Datla, this suspicion was terrible ... - 11 in Marathi Women Focused by Bhagyashree Parab books and stories PDF | दाटला हा संशय भीषण होता... - ११

दाटला हा संशय भीषण होता... - ११

कल्पना आणि आध्या समोरच्या व्यक्तीला बघून आवंढा गिळतात...


समोरील व्यक्ती त्या दोघींना बघून रागाने धुसपुसत असते...


आध्या मनात " आध्या बेटा आता आपल काही खर नाही हे ज्वालामुखी लवकर शांत नाही होणार अस दिसत आहे... चला आध्या बाळा तयारी करा मनाची सहन करण्याची...."


आध्या हळू आवाजात कल्पना ला " आई भूत सोडून गेलं वाटत यांना..."


तिच बोलण ऐकून कल्पना तिला रागात बघत हळू आवाजात " आध्या शांत बस..."


आईला अस रागात बघून आध्या शांत बसते...


यांची खुसुरपुसुर चाललेली बघून रागात समोरची व्यक्ती " काय खुसूरपुसुर चाललीय मयलेकीची..."


त्यांच्या आवाजाने त्या दोघी दचकतात....


कल्पना शब्दांची जुळवाजुळव करून " काही नाही आई.... तुम्ही अस अचानक आलात आम्हाला सांगायचं होत लवकर आलो असतो आम्ही...."


गीता आजी " का मी नाही येऊ शकत इथे , आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही उपकार केलेत का.... आली मोठी मान वर करून सांगणारी आम्हाला सांगायचं होत लवकर आलो असतो आम्ही...."


कल्पना खाली मान घालून " तस काही नाही काळजी म्हणून सांगितलं..."


गीता आजीच्या बोलण्याने आध्या ला राग आला...

आध्या रागात गीता आजीला " आजी आई ऐकुन घेतेय म्हणजे काहीही बोलणार का... तुम्हाला मन नावाची गोष्ट आहे की नाही , अस वाटत नाही का की आपण जे वाईट बोलतोय ते समोरच्याला कस वाटत असेल ते... तुम्हाला समजावून काय फायदा जे कधीच समजून घेत नसेल , तुम्हाला एक मुलगी असती तर समजल असत एका मुलीचं , एका आईच काय दुःख असत ते.... हं तुम्हाला बोलून काही फायदा नाही आहे..."


गीता आजीला आध्या ने अस उद्धट बोलल्याने त्यांना खूपच राग आला...


गीता आजी भयंकर रागात " मला अस उलट बोलण्याची हिम्मत कशी झाली तुझी , ( कल्पना कडे बघत ) कल्पना सांग तुझ्या मुलीला माझ्यासोबत शिस्तीत राहायचं..."


आध्या ने आजीला उलट बोलल्याने कल्पना ला राग येतो...


कल्पना रागात " आध्या आजी तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना , तू काय बोलतेय त्यांना जरा तरी भान ठेव... हेच का आम्ही शिकवलेले संस्कार तुला..."


आध्या हसतच आईला " संस्कार रिअली , मग आजीचे पण हेच संस्कार आहेत का एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा कमीपणा लेखणे हा... हेच आहेत का त्यांचे संस्कार बोला..."


कल्पना रागात आध्या वर हात उचलणार " आध्या..."
पण त्यांचा हात हवेतच तसाच राहतो...

आध्या कल्पना ने हात उचलले ला बघून डोळे घट्ट मिटून घेते , अजुन काही हालचाल नाही जाणवताच ती हळूच डोळे उघडते... समोर बघते तर कल्पना चा हात हवेत तसाच होता आणि त्यांच्या डोळ्यात त्यांनी रोखलेले अश्रू दिसत होते....कारण त्यांना आपल्या मुलीला उचलणार होते म्हणून डोळ्यात पाणी येत....


अस नव्हत की ती चुकीचं काही बोलली... तिला रोज अश्या वाईट बोलण , वाईट गोष्टी , अविश्वास यांचा सामना करावा लागतो सहन करावं लागत होत अस रोज घडत असल्याने तिची मानसिक स्थिती सहन करण्याच्या बाहेर गेली होती , तिला सहन झालं नाही म्हणून रागात तिने आपल्या मनातल सगळ बाहेर काढल होत.... बोलताना तिला गहिवरून आले होते , साहजिकच होत ना तिच्या स्वभावात मोठ्यांशी उलट बोलणे अस नव्हतच... पण तिने जे काही रागात बोललं होत ते खरच तर होत...आध्या कल्पना ला " का थांबवला हात मारायचा होत ना ( हसत असलेल्या आजीकडे बघत ) काही लोकांना समाधान भेटल असत..."


आध्या च बोलण गीता आजीला समजल होत त्या तिच्या कडे रागाने बघत होत्या...


