भटकंती.......पुन्हा एकदा

(192)
  • 159.2k
  • 73
  • 60.4k

सूर्यास्त होतं होता. ढगांची धावपळ सुरु होती घरी पोहोचण्यासाठी. खाली नदीचं विस्तीर्ण पात्र, गाढ झोपेत असावी अशी भासावी इतकी शांत होती ती. शेजारी असलेल्या वनात पक्ष्यांचे थवे दिसतं होते.... घरी परतलेले. सूर्याची किरणे झाडा-झाडात दिसत होती अजूनही .... काय फोटो होता तो. असं वाटतं होतं कि समोरच उभा राहून पाहत आहोत सगळे. " wow !!! amazing.... शब्दच नाहीत माझ्याकडे काय बोलू ते... means ... एवढं feel होते आहे ना हा फोटो बघून... " कोमलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. लगेच तिने पुसूनही टाकलं. संजनाने सहानुभूतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. " होते असं.. जे जे हा फोटो

Full Novel

1

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १)

सूर्यास्त होतं होता. ढगांची धावपळ सुरु होती घरी पोहोचण्यासाठी. खाली नदीचं विस्तीर्ण पात्र, गाढ झोपेत असावी अशी भासावी इतकी होती ती. शेजारी असलेल्या वनात पक्ष्यांचे थवे दिसतं होते.... घरी परतलेले. सूर्याची किरणे झाडा-झाडात दिसत होती अजूनही .... काय फोटो होता तो. असं वाटतं होतं कि समोरच उभा राहून पाहत आहोत सगळे. " wow !!! amazing.... शब्दच नाहीत माझ्याकडे काय बोलू ते... means ... एवढं feel होते आहे ना हा फोटो बघून... " कोमलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. लगेच तिने पुसूनही टाकलं. संजनाने सहानुभूतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. " होते असं.. जे जे हा फोटो ...Read More

2

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २)

" गेल्यावर्षी ... पावसा आधी... जून महिना बहुदा..... नाही, नाही... मे मध्ये भेटला होता " ," मे महिन्यात... ? मग लेख या महिन्यात कसा .. " संजना विचारात पडली. " आमचं मॅगजीन वार्षिक आहे ना.. वर्षभरात एकदाच येते.. मी पण तसंच करते.. जानेवारी पर्यंत लेख लिहीत असते... त्यानंतर ते मॅगजीनमध्ये प्रिंट करतात... मे महिन्यात वार्षिक अंक प्रकाशित करतात.... शाळा - कॉलेजला सुट्टी असते ना म्हणून हा सुट्टी विशेषांक आहे ..." ," ठीक आहे ... सॉरी , मला माहित नव्हतं हे.. " आणि संजना रडू लागली. " काय झालं रडायला... ? " कोमलला कळे ना का रडते ते. " रडतेस का... त्या दोघांचे ...Read More

3

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ३)

" तुम्ही मघाशी ओरडलात ना... ऑफिसमध्ये.. नक्कीच हिने चिमटा काढला असेल.. " सुप्रीने संजनाच्या पाठीवर हळूच चापटी मारली. " कोण ? "," मी कोमल... travel blogger आहे. एका मॅगजीन साठी लिहिते मी. "," खूप छान... फिरायला आवडते वाटते... बरं आहे.. मी सुप्रिया... हिची लहानपणापासूनची मैत्रिण.. हिचं जास्त मनाला लावून घेऊ नका.. आणि मला माहित आहे, तुमचा कोणता विषय सुरु आहे ते.... ह्या संजूला ना वेडं लागलं आहे... काहीही करते, कोणालाही बोलावते आणि डोळ्यांचा नळ सुरु करते. ये रडू बाई.. हसतेस कि करू गुदगुल्या... " सुप्रिया संजनाकडे पाहत बोलली. तशी संजनाने हलकीशी smile दिली. " मी हिला जेवायला बोलवायला आलेले.. तुम्ही येता ...Read More

4

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ४)

