Datla this suspicion was terrible ... - 3 in Marathi Women Focused by Bhagyashree Parab books and stories PDF | दाटला हा संशय भीषण होता... - 3

दाटला हा संशय भीषण होता... - 3

कल्पना रूम मध्ये येते आणि समोरचं दृश्य बघून घाबरून ओरडते...

कल्पना " अहो... काय करताय वेडे आहात का तुम्ही..."


विश्वास खिडकी बाहेर बघत आणि साईड ला भिंतीवर हाताच्या मुठी आवळून जोरजोरात मारत होते...


इकडे कल्पना यांनी आवाज दिला तरी त्यांचं लक्ष नव्हत... शेवटी न राहवून कल्पना त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांना थांबवून बेड वर बसवलं , सोबत त्याही त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या...


कल्पना त्यांचा हात बघत " अहो , काय करत होता तुम्ही अस कोण भिंतीवर मारत जोरजोरात हात बघा कसं झाल आहे ते..."


विश्वास " मग काय करू मी आध्या ला ओरडाव वाटत नाही तरी ती अस काही करते मग मला राग येतो आणि ते कंट्रोल करता पण येत नाही... "


कल्पना " तिची काही चूक नव्हती ती खरच विसरली होती..."


विश्वास " ती विसरली नव्हती मुद्दाम केलं आहे तिने अभ्यास न करावा म्हणून..."


कल्पना " तुम्हाला विश्वास आहे की नाही तिच्यावर..."


विश्वास " यात विश्वास कुठून आल मध्ये..."


कल्पना " अस का बोलत आहात आतापर्यंत बघत आला आहात कधी अशी चूक केली नव्हती आध्या ने , खोटं पण कधी बोललं नव्हत... मग आज असा अविश्वास का ?..."


विश्वास " नाटक असेल ते..."


विश्वास च अस बोलण कल्पना यांना खूपच राग आला...


कल्पना रागात " हे बघा तुम्हाला आपल्या मुलीला प्रेमच द्यायचं नाही तर तिला तसचं मारून टाकायचं होत ना उगाच कशाला तिला मानसिक त्रास देत आहात तसही ती जिवंतपणी मरतेच आहे ती त्यापेक्षा आधीच तिला मारायचा होत... आणि हे मध्येच प्रेम दाखवता , राग काढून झाला की भिंतीवर हात मारता हे खरच प्रेम आहे का तुमचं की नाटक आहे बोला... ( हळू हळू त्यांचा आवाज कमी होतो आणि त्या विश्वास ना समजावून सांगतात...) अहो तुम्ही अजुन रागात आहात म्हणून तोंडात येईल ते बोलत आहात , मी विनंती करते तिला अस मेलेले जीवन नका देऊ हो... तिला समजून घ्या..."कल्पना आध्या बद्दल सांगताना त्यांना भरून येत...

विश्वास कल्पना च काहीही न ऐकता अंगावर पांघरून घेऊन झोपून जातात आणि कल्पना हताश होऊन तिथेच बसून ते झोपलेल्या विश्वास यांना बघतच राहतात...थोड्यावेळाने भानावर येत कल्पना आपल्या जागी येऊन झोपते पण त्यांना आध्या च्या विचाराने झोप काही येत नाही...कल्पना वरच्या भिंतीला एकटक बघत " आध्या मला माफ कर मी काही करू शकले नाही , केलं जरी असतं तर प्रकरण मारण्या पर्यंत गेलं असत... मला माहिती तुझे बाबा खूप प्रेम करतात तुझ्यावर , त्यांना भीती वाटते की तू बिघडून काही उलटसुलट करू नये पण त्यांना कोण सांगणार की राग , हक्क दाखवावा पण लिमिट मध्ये लिमिटच्या बाहेर गेलं की प्रकरण खूप गंभीर होत ते आपल्या माणसात आपणच त्यांच्या मनातून निघून जातो... तेच तुझे बाबा समजून घेत नाही आहे , त्यांना समजत असून पण समजून घ्यायचं नाही आहे अस दिसतय... एक दिवस असा येईल की त्यांना त्यांची चूक समजेल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल... ती एकटी आहे तिला भीती वाटत असेल खूप आता काय करू... मी दार उघडलं तर यांना समजल तर हे आध्या ला माहीत नाही काय करतील आणखी कोणती शिक्षा देईल... "

आध्या एकटी घाबरेल म्हणून त्या रडत होत्या त्यांना काहीच करता येत नव्हतं , त्या हतबल झालेल्या...

