चांदोबा आणि टोपी : Learn Marathi - Story for Children & Adults

Marathi   |   01m 47s   |   4.4k Views

चांदोबा आणि टोपी नोनी लिखित आम्ही सर्वजण गावातल्या जत्रेत फिरायला गेलेलो होतो. बाबांनी चिंटूला त्याचा आवडता चष्मा घेतला. आईने मला भडक निळ्या रंगाची टोपी घेतली. बेबीला कॅडी घेऊन दिली. आम्ही जात असतानाच जोराचा वारा सुटला. त्यामुळे माझी टोपी दूर उडून गेली. जुन्यापिंपळाच्या झाडच्या फांदीवर जाऊन माझी टोपी अडकली. मी खूप रडलो आणि मी दुपारी जेवलो सुद्धा नाही. त्या रात्री आकाशात चांदोबा आला. त्याने जुन्या पिंपळाच्या झाडवर माझी टोपी पाहिली. त्याने माझी टोपी घालून पाहिली. चांदोबा आनंदाने हसला. मी सुद्धा त्याच्याकडे बघून हसलो. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर आईने मला सुंदर नवीन लाल रंगाची टोपी घेऊन दिली. ती म्हणाली “चांदोबाने पाठवून दिलीय,” त्या रात्री चांदोबा आणि मी आम्ही दोघांनीही आमच्या टोप्या घातल्या आणि हासलो. आम्ही दोघे ही आनंदी झालो. तुम्हाला वाटतं का सूर्याला सुद्धा टोपी हवी असावी? Story: Noni Illustrations: Angie & Upseh Music: Jerry Silvester Vincent Translator: Sameer Shankar Mhatre Narrator: Mohita Namjoshi Animation: BookBox

×
चांदोबा आणि टोपी : Learn Marathi - Story for Children & Adults