Datla this suspicion was terrible ... - 2 in Marathi Women Focused by Bhagyashree Parab books and stories PDF | दाटला हा संशय भीषण होता... - 2

दाटला हा संशय भीषण होता... - 2

आध्या आपल्या रूम मध्ये अभ्यास करत असते...

तेवढ्यात तिला बाहेरून तिच्या बाबांचा आवाज येतो , ती उठून जातच असते की तिला आठवत पूर्ण अभ्यास झाल्या शिवाय उठायचं नाही असा बाबांचा नियम आहे...

मग ती परत बसून अभ्यास पूर्ण करायला घेते...



थोड्यावेळाने तिचा अभ्यास पूर्ण होतो आणि ती सगळ आवरून बाहेर हॉल मध्ये येऊन बसते...

तिचे बाबा टीव्ही बघत बसलेले असतात आध्या आलेली दिसताच त्यांनी टीव्ही बंद केली आणि आपला मोर्चा तिच्या कडे वळवला...


विश्वास ( आध्या चे बाबा ) " अभ्यास झाला का ?..."


आध्या हसून " हो बाबा झाल अभ्यास..."


विश्वास " ठीक आहे मग दाखव अभ्यास आणि सोबत दैनंदिन पण दाखव..." ( आध्या च्या शाळेत एक नियम आहे की जी दैनंदिन आहे त्यात घरचा अभ्यास नोंद करणे कम्पल्सरी असावं...)



आध्या " हो आलेच..."



आध्या आपल्या रूम मध्ये जावून झालेला अभ्यास आणि दैनंदिन घेऊन येते आणि बाबांना दाखवते...


विश्वास तिचा अभ्यास आणि दैनंदिन दोन्ही चेक करतात... आध्या त्यांच्या समोर उभी राहून त्यांना बघत असते...



विश्वास तिची दैनंदिन बघता बघता त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उभ राहत आणि आपल लक्ष आध्या कडे जात...



जी हसून उभी असणारी आध्या बाबांच्या चेहऱ्यावरचा प्रश्न चिन्ह बघून गोंधळून जाते...


आध्या अडखळत " काय झाल बाबा... "


आध्या ने अस विचारल्याने तिच्या बाबांनी एका हाताला धरून त्यावर दैनंदिन जोरात ठेवली...

विश्वास " हे बघ वाच..."

आध्या गोंधळून दैनंदिन वाचते...


त्यात वर लिहिलेलं अभ्यास झाल होत , मग तीच लक्ष एके ठिकाणी जात त्यात भूगोल विषयाचे दोन धड्याची प्रश्नोत्तरे लिहायला सांगितली असते...

घाई घाईत ती विसरलेली असते...


आध्या मनात " आता आपल काही खर नाही देवा वाचव मला , वाचवलस तर मी तुला शंभर पेढे ठेवेन आणि जर मी नाही वाचले तर एकच पेढा देईन..."

आध्या मनातच बोलून आवंढा गिळते...

आध्या खाली मान घालून " बाबा ते मी विसरले सॉरी पुढे ही चूक नाही होणार..."


बाबांना आध्या च हे उत्तर ऐकून त्यांचं डोकं चांगलंच तापत... त्यांचा चेहरा रागाने लालबुंद होतो...


विश्वास रागात ओरडत " अशी कशी विसरलीस हा हे येवढ्या मोठ्या अक्षरात लिहून दिलं आहे ते दिसल नाही का तुला , की विसरलीस चा बहाणा सांगून खोटं बोलतेय का ?... अभ्यास न करण्याचा बहाणा चांगलाच शोधलास, आम्ही असे घाम गाळून काम करतोय वेडे वाटलो का तुला ?... आणि काय म्हणालीस पुढे चूक नाही होणार किती विश्वास ठेवायचा आणि कसा..."



