आरोही त्या दुसऱ्या खोलीच्या दाराजवळ येऊन उभी राहत दरवाजा उघडते आणि समोर बघून तिचे डोळेच मोठे होतात....
पाठून आलेल्या मुली ही अशी का उभी राहिली म्हणून समोर बघतात तर त्यांचे पण डोळे मोठे होतात....
पुढे....
निखिल आणि पार्थ एका कॅफे मध्ये येतात.....
आणि दोघेही समोरासमोर चेअर वर बसतात....
पार्थ " बोला साहेब अस काय बोलायच आहे त्यासाठी पोलिस स्टेशन ला आलात...."
निखिल " हो खूप इंपॉर्टन्ट आहे...."
पार्थ डोळे मोठे करून " इतक इंपॉर्टन्ट आहे का ?...."
निखिल " हो , तुला इतक शॉक व्हायला काय झाल...."
पार्थ " काही नाही हो सर... असच शॉक झालो कधी झालो नव्हतो ना म्हणून मग म्हंटल होऊन बघू... पण बेकार शॉक होता फालतू चा...."
निखिल कपाळावर आठ्या पाडत चिडून त्याला " पार्थ आय विल कील यू...."
पार्थ " उफ् , सॉरी सॉरी तुझा चेहरा इतक टेन्शन मध्ये दिसत आहे... आल्यापासून बघतोय जस मासा पाण्यासाठी तडफडतो तस तुझा चेहरा झाला होता... म्हणून मी तुला हसविण्यासाठी बोललो... आणि तूच मला ओरडत आहेस , हुह...."
निखिल " झाल तुझ तू कधी सुधारणार रे.... कधी कधी तू ना वेड्यासारख बोलत असतो , तुला तरी कळतय का काय बोलतो ते....."
पार्थ " काय करणार हो सर मला सांभाळणारी अजुन भेटलीच नाही ना.... म्हणून डोक्याला झटका लागला बघा..."
निखिल ने मनातच कपाळावर हात मारून घेतला " देवा.... कसला मित्र दिलास मला...."
निखिल पार्थ ला " आता मुद्द्यावर यायच का.... आधीच तू टाईम वेस्ट केला आहेस..."
निखिल च्या बोलण्यावरून पार्थ काही बोलणार तर निखिल ने त्याला हात दाखवून थांबवले आणि स्वतः च्या ओठांवर बोट ठेवत शांतपणे थंड आवाजात त्याला " चूप चूप एकदम.... मी काय सांगतोय ते ऐक.... "
तसा पार्थ निखिल ला हाताने बोलण्याचा इशारा करत स्वतः च्या ओठांवर बोट ठेवले....
निखिल याच काही होऊ शकत नाही अस समजून बोलायला सुरुवात करतो....
निखिल " मला आता थोड्या वेळा पूर्वी...."
निखिल ने पार्थ ला त्याला एका माणसाच्या आलेल्या कॉल बद्दल , कॉल वर काय काय बोलणं झाल... त्या माणसाने निखिल ला दिलेली धमकी सगळ सविस्तर सांगितल....
पार्थ निखिल च सगळ ऐकुन झाल्यावर " मला त्या माणसाचा नंबर भेटेल.... "
पार्थ बोलतो तस निखिल लगेच त्या माणसाचा नंबर देतो....
पार्थ नंबर घेत तो नंबर बघून डोळे मोठे करत तोंडावर हात ठेवून जोरात ओरडतो " हुइ मा... "
आरोही आणि रिया असतात त्या घरात....
समोर बघत सगळे शॉक होतात....
आणि समोरच बघून आरोही चा चेहरा लालबुंद होतो...
आरोही रागात " ह.... कोण हा महानायक कोणाच अस डोक चालत..... येऊ दे एकदा हातात...."
रिया तिच ऐकुन डोक्यावरच हात मारत स्वतःशीच बडबडत " बघाव तेव्हा मारायच्याच गोष्टी असतात.... हे देवा बुध्दी जरा या मुलीला , यातून बाहेर कस निघायच सोडून त्या महानायकाला धडा शिकवायचा आहे...."
रिया बडबडून झाल्यावर आरोही जवळ येत तिला " हे बाई.... इथून कस बाहेर निघायच हा विचार कर ना नको ते कसला विचार करत बसली आहेस....."
