1.30 A.M # In hevhan # vheri heppy - 3 books and stories free download online pdf in Marathi

१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - ३- शेवटचा भाग

१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - ३

शेवटचा भाग

"मी का हसती आहे? आय नो रोहित! एक तर तू दारू पीत नाहीस! आणि तुझा मोबाईल चांगला आहे.."

"श्या... मला वाटल तुला सगळ पटेल मी सांगितल ते.. इतक सगळ सांगून काही उपयोग नाही!"

"मे बी नेक्स्ट टाइम! हाहा... आणि आय नो तू कसा आहेस! तुझी प्रिन्सिपल्स मला चांगली माहिती आहेत! पण इतका वेळ का खोट सांगत राहिलास? आणि मला खोट पटवून देण्याचा प्रयत्न का करत होतास?"

"तू बोलायला आल्या आल्या म्हणालीस ना.. जाम बोअर होतंय! आय थॉट ऑफ चेंजिंग युअर मूड! मला वाटलेलं तू भांडशील.. झापशील! तू परत फ्रेश होशील! पण तस काहीच झाल नाही.. मी तुला पटवून द्यायचा किती प्रयत्न केला पण तरी तुला काहीच पटल नाही! तू मला इतकी ओळखतेस? वॉव!!"

"ओह आय सी.. आणि मी तुला खूप चांगल ओळखते! काका काकू कसे आहेत ते देखील मला माहिती आहे! आणि ते कसे आहेत हे माहिती आहे तर तू कसा आहेस हे माहिती पाहिजेच ना... आणि मला बोअर झाल होत सो काहीही टिंग्या टाकणार का??.. पण मी एकदम चिडले असते तर? हा विचार नाही केलास का? मी चिडले की किती चिडते तुला माहिती आहे! तरी तू इतकी रिस्क घेतलीस?"

"तू चिडलीस तर तुला मनवू शकतोच.. ते काही अवघड काम नाही! आत्ता माझ्यासाठी तुझा फ्रेश करायचं हे महत्वाच होत! आणि तुझा कंटाळा घालवायचा होता!!"

"यु आर क्रेझी रोहित! म्हणूनच आय लव यु सो मच! आणि खर सांग.. यु डोंट ड्रिंक ना?"

"हाहाह.. डाऊट आहे म्हणजे अजून तुला! कधीतरी क्वचित दारू पितो पण मोस्टली आय से नो टू हार्ड ड्रिंक्स! पण कधी कधी मोठ मोठ्या पार्टी मध्ये नाही म्हणण शक्य नसत त्यावेळी थोडी घ्यावी लागते.. पण जास्त होणार नाही याची खात्री घेतो. "

"डाऊट नाही.. पण जस्ट कन्फर्म केल! हाहा! कधीतरी इज फाईन! पण कधीतरी म्हणता म्हणता कधी सवय लागते कळत नाही सो काळजी घ्या!!! शक्यतो दारूला नाहीच म्हणत जा.. आपणच आपले नियम ठरवायचे..प्रत्येकवेळी कोणाला दाखवायला किंवा कोणाच्या बर्डन मध्ये येऊन नाही."

"आय नो हाऊ टू लिव्ह द लाईफ!.. आयुष्य प्रेशियस आहे! ते अस खराब का करेन? आणि काही दिवसातच तू असशील न रोज माझ्याबरोबर! लक्ष ठेव नीट माझ्यावर... हाहा!"

"हाहाहा! ते करेनच! आणि आय नो आय नो.. माझा रोहित कसा आहे मला चांगलच माहिती आहे! थॅंक्यू बाय द वे! गेला कंटाळा.. पण आपण आज वेगळ्याच विषयावर बोललो ना... आपण दारू ह्या विषयावर कधी बोललो असतो अस मला नाही वाटत!"

"हाहा.. मला तरी कुठे माहित होत मी अश्या विषयावर बोलेन!! तू क्युरिअस झालीस माझा स्टेटस पाहून सो आय थॉट थोडा त्रास देऊ.. दोन्ही काम होतील! तुझा कंटाळा जाईल आणि मला पण तुला त्रास देता येईल!"

"वा.. हुशार आहात! ए, स्टेटस का लिहिलास ते आता तरी सांग!"

