Rutu Badalat jaati - 11 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..11







ऋतू बदलत जाती....११.

"हा कुठे...?? तु..तिला माझ्या मदतीसाठी थांबवले ना??"महेशीने भुवया उंचावल्या.

त्याने केसांतून हात फिरवला.
"ठिक आहे जा तुम्ही..."महेशी गालात हसली.

"अरे पण..कुठे..."अदीती अजूनही तिथेच होती.

" त्या पोलीसांकडे...."क्रिश.

****

आता पुढे...

घरात आता फक्त आजी ,सावी आणि महेशीच होती.

"महेशी बेटा दुपारच्या जेवणाला काय बनवायचं.."आजी.

"आजी तुम्हीच सांगा ना काय बनवू... अ...अनिकेत येणार आहेत का जेवायला..??."महेशी.

" तो जेवायला घरी येत नाही ..ड्रायव्हरच्या हातात डबा पाठवावा लागतो.. पण शांभवी गेल्यानंतर तो डबा ही नीट खात नाही तसाच परत येतो..."आजी.

"हम आज नाही येणार ..."महेशी काहीतरी विचार करत बोलली.

" तसच होवो..मी जरा माझ्या माळा करून घेते सावी झोपली आहे तोपर्यंत.." आजी तेथून निघून गेल्या.

महेशी ला राधा मुळे अनिकेतच्या सर्व आवडीनिवडी माहीत होत्या, त्याच्या चवी माहीत होत्या .तिने त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला. मस्त झणझणीत शेव ची भाजी भाकरीआणि रायता आणि गोड मध्ये तिने त्याच्यासाठी गुलाबजामून बनवले त्याला आवडतात तसेच घट्ट पाकातले गोड..
तिने त्याचा डबा भरला आणि डब्बा ड्रायव्हर कडे दिला.
"सरांचा डबा स्वतः त्यांच्या केबिनमध्ये येऊन देशील अगदी त्यांच्या टेबलावर ठेवशील ओके..."महेशी.

ड्रायव्हरने डोक हलवलं आणि तो डबा घेऊन गेला.

सकाळी गेल्या गेल्या अनिकेत फॅक्टरीमध्ये फिरला ,प्रोडक्शन चेक केले.त्याच्या माघारी मॅनेजरने बऱ्यापैकी सांभाळलं होतं .पण बरेच महत्वाचे डिसिजन खोळंबले होते. तो ऑफिसमध्ये आला ,शांभवीही त्याच्या मागे फिरत होती.
टेबलावर त्याचा टिफिन ठेवला होता पण त्यांने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि लॅपटॉप सुरु केला.
पण डबा अगदी लॅपटॉपच्या जवळ होता, अनिकेतला त्यातल्या शेव भाजी चा वास स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर त्याने लॅपटॉप बाजूला केला आणि तो डबा उघडला. आत मध्ये मस्त तर्रीवाली शेवची भाजी ,भाकरी ,कांदा ,रायता आणि गुलाबजामुन होते. हात न धुता त्याने तसाच त्याच्यावर ताव मारला . शांभवी गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तो नीट जेवत होता.

"थँक्स महेशी ..!! "शांभवी ने मनोमन महेशी चे आभार मानले.

त्याने तृप्तीने ढेकर दिला आणि त्या रिकाम्या डब्या कडे बघत बसला. आज बरेच दिवसांनी मन भरून जेवण झालं.

." पण मी हे काय केलं..?? माझ्या शांभवीला आता कुठे महीना होतोय आणि मी पोटभर जेवण करतोय ...कसं गेलं मला जेवण ?? कसं गेलं मला हे जेवण आहे.??. त्याने तडक घरी आजीला फोन लावला.

"आजी आज जेवण कोणी बनवलं होतं ..?"अनिकेत.

"महेशीने बनवलं होतं... का बाळा तुला आवडलं नाही का..??"आजी.

"आवडलं ..खूप आवडलं ..सर्व डबा फस्त केला मी .. पण तिला सांग आज पासून माझ्यासाठी जेवण नको बनवू !.." आणि त्याने दाणकन फोन आपटला शांभवी ही आश्चर्यचकित झाली असा कसा हा..?

आजींनाही आश्चर्य वाटलं, किती विचित्र मुलगा आहे..

"काय झालं आजी..??" महेशी.

"अनिकेतचा फोन होता.. म्हणत होता जेवण आवडलं..डबा पुर्ण फस्त केला ..आणि वरून म्हणतो कसा.. तिला सांग आज पासून माझ्यासाठी जेवण बणवत नको जावू.. काही खरं नाही या पोराचं..."आजी.

