Lagnacha vaadhdivas books and stories free download online pdf in Marathi

लग्नाचा वाढदिवस

लग्नाचा वाढदिवस ..!

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे

अक्षय -तृतीया -आमच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस त्यानिमित्ताने.

मित्रहो - नमस्कार ,आज अक्षय-तृतीया ",आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या लग्नाचा तिथी नुसार वाढदिवस आहे.आमच जमल्यानंतर ,लग्न लागले त्या दिवशी तिथी होती "अक्षय-तृतीया -"..आणि तारीख होती ..०२ मे- १९७६ .

आज अक्षय तृतीया तिथी - दि.२८ एप्रिल -२०१७ ..तिथीनुसार आमच्या सहजीवन -प्रवास हा आता ४१ वर्ष पूर्ण करून .४२ व्या वर्षाचा शुभारंभ होतो आहे.

मित्र हो - १९७२ साली मी कॉमर्स शाखेचा पदवीधारक झालो .आणि मराठवाड्यात स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा - वजिराबाद नांदेड ला २७ फेब्रुवारी -१९७३ ला टायपिस्ट-क्लर्क म्हणून रुजू झालो. माझे वडील (कै).विठ्ठलराव -व्ही .एच .देशपांडे -जे अख्या बँकेत "बाप्पा देशपांडे "या नावाने परिचित होते ..ते या काळात परळी-वैजनाथ शाखेचे मनेजर होते, त्यावेळी बँकेतले वातावरण आणि कार्यालयीन संबंध अगदी नातेवाईक असल्यासारखे म्हणजे घरच्या सारखे असायचे.सर्वांना एकमेकांच्या पारिवारिक स्थ्त्ती आणि परीस्थ्तीची कल्पना असे.फार मोठा मानसिक आधार आणि माणसांची सोबत असण्याचा तो काल होता.

परळीच्या मनेजर साहेबांचा मुलगा लग्नाळू आहे " ही गोष्ट आजूबाजूच्या शाखां मधून बँकेच्या सर्क्युलर सारखी .पसरलेली होती..त्यामुळे , वडिलांचा , "बँकेतील वेळ बँकेच्या कामाच्या इतकाच -कधी कधी थोडा जास्तच वेळ -मुलासाठी आलेल्या -प्रपोजल पहाण्यात जाऊ लागला ..आणि त्या भरात त्यांनी स्वतःचेच एक सर्क्युलर -व ऑफिस ऑर्डर काढली ..त्यात त्यांच्या कडक वागण्याच्या स्टाईल झटका होता- "आमचे चिरंजीव नुकतेच बंकेत लागले आहेत ..हे जरी खरे असले तरी .."लग्नाची जबाबदारी ते सांभळू शकतील असे अजून तरी " त्यांच्या वागण्यातून आम्हास जाणवत नाही ..सबब- त्यांचे उरकून टाकणे " असे घाई करणे आम्हासी अजिबात मंजूर नाही त्यांच्या लग्न-कार्य संबंधी .विचार करणे "तूर्तास ३ वर्षतरी संभवत नाही ..! मध्येच काही ठरल्यास आम्ही आपल्याशी संपर्क साधू.

हा खलिता रीतसर साऱ्या " दख्खनी - इलाख्यात पोन्च्ता झाला " आणि जिकडे तिकडे सामसूम झाली.

थोडक्यात आता थेट -१९७६ पर्यंत ,मी "अभय-अरण्यात" राहणार होतो हे निश्चित वडिलांच्या या आदेशाने मातोर्शी सरकार नाराज झाल्या .पण..बोलून दाखवून उपयोग नाही..हा त्यांचा स्वानुभव गाठीशी होता ..त्यात पुन्हा .."आपले कार्टे -बापाच्या वळणावर गेले आहे ",..एकदा नाही म्हणजे -नाही ..हमारा घोडा ऐसा ही चलेगा "..एकूण ..आमची स्वारी प्रचंड खुश आणि मातोश्री आणि त्यांचे निकटवर्ती नाराज ..असे चित्र स्पष्ट झाले.

मधले दोन -तीन वर्ष फारच झकास गेले बघा ..मी कधी एकटा-आहे " असा भकास भाव मनात कधी नसे. बँकेत आणि बँके नंतरचा वेळ मस्त .पिक्चर पहाणे ,हॉटेल मध्ये मित्रांच्या सोबत बसून चकाट्या पिटणे अशा गोष्टीत जात असे. माझ्या स्वभावातली एक मायनस बाजू सांगितली पाहिजे .