संजनाने सुप्रीला घरी सोडलं. ऑफिसमधे जरी काही दाखवलं नसलं तरी तिने कोमल-संजनाचं बोलणं ऐकलं होतं. आकाशची आठवण झाली तिला. तो दिवसही आठवला. फ्रेश होऊन खिडकीसमोर बसली होती सुप्री. आकाशच्या आठवणी जाग्या झाल्या. " आई !! मी गच्चीवर आहे. " म्हणत ती गच्चीवर आली. मे महिन्याची संध्याकाळ ती. थोडासा वारा वाहत होता. ढगांचे तर नामोनिशाण नाही आभाळात. सुप्री पुन्हा तेच आठवू लागली... " तो " दिवस.. !! गेल्यावर्षी जून मध्ये पाऊस कमी पडलेला , त्यामुळे वातावरणात म्हणावा तसा थंडावा नव्हता. आकाशने सुद्धा "भटकंती" ला जाण्याआधीच... " जूनमध्ये पाऊस कमी असेल ...Read More

5

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ५)

" चला .. आम्ही निघतो... ती बॅग सापडली बसमध्ये, एका ठिकाणी अडकून बसली होती. म्हणून कळलं तुमचा माणूस गेला ते सांगायला आलेलो. डेड बॉडी मिळाली तर कळवू. एक फोटो देऊन ठेवा त्याचा. " आकाशच्या वडिलांनी त्याचा फोटो आणला होता सोबत. देऊन टाकला. सगळे निघाले. सुप्री एका ठिकाणी तशीच उभी. " काका... मी येऊ का तुमच्या सोबत... " सुप्री त्या पोलिसांना उद्देशून बोलली. " कुठे ? " ," आकाशला शोधायला.. " ," काय वेड-बीड लागला आहे का तुम्हाला... महापूर आला आहे तिथे... "," प्लिज .. प्लिज... काका मला सुद्धा घेऊन चला... " सुप्री त्यांच्या पाया पडू लागली. " अहो मॅडम... काय तुम्ही हट्ट ...Read More

6

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ६)

" कोण कुठे निघालं आहे ? " अमोल आला तितक्यात. अमोलला काहीच सांगायच नव्हतं. तो आला समोर, काय सांगावं... समोर प्रश्न.." काही नाही सर , फिरायला निघायचा प्लॅन करतो आहे. ... पिकनिक... " ," wow !! very nice.. जाऊ या ना सगळेच... कुठे जायचे आहे... मी सुद्धा येतो... " अमोल खुशीत बोलला. आली का पंचाईत . अमोलला काय सांगावं आता. तरीही सुट्टी घ्यावी लागेलच ना, जायचे असेल तर... " हि माझी मैत्रीण कोमल... travelling करत असते. ती निघाली होती पुन्हा... तर तिच्यासोबत जायचा विचार होता. " संजना अडखळत बोलली. " चालेल ना... जाऊया सर्वच... कोण कोण येणार आहे ते ठरवा. मी पप्पांची ...Read More

7

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ७)

अखेर २५ मे आला. सर्वानी तयारी तर भक्कम केलेली. तरीसुद्धा शेवटच्या दिवशी काम केलेच पाहिजे , म्हणून सर्व ऑफिस आलेले. अमोल सुप्रीचीच वाट बघत होता. त्या दोघी जश्या आल्या तसा तो लगेच त्याच्याशी बोलायला आला. " काय मग ... येणार ना उद्या... " सुप्रीलाच पहिला प्रश्न. " येते आहे.. माझ्यामूळे लोकांना misunderstanding होते. म्हणून तयार झाले. उगाच गरीब आहे म्हणून नावं ठेवतात लोकं . " अमोलला काय बोलावं कळेना, हसू लागला. " बरं ... सॉरी बाबा.. पण थँक्स... तू तयार झालीस... तुझ्याशिवाय मज्जाच आली नसती तिथे " ," मी काय जोकर आहे का ? " सुप्रीच्या त्या डायलॉग वर पुन्हा हसू ...Read More

8

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ९)

कोमल , संजना ,सुप्री आणि मंडळी, शहरातून गावाकडे निघाली होती. काही तुटक माहिती आणि खूप सारा आत्मविश्वास घेऊन प्रवास झालेला. आता सकाळचे ८ वाजले आहेत, एका तासात पोहोचू , असा कोमलचा अंदाज. सुप्री गप्प, संजना तिच्या शेजारी झोपलेली. आणखी काही मंडळी इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत झोपलेलं बरं म्हणत निद्राधीन झालेली. अमोल मात्र भारी खुश होता. जाग आल्यापासूनच त्याचं "click... click... " सुरु झालेलं. बहुतेक बसच्या बाहेर दिसतं होतं तेच फोटो होते. गुपचूप १-२ सुप्रीचेही फोटो काढले होते त्याने. कॅमेरा तसा महागातला होता त्याचा. दूरवरचे फोटो सुद्धा स्पष्ठ दिसायचे. खुपचं फोटो क्लिक झालेले, नंतर ...Read More

