Me Too books and stories free download online pdf in Marathi

Me Too

नमस्कार मित्रांनो, काय म्हणता, कसे काय चालले आयुष्य. मित्रांनो, मला आज एका अशा विषयावर माझे मत मांडायचे आहे, जो विषय जर मी उचलला तर होऊ शकते मला तुम्ही खासकरून माझा आया, बहिणी, मैत्रिणी शिव्या देतील किंवा बर वाईट बोलतील. परंतु मला एक विश्वास सुद्धा आहे कि त्या इतक्या परिपक्व आहेत कि मला काय बोलायचे आहे आणि त्यामागील माझी भावना काय आहे ती नककी समजून घेतील. पुर्वानुमान लावून काही अर्थच नाही आहे, जेव्हा पर्यंत मी किंवा कुणीही व्यक्ती काही बोलून दाखवणार नाही तो पर्यंत समोरच्याला काहीच कळणार नाही. म्हणून मी माझा मनात जी भावना जे विचार उमडून राहिले आहेत ते तुमचा समोर मांडण्याचे प्रयत्न करतोय. पण तरीही अनपेक्षित जर कुणाची भावना मजकडून दुखावली गेली असेल किंवा दुखावली गेली जाईल तर कृपा करून मला क्षमा करावी ही विनंती सोबतच मज विषयी कसलाही गैरसमज कृपाकरून आपल्या मनात बाळगू नये. तर मी आत्ता तुमचा पुढे माझे मनोगत सांगतो.

तर मित्रांनो, मी आज बोलणार आहे “ मी टू ” या विषयावर . मी टू या विषयावर किंवा या शब्दाबद्दल तुम्ही खासकरून माझा आया, बहिणी, मैत्रिणी फारच चांगल्या प्रकारे जाणता आणि समजता. ज्या विषयाने मागील काही वर्षांत फारच धुमाकूळ मांडला होता. सगळीकडे जणू एखादी चळवळ सुरु झाल्यासारखे वाटत होते त्या क्षणी. एकामागे एक संपूर्ण जगातील स्त्रिया या चळवळीत सामील झाल्या होत्या. सगळ्यांचा एकच नारा म्हणा कि सूर होता तो “मी टू ”. यात माझा खूपच गोंधळ होत होता कि “ मी टू” नककी अर्थ तरी काय आहे, या स्त्रिया काय म्हणत आहेत. एकत्र त्याचा अर्थ असा असावा कि त्या सगळ्या या चळवळीत सहभागी आहेत किंवा त्या सुद्धा पिडीत आहेत. त्या केसमध्ये ऐका पुरुषाने ऐका स्त्रीबरोबर दुर्व्यवहार केला होता. त्यावेळेस त्या स्त्रीने हिम्मत करून ही गोष्ट जगापुढे आणली होती. तेव्हाच सगळ्या स्त्रिया त्या सबंधित पुरुषाला दंड द्या म्हणून मागणी करत रस्त्यावर निघाल्या होत्या. त्याचबरोबर काही आणखी स्त्रियांनी सुद्धा त्यापासून बोध घेत आणि हिम्मत एकवटून त्याचबरोबर भूतकाळात झालेल्या दुर्व्यव्हाराब्द्द्ल जगाला सांगण्याचे धाडस केले. तेव्हा तर वातावरण इतके तापले होते फक्त आणि फक्त काही महिन्यांसाठीच, जसे आपण दुध तापवायला ठेवतो आणि ते दुध जसे उतू येते तसेच स्त्रियांचा पुरुषांप्रती रोष फारच चरम सीमेला भिडून गेला होता. त्या वेळेस अपराधी पुरुष तर कमी परंतु जे साधे भोळे घरघुती पुरुष होते ते ही या रोषाचे कोपभाजन होऊ लागले होते.

त्यावेळेस साध्या पुरुषाला ही रस्त्यावर चालणे फारच कठीण झाले होते. चुकून एखाद्या स्त्रीकडे त्याने एक नजर पहिले तरीही परस्त्रीकडे बघत होता म्हणून त्याला तुरुंगात टाकतो अशा धमक्या भेटू लागल्या होत्या. अहो बाहेर तर होणारच परंतु घरात पत्नी पतीला त्या नजरेने बघू लागली होती. मुलगी बापाला किळसवाण्या नजरेने बघू लागली होती. पती पत्नीचे, बाप मुलीचे संबंध खराब होऊ लागले होते. परंतु त्याही बिकट परीस्थित माझ्या काही समजदार आणि परिपक्व अशा आया बहिणीने आपल्या परिपक्वतेचे उदाहरण चांगल्या तऱ्हेने या जगाला दिले. त्या अशा परीस्थितीत अशा साधा पुरुष तो घरचा असोत किंवा घरा बाहेरचा असोत त्याचा पुढे ढाल बनून उभ्या राहिल्या. त्यांनी समाजाला सांगितले जसे हातातील पाच बोटे सारखी नसतात तसेच प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री सारखे नसतात. आपण सगळ्याना एकाच नजरेने बघू शकत नाही किंवा त्यांचाबद्दल चे आपले मत ठरवू शकत नाही. त्या नंतर पुरुषांना काही तरी दिलासा मिळाला आणि ते सहजरीत्या समाजात वावरू लागले होते.

