Love your new color... 33 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... 33

प्रेमा तुझा रंग नवा... 33

सगळे बोलत असताना अचानक कुठून तरी हालचाल जाणवते.. तशी आरोही सगळ्यांना इशाऱ्यानेच शांत बसायला सांगत इथे तिथे बघते.. आरोही आजूबाजूला बघत असताना तिच लक्ष समोर जात आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते... तशी ती इशाऱ्यानेच चला बोलून पुढे निघून जाते तिच्या मागोमाग रिया आणि बाकी मुली पण निघून जातात...



पुढे....


रिया आणि बाकी सगळे आरोही जिथे जात होती तिथे हे सगळे तिच्या मागून जात होते...


आरोही चालता चालता एके ठिकाणी येऊन उभी राहिली आणि तिच्या मागोमाग बाकीचे पण तिच्या मागे येऊन उभे राहिले .. समोर बघतात तर तिथे एक भेगा पडलेल घर होत...


आरोही मागे वळून हळू आवाजात सगळ्यांना " पटकन आत चला आवाज न करता.. कम फास्ट.."


एवढ बोलून आरोही पुढे गेली आणि आत दरवाजाच्या एका बाजूला उभ राहत सगळ्यांना आत लवकर येण्याचा इशारा केला.. तसे सगळे तिची ऑर्डर फॉलो करत पटपट आत आले , सगळे आत आलेले बघून आरोही ने लगेच दरवाजा बंद करत सुटकेचा निःश्वास सोडला...


आरोही मागे वळून सगळ्यांना गप्प राहण्याचा इशारा करत इकडे तिकडे नजर टाकली तर तिला तिथे एक छोटीशी खिडकी दिसली.. खिडकी दिसताच तिने लगेच तिथे जाऊन बघितल तर तिला काही हट्टे कट्टे माणस इथे तिथे बघत होती जणू ते काही तरी शोधत होती.. आरोही ला लगेच समजल की ते रक्षित ची माणस आहेत..


तशी आरोही लगेच मागे वळून हळू आवाजात " आवाज नका करू आपल्याला शोधत इथपर्यंत आले आहेत ते..."


आरोही च्या बोलण्याने सगळे एकदम शांत कोणताही आवाज न करता एका जागेवर उभे राहिले...


आरोही बाहेर ती लोक काय करत आहेत ते बघत होती..बाहेर ती लोक चारही बाजूने इथे तिथे शोधत होती..


इथे रक्षित मधोमध उभ राहत सगळ्यांना ऑर्डर सोडत होता..


रक्षित " सगळीकडे शोधा त्यांना एक एक कोपरा बघा ते इथेच असतील.. त्यांना मी नाही सोडणार एकेकीला तडफवून मारेन त्यांची हिम्मत च कशी झाली पळून जायची , याची शिक्षा तर भेटणारच आहे त्यांना.."


रक्षित आणि त्याची माणस या सगळ्यांना शोधत शोधत येत असताना त्यांना एक टेम्पो झाडाला धडकलेली दिसली.. मग रक्षित ने ती टेम्पो निरखून बघितल तेव्हा त्याला समजल की ही आपलीच टेम्पो आहे , नंतर त्याला खात्री झाली की टेम्पो इथे धडकली आहे म्हणजे त्या सगळ्या मुली इथेच कुठे तरी असतील म्हणून त्याने पटापट हालचाल करत त्याचा माणसांना चारही बाजूंनी त्यांना शोधायला पाठवल..


रक्षित इकडे तिकडे बघत असताना त्याला एक घर दिसत..


रक्षित मनात " सगळ्या मुलींना सगळीकडे शोधल अजुन कुठे सापडल्या नाहीत म्हणजे त्या याच घरात लपल्या असतील.. " मनात बोलून तो एक एक पाऊल पुढे टाकत त्या घराच्या दिशेने जातो..


