Bhatkanti - punha ekda - 20 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २०)

सईची सकाळ लवकर झाली. सकाळी ७ चा अलार्म असला तरी एक तास आधीच, म्हणजे ६ वाजता जाग आली. बाहेर आली तर सगळीकडे धुकं पसरलेलं, आकाश बाहेरच उभा. सईला तंबूमधून बाहेर आलेलं पाहिलं त्याने.
" काय झालं आहे नक्की... एवढं धुकं कसं... " सई आकाश जवळ येतं म्हणाली.
" मलाही कळत नाही आहे.. असं पहिल्यांदा झालं आहे.. मला वाटते ना.. वादळाची शक्यता आहे.. " सई घाबरली..
" वादळ !!...... आता येते आहे का " सईने घाबरत विचारलं. या दोघांचा आवाज ऐकून बाकीचेही बाहेर आले.
" आता नाही येतं, तसं वाटते आहे मला ... कारण पावसात असं दाट धुकं पडते ना.. तेव्हा वादळ येणार असते असं गावातले म्हातारी लोक बोलतात... " आकाश सारखा वर आभाळात बघण्याचा प्रयन्त करत होता. पण काही दिसेल तर शप्पत.
" then.... what to do... " एकीने मागाहून विचारलं.
" निघूया आताच " आकाश त्याचेही सामान आवरू लागला.
" पण कुठे जायचे.. " सईचा प्रश्न.
" एखाद्या उंच ठिकाणी... या गावात तरी कमी आहेत अश्या जागा.. मला वाटते नदी पलीकडे जावे लागेल.. निघूया का.... " आकाशने विचारलं. तसे सगळेच निघाले.


=======================================================================================


तिथे कोमलने ठरवल्याप्रमाणे , पहाटे ६:३० ला निघाले. " इतक्या लवकर का निघालो आज. " एका मुलीने विचारलं. झोपचं पूर्ण झाली नव्हती कोणाची. अमोल सहित बाकी सर्वच आळसावले होते.
" या नदीच्या पलीकडे एक गाव आहे.. तिथे जायचे आहे.. आणि तिथे जायचे असेल तर लवकर निघावे लागेल... नाहीतर रात्र होईल पोहोचेपर्यंत. म्हणून लवकर.. " अमोल धावतच पुन्हा सुप्री जवळ आला. एकत्रच चालत होते दोघे...
" केवढं धुकं आहे ना... खरंच धुकं आहे कि कुठे आग लागली आहे... " अमोलच सुरु झालं.
" काय अमोल सर... एवढं पण नाही समजत का.. धुकं आहे... माझ्यासोबत राहू नका जास्त... असेल तेवढी हि निघून जाईल बुद्धी.. " सुप्री हसत बोलत होती.
" चालेल... पण छान वाटते तुझ्याबरोबर.... अगदी हलकं वाटते. तुझ्यासोबत बोलताना... " ,
" काय होतंय नक्की... ताप वगैरे आला आहे का तुम्हाला.. उगाच झाडावर चढवू नका... उतरता येत नाही मला. " आजूबाजूचे सर्वच हसले.


कोमल सुद्धा हसत होती. पण खरंच, इतकं धुकं कधी पाहिलं नव्हतं. तिच्या अंदाजाप्रमाणे, पुढे १० मिनिटांवर एक लोखंडी पूल असायला हवा. इथे शेजारी कोण चालत आहे ते दिसत नव्हतं, पुढचा पूल काय दिसणार. " थांबा इथेच... तो ब्रीज कोणत्या दिशेला आहे ते बघून येते.. " असं म्हणत कोमल पुढे निघून गेली.


==============================================================


" माझ्या अंदाजानुसार, इथेच कुठेतरी एक लोखंडी पूल आहे. त्यावरून पलीकडच्या गावात जाऊ शकतो. " आकाश आजूबाजूच्या परिस्तिथीचा आढावा घेत होता.
" इतकं का धुकं पसरलं आहे. " सईचा प्रश्न.
" वैज्ञानिक कारण माहित नाही, पण गावात जुन्या लोकांकडून ऐकलं आहे... हे धुकं म्हणजे ढग असतात एकप्रकारचे ... असे वादळी वारे वाहू लागेल ना. कि वारा काय करतो, मोठया काळ्या ढगांना जागा करून देण्यासाठी , हे पांढरे ढग बाजूला करतो.... त्यांना ढकलून देतो. मग हे पांढरे ढग, वाट मिळेल तिथे पळतात. एखादा ढग जरी खाली आला ना... मग त्याच्या मागोमाग बाकीचे ढग सुद्धा खाली येतात. म्हणून हे धुकं, असं बोलतात. आणि असं असेल सुद्धा. वर आभाळात गर्दी झाली आहे काळ्या ढगांची. " आकाश बोलत होता. काळजीपूर्वक चालत होता.
" पर.. तुफान आ रहा है ना ...then, हम उपर क्यू जा रहे है.. because, it too windy up there ... right .... ? " सईच्या मित्राचा प्रश्न बरोबर होता.
" प्रश्न बरोबर आहे... पण आपण आता ज्या ठिकाणी चालत आहोत ना.... तो नदीचा किनारा आहे... वादळात नदीला अचानक पूर येतो. त्या पाण्यापासून वाचण्यासाठी वरच्या ठिकाणी जावे नेहमी. वरच्या ठिकाणी , वारा -पाऊस या पासून वाचू शकतो. पण पाण्याची ताकद माहित नसेल तुम्हाला कदाचित... " आकाश बोलता बोलता शांत झाला. " पाण्याचा आवाज येतो आहे बघा.... आपण तरी दूर आहोत नदी पासून, तरी आवाज येतो आहे. " सारेच कान देऊन ऐकू लागले. खरंच पाण्याचा जोरात आवाज येतं होता. आवाज ऐकूनच काटा आला अंगावर.