"काही नाही ग.. मला झोप येत न्हवती.. मग गाणी ऐकत बसलो होतो! 'टीअर्स इन हेव्हन' हे गाण माझ्या आवडीच आहे! ते ऐकत होतो! सो खुश होतो आणि तेव्हा १.३० वाजले होते! आणि टीअर्स हा शब्द लिहायला मी वेडा नाहीये! आपल्याकडे काहीतरी लपवून ठेवण गरजेच असत! म्हणजे आय डोंट ओपन अप कमप्लीटली.."

"हाहाहा... गुड १ रोहित! आणि मी काय विचार केला! वॉव!"

"बाय द वे, तूच विचारलं मला मी पब मध्ये गेलो होतो का.. मी म्हणल इतक विचारती आहे तर हो म्हणू! जरा वेगळा विषय! मला तुझी रिअॅक्षन सुद्धा पहायची होती! नाहीतर अस काही खोट सांगण्याचा माझा काही विचार न्हवता.."

"हो हो.. मीच विचारलं! मी तुला कधी म्हणाले तू चालू केलस बोलण? आणि मी इंग्लिश गाणी ऐकत नाही त्यामुळे अस गाण आहे हे मला माहिती न्हवत पण हेव्हन नावाचा पब आहे हे मात्र माहिती होत! हाहा! सो मला तेच वाटल.. हाहाहा! आणि मला माहिती असण गरजेच होत की तू दारू पित नाहीस ना?"

"तुला हेव्हन नावाचा पब आहे हे माहिती आहे? ओह... हाहा! आणि झाल सगळ्या शंकांचं समाधान ना? आणि तू हिंदी गाण्यांबरोबर जरा इंग्लिश गाणी ऐकत जा.. नाहीतर कोणीही उठून गंडवू शकेल तुला.."

"काहीही रोहित! बाकी कोणाशी मी इतक मोकळेपणानी का बोलेन रोहित? आणि इंग्लिश गाणी ऐकली पाहिजेत.. मान्य आहे!"

"आता कंटाळा गेलाय ना? काय करणार संध्याकाळी?"

"हो.. मस्त फ्रेश झाले.. आज भेटायचं का संध्याकाळी?"

"मनातल कस कळल माझ्या? मी तुला हाच प्रश्न विचारणार होतो.. भेटू की! वीकडे ला नाही जमत निवांत भेटायला.. आज भेटू.. कुठे तू ठरव! मी येतो तुला पिक करायला.."

"ग्रेट.. लॉंग ड्राईव ला जायचं का?" रिया म्हणाली..

"आणि मग बाहेरच खाऊ.. आय नीड टू स्पेंड टाइम विथ यु! तू आज मला सरप्राईज दिलस.. इतक शांत वागून! हाहा! नीड टू डायजेस्ट दॅट.."

"हाहाहा.... आय एन्जॉइड.. तू इमोजी वापरान थांबवल तेव्हाच मला कळल यु आर इन अ शॉक!"

"रिया.. टेल मी, तुला खर दारू टेस्ट करायची आहे? नो हार्म इन टेस्टिंग!"

"होच! टेस्ट केल पाहिजेच सगळ!"

"जाऊ आपण कधीतरी! पण बी केअरफुल ह रिया! एक घोटात सुद्धा चढू शकते तुला!"

"काय? उगाच घाबरवू नकोस रोहित! आणि तसही तू बरोबर असलास तर काय चिंता? चढली तर चढली! तू आहेस न माझी काळजी घ्यायला.."

"आहे आहे.. मी नेहमी असेनच तुझी काळजी घ्यायला.. डोंट वरी!"

"कसला गोड आहेस तू रोहित!! आय लव यु सो मच!!!"

"हाहा.. कामापुरती मामी!!" रोहित न राहवून म्हणला..

"त्रास का देतोस रे इतका!!!.. संध्याकाळी भेटू तेव्हा चिडले तर मला बोलू नकोस!"

"हाहाहा.. मला तेच हवय ग! तू चीड मग मी तुला मनवेन! आज एन्जॉय डुइंग दॅट!"

"हाहाहा.. चलो मी जाते आता! आज सगळ्यांना चहा करते!"

"ओह.. सगळ्यांना? आणि मला?" रोहित म्हणाला

"तू ये ह तुला पण देते! हाहा! भेटू संध्याकाळी... मिस यु! आणि लव यु!!"