इथे आरोही रक्षित ला येताना बघून ती लगेच ताठ उभी राहत डोळे मोठे करून समोर रक्षित ला येताना बघत असते.. नंतर भानावर येत पटकन मागे वळून ती इथे तिथे बघते तर तिला पाठीमागून निघण्याचा दरवाजा भेटतो तर तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो आणि पटकन सगळ्यांना इशारा करत त्या दिशेने जाते पण लगेच थांबत तिच लक्ष एके ठिकाणी जात तर तिचा आनंद द्विगुणित होतो... कारण तिथे एक लाकड्यांचा गठ्ठा असतो , तस ती सगळ्यांना हळू आवाजात " सगळ्यांनी एक एक लाकडी घ्या आणि चला पटकन माझ्या पाठोपाठ.. तो रक्षित कधीही येऊ शकतो इथे.."


आरोही च बोलण ऐकून सगळ्यांनी तिची ऑर्डर फॉलो करत एक एक लाकडी घेतली , आरोही ने सुद्धा एक लाकडी घेतली..


आरोही सगळ्यांना इशारा करत हळू आवाजात " फॉलो मी..." अस म्हणत तो दरवाजा उघडून बाहेर आली आणि बाहेरचा अंदाजा घेत थोडी पुढे आली , तसे सगळे तिच्या मागून बाहेर येत उभे राहिले... आरोही अंदाजा घेत पुढे पुढे जात होती आणि तिच्या मागोमाग बाकीचे पण जात होते...


आरोही पुढे जाता जाता मध्येच थांबली , तसे सगळे जण थांबत ही का थांबली म्हणून आरोही च लक्ष जिथे आहे तिथे बघितल तर त्यांना रक्षित चे चार माणस थोड्याच अंतरावर पाठमोरे उभ राहत इथे तिथे बघत होते..


आरोही सगळ्यांना गप्प राहण्याचा इशारा करत त्यातल्या तीन मुलींना आपल्यासोबत चालण्याचा इशारा केला..


आरोहीचा इशारा समजुन त्या तीन मुली तिच्या पाठोपाठ चालू लागल्या.. आरोही आणि त्या तीन मुली हळू हळू आवाज न करता त्या माणसांच्या पाठी जाऊन उभ्या राहिल्या..


ते माणस मागे वळणार त्या अगोदरच त्या चौघीनी एकत्रच त्यांच्या डोक्यावर जोरात लाकडीने वार केला , या चौघिनी त्यांना अस मारल की त्या माणसांच्या तोंडातून शब्द न निघता ते जागीच बेशुध्द झाले... तस सगळ्या जणींनी सुटकेचा निःश्वास सोडला..


त्या माणसांचा खेळ संपवून त्या सगळ्यांनी पुढचा रस्ता पकडला.. थोड अंतर पुढे जात त्यांना परत चार माणस उभी दिसली , त्यांनी परत तसच मारल जस अगोदरच्या माणसांना मारल होत... पुढेही अशीच चार माणस भेटली आणि त्यांनाही तसच मारल...


आरोही आणि बाकी सगळे पुढे जात होत्या तर ते मध्येच थांबल्या सोबत त्यांच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर वाली स्माईल आली.. पुढे एक रस्ता दिसत होता , म्हणजे च त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता..


तश्या त्या वेळ न घालवता पटपट पाऊल टाकत जात होत्या , थोड चालल्यावर सगळे जागीच थांबले.. समोर रक्षित आणि त्याचे काही साथीदार उभे होते..


रक्षित डेविल वाली स्माईल देत सगळ्यांना बघत होता..आरोही आणि बाकीच्या मुली आता आपल काही खर नाही अश्या आविर्भावात एकमेकांकडे बघत होत्या..


रक्षित खुनशी हसत " खूपच माज होता ना पळून जाण्याचा.. ( रागात ) तुमची हिम्मत च कशी झाली पळून जाण्याची हा , आता अशी शिक्षा भेटेल ना परत पळून जाण्याची हिम्मत च नाही होणार समजल...हे बघत काय बसला आहात पकडा यांना..."


