अलवणी

(907)
  • 524.1k
  • 249
  • 297k

ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग…..ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग……..ट्रींग ट्रींग… पुर्वाश्रमीचा अभियंता आणि आता एक उभरता लेखक ’आकाश जोशी’ अर्थात ’अक्की’ चा फोन वाजत होता. आकाश आपल्या संगणकावर कथेची पान प्रुफ-रीड करत होता. कामात असताना आणि विशेषतः कामात लिंक लागलेली असताना मध्ये अध्ये कुणाची लुडबुड त्याला सहसा खपत नसे, पण भ्रमणध्वनीवर त्याचा जिवश्च-कंठश्च, बालपणापासुनचा मित्र ’जयंत पेठकरचा’ नंबर बघुन आकाशला रहावले नाही. आकाश आणि जयंत लहानपणापासुनचे एकमेकांचे मित्र, एकाच शाळेत, एकाच कॉलेजातुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले. दोघेही अभियंते झाले पण दोघांचाही कलाक्षेत्राकडे विशेष ओढा होता आणि त्यामुळेच दोघांचेही कामात लक्ष लागेना. मग प्रथम आकाश आणि पाठोपाठ जयंत नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडले.

Full Novel

1

अलवणी - १

ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग…..ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग……..ट्रींग ट्रींग… पुर्वाश्रमीचा अभियंता आणि आता एक उभरता लेखक ’आकाश जोशी’ अर्थात ’अक्की’ फोन वाजत होता. आकाश आपल्या संगणकावर कथेची पान प्रुफ-रीड करत होता. कामात असताना आणि विशेषतः कामात लिंक लागलेली असताना मध्ये अध्ये कुणाची लुडबुड त्याला सहसा खपत नसे, पण भ्रमणध्वनीवर त्याचा जिवश्च-कंठश्च, बालपणापासुनचा मित्र ’जयंत पेठकरचा’ नंबर बघुन आकाशला रहावले नाही. आकाश आणि जयंत लहानपणापासुनचे एकमेकांचे मित्र, एकाच शाळेत, एकाच कॉलेजातुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले. दोघेही अभियंते झाले पण दोघांचाही कलाक्षेत्राकडे विशेष ओढा होता आणि त्यामुळेच दोघांचेही कामात लक्ष लागेना. मग प्रथम आकाश आणि पाठोपाठ जयंत नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडले. ...Read More

2

अलवणी - २

सर्व कपडे उतरवल्यावर ती सावकाश चालत आकाशच्या जवळ आली. घामाने तिचे शरीर ओलेचिंब झाले होते तर आकाश मात्र हुडहुडी पांघरुणात बुडुन गेला होता. तिने आपले ओठ आकाशच्या ओठांवर ठेवले. एखाद्या गरम इस्त्रीचा स्पर्श व्हावा तसा चटका आकाशच्या ओठांना बसला. त्याने स्वतःला तिच्यापासुन बाजुला करण्याचा प्रयत्न केला, पण शाल्मलीच्या घट्ट मिठीतुन त्याला निसटणे अशक्य झाले होते. इतक्या वर्षात प्रथमच शाल्मलीने प्रणयक्रिडेमध्ये स्वतःहुन पुढाकार घेतला होता. आकाशने फारसा प्रतिकार न करता स्वतःला तिच्या स्वाधिन करुन टाकले. साधारणपणे तासाभरानंतर आकाश तृप्त चित्ताने पहुडला होता. इतक्या वर्षात प्रथमच त्याने शाल्मलीबरोबरचा शृंगार इतक्या उत्कटतेने अनुभवला होता. नेहमी अ‍ॅट्रॅक्टीव्ह भासणारी शाल्मलि आज नुसतीच अ‍ॅट्रॅक्टीव्ह नाही तर सिडक्टीव्ह पण भासली होती. ...Read More

