A love story in the rain books and stories free download online pdf in Marathi

एक लव्हस्टोरी पावसाळ्यातली

एक पावसाळी आठवण.

असंच एकेदिवशी बसलो होतो आपल्या एका मित्रा सोबत तो ही college मध्ये असताना एका हॉस्टेल ला असतानाची त्याची लव्हस्टोरी सांगितली आता तिच मी तुम्हाला सांगतो. मला नाही माहीत ही स्टोरी लोकांना आवडेल की नाही पण आपल्या मित्रासाठी लिहिली आहे त्याची एक आठवण म्हणून.
स्टोरी मी त्याच्या शब्दातूनच सांगतो.

मी त्यावेळी कॉलेज ला होतो. आणि strict असं कॉलेज होतं. College ला मुली नव्हत्या. पण शेवटी काय ओ उगवलेला सूर्य शेवटी मावळतोच. तसं किती ही strict कॉलेज असलं तरी या वयात आम्ही प्रेमात तर पडणारच ना तसंच काहीसं.

आम्हाला रोज सकाळी 6 ला उठवून व्यायाम म्हणुन running साठी बाहेर घेऊन जायचे. आणि आमचं कॉलेज म्हणजे एका डोंगरावरती होतं जिथं वस्ती नव्हती किंवा काहीच नव्हतं पण त्या पलीकडच्या गावातून काही मुलं मुली कॉलेज ला दुसऱ्या गावात जायची. आणि त्यांचा रास्ता मात्र आमच्या कॉलेज शेजारून जात होता. मग सकाळी लवकर आम्ही running ला जायच्या वेळेला आमच्या विरुद्ध दिशेला ती मुलं कॉलेज ला जात असायची. त्यात मुलीपण होत्या. आणि त्यांना बघितल्यावर आमच्या college वरची मुलं मुद्दाम आरडाओरडा करत शिट्ट्या मारत जात असत. कारण तो एकमेव चान्स होता आमच्यासाठी. मुलीशी मस्ती करण्याचा. मग मी पण असच पण जरा चोरून त्यातला एका मुलीवर लाईन मारायचो. रोज ती येताना दिसली की माझ्या बुटाची less सुटल्याच नाटक करून खाली बसायचो आणि तिच्यावर लाइन मारायचो. हे कदाचित तिला ही कळालं असावं मग हे असंच चाललं होतं. आणि पावसाळ्याचा काळ होता आणि मी अशीच मज्जा करता करता एक खड्यात पडलो. आणि ती आणि तिची मैत्रीण जोरजोरात हसू लागली. आणि मी खुळ्या डोक्याचा खुश झालो कारण ती माझ्याकडे बघून हसली. आणि मित्राला बोललो
अरे सिध्या ती पोरगी आज माझ्याकडे बघून हसली रे

सिध्या :- अरे खुळ्या डोक्याचा तू पडलास म्हणून ती हसली. काय तू पण बेवफा सनम साला. कळतंच नाही पोरगी का हसली ते.

मी :- नाही हा सिध्या ते काय पण होउदे मला ती च आवडते.

सिध्या :-मग आज संध्याकाळी येताना विचारणार तिला?

मी :- अरे पण कसं शक्य आहे ?

सिध्या :- शाळेच्या मागल्या बाजून उडी मारून जा.

मग आमचं ठरलं मी गेलो छत्री घेतली आणि जोरदार पाऊस सुरू होता आणि आणि वीज पण कडाडत होती.

आणि तिचं college सुटलं आणि ती समोरून येऊ लागली.

खरं तर माझं धाडस होत नव्हतं. पण हा शेवट चा चान्स होता कारण खूप जुगाड करून college च्या भिंतीवरून उडी मारून आलो होतो. बाकी कुठेही जात येत होतं पण त्या रस्त्यावर जण महाभयंकर.

गेलो तिच्या वाटेत एक गुलाबाचं फुल दिलं तिच्या हातात.
आणि काय होईल ते होईल म्हणुन धाडस केलं.

मी : i love you.

आणि ति मात्र गालातल्या गालात हसली. न बोलता निघून पुढे गेली. मला मात्र मनात धग-धग होत होतं की ही कोणाला घेऊन येते का काय कॉलेज वर? काहीच उत्तर न देता पुढे गेली. मग मी पण त्या शरूख खानच्या picture सारखं तिच्या कडे बघत राहिलो की. ही मागे वळून पहिली की जिंकलो मी आशा आशेने.