विश्वास यांचं एवढ्या रागात ओरडण्याचा आवाजाने किचनमध्ये काम करणाऱ्या आध्या ची आई दचकल्या , त्यांच्या हातातलं भांड पडता पडता राहिला... त्या पटकन पळतच हॉल मध्ये आल्या आणि सोबत कल्पेश पण आपल्या रूम मधून हॉल मध्ये आला....



इथे हॉल मध्ये आध्या तिच्या बाबांना भरल्या डोळ्यांनी माफी मागत होती...


आध्या भरल्या डोळ्यांनी बाबांकडे बघत " बाबा अस नका बोलू मी... मी... मी... खरच परत चूक नाही करणार प्रॉमिस..."


आध्या रडत रडत त्यांना सांगत होती तरीही ते ऐकत नव्हते... ते तेवढ्याच रागात तिला ओरडत होते...


विश्वास तिला रडताना बघून आणखी रागात " डोळ्यातून एकही अश्रू निघाला नाही पाहिजे समजल... आणि आता पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय रूम च्या बाहेर पडता कामा नये आणि जेवण पण अभ्यास पूर्ण झाल्यावरच भेटणार आहे... हीच तुझी शिक्षा आहे..."



विश्वास ना आध्या ला अस बोलताना बघून कल्पना घाबरल्या...


कल्पना " अहो ती विसरली यात तिची काय चूक परत नाही करणार ती बोलली ना... अस म्हणजे अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय नाही जेवायचं आधी तिला जेवू द्या नंतर करेल ना ती..."


विश्वास " नाही मी आता कोणाचं काही ऐकणार नाही... मी जे सांगितलं आहे तसचं होईल..."


आध्या रडत बाबांचा हात हातात घेत " बाबा खर मी परत नाही करणार..."


विश्वास आध्या च काहीही न ऐकता तिला हाताला पकडुन ओढतच रूम मध्ये ढकलल...


विश्वास " अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत हे दार उघडणार नाही..."


बाबा दार बंद करायला जाणार आध्या मध्येच त्यांना थांबवते...


आध्या " बाबा प्लीज अस नका करू सॉरी... मी... मी... करेन पूर्ण अभ्यास पण दार नका बंद करू प्लीज मला एकट राहायला भीती वाटते माहिती आहे ना तुम्हाला..."

आध्या बाबांना विनवणी करत होती , तिने रडलेल्या चेहऱ्याने आपल्या आई कडे आशेने बघितले पण तिची आई काहीच करू शकत नव्हती आणि जर काही केलं असत तर प्रकरण मारण्या पर्यंत गेलं असत... सहज तिचं लक्ष कल्पेश तिच्या भावाकडे गेलं तो हे सगळ बघून हसत होता... तो हसतोय हे बघून तिला खूप वाईट वाटत होत... तरी ती विनवण्या करत होती...


आध्या च्या विनवणी ने तिचे बाबा काही ऐकत नाही आणि तिचा हात झटकत दार लावून घेतात...



विश्वास दार लावून घेतल्यावर कल्पना आणि कल्पेश कडे बघत " हे दार कोणी उघडलं तर बघा माझ्यापेक्षा कोणी वाईट नसेल समजल..."


एवढं बोलून ते निघून जातात...


कल्पना हताश होऊन किचनमध्ये निघून जाते आणि कल्पेश पण आपल्या रूम मध्ये निघून जातो...




थोड्यावळाने विश्वास , कल्पना , कल्पेश शांतपणे जेवत असतात कोणीच कोणाशी बोलत...


विश्वास आणि कल्पेश जेवण झाल्यावर आपापल्या रूम मध्ये निघून जातात...



कल्पना आपली मुलगी जेवली नाही म्हणून त्यांना जेवण घश्याखाली जात नव्हत आपल्यासाठी वाढलेलं जेवण तसचं ठेवून देते आणि किचन मधल काम आवरून आपल्या रूम मध्ये निघून जातात...



कल्पना रूम येतात आणि समोरचं दृश्य बघून त्या घाबरून ओरडतात....

" अहो..."



क्रमशः

© भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी....

Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 11 months ago

Rahul Gholve

Rahul Gholve 1 year ago