महेशीलाही हे त्याचं हे वागणं कळलं नाही..

"महेशीने तिचे हत्यार बाहेर काढले म्हणजे तिचा मोबाईल बाहेर काढला..

"हाय अनिकेत काय करताय तुम्ही जेवण झालं का..??"राधा.

"नेमका माझा मूड खराब असल्यावर ..मला प्रश्न पडत असतांनाच राधा चा मेसेज कसा येतो?? त्याला प्रश्न पडला त्यातच त्याने तो मेसेज उघडून बघितला.

"हम आत्ताच झालं.."अनिकेत.

"काय केल मग जेवण..?"राधा.

'हा सगळ माझ्या आवडीचं होतं.. शेवची भाजी गुलाब जामून.. आणि तुला सांगू हे सगळं जेवण महेशीने बनवलं होतं.. म्हणजे मला जसं आवडतं तसंच एक्झॅक्ट.... शांभवीही कधी असं बनवायची नाही.."अनिकेत .

"कदाचित तिला काहीच माहिती नसल्यामुळे तिने आजींना विचारलं असेल.."तीने बराच विचार करून टाईप केलं.

"हो असु शकतं.."अनिकेत.

"बरं मला सांग तू कशी आहेस..?? कुठे आहेस??"अनिकेत.

"मी ठीक आहे ..आणि तुझ्या जवळपासच आहे असं ती पुढे लिहिणार होती पण तिने ते खोडून टाकलं .फक्त ठीक आहे एवढंच लिहिलं

"राधा तुला एक विचारायचं होतं
.म्हणजे बघ ना ग ..शांभवी ला जाऊन आता महिनाच होईल.. पण आज माझ्या ताटात माझ्या आवडीचे पदार्थ आले तर मी भरपेट जेवण केलं.. मला शांभवीची आठवणही आली नाही. मी चुकीचं वागलो ना गं.?."अनिकेत.

आत्ता महेशीला आजीशी त्याच्या बोलण्याचं कारण कळलं..
"एखाद्याच्या घरी जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा आजूबाजूचे लोकं त्यांच्यासाठी जेवणाचं आणतात...बर्याच ठिकाणी त्याला कडू घास असं म्हणतात ..कारण त्या घरातली लोकं दुःखात असतात..म्हणून तो घास गोड लागत नाही...पण कडू का असेना आपल्याला तो खावाच लागतो... त्यामागे हेच सांगणे असते की..जीवंत माणसाला अन्न जरूरी आहे.. भलेही तो खुप दुःखात का असेना...आणि त्यात तुमची गोष्ट फारच वेगळी आहे.. तिला जावून महिना झाला आहे. जिवंत माणसाला भूक, त्रुषा ह्या गोष्टी सोडून चालत नाही ..त्यांना जगण्यासाठी ऊर्जा लागते .. त्यामुळे त्यांना भुकेले राहून चालत नाही आणि मला तर वाटतं महेशीने तुमच्या आवडीचं मुद्दामूनच पाठवल असेल जेणेकरून तूम्ही पोटभर जेवावे."महेशी.

"पण तरीही.. माझं मन कसं झालं खायचं ..??मला दुःख का नाही वाटलं त्या क्षणाला..??"त्याच मन त्याला खात होतं.

"हे बघ ..जरी तुमच्या मनाला खावसं नसेल वाटलं तरी.. तुमच्या शरीराला त्याची गरज होती ..त्यामुळे त्याने मनाला ताब्यात घेऊन.. जेवणावर ताव मारला ..आणि ही गोष्ट होणं खूप नैसर्गिक आहे.. यासाठी स्वतःला दोष देऊ नका.. आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सावीला सांभाळायचा आहे पुढे चालून तर... तुम्हाला स्वस्थ असणं जास्त गरजेचे आहे .. त्यासाठी तुम्हाला नीट जेवावच लागेल..
मी तर म्हणते... महेशीच्या हातच बनवलेलंच जेवण करा.. जेणेकरून तुमची तब्येत लवकर चांगली होईल तिच्या हातच्या जेवणाला नकार नका देऊ.."राधा.

"यप... तिच्या हातच्या जेवणाला नकार नका देवू.. ह्या वाक्यावर अनिकेत जरा विचार करायला लागला."मी तर राधा ला सांगितलं नव्हतं की मला महेशीच्या हातच्या जेवण नकोय ते..."त्याने मागची चाट स्क्रोल करून बघितली असं लिहिलेलं नव्हतं..

