Rutu Badalat jaati - 24 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..24


ऋतू बदलत जाती...२४.



आजींनाही वाटत होतं की अनिकेत आणि शांभवी ला जरा वेळ देऊ या... म्हणून त्याही त्यांच्या रुममध्ये निघुन गेल्या. रूम मध्ये शांभवी ,अनिकेत आणि झोपलेली सावीच होती.



आता पुढे....


दोघांनाही काय बोलावं ते कळत नव्हतं, सांगायचं तर भरपूर होतं.. दोघं फक्त एकमेकांकडे बघून स्मित देत होते.
दहा-पंधरा मिनिटे फक्त एकमेकांकडे मनभरून बघितल्यावर अखेर शांभवीनेच चुप्पी तोडली .

"खूप त्रास झाला असेल ना...?? मी नसताना.. माझ्या सावीला...."शांभवी.

" फक्त तुझ्या सावीला नाही... मलाही... !..जगावं अस वाटतच नव्हतं ...........फक्त सावीसाठी जिवंत होतो....शांभवी ..!! आता तू मला सोडून कुठेच जाणार नाही ना..??"अनिकेत

" अनि ...हे बघा ..! मला हातात वस्तू पकडता येतात.. मी तुम्हाला दिसते.... मी एका जिवंत माणसासारखी तुमच्या समोर आहे.. आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही.." शांभवीच्या मनात स्वार्थ डोकावला होता...

"जीवंत..माणसासारखी म्हणजे.."??शांभवीच्या बोलण्याने अनिकेतच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.

"मी तुम्हाला सर्व सांगते अनि..."
शांभवीने ती कशी भूत बनली.. क्रिश ने तिची कशी मदत केली ,ते सर्व सांगितलं .पण साधू ..त्यांचा पुनर्जन्म, जानकी, वैदेहीची कथा...तसच तीने महेशीला ईथे का बोलवलं हे सर्व सोडून....कदाचित तिच्यात मोह उपजत होता...अनिकेतचा.. त्याच्या प्रेमाचा ..
सावीचा .. आता तिची इच्छा त्यांना सोडून जायला होत नव्हती... पण विधिलिखित ती बदलू शकणार होती का???

ती सांगत होती अनिकेत ऐकत होता .

"म्हणजे इथं शांभवी माझ्या आसपासच होती... मी महेशी विषयी.. राधा ..विषयी विचार करत होतो ...तिच्या हातच्या जेवणाने खुश होत होतो.. तिच्याशी बोलून आनंदी होत होतो.. तेव्हा हे बघायला शांभवी इथेच होती... "आता अनिकेतला शांभवीशी नजर मिळवणे थोडे अवघड झाले. त्याचं मन त्याला आतून खात होतं. त्याला वाटलं महेशी विषयी तिला खरं खरं सांगून टाकावं." कि तीच माझी राधा आहे... माझी ?? माझी तर शांभवी आहे... नाही नाही मी काय विचार करतो आहे ..?? शांभवी परत आली आणि मी अजूनही राधा मधेच गुंततोय... त्याच्या मनाची दोलायमान अवस्था झाली होती.." हो मला सांगावच लागेल... शांभवीला ..कि महेशीच राधा आहे...."अनिकेत विचारात होता.

"अनि..काय झाले..??"शांभवीच बोलणं संपल्यावर सुद्धा त्याचं लक्ष नव्हतं .

"शांभवी ..!! महेशीच राधा आहे ..."अनिकेत.

"अनि.. मला ते कळलंय... ज्या दिवशी तुम्ही तिचा मोबाईल बघत होते.. त्या दिवशी मी तिथेच बसली होती....महेशीनेही मला हे ..ईथे आल्यावर सांगितले होते..."शांभवीला मनातून भिती वाटत होती..तो असं तर नाही म्हणणार...कि मी..राधावर..प्रेम...

"...तुला माहीत आहे तर..तर तुला सांगायला काही हरकत नाही....राधा मुळेच मी तुझ्या जाण्याच्या दुःखातून बाहेर निघू शकलो...तिचे शब्द नेहमीच माझ्या दुखऱ्या मनावर फुंकर घालतात....आताही तेच कामात आले.."अनिकेत.

" मला माहित आहे अनि..." पुढे ती काही बोलणार तेव्हाच सावी उठली.

शांभवीने लगेच सावीला जवळ घेतलं, पण ती तिला बघून रडायला लागली.

" अरे माझ्या पिल्लू ..ममा आहे.. ममा ..ममा जवळ..आहे तु..." शांभवी तिला शांत करत होती,पण ती चुप व्हायचे नाव न घेता उलट अजून जोरात रडायला लागली... शांभवीचा स्पर्श आणि तिचा चेहरा तिला अनोळखी भासत असेल कदाचित.... अनिकेतने पुढे होऊन शांभवीकडून सावीला घेतलं .अनिकेत कडे जाताच ती लगेच शांत झाली.

" अनि माझी सावी विसरली का हो मला ...माझा चेहरा ...माझा स्पर्श ...काहीच आठवत नाही आहे तिला..."शांभवी भाऊक झाली.