रिया च्या बोलण्याने तिच्या लक्षात येत की आपण काय बोललो ती जीभ चावत रिया कडे बघत " सॉरी....."
रिया तुझ काही होऊ शकत नाही असा चेहरा करत तिला बघते.....
आरोही रियाला दात दाखवत समोर बघत तोऱ्यात बोलते " चला मिशन बाहेर पडींग टू चालू करू...."
रिया " ओह गॉड 🤦....."
आरोही आणि रिया सोबत असलेल्या मुलींमधून एक मुलगी आरोही ला " ताई मिशन टू कस काय ?....."
आरोही तिच्या जवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवून " बाळा मघाशी आपण बाहेर निघण्यासाठी युद्ध करत होतो
ते मिशन वन झाल आणि आता जे ( समोर बघत....) यातून बाहेर पडणार आहोत ते मिशन टू... ( आरोही त्या मुलीच्या खांद्यावरून आपला हात काढत स्वतः बडबडत त्या दरवाजा समोर उभ राहत समोर बघत...) माहीत नाही
अजुन किती मिशन असतील पुढे....."
त्या दरवाज्यासमोर काळ कुट्ट अंधार होता की पुढे नक्की काय आहे तेही समजत नव्हते...
रिया " एवढ्या अंधारात कस जायच , आणि गेलो तरी काही दिसणार पण नाही पुढे काय आहे.... मध्ये खड्डा वैगरे असला तर कोणी पडायच त्यात...."
त्यांच्यात असलेली एक मुलगी " हे होरर सारख दिसतय.... ( ती सगळीकडे नजर फिरवून....) इथे भूत वैगरे तर नसेल ना...."
तिच्या सोबत बाजूला असलेली मुलगी तिला " हे तू कशावरून बोलत आहेस..."
ती मुलगी त्या मुलीकडे बघत " अग समोर हे असल सीन दिसतय आणि एकच दरवाजा दिसतोय.... ते नाही का होरर सीन मध्ये दाखवतात एका घरात बाहेर पडण्याच एकच दरवाजा असतो म्हणून वाटल इथे भूत वैगरे तर नसेल...."
त्या मुलीच बोलण ऐकून एक मुलगी हसत पटापट पाऊले टाकत त्या दरवाजा समोर आली आणि समोर बघून च ती एक पाऊल पुढे टाकणार तर आरोही ने तिला पटकन मागे खेचल....
अचानक मागे खेचल्यामुळे आरोही ने तिला सवरल तर ती मुलगी पडता पडता वाचली...
आरोही तिला सरळ उभ करत तिच्याकडे रोखून बघत भुवया उंचावत " काय... वेड लागलय का तुला..."
ती मुलगी आरोही ला " सॉरी... ते भूत नाव ऐकुन एक्साईटेट झाले , मला बघायच होत भूत कसे असतात , ते कसे राहतात , झोपतात , जेवतात ते....."
रिया त्या मुलीच बोलण ऐकून जोरातच कपाळावर हात मारून घेते " अरे देवा.... कोणाच काय आणि कोणाच काय.... आरु ची काय कमी होती ते तू पण आलीस..... ( आरोही कडे बघत...) आरु तुझ गुण यांच्यात ट्रान्स्फर झालेल दिसतय...."
तशी आरोही दुसरीकडे बघून गालातच हसते....
रिया ने आरोही ला हसताना बघितल तस रिया रागानेच तिला रोखून बघते....
आरोही रिया ला इग्नोर करत त्या मुलीला जवळ घेत " बाळा आपण ऑफिसियली भुताला भेटवेन हा मी.... इथून सुटका भेटल्यावर..."
ती मुलगी " हो...."
आरोही " चला शोधा काही तरी भेटत का बघू इथे.... काही ना काहीतरी असेलच इथे....."
तसे सगळे इकडे तिकडे होऊन शोधायला लागतात काही भेटत का बघत होते......
एका गोडाऊन मध्ये.....
एका माणसाला तारेने पूर्ण अंगाला एकदम घट्ट बांधून ठेवले होते आणि त्याच्या समोर एक माणूस त्याला रागाने बघत होता....