामुळे...."

आरोही " निखिल तुम्ही का सॉरी बोलत आहात तुमची चुक नाही आहे...मला रिया ने समजावलं तिच्या मुळे आज फ्रेश वाटत आहे.... सांगते मी रिया काय बोलली ते...."


फ्लॅशबॅक.....

रिया आणि आरोही आश्रमात आल्यावर , आरोही सरळ धावत च आपल्या रूम मध्ये निघून गेली , तिच्या पाठोपाठ रिया पण निघून गेली.....

रिया रूम मध्ये आल्यावर बघते तर आरोही बेड च्या एका टोकाला पाय दुमडून त्यात तोंड खुपसून रडत होती....

रिया तिच्या जवळ जात बाजूला बसून तिच्या डोक्यावर हात फिरवू लागली.....

हाताच्या स्पर्शाने आरोही ने वर बघितल तर रिया होती , तिला बघून आरोही लगेच रिया ला मीठी मारत आणखी रडू लागली.... रिया तिला रडू देत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती....

थोड्या वेळाने आरोही रडायची बंद झाली....

रिया तिचं रडायचं बंद झालेलं बघून तिला " झाल रडून...."

आरोही डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.....

आरोही पूर्ण शांत झालेलं बघून रिया तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत " आरोही मला माहित आहे तू खूप दुखावली आहेस , तू अस रडत बसशील कमजोर पडशील तर कशी लढणार या संकटांना , त्यासाठी बक्कळ हिम्मत पाहिजे हो ना.... आय नो तुला तुझ्या बाबांचं बोलण ऐकुन खूप वाईट वाटल आहे , मनाला लागलं आहे.... पण अस रडायचं नसतं कंबीरपणे लढायच असत.... मला स्ट्रोंग मैत्रीण च खूप आवडते अशी रडकी नाही.... काय समजल का....."

रिया च्या बोलण्याने आरोही थोडीफार सावरली होती....

तिने मनाशीच निर्णय घेतला की काहीही झालं तरी रडायच नाही....

आरोही चेहऱ्यावर गोड हास्य आणत " हो समजल... थँक्यू रिया... सॉरी माझ्यामुळे त्रास झाला...."

रिया " अग कसला त्रास आणि सॉरी नको बोलू.... बस तू एकदम हॅप्पी रहा एवढीच इच्छा आहे...."

आरोही " हो...."

रिया " चल आता थोड जेवून घे , नंतर झोप..."

आरोही " हो... मी फ्रेश होऊन येते जेवायला...."

रिया " हो...."

थोड्यावेळाने दोघी फ्रेश होऊन जेवायला येतात आणि जेवून आपापल्या रूम मध्ये निघून जातात... जास्त थकल्यामुळे लगेच झोपी जातात.....



फ्लॅशबॅक एंड....

आरोही च बोलून झाल्यावर निखिल " हो आरोही रिया बरोबर बोलत आहे.... आरोही स्ट्रोंग च परफेक्ट वाटते अस रडताना नाही...."

आरोही " हम...."

निखिल " हम चल भेटू नंतर आता मला एका कामासाठी जायचं आहे.... तिथून च ऑफिस ला येणार...."

आरोही " हो..."

निखिल " ओके , बाय...."

आरोही " बाय...."

दोघही फोन कट करून आपापल्या कामाला निघून जातात.....




निखिल एका बंगल्या समोर येऊन कार मधून उतरून उभा राहतो आणि डोळ्यावर गॉगल चडवून आत शिरतो....

निखिल दाराची बेल वाजवल्यावर एक नोकर दार उघडतो....

नोकर दार उघडल्यावर समोर निखिल ला बघत " कोण पाहिजे तुम्हाला..."

निखिल " मला मिस्टर सपकाळ यांना भेटायचं आहे..."

नोकर " ठीक आहे... आत या ( निखिल आत घेत दार बंद करून त्याला हॉल मध्ये नेत सोफ्याकडे बोट दाखवत...) तुम्ही बसा इथे मी बोलवतो साहेबांना...."

निखिल सोफ्यावर बसत " हा..."

नोकर तिथून निघून मिस्टर सपकाळ यांना बोळवण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये निघून जातो....


थोड्या वेळाने मिस्टर सपकाळ खाली येतात आणि तिथे निखिल बघून त्यांना अनेक प्रश्न पडतात , पण ते न दाखवता त्याच्याशी रागाने बघत " तू इथे काय करत आहेस...."

निखिल निर्विकारपणे त्यांच्या नजरेला नजर देत त्यांना " मी मुद्याच बोलतो , तुम्ही काही तरी लपवत आहात... कारण काल तुम्ही आरोही ला सूनावून जात असताना मी तुमच्या डोळ्यातून पाणी आलेलं बघितल आहे...."

निखिल च बोलण ऐकून त्यांना घाम पुटतो ते नजर चोरत निखिल ला " नाही अस काहीच नाही आहे...."

निखिल " काका , खर काय ते सांगा... आरोही खूपच दुखावली आहे तुमच्या अश्या वागण्याने...."

मिस्टर सपकाळ ना खर बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो त्यामुळे ते खर सांगतात " त्यादिवशी....."



वर्तमानकाळ....

निखिल कसल्याच्या आवाजाने भानावर येतो आणि घड्याळात बघतो तर संध्याकाळ झाली असते.....

तो ऑफिस च सगळ आवरून घरी निघतो.....





इथे रिया आणि आरोही असतात त्या खोलीत.....

सगळे काम करत असताना अचानक एक माणूस आत येत ओरडतो " लवकर लवकर हात चालवा , किती हळू हळू करत आहात...."

तिथे असलेली कोणी तरी एक मुलगी जोरात ओरडून "आम्ही रोबोट नाही आहोत जे लवकर काम करायला..."


तो माणूस चिडत " कोण बोललं एवढी हिम्मत कशी झाली उलट बोलायची समोर या नाही तर चटणी करेन..."

त्यातली दुसरी मुलगी ओरडून " तुम्ही चटणी करणार मग घ्या ऑर्डर....
जवस चटणी
कारल्याची चटणी
शेंगदाणा चटणी
तिळाची चटणी
आंब्याची , कैरीची चटणी
लसूण खोबरे चटणी
दह्याची चटणी..... हो आणि सोबत भाकरी , चपाती आणा आम्हाला पुरेल एवढी...."
( अजुन कोणती चटणी पाहिजे सांगा यांना... 🤭😂😂)

त्या मुलीचं बोलण ऐकून त्या माणसाचं डोकं फिरल होत , तस त्याने रागातच आपल्याकडची बंदूक काढून एक गोळी हवेत चालवली....

नंतर तो काही बोलणार तेवढ्यात त्याच्या डोक्यावर मागून कोणी तरी वार केला तस खाली बेशुद्ध होऊन पडला.....


क्रमशः

©®भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी....

🤗 Stay happy 🤗
🥰 Take care 🥰

Rate & Review

Be the first to write a Review!