इथे विश्वास एका कुशीवर झोपून मनात " मी खरच आध्या सोबत चुकीचं वागतोय का... मी बघितल तिच्या डोळ्यात ती खोटं नाही बोलत पण मला विश्वास का बसत नाही आहे , काहीच समजत नाहीये... मला भीती वाटते की ती काही चुकीचं वागू नये , करू नये म्हणून मी प्रेम कमी राग जास्त करतो तिच्यावर... नाही मी नाही काही चुकीचं वागत बरोबर वागतोय तिच्याशी..."

( अहो विश्वासराव तुमचं अस झालंय तुम्हाला कळतंय पण वळत नाहीये... बरोबर ना...)विश्वास आणि कल्पना दोघे आध्या चा विचार करता करता कधी तरी मध्यरात्री झोपून जातात...
इकडे आध्या तिला रूम मध्ये बंद केल्यापासून च रडत होती आणि भीती पण खूप वाटत होती...


तरी ती कसबस आपला अभ्यास पूर्ण करत होती...


आध्या ला एकट राहण्याची खूप भीती वाटायची सवयच झालेली तिला या भीतीची... ती शाळेत जाताना येताना , आणखी कुठे जायचं असेल तर कोणी ना कोणी तिच्या सोबत यायचं हे तिच्या आई , बाबा , भाऊ सगळ्यांना माहीत होत तरी तिच्या बाबांनी तिला एकट ठेवलं होतं... रात्री ती सगळे झोपले याची खात्री करून कल्पेशच्या रूम मध्ये जावून झोपायच्या आणि मग सकाळ झाल्यावर आपल्या रूम मध्ये येऊन दरवाजा उघडा ठेऊनच झोपून जायची त्यामुळे कोणाला काही समजायचं नाही , त्यांना वाटायचं की तिला भीती वाटते म्हणून ती दरवाजा उघडा ठेऊनच झोपते...
थोड्यावेळातच तिचा अभ्यास पूर्ण होतो , नंतर ती सगळ आवरून बेडवर एका टोकाला पायाला पोटाशी पकडुन रडत बसते....


आध्या रडत स्वतःशीच " का बाबा का मी इतकी वाईट आहे का जी एवढी मोठी शिक्षा दिली तुम्हाला माहीत असून पण की मला एकटेपणाची भीती वाटते... अस वाईट का वागलात माझ्याशी का ? का ? का ?... मी... मी... तुम्हाला वाईट नाही समजत आहे , तुम्ही वाईट वागलात म्हणून माझं तुमच्यावर च प्रेम कमी नाही झाल आणि कधी होणारही नाही खूप प्रेम आहे तुमच्यावर माझं... माझी फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही मला समजून घ्यावं बस... माझ्यावर अविश्वास दाखवला म्हणून माझ्या मनातून तुम्ही उतरलात अस नाही... मी समजू शकते की तुम्हाला भीती वाटते मी काही उलट सुलट करून नये , पण एकदा तरी समजून घ्यायचं होत... फक्त एकदा तरी..."


आध्या ला खूप मोठ्या रडावसं , ओरडावस वाटत होत तरी तिने कसतरी रोखल आणि हळू हळू हुंदके देत रडत होती....


रडत रडत कधी तरी मध्यरात्री एकटीच घाबरत झोपून गेली...
क्रमशः

© भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी...

Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 11 months ago