.मी होतो दिवसात त्या एकमस्त मनमौजी -फुल-पाखरू .कधीच नाही भिर -भिरलोइकडे तिकडे शोधीत पाखरू ....||

१९७५ मध्ये वडिलांची बदली -उदगीर ला झाली .आणि हेड ऑफिस मध्यला काळजी-वाहू काकांनी माझी बदलीअंबाजोगाई वरून ..उदगीर पासून २० कि,मी असलेल्या .बिदर- जिल्ह्यातल्या .कमालनगर या गावी केली आणि सांगितले .जा तिकडे .आणि उदगीरला राहून अपडाऊन कर...झालं...ओबे डी ऑर्डर ..मी निघालो नव्या गावी..नाव-कमाल नगर..-कर्नाटक -महाराष्ट्र - राज्य बोर्डर वरचे पहिले गाव ..बिदर तिथून ५०-६० कि.मी .असावे.

या कमालनगर गावातले लोक -कर्नाटकी लहेजा मध्ये मराठी बोलत असत ..हिंदी मध्ये पण बोलणे असायचे...मला कानडी भाषेचा ओ की ठो...कळत नाही हे समजल्यावर .ती प्रेमळ आणि साधी माणसे त्यांच्या कानडी टोनच्या मराठी मध्ये बोलत असतं.दरम्यान .कमाल नगर शाखेत .".एक उत्तम स्थळ -आहे सध्याला ,चला पाहून तर घेऊ, जमलं तर जाऊ पुढे . पोरगा पाहायला -. काय होतंय व्हो ..नशिबाच्या गाठी ..काय माहिती ? काही सांगता येत असत का? असे ठरवून उत्सुकतेपोटी येणार्या मान्यवरांची संख्या दिवसे दिवस वाढू लागली .सहाजिकच माझे मनेजर साहेब म्हणाले - देखो बाबू..तुम इन सब को..उदगीर का पता दे दो, फिर बडे लोग .सोचेंगे ..तुम इसमे ना पडो..."लडकी -वडकी -को देखने के टाईपार तुम सोचना ..तब तक..इधर काम करो...तरी पण कमाल -नगर मधल्या समाजिक-सेवेकरी मंडळीं मला मोठ्या चिकाटीने "बिदर-ला घेऊन जायचे आणि त्यामुळे अखेर " स्थळ-दर्शन घडण्याचा योग आलाच . गम्मत अशी की-यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे उपवर कन्या आणि वरवरचे वधू - संशोधन मोहिमेवर असलेला मी.. अशा दोघांना याचे काहीच गांभीर्य नव्हते. तिने चहा दिला- तो मी घेतला ",फिनिश.....असे हे ओमफस कांदा-पोहे .प्रोग्राम होत होते....इकडे मुकामी उदगीर निवासस्थानी ..मातोश्री यांचा मनसुबा मात्र दिवेसेदिवस अधिकच मजबूत होत होता ,त्यांचा हा निर्धार दृढ होण्यास ..कारण झाले ..माझ्या वडिलांच्या माविशींचे येणे ..या आज्जीबाई आल्या ..आणि मातोश्रींनी त्यांना जे सोयीचे शब्द वाटले.त्या शब्दात ..माझ्या पिताश्री बद्दल आणि माझ्या पोरकटपणाबद्दल ..गाऱ्हाणे" मांडले..इथेच मातोश्रींनी लढाई जिंकली..एका रविवारी " दादीजी की अदालत मध्ये - आम्ही बाप-लेक "उभे राहिलो" आणि आज्जी जे म्हणतील त प्रत्येक शब्दावर मान डोलवत राहिलो. परिणामी.. आज्जींनी त्यांच्या चंची तून एक यादी काढून वडिलांच्या हातात देत म्हटले -- विठ्ठल ..ही आपल्या परभणीकडची चांगली, माझ्या ओळखीची स्थळं आहेत.याच्यातून पोरगी पहायची..पसंत पडली की ..या पोराचं उरकून टाकायचं ..समजलं ?

वडीलच ज्यांच्या समोर काही बोलू शकले नाही ..त्या थोर आज्जी-माउलीच्या समोर मी अजाण-पामर काय बोलणार..

