पलीकडच्या व्यक्ती च बोलण ऐकून पार्थ खाडकन झोपेतून उठतो आणि " मी येतोय तिथे , त्या व्यक्तीवर पाळत ठेवा... ती हातातून निसटून जाऊ नये समजल.. "
एवढ बोलून दोन्हीकडून फोन कट होतात.. फोन कट करून पार्थ लगेच तिथून निघून जातो...
इथे गीता विजय च्या बोलण्याने थरथर कापत होती.. तरीही ती हिम्मत करून " मला नाही माहित हे घर कोणाच.. तुम्ही मला कुठे घेऊन आलात चुकीच्या जागेवर आलोय अस वाटत आहे.."
विजय " ओह चुकीची जागा , ही जागा चुकीची नाही बरोबर आहे... हे घर कोणाच नाही माहीत ना.. मी माहिती करून देतो ना थांब..."
अचानक गीता किंचाळते " हा.."
विजय तिच मनगट पकडुन जळालेल्या लाईटरवर ठेवलेला असतो , गीताला भाजत असल्याने तिला खूप वेदना होत होत्या.. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते तरीही विजय तिच्या अश्रूंना दुर्लक्ष करून तीच मनगट आणखी घट्ट करतो..
गीता आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण विजयने तिचा हात एकदम घट्ट पकडल्याने तिला सोडवता येत नव्हते...
गीता विजय ला गयावया करून " विजय प्लीज हात सोडा खूप दुखत आहे मला.. मी काय वाईट केलय तुमच जे तुम्ही असे वागत आहात.."
विजय " वाईट.. " एवढ बोलून हसत तिला तिथेच जमिनीवर ढकलून देत " सांगतो ना काय काय केल आहे तू..."
इतक बोलून विजय आपला मोबाईल काढत तिला त्यात असलेल एक व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग दाखवतो तस ती डोळे मोठे करून विजय ला बघते...
विजय " काय काही आठवल का.... तू विचार करत असशील की हे व्हिडिओ कोणी दिले हो ना... सांगतो हे व्हिडिओ आपल्याच मुलाने दिलेत मला , तो तुझ्यावर लक्ष ठेवून होता...."
गीता " मी... मी... काही नाही केल विजय , सगळी चूक त्याची आहे त्याच्यामुळे हे सगळ होत.."
विजय " आता खर समोर आल तर सगळ दोष त्याच्यावर वा.. पण मी काही फसणार नाही तुझ्या या बोलण्यावर.. मला सगळ समजल आहे आणि त्याची एकेकाला शिक्षा भेटणार आहे... तयार राहा... "
विजय च्या हातातली वस्तू बघून गीता जागीच गोठली पूर्ण शरीर कापायला लागल होत.. नंतर भानावर येत
गीता त्याचे पाय पकडून विनंती करत होती " प्लीज विजय मला माफ करा दुसरी कोणतीही शिक्षा पण.. पण.. ही जीवघेणी शिक्षा नको... प्लीज...."
अचानक चारही बाजूने आवाज घुमला " आ...."
विजय
ने तिच्या अंगावर लोखंडाच्या बादलीत जळणारे कोळसे पूर्ण टाकून आणि बाजूला झाला होता... तो गीताला डोळ्यात पाणी आणि सोबत राग आणून एकटक तिला तडफताना बघत होता... ( तुम्ही म्हणाल की विजय ने बादली पकडली तर त्याला चटका नाही बसला.. अहो त्याने हातात ग्लोज घातले आहेत तर त्याला चटका नाही बसला 😁....)
शेवटी तिने तिथेच प्राण सोडून दिला...
इथे पार्थ ज्या व्यक्तीने एके ठिकाणी बोलावल त्या ठिकाणी पोहोचतो.. तो गाडी पार्क करून त्या व्यक्तीकडे येत " बोल रवी कोण आहे तो..."
रवी समोर बोट दाखवत " तो बघा समोर उभा आहे ना तोच ज्याने त्या फोटोतल्या व्यक्तीला प्रत्येक कामात मदत केली... सोबत हे पण समजल आहे की ती व्यक्ती आता कोणा कोणाला मारणार आहे ते आणि नावही..."
पार्थ प्रश्नार्थक नजरेने " कोण कोण म्हणजे.."
रवी " म्हणजे तो यावेळी आता चार व्यक्तींना एकदाच आणि आजच मारणार आहे.. "
पार्थ आश्चर्य चकित होत " व्हॉट... हे सगळ कस समजल.."
रवी " सर माझ्या माणसांनी खोलवर जाऊन माहिती काढली आहे... "
पार्थ " तुला एवढी माहिती इतक्या लवकर कशी काय..."
रवी " सर आमच नेटवर्क फास्ट आहे..."
