Prema, your color is new ... 26 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... 26

प्रेमा तुझा रंग नवा... 26

रक्षित फास्ट कार चालवत कोणाला तरी इन्स्ट्रक्शन देत होता....

रक्षित " त्यांना काहीही करून बाहेर जाऊ द्यायच नाही आहे समजल....."

पलीकडून " हो बॉस...."


फोन कट करून रक्षित स्टेअरींगवर हात मारत रागात स्वतःशीच " आरोही तू खूप मोठी चूक केली आहेस , सोडणार नाही मी तुला काहीही होऊ दे....."


रक्षित स्वतःशीच रागात बडबडत कारची स्पीड आणखी वाढवतो.....









पुढे...



पार्थ च्या ओरडण्याने निखिल कानावर हात ठेवत च त्याला चिडून " हे... हळू ना जरा एवढ्या मोठ्याने ओरडायला काय झाल....."


पार्थ " सॉरी , अरे मी तर यालाच शोधतोय यासाठीच तर आज नव्हतो पोलिस स्टेशन मध्ये...."


निखिल " कस काय...."


पार्थ " ह... याने चार जणांच मर्डर केल आहे , त्या दोघांच्या मोबाईल लास्ट कॉल याचाच होता.... मी कधीपासून वन वीक याचा फोन ट्राय करत होतो तर नंबर बंद दाखवत होता , मग माझ्या खबरीच्या मदतीने त्याचा नंबर वरून ॲड्रेस शोधला तिथे गेलो तर घर बंद होता , काहीही विचार न करता दरवाजा तोडला जेणेकरून काही तरी भेटेल , शोधून शोधून एक वस्तू भेटली ज्यावरून कन्फर्म झाल की तो तोच आहे.... तो मर्डर करणारा कन्फर्म झाल त्यानंतर मी परत त्याचा कॉल लागतो का बघितल पण बंदच येत होता.... आणि योगायोग म्हणजे आज त्याचा नंबर चालू होता.... मी केला तर बिझी दाखवत होता , मग काय टाइम वेस्ट न करता लोकेशन ट्रॅक केल.... पण मध्येच लोकेशन बंद झाल , हा एकच मार्ग होता त्याला पकडण्याचा... हातातून गेला...."


निखिल " दुसर प्रूफ नाही भेटल का याच्या विरूद्ध...."


पार्थ " नाही.... अजुन शोधतोय काही सापडत का बघू...."


निखिल " हम.... ती वस्तू कोणती आहे ज्यावरून मर्डर करणारा तोच आहे हे कन्फर्म झाल....."



पार्थ " ते एक रेड बॉल आहे....त्या....."

पार्थ पुढे काही बोलणार तर निखिल त्याला मध्येच अडवतो....

निखिल " व्हॉट ?.... रेड करल च बॉल ते कोणाकडे ही असू शकते ना... काहीही काय बोलतोय पार्थ..."


पार्थ चिडून आठ्या पाडत " निख्या पूर्ण तरी बोलू दे मध्येच काय बोलतोय...."


निखिल " हम बोल...."


पार्थ " हा.... रेड बॉल आहे त्यावर क्रॉस ने चाकू चे निशाण आहे.... तेच सेम बॉल त्या डेथबाॅडी च्या बाजूला भेटले.... त्यावरून कन्फर्म झाल....."


निखिल " ओके..... "


पार्थ " हम.... त्या माणसाच डोक माहीत नाही कस असेल... असल मर्डर पहिल्यांदा बघतोय मी....."

निखिल " म्हणजे...."

पार्थ " त्या चौघांना अस मारल आहे की कोणाच पण डोक सुन्न होईल.... पहिल्या दोन जणांना पूर्ण शरीराला जागोजागी चटके दिलेत... डोळे , कान काहीच सोडल नाही... तडफवून तडफवून मारलेल दिसत होत.... नंतरच्या दोन जणांना तर चाबकाने वरून धारधार चाकूने शरीरावर जागोजागी कट केल आहे...."


निखिल पार्थ च ऐकुन तर शॉक च झाला....

पार्थ त्याला हलवून भानावर आणतो तस निखिल भानावर येत " पार्थ हा माणूस आहे की काय आहे..... ( निखिल ला काही तरी क्लिक झाल ) हम पार्थ त्याच्या बोलण्यावरून अस वाटत होत तो रक्षित ला शोधतोय....."


पार्थ " हो.... त्याचा आणि रक्षित चा काही तरी संबंध आहे..... "


निखिल " हो.... कदाचित बदला असू शकतो....."


