आध्या तोंडावर हात ठेवून रडत असते....
आध्या अशी रडत असताना तिथे बाजूच्या बाकावर बसलेली एक आजी तिच्या बाजूला जवळ येऊन बसते आणि मायेने आध्या च्या डोक्यावरून हात फिरवते...
ती आजी प्रेमाने आध्या ला " बाळा काय झाल रडत का आहेस... "
तिच्या जवळ कोणी तरी आलेलं पाहून ती लगेच स्वताला सावरत डोळे पुसत त्यांना बघते , त्या आजी प्रेमाने तिला बघत होत्या , त्यांचा प्रेमळ आवाजात माया लपलेली होती... आध्या ने कधी आजीच प्रेम अनुभवलं नव्हत आजोबा तर ती यायच्या आधीच वर निघून गेले होते... ती आज पहिल्यांदा आजीच प्रेम अनुभवत होती...
आध्या त्यांना बघत " काही नाही आजी ते बाबांना बर वाटत नाही आहे... सगळ माझ्यामुळे झाल..."
आजी " अग रडतेस कशाला अस रडून काही ठीक होणार आहे का होतील बाबा बरे... आणि तुझ्यामुळे झाल आहे अस वाटत आहे तुला त्यामागे वेळ , परिस्थिती तशी असते म्हणून अश्या गोष्टी घडत असतात... स्वतःच चुकत नसेल तर स्वताला बरोबर करून दाखवायची हिम्मत ठेवायची यात कोणतीही संकट आले तरी हार न मानता पुढे जायचं आणि चुकत असेल तर ती चूक स्वीकारून माफी मागायची , ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा परत ती चूक होऊ नये याची काळजी घ्यायची समजल..."
आध्या " हो आजी समजलं मी आता हार न मानता पुढे जाईन... पण आजी आपलीच माणसं आपलाच तिरस्कार करत असेल तर आपण चुकीचे नसून पण त्यांच्या सारखं वागावं लागतं , त्यांची बोलणी ऐकावी लागते , टोमणे ऐकावे लागतात , आणि आपणच त्यांच्याविरुध्द उभ राहून आपल्याला लढावं लागतं..."
आजी हसतच तिला " मला माहित आपल्याच माणसाविरूद्ध उभ राहण अवघड आहे.... आपली चूक नसताना स्वताला निर्दोष ठरवायचं गरजेचं आहे नाही तर एकदा गैरसमज निर्माण झाला की पुढच्या गोष्टीत आणखी गैरसमज निर्माण होतो आणि त्यामुळे नात्यात दुरावा आणखी निर्माण होतो..."
आध्या " समोरचा जर कितीही समजावलं समजूनच घेत नसेल , आपल स्पष्टीकरण ऐकुन घेत नसेल तर ?..."
आजी " बाळा आपल्या परीने जितकं समजवता येत तितकं समजावण्याचा प्रयत्न करायचा , राहिली गोष्ट ऐकून न घेण्याची जेव्हा त्याला ऐकावस वाटेल तेव्हा तो ऐकुन घेईल किंवा तो ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नसेल , पण जर त्याला विश्वास असेल की हा अशी चूक नाही करू शकत , वाईट किंवा चुकीची गोष्ट नाही करू शकत तर तो नम्रपणे त्या गोष्टीचा शोध घेईल... आणि विश्वास च नसेल तर त्याची हीच चूक असेल विश्वास न ठेवण्याची , जेव्हा त्याला खर कळेल तेव्हा त्याला पश्र्चाताप होईल...."
आध्या " हम समजल आजी , धन्यवाद आजी समजावून सांगण्यासाठी..."
आजी " अग बाळा त्यात धन्यवाद काय तू माझी नाती सारखी आहेस मग आपल्या नातीला धीर देत होते बस..."
आजींनी आपली नाती बोलल्यामुळे आध्या ला भरून आल आणि लगेच त्यांना रडतच मीठी मारली....
आजी तिला मिठीत घेत " रडतेस काय... काय झालं एवढ रडायला..."
आध्या रडतच त्यांना सांगते " मला पण आजी आहे पण ती माझा नेहमी तिरस्कार करत असते... मला कधी आजीच्या प्रेमाचं अनुभव नाही झाला आई चे आई बाबा तर मी झाली तेव्हाच कायमच जग सोडून गेले , त्यांचा एका ॲक्सिडन्ट मध्ये मृत्यू झाला अस मला आईने सांगितलं तेव्हा बाबांच्या आईने माझा तिरस्कार केला की हिच्या येण्यामुळे त्यांचा असा मृत्यू झाला आहे... बाबांचे बाबा तर मी यायच्या अगोदर च त्यांचा मृत्यू झाला होता... मला आजोबांचे प्रेम तर नाही भेटले पण आजी असून पण आजीच प्रेम नाही भेटल... तुम्ही आता मला प्रेमाने हाक मारली तेव्हा मला खूप भरून आल होत आणि आता बोललात माझी नाती म्हणून मला खूप रडू आल खूप आनंद झाला , अस वाटल की जगातलं सगळ्यात मोठे आनंद भेटल आहे..."