9

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ८)

पुन्हा आठवण, त्यात पावसाच्या ढगांनी आभाळ भरत चाललं होतं. थंड गार वारा... मागे असलेल्या झाडाच्या पानांची प्रचंड सळसळ... " काढू नये... किती वेळा सांगितलं तरी आमच्या येडीला कधी कळणार हे त्या गणूलाच माहित... " आकाशने टपली मारली सुप्रीच्या. क्षणभरासाठी, तिला आकाश शेजारीच बसला आहे असा भास झाला. सर्वच आठवणी उफाळून बाहेर येण्याचा प्रयन्त करत होत्या. नको थांबायला येथे... घड्याळात पाहिलं... संध्याकाळचे ५:३० वाजतं होते. सुप्री उभी राहिली, पुढे जाणार तर कोणीतरी ओढणी पकडून ठेवलेली... आकाश मुद्दाम कधी सुप्रीची ओढणी गुपचूप टेबलला बांधून ठेवायचा... आनंदाने सुप्रीने मागे पाहिलं. मगाशी आलेल्या वाऱ्याच्या झोताने , ओढणी टेबलाला गुंडाळली होती. पुन्हा थंडगार हवा ...Read More

10

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १०)

पावसाचा वेग कमी झालेला. अमोल सोडून बाकी सर्व एका जागी शांत बसून होते. अमोलचं फोटो काढणं सुरूच होतं. पुजारीने एकदाच अमोल कडे पाहिलं. नंतर या सगळ्याकडे नजर टाकली. " पहिल्यांदा आलात वाटते तुम्ही.... इथे " ," हो.. तुम्हाला कसं कळलं ते ... " ...संजना " हे महाशय ... ज्याप्रकारे फोटो काढत आहेत त्यावरून... फिरायला आलात वाटते तुम्ही... " पुजारीने चौकशी केली. " हो... फिरायचे तर आहेच.. पण आणखी एका कामासाठी आलो आहोत.. " कोमलने सांगितलं. " असा कोणी व्यक्ती तुम्ही बघितला आहे का... जो या सर्व गावकरी , शेतकरी पासून वेगळा वाटतो. म्हणजे इथला वाटत नाही असा.. दाढी- केस वाढलेले... जो सारखा भटकत ...Read More

11

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ११)

" Hi .. मी सई .. फोटोग्राफी शकते आहे. मला अशी काही ठिकाणी जायचे आहे , जिथून छान छान काढता येतील. गावात विचारलं तर त्यांनी तुझं नावं सांगितलं... माहित आहे का तुला.. " आकाश पुन्हा हसला. " कसं असते ना, माणूस एवढा गुंतलेला असतो ना आपल्या विचारात , कि गोष्ट समोर असली तरी दिसत नाही.. " आकाश स्वतःशीच बोलत होता. " what.... ?? means काय समजलं नाही मला... " सईने लगेच बोलून दाखवलं. " एवढं समोर... निसर्ग त्याचं सौंदर्य उधळत असताना, तुम्ही विचारत आहात... कुठे मिळेल चांगलं ठिकाण... " आकाश समोर पाहत बोलत होता. खरंच किती छान होतं ते द्रुश्य.. सई ...Read More

12

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १२)

समोर हिरवं -हिरवं गवत.. अगदी ढोपरापेक्षा हि उंच... जमिनीवर तरी तेच होतं सगळीकडे... आणि समोर... बरोबर समोर , आणखी डोंगर दिसतं होता... परंतु थोडा दूर होता. त्याच्या आजूबाजूला पांढरे ढग ,प्रवास करत होते. त्याचं वरचे टोक तेव्हढं दिसतं होतं. सारे ढग त्याच्या बाजूने जात होते... पांढरी शुभ्र नदी जणू काही... त्याला चिटकून , तर कधी त्याच्या माथ्याला स्पर्श करत पुढे निघाले होते. सईला समोर काय आहे त्यावर विश्वास नव्हता. आकाश एका जागी उभा राहिला. सईचे बाकी मित्र पटापट फोटो काढत होते. पण सई ... अजूनही ती भानावर आली नव्हती. समोर आहे ते खरं ...Read More

