स्वप्नस्पर्शी

(25)
  • 61.8k
  • 3
  • 30.1k

स्वप्नस्पर्शी हे पुस्तक व्यावहारिक कर्तव्यपूर्ती पार पाडल्यानंतर जो वेळ आपल्यासाठी उरतो त्यावर आधारित आहे. जीवनात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्या करायला काळ आपल्याला थोडा वेळ देतो. तेव्हा त्या गोष्टी करून आनंद घ्यावा. त्याची पुर्तता करून समाजासाठी व स्वतःसाठी जरूर जगावे. त्यावेळेसही आपण कारण नसताना कौटुंबिक जीवनात अडकून पडलो तर नंतर काळ आणि कुटुंब दोघही तुमची किंमत करत नाही. घरासाठी कितीही कष्ट उपसले तरी त्यात आपल्याला समाधान मानून घ्यावं लागतं. पण त्या समाधानाची फिकीर समोरचा करेलच असे जरूरी नाही. आपण कामात किती व्यस्त आहोत आणि तुम्ही कसे रिकामपणे काही न करता जगता अश्या विचारावर समोरच्याचा भर असू शकतो. प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि तो त्या पध्दतीने जगतो. हे संस्कार लहानपणीच बिंबवले गेले तर त्या हीन भावनेला फार कमी जणांना सामोरे जावे लागेल. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळेच तर जगात इतके प्रकार तयार होऊ शकले. वैविध्यता आली. त्या वैविध्यतेतून आपल्याला काय आवडतं ते जगून तृप्त होण्याची संधी मिळाली. पण फार कमी जणांना आपल्याला खरच काय हवे आहे हे लक्षात येते. मग त्यांनी त्या वाटा निवडल्यावर, त्या जरा जगावेगळ्या असल्या की टीकेचा सामना करावा लागतो. त्याच्याशी सामना करण्याची कुवत एखाद्यापाशी नसली तर त्याला आपलं स्वप्न, आवड दूर सारावी लागते. मग ती कुवत शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अश्या कितीतरी प्रकारानी नसू शकेल. पण त्यावरही मात करून एखाद्याने झेप घेतली तर ती भलेही बाकीच्यांच्या दृष्टीने फार मोठी नसेल पण त्या व्यक्तीसाठी ती एक गरुडझेप असेल. त्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा असेल. त्याच्या आनंदात जगाला सहभागी करायलाही उत्सुक असेल. पण जगाने सहभागी होणे नाकारले तरी त्याला त्याची खंत नसेल. या पुस्तकात सरळ साध्या माणसांची साधी स्वप्न पुर्णतेची कहाणी आहे. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतातच. पण त्या अडचणींनाच आपलं जीवन न बनवता ओघवतं राहणारं कुटुंब दर्शवलं आहे. प्रत्येकाच्या स्वप्नांचा आदर करा. एव्हढाच या पुस्तक लिहिण्यामागे उद्देश आहे.

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

स्वप्नस्पर्शी - 1

स्वप्नस्पर्शी हे पुस्तक व्यावहारिक कर्तव्यपूर्ती पार पाडल्यानंतर जो वेळ आपल्यासाठी उरतो त्यावर आधारित आहे. जीवनात काही गोष्टी करायच्या राहून त्या करायला काळ आपल्याला थोडा वेळ देतो. तेव्हा त्या गोष्टी करून आनंद घ्यावा. त्याची पुर्तता करून समाजासाठी व स्वतःसाठी जरूर जगावे. त्यावेळेसही आपण कारण नसताना कौटुंबिक जीवनात अडकून पडलो तर नंतर काळ आणि कुटुंब दोघही तुमची किंमत करत नाही. घरासाठी कितीही कष्ट उपसले तरी त्यात आपल्याला समाधान मानून घ्यावं लागतं. पण त्या समाधानाची फिकीर समोरचा करेलच असे जरूरी नाही. आपण कामात किती व्यस्त आहोत आणि तुम्ही कसे रिकामपणे काही न करता जगता अश्या विचारावर समोरच्याचा भर असू शकतो. प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि तो त्या पध्दतीने जगतो. हे संस्कार लहानपणीच बिंबवले गेले तर त्या हीन भावनेला फार कमी जणांना सामोरे जावे लागेल. ...Read More

2

स्वप्नस्पर्शी - 2

स्वप्नस्पर्शी : २ रोजच्या ऑफिसच्या रस्त्यांचा राघवांनी मनानेच निरोप घेतला. कार घरापाशी थांबली. बाळू रोजच्या सवयीने ऑफिसबॅग मागे गेला. ते पाहून राघव हसू लागले तसा बाळूही हसू लागला. “ पहा आता मला पण किती सवयी तोडाव्या लागणार.” क्षणभर उसासा टाकत ते म्हणाले. पण परत सावरून उत्साहाने गप्पा मारत आत शिरले. दोघांना घरात अकारण शांततेची झुळूक ...Read More

