Love your new color... 30 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... 30

प्रेमा तुझा रंग नवा... 30

बटन दाबल्यावर दरवाजा उघडण्याचा आवाज येतो आणि सगळे समोर बघतात तर सगळ्यांचे डोळे मोठे होतात सोबत त्यांच शरीरही कापत असत....


पुढे...

समोरच दृश्य बघून सगळ्यांच शरीर कापत होत.. समोर दरवाज्याच्या मागे एक पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यात एक वाघ डरकाळी फोडत होते.. आरोही कडून चुकून तिसरा बटन दाबल्याने तो पिंजरा उघडला गेला...

आरोही पण त्या वाघाला बघून घाबरली होती.. पण तिने हिम्मत करून काहीही विचार न करता पहिला आणि चौथा बटन एकत्र दाबला , त्यामुळे तो पिंजरा बंद झाला आणि जिथे सगळे उभे होते ती जागा अचानक लिफ्ट सारखी खाली जाऊ लागली.. सगळ्यांना काय होत आहे काहीच समजत नव्हत , सगळे पुढे काय होत आहे ते बघतच राहिले...

थोड्यावेळाने ती लिफ्ट थांबली , सगळ्यांनी आजूबाजूला नजर फिरवली तर तिथे कोणीच नव्हत..

आरोही इकडे तिकडे बघत तिच लक्ष समोर जात , समोर काही अंतरावर हलक हलक उजेड दिसत आरोही तिथे बघून सगळ्यांना " चला माझ्या पाठून.."

तसे सगळे तिच्या पाठी जायला लागतात.. चालत चालत ते त्या जागेवर येतात तर आरोही अचानक " थांबा..."

रिया " काय झाल आरोही का थांबलीस..."

आरोही कानोसा देऊन " तुम्हाला आवाज ऐकू येतोय.."

आरोही च्या बोलण्याने सगळे शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करतात , तस त्यांना काही आवाज ऐकू येतो..

रिया " हो आरोही कोणीतरी आहे इथे वाटत..."

आरोही " हो.. तुम्ही थांबा इथे , मी बघून येथे कोण आहे ते..."

आरोही जाणार तर रिया तिला अडवते " आरु नको मी पण येते तुला काही..."

आरोही ला समजत रिया ला काळजी आहे म्हणून तिला मध्येच अडवत " डोन्ट वरी रियु , मला काही होणार नाही ओके..."

रिया " पण.."

आरोही रिया हात घट्ट दाबत डोळे मिचकावत एक गोड स्माईल देत तिला आश्वस्थ करते..रिया आरोही काही ऐकणार नाही म्हणून तिचा हात सोडवत सुटकेचा निःश्वास घेत तीही तिला गोड हसत जायला सांगते..

तशी आरोही जिथून आवाज येतो तिथे जाते.. बघते तर तिथे दोन व्यक्ती आपापसात बोलत असतात त्यातला एक व्यक्ती रागाने दुसऱ्या व्यक्तीला ओरडत असतो , तो पाठमोरा असल्याने आरोही ला तो दिसत नाही.. दुसरीकडे आजूबाजूला काही माणस काम करत असतात
त्यांच्याकडे बघून अस वाटत होत की त्यांना मारून , काही खायला न देता त्यांच्याकडून काम करून घेत होते आणि एकीकडे काही बॉडीगार्ड त्या माणसावर पहारा देत होते...

आरोही सगळ निरखून बघत असते तेव्हा अचानक तो ओरडणारा व्यक्ती वळतो , तो वळण्याने त्या व्यक्तीची आणि तिची नजरानजर होते.. तस दोघ विजेचा झटका लागल्यासारख आश्चर्य चकित होऊन एकमेकांना बघत होते...

आरोही मनात " हा.. हा.. तर... हा जिवंत कसा..."

इथे ती व्यक्ती मनात " ही इथे कशी आली..ही तर.."

