Mayanagari dubai books and stories free download online pdf in Marathi

मायानगरी दुबई

मायानगरी दुबई ..भाग १सुंदर गुळगुळीत आणी आरशा सारखे लख्ख चकचकित रस्ते .. धुळीचा अथवा कचर्याचा एक कण ही आसमंतात नाही पाहताना डोळ्याचे पारणे फेडतील असे खड्डे विरहित रस्ते पाहण्याची आपल्या डोळ्याला सवय कुठेय पण मायानगरी दुबईत मात्र असे सगळीकडेच पाहायला मिळते ट्राफिक चा कोणताही आवाज नाही होर्न नाही सुरळीत वाहतूकी साठी समुद्रा खाली अंडर वाटर टनेल..रस्त्याच्या दुतर्फा आणी शिवाय मध्यात सुंदर सुंदर फुलांचे ताटवे हे ताटवे सुद्धा दर तीन महिन्यांनी बदलले जातात बर का .४८ ते ५० डिग्री तापमानात पण हे ताटवे कायम सुंदर फुललेले असतात आणी आपल्या डोळ्याला सुखावतात अगदी उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा अगदी ताजी राहतील अशी वेगळ्या प्रकारची फुले सारीकडे लावलेली असतात खरे म्हणजे दुबई म्हणजे सारें वाळवंट आणी पाण्याचे दुर्भिक्ष ..सगळीकडे समुद्राचे पाणी ..पुर्वी गोड्या पाण्या साठी मैलोनमैल फिरावे लागत असे ..पण आता मात्र दुबई ने स्वतच यातून वाट काढली आहे अनेक प्रक्रिया करून समुद्राचे पाणी पिण्या साठी गोडे बनवले जाते व त्यानंतर ही जे पाणी थोडेसे वेस्ट राहते ते झाडांना पुरवले जाते यासाठी पण ठिबक सिंचन पद्ध्तोने फुलांच्या ताटव्या तुन बारीक पाईप फिरवलेली असते व त्या पाईप मधुन आपोआपच झाडांना योग्य तेव्हा व योग्य तितकेच पाणी पुरवले जाते तुम्ही फुलझाडे लावली की सरकार स्वतः हुन त्याला पाणी पाजण्या साठी बारीक पाईप पुरवते रहदारी चे खास असे नियम आहेत व ते खुप कडक पण आहेत नियम तोडणाऱ्या लोकांना त्वरित शासन आहे मग तो तोडणारा राजा असो वा प्रजा सर्वाना एकच कायदा लागू आहे या दुबईत प्रशासना कडून कोणताच कर लावला गेला नसल्याने गाड्यांच्या किमती भारताच्या निम्म्याने आहेत त्यामुळे रस्त्या वर सगळीकडे चार चाकी व किमती गाड्या फिरतात दुचाकी गाडी जवळ जवळ नाहीच ..पेट्रोल पण इथल्या पेक्षा निम्म्याने स्वस्त कुठेही ट्राफिक पोलीस नाही किंबह्ना त्याची जरूर पण नाही ट्राफिक इतके सुनियंत्रित आहे की अपघाताचे प्रमाण अक्षरश नगण्य आहे समजा चुकून दोन गाड्या एकमेकांना धडकल्या आणी काही खरोच आली तर ताबडतोब स्वताहून पोलीस केस केली जाते पोलीस केस चे पेपर असल्या खेरीज कोणतीच गाडी दुरुस्त केली जात नाही आणी समजा एखाद्या मेक्यानिक ने असे काही बेकायदेशीर केले तर आधीच ग्यारेज चे शटर डाऊन केले जाते व मग चौकशीस् प्रारंभ ..व नंतर सहा महिने धंदा बंद करून शिवाय दंड भरणे राजा ला सुद्धा इथे कोणतीही सुरक्षा नाही

सर्व प्रकारचे नियम राजा ला पण लागू आहेत राजा आपली गाडी आपण स्वत चालवतो सारे जग इथे महाग मोबाईल विकत घेते पण ..राजाच्या वापरातला मोबाईल मात्र अगदी साधा आणी नवी टेक्नॉलॉजी नसलेला असा आहे

सध्या इथे असलेले राजे उच्च विद्या विभूषित असुन परदेशात त्यांचे शिक्षण पार पडले आहे