मित्रांनो, मी जर चुकत असेल तर मला तुम्ही करेक्ट कराल कि हे प्रकरण सर्वप्रथम आपल्या देशात म्हणजेच भारतात सुरु झाले. भारतीय ऐका महिलेने हे प्रकरण जगापुढे आणले आणि भारत देशाबरोबर जगातील सर्व देशापर्यंत ही चळवळ जाऊन पोहोचली होती. आपण म्हणतो बाहेर देशात सगळ उघळ नागळ चालत त्या देशांतूनही स्त्रिया या चळवळीत सहभागी झाल्या होत्या. परंतु वाईट वाटून घेऊ नका खास करून माझा आया बहिणी यात काही स्त्रियांनी पुष्कळशा निरपराध पुरुषांना आकारण आपला सूळ उगवण्याचा भावनेने त्रास दिला. यात एक नेहमीची गोष्ट निर्माण झाली ती नवनवीन संस्था जन्माला आल्या. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यावर जशा ठीक ठिकाणी गवत उगवत तशाच या संस्था गल्लो गल्ली उघडल्या. त्या संस्थांची महिला कार्यकर्ता घरोघरी जाऊन पीडित महिलेला भेटू लागली. जशी काही त्यांचा शरीरात शक्तीच संचारली होती. त्यांचा एकच हेतू होता कि आमचा संस्थेने इतके प्रकरण आणले, इतकी आम्ही मदत केली. यात तर राजकारण आलच प्रत्येक पार्टीचा महिला कार्यकर्ता पीडितांची कमी आपल्या पार्टीचे गुणगान जास्त करू लागले होते. दिवसंदिवस ते उतू गेलेले दुध थंड झाले. आता कुठेच काहीच एकू येत नाही. हे जे “मी टू” करणारे दुसर्यांचा घरचा विषय असला तर जाऊन तेथे “मी टू” म्हणतात पण त्यांचा घरात “मी टू नाही” असे चित्र असतात. साध्या सर्वसामान्य स्त्रियांचे सोडा परंतु जे हे संस्थेचे दुकान उघडून बसले आहेत ते जेवढे दुसर्यांचा घरात इंटरेस्ट घेतात. जेव्हा त्यांचा घरची गोष्ट येते तेव्हा त्याचं “ मी टू” कुठे जाते.

त्यांचाच घरात मोलकरीनीला म्हणा कि स्वतःचा सुनेला वाईट वागणूक मिळत असेल तेव्हा त्यांना सगळ चालत. त्यांचीच नाही हो ही आपल्या सर्वांचीच गोष्ट आहे. शेजारी आपल्या बायको मुलांना मारहाण करतो तर मी संस्थेचा कार्यकर्ता आहे म्हणून शेजारीचा घरी जाऊन त्याला अक्कल शिकवून देणारा तेथे जाऊन “ मी टू” म्हणतो आणि स्क्तःचा घरी तेच कृत्य आपल्या बायको आणि मुलांबरोबर करतो तेव्हा “मी टू नाही ” म्हणजेच मी यात सहभागी नाही म्हणतो. यात कार्यकर्ता महिला आणि पुरुष दोन्ही ही आलेत. पुरुषच नाही तर महिला सुद्धा घरात आपल्या पतीला छळू शकते. महिलांसाठी तर वाट्टेल तितकी महिलामंडळ बनलेली आहेत परंतु पुरुषांचे काय? मला तर एकही पुरुष मंडळ बनलेले कानावर आले नाही आता पर्यंत. इथे सुद्धा मी चुकीचा असेल तर मला तुम्ही करेक्ट कराल.

मी जे बोलतोय यासाठी मला माफ करा, परंतु हे सत्य आहे कि आपल्या देशात फक्त आणि फक्त आपल्या देशात यासाठी म्हणतोय कारण कि बाहेरचा देशात आपण स्वतः जाऊन पहिले नाही किंवा अनुभवले नाही. म्हणून म्हणतो आपल्या देशात काहीही स्वार्थ शिवाय होत नाही आणि होणार नाही. जसे मौसमी वारे येतात आणि जातात तसेच अशा नवनवीन चळवळ येतात आणि जातात. असे वारे जेंव्हा वाहतात तेव्हा एक म्हण आहे कि “ बहते गंगा मे हाथ धोना” त्याचप्रमाणे अशा संधीचा फायदा घेऊन काही लोकं आपला स्वार्थ साध्य करतात. तेंव्हा त्या पिडीत व्यक्तीचा मुद्द्याला इतके महत्व दिले जाते कि ती काही सांगू शकत नाही. फक्त आणि फक्त काही दिवस जोपर्यंत आपला स्वार्थ साध्य होत नाही आणि एकदाचा आपला स्वार्थ साध्य झाला तर भुतासारखे कसे आणि केव्हा गायब होतात कळतच नाही. याचत तर आपले राजकारण पहिल्या नंबर वर असते ज्या क्षेत्रातील पिडीत असेल किंवा तो क्षेत्र ज्या पार्टीचा हद्दीत येत असेल तर विरुद्ध पार्टीचे कामच असते तेथे जाऊन जास्तीत जास्त त्या पिडीतेचा प्रचार करण्याचा आणि तेथील लोकल पार्टीला कसे खाली पाडायचे. पिडीतेचा बहाण्याने राजकारण खेडायचं आणि तेथील पार्टीला पाडायचे. त्यासाठी पिडीतेला एक कठपुतली सारख वापरायचे आणि आपला आणि आपल्या पार्टीचा प्रचार करायचा. ज्या दुखाला ती पिडीत विसरण्याचा प्रयत्न करू इच्छित असेल तरीही पुन्हा पुन्हा त्या जख्मा उखरून त्याला मुद्दा बनविणे ते ही आपल्या स्वार्था करिता.