गीता आजी " तुझ तोंड जास्तच चालतंय आज थांब येऊ दे तुझ्या बाबांना सांगते च त्याला की तुझी मुलगी बघ कशी बोलायला लागली ते वर वर लोकांना..."आध्या " बोला कोणाला बोलायचं आहे ते ही आध्या कशी आहे ते दाखवून देईन आणि मी काही चूक केली नाही हे पण दाखवेन..."


एवढ बोलून आध्या आपल्या रूम मध्ये निघून जाते...कल्पना तिला जाताना बघून तिला आवाज देते " आध्या..."


पण आध्या तोपर्यंत रूम मध्ये गेलेली असते आणि दार पण लावलेलं असत...


गीता आध्या गेलेली बघून कल्पना ला " बघ बघ कशी धमकी देऊन गेली..."


कल्पना त्यांचा पुढे हात जोडत " आई आध्या जे काही बोलली त्या बदल्यात मी माफी मागते... ती जे बोलली रागात बोलली परत ती अस काही बोलणार नाही याची काळजी घेईन मी..."


गीता आजी तिरकस पणे " आता माफी मागून काय होणार आहे , तिने मागायला पाहिजे ती तर मस्त ऐटीत धमकी देऊन निघुन गेली.... विश्वास ला येऊ दे सांगतेच त्याला आध्या कशी वागली ती...."


एवढ बोलून त्याही आपल्या रूम मध्ये निघून गेल्या...कल्पना तश्याच पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिल्या...

आध्या च्या रूम मध्ये...


आध्या बेड ला टेकून रडत बसली होती....आध्या स्वतःशीच " माझ्याच नशिबी अस का देवा , मी काय बिघवडल आहे कोणाचं जी इतकी मोठी शिक्षा का... का ? का ? का ? अस... ( डोळे पुसत ) ठीक आहे तू एवढी मोठी परीक्षा देतोय तर ती सोडवावी लागेल आणि पास पण होऊन दाखवाव लागेल... त्या आजी म्हणाल्या होत्या की न रडता परिस्थितीशी सामना करावा आता मी तसचं करेन न रडता मी चुकीची नाही हे दाखवून देईन...."स्वतःशीच निर्णय घेऊन झाल्यावर ती अभ्यासाला बसते...थोड्यावेळाने तिच्या आई दार लोटून आत येतात त्यांना माहीत असत आध्या अस आतून कडी लावून नाही घेणार ....


कल्पना तिला फोन देत " पल्लवी चा फोन आहे , बोलायचं आहे तिला तुझ्याशी..."


आध्या त्यांचा कडून फोन घेत " हो..."


कल्पना " बोलून झाल्यावर ये जेवायला..."


आध्या " हो..."


कल्पना निघून गेल्यावर आध्या पल्लवीशी बोलते...


आध्या " हॅलो बोल पल्लवी..."


पल्लवी " आध्या कुठे आहेस कुठे तू मी कधीची फोन करत होते काकींना त्या फोनच उचलत नव्हत्या , काही झाल आहे का ठीक आहे ना सगळ..."


आध्या पल्लवी ला सगळ शेअर करायची , पल्लवी ला तिचं अभ्यासाचं रूटीन माहीत होत तिचा कधी अभ्यास पूर्ण होतो ते म्हणून ती त्याच टाईम ला रोज फोन करायची कारण आध्या तिची मैत्रीण नसून बहीनीसारखी होती तिला तिची काळजी असायची म्हणून ती रोज फोन करायची , बाबा अभ्यासाचं रूटीन संपल म्हणून तिला तिच्या मैत्रिणीशी बोलू द्यायचे त्यांना माहीत होत की तिचे कोणी मुलगा म्हणून मित्र नाही म्हणून तिला बोलू द्यायचे , रोजच्या प्रमाणे पल्लवी ने आजही फोन केला होता....


रोजच्या प्रमाणे आध्या तिला आज काय काय घडल ते सर्व सांगते...


पल्लवी सगळ ऐकुन त्या मुलाचा राग येतो आणि ती रागात " सोडणार नाही मी त्याला , भेटू दे चांगलाच धुवेल मी..."

आध्या तिला शांत करत " अग चील त्याला तर मी पण नाही सोडणार आहे भेटू दे एकदा..."


पल्लवी " हो मी आहे तुझ्यासोबत... हे त्या अजीनी किती छान समजावून सांगितलं हो ना... मला पण त्यांना भेटायची खूप इच्छा आहे , हे मी पण येणार हा तुझ्यासोबत आपण जाऊ..."


आध्या " हो ग..."


या दोघींच्या गप्पा एक तासात संपत शेवटी....


पल्लवी " चल ठेवते फोन आता उद्या बोलू..."


आध्या " हो चल..."


आध्या आणि पल्लवी फोन ठेवतात....

आध्या फोन ठेवून झाल्यावर जेवायला निघून जाते...


क्रमशः


यात काही चूक असल्यास माफी असावी.....Rate & Review

Swati Deshmukh

Swati Deshmukh 3 months ago