पार्थ " हम असू शकत कदाचित..."


निखिल " हम.... "


पार्थ वॉच बघुन उठत " चल खूप लेट झाला निघाव लागेल...."


निखिल उठत पार्थ ला हलकी मीठी मारत " हो चल...."


पार्थ निखिल च्या खांद्यावर हलक थोपटत " टेन्शन नको घेऊ होईल नीट मी आहे ना.... "


निखिल " हो म्हणूनच निवांत आहे मी.... तू नसता तर माहीत नाही काय झाल असत...."


पार्थ चिडून " ये इमोशनल नको होऊ ते माझ्या डिक्शनरी मध्ये नाही बसत.... लोकांना इमोशन मध्ये बघून हसू येते कंट्रोल नाही होत...."

निखिल " हो माहीत आहे ते जगावेगळा आहेस तू.... माहीत नाही कोणत्या प्लॅनेट मधून आलास....."


पार्थ " हो भाई इतकी नका तारीफ करु नजर लागायच माझ्या गुणांना...."


निखिल त्याच्या डोक्यात टपली मारत " काहीही.... चल...."


पार्थ " अरे...."


पार्थ पुढे काही बोलणार निखिल त्याच तोंड बंद करून त्याला खेचत बाहेर घेऊन जातो.....







गोडाऊन मध्ये....

त्या व्यक्तीच्या हातातल्या वस्तू कडे बघून समोर बांधलेल्या व्यक्तीला दरदरून घाम फुटला , सोबत दात पण एकमेकांना घासत होते....


समोरच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती थंडपणे धारधार आवाजात त्याला " शेवटच सांगत आहे बोल पटकन तुझा बॉस कुठे आहे.... नाही तर पुढे काय होणार ते ( त्या वस्तूला बघून त्याच्या कडे बघत ) तुझ्या डोळ्यासमोर आहे...."


समोर मृत्यू दिसत असूनही तो जीव एकटून त्या व्यक्तीला बोलतो " एकदा सांगितल ना नाही सांगणार म्हणजे नाही सांगणार....."


त्याच्या बोलण्याने त्याला खूपच राग आला आणि रागातच ताडकन उठला त्यामुळे खुर्ची खाली पडली...

त्याने रागातच खाली पडलेल्या खुर्चीला लाथेने उडवून त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीकडे बघत राक्षसी हसत गूढ आवाजात " माहीत आहे ना काय करायच...."

त्याच्या बोलण्याने बाजूला असलेला व्यक्ती हो म्हणून मान हलवतो..... तसा तो झपाझप पावले टाकत दरवाजा खाडकन उघडून जोरात बंद करून बाहेर निघून जातो...

इथे तो गेल्यावर ती व्यक्ती हातात असलेली वस्तू त्या बांधलेल्या व्यक्तीच्या समोर धरतो , त्यात असलेले दोन विंचू त्याच्या अंगावर येतात त्यांना बघून त्याच शरीर थरथर कापू लागत....

एक विंचू हळूहळू त्याच्या तळहातावर येत त्याला जोरात चावतो त्यामुळे त्याच्या तोंडातून आर्त किंकाळी बाहेर पडते.... परत दुसरा विंचू त्याच्या दंडावर चावतो आणि आर्त किंकाळी बाहेर पडते....


तो विंचू सोडणारा माणूस त्यांना जस सोडल तस तो बाहेर निघून गेला....

त्या गोडाऊन मध्ये जस जस विंचू चावत होते तस त्याची किंकाळी ऐकु येत होती....






तो रागानेच बाहेर येऊन आपल्या गाडीत येऊन बसला आणि कोणालातरी फोन करून रागातच बोलू लागला " काहीही करा मला तो पाहिजे म्हणजे पाहिजे समजल नाही तर त्या पाच जणांची जशी हालत केली तशी तुमची होईल....."


एवढ बोलून तो रागातच फोन कट करून बाजूच्या सीटवर जोरातच फेकून देतो.....
स्टेअरींग वर जोरात हात मारत स्वतःशीच " तुला सोडणार नाही मी बदला तर घेऊनच राहणार... माझ्या फॅमिली ला दूर करून खूप मोठी चूक केली तू.... खूप त्रास दिलास त्याचा तिप्पट मी त्रास देणार आहे....."


इतक बोलून कार स्टार्ट करत वेगाने आपल्या घराकडे गाडी घेतो.....







क्रमशः

©® भाग्यश्री परब


🥰 Stay Happy 🥰
😍 Take care 😍



Rate & Review

Be the first to write a Review!