===========================================================


" मला भेटला तो लोखंडी ब्रिज, चला पटपट... " कोमल पुन्हा या सर्वा जवळ आली.. " पटपट कसं चालणार... पुढचं काही दिसत नाही. " एक जण पट्कन बोलून गेला. तरी जावेच लागणार होते. पुढच्या १५ मिनिटात, ते पोहोचले तिथे. आणि सर्वाना नदी दिसली.
" बापरे !! " सुप्री घाबरली..
" काय झालं ... " अमोल मागेच होता.
" पूर येतो आहे नदीला... " आधीच त्या आवाजाने सगळे घाबरले होते. त्यात सुप्री बोलली , आणखी घाबरले.
" तुला कसं माहित... " अमोल नदीच्या दिशेने पाहत बोलला.
" आकाशने शिकवलं आहे... " सुप्री पट्कन बोलून गेली. अमोल जरा आश्चर्यचकित झाला. तरी त्याचं लक्ष नदीकडे होते. सुप्रीने जीभ चावली.
" चला लवकर... हा ब्रिज ओलांडलाच पाहिजे... " कोमल बोलली.
" अरे पण , काही दिसतंच नाही... कसं जाणार पलीकडे... " सगळेच त्या नदीपासून दूर थांबले होते.


पलीकडे, आकाश , सईचा ग्रुप येऊन पोहोचला. तेही पाण्याला बघून घाबरले. " पण जाणार कसं... ब्रिज चांगला आहे का ते सुद्धा माहित नाही... " तेही थांबले.
" एक काम करूया... मी पुढे जाऊन बघतो. " ,
" नको... wait... तू नको जाऊस.. दुसऱ्या कोणाला तरी पाठवू... तुलाच माहित आहे इकडचं... तू कुठे हरवला तर कुठे जाणार आम्ही... " सई काळजीने बोलली. आकाशला केवढं हसू आलं. लाजली सई त्यावर. " ok ok नाही जात ", त्या ६ जणांमध्ये २ मुली , ४ मुलं. त्या मुलांपैकी धडधाकट असलेल्या एकाला पुढे पाठवलं. चाचपडत तो एका बाजूने धरून चालत पुढे गेला. पलीकडे गेला सुद्धा. पलीकडे उभ्या असलेल्या सुप्री-संजनाच्या ग्रुपला दिसला तो. कोमल गेली पुढे.


" चांगला आहे ना ब्रिज... " ,
" मुझे मराठी नही आता... " त्याने उत्तर दिलं.
" ब्रिज बराबर है ना... हमे उस तरफ जाना है... " ,
" हा.. मेरा भी ग्रुप उधर है... उनको यहा आना है... " कोमल आणि त्याचं संभाषणं सुरू होते.
" तो एक काम करते है.... मै अभी रिटर्न जाता हू.... आप अपने ग्रुप को left side से ले आना...मै right side से मेरे दोस्तो के साथ आता हू... ब्रिज पर कुछ दिख नही रहा... ऐसे चले तो आपस मै टकरा जायेंगे... चलेगा ना.. " ,
" Done ... " कोमलला पटलं. सारेच त्या ब्रिज जवळ आले. सईचा मित्र पुन्हा दुसऱ्या बाजूला गेला. त्याने काय घडलं ते सांगितलं. उजव्या बाजूने सईचा ग्रुप निघाला हळूहळू. आकाश मात्र सगळ्यांत शेवटी जाणार होता. तिथून कोमल आधी निघाली. तिच्या मागोमाग बाकीचे. सुप्री का कुणास , मागे थांबली.


इतकं धुकं त्या नदी आणि पुलावर, कि उजव्या-डाव्या बाजूने जाण्याचा निर्णय योग्य होता. समोरचं , आजूबाजूचं अजूनही दिसतं नव्हतं, तरी फक्त अंदाज लावून चालायचे ठरवलं होतं सगळ्यांनी. पण त्या धुक्यामुळे या सर्वांची भेट टळली, नाहीतर तेव्हाच आकाश सुप्रीच्या ग्रुपला दिसला असता. सर्व त्या धुक्यात शिरले तसे शेवटी आकाशहि शिरला. आकाश आत गेला आणि कोमल-संजना दुसऱ्या बाजूने बाहेर आल्या. सुप्री दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ग्रुप मध्ये आकाशलाचं बघत होती. सईचा पूर्ण ग्रुप बाहेर आला. यांचा सर्व ग्रुप पुढे निघून गेला होता, सरतेशेवटी... आता पलीकडून कोणी येणार नाही... हे सुप्रीला कळलं आणि ती सुद्धा त्या धुक्यात शिरली. जोराचा वारा आला. सुप्रीने डोळे बंद करून घेतले. तिला सगळीकडून धुक्यानी लपेटून टाकलं. आकाशच्या बाजूचे धुकं विरळ झालं आणि तो त्यातून बाहेर येताना वेगळाच भासला सईला. आकाश पुढे निघून गेला. धुक्याने पुन्हा आपली जागा घेतली. सुप्रीने डोळे उघडले, मागे वळून पाहिलं... मागे आता पुन्हा धुकं होते. सुप्रीने उसासा टाकला आणि पुढे गेली.



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: