Love your new color... 32 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... 32

प्रेमा तुझा रंग नवा... 32

इकडे निखिल झोपेतून च कॉल उचलतो " हॅलो.."


पलीकडून " हॅलो..."


पलीकडचा आवाज ऐकुन निखिल खाडकन झोपेतून उठून बसत " आरु..."


दोघ थोडावेळ शांत असतात खूप वर्षांनी दोघ एकमेकांचा सहवास घेत होते.. दोघांना भरून येत होत...


तेवढ्यात अचानक..


" आ..."


पुढे.....


अचानक मोठा आवाज आल्याने इथे निखिल दोन मिनिट स्तब्ध होतो.. नंतर भानावर येत " आरोही " अस जोरात ओरडतो...


निखिल " आरोही.. हॅलो.. हॅलो..."


निखिल फोन कट करून परत लावतो तर फोन स्विच ऑफ दाखवत होता...


निखिल वेळ न लावता लगेच पार्थ ला कॉल करतो.. इथे पार्थ गाडी चालवत असताना फोन वाजतो तर तो रवीला रिसिव्ह करून स्पीकर वर टाकायला सांगतो...


पार्थ " हॅलो..."


पलीकडून " हॅलो पार्थ..."


पार्थ डोळे मोठे करून " निखिल... ( मनात : निखिल यावेळी कॉल याला समजल की काय.. नाही अस नाही होऊ शकत...) पार्थ मनात बोलत असताना इथे निखिल खूप हॅलो करतो पण काही प्रतिसाद मिळत नाही म्हणून तो मोठ्याने " हॅलो " करतो , तेव्हा जाऊन पार्थ भानावर येत " ह... हा... हा... बोल काय झाल ? यावेळी फोन ?..."


निखिल " कुठे हरवला होतास कधीचा हॅलो करतोय मी..."


पार्थ " सॉरी सॉरी बोल ना तू यावेळी फोन ?..."


निखिल " मला एक कॉल आलेला आणि त्या कॉल वर आरोही होती..."( निखिल पुढे काय घडल सगळ सांगून टाकतो..)


पार्थ डोळे मोठे करून शॉक मध्ये " व्हॉट..."


निखिल " हो... कुठे आहेस तू , आता जाऊ लोकेशन ट्रेस करू मग समजेल आरु कुठे आहे..."


पार्थ निखिल च बोलण ऐकून मोठ्याने " नाही..."


निखिल " काय ?....का नाही जायच , तुला यायच नसेल तर मी जाईन एकटा..."


पार्थ अडखळत " अ... ते तू.. तू.. का जात आहे मी आहे ना मी जातो... उगाच रिस्क होईल तुला माहिती नाही तिथे वातावरण कस असेल..."


निखिल " तू का मी पण येणार आहे , माझ्या आरु ला माझी गरज आहे... ( निखिल ला काहीतरी क्लिक झाल्यासारख ) एक मिनिट.. माझ्या मते ती जागा कोणती ते नाही माहीत मग तू अस का बोलला मी जात आहे हम...🤨 "


पार्थ " अरे..."


निखिल " थांब तू काही तरी लपवत आहेस पार्थ... बोल काय लपवत आहे तू ?...."


पार्थ " अरे.. मी..."


निखिल रागवत " आता बोलणार आहेस की नाही...."


निखिल चा राग बघून पार्थ " ओके ओके सांगतो रागवू नकोस...." ( पार्थ जी काही माहिती भेटली होती ती सगळी माहिती निखिल ला सांगून टाकतो..."


पार्थ च बोलून झाल्यावर निखिल ला जोरासा झटका लागतो , तो मोठ्याने " काय ?..."


निखिल चा मोठा आवाज ऐकुन इथे पार्थ आणि रवी दोघेही दचकतात...


नंतर निखिल भानावर येत " हे... हे... कस शक्य आहे तो तर मेला होता ना... पार्थ तू चूकीच काही ऐकल असशील... हे कस शक्य आहे इम्पॉसिबल..."


पार्थ " निखिल तू जे ऐकल ते बरोबर आहे... माझी माणस चुकीची माहिती नाही देणार..."


पार्थ च बोलण निखिल ला पटल , त्याला माहित होत पार्थ कसा आहे तो कधी चूक नाही करत...


निखिल " बट तो कसा काय जिवंत..."


पार्थ " तो जिवंत कसा ते तर त्याला पकडल्यावर च समजेल...मी आता तिथेच जात आहे..."


निखिल " मी पण येत आहे तुझ्या पाठून..."


पार्थ निखिल नाही बोलल तरी तो येण्याचा हट्ट करेल किंवा न सांगता पण तो येऊ शकतो म्हणून पार्थ ने निखिल ला यायला सांगितल..


पार्थ " ठीक आहे ये..."


निखिल " हम.. मला त्या जागेच लोकेशन सेंड कर..."


पार्थ " हो... करतो लगेच..."


दोघांच बोलून झाल्यावर फोन कट करतात.. फोन कट करून निखिल लगेच आहे तसाच उठून , ड्रॉवर मध्ये असलेली कार ची चावी घेऊन कोणालाही काही न सांगता कार घेऊन पार्थ ने सांगितलेल्या लोकेशन वर निघून जातो...







इथे रक्षित त्या जागेवर येऊन पोहोचतो जिथे आरोही ला कोंडून ठेवल होत.. त्या जागेवर पोहोचल्यावर बघतो तर तिथे कोणतीतरी गडबड चालू होती , तिथले काही बॉडी गार्ड बाहेर येताना दिसत होते...