त्यांचे वय ५३ वर्षे असुन अत्यंत कठीण असे प्रशिक्षण घेवुन ते आता राजे पदावर पोचले आहेत ज्या हॉटेल मध्ये उतरलो तिथून खाली पाहिले असता गाड्यांचे पार्किंग पण पार्किंग लॉट मध्ये इतक्या सुंदर रीतीने केलेले असते जितकी जागा ठेवली आहे अगदी त्यातच सुबक पणे गाड्या पार्क केलेल्या असतात आपल्या देशात सेल्स .प्रोफ ..इन्कम गिफ्ट वेल्थ असे अनेक प्रकारचे कर आहेत पण दुबईत यातील कोणताही कर नाही ..पगार वार्षिक स्वरूपात दिला जातो व सारा पगार तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता येथील चलन “दिराम “म्हणुन ओळखले जाते व स्थापने पासून गेल्या चाळीस वर्षात या देशाने आपली इकोनोमी इतकी बळकट ठेवली आहे की आपले १७ रुपये म्हणजे त्यांचा एक दिराम असा सध्या चलनातील दर आहे शिवाय दुबैस्थित व इथेच असणाऱ्या इस्लामी नागरिकाला त्याच्या कंपनी कडून मोफत घर दिले जाते प्रथम लग्नासाठी सत्तर हजार दिराम सरकार कडून मदत केली जाते मुले झाली की त्यांच्या भविष्या साठी आपोआपच त्यांच्या खात्यावर सरकार कडून काही रक्कम जमा केली जाते भारतात आपण पाहतो आपल्या चलनी नोटा वर बहुधा थोर पुरुषांची चित्रे आहेत पण दुबई तील दिराम (त्यांचे चलन ) च्या नोटावर तेथील उत्कृष्ट अशा इमारती व निसर्गाचे फोटो आढळतात इथे प्रत्येक गोष्ट उलट पद्धतीने केली जाते म्हणजे इथे ड्रायविंग लेफ्ट बाजूने केले रस्त्यावर उजव्या बाजूने वाहतूक केली जाते यांचे लिखाण ही उर्दू असल्याने कागदाच्या उजवीकडून डावीकडे लिहिले जाते पण आमचा गाईड मात्र संगत होता यांची एक गोष्ट मात्र उलटी आहे ती खरोखर कौतुकाची आहे ती म्हणजे आपण आपल्या देशातील अन्न धान्य फळे भाजीपाला उत्तम प्रत प्रथम निर्यात करतो पण येथे मात्र उलट उत्तम प्रतीचे सारे प्रथम देशात खाल्ले जाते व नंतर बाकीचा माल निर्यात करतात जगात अव्वल “दुबई ...!!संयुक्त अरब अमिराती मधील सात राष्ट्रा पैकी दुबई व अबुधाबी अशी एकमेकांच्या शेजारील राष्ट्रे खरे तर संपूर्ण वालुकामय प्रदेश असलेला हा प्रदेश त्याच्याकडे पेट्रोल साठे आहेत म्हणुन श्रीमंत बनला सध्या जगातील पेट्रोल साठ्यातील १० टक्के साठा फक्त दुबईव अबुधाबी कडे आहे त्यातील ७ टक्के भाग मात्र अबू धाबी कडे आहे म्हणजे खरे तर सध्या अबुधाबी जास्त श्रीमत आहे दुबई ने मात्र गेल्या चाळीस वर्षात जी काही लक्षणीय प्रगती केली आहे ती पाहिली की कौतुक वाटते जगातील सर्वात चांगले असे एक नंबर व दोन नंबर चे सारे काही दुबई ला मिळवायचे असते जगातील सर्वात उंच बिल्डिंग २११ मजली “बुर्ज खलीफा ..”१९९९ साली बांधली आहे २७१७ फुट उंच इमारत आहे फक्त पार्किंग साठी दोन बेसमेंट आहेत

इथे जगातले सर्वात उंच व महाग असे हॉटेल आहे यापैकी १२५ मजल्या पर्यंत सध्या पर्यटकांना पाहण्या साठी खुले आहे या बिल्डींग चे पण रेकोर्ड ब्रेक सध्या दुबईच या पेक्षा उंच इमारत बांधून करीत आहे येत्या दोन वर्षात ही पण इमारत तयार होईल सगळ्यात उंच इमारती बांधताना वालुकामय प्रदेश असल्याने पाया बांधला जाऊ शाक्त नाही प्रेशर पायलिंग पद्धतीने सारे बांधले जाते शिवाय या बिल्डिंग भूकंप प्रतिरोधक असतात वादळाने याना हानी पोचू नये म्हणुन यातले काही मजले रिकामे ठेवलेले असतात पुर्ण बांधकाम कोलम वर केले जाते संपूर्ण मैलोन मैल रेसिडेन्शियल एरिया इथे दोन तीन वर्षात वसवून होतो “आल रशिद डॉक ...” जगातले दुसऱ्या क्रमांकाचे जहाज दुरुस्ती बंदर आहे इथे जगातले कोणतेही जहाज तीन दिवसात दुरुस्त करून मिळते “बुर्ज अल अरब .....” जगातले एकमेव सेवन स्टार हॉटेल ..हे बाधण्या साठी जगातला उकृष्ट आर्किटेक्ट “टोम राईट ..याला बोलावण्यात आले होते सर्वात जास्त भूसंपादित हॉटेल असा या हॉटेल चा लौकिक आहे याचा आकार एखाद्या मोठ्या शिंपल्या प्रमाणे असुन ..उंची ३२२ मीटर आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच हॉटेल असा लौकिक आहे यात २४ टक्के सोने आर्किटेक्चर मध्ये वापरण्यात आले आहे असे सांगतात येथील फक्त नाश्त्याची किंमत ३०००० रुपये आहे जगातील” बेस्ट म्युझिकल फौन्टन शो ..”दुबई मॉल येथे आहे दरोज संध्याकाळी पाच शो सहा ते आठ या वेळात केले जातात डोळ्याचे आणी कानाचे पण पारणे फेडणारा हा शो असतो आम्ही मुद्दाम सलग तीन चार शो पाहिले पण प्रत्येक वेळा प्रकाश योजना व गाण्याची वेगळी निवड होती हे आम्हाला जाणवले त्यामुळेच त्याचे वेगळे पण जपले गेले आहे दुबईत एकंदर ७७ फाईव्हस्टार स्टार हॉटेल्स आहेत यात पण दुबई सर्वोत्तम आहे जगातला सर्वात मोठा पोलो क्लब इथे घोड्यांना प्रशिक्षण दिले जाते जगातला सर्वात मोठा मॉल “...दुबई मॉल ..” इथूनच सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा ला जाण्या साठी एन्ट्री आहे जगातले सर्वात मोठे गोल्ड मार्केट ..”गोल्ड सुक ..’इथे अनेक उत्तम प्रकारचे दागिने आहेत तसेच ६३ किलो वजनाची जगातली सर्वात मोठी अंगठी येथे आहे जिचा लौकीन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये आहे जगातले सर्वात मोठे मसाला मार्केट ...”स्पाईस सुक ..”जगातील पहिली ड्रायवर लेस (ऑटोमॅटिक)..मोनो रेल ..व ऑटोमॅटिक मेट्रो रेल इथेच आहे ..या मोनो रेल मधुन जाताना उंचावरून पाम बीच एरिया चे दर्शन होते हाताचा तलवा असलेला आकार असलेला हा पाम बीच जगातील सर्वात महागड्या बंगल्यांनी व्यापलेला आहे शिवाय इथे प्रत्येक बंगल्याला त्याचा वैयक्तिक असा.. बीच आहे ..आपल्या कडील बोलीवूड हिरो चे इथे बंगले आहेत अटलांटिस् हॉटेल इथे सर्वात मोठे माशांचे अक्वेरीयाम आहे अमेरिकन पद्धतीचे शिक्षण घेण्यासाठी इथे अमेरिकन युनिव्हर्सिटी सुद्धा आहे वैशिष्ट्य पुर्ण “दुबई ....!१दुबई विषयी विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तेथील स्वातंत्र्य खरे तर हे एक पुर्ण इस्लामिक राष्ट्र आहे पण सर्व धर्म सर्व पंथ याना दुबई ने मुक्त आश्रय दिला आहे इथे सर्व धर्माचा आदर केला जातो व त्यांचा मान सांभाळला जातो कोणत्याही देशातून इथे कोणताही व्यवसाय करण्यास पुर्ण परवानगी आहे यासाठी तेथील सरकार तुम्हाला वार्षिक भाडेपट्टीने जागा दिली जाते फक्त एकच अट आहे ती म्हणजे त्या देशातील नागरिकाला व्यवसायात पार्टनर म्हणुन घ्यावे लागते इथे तुम्हाला कुठेही जा इंडियन माणसे गाठ पडणारच भारताच्या अनेक प्रांतातून अनेक याव्साया साठी अथवा नोकरी साठी आलेली माणसे इथे स्थायिक आहेत

