त्या व्यक्तीच्या ओरडण्याने आध्या दचकते आणि समोर बघते तर तिच्या चेहऱ्यावर भीती आणि शॉक दोन्ही दिसत होते...
कोणी उत्तर देत नाही म्हणून ती व्यक्ती आणखी रागात " मी म्हंटल काय चालू आहे... ( आध्या कडे बघत ) हा कोण आहे मुलगा..."
आध्या विश्वास ना एवढ्या रागात बघून तिच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता...
पण त्या मुलाला मध्येच डिस्टर्ब केलेलं बघून तोही त्यांना रागात बघत होता....
तो मुलगा " तुम्हाला दिसत नाही का गर्लफ्रेंड शी बोलतोय ते कशाला मध्ये मध्ये येताय आमच्या..."
आध्या त्याच्या अश्या बोलल्याने भलतीच शॉक झाली आणि तिच्या बाबांकडे बघू लागली जे की त्यांच्या चेहरा पूर्ण रागाने लाल झालेला , हाताच्या मुठी आवळल्या होत्या... अस वाटत होत की ज्वालामुखी कधीही बरसेल... आता आध्या च काही खर नव्हत , तिला देव पण वाचवू शकणार नाही असे दिसत होत....
विश्वास अजूनही तिथेच उभे आहेत दिसल्यावर तो मुलगा अजुन भडकला पण त्याच्या रागापुढे विश्वास किती रागात आहेत हे त्याला दिसल , कोणीतरी त्याला डिस्टर्ब केलेलं बघून तो रागावलेला....
तो मुलगा आणखी भडकत " हो आता काय आमचा रोमान्स बघूनच जाणार आहात का जावा ना इथून..."
त्या मुलाने विश्वास ना उद्धट पणे बोललेल बघून त्यांनी रागातच त्याच्या दोन तीन कानाखाली मारली...
विश्वास " तुला लाज नाही वाटत का अस बोलताना... तुझ्या आईवडिलांनी हेच शिकवलं का ? , शाळेत हेच शिकवलं जात का तुमच्या ?... आता जास्त जीभ चालवली ना तर सरळ जेल मध्ये पाठवेन समजल..."
विश्वास ना इतकं भडकलेल बघून तो जेल च नाव ऐकून घाबरला , इथून निघून जाणं च शहाणपणा आहे अस समजून तो निघून....
आतापर्यंत त्या मुलाला त्यांच्या बोलण्यावरून आणि तिच्या हावभावावरून समजल होत की ते तिचे वडील आहे...
पण जाताना त्याच्या अंगातली मस्ती काही निघाली नव्हती...
तो मुलगा जाता जाता आध्या ला " बाय बेबी आपण उद्या भेटू हा आता अस वाटत आहे की माझे सासरेबुवा खूप रागावले आहेत... त्यांचा राग शांत झाला भेटू हा मग आपण..."
आध्या मनात " ये मूर्खा , नालायक , बेशरम कुठला तू भेट नंतर अशी शिक्षा देईल ना की कोणत्याही मुलींना बोलताना घाबरशील तू... "
खर तर आध्या बाबांचा राग पाहून थरथर कापत होती... आणि सोबत त्या मुलाचाही खूप राग आलेला तिला , कारण त्याने बाबांच्या मनात गैरसमज निर्माण करून ठेवले होते...
विश्वास रागात शांत थंड आवाजात आध्या ला " आध्या काय चालू आहे हे समजेल का ?..."
आध्या अडखळत " ब... बाबा... त... तुम... तुमचा..."
आध्या ला मध्येच तोडत विश्वास " काय त त प प लावल आहे नीट सांग..."
अध्या घाबरत पटकन " तुमचा गैरसमज झाला आहे बाबा तुम्ही समजत आहात तस काही नाही आहे..."
विश्वास " व्वा अजुन खोट..."
आध्या रडवेल्या आवाजात " बाबा..."
ती पुढे काही बोलणार विश्वास हातानेच तिला थांबवतात आणि एका रिक्षाला थांबवून तिला आत बसायला सांगतात , पण आध्या तिथेच त्यांना एकटक बघत उभी असते...
ती हालचाल करत नाही म्हणून विश्वास तिला ओरडत " आध्या ऐकू येत नाही आहे का बस म्हंटल आत की बसण्याच निमंत्रण देऊ..."
आध्या त्यांच्या आवाजाने भानावर येत पटकन रिक्षाच्या आत जाऊन बसते...
घर येई पर्यंत कोणी कोणाशी बोलत नाही....
आध्या आणि विश्वास थोड्यावेळाने घरी पोहोचतात...
घरी आल्यावर कल्पना दोघांना एकत्र बघून आणि आध्या च्या चेहऱ्यावरून अस वाटत होत की काहीतरी चुकीचं घडल आहे...
जेवण होईपर्यंत कोणी कोणाशी बोलत नव्हत...
जेवण झाल्यावर बाबा काही बोलत नाही म्हणून आध्या त्यांना " बाबा मी खरच बोलतेय अस काहीच नाही आहे तोच मला त्रास देत होता... तुमचा गैरसमज झाला आहे..."
विश्वास शांतपणे " लाज वाटत आहे मला आता की माझी मुलगी येवढं खोट बोलतेय ते... मला आता काहीच एक्स्पेलेशन नकोय बस झाल आता तुझ खोट पुराण..."
आध्या " बाबा माझं ऐकुन तरी घ्या प्लीज..."
विश्वास रागात मोठ्याने ओरडत " मी म्हंटल ना मला आता काही ऐकायचं नाही आहे...."
ते बोलतच होते की अचानक ते खाली पडले...
आध्या ओरडत " बाबा..."
( विश्वासराव आपल्या मुलीवर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली आहे खूप मोठी...)
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी...
यात काही गोष्टी निगेटिव्ह वाटत असेल तुम्हाला... पण सगळ्याच मुली लकी नसतात ना , माणूस समजून न घेणे , विश्वास न ठेवणे , ऐकुन न घेणे इथेच तर चुकतो त्यामुळे त्याला समजत नाही की आपण नक्की कसे वागत आहोत...