आजी तिला हसून " आता पासून तू माझी नात आणि मी तुझी आजी बर का...आणि इतकं रडायचं नसतं माझी नात तर हिम्मत वाली आहे हो ना..."
आध्या त्यांचा मिठीतून बाहेर येत रडून हसतच " रडत नाही आनंदाश्रु आहेत..."
आजी " हो... मग आता तर मला भेटायला पण यायची दर रविवारी समजल आणि माझा नंबर घे पहिल्यांदा येशील ना मग माझं घर कस शोधशील , तुला तर घर माहितीच नाही ना मग नंबर घे येणार तेव्हा मला फोन कर हा..."
आध्या " हो आजी मी येईन भेटायला द्या नंबर..."
आजी " कसं घेशील कागद पेन तरी आण..."
आध्या " हो आणते थांबा..."
अस बोलून आध्या पळतच कुठेतरी जाते आणि तिथल्या स्टाफला रिक्वेस्ट करून एक कागदाचा तुकडा, पेन घेऊन येते...
आध्या आजीच्या जवळ बसत " सांगा आजी नंबर..."
आजी " हो... घे..."
आजी नंबर सांगतात आणि आध्या नंबर लिहिते....
आजी " चल बाळा मला निघाव लागेल माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं असेल त्याला आता आय. सी. यू मध्ये ठेवलं असेल...."
आजीच ऐकुन आध्या शॉक मध्येच डोळे मोठे करत " काय... तुमच्या मुलाचं ऑपरेशन आणि तुम्ही इथे माझ्याजवळ..."
आजी " अग इतकं डोळे मोठे करायला काय झाल हा..."
आध्या भानावर येत " त... ते...ते..."
आजी तिला मध्येच तोडत " समजल मला तुझं प्रश्न... माझ्या मुलाचं ऑपरेशन चालू असताना मी त्याच्याजवळ न राहता इथे तुझ्याजवळ तुला समजावत होते ?.... असच ना "
यावर आध्या मान डोलवते...
आजी " मला पूर्ण विश्वास होता की माझ्या मुलाला काही होणार नाही म्हणून मी सकारात्मक विचार करत होते भीती तर वाटत होती मला कुठेतरी , पण माणसाला शेवटी जावच लागत ना जग सोडून , तो गेला तरी पाच सहा महिने त्याच्या आठवणीत जाईल मग पाहिल्यासारखं होईल , पण त्याला विसरता नाही येणार कारण तो व्यक्ती खूपच जवळचा असतो , त्याची आठवण आली तर आपण त्याच्या अठवणीला उजाळा देऊन हसतमुख राहायचं... मी बसलेले होते तर सहज लक्ष तुझ्यावर गेलं आणि तुला अस रडताना पाहिले मला राहवले नाही , मग मी आली तुझ्याकडे..."
आजी च्या अश्या बोलण्यावर आध्या गोड हसली...
तेवढ्यात तिथे आजीला शोधत एक नर्स आली...
नर्स हसत " आजी तुमच्या मुलाचं ऑपरेशन सक्सेसफूल झालं आहे... ते आता एकदम ठीक आहे , त्यांना आय.सी.यू मध्ये ठेवलं आहे तुम्ही भेटू शकता त्यांना..."
आजी " हो , येते मी..."
नर्स " हो..."
एवढ बोलून नर्स निघून जाते...
आजी आध्या ला " चल बाळा येते मी भेटू मग नंतर..."
आध्या गोड हसत " हो..."
आजी जातच असते की काहीतरी आठवत मध्येच थांबते...
आजी वळून आध्या ला बघत " बाळा तुझ नाव विचारायचं विसरूनच गेले..."
आध्या " आजी माझं नाव आध्या शिंदे आहे..."
आजी " खूप गोड नाव आहे आध्या बाळा तुझ... चल येते मी आता..."
आजी निघून जाते आणि आध्या त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहते , नंतर भानावर येत ती तिथल्या बाकावर जाऊन बसते...
थोड्या वेळाने तिची आई बाबांना जेवण देऊन बाहेर येते , नंतर त्या दोघी घरी जायला निघतात...
आध्या आणि कल्पना घरी पोहोचतात , दोघी बोलत बोलत हसत घराच्या आत शिरतात...
घरात आल्यावर त्यांचं लक्ष समोर जात , समोर बघतात तर त्या घाबरतात....
कारण समोर उभी असलेली एक व्यक्ती त्यांच्या कडे रागाने बघत होती....
क्रमशः
यात काही चूक असल्यास माफी असावी....