असे म्हणतात की जेव्हा २००५ साली सर्वात मोठमोठ्या बिल्डिंग येथे निर्माण होवू लागल्या तेव्हा जगातील पस्तीस टक्के हेवी मशिनरी दुबईत होती जगातल्या एकूण पेट्रोल साठ्या पैकी १० टक्के पेट्रोल दुबई व अबुधाबी कडे आहे व त्यातील तीन टक्के दुबई कडे आहे पण हा साठा २०५० पर्यंत समाप्त होणार हे ते जाणून आहेत म्हणुन च जगातील जास्तीत जास्त पैसा देणारी अशी पर्यटन इंडस्ट्री दुबई ने निर्माण केली आहे व तिचा चांगला विकास केला आहे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्यात दुबई अग्रेसर आहे पर्यटन व्यवसायात गाईड म्हणुन काम करणारी गुजरात राज्यातील अनेक माणसे इथे भेटतात आणी अगदी सुखाने आणी समाधानाने राहत असतात व्यवसायात चांगल्या संधी असल्याने आपले अनेक नातेवाईक पण लोक बोलावून घेतात आमच्या टूर मध्ये गाठ पडलेला एक गाईड आम्हाला सांगत होता की तो ज्या नोकरीत होता तिथे त्याला थोडे आर्थिक संकट आले तेव्हा इथल्याच स्थानिक माणसाने त्याला मदत करून परत प्रस्थापित करून दिले होते परदेशातील माणसांना इथल्या माणसांचे खुप चांगले सहकार्य लाभते इथली लोक संख्या केवळ ८६ लाख आहे म्हणजे आपल्या मुंबई पेक्षा खुप कमी इतर राष्ट्रा सारखी इथे स्त्रीला बंधने अजिबात नाहीत बायका इथे रस्त्यावर आरामात हिंडू फिरू खरेदी करू शकतात किंवा हॉटेल वा सिनेमागृहात पण जाऊ शकतात अगदी विमानतळावरील सेक्युरिटी चेकिंग पासून वेगवेगळ्या ऑफिस मध्ये अनेक स्त्रिया काम करतात अगदी सध्या विधान सभेत पण काही स्त्रिया निवडून आल्या आहेत व यशस्वी पणे कारभार पहात आहेत इथे स्त्रिया जो वेश परिधान करतात त्याला “अबाया “ असे म्हणतात अबुधाबी येथ “ शेख झायेद ग्रांड मास्क “ येथे जाताना जर्किन आणी स्कार्फ हा बायका साठी अनिवार्य असतो ते नसेल तर “अबाया ..”वापरावा लागतोच (अशाच पुरुषांच्या इस्लाम पोशाखाला “कंदोरा ..”असे संबोधले जाते )म्हणुन टूरिस्ट गाडीत काही अबाया ठेवलेले च असतात आम्हीही एक वेगळेपणा म्हणुन अबाया धारण केला व फोटो पण काढले मात्र या अबाया च्या आत स्त्रिया पुर्ण वेस्टर्न पोशाख करतात तसेच सर्वांच्या सुंदर आणी गोर्यापान देखण्या चेहेर्या वर सुद्धा उत्तम प्रकारचा मेकअप रोजच असतो आर्थिक समृद्धी असल्याने कपडे फ्याशन आणी महाग सौंदर्य प्रसाधने यात दुबई अग्रेसर आहे स्त्रियांना येथे पुर्ण सम्मान दिला जातो व घरचा तसेच बाहेरचा पण पुर्ण कारभार स्त्री संमतीने चालतो स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहण्याची इथे कुणी हिम्मत करू शकत नाही कारण यासाठी खुप भयंकर शिक्षा इथे भोगावी लागते त्यासाठी चे इथले कायदे कडक आहेत स्त्रियांची छेड छाड करणे हा इथे अत्यंत गंभीर गुन्हा मनाला जातो बलात्काराच्या गुन्ह्याला इथे फार भयंकर शिक्षा आहे ती म्हणजे तीन महिन्याच्या आत त्या व्यक्तीला फाशी ला सामोरे जावे लागते भारतातील बलात्काराचे गुन्हे आणी त्यासाठी होणाऱ्या शिक्षेला लागणारा विलंब पाहता हे फारच कौतुकास्पद वाटते कडक कायदे त्याची ताबडतोब अंमलबजावणी यामुळे इथे क्राईम रेट फक्त २ टक्के आहे इथला पर्यटन व्यवसाय इतका सुरक्षित आहे की अनेक देशातून पर्यटक इथे बिनधास्त येवून राहू शकतात सध्या सर्वात जास्त पर्यटना वर खर्च करणारे देश म्हणजे वियेतनाम कंबोडियपण या देशांनी सध्या भारता कडे पाठ फिरवली आहे याचे मुख्य कारण आपल्या देशात असणारी असुरक्षितता आणी महिलांशी गैरवर्तनाचे प्रकार भारतात परदेशी पर्यटका वर केल्या गेलेल्या बलात्काराच्या इतक्या केसेस आहेत की परदेशी पर्यटक इंडियात यायला फारसे खुष नसतात ही आपल्या दृष्टीने खरेच लज्जास्पद गोष्ट आहे !