3

स्वप्नस्पर्शी - 3

स्वप्नस्पर्शी - ३ सवयीप्रमाणे पहाटवाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली, आणि राघवांची साखरझोप चाळवली. पहाटेच्या थंडाव्यात उबदार पांघरूणात पडून राहायचं अनुभवत दिवसाचं वेळापत्रक ठरवायचा त्यांचा रोजचा नियम होता. पण.. आता काय ठरवायचं ? खुप छान वाटत राहिलं त्यांना. आता कुठले नियम बांधून घेण्याची गरज नव्हती. पण मग हे ही लक्षात येत गेलं ...Read More

4

स्वप्नस्पर्शी - 4

स्वप्नस्पर्शी : ४ पंधरा दिवसांसाठी आलेला नील, जायचा दिवस आलेला पाहून खंतावू लागला. किती घडामोडी झाल्या होत्या या दिवसात. बाबांची पार्टी झाल्यावर, सर्वांनी केलेल्या विचारविनिमया प्रमाणे आबांनी त्यांच्या मित्राला फोन केला. ते तयारच होते. जमिन पहाण्यासाठी त्यांचं बोलवणं आल्यावर सगळ्यांनीच मी पण येणार अशी घोषणा केली. मग कौटुंबिक सहल गुहागरला न्यायची ठरली. घरी तीन ...Read More

5

स्वप्नस्पर्शी - 5

स्वप्नस्पर्शी : ५ नेहमीच्या सवयी प्रमाणे पहाटवाऱ्याने राघवांना जाग आली. पण आजची हवा कशी वेगळीच जाणवत होती. स्वच्छ. कोलाहल इथे जाणवत नव्हता. प्रदूषणाचा गंध नाही. स्वच्छ, आल्हाददायक हवेत एक असीम शांतता भरुन राहिली होती. निसर्ग अजुन अस्फुट जागृतावस्थेत होता. राघवांना पहाट अंगावर घेत, पडून रहायला फार आवडायचं. ते शांतता ...Read More

6

स्वप्नस्पर्शी - 6

स्वप्नस्पर्शी : ६ रात्री अकरापर्यन्त घरी पोहोचले तेव्हा सगळे अगदी थकून गेले होते. रस्त्यातच जेवण करुन घेतल्यामुळे घरी कसेबसे कपडे बदलून सर्वजण गाढ झोपुन गेले. दुसऱ्या दिवशी घराला जरा उशिराच जाग आली. पहाटे उठणाऱ्या राघवांना आज सुर्यकिरणांनी जाग आणली. गडबडीत सगळेच उठले. आज मधुरला कामावर जायचं होतं. त्याच्या मुलांनाही शाळा होत्या ...Read More

7

स्वप्नस्पर्शी - 7

स्वप्नस्पर्शी :७ बुधवारी आबा आले. अमेरिकन दुतावासात शुक्रवारी साडेदहाची वेळ मिळाली. दोन दिवस नुसती धावपळ चालली होती. शुक्रवारी त्यांना एंबसीमधे सोडून ऑफिसला निघून गेला. आतली प्रोसिजर आटोपली की तिघं टॅक्सीने घरी येणार होते. हळुहळू करत सगळे सोपस्कार पार पडले. नीलनी टिकिट बुक करून ठेवलेच होते. आता महिना मोकळाच होता पण आनंदात आणि तयारीच्या ...Read More

8

स्वप्नस्पर्शी - 8

स्वप्नस्पर्शी : ८ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कातीव हिरव्यागार कुरणांच्यामधुन काळाशार रस्ता पुढे सरकत होता. पोटातलं पाणी पण हलणार नाही तलम रस्त्यावरून गाडी तरंगत असल्यासारखी जात होती. भारतातल्या दृश्यांशी तुलना करणं तर अवघडच होतं. अधुन मधुन कुरणं, शेती, रंगीबिरंगी फुलांमधून डोकावणारे फार्महाऊस दिसत होते. राघवांच्या मनातलं हिरवं स्वप्न त्या सगळ्याशी तुलना करून पाहू लागलं. “ ...Read More

9

स्वप्नस्पर्शी - 9

स्वप्नस्पर्शी : ९ ट्रीप एन्जॉय करता करता कधी जायचे दिवस जवळ आले कळालेच नाही. आता सगळ्यांची मनं हळुहळू जड लागली. नीलचा उदास चेहेरा पाहून राघव म्हणाले “ नील, आपल्या इतक्या छान आनंदावर उदासीचं सावट येऊ द्यायचं नाही. इतकी मजा केली आपण. गप्पा मारल्या. तुझी आम्हाला अमेरिका दाखवायची इच्छा पुर्ण झाली. यात किती आनंद आहे. हे सगळं ...Read More