दरम्यान १९७६ च्या पहिल्या महिन्या पासून अनेक स्थळं येत होती..पत्रिका जुळत नाहीत म्हणून ..मुलगी पाहायला जाणे "हा योग नव्हता.. आणि कमाल नगरकर कडच्या कानडी स्थळांच्या गराड्यातून सुटावे याची धडपड व्यर्थ होत होती..त्यामुळे लागोपाठचे रविवार वाया गेल्या मुळे .आलेला सगळा राग .मी मातोश्री जवळ व्यक्त करीत असे.

.१९७६ -चा मार्च महिना - शनिवारी कमाल-नगर हून मी आलेलो ,आणि मातोश्री म्हणाल्या.. जरा अज्जीशी बोल ..चहाचा कप हातात .मी आज्जे समोर ..हे बघ.. उद्या तुला हिंगोलीला जाऊन याचे आहे ..,आजी पण डायरेक्ट हुकुम..जाऊन येतोस का वगेरे काही नाही..असो.

हिंगोलीचे बसोले घराणे..मोठा परिवार आहे, माणसं माझ्या नात्यातील आहे.. आणि मुलगी आपल्या घराला शोभणारी आहे. आता तू असे कर ..

तू परभणीला जा .वेणूबाई -कडे (माझी आत्या )- तिथे यशवंत ला -आणि कांताला सोबत म्हणून घे .आणि हिंगोलीला जाऊन मुलगी पाहून या. बाकीचं आम्ही बघू..-समजला ना ?

आज्जींनी सांगितल्या प्रमाणे -हिंगोलीला अर्जंट कॉल लावला गेला ..रविवार -७ मार्च १९७६ .मुलगी पहाणे "हा कार्यक्रम ठरवला गेला ,या सगळ्या कार्यक्रमाला माझी संमती आहे का ".? . असा प्रश्न माझ्या पालकांना पडण्याचा तो काळ नव्हता हो....

रविवारी सकाळी ६ वाजताच्या उदगीर-जिंतूर बस ने मी निघालो..राणी-सावरगाव .हे गाव त्या .रस्त्यातला मोठा स्टोप..११ वाजता चहासाठी बस थांबली .आणि निघायच्या वेळी पंचर ---झाल्याचे लक्षात आल्यामुळे .तिथेच थांबली...४० वर्षापूर्वी..मधल्या मार्गावरून आड-मार्गावरून जाणर्या गाड्यांची आणि प्रवाशांची हालत अशावेळी कशी होत असे आता इथे सांगणे शक्य नाही.. असो किमान २ तास इथेच..जाणार हे निश्चित झाले.राणी-सावरगाव हे गाव " माहूरच्या देवीचे एक स्थान -आहे" .इथे देवी दर्शन योग उत्तम असतो. असे सगळ्यांनी सांगितले .इतर पासिंजर सोबत मी पणआमच्या कुल- देवीचे दर्शन घेतले ..आई- अंबाबाई - "आज संध्याकाळी सुद्धा "देवी-दर्शन योग आहे", कृपा करावी ,अशी आटोपशीर प्राथना आणि साकडे घाऊन झाले.बहाराल , डायवर साहेबंनी परभणीला गाडी याव्स्थित नेली हे बेस्ट झाले.आत्याबाई कडे माझ्या येण्याची वाट पहात होते.. वेळेचा पार बोजवारा उडाला होता.आता हिंगोलीला जाऊन पुन्हा परभणीला रात्री पोन्च्ने गरजेचे..सोमवारी ज्याचे त्याला ऑफिस होते..आणि त्यावेळी बस खूप कमी होत्या.निघतांना अत्याबाईने मला .." वेंधळेपणा करू नको, आणि दाखवू पण नको " हे लक्षवेधी सूचना केली.

माझे दोन्ही आत्येभाऊ म्हणाले .अरे..आपण तिघेच कसे..तीन तिघाडा काम-बिघाडा "असे होईल रे बाबा ..मनात मी म्हणालो..होऊ दे ना ..मस्त रविवार सोडून हे काय लागलाय माझ्या मागे.मात्र उघडपणे ..काहीच म्हणालो नाही.आत्या म्हणाल्या जावईबापू पण सोबत असू द्या , जाणता माणूस असलेला बरा . नाही तर ..ते सोयरे म्हणायचे.पोरांचा कारभार नुसता .असे नको ऐकायला .

अखेरीस ..अस्मादिक आणि सोबत .२ आत्येभाऊ आणि आत्येबाहीनीचे यजमान ..असे आम्ही चौघेजण हिंगोलीस गमन करिते जाहलो.त्यावेळी रात्री ९ ची वेळ म्हणजे शेवटची गाडी सुटण्याची वेळ .नंतर थेट दुसरे दिवशी सकाळी ..नो वे ..या वेळेत सगळा झालच पाहिजे होते.

