Datla's suspicion was terrible ... 14 in Marathi Women Focused by Bhagyashree Parab books and stories PDF | दाटला हा संशय भीषण होता... १४

दाटला हा संशय भीषण होता... १४

शाळा सुटल्यावर आध्या सरळ घरी येते आणि जेवून वैगरे लगेच अभ्यासाला बसते....संध्याकाळ पर्यंत आध्या चा अभ्यास पूर्ण होतो आणि ती रूमच्या बाहेर येते , बघते तर बाबांच्या आवाजाने तिला समजत की बाबा आले आहेत....


आध्या खुश तर होते तिच्या बाबांना तिच तोंड बघायचं नसत म्हणून ती नाराज होऊन किचन मध्ये जात असते तर मध्येच काहीतरी आठवत थांबते....

तिला आठवत की आत्या ची माफी मागायची आहे....आध्या लगेच आत्याच्या रूम च्या दिशेने जाते ती दार परमिशन घेण्यासाठी दार वाजवायला हात पुढे करणार तेवढ्यात दार उघडलं जात , ती हळु मान वर करून बघते तर समोर तिचे बाबा रागात तिला बघत उभे होते....
विश्वास तिला समोर बघून रागात तिचा हात घट्ट पकडतात आणि खेचत हॉल मध्ये घेऊन येतात....

विश्वास आध्या चा हात घट्ट पकडल्याने तिला दुखत होत...


आध्या त्यांचा हात सोडवण्यासाठी तळमळत " बाबा हात दुखतोय सोडा.... आह...."


आध्या च्या आवाजाने घरातले सगळे हॉल मध्ये येतात....

कल्पना ला आध्या च दुखणं बघवत नव्हत....

कल्पना पुढे येत विश्वास ना " अहो सोडा तिला दुखतय खूप...."


कल्पना कसे तरी विश्वास च्या हातातून हात सोडवून घेते आणि तिला आपल्या पाठीमागे घेऊन स्वतः पुढे उभ्या राहतात कारण विश्वास च्या रागावरून समजत होत की ते कधीही मारतील , विश्वास ना इतका राग आलेला की ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते...विश्वास रागात " कल्पना बाजूला हो , हीच खूप झाली नाटक आता.... आज हिला धडा शिकवावा च लागेल..."


ते पुढे येवून आध्या ला पकडणार तर कल्पना त्यांना अडवत हात जोडून " अहो सोडा तिला , तिने काही चूक केली तिच्या वतीने मी माफी मागते... पण अस मारू नका हो , लहान आहे ती अजून...."


विश्वास " लहान आहे म्हणून तर जास्त नाटक चालू आहेत.... तू आधी बाजूला हो , मी इथे नव्हतो तर काय काय केलं आहे ते समजल आहे.... आज पासून कोणाशी बाहेरच्यांशी बोलायचं नाही , शाळेत ज्या पण मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मैत्री तोडायची मैत्रिणी सोबत राहून जास्तच नाटक चालली आहेत तुझी हा , शाळेत मीच सोडायला आणि आणायला तुझी आत्या येणार आहे त्याच आता तुझ्यावर लक्ष ठेवतील समजल आणि जर शाळेत कोणाशी बोलताना दिसलीस तर बघ.... आणि हो यातलं एक नियम तुटला ना तर समजून जा तुझ आणि या घरच्यांशी नात तुटल....."


शेवटचं वाक्य ऐकून आध्या पुढे येत त्यांचा हात दोन्ही हातांनी पकडुन रडत " बाबा.... अस नका करू मी... मी... सगळ ऐकेन तुमचं , पण अस नात तोडू नका...."विश्वास तिच काहीही न ऐकता तिचा हात झटकत सरळ आपल्या रूम मध्ये निघून जातात....


अंजली आणि गीता जे बिचारा चेहरा करत उभे होते ते आता एकमेकींकडे बघून हसत होते आणि हसतच तेही आपल्या रूम मध्ये जातात.... त्यासोबत कल्पेश हसत निघून जातो , आध्या ला अशी कडक शिक्षा भेटली म्हणून हे तिघे जण खुश होतात....हॉल मध्ये आध्या आणि कल्पना फक्त होत्या....


आध्या रडत कल्पना ला मीठी मारते...