3

अलवणी - ३

मोहीत खाली कारमध्ये बसुन गाडी गाडी खेळत होता, आकाश बंगल्याचे दार उघडुन मोहीतशी खेळायला बाहेर आला आणि त्याने दार घेतले. खालचे दार लावण्याचा आवाज आला तसे शाल्मली आपल्या बेडवरुन उठली आणि सावकाश चालत चालत खिडकीपाशी गेली. तिने खिडकीचा पडदा बाजुला करुन खाली बघीतले. गाडीपाशी मोहीत आणि आकाश आप-आपसात खेळण्यात मग्न होते. शाल्मली सावकाश माघारी वळली तेंव्हा तिच्या चेहर्‍यावर एक क्रुर हास्य होते. तिच्या चेहर्‍यातला गोडवा केंव्हाच गायब झाला होता आणि त्या क्रुर हास्याने तिचा चेहरा अधीकच विद्रुप दिसत होता. तिची नजर कुठेतरी शुन्यात लागली होती, तरीही तिला समोरच्या वस्तु बरोबर दिसत होत्या. हळु हळु चालत ती ड्रेसिंगच्या टेबलापाशी गेली. तिने खण उघडला आणि स्वतःचे लाल रंगाचे लिपस्टीक बाहेर काढले. ...Read More

4

अलवणी - ४

जयंत बंगल्यावर पोहोचला तेंव्हा घड्याळात ३ वाजुन गेले होते. “वहिनी कश्या आहेत?”, जयंतने दारातुनच विचारले “शाल्मली ठिक आहे. ताप आहे तिचा, पण अजुनही अशक्तपणा आहे तिच्या अंगात”, जयंताला आतमध्ये घेत आकाश म्हणाला. जयंत आत आल्यावर आकाशने दार लावुन घेतले. “कसा झाला प्रवास?”, जयंताच्या हातातली बॅग घेत आकाश म्हणाला. “चल एकदा वहीनींना भेटुन घेतो, मग आपण सविस्तर बोलु”, आकाशचा प्रश्न टाळत जयंत म्हणाला. “बरं, चल वरच्या खोलीत आहे शाल्मली”, असं म्हणुन आकाश जिन्याकडे गेला, जयंतसुध्दा त्याच्यामागोमाग वरच्या खोलीत गेला शाल्मलीला नुकतीच झोप लागली होती. मोहीतला सुध्दा सकाळपासुन कुठेच बाहेर पडता आले नव्हते त्यामुळे तो सुध्दा कंटाळुन झोपुन गेला होता. दोघांना ...Read More

5

अलवणी - ५

दहा वाजुन गेले तसे सर्वांनीच थोडं फार खाऊन घेतले आणि आपल्या पांघरुणात शिरुन झोपण्याचा प्रयत्न करु लागले. अर्थात झोप अशक्यच होतं, पण दिवसभरातल्या घडामोडींमुळे शरीराला आणि मनाला थकवा आला होता त्यामुळे नकळतच सर्वांचे डोळे मिटले गेले. साधारणपणे रात्री १ वाजता कसल्याश्या आवाजाने आकाशला जाग आली. बर्‍याच वेळ तो कसला आवाज असावा ह्याचाच आकाश करत होता. जणु काही कोणीतरी झाडू मारत असल्याचा तो आवाज वाटत होता.. किंवा… किंवा कोणीतरी सरपटत चालण्याचा.. काशने हळुच हलवुन जयंताला जागे केले. जयंता लगेच उठुन बसला. दोघंही बाहेरील आवाज कान देऊन ऐकु लागले. तो आवाज हळु हळु जवळ जवळ येत होता. काही क्षणातच तो दाराच्या अगदी जवळ आला आणि मग तेथुन पुढे जिन्यापाशी गेला. हळु हळु तो आवाज दुर दुर गेला. बहुदा ते जे कोणी होतं ते जिन्याचा आधार घेउन वरच्या खोलीकडे चालले होते. ...Read More