आम्ही संध्याकाळचे ५ वाजता परभणीहून निघाली ..साधी लाल डब्बा बस.. डायवरच्या मर्जीने ७.३० पर्यंत पोंचली.हिंगोली माझ्या साठी नवीन होते ..सोबत भावजी होते ..आम्ही जाणार होतो त्या बसोले -परिवारात त्यांचा जुना परिचय होता ..पण.या भाऊजींनी .बस मध्ये ..या "मुली बद्दल .काही म्हणजे काही सुद्धा एक शब्दात पण सांगितले नव्हते..!

आम्ही घरात प्रवेशलो.. मुलीचे दोन्ही आजोबा -" आईचे वडील, वडिलांचे वडील ." या जेष्ठांनी स्वगत केले ..इतक्या मोठ्या व्यक्ती समोर आम्ही गप्प बसलो."आजोबांनी मुलीस ..बोलावले... आम्हाला ते म्हणाले.. विचार हो..काय ते..त्या आवाजात "जास्त चौकशी नाय करायची . "असा गर्भित इशारा आहे का ? असे उगीचच वाटून गेले ..

माझे लक्ष.. समोरच्या घड्याला कडे होते ..आमच्या हातात फक्त पाऊन तास होता ..यात पहाणे ,बोलणे,काही दिल्यास खाणे नसता ' चहा पिऊन बस साठी पाळणे" असा भरगच्च कार्यक्रम होता.

समोर बसलेल्या मुलीकडे पाहिले ..नाव विचारले ..उत्तर आले..मीनाक्षी...बस ..त्या नजरेच्या जाळ्यात कसा अडकलो ते त्या दिवसा पासून आज पर्यंत कळालेले नाही.

त्यादिवशी उधर की हलत" भी सेम टू सेम झाली होती.. " हे नंतर लिक झाले.. की- या बाईसाहेबांनी डालडा तुपात करायचा शिरा. " चुकून .चांगल्या लोणकढी तुपात बनवला होता ".असो.. या बाई साहेबांनी पोटात आणि मनात एकाच वेळी शिरण्यात यश मिळवले हे नक्की.

चांगल्या तुपातला शिरा .भरपेट .मनोसक्त चापून.. आम्ही बस साठी निघालो ..मुलीचे आजोबा आमच्या सोबत येत म्हणत होते ..आता तुमचा निर्णय जो काही असेल तो..घरी गेल्यावर मोठ्यांना सांगा..म्हणजे कळेल ..उशीर मात्र लावू नका ..म्हणजे .आम्ही मोकळे ....अहो आजोबा ..मुलगी पसंत आहे.. आत्ताच सांगतो मी ...घरून मोठ्यांचा होकार रीतसर येईल .आजोबांचा तो समाधानी चेहेरा आज ही जसाच्या तसा आठवतोय.

घरी गेल्या वर माझ्या होकाराने आनंदी-आनंद झाला , लगेच ..गुड-फ्राय डे "च्या सुट्टीला मुलगी उदगीरला सर्वांना पाहता यावी म्हणून आली ..तिची चक्कर वाया गेली नाही..त्याच दिवशी..बोलाचाली .आणि शाल-अंगठी .हा कार्यक्रम..आणि बरोब्बर १ महिन्यांनी ..२ मे-१९७६ रोजी.. हिंगोलीस.. बसोलेची मीनाक्षी.. देशपांडे परिवारातील मीनाक्षी झाली.आज २०१७ ची अक्षय तृतीया ..४१ वर्ष पूर्ण झालीत ..तिच्या समोर पसंती दर्शक मान डोलली .ती आजतागायत तिच्या इशार्या प्रमाणे डोलते आहे आता सवयीने या पुढे अशीच छान डोलत राहणार आहे हे नक्की.

मी लेखक-कवी झाल्यापासून म्हणजे गेली ३५ वर्ष पारिवारिक एरिया तिच्या अधिपत्याखाली आहे..मी सेवेतून आणि पारिवारिक झ्मेल्यातून निवृत्त झालोय ..आता नेत्रा ,यथार्थ आणि अगस्त्य या नातवांची ती लाडकी आज्जी झाली आहे. या बालकांच्या सोबत आज्जीबाई माझ्या साख्या अजाण-आबाला तितक्याच मायेने संभाळत असते .

***