Ek Chhotisi Love Story - 1 books and stories free download online pdf in Marathi

एक छोटीसी लव स्टोरी - 1

आज कॉलेजचा रस्ता फुलून गेला होता. कॉलेजचे नवीन वर्ष सुरू झाले होते. जुने मित्रमैत्रिणी आपले ग्रुप शोधत होते तर नवीनच आलेले विद्यार्थी थोडे घाबरले होते...नवीन वातावरण, शाळा सोडून नवीन जगात आले होते त्यात कॉलेजच्या रॅगिंग विषयी ऐकलेले होते...त्यानं मुळे थोडे तणाव होता....
सरस्वती विद्यालयचा बहुतेक मुलामुलींनी इथे एडमिशन घेतले होते तो एक अख्खा ग्रुप एकत्र फिरत नवनवीन गोष्टी बघत होता. एकटा हाच ग्रुप काय तो नवीन कॉलेज, पहिला दिवस एन्जॉय करत होता. लिस्ट वरून आपला वर्ग शोधला, नवीन वर्ग कुठे आहे , आजूबाजूला कोणते वर्ग आहेत, कॅन्टीन ग्राउंड ह्या सगळ्याची हेर गिरी चालू होती....तर ह्या ग्रुप मध्ये होते अक्षय, निनाद, हेमंत प्रिया,प्रीती,अनुजा, निधी, ज्योती, स्मिता, सुमित. हे १० जण अगदी लहान पण पासून एकत्र वाढेलेले बालवाडी पासून ते आता कॉलेज पर्यंत एकत्र. एकमेंकाचे घट्ट मित्र....अगदी जिवलग...
ह्या मित्रामध्ये दोन कपल सुद्धा होती स्मिता हेमंत आणि अक्षय प्रिया...शाळेच्या शेवटच्या वर्षात त्यांचे प्रेम जमले आणि दोंघानी ही एकत्र कॉलेजला एडमिशन घेतली...बाकी सगळे सडेफटिंग होते...त्यातला निनाद हा अतिशय बोलघेवडे प्राणी... आख्या ग्रुप ची जान...तर प्रीती ह्या ग्रुप ची समजदार पण तितकीच मानी मुलगी......
ग्रुप मधल्या प्रत्येका ची स्वप्नं होती काही तरी मोठे बनायची...त्यासाठी सगळ्यांनी सायन्सला एडमिशन घेतला होता...कोणाला डॉक्टर बनायचे तर कोणाला इंजिनिअर तर कोणाला आयपीएस बनायचे होते...अभ्यास त्या बरोबर मस्ती आणि दोस्ती करणारा हा ग्रुप होता...सगळा ग्रुप आपल्या नवीन वर्गात आला. सगळेच आजूबाजूला बसले.निनाद मात्र एकटा एका बेंच वर बसला...त्याच्या बाजूला नंतर एक मुलगा येऊन बसला...निनाद ने नेहमी प्रमाणे लगेच दोस्ती करून टाकली....
होता होता कॉलेज मध्ये सगळा ग्रुप रुळला..नाव नवीन मित्रमैत्रिणी बनत होत्या ..तरी पण आतल्या १० जणाच्या गोटात मात्र कोणाला प्रवेश नव्हता. इतकी मैत्री घट्ट होती....अनुजा ने नवीन बातमी आणली होती...कॉलेज मध्ये एक हँडसम मुलगा होता..त्याची माहिती काढणे सुरू होते...निनाद ने माहिती आणली होती...नाव मंदार शाळेतला टॉपर आणि राहणारा डोंबिवलीला...एनसीसी मध्ये प्रवेश घेतला आहे. दहावीला ९०%मार्क. फुटबॉल player फुटबॉल पटू शाळेतून अन्अएक मॅचेस जिकुन दिलेला..सध्या कॉलेजच्या फुटबॉल टीम मध्ये शिरण्यास उत्सुक... अनुजा ला मात्र मंदार खूप खुप आवडला... त्याच्या बरोबर आयुष्याची स्वप्नं रंगवत होती...ते वयच तसे होते म्हणा.... आणि बाकीचे सगळे त्यावरून तिला चिडवत होते. मंदार मात्र ह्या सगळ्या पासून पूर्णपणे बेखबर होता.


एनसीसी चे प्रॅक्टिस सुरू झाली की सगळ्या मुली कॉरिडॉर मध्ये उभ्या राहत..मंदारला बघायला...तो ही होताच तस्सा उंच गोरा, हँडसम, कोणाच्याही नजरेत पटकन भरेल असा...
त्याला मात्र मुली आपल्यावर मरतात आपल्याला बघायला कॉरिडॉर मध्ये लेक्चर बसवून उभ्या राहतात ह्या बदल काही माहीत पण नव्हते....
अनुजाला मात्र मंदार खूप आवडला..ती आपली रोज त्याला बघायला कॉलेज बुडवायला लागली...बाकीचे मात्र तिला चिडवायचे मंदार वरून...ती मात्र छान पैकी लाजायची...पण ती काही एकटीच नव्हती मंदार चे स्वप्न बघणारी..कॉलेज मध्ये अजून खूप मुली होत्या ज्यांना मंदार आवडायचा. अनुजा तर एकदाही मंदारशी थेट बोलली नव्हती पण त्याच्या बरोबर आयुष्य घालवायचे स्वप्नं बघत होती....मंदार मात्र ह्या सगळ्यापासून खूप लांब होता ...त्याला पत्ता ही नव्हता आपण येवढ्या मुलीच्या स्वप्नात रोज येतो ते....
निनाद मात्र मंदार शी दोस्ती वाढवायला वेगवेगळ्या शकला लढवत होता. अशीच एक संधी चालून आली.मराठी वाडमय चे सदस्य होण्यासाठी कॉलेज मध्ये नोटीस आली होती. निनाद ने मागे लागून अनुजा आणि प्रीती चे नाव दिले. प्रीतीला पहिल्यापासून साहित्याची आवड तर अनुजा फक्त मंदार तिथे जातोय म्हणून नाव दिले.....
बघू पुढच्या भागात ..मंदार आणि अनुजा ची मैत्री होते का...आणि कशी...