खरतर आपली मानसिकताच अशी बनलेली आहे आपल्या पाठीमागे तर सोडा आपल्या नजरे समोर रस्त्यावर काही घडत असेल तर मला काय करायचे आहे त्याचे तो बघत बसेल असे म्हणून तेथून निघून जाण्याची आणि जेंव्हा स्वतः अशा परीस्थितीत आपण सापडलो तेंव्हा आशेने इतरत्र बघण्याची. जेंव्हा दुसर्यावर प्रसंग ओढावतो तेंव्हा “ मी टू ” का बर येत नाही तर स्वतः वर वेळ आल्यास “मी टू ” ची आशा करतो. मी विचारतो काय “मी टू” करण्यासाठी अशा सार्वजनिक चळवळीचीच आवश्यकता असते काय. आज आपल्याला सर्वांच ठिकाणी आवश्यकता आहे “मी टू ” ची. आज अनेक प्रश्न, समस्या, मुद्दे आहेत ज्यांनी आपण सगळे पिडीत आहोत पण याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. याबरोबर कुणीही असा माई का लाल येऊन म्हणत नाही “मी टू ”. ज्याचा वाट्याला जे दुख आले आहे तोच गुमान ते दुख सहन करत जगतोय आणि असेच करत करत एकेदिवशी मरतो. तेंव्हा कोणतीच संस्था, कोणतेच मंडळ हे तर सोडा अहो कोणीही सखा सोयरा येत नाही “मी टू ” म्हणायला. आपल्या देशात म्हणा कि संपूर्ण जगात दुर्व्यवहार आणि दुष्कर्म होतच आलेत पण याचं मानसिकतेने आपण मनुष्य जगात आलोत. आजही घरोघरी दुर्व्यवहार होतात, लहान माणसांचा घरचा आवाज पटकन रस्त्यावर जातो परंतु मोठ्या घरातील आवाज सहसा जात नाही. असे नाही कि तो आवाज मोठा नसतो, तो ही आवाज मोठा असतो परंतु तेथे कुणा गरीबाची मजबुरी आडे येते. त्या मजबुरीपाई तो किंवा ती बेचारे हे दुर्व्यवहार सहन करत असतात. कारण कि अशी मानसिकता त्यांना माहित आहे. कुणाचा भुलाव्यात येऊन त्यांनी काही बोलले तर रोजगार हातून जातो.

गरीब आपल्या इज्जतीला भितो, त्याला माहित आहे आपल्या घरची इज्जत ही आपणच सांभाळली पाहिजे म्हणून तो कितीही त्रासात असला तरीही आपल्या घरची गोष्ट रस्त्यावर येऊ देत नाही खास करून घरची स्त्री. ती घरात मारझोड सहन करून आपले घर सुखी ठेवण्याचे प्रयत्न करते. पण आपल्या ओठांवर ते दुख कधीच येऊ देत नाही आणि तशीच एके दिवशी मरून जाते. मित्रांनो, या विषयावर कितीही आणखी लिहिले तरी हा विषय संपणार नाही स्त्री, कन्या यांचाब्द्द्ल जे ही दुष्कर्म आणि दुर्व्यवहार होतात त्यांचा विरोधात मी सुद्धा “मी टू” म्हणतो म्हणजे असे व्हायला नको आणि त्याचा दुखात मी सुद्धा सहभागी आहे. या अनुषंगाने मी “मी टू” म्हणतो. दुष्कर्म आणि दुर्व्यवहार करणार्यांना सक्त अशी शिक्षा झाली पाहिजे. माझी फक्त एकच इच्छा आहे कि जसे वरील विषयाकरिता “मी टू” होते आहे तसेच आपल्या मानवी जीवनातील प्रत्येक समस्यांसाठी “मी टू” झाले पाहिजे. मी जे काही बोललो त्याने माझ्या आया, बहिणी, आणि मैत्रिणींचे काही मन दुखावले असतील तर मला माफ करा.
धन्यवाद
गजेंद्र गोविंदराव कुडमाते