13

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १३)

" मराठी छान बोलतोस तू .. म्हणजे इथला या गावातला वाटतं नाही " सईने मागूनच आकाशला विचारलं. अजूनही ते डोंगरावरच बसलेले होते. " Actually, मला माहीतच नाही मी कुठला आहे ते... " आकाश तिच्याकडे न बघताच बोलला. " अरे व्वा !! इंग्लिश शब्द सुद्धा माहित आहे का .. very good .. पण नक्की राहतोस कुठे तू... " ," सांगतो, आता पुढे जाऊया. तुम्ही तुमच्या वाटेने... मी माझ्या वाटेने.. " ," अरे !! आम्हाला आणखी फोटो काढायचे आहेत.. असा कसा जातोस सोडून.. by the way... कुठे निघाला आहेस.. "," माहित नाही... पाय जातील तिथे... चला निघूया.. पावसाला सुरुवात झाली कि अवघड होईल ...Read More

14

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४)

" excuse me.... आज काय उपवास आहे का.. जेवणात काय fruits खायचे का... " अमोलने या दोघींनी आणलेल्या पाहत comment केली. " काय पाहिजे होते... ऑर्डर देयाची ना आधी... " सुप्री वेडावत बोलली. आजकाल, मूड बदलायचं बटन सापडलं होतं तिला. काही क्षणापुर्वी डोळ्यातलं पाणी पुसरणारी सुप्री पुन्हा नॉर्मल झालेली. " काहीही चाललं असतं मला .. तिखट पाहिजे होतं जरा.. " अमोल बोलला तसा तिला त्यांच्या पहिल्या भटकंतीची आठवण झाली. आकाशने असंच विचारलं होतं ना सगळ्यांना. आठवणीने हसायला आलं तिला. आवरलं लगेच. " आहे ते खा... नाहीतर तुम्ही जाऊन आणा. बघ रे गणू... कशी असतात माणसं... " सुप्री हसत म्हणाली. ----------------- X ----------------------- ...Read More

15

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १५)

"hi सुप्रिया .. कशी आहेस.. " अमोल सुप्री जवळ बसत म्हणाला. " मला काय झालंय ... गणूने आतापर्यंत छान आहे मला.. " ," तसं नाही... आपलं बोलणंच झालं नाही ना सकाळ पासून.. आता बघ, रात्र सुद्धा झाली. दिवसभर तू फिरत होतीस.. आणि मी इथे.. " ," अरे मग यायचे ना माझ्यासोबत फिरायला... बसून काही मिळत नाही... आणि मी काही celebrity आहे का माझ्या बरोबर बोलायला " ," बाकीच्यांचे माहित नाही... but तू special आहेस माझ्यासाठी... " ," हो का.. "," हो तर... एवढ्या मुली बघिल्या... तुझ्या सारखी तूच... अशी कोणी दुसरी नसेल."," माझ्यासारखी म्हणजे... पागल ना... डोक्यावर पडलेली.. " ते ...Read More

16

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १६)

आकाश अजूनही त्या शेकोटीजवळ बसला होता. " कोण आहोत आपण... कधीच काढून टाकला होता मनातून हा प्रश्न... या सर्वामुळे आला समोर... कोण असतील माझी माणसं, कुठे असतील.. काय नातं असेल पावसाचं आणि माझं... " माझा गणू ", ... माझाच आहे कि कोणा दुसऱ्याचा... आणि तो चेहरा, सतत आठवण्याचा प्रयन्त करतो मी.. कोण असेल ती, काय अस्तित्व असेल माझं.. " स्वतःशीच विचार करत होता आकाश. दूरवर नजर गेली त्याची. या डोंगरावरच्या मिट्ट काळोखात आग दूरवर दिसत होती. कुठेतरी दूर डोंगरावर अशीच कोणीतरी आग पेटवली असावी. हे दोन डोंगर एकमेकांपासून खूप दूर होते. या दोघामध्ये पसरलं होतं विस्तीर्ण जंगल... गावे आणि ...Read More

17

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १७)

