Sovereignty of Nationalists books and stories free download online pdf in Marathi

सार्वभौमत्व: राष्ट्रवाद्यांचे

            सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे. भारत एक सार्वभौम देश आहे; म्हणजे पुर्णपणे स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही. त्यामुळे भारत आपले बाह्य व अंतर्गत कारभार स्वतः करण्यास स्वतंत्र आहे. भारत हा अप्रत्यक्ष लोकशाही प्रणाली अंतर्गत संसदीय लोकशाहीचा स्वीकार करणारा देश आहे. त्यामुळे भारत देशाच्या सार्वभौमतेच्या मुळाशी तेथील नागरिक आहेत. भारतीय जनतेने अप्रत्यक्ष संसदीय लोकशाहीप्रणाली अंतर्गत आपल्या सार्वभौमतेच्या अधिकाराचा वापर करीत आपल्यामधून लोकप्रतिनिधी निवडून देशाचा अंतर्गत व बाह्य कारभार पाहण्यासाठी व करण्यासाठी लोकप्रतिनिंधीना अंतिम निर्णय घेण्याचा उसना अधिकार प्रदान करीत त्यांच्या हातात राष्ट्राची सत्ता देते. परंतू भारतीय जनता ही वास्तविक सार्वभौम असल्याने तिच्याकडे राष्ट्राची अंतिम सत्ता असते.
           सार्वभौम सत्ता जनतेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे तिच्या सर्वसाधारण ईच्छेनुसार ती लोकप्रतिनिधी मार्फत देशाचा कारभार अप्रत्यक्षरीत्या पाहत असते; आणि लोकप्रतिनिधींना राज्यकर्ता ही पदवी बहाल करीत असते. त्यामुळे राज्यकर्ता ही एक सामुदायिक व्यक्ती असल्याने त्याचे दुसरे इतर कोणीही प्रतिनिधित्व करू शकत नाही. जनतेने लोकप्रतिनिंधींना अंतिम निर्णयाचा अधिकार जरी दिलेला असेल तरी सत्तेची अंतिम सूत्रे मात्र तिच्याच हाती कायम असतात. कारण सार्वभौमता ही एकच व अविभक्त असते; ती जनतेच्या सार्वजनिक ईच्छेच्या केंद्रस्थानी निहित असते. तसेच जनता सार्वजनिक ईच्छेवर राज्यकत्र्याला निर्णय घेण्याचा अधिकार हस्तांतर करीत सार्वभौम सत्तेला राजयकीय जीवनाचा अविभाज्य भाग बनवते.