10

स्वप्नस्पर्शी - 10

स्वप्नस्पर्शी : १० दुसऱ्या दिवशी राघव दिवाळीला थांबणार आहेत हे कळाल्यावर सगळं घर आनंदलं. राघवांनी मधुरला फोन करून तेव्हा प्रथम तो हिरमुसला, पण त्यांनी त्याची समजुत काढली. “ मधुर, आता हे नेहमीच चालत रहाणार. पुणं, गुहागर, कधी इथे, अशीच कुठे कुठे दिवाळी होत रहाणार. तू फक्त असं कर, धनतेरसला आपल्या घरी लक्ष्मीपुजन करून घे, आणि मग इकडे ...Read More

11

स्वप्नस्पर्शी - 11

स्वप्नस्पर्शी : ११ पहाटवारा अंगाभोवती फिरू लागला, तशी त्या सुखद वाऱ्याने राघवांना जाग आली. मावळतीला आलेले चंद्र चांदण्या जात आहेत असं त्यांना वाटून गेलं. खालचं हिरवं जग, रात्रभर चंद्र चांदण्यांचा प्रकाश पिऊन त्या तेजाने विलसतय असं भासत होतं. हळूहळू दिशा उलगडून आपले रंगाचे पट खोलू लागल्या. मग पक्षीही आकाशी झेप घेत किलकिलाट करू लागले, तसे ...Read More

12

स्वप्नस्पर्शी - 12

स्वप्नस्पर्शी : १२ सकाळी ठरल्याप्रमाणे भराभर आवरून सगळे निघाले. अस्मिताचा नुसता जीव जात होता. माझ्याशिवाय तुम्ही खरेदीला कसे पण फोनवरून नुसतेच खोटे भांडत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. गाडीत गप्पा, हसणे खिदळणे याला नुसता ऊत आला होता. वासुचं हे चहू अंगाने फुललेले रूप पाहून मनात प्रत्येकाला बरं वाटत होतं. खरं तर वीणालाही बरोबर घ्यायची इच्छा ...Read More

13

स्वप्नस्पर्शी - 13

स्वप्नस्पर्शी : १३ खंडाळ्याला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीने व स्वरूपाबरोबर चार दिवस निवांतपणे घालवल्यावर राघवांना फार बरे वाटले. जगता जगता आपलं स्वतःसाठी कधी जगणं झालच नाही हे त्यांच्या लक्षात आले. पण आता स्वतःच ते आपलं हिरवं स्वप्न पुर्ण करणार होते. स्वतःसाठी जगण्यात जेव्हढा आनंद असतो तेव्हढाच दुसऱ्यांसाठी जगण्यातही असतो. या विचाराने आपण बरोबर दिशेला ...Read More

14

स्वप्नस्पर्शी - 14

स्वप्नस्पर्शी : १४ जसजश्या बॅगा भरणं सुरू झालं तसतश्या न्यायच्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या. अगदी ताटं, वाट्या, चमचे, ग्लास, भांडे, स्वैपाकघरात लागणारे सामान, प्राथमिक किराणा, सुई दोरा, पासुन आठवून आठवून बॅग भरली. त्या घरात फर्निचर तर सगळं होतं पण बाकी जरूरी सामान तर घ्यावच लागणार होतं. उद्या सकाळी सातला निघायचे ...Read More

15

स्वप्नस्पर्शी - 15

स्वप्नस्पर्शी:१५ खिडकीतून जेव्हा सुर्यकिरणं आत आली तेव्हा सगळ्यांना जाग आली. सात वाजून गेले होते. इतका वेळ कधीच कुणी झोपत पण कालच्या प्रवासाचा शीण असेल असे आधी वाटले मग लक्षात आले की आजुबाजूला गाडयांचे आवाज नाही, दूधवाला पेपरवाला यांची बेल नाही, कुठूनही रेडिओ, टीव्हीचा आवाज नाही आणि मुख्य म्हणजे कामावर जायचे दडपण नाही की मुलांना शाळेची तयारी करुन ...Read More

16

स्वप्नस्पर्शी - 16

स्वप्नस्पर्शी : १६ राघवांचा आता उठल्यावरचा चिंतनकाळ कमी झाला होता. शेतीविषयक कामं जेव्हढी सकाळी कराल तेव्हढी चांगली, काकांच्या विचाराने दोघही पहाटेच चहा पिऊन शेतात जात असत. मोटर चालू करुन पाण्यानी जमिन मऊ करायचं काम चालू होई. उन्हात पाणी सोडलं तर त्याची वाफ होऊन जाते आणि जमिनीला पाणी कमी मिळतं, म्हणुनच पहाटेच आणि सुर्यास्ताच्या ...Read More