तिथे दुसऱ्या टोकाला . सुप्री आणि तिच्या मैत्रिणींनी , खाली गावात जाऊन , अंघोळ वगैरे उरकली होती... लवकर निघायचे अमोल अजूनही झोपलेला. " ओ... अमोल सर, जागे व्हा... निघायचे आहे... " सुप्री अमोलच्या तंबू बाहेरूनच त्याला हाका मारत होती. अमोल जागा झाला. " काय यार... किती दिवसांनी एवढी छान झोप लागली होती... आणखी ५ मिनिटं झोपलो असतो तर काय झालं असतं .. " अमोल आळस देतं होता." जरा डोळे उघडा... आजूबाजूला बघा... तुमचाच तंबू आहे... बाकीचे निघाले... तुम्हाला सोडून गेलो तर पगार मिळणार नाही आम्हाला , म्हणून उठवलं तुम्हाला... " अमोलचे डोळे उघडले. खरंच, बाकीचे तयार होते निघायला. " अरे !! ...Read More

18

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १८)

सुप्री अशीच मधेच आठवणीत हरवून जायची. जेव्हा जेव्हा बाहेर जायचे, तेव्हा आकाश सोबतच असायची. त्याला अजिबात सोडायची नाही. जेवणाचे जाताना सुद्धा आकाश सोबतच असायची ती. म्हणून तर यावेळेस जेव्हा जेवणाची व्यवस्था करताना सुप्री पुढे होती. आकाशने शिकवून ठेवलं होतं ना, तसेच काही तिने विकत घेतलं गावातून. तिघी निघाल्या पुन्हा त्यांच्या जागी. अचानक संजनाचे लक्ष गेले एकीकडे. " कोमल... ती बघ... तशीच मूर्ती.." यावेळेस सुप्रीने सुद्धा पाहिली मूर्ती. तिघी त्या गणपतीच्या मूर्ती जवळ गेल्या. सुप्रीला अश्या मूर्तीबद्दल काहीच माहित नव्हतं. कोमल ,संजना शोधू लागल्या काही लिहिलं आहे का मुर्ती खाली. तर तिथेहि तीच गत.. भटक्याने काय लिहून ठेवलं होते, ते नव्हतेच ...Read More

19

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २०)

सईची सकाळ लवकर झाली. सकाळी ७ चा अलार्म असला तरी एक तास आधीच, म्हणजे ६ वाजता जाग आली. बाहेर तर सगळीकडे धुकं पसरलेलं, आकाश बाहेरच उभा. सईला तंबूमधून बाहेर आलेलं पाहिलं त्याने. " काय झालं आहे नक्की... एवढं धुकं कसं... " सई आकाश जवळ येतं म्हणाली. " मलाही कळत नाही आहे.. असं पहिल्यांदा झालं आहे.. मला वाटते ना.. वादळाची शक्यता आहे.. " सई घाबरली.. " वादळ !!...... आता येते आहे का " सईने घाबरत विचारलं. या दोघांचा आवाज ऐकून बाकीचेही बाहेर आले. " आता नाही येतं, तसं वाटते आहे मला ... कारण पावसात असं दाट धुकं पडते ना.. तेव्हा वादळ येणार असते असं ...Read More

20

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १९)

सई आकाशकडे पाहत होती. किती रमला होता तो त्या मुलांमध्ये. किती गूढ माणूस आहे हा... स्वतःच अस्तित्व माहित नाही.. किती आनंदात, स्वतः पेक्षा दुसऱ्याचं सुख बघणारा... असा पहिलाच व्यक्ती बघितला मी. त्या बाई बोलल्या ते अगदी बरोबर, पाऊसच आहे हा... सतत भटकत राहायचे.. वाऱ्यावर स्वार होऊन... वाट मिळेल तिथे. वारा नेईल जिथे.... कोणताही अटकाव नाही, बंधन नाही.. फक्त भटकत राहायचे आणि बरसत रहायचे. सईच्या मनात काही जाणवू लागलं होतं आकाश बद्दल. ================================================== " तुमच्या दोघांचे कधीपासून relation आहे रे .. ? " सुप्री खोटा राग चेहऱ्यावर आणत विचारत होती. आकाश बुचकुळ्यात पडला. ...Read More

21

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २१)