पोलो हा खेळ तिथे खुप लोकप्रिय आहे जगातले एक नंबरचा मोठा पोलो क्लब इथे आहे उत्तम प्रकारचे प्रशिक्षण इथे दिले जाते इथे महिला पोलो क्लब असुन त्याचे पण प्रशिक्षण दिले जाते पोलो या खेळात अत्यंत टाईट कपडे घातले जातात इस्लाम मध्ये महिला साठी टाईट कपडे मान्य नाहीत पण दुबईत यांनी पोलो साठी खास ड्रेस शोधला आहे तो घालून इथल्या महिला खेळतात व चक्क ऑलिम्पिक पण जिंकतात आहे ना भारी गोष्ट ..!डेझर्ट सफारी एक धम्माल अनुभव ....!!डेझर्ट सफारी म्हणजे पुर्ण वालुकामय टेकड्या मधुन वेगाने केली जाणारी सैर या सफारी मध्ये शक्यतो ल्यांड क्रुझर गाड्यांचा वापर केला जातो कारण या गाड्या खुप टफ असतात या सफारी ला सुरवात करण्या पुर्वी च तुम्हाला सांगितले जाते की हा एक रोलर कोस्टर सारखा अनुभव आहे एका वेळेस दहा पंधरा गाड्यांचा ताफा अनेक पर्यटक घेऊन या सफारी वर निघतात एका ठिकाणी सर्व गाड्या पर्यटकांना घेवून जमा होतात सर्व प्रथम वाळू वारून गाड्या स्लीप होवू नयेत म्हणुन त्यातील हवा कमी केली जाते पर्यटकाना पहिली सुचना सीट बेल्ट लावुन घेण्याची असते कारण नंतरचा प्रवास अत्यंत धोक्याचा असतो काहीही वेडे वाकडे होवू नये म्हणुन खुप दक्षता घेतली जाते आणी म्हणुन च सर्व गाड्या एका मागून एक निघतात असंख्य वाळूच्या अती उंच सखल मार्गा वरून मग हा प्रवास चालू होतो एका क्षणात गाडी खुप उंचावर असते तर एकां क्षणात ती खाली झेप घेते आपल्या पुढे असलेल्या गाडीचा असा प्रावास आपण पहात असतो व पुढच्या क्षणी आपली पण तीच अवस्था होणार आहे हे समजून पोटात गोळा येत असतो पण आपल्याला ही त्याचा “दिव्याला ..” सामोरे जावे लागते प्रत्येक गाडीतले प्रवासी जीव मुठीत घेऊन बसलेले असतात आणी मग त्या भीतीला सामोरे जाण्या साठी जोरजोरात किंचाळत रहावे लागते त्या शिवाय पर्याय नसतो ...आम्ही तर आमच्या गाडीत शेवटी मोठमोठ्याने गाणी म्हणू लागलो पण कितीही धोकादायक असला तरी तो प्रवास नक्कीच लक्षात राहण्या सारखा असतो संपूर्ण वालुकामय प्रदेशात जीथे रस्ते नाहीत आणी शिवाय असंख्य वाळूच्या उंच डोंगर रांगा आहेत इथला प्रवास करताना ड्रायवर लोकांच्या कौशल्याची “दाद ..द्यावी लागते काही क्षणाला तर आता गाडी अनेक पलट्या मारून उलटी होईल आणी अपघात होईल असे वाट्ते पण असे कदापी ही घडत नाही ..गेली कित्येक वर्षे रोज केला जाणारा हा प्रवास खुपच सुरक्षित असे जाणवले यानंतर तेथे पोचल्या वर या संपूर्ण वालुकामय प्रदेशात दिसते की इथे एक छोटे नगर वसवले आहे आणी मग तिथे आपले स्वागत होते दाराशीच असतो “अल्ला राख्खां .म्हणजे ससाणा पक्षी घेऊन एक मुलगा तो पक्षी तेथील समाजाचे दैवत असते .पूर्णपणे प्रशिक्षित व माणसाळलेला हा पक्षी खुप सुंदर असतो मालकाने सांगितले की तो आरामात आपल्या हातावर डोक्यावर आरामात बसतो लोक पण त्याच्या बरोबर मस्त मस्त स्टायलिश फोटो काढुन घेतातआम्हाला भेटलेल्या ससाण्याचे नाव “पिंकी >>” होते हाक मारली की मस्त मान वाकडी करून पहात असे तो दाराशीच एक उंट पण बसलेला असतो ज्याला इच्छा आहे तो या उंटावरून मस्त सफर करू शकतो ..