आध्या " आई...."

कल्पना तिला कुरवाळत " शांत हो बाळा होईल ठीक , चल आता जेवून घे थोड आणि झोप...."


आध्या " भूक नाही मला..."


कल्पना " आध्या चल बोलली , भरवते हवं तर..."


कल्पना तिला जेवायला घेऊन गेली....


कल्पना ने आध्या ला जेवण खाऊ घालून झोपायला पाठवल....


इकडे अंजली आणि गीता आपल्या रूम....


या दोघी जोरजोरात हसत होत्या....


अंजली हसू रोखत " बिचारी आध्या तिला फक्त एक छोटीशी शिक्षा द्यायची होती , पण तिला खूपच मोठी शिक्षा भेटली.... आता बघ कशी वठणीवर येते ते , सकाळी जास्तच माज चढला होता ना वाघीण बनायचं आणि आता भित्र्या सश्यासारखी हालत झाली होती...."गीता आजी " हो , जास्तच बोलत होती.... आता छान वाटत आहे , तिला रडताना बघून...."


अंजली " पण आई विश्वास ला अस बोललं की तो इतका रागावला आध्या वर...."


गीता " हा सांगते बस इथे...."


अंजली " हो..."


गीता आणि अंजली बेड वर जाऊन बसतात....

गीता " हा झाल अस की...."थोड्यावेळा पूर्वी....विश्वास आणि कल्पना हॉस्पिटल मधून घरी येतात....

घरी आल्या आल्या विश्वास फ्रेश होऊन आपल्या आईला आणि मोठ्या बहिणीला भेटायला त्यांच्या रूम मध्ये जातात....


रूम मध्ये आल्या आल्या विश्वास " आई कशी आहेस आणि ताई ( इकडे तिकडे बघत , पण त्यांना अंजली दिसत नाही... मग आईला बघून ) , ताई नाही आहे का कुठे ताई..."


गीता " मी एकदम मस्त बघ ठणठणीत , अरे अंजली कल्पेश रूम मध्ये आहे त्याच्याबरोबर ती पण मस्त एकदम... काय रे लक्ष नसत तुझ स्वताच्या तब्येती कडे पण काही हरकत नाही मी आणि तुझी ताई आली आहे ना बघ कस ठणठणीत करतो तूला , तुला चालेल ना इकडे राहील तर...."विश्वास " अग आई हे तुझच घर आहे कितीही दिवस राहू शकतेस.... पण तू असं का बोलत आहेस , कोणी काही बोललं आहे...."


गीता " हो , म्हणून तर बोलले ना की मी राहिली तर चालेल का...."


विश्वास च्या रागाने मुठी आवळल्या होत्या " कोण बोललं सांग बघतोच त्याला मी...."


गीता विश्वास च राग बघत थोड घाबरण्याचे नाटक करत " ते आपल्याच घरात आज...."


विश्वास आवाज चढवत " कोण आहे सांग कल्पना काही बोलली का , की कल्पेश किंवा आध्या काही बोलले...."


विश्वास च्या आवाजाने गीता ने पटकन " आध्या..."विश्वास आध्या च नाव ऐकून त्यांच्या डोक्यावर अठ्या पडतात " आध्या , ती काय बोलली..."


गीता " बोलते पण तू शांत आणि रागावू नको...."


गीताच्या बोलण्याने विश्वास स्वताला शांत करतात " बोल आता...."


विश्वास ना शांत झालेलं पाहून गीता बोलू लागते " ते आध्या मी इथे आल्यावर दिसत ती बोलत होती की तुमचं घर आहे ना तिथे रहा की बघावं तेव्हा इथेच येता , बाबा देतात ना पैसे कशाला इथे येऊन आम्हाला सुखाने राहू देत नाही... तुमच्या मुळे माझे बाबा माझ्याशी असे वागत आहे , तुम्ही बाबांच्या मनात वाईट साईट भरवत असता त्यामुळे बाबा इतके रागवतात.... ( गिताच बोलता बोलता लक्ष विश्वास कडे जातो , जे त्यांच्या आध्या बद्दल बोलण्याने त्यांच्या डोळ्यात अंगार फुलत असत.... त्यांना आणखी राग आणण्यासाठी पुढे बोलतात....) आणि ती अंजली बद्दल पण नको ते बोलत होती...."विश्वास " ताई बद्दल काय बोलली.... सांग लवकर...."गीता " अंजली ला बोलली आपल्या सासरी जाऊन रहा की , नुसत माहेरी यायचं असत तुम्हाला काही येत नाही ना म्हणून च सासरी असच वागत असतात तुमच्याशी....अंजली ने तिला नीट समजावण्याचा प्रयत्न केला , पण ती तर उलटून बोलू लागली...."