थोडेच चालले असतील. सुप्रीचं लक्ष सहज वर आभाळात गेलं. वादळ येते आहे. सुप्रीच्या मनात आलं लगेच. त्यात नदीला पूर शक्यता तिने मघाशीच सांगितली होती. " कोमल !! आता आपल्याला पटापट चालावे लागेल. पाऊस येतो आहे मोठा.. आणि जमलं तर एखाद्या उंच ठिकाणी जावे लागेल.. " सुप्रीने आता पर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. म्हणूनच कोमलने सुप्री बोलल्याप्रमाणे करायचं ठरवलं. आकाशचा अंदाज बरोबर होता. तिथून पुढे एका डोंगरवजा ठिकाणी चढाई केली त्यांनी. विजेचा अस्पष्ट आवाज आला. आकाशचे लक्ष वेधलं त्याने. " बोललो होतो ना.. या गावातल्या लोकांचं कधीच चुकत नाही. " सर्व जण ...Read More

22

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २२)

" खोटं बोलतेस ना.. मला फसवण्यासाठी... " अमोलला वाटलं नेहमी सारखी मस्करी करत आहे. " नाही सर, खरंच... माझं आहे एकावर... " सुप्री. त्यावर अमोलचा चेहरा पडला. " मी तुला गेले ६ महिने ओळखतो. एकदाही असं वाटलं नाही... तुझा कोणी बॉयफ्रेंड असेल असं. एकदाही भेटायला आला नाही... एकदाही फोन नाही किंवा तुझ्या तोंडून उच्चार नाही... प्रेम आहे त्याच्यावर ना... असतो कुठे तो... " अमोलचा स्वर बदलला. सुप्री काहीच बोलली नाही त्यावर. कुणीच काही बोलत नव्हतं. " सांग ना... कुठे असतो तो... " ," त्यालाच शोधायला आलो आहोत आपण... " सुप्रीने मान खाली करत उत्तर दिलं. " what !!! काय बोलते ...Read More

23

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २३)

पहाटे पहाटे आलेल्या वादळाने पूर्ण रात्र भिजवून टाकली होती. दुसरा दिवस, सुरु झाला तेव्हा वारा त्याच्या स्वभावानुसार इकडून -तिकडे उडत होता. पहाट होतं होती, कालच्या पावसाने सारा परिसर धुवून निघाला होता. हिरवा रंग काय उठून दिसत होता सांगू , पण अमोलच्या मनात मात्र संध्याकाळ दाटत होती. काल आलेल्या वादळात... तो स्वतःही वाहून गेला होता. राहिला होता तो फक्त हाडा-मांसाचा देह. भावनाहीन झालेला बहुदा. पुढचे २ दिवशीही तेच. चल बोललं कि चालायचं .... आणि बस बोललं कि बसायचं. ना खाण्यात लक्ष ना कश्यात.. कॅमेरा त्या वादळात बॅगमध्ये ठेवला तो ठेवलाच. कोणाशी बोलणं नाही... अगदी ...Read More

24

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २४)

आकाश तर भलत्याच विचारात गढून गेलेला. त्यात सई त्याच्या मागे कधी येऊन उभी राहिली, हे त्याला कळलं नाही. " कधी वापरला आहेस का... तू .. " आकाशने सई कडे पाहिलं. " नाही .... का ? " ," तुझ्या गळयात असतो ना... तो कोणाचा आहे मग... " , " सांगितलं ना आधीच... माझ्यासोबतच आहे आधीपासून.. पण आता का पुन्हा विचारते आहात .. " सईने वाचलं होते कुठेतरी. memory lose झालेल्या व्यक्तींना , त्याच्या आठवणीतील गोष्टी , रोजच्या वापरातील गोष्टी समोर आणल्या तर त्यांची गेलेली memory परत येते. आता भटक्या हाच आकाश असेल तर त्याची नित्याची गोष्ट म्हणजे... साहजिकच कॅमेरा ... म्हणून ती कॅमेरा ...Read More

25

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २५)

अमोल निघाला आहे , हे सर्वाना कळलं होतं. " जायलाच पाहिजे का ... अमोल सर ... ? " संजनाने सुप्री दुरूनच अमोलला बघत होती. " पप्पांना मदत पाहिजे आहे तिथे. जावे लागेल. नाहीतरी आता प्रवास संपला आहे माझा. " अमोलच्या या वाक्यावर संजनाने सुप्रीकडे वळून बघितलं. " असं का बोलतो आहेस अमोल ... " कोमल " म्हणजे तुम्ही पुढे जाणार आता... मी दिल्लीला चाललो.. मग संपला ना प्रवास इकडचा... " अमोलचे तर नक्की झालेलं निघायचे. थांबून तर चालणार नाही. " तुम्ही जाणार कसे दिल्लीला... " एका मुलीने विचारलं. प्रश्न तर बरोबर होता तिचा. अमोलनी कोमलकडे पाहिलं. कोमलला समजलं. " मला नक्की माहित नाही. but ...Read More