माझ्या मतानूसार राष्ट्र सार्वभौमत्वाची विस्तृत व्याख्याः ‘‘राष्ट्रीय सार्वभौमत्व हे राष्ट्रातील जनतेच्या सार्वजनिक ईच्छेवर आधारित असल्यामुळे नागरिक सार्वभौमत्व म्हणजेच राष्ट्र सार्वभौमत्व होय.’’
             जरी राष्ट्राची जनता सार्वभौम असली तरी तिला तिचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी सततच्या एका कार्यप्रणालीतून जावे लागत असते. म्हणजेच तिला निवडणूक या प्रणालीतून मतदान या प्रक्रियेतून आपला राज्यकर्ता निवडावा लागतो. त्यामुळे राष्ट्रातील जनता आपली सार्वभौमता निवडणूक प्रणालीतून मतदान या प्रक्रियेतून व्यक्त करीत असते. आणि राष्ट्राची जनता प्रत्यक्ष सार्वभौम असल्याने त्यांनी स्थापन केलेले राष्ट्र हे निश्चितच सार्वभौम असते.
           सार्वभौमता नष्ट होण्याची काही कारणे अस्तित्वात आहेत; बहुधा त्याकडे कोणाचे लक्ष गेले नसेल. जरी सार्वभौमता अविभाज्य असली तरी तिच्यावर घात घालणाÚया विषमतेच्या संघर्षातून पारतंत्र्याचा वर्षाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतेही राष्ट्र हे तोपर्यन्तच सार्वभौम राहू शकते जोपर्यन्त त्याची जनता सार्वभौम असते. पंरतू भारतामधील असणारी विविधता ही आपल्या देशावर नैसर्गिकरीत्या आपण समृध्द असल्याचे चिन्ह प्रदर्षित करीत असते; तसेच भारतामधील असणारी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतीक, शैक्षणिक विषमता ही राष्ट्राचे अठरा-विसाव्याचे दारिद्रय कायम असल्याचे चिन्ह प्रदर्षित करीत असते.
          विषमता मध्ये अनैतिक वंशवाद, धर्मवाद, जातीवाद, सांप्रदायिकतावाद, भाषावाद, सामाजिक, आर्थिक विषमता इत्यादी अंतर्भूत असतात. आर्थिक विषमतामध्ये राष्ट्रातील विविध सामाजिक गटातील लोकांचे मिळकतीचे साधन काढून घेणे, राजकीय विषमतामध्ये केंद्रवाद व प्रांतवाद ही वरील सर्व विषमता ही भारत देशाच्या एकता व एकात्मतेवर प्राणघातक हल्ला करीत राष्ट्रातील जनतेची सार्वजनिक ईच्छा भंग करू पाहत आहे. कारण राष्ट्राची सार्वभौमता ही त्याच्या जनतेच्या सार्वजनिक ईच्छेवर कायम असते; जर विषमतेमधून त्यांची एकता जर भंग झाली तर आपोआपच सार्वजनिक ईच्छा ही भंग होते. आणि राष्ट्राची एकात्मता तडीस जाते. तसेच राष्ट्राची सार्वभौमता ही जनतेच्या सार्वजनिक इच्छेवर आधारित असल्यामुळे जनतेची सार्वजनिक ईच्छा भंग होते व राष्ट्राच्या सार्वभौमतेलाही वाघनखी लागतात. त्यामुळे भारतामध्ये विविधता असणे चांगलेच पंरतू विषमता केव्हाही देशासाठी चांगली ठरू शकत नाही. आपल्याला विषमता दूर करून; विविधतेत एकता साधावयाची आहे.
           माझ्या संधोनातून मी हा निष्कर्श काढीत आहे की, जनतेची सार्वभौमता नष्ट झाल्यावर अशांततेचा उद्गम होऊन हुकुमशाही व बाह्य आक्रमनातून पारतंत्र्य राष्ट्राच्या पदरात पडून राष्ट्राची सार्वभौमता छिन्न-भिन्न होते. याच्या मुळात फक्त राष्ट्रामधील वाळवीच्यास्वरूपात अस्तित्वात असणारी सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक विषमता आहे; जी राष्ट्राच्या सार्वभौमतेला टोकरून खाऊ पाहते; हे राष्ट्राच्या जनतेने जाणले पाहिजे आणि राष्ट्रातील असणारी विविध विषमता दूर करून स्वतःची सार्वभौमता राखत राष्ट्राची सार्वभौमता कायम राखली पाहिजे. नेहमीच लक्षात ठेवा, राष्ट्रातील जनतेच्या सार्वजनिक ईच्छेवर राष्ट्राची सार्वभौमता कायम असते; आणि सार्वजनिक ईच्छा राष्ट्रातील जनतेच्या एकतेच्या मुळाशी असते. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक विषमता दूर करीत सहिष्णूतेचा स्वीकार करीत राष्ट्रीय एकता आणि एकात्मता कायम राखली पाहिजे. तसेच स्वायत्त निवडणूकीत सहभाग घेऊन आपले सार्वभौमत्व कायम राखले पाहिजे.

= माझे प्रश्न आणि तुमचे उत्तरः
1. भारताच्या सार्वभौमत्वासाठी तुम्ही राष्ट्रीय एकता साधण्याचा प्रयत्न करणार का ?
2. राष्ट्रीय एकता कायम राखण्यासाठी तुम्ही सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैैक्षणिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करणार का ?
3. सार्वभौमत्व आजमावण्यासाठी तुम्ही स्वायत्त व न्यायोचित निवडणुकामध्ये नेहमी सहभाग घेता का ?
4. राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी जनतेची सार्वजनिक ईच्छा गरजेची असते आणि सार्वजनिक ईच्छेसाठी एकतेतून एकमत होणे गरजेचे असते त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार का ?
5. राष्ट्रातील जनता लोकप्रतिनिंधीना अंतिम निर्णय घेण्याचा उसना अधिकार प्रदान करीत त्यांच्या हातात राष्ट्राची सत्ता देते का ?
6. भारतीय जनतेकडे देशाची अंतिम सत्ता असते का ?
7. सार्वभौम सत्ता जनतेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे तिच्या सर्वसाधारण ईच्छेनुसार ती लोकप्रतिनिधी मार्फत देशाचा कारभार अप्रत्यक्षरीत्या पाहत असते का ?
8. राज्यकर्ता ही एक सामुदायिक व्यक्ती असते का ?
9. राष्ट्राची जनता सार्वभौम असली तरी तिला तिचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी सततच्या एका निवडणूकी कार्यप्रणालीतून जावे लागते का ?
10. राष्ट्र हे तोपर्यन्तच सार्वभौम राहू शकते जोपर्यन्त त्याची जनता सार्वभौम असते या कथनाशी तुम्ही सहमत आहात का ?
11. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक विषमता ही राष्ट्राचे अठरा-विसाव्याचे दारिद्रय असल्याचे चिन्ह प्रदर्षित करीत असते का ?