या प्रदेशात असलेल्या छोट्या टेकडीवरून आता आपण सूर्यास्ताची मजा घेवू शकतो टेकडीवर बसण्या साठी काही बाक पण टाकले आहेत टेकडीवरून खाली असलेल्या खोल भागात अगदी धाडसी लोक मोटोर बाईक राईड पण करू शकतात मोटो क्रोस सारखा असणारा हा प्रकार पण खुप चित्त थरारक असतो मोटर बाईकवर असणाऱ्या ला पाहणारी लोक छान बक अप देत असतात शिट्ट्या टाळ्या आरडा ओरडा यांनी सारा आसमंत दणाणून गेलेला असतो आता सूर्य खाली गेल्या वर पुन्हा त्या छोट्याशा टेकडीवरू हळू हळू उतरायचे दिव्य पार पडावे लागते ... आता खाली उतरून मोठी कमान असणाऱ्या त्या छोट्याशा गावात आपण प्रवेश करतो आम्ही प्रवेश करीत असलेल्या गावाचे नाव स्काय ल्यांड क्याम्प असे होते या मैलोमैल पसरलेल्या वाळूच्या प्रदेशात अशी अनेक छोटी गावे करमणुकीसाठी वसवली आहेत व रो हजारो पर्यटक तेथे भेट देत असतात आता आत प्रवेश केल्यावर एक भले मोठे स्टेज व त्याच्या चारही बाजूनी बसण्याची व्यवस्था असते बसण्या साठी लोड व तक्के अशी व्यवस्था असते सभोवार सगळीकडे वेगवेगळे खाद्य प पेय पदार्थांचे स्टाल असतात तुमच्या आवडी प्रमाणे तुम्ही काहीही खाऊ अथवा पिऊ शकता खाणे पिणे तसेच प्रसाधन गृहाची पण इथे चकाचक व्यवस्था असते ..!!सभोवार फेर फटका मारत वेगवेगळे पदार्थ चाखत वेळ कसा पसार होतो समजत नाही इथेच बायकांच्या हातावर मेंदी काढण्याचे स्टाल असतात ..पुरुष लोकांसाठी हुक्का ..बियर याचे पण स्टाल असतात दुबई मध्ये वापरला जाणारा स्त्रियांचा खास पोशाख “अबाया ..”व पुरुषांचा पोशाख “कंदोरा ..” हे पण इथे एका स्टाल वर खास फोटो सेशन साठी ठेवलेले असतात ते घालून तुम्ही मस्त फोटोग्राफी करू शकता आम्ही पण त्या ड्रेस मधील फोटो काढून घेतले ..हो म्हणलेच आहे ना ...जैसा देश वैसा भेश फिर क्या करना .... आता हळूहळू थंडी चढू लागते सगळीकडे वाळू त्यामुळे थंडीचा आणखीन कडाका वाटतो सारे लोक शाली टोप्या मफलर स्वेटर यात घुसून जातात .या सफारी पूर्वीच गरम कपडे सोबत बाळगण्याची सर्वाना सूचना दिलेली असतेच ..तरी पण विसरला असाल तर इथे गरम कपड्यांचे पण स्टाल असतात आता सुरु होतो इथला खास रंगांरंग कार्यक्रम सर्व जण स्टेज च्या अवतीभवती बसतात आणी नाचाला प्रारंभ होतो प्रथम केला जातो तो .....”तनुरा .....” डान्स पुर्ण घागर असा वाटणारा भरपूर जड असणारा आणी त्यावर बारीक बारीक इलेक्ट्रिक दिवे बसवलेला पोशाख घालून पुरुष नर्तक स्टेज वर येतो व म्युजिक सोबत हा डान्स सुरु होतो क्षणाक्षणाला गिरक्या घेत हा डान्स सुरु असतो घागरा पुर्ण वेगाने उमलत असतो ..संगीत पण अत्यंत वेधक व नर्तकाच्या हालचाली मनमोहक आणी अत्यंत गतिमान असतात हा डांस पाहताना अक्षरश डोळ्याचे पारणे फिटते ..