रक्षित ची ऑर्डर मिळताच सगळे धावत सगळ्या मुली जिथे उभ्या होत्या त्या दिशेने पळत सुटले... त्यांना येताना बघून आरोही जोरात ओरडत " सैनिको अटॅक.." इतक बोलून हातातली काठी उंचावून ती धावत सुटली , तसे सगळ्या मुली पण तिच्या पाठोपाठ धावत सुटल्या...


रक्षित ची माणस आणि मुली जसे जवळ आले तस एकमेकांवर अटॅक करू लागले..त्यात मुली जास्त असल्याने रक्षित ची माणस घायाळ होत होती..


इथे रक्षित आपल्या माणसांना अस घायाळ झालेल बघून त्याला खूपच राग आला.. तो हाताच्या मुठी आवळून रागात युद्ध चालू होत त्या दिशेने झपाझप पावल टाकत येत होता...


रक्षित त्यांच्या जवळ आल्यावर त्याने एका मुलीला पटकन एका हाताने पकडुन तिच्या डोक्यावर गन ताणून ओरडायला लागला " हे शांत बसा नाही तर हिला उडवेन...."


त्याच्या आवाजाने सगळ्या मुली शांत झाल्या आणि समोर बघतात तर रक्षित ने रिया च्या डोक्यावर गन ताणून ठेवली होती..


आरोही रिया ला अस बघून रक्षित ला रागाने " रक्षित सोड तिला.. नाही तर तुझी अशी हालत करेन ना की स्वताला विसरून जाशील समजल...."


रक्षित पण तितक्याच रागाने तिला " तुला जास्त कॉन्फिडन्स आला आहे का... तुझ्या अश्या धमक्यांना मी घाबरत नाही समजल , खूपच हिम्मत आहे ना पळून जायची आता बघ मी काय करतो ते ( रक्षित ने रिया चा पकडलेला हात आणखी दाबला आणि गन अजुन ताणून धरली.. त्याने हात आणखी जोरात दाबल्याने रियाला वेदना होऊ लागल्या वेदनेने तिच्या डोळ्यात पाणी यायला लागल " आह..." )..."


रिया च्या डोळ्यात पाणी बघून आरोही मोठ्याने " रक्षित..."


तस मागून धारधार आवाजात एक व्यक्ती " आवाज खाली समजल..."


त्या व्यक्तीचा आवाज ऐकुन सगळ्यांनी मागे वळून बघितल तर तिथे दोन व्यक्ती त्या सगळ्या मुलींना धारधार नजरेने बघत होते जणू काही सगळ्यांना आताच मारून टाकणार...


आरोही त्या दोन व्यक्तींना बघून हसत " ओह तुम्ही अजूनही या जगात आहात का मला वाटल तुम्हाला देवाने त्यांच्याजवळ बोलवल असणार..."


पहिली व्यक्ती चिडून " तुला म्हणायच काय आहे हा.."


आरोही " तेच जे तू समजत आहे..."


तो रागात आरोही काही करणार तर त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या हाताला धरून थांबवत " सोहम शांत हो आपण या मुलींचा बंदोबस्त करणार आहोत पण इथे नाही , यांना अश्या जागी घेऊन जायच जिथे माणूस काय कोणी प्राणी पण नाही येणार आणि अशी हालत करायची की ह्या जागेवरून हलल्या पण नाही पाहिजे..."


सोहम काही बोलणार तर त्यांना एका व्यक्तीचा आवाज येऊ लागला " त्यासाठी तुम्ही जिवंत असायला पाहिजे ना..."

त्या व्यक्तीचा अवाजाच्या दिशेने बघितल तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर पश्र्न चिन्ह दिसत होते..

रक्षित , सोहम आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीला " हे कोण नवीन मध्येच आलय " अश्या नजरेने आठ्या आणून बघत होते...


क्रमशः

©® भाग्यश्री परब

🥰Stay Happy 🥰
🥰Take care 🥰

Rate & Review

Be the first to write a Review!