"लव यु टू.. मिस यु! संध्याकाळची वाट पाहतोय! तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे खर... पण थोडी वाट पाहतो आणि भेटू संध्याकाळी! आणि आल्यावर चहा हवाय तुझ्या हातचा!"

"ओके.. तू तुझ्या घरून निघालास की फोन कर! मग मी चहा ची तयारी करून ठेवते?"

"काय नाटक रिया... चहाची तयारी करून ठेवते? चहाची काय तयारी असते! उगाच भाव खायचा म्हणून... हाहाहाहा!"

"ए जास्ती बोलायचं काम नाही.. चहा मिळणार नाही! आज नाही आणि कधीच नाही! उगाच चिडवू नकोस!"

"गम्मत ग... लगेच धमक्या का देतेस?"

"हाहा.. जाते आता! तुझ्याशी सारख बोलत बसाव अस वाटत पण आता चहा करायचं सो.."

"ओके.. मी फोन करतो आणि भेटू संध्याकाळी!"

"लवकर ये! जाते आता.."

"ठीके... भेटूच!"

इतक बोलून रोहित निघून गेला आणि रिया चहा करायला स्वयपाक घरात गेली! चहा करतांना सुद्धा तिला रोहित ची खूप आठवण येत होती..रिया नी चहा केला आणि आई बाबांना हाक मारली! तीघ गप्पा गोष्टी करत चहा प्यायला लागले आणि तितक्यात दाराची वेळ वाजली..

"आत्ता कोण आल असेल? बघतेस का ग रिया?" रियाची आई म्हणली..

"हो आई.. तुम्ही प्या चहा! खर तर मला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या आणि आत्ता कोण आलंय देव जाणे! अश्या वेळी अवेळी येणाऱ्या लोकांबद्दल मला भयंकर राग आहे!"

"चिडू नकोस रिया! काहीतरी महत्वाच असेल म्हणून दुपारी आले असतील! नाहीतर अवेळी कोणी येत नाही.." रिया चे बाबा रिया ला समजावत म्हणले, "आणि पाहुण्यांचं स्वागत कस करतो आपण? कधीही आले तरी? तू विसरलीस का?"

"विसरले नाही.. पण आत्ता तुमच्याशी बोलायचं होत आणि.. ठीके! मी उघडते दार!"

रिया दार उघडायला गेली. तिनी दार उघडल आणि समोर रोहितला पाहून ती आश्यर्यचकितच झाली... तिच्या चेहऱ्यावरचा राग जाऊन त्यावर हसू आल होत!

"रोहित.. आत्ताच आलास? संध्याकाळी येणार होतास ना?"

"सरप्राईज द्यायचं होत.. आणि तुझा चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता.. येऊ का आत? आणि इतका वेळ का लावलास दार उघडायला?"

"विचारतोस काय.. ये की आत!"

"ये की आत? कुठून येऊ? तू दारा समोर उभी आहेस? रस्ता आहे का आत जायला? हाहा"

"ओह सॉरी!! हाहा.." रिया मनसोक्त हसली..

"कोण आलाय ग रिया..." रियाच्या बाबांनी रियाला आतूनच विचारलं..

"बाबा.. रोहित आलाय!!!"

"ओह.. रोहित? ये रे रोहित! जॉईन अस फॉर टी!"

"हो काका... चहा प्यायलाच आलोय. रिया म्हणाली ती चहा करणार आहे म्हणून आलोच लगेच!"

"बर केलस आलास.. रिया आत्ता दार उघडतांना इतकी चिडली होती! वेळी अवेळी कोण येत इत्यादी!"

"हो रिया? मी जाऊ का मग?" रोहित म्हणाला

"चूप रे रोहित! मला आई बाबांशी बोलायचं होत. त्यांना सांगायचं होत आपल बोलण. आणि आपली मजा. आणि तू असशील अस वाटलाच न्हवत! म्हणून मी चिडले होते.."

"हाहा! कस वाटल मला पाहून? तेही अचानक?" रोहित म्हणाला..

"रोहित.. चेहरा बघ तिचा! किती खुश झाली तुला पाहून! अहो बघताय ना.. मगाशी किती चिडली होती दार उघडायला जातांना आणि आता आनंद लपवता येत नाहीये!"