"म्हणजे राधा नक्कीच माझ्या आजूबाजूला आहे.. पण कुठे आहे ती..?? कोण आहे .?? राधा नावाची कुठलीच व्यक्ती माझ्या एवढ्या जवळ नाही ..?? का राधा हे नाव सुद्धा तीच खोट असेल ..?? तिला विचारायलाच पाहिजे "त्याने लगेच टाईप केले.

"राधा..!! मला नेहमी प्रश्न पडतो राधा हेच तुझं खरं नाव आहे का...??" पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. खरं तर तिकडे सावी उठली होती ,त्यामुळे महेशीने मोबाईल तसाच टेबलवर ठेवून तिच्या रूम कडे धाव घेतलेली.

"पण काही का असेना राधा.. तुझ्याशी बोलल्यावर मन नक्कीच शांत होत ...मला खरंच तुझी गरज होती आता ..आणि बघ तू आलीस.. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तू साथ देतेस...."अनिकेत मनात राधाला आठवत होता.

*******

"हा क्रिश.. काही माहिती लागली का तुमच्या हाताशी ..काही बोलला का तो इन्स्पेक्टर??" महेशीने आल्या आल्या क्रिश ला विचारपूस करायला सुरुवात केली.

"तो नंबर जवळच्या खेड्यातल्या ..एका माणसाचा आहे .त्याला ताब्यात घेतल आहे ..पण तो म्हणतो हे त्याचं सीम हरवलं होतं ..आणि मग परत त्याला सापडलं.. इन्स्पेक्टर आता त्याचा पुढचा तपास करत आहेत... तू कुठे काम करतो वगैरे वगैरे सुरू आहे तपास ..कदाचित तीथे कोणी त्याच्या मोबाईल मधले ते सिम काढून घेतले असेल आणि वापरून परत ठेवून दिलं असेल ...पण कदाचित..हा..."क्रिश.

"असं कसं शक्य आहे?? तुमच्या मोबाईल मधून कोणीतरी सिम काढत ..आणि परत तुमच्याजवळ ठेवून देत.. .."महेशीने नकारात मान हलवली."बरं त्या ट्रक विषयी काही समजलं का..??"महेशी.

" इथे यायच्या आधी एक चेक पोस्ट लागतो.. त्या चेक पोस्टवर.. सीसीटीव्ही आहेत.. तिथे तो ट्रक क्रॉस झालेला बघितला आहे ..त्याचा नंबर ही नोट केला आहे ..आता पोलिस पुढचा तपास करत आहेत.."क्रिश.

"हे ठीक झालं... कदाचित त्या ट्रकचा ओनर पकडला गेला तर ...मुख्य माणसापर्यंत पोहोचता येईल.. "आजी.

तेवढ्यातच अनिकेतचा परत फोन आला.
" ह आजी.. सावी उठली का ..ती कशी आहे...??"अनिकेत.

"हो उठली आहे.. खेळत आहे..आता थोडी छान राहते ती ..त्या सुवर्णा जवळ होती तेव्हा सारखी रडत रहायची.. महेशी अगदी तिच्या आईसारखीच सांभाळते तीला..."आजी.

"हा.."अनिकेत.

"बर तू संध्याकाळी केव्हा येशील..? मावशींना काय सांगू तुझ्यासाठी बनवायला..?"आजी.

" सात आठ वाजेपर्यंत येईल मी ...पण मावशीला नको सांगू ..महेशीलाच बनवू दे स्वयंपाक.."अनिकेत.

"नक्की ना??"आजी.

"हो ग.. नक्की.."अनिकेत.

"आजीने फोन स्पीकर वर टाकला होता त्यामुळे महशिला हे ऐकू गेले. अनिकेत काय बोलला होता ते . तिलाही हायसं वाटलं..संध्याकाळी परत तिला त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं होतं. जेणेकरून तो संध्याकाळीही पोटभर जेवेल.. तिला आठवलं एकदा तो म्हटला होता मेथीची डाळ घातलेली कोरडी भाजी त्याला खूप आवडते, थोडीशी गुळचट चविची मात्र.. त्याची आई बनवायची तशी. पण आई गेल्यावर त्याने ती भाजी खालीच नव्हती कारण तसं कुणी बनवायच नाही. मग त्याने ती भाजी खाणंच सोडलं.
आज तीच भाजी बनवायची तिने मनाशी पक्के ठरवले.

ऋतू बदलत जाती...
आशेच्या लहरीवर....
नाव वल्हावत नेती....
ऋतू बदलत जाती....

क्रमक्षः...

******
भेटूया पुढच्या भागात...

©®शुभा.