26

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २६)

" शट्ट यार !! ..... बॅटरी पुन्हा संपली. " अमोल मोबाईल कडे बघत म्हणाला. " एकतर रस्ता माहित नाही, याने पण दगा दिला. " अमोल वैतागला होता. कसाबसा तू नदी पार करून पलीकडे आलेला होता. एका नावाड्याने त्याला नदी पार करून दिली होती. तरी गावातल्या पायवाटांनी फसवलं होते त्याला. सुप्री-संजनाचा ग्रुप पुढे निघून गेलेला. त्यामुळे त्याच्या मागे सुद्धा जाऊ शकत नव्हता. शिवाय नदी होतीच वाट अडवायला. दिल्लीला जायला निघाला आणि पुरता गोंधळून गेला. दमला आणि एका जागी बसला. " थांब अमोल... जरा एकाग्र हो... शांत डोक्याने ...Read More

27

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २७)

खूप साऱ्या विनवण्या ... request करून अमोल पुन्हा पलीकडल्या तीरावर पोहोचला. परंतु आता नवीन प्रश्न.. या सर्वाना शोधायचं कुठे.... तो नदी पासून दूर आला आणि एक थंड हवेच्या झोताने शहारून गेला. मागे वळून पाहिलं त्याने. पाऊस भरून येतं होता. बापरे !! घाई करावी लागेल आता.. समोरच एक पायवाट दिसली... नक्की गावात जाईल हि वाट... अमोल तिचं वाट पकडून धावत गेला. पलीकडल्या तीरावर, सई सुद्धा आकाशने सांगितलेल्या गावात पोहोचली. एव्हाना वाऱ्याने चाहूल दिलेली... पाऊस येतं असल्याची. आकाशला लवकर शोधलं पाहिजे. गावात पोहोचली तर कोणालातरी विचारता येईल... सईच्या मनात चलबिचल. तरी एकाला विचारलं तिने .. " भटक्या ना... आज सकाळीच निघून ...Read More

28

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २८)

अमोलने तर पहाटेच प्रवास सुरु केलेला... पहाटेच्या ६ :१५ च्या सुमारास तो निघाला. कधी चालत , कधी धावत... त्याला पोहोचायचे होते. कालच्या पावसात ते सर्व नक्की थांबले असणार, त्यामुळे ते आणखी पुढे जाण्याच्या आधीच गाठूया त्यांना, असं ठरवलं त्याने. पोहोचला ही पुढच्या गावात. गाव अजूनही झोपत असावं... कोणीच दिसतं नव्हतं. तरी तो पुढे चालत गेला. एका ठिकाणी , २-३ माणसं दिसली त्याला. धावत पोहोचला त्यांकडे. " अहो... तुमच्या गावात .. कोणी शहरातली माणसं ... पाठीवर मोठ्या बॅगा असलेले आले आहेत का... " ," हो... आहेत ... कालपासुन थांबली आहेत तिथे... " एका दिशेला त्याने बोट दाखवलं. त्या दिशेने धावत ...Read More

29

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २९) अंतिम भाग

रात्री आकाश कधी आला कळलं नाही. सई सकाळी जागी झाली तेव्हा नहमीपेक्षा जास्त काळोख होता. घड्याळात पाहिलं तिने. सकाळचे वाजत होते. आकाश अजूनही tent मधेच होता. " आकाश !! आकाश !! " सईने त्याला बाहेरूनच आवाज दिला. सईचा ग्रुप बाहेर आलेला होता. आकाश आवाज ऐकून बाहेर आला. केस कापून , दाढी केलेला आकाश... वेगळाच भासत होता. "wow !! " त्यातली एक मुलगी पट्कन बोलली. सईसुद्धा बघत राहिली त्याच्याकडे. आकाश आला तिच्यासमोर... आणि टिचकी वाजवली. तेव्हा सई भानावर आली. " मी असाच दिसतो नॉर्मल.. " आकाश हसला. पण त्याचं ते हसू जास्त काळ टिकलं नाही. कारण पावसाचे मोठे मोठे ढग ...Read More