ती गती आणी ते प्राविण्य शेवटी शेवटी मनाला थक्क करते शेवटी या घाग्र्या वरील लाईट सुंदर गतीने प्रकाशमान होतात व डान्स मध्ये आणखीन रंग भरला जातो सतत अर्धा ते पाउण तास अती द्रुत गतीने नाचणे सोपे काम नाही शिवाय डान्स थांबला की जराही चक्कर वगैरे न येता नर्तक जिथल्या तिथे उभा असतो याचे रहस्य विचारले असता नर्तक म्हणतो हा डान्स करताना तो मनाने परमेश्वरच्या म्हणजे त्यांच्या भाषेत “खुदा च्या जवळ पोचलेला असतो म्हणुन च हे त्याला शक्य होते नंतर हाच डान्स करून पाहण्याची प्रेक्षकांना पण ऑफर दिली जाते काही लोक प्रयत्न करतात पण त्या घागर्याचे वजन इतके असते की ते पेलून शिवाय डांस करणे कठीण असते दोन चार गिरक्या मारल्या की कोणालाही चक्कर येऊ लागते यानंतर चे आकर्षण ब्याले डांस असते हा एक प्रकारचा क्याबेरे डांस म्हणता येईल अत्यंत कमनीय बांधा असलेली सुंदर युवती घट्ट आणी .पारदर्शक कपड्यात नाचत असते हा डांस पण एक उत्कृष्ट नमुना ठरतो प्रेक्षक ...विशेषतः पुरुष प्रेक्षक फुल एन्जोय करतात या दोन्ही डान्स चे विडियो शूटिंग ला पण पुर्ण परवानगी असते आता मात्र रात्र चढू लागते आणी जेवण वेळ सुरु होते सुंदर पैकी बार्बेक्यू व स्वीट डिश सहित शाकाहारी आणी मासाहारी दोन्ही प्रकारचे जेवण इथे दिले जाते जेवण झाल्या वर मात्र सर्व गाड्या वरील ड्रायवर लोक आपल्याला बोलवायला येतात व परतीच्या प्रवासाची धांदल सुरु होते निघताना जशा होत्या तशाच आता पण सर्व गाड्या एकमेका सोबत च निघतात ..पण आता मात्र प्रवास वाळूच्या टेकड्या वरून नसतो तर जवळच असणाऱ्या हायवे वरून असतो अर्ध्या पाउण तासात आपण आपल्या हॉटेल वर सुखरूप पोचतो ..सोबत या प्रवासाच्या चित्तथरारक आणी अविस्मरणीय आठवणी घेवूनच .,..!!!सहल अबुधाबीची .,..दुबई व अबुधाबी शेजारी शेजारी असणारी इस्लाम राष्ट्रे !२ डिसेम्बर १९७१ ह्या दिवशी सात अमिरातीचे मिळून संयुक्त अरब अमिरातची स्थापना झाली या दोन्ही देशात कोणतीच बोर्डर नाही फक्त रस्त्याचा काळा रंग बदलून तो थोडा लाल झाला की समजायचे आपण अबुधाबी मध्ये प्रवेश करीत आहोत जगातील सर्वात श्रीमत देश म्हणुन अबुधाबी ओळखला जातो इथे ९ टक्के तेलाचा रिझर्व साठा आहे दुबई आणी अबुधाबी कडे जगातील दहा टक्के तेल आहे पण त्यातील ही सात टक्के अबुधाबी कडे आहे जवळ जवळ दोनशे बिलियन ब्यारल इतके अबुधाबीचे तेल उत्पादन आहे त्यामुळेच करन्सी इतकी मजबूत आहे की आपले सतरा रुपये म्हणजे त्यांचा एक दिरामअबुधाबी ओईल ऑपरेशन बिल्डिंग ही एखादा पेपर फोल्ड केल्यावर जसा दिसतो अशा आकाराची आहे त्याची उंची ३८५ मीटर आहे .ही जगातील सर्वात श्रीमंत कंपनी आहे इथला एक महत्वाचा भाग म्हणजे गन्तुद एरिया इथे राजे लोकांचे घोडे सांभाळले जातात इथे घोड्याना खुप मान आहे अगदी राजाच्या राजवाड्याच्या प्रवेश द्वारावर पाच घोड्यांचे चित्र आहे असे म्हणतात की घोड्या मुळे राज्याचो पण चांगली घोडदौड होते इथले घोडे सहा महिने इथे असतात व सहा महिने लंडन इथे पाठवले जातात सगळ्यात मोठा गोल्फ क्लब इथेच आहे देशाला चाळीस वर्षे पुर्ण झाली म्हणुन २०१२ साली इथे “ खलीफा सिटी “वसवली आहे व त्यामध्य २५० घरे येथील लोकाना मोफत दिली गेली आहेत शिवाय पुन्हा “मजधार सिटी मध्ये १५० घरे मोफत दिली आहेत याला “सोलर सिटी “ म्हणले जाते कारण येथे सर्व काही सोलर एनर्जी वर चालते इथे ..’फेरारी वर्ल्ड ..”