त्या व्यक्तीला काही कळायच्या आत आरोही तिथून लगेच निसटून जाते.. कारण तिला माहित असत तो व्यक्ती कसा आहे , इथे थांबल तर त्या व्यक्तीच्या हातून सुटन अवघड आहे... आरोही निघून गेलेली बघताच तो व्यक्ती पटकन तिथे असलेल्या बॉडीगार्डला ऑर्डर " अरे पकडा तिला बघत काय बसला आहात..."
त्या व्यक्तीने ऑर्डर सोडता बॉडीगार्ड लगेच आरोही पळाली त्या दिशेने धाव घेतात...

आरोही तिथून अगोदर पळाल्याने ती रिया आणि बाकी मुली जिथे असतात तिथे येते.. आल्या आल्या ती " लवकर चला इथून नाही तर तो आपल्याला सोडणार नाही .. चला पटकन ( रिया काही बोलणार तर आरोही तिला काय बोलायच आहे ते समजून लगेच..) मी सांगते नंतर काय ते आधी चला इथून पकडन..."

आरोही च बोलण ऐकून सगळे तिथून पटकन निघून जातात म्हणजे पळून जातात आणि जिथून आले तिथे येतात... त्या जागेवर पोहोचताच आरोही इथे तिथे बघते तर तिथे दोन बटन होती ती काहीही विचार न करता त्यातल कुठलही एक बटन दाबते.. बटन दाबल्याने लिफ्ट वरच्या दिशेने जाते आणि अचानक थांबते...

लिफ्ट थांबल्यावर दरवाजा उघडला जातो.. दरवाजा उघडल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर उजेड पडतो तसे सगळे एक हाताने चेहरा झाकतात.. कारण वर्ष झालेली त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले होते जिथे प्रकाश खूपच कमी होत.. खूप दिवसांनी इतका प्रकाश डोळ्यांवर पडल्याने त्यांना सहन झाल नाही म्हणून सगळ्यांनी काही मिनिटे डोळे बंद करून उघडले...

डोळे उघडल्यावर समोर एक रस्ता होता आणि आजूबाजूला जंगलाचा भाग होता.. रस्ता एकदम सूनसान एकही गाडी दिसत नव्हती , होती फक्त एक टेम्पो आणि एक कार अंदाजे त्या दोन गाड्या या लोकांच्या असतील.. टेम्पो बघून अस वाटत होत यातून लोकांना पकडुन आणत असे , आणि कार मलकाचीच असू शकते...

सगळे आजूबाजूला बघत असताना त्यांना कोणाची तरी चाहूल लागते तर आरोही लगेच सगळ्यांकडे बघत " चला पटकन टेम्पो मध्ये बसा आपल्याला इथून लवकर निघायला हव..." तसे सगळे तिला कोणताही प्रश्न न विचारता पटपट त्या टेम्पो मध्ये बसतात.. आरोही आणि रिया सगळे बसल्यावर पुढे बसतात आरोही ड्रायव्हिंग सीट वर तर रिया तिच्या बाजुच्या सीट वर बसते.. आणि आरोही लगेच टेम्पो स्टार्ट करून तिथून निघते...

टेम्पो चालवत असताना आरोही च लक्ष समोर जात तर तिच्या चेहऱ्यावर मोठ हास्य पसरत...

विजय आणि गीता च्या घरी...

विजय आणि गीता एकमेकांशी काहीही न बोलता जेवत ,पण गीता मनातच चरफडत होती.. तिला त्या व्यक्तीचा खूप राग येत , अस वाटत होत की त्याला कायमच वर पाठून द्याव...

गीता मनातच " त्याला मी सोडणारच नाही बघून घेईन.. आता काय करू हे बाळ , विजय ला समजल तर.. ( हो बाई तुमच्या नवऱ्याला समजल हो सगळ आता तुझ काही खर नाही 🤣...) मलाच काही तरी कराव लागेल.."

विजय तीच निरीक्षण करत जेवण करत होता.. त्याचा चेहरा निर्विकार कोणतेच भाव दिसत नव्हते , जणू वादळापूर्वीची शांतता असावी.. नंतर काय होईल ते देव जाणे..

जेवण झाल तस विजय गीताला " गीता आता आपण बाहेर जात आहोत..."

गीता डोळे मोठे करून " आता कुठे ?..."

