तमःकार

  • 558
  • 125

फुल्ल स्पीड मध्ये चालु असलेला व्हायपरब्लेड गाडीच्या काचेवरचा पाण्याचा थर दूर करायला निष्फळ ठरत होता. संदीप आणि विद्या कार मध्ये बसून घरी निघाले होते. काळजीच कारण पाऊस नव्हता तर... विद्याला अचानक पणे सुरु झालेल्या प्रसव वेदना हे होतं. घाट रस्ता, निबीड आरण्य, रोरावणाऱ्या वाऱ्यांसहीत भयाण कोसळणारा पाऊस आणि पसरलेला दाट अंधार. यामध्ये जीव मुठीत घेऊन संदीप गाडी चालवत होता. पुढं काय वाढून ठेवलंय याची दोघांना किंचितही कल्पना नव्हती.हे सुरु झालं ते विद्याच्या अचानक मनात आलेल्या इच्छेने."आज मला हिरवं कुरण आणि टपटपणारा पाऊस बघायचाय." असं विद्या संदिपला म्हणाली. बुधवार दुपार होती. बाहेर पाऊस पडत होता. संदिपला वाटले कारने तिनेक तासाचा ड्राईव्ह