"आई.. बाबा! तुम्ही पण?" रिया लाजून लाल झाली आणि रोहित ला चहा आणते अस सांगून चहा आणायला स्वयपाकघरात गेली!

"काय म्हणतोयस रोहित? आज अचानक आलास?" रिया चे बाबा बोलले

"काही नाही काका.. मगाशी रियाशी बोलण झाल आणि तिची खूप आठवण यायला लागली. सो आलो तडक! काय म्हणतोयस काका? आणि काकू?"

"आम्ही मस्त बघ.. तुम्ही मारा गप्पा! रियाच्या रूम मध्ये जाता कि इथेच बसताय? म्हणजे त्याप्रमाणे आम्ही हलू.. तुम्ही बोला निवांत!" हसत रियाचे बाबा बोलले..

"बाबा.. तुम्ही पण इथेच बस की. आम्ही काय फार पर्सनल नाही बोलणार आहोत."

"नाही नाही... तुम्ही बोला मला माझी काम आहेत आणि ह्यांना पण काम सांगयची आहेत. " रियाची आई हसत बोलली..

"हाऊ नाईस आई बाबा..पण तुम्ही इथच बसा. आम्ही चहा इथेच पितो. आपण गप्पा मारू आणि मग जातो रूम मध्ये.." रिया बोलली

"बरोबर रिया.. मी काय फक्त तुला भेटायला नाही आलो. तुझ्या हातचा चहा आणि काका काकूंबरोबर गप्पा हाच माझा सुद्धा प्लान होता."

"काय दलबदलू आहेस रे रोहित. मगाशी म्हणलेलास तुला भेटायला येतो.. आता बरोबर बदललास... हाहा!" रीयानी हसून रोहित कडे पाहिलं.. रोहित पण तिच्याकडे पाहून हसला आणि रिया रोहित ला चहा करायला स्वयपाकघरात गेली. तिनी चहा आणला आणि बोलायला लागली,

"सांगू का रोहित आई बाबांना की मगाशी काय बोलत होतास?" भुवया उंचावत रिया बोलली.. रोहितनी डोळे वटारून तिला नकार सांगितला..

रोहित चे आई बाबा दोघांकडे पाहत होते आणि दोघ एकमेकांकडे पाहून हसले आणि बोलले "काय इशारे चालू आहेत दोघांचे? काय सांगायचं म्हणत होती रिया?"

"काही नाही काका.. असाच बोलत होतो. मी थोडा त्रास दिला तिला म्हणून तुमच्या कडे माझी तक्रार करायची असेल.." रोहित सारवासारव करत बोलला..

"हो का ग रिया.. तुला रोहित नी त्रास दिला?" हसत रिया ची आई बोलली..

"नाही ग आई, तो असाच म्हणाला..त्याला इतक सिरीअसली घेऊ नका." रियानी डोळे वटारून रोहित कडे पाहिलं आणि त्याला रूम मध्ये जाण्यचा इशारा केला.."आई बाबा.. आम्ही जरा येतो! जरा महत्वाच बोलायचं आहे.."

"ओके ओके.. कॅरी ऑन बोथ ऑफ यु.. एन्जॉय युअर टाईम टुगेदर!"

रिया आणि रोहित तिच्या रूम मध्ये गेले आणि रिया नी रूम च दार लाऊन घेतलं आणि ती रोहित शी भांडायला लागली,

"काहीही काय बोलतोस रे रोहित आई बाबांसमोर? सगळ सांगायचं नसत अस.."

"डोंट वरी रिया! मी काय आपण काय बोललो ते न्हवतो सांगणार. काहीतरी वेगळ सांगितलं असत मी. इतकी का घाबरलीस?"

"घाबरले नाही रे..जरा आपल्यात गोष्टी ठेवायला शिक. मी सांगण वेगळ आणि आपण सांगण वेगळ."

"ओके ओके मॅडम. तू चिडली आहेस अस दिसतंय.."

"होच... मी चिडले आहेच! आता फाईन हवाय मला.."

"सांग सांग.. मला ते माहिती होतच. तू काहीतरी उकळायच्या मूड मध्ये आलीयेस!"

"वॉट? मी तुझ्याकडून काही उकळते? ई, असे आहेत तुझे विचार?"