"नाही..शांभवी...जरा वेळ दे तिला..तु बरेच दिवस समोर नव्हती तिच्या...आणि आज बरचं काही घडलं आहे तिच्यासोबत..."अनिकेत समजावणीच्या सुरात बोलला.

"हम्म..."शांभवी.

"आणि..सावीला मीच जास्त आवडतो हो..ना..शोना..."अनिकेत साविशी बोलत होता. लहान मुलं समोर असले की सर्व काही विसरायला होते,अनिकेतही जरा वेळासाठी सर्व विसरला होता आणि शांभवीचं मन वळवायला बघत होता.

"..हो...का..??..ममा नव्हती थोडे दिवस तर माझ्या सावीने पार्टी बदलली का..?का... ममा जवळ चटके लागत होते बच्चाला..??.. बाबा जवळ किती शांत आहे ..." शांभवी लटक्या रागाने बोलली आणि परत प्रेमाने तिला हात लावला ,पण सावी लगेच रडायला लागली .आता दोघांना आश्चर्य वाटलं , ह्यातचं अनिकेतचा हात शांभवीच्या हाताला लागला ,तर त्याला तो गरम जाणवला.

"शांभवी तूझं अंग खरच गरम आहे... खूप जास्त गरम आहे .. "अनिकेत.

आता शांभवी लाही काहीतरी जळत असल्यासारखं जाणवल...आग व्हायला लागली तिच्या शरीरामध्ये...

"अनिकेत... !! खूप आग होतेय.. खूप आग होतेय अनिकेत...!! "शांभवी.

" शांभवी ..!!..काय होतंय..??" अनिकेत.

ती बाथरूम मध्ये थंड पाण्याच्या शॉवरखाली गेली, तरीही थंड पाण्याने काहीच फरक पडत नव्हता .ती ओलीही होत नव्हती,अंग अजूनही जळत होतं वरून दिसत नसलं तरी आतून तिला जाणवत होतं...ती पळतच परसातल्या मंदिरात गेली.

"देवा महादेवा...!! हे काय होतंय मला...?? का माझ्या जीवाची ही लाही लाही होतेय..
महादेवा ...काय चुकलं माझ्याकडून..??." तेवढ्यात समोर गेटमधून तेच साधू तिला आत येताना दिसले, ती पळत त्या साधूकडे गेली.

" बाबा ss ..बघा माझ्या शरीराची लाहीलाही होतेए... खूप आग होतेय..याला शांत करायला काही उपाय सांगा बाबा.... तीने त्यांच्या पायाशी लोळण घातली. त्यांनी मात्र पाय बाजूला घेतले..

"तू महादेवाच्या आज्ञेचा अपमान केलास.... विधिलिखित बदलू पहात होतीस.... स्वार्थी स्वार्थी.. दूर..हो..."साधू.

"बाबा काय चूक झाली माझी ..ते तरी सांगाल...?"शांभवी.

"शंभू ने तुला शक्ती बहाल केली.. तू विसरून गेली तुझं कार्य काय होतं ते... स्वार्थी झालीस तू .."साधूबाबा.

आता शांभवीला हळूहळू कळायला लागलं. ती तिचं कर्तव्य विसरून ,अनिकेत सोबत थांबण्याचा तिथेच राहण्याचा तिच्या सावी जवळ .. विचार करत होती.

"बाबा मला माफ करा ..महादेवाला सांगा मला माफ करा...बाबा मी फक्त त्यांच्यासोबत राहणार होते.. "शांभवी.

"तरीही बेटा तुझा मुक्तीचा काळ जवळ आला आहे... विधात्याने तुझ्यासाठी वेगळेच लिहिलेलं आहे तू ते बदलू शकत नाहीस... तुला मुक्ती मिळतेय... विधात्याच्या चरणी तुला स्थान भेटतेय... ही खूप मोठी गोष्ट आहे... बडे बडे ऋषी-मुनी, तपस्वी... कित्येक वर्ष तप करतात तेव्हा कुठे त्यांना ही संधी भेटते .. .क्षणिक मोहात अडकून नकोस ....तुझ्या आयुष्याचं कल्याण कर... तुझं हे नश्वर शरीर कधीच नष्ट झालेला आहे... आता ह्या आत्म्याला इथं मृत्युलोकात अडकवू नकोस... जा त्या विधात्याला शरण जा... तुझं कर्तव्य कर आणि मुक्त हो मुक्त हो...." असं म्हणून त्या बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला तिच्या शरीराचा दाह कमी झाला.

"हो बाबा.. मी क्षणिक मोहात अडकले होते.. बाबा तुम्ही माझ्यासाठी धावून आलात ..मी तुमची खूप खूप आभारी आहे... मी उद्याच अनिकेत...महेशीचा विवाह संपन्न करेल....मी वचन देते..." शांभवी.

"शांभवी..!! काय बोलतेस तु हे..?? हे बाबा कोण आहेत ..??..अनिकेतच्या कानावर महेशी आणि अनिकेत चा विवाह हे शांभवी चे शब्द गेलेले होते.

"अनि मी तुम्हाला सर्व सांगते.. आधी आपण बाबांना आत बोलवू... त्यांचा आशीर्वाद घेऊ...."शांभवी.

क्रमश:

©️®️शुभा.