विजय भुवया उंचावत " का तुला काही प्रोब्लेम आहे ?.."

गीता स्वताला सावरत हसून " नाही.. नाही.. चला , मला आश्चर्य वाटले म्हणून कधी यावेळी मी बाहेर जाऊ बोलल्यावर तुम्ही नकार द्यायचे आणि आता तुम्ही स्वतः हुन बोलत आहात तर... पण मला खूप आनंद झाला , मी येते लगेच तयार होऊन... ह , तुम्ही असेच येणार का.."

विजय " हो.."

गीता खांदे उडवत " ओके " बोलून डायनिंग टेबलवर असलेली भांडी किचनमध्ये ठेवून तशीच तयार व्हायला बेडरूम मध्ये खुशीत निघून जाते..

इथे विजय ती गेल्यावर मनात राक्षसी हसत " गीता तू आता खुश आहेस , थोड्यावेळाने हे सुख आगीत जाणार आहे..."

थोड्यावेळाने गीता तयार होऊन आल्यावर दोघ घरातून निघून जातात....

विजय गाडी चालवत असताना गीता त्याला आपण कुठे जात आहोत ते विचारते , पण विजय काही बोलत नाही तरीही ती त्याला विचारत असते...
गीता " विजय , आपण कुठे जात आहोत बोला ना प्लीज..."

गीताच अस सारख सारख बोलण ऐकून विजय पुरता वैतागतो तरीही तो स्वतः ला नॉर्मल ठेवत तिला " गीता ते सप्राईज आहे , आता सांगितल तर मज्जा नाही येणार ना सप्राईजची.. सो मग तू गप्प बस थोड , आपण पोहोचणार आहोत थोड्या वेळाने..."

विजय च्या बोलण्याने गीता गप्प बसते , पण सप्राईज च नाव ऐकल्यावर ती खूप आनंदी होते...

इथे विजय गाडी चालवत राक्षसी हसत होता..

थोड्यावेळाने दोघ विजय च्या इच्छित स्थळी पोहोचतात.. गीता लगेच बाहेर निघणार तर विजय तिचा हात पकडुन थांबवत लगेच तिच्या डोळ्यावर पट्टी बांधू लागतो..

गीता पट्टीवर हात ठेवून " अरे विजय हे काय ?..."

विजय थंडपणे " सप्राईज देताना असच देतात ना.."

त्याच्या आवाजाचा टोन गीताला बदलल्यासारखा वाटला , पण ती गप्पच बसणे पसंत करते आणि तो काय करतो आहे ते त्याला करू देते...

विजय तिला पट्टी बांधून कार मधून उतरवून तिचा हात पकडत एका घरासमोर येऊन उभ करतो आणि तिच्या मागे येत तो तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो...

पट्टी काढल्यावर गीता हळूहळू डोळे उघडत समोर बघते तर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य , भीती आणि राग हे तिन्ही भाव दिसायला लागले...

विजय तिच्या कानाजवळ ओठ नेत थंड आवाजात " या घराशी तुझा खूपच जवळचा संबंध आहे हो ना.."

विजय च बोलण ऐकून गीताच्या कपाळावर घाम जमा होतो.. आणि ती आवंढा गिळत समोरच्या घराला एकटक बघत असते...


पार्थ च घर...

पार्थ सगळी कामे करत आपल्या बेडरूम मध्ये झोपलेला होता.. मध्येच त्याच्या फोनची रिंग वाजू लागली ज्याने पार्थ ची चाळवली...

पार्थ ने झोपेतच फोन रिसिव्ह करून कानाला लावला " हॅलो.."

पलीकडून " ............."

पलीकडच्या व्यक्ती च बोलण ऐकून पार्थ खाडकन झोपेतून उठतो आणि " मी येतोय तिथे , त्या व्यक्तीवर पाळत ठेवा... ती हातातून निसटून जाऊ नये समजल.. "

पलीकडून " हो सर..."

एवढ बोलून दोन्हीकडून फोन कट होतात.. फोन कट करून पार्थ लगेच तिथून निघून जातो...क्रमशः

©® भाग्यश्री परब


Rate & Review

Be the first to write a Review!