प्रसिद्ध आहे मोटो क्रोस साठी लागणारा सर्वात कठीण मार्ग इथे आहे त्यासाठी अबुधाबीचा तिसरा क्रमांक लागतो येथे मायकेल शूमाकर ची फॉर्म्युला वन मध्ये वापरलेली फेरारी गाडी पाहायला व त्यासोबत फोटो ही काढायला मिळतात फेरारी वर्ल्ड मध्ये सर्व प्रकारच्या जुन्या व नव्या गाड्या पाहण्याचे दालन आहे अबुधाबीत प्रवेश करताच कोर्निश व्यू ..ही एक सुंदर वसाहत लागते याला अबुधाबीचे हार्ट म्हणले जाते येथील एरिया पैकी आठ टक्के भाग उमराव एरिया म्हणुन ओळखला जातो इथे अबुधाबी तील श्रीमंत लोकांचे बंगले आहेत अबुधाबीत एका विशिष्ट प्रकारच्या झाडांची खास जोपासना केली जाते ज्यामुळे तेथील वन्य जीवन सुरक्षित राहते व त्याची वाढ होते अल्दार या नावाची येथील शेख खलीफा ची बांधकाम कंपनी आहे ती जगात सर्वश्रुत आहे कारण तिचा आकार हा उभ्या ठेवलेल्या एक रुपयाच्या नाण्या प्रमाणे आहे अबुधाबी कडे दोन विमान तळे आहेत अल हलाल या बँकेचे इथे मुख्य ऑफिस आहे येथे प्रेसिडेन्शियल प्यालेस जगातील सर्वात मोठा राजवाडा बांधत आहेत सध्या या नवीन राजवाड्यात खजुराची झाडे लावली आहेत तसे खजुराच्या झाडाला खजूर लागायला पंधरा वर्षे लागतात पण इतका वेळ नसल्याने त्यात अशी खजुराची झाडे मुळा पासून काढुन इथे लावली आहेत एमिरेट्स प्यालेस हे जगातील सर्वात महागडे हॉटेल येथे आहे इथल्या फक्त ब्रेकफास्ट साठी रुपये ३०००० मोजावे लागतात पूर्णपणे पारंपारिक बांधकाम असलेल्या या हॉटेल चा डोम जगात सर्वात मोठा आहे इथे अकरा मिलियन डॉलर किमतीचे ख्रिसमस झाड .आहे येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शेख झायेद ग्रांड मॉस्क या इमारतीला ८२ डोम आहेत सगळ्या वर सोन्याची कलाकुसर आहे १०७ मीटर उंचीवर बांधलेली ही इमारत पुर्ण पणे गोल्ड प्लेटेड आहे संपूर्ण सोने अठरा क्यारेट वापरले आहे सदर मशिदीच्या बांधकामासाठी १८ देशांचे कारागीर आले होते हे बांधकाम सतत अकरा वर्षे चालू होते या बांधकामात मोत्याचा चुरा वापरला आहे त्यामुळे याचा रंग मोतिया सफेद आहे खुप सुंदर चकाकी आहे या मशिदीला शिवाय रात्रीच्या वेळी इथे सुंदर असे लाईटिंग केले जाते या मशिदीत एका वेळी बेचाळीस हजार लोक नमाज पढू शकतात या मशिदीत संपूर्ण मशीद भर हाताने विणलेला गालीचा घातला आहे तो जगातील सर्वात मोठा गालीचा आहे तो सदर गालीचा ५९५ स्क़ेअर मीटर चा असुन बाराशे महिला सतत दोन वर्षे हा गालीचा विणत होत्या रोज वापरात असुन सुध्धा अजून ही त्याची” नजाकत” व “चकाकी” अबाधित आहे या मशिदीत एक महत्वपूर्ण घड्याळ आहे त्याला “नमाजी घडी “असे संबोधले जाते दिवसातून नमाज पढण्याच्या सहा वेळा त्यावर दाखविल्या आहेत यातील सर्वात पहाटेची नमाज ही फजहर नमाज म्हणुन ओळखली जाते ही नमाज फक्त आपल्या व्यतिरिक्त इतर लोकांच्या सुखसमाधाना साठी अदा केली जाते जर पाच ही वेळा नमाज पठण राहून गेले तर सर्वात शेवटी सहावी वेळ साधली तर इतर सर्व वेळेची नमाज अदा केली असे समजले जाते सदर मशीद इतकी सुंदर आहे की तीचे अलौकिक सौंदर्य मन मोहून टाकते संपूर्ण मशीद भर सतत अत्तराचा वास दरवळत असतो प्रसाधन गृहात गेले असता हे प्रसाधन गृह आहे की फाईव स्टार हॉटेल चा परिसर असे कोडे पडते इथे तर चोवीस तास अत्तराचे फवारे उडत असतात मन थक्क होऊन जाते अबुधाबी चे वैभव पाहून अबुधाबी आणखी अशाच वीस शहरांचे निर्माण करू शकेल इतका पैसा त्यांच्याकडे आहे