"मजा करतोय ग.. तुला सांगितलं आहे, थोड चिल मारत जा. इतकी का तापतेस लगेच?"

"फार काही नको रे.. फक्त नेहमीच माझ्या बरोबर राहा!" रिया गोड हसली..

"येस..येस! तुला सोडून कुठे जाणारे मी? मला तुझ्या शिवाय आणि तुला माझ्या शिवाय कोण मिळणारे? बाय द वे, "१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी!".. मुळे आपल्यात अजूनच जवळीक आली न.."

"हो ना... काहीही असत ना व्हर्चुअल जग? काहीही लिहा आणि लोकं विश्वास ठेवतात.. म्हणजे मी पण विचारात पडलेच की.! हाहा.."

"बर झाल ना पण.. आपल्याला वेगळ्याच विषयावर बोलण झाल.. नाहीतर आपण ह्या विषयावर कधी बोललो असतो का?.."

"करेक्ट! अशीच पाहिजेत न रे नाती.. इतकी मोकळी! नाहीतर त्या नात्यांची काय मजा?"

"बरोबर.. नाती मोकळी असतील तरच त्यातली मजा.. कोणत्याही विषयावर बोलता आल पाहिजे.. जे वाटत ते एकमेकांबरोबर शेअर केल पाहिजे. आज मस्त वाटल पण.. काही विषय कधीच बोलले जात नाहीत...आणि असे विषय खरच किती महत्वाचे असतात. फार कोणी अश्या विषयांमध्ये हात घालत नाहीत. मुलींनी तर सगळ्यात आधी अश्या विषयांवर बोलल पाहिजे. नाहीतर मग नंतर कधीतरी कळल की नात्यात गैरसमज वाढतो. नात्यात लपवा छपवी होते आणि ते तर नकोच! जे आहे ते स्पष्ट बोलाव.. जेव्हा तुम्ही नवीन नात्याची सुरवात करता तेव्हा तर नाहीच!!" रोहित बोलत होता अगदी मनापासून..

"तू कसला भारी आहेस रे रोहित!! एकदम बरोबर. बाय द वे, आपण सुद्धा असा विषय कधी बोललोच नसतो ना.. तुझा स्टेटस मुळे आपण किती महत्वाच्या विषयावर बोललो आज. आपल नात इतक मस्त आहे मला खूप भारी वाटतंय रे रोहित! तू माझ्या आयुष्यात आहेस मी किती लकी आहे!!"

"वाह..फायनली मी भारी झालोच!! तुझ्या मते भारी म्हणजे खरच भारी.. हाहा.. आपण भेटणार होतो सो भेटलो आणि ह्यापुढेही असाच एकमेकांबरोबर राहू...खर तर मला वाटलच न्हवत तू माझा स्टेटस पाहशील मग बोलायचा प्रश्नच न्हवता...म्हणजे मी असंच टाईमपास म्हणून स्टेटस टाकला होता. पण इथे कधी न बोलणारी तू बोललीस.. आणि आपण इतकी मस्त चर्चा करू.. वाह! मला एकदम फ्रेश वाटतंय." रोहित बोलला..

"हो ना.. कधी वॉट्सअप न पाहणारी मी, आज तझा स्टेटस पाहून अनइझी झाले. मला त्रास होतो काही गोष्टीनी... संताप पण येतो! डोंट थिंक मी तुला कधी सोडून जाईन किंवा तुला सोडून देईन! मी तर तुला सोडणारही नाहीये मी सहज सहजी... इतका आणि हो, तू लक्षात ठेव, नो हार्ड ड्रिंक्स! तू पण नाही म्हणायला शिक.." डोळे वटारून रिया बोलली

"हो हो.. रियाला चिडवायची हिम्मत नाही आपल्याकडे.. सो तू फक्त सांगायचं.. तुला जे हव तेच होईल आता.. आपण बरोबर असू काही दिवसात म्हणजे मला तुझ ऐकल पाहिजेच.. पण एक.. ," रोहित बोलायला लागला, पण रियाला आता काहीच ऐकायचं नव्हत. रियानी त्याला गप्प केल आणि रोहितला घट्ट मिठी मारली आणि रोहित नी सुद्धा तिला कवेत सामावून घेतलं.

***