पण ही काय वळून बघायलाच तयार नाही. पण मग अचानक लगेच ती थांबली. आणि हातातुन एक कागदाचा गोळा टाकला. आणि निघून गेली. आणि मी तिथं जाऊ पर्यंत कागद पूर्ण भिजला होता. उलगडला तर फाटणार म्हणून आहे तसाच घेऊन हॉस्टेल मध्ये गेलो. आणि मेणबत्ती लावून पूर्ण कागद कडकडीत वाळविला. आणि मला म्हणजे कधी एकदा कागद उघडणार असं झालं होतं. आणि तो कागद उलगडणार तेवढ्यात तिथं मुलं आली. मग मी टेरेस गेलो आणि तिथे जाऊन बघितलं त्यात एक छोटा मजकूर होता.

99xxxx12xx हा माझा नंबर आहे please massage only. Don't call.

माझ्याकडे मोबाईल नव्हता. मोबाईल वापरायला सक्त मनाई केली होती. पण तरीही बरीच मुलं चोरून मोबाईल वापरायची. मग मी सिध्या च्या मोबाईल वरून message केला.

Mi :- hi नावं काय तुझं ?

Ti :- अंजली आणि तुझं ?

Mi :- राजकुमार. ते सोड . तू मघाशी न बोलता का गेलीस ?

Ti :- तुझं लक्ष नव्हतं पण आपल्याला तुझ्या college मधून कोणीतरी बघत होत.

बरं ऐक तु please फोन करू नको मला बोलता येऊ शकत नाही घरातुन. मी मिसकॉल करेन मग तू फोन करत जा ok.

By

Mi :- सगळं बोललीस खरं पाहिजे तेच अजून बोलली नाहीस.

Ti :- मला लाज वाटते.

Mi :- आयला याला काय अर्थ आहे. तुला लाज वाटते आणि मी कोण निर्लज्ज ?

Ti :- तसं नाही रे. मी मुलगी आहे ना म्हणून.

Mi :- तू please भेटशील मला ?

Ti :- सांधकाळी 4 वाजता त्या डोंगरावर. येशील ना तू. ?

Mi :- म्हणजे काय नक्की येणार.

आता मग मी 4 वाजायची वाट बघू लागलो. मी जरा लवकरच आवरून गेलो. आणि मग ती पण मस्त पैकी नटून आली. पण ती एकटी नव्हती तिच्या सोबत आणखी कोणीतरी होतं. ती पोहोचली पण मी लपून बसलो आणि तिला massage केला.

Mi :- तू एकटी का नाही आलीस.

Ti :- sorry पण एका अनोळखी माणसाला भेटायचं म्हंटल्यावर थोडं सावध राहायला नको?

Mi :- एवढा विश्वास नसेल तर इथपर्यंत आलीच का ? नकार द्यायचा होता ना सरळ.

Ti :- विश्वास नसता तर नंबर पण दिला नसता. आणि तू आता भेटून बोलणार आहेस की नुसता massage च करणार आहेस ?

Mi :- हो भेटतो पण तुझ्या मैत्रिणीला तिकडे तोंड करून उभारायला सांग.

(मग ती तिच्या मैत्रिणीला इशारा करून सांगते)

Mi :- आता बरोबर 7 पाऊले straigth पुढे ये आणि पायतला दगड बाजूला कर.
(त्याच्याखाली खाली एक चिठ्ठी असते. त्यात लिहिले होते. "आता डाव्या बाजूला 30° वळ 12 पावले ये." मग ती पोहोचली हळूच दगड बाजूला करणार तेवढ्यात आवाज आला. )

Mi :- तो दगड राहूदे.
( मग ती दचकन हलली आणि तिच्या हृदयाचे ठोके वाढले. कारण तो तिच्या मागेच उभा होता अगदी चिकटून. पण मनातल्या मनात एक वेगळंच वातावरण होतं. बाहेर पाऊस सुरू होता. आणि इकडे राजकुमार भर पावसात चिंब भिजून गुढग्यावर बसून prapose करत होता.)

हमे आप ही का इंतजार था जानी.।।।
नको करून घेऊ हृदयात पाणी पाणी.।।।
मै तेरा राजा तू बन जा मेरी राणी.।।

🌹🌹🌹🌹🌹💓💓💓💓

आणि काय मग तिने ही छत्री दिले फेकून आणि स्वीकार केला या पावसाला साक्ष मानून हा जोडीदार कायम स्वरूपी.

कथा आवडली तर नक्की कंमेंट करा आपल्या मित्राची real love story आहे.