6

अलवणी - ६

रामुकाका सावकाश पावलं टाकत दोघांच्या जवळ येऊन उभे राहीले. त्यांच्या खांद्याला एक पिशवी होती तर दुसर्‍या हातात एक चुळबुळ मांजराचं छोटंस पिल्लु. “रामुकाका? अहो होतात कुठे तुम्ही? असे अचानक कुठे निघुन गेलात? काही सांगुन जायची पध्दत…”, आकाशने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. “सांगतो.. सांगतो.. जरा मला आतमध्ये तरी येऊ द्यात…”, रामुकाका पायर्‍या चढुन व्हरांड्यात येत म्हणाले… “अहो काय सांगतो?? इथे काय परिस्थीती ओढावली आहे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही कुठल्या संकटातुन जात आहोत…”, आकाश “काय झालं?”, रामुकाकांनी विचारले.. मग आकाशने रामुकाका गेल्यानंतर थोडक्यात घडलेल्या घटना त्यांना ऐकवल्या. थोडावेळ जाउ देऊन रामुकाका म्हणाले…”मी सांगीतलं होतं तुम्हाला.. तुमचाच विश्वास बसला नाही माझ्यावर…” ...Read More

7

अलवणी - ७

त्या घटनेनंतर नेत्रा स्वतःहुनच गावाबाहेर निघुन गेली. गावाबाहेरच्या जंगलात एका झाडाखाली ती बसुन असायची. ती कधी कुणाशी बोलली नाही कोणी तिच्याशी बोलायला गेले नाही. चार-पाच दिवसांनंतर गावातल्याच एका विहीरीत तिचा मृतदेह सापडला. नेत्राने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. नेत्राच्या मृत्युची बातमी समजताच त्र्यंबकलालचा धीर सुटला. तो अचानक वेड्यासारखाच वागु लागला. त्याने स्वतःच्या चुकीची कबुली आणि नेत्रावर केलेल्या खोट्या आरोपांची माहीती पंतांना सांगीतली. परंतु आता बोलुन काय फायदा होता? वेळ केंव्हाच निघुन गेली होती. नेत्राच्या आईने नेत्राच्या देहाचा ताबा घेण्यास नकार दिला. आपल्या ह्या कुलक्षणी मुलीचे तिच्या मृत्युनंतरही तोंड बघायची त्यांची इच्छा नव्हती. शेवटी पंतांनी नेत्राच्या देहाला स्व-खर्चाने अंत्यसंस्कार ...Read More

8

अलवणी - ८

शाल्मलीच्या अंगावर एक सरसरुन काटा आला. तिची नजर भिंतींच्या कोपर्‍यात काही दिसते आहे का ह्याचा शोध घेत होती. रामुकाकांच्या हातात बसणं अशक्य झालं तसं रामुकाकांनी मांजर खाली सोडुन दिले. ते मांजर धावत धावत स्वयंपाकघराच्या कोपर्‍यात गेले आणि तेथे मोठमोठ्यांदा गुरगुरु लागले. सर्वजणं धावतच त्या मांजराच्या मागे गेले आणि तेथे त्यांना एक भले मोठ्ठे दार दिसले. एका मोठ्ठ्या कुलुपाने आणि मोठ्ठ्या फळीने ते दार बंद केले होते. रामुकाकांनी एकवार सर्वांकडे पाहीले आणि मग ते म्हणाले, “संपूर्ण बंगल्याला कोठेही इतके मोठ्ठे दार किंवा इतक मोठठं कुलुप लावलेलं नाही, मग इथंच का? असं काय मौल्यवान वस्तु त्या तळघरात असणार आहे की जी सुरक्षीत रहावी म्हणुन इतका बंदोबस्त केला गेला असावा?” ...Read More

9

अलवणी - ९

रामुकाकांनी खोलीच्या कोपर्‍यात अंग चोरुन बसलेल्या आपल्या मांजराला जवळ बोलावले. मांजराला मांडीवर घेउन कुरुवाळले, त्याच्या पाठीवर थोपटले आणि मग मांजर त्यांनी जयंताकडे दिले. जयंताने प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे बघीतले. रामुकाकांनी नजरेनेच त्याला आपण जसे केले होते तसे करायला सांगीतले. जयंताने रामुकाकांसारखेच त्या मांजराला गोंजारले आणि ते मांजर आकाशकडे दिले. आकाशने सुध्दा तसेच केले आणि मांजर शाल्मलीच्या समोर धरले. शाल्मली त्या मांजराला घेणार तोच त्या मांजराने आपले दात बाहेर काढले आणि “म्याऊ…” असा कर्णकर्कश्श आवाज काढला आणि फिस्सकारत तेथुन निघुन गेली. सर्वांनी पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे पाहीले. “नेत्राचा काही अंश अजुनही शाल्मलीच्या शरीरात आहे.. जर आपण तिला इथुन न्हेण्याचा प्रयत्न केला तर…”, रामुकाका अचानक बोलायचे थांबले ...Read More