येवढं बोलून त्या मध्येच थांबल्या....


विश्वास " काय बोलली ?....( तरीही त्या शांतच होत्या....) आई सांग लवकर...."


गीता " हे बघ विश्वास तू आध्या वर रागवत नसेल तर सांगेन मी उगाच त्या बिचारीला त्रास होईल तुझ्या रागाने , ती आता लहान आहे कदाचित तिच्या कोणी मैत्रिणीने अस वागायला शिकवलं असेल किंवा कोणी बाहेरच असेल...."विश्वास " मी रागवायच की नाही हे मी बघेन पण तू सांग आधी आध्या ताई ला काय बोलली ते...."


गीता " ठीक आहे सांगते , ती अंजली ला बोलली की जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर माझं सगळ ऐकावं लागेल आणि जास्त शहाणपणा केला तर ही जी आध्या आहे ना कधी वाघीण बनेल सांगता येणार नाही , मग शिस्तीत राहायचं...."


त्यांच्या अश्या बोलण्याने विश्वास ना खूप राग येतो आणि ते रागात च तिथून निघत असतात....

पाठून गीता " अरे विश्वास ऐक तिला काही बोलू नको लहान आहे ती...."


पण ते त्यांचं काहीच ऐकुन घेत नाही .....विश्वास दरवाज्यापर्यंत येतात आणि पटकन दरवाजा उघडतात....


त्यांना दरवाजा उघडायला आणि आध्या ने हात पुढे करायला एकच वेळ असते ....समोर आध्या ला बघून विश्वास चा राग आणखी वाढतो आणि ते तिचा हात जोरात पकडुन च तिथून घेऊन जातात....इथे गीता " आध्या , तू गेली आता.... हा.... हा... हा...."पुढे माहिती काय घडल ते....वर्तमान....


घडलेलं सगळ सांगून गीता थांबतात आणि अंजली कडे बघत " मग कस वाटलं माझं प्लॅन...."


अंजली " एक नंबर आई....आता ती महाराणी आपलं काही बिघडवू शकणार नाही...."


गीता " मग आता त्या महाराणी ला समजल असेल माझ्या वाटेला आल काय होत ते...."अंजली आणि गीता दोघीही आनंद व्यक्त करत झोपून गेल्या.....
अरे.... अरे..... अरे..... गीता आणि अंजली ताई तुम्हाला माहीत नाही का भिंतीला पण कान असतात जरा सांभाळून हो , नाही तर भूकंप व्हायचा आणि काही क्षणात सगळ संपून जायचं.... जरा नाही नाही नाही जरा नाही आणखी जरा सांभाळून हो......


इकडे कल्पना आणि विश्वास ची रूम.....


कल्पना किचन मधल सगळ आवरून आपल्या रूम मध्ये येते.....


बघते तर विश्वास अजुन झोपले नव्हते , मग त्या त्यांच्या बाजूला पडून " अहो , जास्त जागे नका राहू झोपा बर नाही तर आणखी त्रास...."


विश्वास भिंतीला एकटक बघत निर्विकारपणे " आध्या ने दिलेला त्रास कमी आहे का...."


कल्पना " तुम्ही तिला अशी शिक्षा देऊन खूप मोठी चूक केली आहे , जेव्हा तुम्हाला खर काय ते समजेल ना तेव्हा तुम्ही स्वताला पण माफ नाही करू शकणार...."इतकं बोलून कल्पना त्यांच्या कडे पाठ करून झोपी जाते...विश्वास पण काही वेळाने झोपून जातात.....

क्रमशः

©® भाग्यश्री परबयात काही चूक असल्यास माफी असावी....

Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 11 months ago

Swati Jagtap

Swati Jagtap 11 months ago