रवी च बोलण ऐकून पार्थ खूप खुश होतो... कारण त्याने खूप प्रयत्न केले त्या व्यक्तीला शोधण्याचे पण ती व्यक्ती काही हाती लागत नव्हती , ती व्यक्ती चालाखीने मर्डर करत होती त्या व्यक्तीबददल कोणताही पुरावा पार्थ च्या हाती लागत नव्हता.. पार्थ दिवस रात्र जागून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा हाती काहीच लागत नव्हत... तरीही त्याने हार मानली नाही तो प्रयत्न करतच राहिला.. आणि आता शेवटी तो त्या व्यक्तीच्या जवळ पोहोचला होता..
पार्थ रवीच्या खांद्यावर थोपटत " वाह रवी खूप मोठ काम केलस तू.. मी किती आणि कस तुझे आभार मानू अस झाल आहे..."
रवी हसत पार्थकडे बघून " बस का सर , ते माझ कर्तव्य आहे.. तुमच्यामुळे मी इथे उभा आहे आणि तुमच्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे..."
पार्थ " हे बाबा अस नको बोलू , तूच असा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्यामुळे आम्हाला गुन्हेगारांना पकडायला सोप जात..."
रवी " अहो सर माझ खूप झाल कौतुक , तुम्हाला नाव सांगू का ?.."
पार्थ " हो.. हो.. सांग पटकन..."
तसा रवी तो गुन्हेगार आणि तो आता कोणा कोणाला मारणार आहे त्याची नाव सांगतो ".........."
पार्थ नाव ऐकुन शॉक होतो.. त्याच्याकडे ज्या व्यक्तीचा फोटो होता त्याचा चेहरा बघून ओळखू शकला नाही , जेव्हा रवीने त्याच नाव घेतल तेव्हा त्याला सगळ आठवल आणि सोबत त्या चौघांचे नाव ऐकुन तो जागीच फ्रिज झाला...
रवीने त्याला हलवून भानावर आणल " सर काय झाल ?.."
रवीच्या हलवण्याने तो भानावर येत " हे.. हे.. कस शक्य आहे , मला विश्वास च बसत नाही आहे.. आणि तो.. तो कसा काय जिवंत तो तर..."
रवी " हो सर मी जेव्हा माहिती काढली तेव्हा मलाही विश्वास बसला नाही.. नंतर कन्फर्म करून बघितल तर ते खर निघाल.. आता तो कुठे आहे ते मी सांगू शकतो पण तो फोटोतला व्यक्ती कुठे असेल ते ( समोर कोणासोबत तरी बोलत उभ्या असलेल्या माणसाला बघत..) हाच सांगू शकतो..."
पार्थ " तुला त्या ...... बद्दल कस समजल..."
रवी " सर माझे दोन साथीदार त्याच्या वर लक्ष ठेवून आहे तेही त्याच्याच पिंजऱ्यात..."
पार्थ त्याच्या कडे भुवया उंचावत " हम.. मग तुला ( आपल्या मोबाईल मधून एका मुलीचा फोटो दाखवत ) ही मुलगी म्हणजे आरोही वाहिनी बद्दल पण माहीत असेल हो ना.."
रवी " ही मुलगी ( तो आठवण्याचा प्रयत्न करतो नंतर त्याला लगेच काही तरी क्लिक होत..) हो ही मुलगी पण तिथेच आहे त्यांचा तावडीत.."
पार्थ " म्हणजे आरोही वाहिनी तिथेच आहे.. चल लवकर मला तिथे घेऊन.."
रवी " सर आता रात्र झाली आहे म्हणजे तिथे खूप कडक सिक्युरिटी असेल आणि तुम्ही एकटे त्यांच्याशी कस लढणार तुम्हाला काही झाल तर.."
पार्थ पुढे काही बोलणार तर त्याला एक कॉल येतो..
पार्थ कॉल रिसिव्ह करून " हॅलो..."
पलीकडून "................."
पार्थ " काय ? एक मर्डर ( त्याला मध्येच काही तरी क्लिक होत ).. एक मिनिट ती कोणी बाई आहे का..."
पार्थ " ओके मला त्या बाईचा फोटो सेंड करा..."
पलीकडून " ओके सर लगेच सेंड करतो..."
बोलून झाल्यावर दोन्हीकडून फोन कट होतो...
फोन कट केल्यावर पाच मिनिटांनी पार्थ ला फोटो सेंड झाले.. पार्थ ते फोटो बघतो तर त्यात एका बाईच शरीरावर ठिकठिकाणी जळल्याचे निशाण होते चेहऱ्यावर पण थोडेफार निशाण होते.. पार्थ लगेच त्या बाईला ओळखतो ती बाई गीता असते आणि त्याचा अंदाज खरा निघतो.. आणि ते फोटो रवी ला दाखवतो..
