आध्या ती बुक वाचायला सुरुवात करते...
" प्रिय आध्या उर्फ माझी जान ,
विचित्र वाटत असेल ना अशी चिठ्ठी वैगरे , काय करणार मजबूरी आहे... तुझ्या बाबांना समजल तर तुला घरातूनच काढतील , म्हणून माझं चिठ्ठी वैगरे लीहण्याच डोक चाललं... नंतर सांग हा कशी वाटली आयडिया ( आध्या मनात " एकदम झकास शेवटी माझी च बहीण तू , किती ती माझी काळजी... लव्ह यू पल्ले...) तू जेव्हा या शाळेत पहिल्यांदा आलेली दुसरीत होतो बघ , तेव्हा तुझ्या कडे बघून अस वाटायच की आपण खूप वर्षांपासून ओळखत आहोत , आपण अगोदर च ओळखत आहोत असच वाटायचं अगदी... मग आपली मैत्री झाली हळूहळू एकमेकांना ओळखू लागलो आपण , एकमेकांचा जीव झालो आताही तितकाच जीव आहे... तुझ्या बाबांचा स्वभाव समजत होत तेव्हा अस वाटल की मी तुझी बहिण असते तर प्रत्येक संकटात वाचवल असत तुला , कधीच त्रास झाला नसता आता तू खूप आनंदी असती....पण जाऊदे तुला कधी माझी मदत लागली तर सांग मी जिथे असेल लगेच येईन , त्या हॉस्पिटल मधल्या आजीची खूप आठवण येत असेल ना बोलायचं पण असेल तुला , पण काळजी नको करू मला शाळेच्या मागच्या बाजूला भेट.... तिथे का तर आपण ही बूक एक्सचेंज करू , आता आपण असच या बूक वर पत्र लिहत जाऊ... अस का तर शाळेच्या मागच्या बाजूला च बोललो असतो , पण अस जास्त वेळ थांबण शंका होईल म्हणून अस पत्राद्वारे बोलू चालेल ना....
चल आता इतक च लिहते बाकी नंतर बोलू हा....
बाय लव्ह यू जान....
तुझीच जान
पल्लवी
वाचताना आध्या च्या चेहऱ्यावर हास्य पसरत , ती बुक बंद करून छातीला कवटाळत " लव्ह यू , लव्ह यू पल्ले मला वाटत होत की मला समजून घेणार कोणी नाही एक आई आहे पण तिला काहीच करता येत , ती जर बोलली असती तर सगळच संपल असत आतापर्यंत.... मला छान वाटत आहे की आई सारखं अजुन कोणी आहे ते , अशीच आपली मैत्री आयुष्यभर राहू दे काहीही झालं तरी ही मैत्री कधीच तुटणार नाही...."
आध्या स्वतःशीच बोलून बुक वर काहीतरी लिहून आपल्या बॅग मध्ये ठेऊन देते आणि आपला टिफीन काढून खाऊ लागते....
थोड्यावेळाने शाळा सुटते...
आत्या ला यायला अजुन वेळ लागणार म्हणून आध्या पटकन शाळेच्या मागच्या बाजूला जाते , तिथे पल्लवी आधीच येऊन तिची वाट बघत होती....
पल्लवी ने आध्या ला बघताच इशाऱ्याने " ये... ये... लवकर..."
आध्या पळतच तिच्या जवळ जात गच्च मीठी मारते " पल्ले थँक्यू खूप... तू नसती तर काय झालं असत..."
पल्लवी " गप तू तुझं प्रॉब्लेम ते माझं प्रॉब्लेम समजल...आणि थँक्यू काय बोलतेस माहिती आहे मैत्रीत चालत नाही हे..."
आध्या मिठीतून बाहेर येत " हो माहिती.... सुशीला आजी...."
पल्लवी " समजल मला तुला आजीला भेटायचं आहे ते , एक काम कर तू मला आजीचा नंबर दे मी त्यांच्याशी बोलते आणि तुला भेटायला सांगते चालेल..."
आध्या " हो चालेल..."
आध्या लगेच ती बुक काढून त्यावर सुशीला आजी चा नंबर लिहिते आणि ती बुक पल्लवी ला देते....
पल्लवी " हम खूप छान नाव आहे आजीच , सुशीला..."
आध्या " हो..."
पल्लवी " चल आता जास्त वेळ थांबलो तर तुझी आत्या कच्च खायची..."
आध्या " हो... हो... चल..."
बोलून झाल्यावर आध्या आणि पल्लवी तिथून निघून जातात.....
त्याच जागी दुसऱ्या ठिकाणी....
एक व्यक्ती " हम एक पुरावा तर भेटला..."
दुसरी व्यक्ती " मग पाठव तिच्या वडिलांना...."
पहिली व्यक्ती " नाही आता नाही वेळ आल्यावर अजुन पुरावे गोळा करायचे मगच पाठवायचा.... काय आहे ना आता पाठवल तर प्लॅन फसेल म्हणून तयारीनिशी तिला अद्दल घडवायची आहे...."
दुसरी व्यक्ती " हम... यू आर ग्रेट...."
पहिली व्यक्ती " ते तर मी आहेच...."
सुशीला आजीच्या घरी...
एक मुलगा शाळेतून घरी आल्यावर आजीच्या गळ्यात पडतो....
तो मुलगा " आजी तुझी खूप आठवण आली होती आज..."
आजी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत " काय रे रोजच तर भेटतो..."
मुलगा " हो पण दिवसाचे सात तास तर नाही भेटत ना...."
आजी त्याचा कान पकडत " खूपच शहाणपण भरलाय हा तुझ्यात..."
मुलगा " हा... आजी कान सोड नाही तर आजोबाला तुझ नाव सांगेन...."
आजी " चल पूरे झाल तुझ शहाणपण , जा तुझ्या बाबांना जाऊन भेट..."
मुलगा " हो... आलोच..."
आजी शी बोलून तो आपल्या बाबांना भेटायला जातो....
तो त्यांच्या रूम मध्ये येताच त्याचे बाबा " अरे शिव तू ये इकडे बस...."
शिव त्यांच्या बाजूला जाऊन बसत " बाबा कस वाटत आहे आता...."
शिव चे बाबा " हो आता एकदम मस्त वाटत आहे...."
शिव " बाबा किती घाबरवल होत तुम्ही आम्हाला , काळजी घ्या जरा स्वतःची आम्हाला तुम्ही खूप महत्त्वाचे आहात....."
शिव चे बाबा " हो बाळा मी इतक्या लवकर कुठेच नाही जाणार आहे तुम्हाला सोडून आणि तुम्हालाही कुठे जाऊ देणार नाही...."
शिव " हो बाबा.... जेवलात का तुम्ही..."
शिव चे बाबा " नाही तुझीच वाट बघत होतो , चल आता जेवायला ये फ्रेश होऊन..."
शिव " हो...."
थोड्या वेळाने शिव फ्रेश होऊन जेवायला येतो....
शिव आल्यावर सगळे गप्पा मारत जेवतात , मग आपापल्या रूम मध्ये जातात...
शिव चा बाकीचा दिवस अभ्यासात जातो....
रात्री शिव जेवून आपल्या रूम मध्ये येतो आणि मोबाईल मध्ये एका मुलीच्या फोटोला बघत , गप्पा मारत झोपून जातो....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....