रक्षित आत जात त्यातल्या एका बॉडी गार्ड ला थांबवून " हे काय चाललंय तुम्ही असे पळत का आहात.."


तो बॉडी गार्ड " सर त्या सगळ्या मुली पळून गेल्या..."


रक्षित " काय ?... अश्या कश्या पळाल्या , मी सांगितल होत त्यांना कुठेही जाऊ द्यायच नाही.. ह... तुम्ही काही नाही आहात..."


तो बॉडी गार्ड खाली मान घालून " सॉरी सर.. "


रक्षित त्याच सॉरी ऐकुन आणखी रागवत " आता सॉरी बोलून काय होणार... ( रागात केसात हात फिरवत ) तुम्हाला माहीत आहे कुठल्या रस्त्याने गेलेत ( तिथे दोन रस्ते एक डाव्या बाजूला दुसरा उजव्या बाजूला , आरोही आणि बाकी मुली उजव्या रस्त्याने पळाले होते..)..."


तो " हो सर..."


रक्षित तिथूनच माघारी जात " चला मग... आणि त्याला सांगा काळजी नको घ्यायला मी तिला आणि बाकी सगळ्यांना घेऊनच येईन... मग बघू त्यांना अशी शिक्षा द्यायची की कधी पळण्याचा विचार नाही केला पाहिजे..."


एवढ बोलून रक्षित झपाझप पावले टाकून तिथून बाहेर पडतो आणि ज्या दिशेने आरोही गेली त्या दिशेने गाडीचा स्पीड वाढवत तिथून निघून जातो.. त्याचा पाठोपाठ बाकीचे पण निघून जातात....






इथे विजय रागातच घरी येतो आणि थेट आपल्या बेडरूम मध्ये जात तिथल्या वस्तू इथे तिथे फेकून आपला राग काढत असतो.. पण काही केल्या राग जात नाही त्याच्या डोक्यात गीता ने आतापर्यंत जे काही केल होत तेच सारख सारख येत होत.. गीता ला मारून सुद्धा विजय च समाधान झालेल नसत...


विजय खाली गुडघ्यावर बसून जोरात " आ.... मी सोडणार नाही कोणालाच नाही सोडणार... "


एवढ ओरडून विजय तिथून उठतो आणि बेडरूम च्या बाहेर येतो आणि मेन दरवाजा उघडून बाहेर जाणार तर समोर दोन पोलिस उभे असतात... त्यांना बघून विजय च्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नव्हती.. दिसत होता फक्त राग त्या चौघांबद्दल चा....


विजय काही झाल नाही अस चेहऱ्यावर भाव आणत " तुम्ही इथे... काही झाल आहे का..."


त्या दोन पोलिसांमधून एक पोलिस " काय झाल ते तुला जेलमध्ये कळेल..."


एवढ बोलून तो पोलिस विजयच्या हातात बेड्या बांधत त्याच्या सोबत आलेल्या पोलिसाला इशारा करतो.. त्या पोलिसाचा इशारा समजुन तो पोलिस विजयला एका साईडने पकडतो तर दुसऱ्या साइडने दुसरा पोलिस पकडतो... विजयला ते दोन पोलिस पकडुन घेऊन जातात आणि विजय शांतपणे कोणतीही हालचाल न करता त्यांच्यासोबत चालतो... न जाणो त्याच्या मनात काय चालू असेल...





इथे आरोही आणि बाकी मुली बेशुध्द पडलेल्या असतात..थोड्यावेळाने आरोही ला शुद्ध येते , ती हळू हळू पूर्ण डोळे उघडून बघते तर टेम्पो एका झाडाला आढलळी होती ( मगाशी निखिल च्या आवाजाने आरोही चा बॅलन्स घेल्यामुळे त्यांचा ॲक्सिडन्ट झाला होता ).. ती आजूबाजूला बघते तर चहूबाजूंनी घनदाट जंगल होत... नंतर हळूहळू रियाला आणि बाकी मुलींना शुद्ध येत होती.. शुद्ध आल्यावर सगळे बाहेर येऊन उभे राहतात...


रिया चहूबाजूंनी बघत " आता इथून बाहेर कस पडायच...."


बाकी मुलींमधून एक मुलगी " हे ॲमेझॉन जंगल सारख दिसत आहे... अस वाटत आहे की इथली झाड कोणी विकत नाही घेतली म्हणून अशी पडून आहे..."


तिच बोलण ऐकून आरोही सोडून सगळे त्या मुलीकडे इथे काय चालू आहे आणि तुझ काय चाललय अश्या आविर्भावात बघत असतात...


इथे आरोही त्या मुलीच ऐकुन हसत " हम कदाचित कोणाला अशी जंगली झाड आवडली नसेल म्हणून कोणी घेतली नसेल...."

रिया

तिच्या कडे विचित्र नजरेने बघत " एकदम थर्ड क्लास जोक होता..."

सगळे बोलत असताना अचानक कुठून तरी हालचाल जाणवते.. तशी आरोही सगळ्यांना इशाऱ्यानेच शांत बसायला सांगत इथे तिथे बघते.. आरोही आजूबाजूला बघत असताना तिच लक्ष समोर जात आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते... तशी ती इशाऱ्यानेच चला बोलून पुढे निघून जाते तिच्या मागोमाग रिया आणि बाकी मुली पण निघून जातात...

क्रमशः

©® भाग्यश्री परब

Rate & Review

Arati

Arati 11 months ago