रवी समोर च्या माणसाला बघत " सर आता याची गरज नाही अस वाटत..."
पार्थ " हम.. पण याला शिक्षा भेटणार आहे त्याने केलेल्या कामाची... रवी आता तर तिथे जावच लागेल मी माझ्या टीमला लगेच यायला सांगतो आपल्या पाठी तू मला ॲड्रेस सेंड कर...एक मिनिट ..... हा तिथे असेल मग ते विश्वनाथ आणि रक्षित हे दोघ.."
रवी " सर विश्वनाथ आणि रक्षित हे दोघ तिथेच असणार... हे तिघ जण रोज रात्री भेटत असतात..."
पार्थ " मग तर मला तिथे लवकरात लवकर पोहोचायला हव..."
रवी " हो सर.. सर मी पण येणारे तुमच्या सोबत.. "
रवी " थँक्यू सर.. सर बघा मी ॲड्रेस सेंड केला आहे.."
पार्थ त्या जागेचा ॲड्रेस सेंड केल्यावर त्याच्या टीम मधल्या एकाला कॉल करतो..
पलीकडून कॉल उचल्यावर पार्थ " हॅलो.. मी सांगतो ते नीट ऐका..."
पार्थ " हा.. तर ऐका आपली जी केस चालू आहे आता त्यात विचित्र मर्डर झाले त्याचा गुन्हेगार भेटला आहे.. त्याने आता एक बाईचा मर्डर केला आहे आणि तो आता आणखी तीन जणांचा मर्डर करणार आहे तर आपल्याला त्या जागी जायच आहे त्याला पकडायला.. सो आपली टीम रेडी करून त्या ॲड्रेस वर या माझ्या मागोमाग मी ॲड्रेस सेंड करत आहे.. आणि हो मी अजून एक ॲड्रेस आणि मोबाईल नंबर सेंड करत आहे अजून एका बकऱ्याला पकडायच आहे तर दोन जणांना पाठवा जर तो मी पाठवलेल्या ॲड्रेस वर सापडला नाही तर त्याचा नंबर ट्रेस करायला सांगा... "
पलीकडून " हो सर मी माने आणि यादव यांना पाठवतो...मी लगेच निघतो आपली टीम घेऊन..."
फोन ठेवून झाल्यावर पार्थ रवी ला " चल रवी तिथे काही घडण्याअगोदर आपल्याला पोहोचाव लागेल..."
पार्थ आणि रवी लगेच तिथून निघतात.. निघताना पार्थ मनात " निखिल ला सांगायला नको नाही तर तो सोबत यायचा हट्ट करेल... आला तर त्याला काही झाल तर... नकोच... नंतर समजावेल त्याला..."
इथे आरोही अंधाऱ्या रस्त्यावरून गाडी चालवत होती हेडलाईटचा प्रकाश असल्याने तिला कोणताही प्रोब्लेम नव्हता... इथे तिथे बघत असताना तिच लक्ष समोर ठेवलेल्या मोबाईल वर जात तस तिच्या चेहऱ्यावर मोठ हास्य पसरत...
आरोही रिया कडे बघून " रीयु..."
रिया आरोही च्या आवाजाने तिच्या कडे बघते आणि डोळ्यांनीच " काय " अस विचारते.. तशी आरोही तिला डोळ्यांनीच समोर बघायला सांगते.. रिया समोर बघते तर तिच्याही चेहऱ्यावर मोठ हास्य पसरत...
रिया लगेच ते मोबाईल उचलून कोणालातरी कॉल लावत असते तर आरोही ला समजत ती कोणाला कॉल लावणार आहे मग ती पटकन " हेय , कोणाला कॉल लावत आहेस.."
रिया " माझ्या मित्राला उर्फ जिजूंना लावत आहे..."
आरोही " वेडी आहेस का उगाच ते पॅनिक होईल..."
रिया तिच्याकडे रोखून बघत " आरु तू गायब आहेस त्याच्याजवळ नाही तर त्याने कसे काढले असतील दिवस... त्याला ऑलरेडी त्रासच झाला आहे..."
आरोही ला ही ते पटत पण तीच मन मानत तरीही ती काहीतरी ठरवून रियाला कॉल करायला सांगते.. तशी रिया लगेच कॉल करते...
इकडे निखिल झोपेतून च कॉल उचलतो " हॅलो.."
पलीकडचा आवाज ऐकुन निखिल खाडकन झोपेतून उठून बसत " आरु..."
दोघ थोडावेळ शांत असतात खूप वर्षांनी दोघ एकमेकांचा सहवास घेत होते.. दोघांना भरून येत होत...