10

अलवणी - १०

जयंता वरच्या बेडरुममध्ये गेला. खोलीच्या खिडक्या बंद होत्या आणि पडदे लावून घेतल्याने खोलीत अंधार पसरला होता. जयंताने सावधानतेने खोलीत केला. त्याची नजर खोलीच्या अंतरंगात लागलेली होती. चाचपडत त्याने बटनांच्या दिशेने हात न्हेला आणि अचानक त्याला असे जाणवले कि त्याचा हात कोणीतरी घट्ट पकडला आहे. जयंताने झटका देऊन हात काढून घेतला. तो भास होता का खरंच कोणी त्याचा हात धरला होता ह्यावर त्याचे एकमत होईना. जयंता थोड्यावेळ तेथेच अंदाज घेत उभा राहिला. परंतु खोलीतून कसल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता. धडधडत्या अंतकरणाने जयंता खोलीच्या आत गेला आणि त्याने दिव्याचे बटन दाबले. क्षणार्धात खोलीचे अंतरंग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाले. जयंताने खोलीतून सर्वत्र नजर फिरवली. त्याच्या नजरेस दिसेल असे तेरी कोणीही त्या खोलीत नव्हते. जयंताने भिंतींच्या टोकाला असलेल्या कोपर्यांकडे बघितले. ...Read More

11

अलवणी - ११

रामुकाका दोघांना घेऊन खोलीत गेले. शाल्मली आणि मोहीत गप्पा मारत बसले होते. त्या तिघांना आत येताना पहाताच दोघंही उठुन राहीले. रामुकाका खोलीच्या मध्यभागी उभे राहीले आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्या भोवती कोंडाळे केले. रामुकाकांनी आपल्या कपाळाचा गंध शाल्मली सोडुन आकाश, मोहीत आणि जयंताला लावला आणि म्हणाले.. “उद्या आंघोळीला सुट्टी द्या, आपण इथुन जाईपर्यंत हा गंधच आपले रक्षण करणार आहे, तो पुसुन देऊ नका..” तिघांनीही गुणी बाळासारख्या माना डोलावल्या. “रामुकाका मी राहीले…”, शाल्मली निरागसपणे म्हणाली. “तुला पण लावणार, पण आत्ता नाही, वेळ आली की नक्की लावीन..” असं म्हणुन रामुकाका आकाशकडे वळले आणि म्हणाले, “आकाश, तु इथे शाल्मली आणि मोहीतपाशीच थांब. मला ...Read More

12

अलवणी - १२

सर्वचजण हातापायाची बोटं घट्ट करुन आता काय होणार ह्याचीच प्रतिक्षा करत होते. शाल्मली मंडलापर्यंत आली आणि अचानक कश्याचा तरी बसावा तशीच जागेवर थिजुन उभी राहीली. मग तिने इतरांकडे आणि त्यांच्या भोवती आखलेल्या मंडलांकडे पाहीले आणि म्हणाली.. “अरं बाबा.. तु तर साधु झाला की रं.. अरं पण ह्या पोरीचं काय करशीलं रं, ती पुर्णपणे माझीया ताब्यात हाय नं.. मारु हिला मारु??” “नाही नेत्रा.. तु तसं करणार नाहीस… तुला तुझ्या मालकानं तसं करण्याची परवानगी दिलेली नाही…”, रामुकाका म्हणाले.. “माझा मालकं?? कोन माझा मालक?”, नेत्रा म्हणाली.. “तोच.. जो तळघरात लपुन बसला आह्रे.. जो तुझ्याकडुन सर्वकाही करवुन घेत आहे… त्र्यिंबकलाल…”, रामुकाका म्हणाले ...Read More