आध्या ओरडत " बाबा..."
कल्पना , आध्या , कल्पेश तिघेही त्यांच्याजवळ जातात...
आध्या त्यांना हलवत " बाबा... बाबा... काय झालं..."
कल्पना त्यांच्या गालावर थोपटत " अहो... उठा..."
आध्या आईला " बाबांना हॉस्पिटल ला घेऊन जावं लागेल..."
कल्पना " हो... हो..."
बाबांना अस पडलेलं बघून कल्पेश रागात आपल्या बहिणीला " हे सगळ हिच्या मुळे झाल आहे... बघाव तेव्हा काही काही करत असते..."
आपला भाऊ आपल्याशी असा वागतोय हे बघून आध्या ला वाईट वाटत...
कल्पना रागात कल्पेश ला " कल्पेश शांत रहा इथे यांना काय झाल आणि तू बोलतो काय आहे.... यांना हॉस्पिटल न्याव लागेल लवकर..."
ते लगेच विश्वास ना हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात...
तिथे जाऊन समजत की त्यांनी जास्त टेन्शन घेतल्याने त्यांचा बीपी लो झाला आहे , काही काळजीच कारण नाही फक्त त्यांनी जास्त टेन्शन घेतल नाही पाहिजे...
विश्वास ठीक आहे म्हंटल्यावर हे तिघे रिलॅक्स झाले... त्यांना दोन दिवसांनी डीस्चार्ज भेटणार होता...
ते आता बेशुद्ध होते त्यांना शुद्ध यायला वेळ लागणार होता...
कल्पना आणि आध्या बाहेर बाकडावर बसले होते , कल्पेश आत बबांजवळ त्यांच्या बाजूच्या टेबलावर बसला होता...
आध्या " आई हे सगळ माझ्यामुळे झाल आहे , मला कशाला जन्म दिला जर जिवंतपणी मरण भेटत असेल तर... आधीच का नाही मेले मी...."
कल्पना " आध्या काहीही काय बोलत आहेस तुझ्यामुळे काही झाल नाही आहे... चूक परिस्थितीची आहे , गैरसमज झाला आहे तुझ्या बाबांना राग शांत झाला की समजेल त्यांना की तुझी चुक नव्हती..."
आध्या मुसमुसत " कधी... कधी... होईल बाबांचा राग शांत , शांत होण्याच्या जागी त्यांचा राग वाढतच चाललं आहे आणि त्यामुळे बाबांची अशी हालत मला नाही बघवत... बाबा कधी समजून घेतील मला..."
कल्पना आध्या ला मिठीत घेत " आध्या बाळा शांत हो , मला माहित आहे बाबा चुकत आहेत... पण त्यांना समजावून , ओरडून काही फायदा नाही ते आपलंच खर करतील.... त्यांना वेळ आल्यावर सगळ समजेल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.... "
माणसाला तो काय करतो आहे , कसा वागत आहे काही समजत नाही... त्याला वाटत तो जे वागतोय , जे करतोय ते बरोबर आहे... पण जेव्हा त्याला चूक काय होत आणि बरोबर काय होत हे समजत ना तेव्हा वेळ आणि आपल अगदी जवळचा माणूस निघून गेलेला असतो...
आध्या आपल्या आईच्या मिठीत मुसमुसत रडत होती आणि कल्पना तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होती...
थोड्या वेळाने आध्या आईच्या कुशीत च झोपून गेली...
कल्पना आध्या च्या चेहऱ्याकडे बघत विचारात हरवल्या " किती निरागस दिसतेय आध्या , पण या निरागस चेहऱ्या मागे किती दुःख लपले आहेत हे कोणाला समजेल... ऐकुन घेतेय सगळ ती तिलाही मन आहे , अस वागवत आहेत जस काय ही माणूसच नाही जणू... कधी एका पक्षी प्रमाणे मुक्त उडू दिलं नाही नेहमीच पिंजऱ्यात ठेवलं.... एका रॉबर्ट प्रमाणे कंट्रोल केलं... एवढं मोठं दुःख येवढ्या लहान वयात का देवा का इतकी कठीण परीक्षा घेतोय हीची का...."
सिस्टर च्या आवाजाने त्या भानावर आल्या...
सिस्टर " मिसेस शिंदे..."
कल्पना भानावर येत " ह... हो..."
सिस्टर " तुमच्या मिस्टर ना शुद्ध आली आहे..."
कल्पना ला विश्वास शुद्धीवर आले म्हणून त्यांना रिलॅक्स वाटल...
कल्पना " आम्ही भेटू शकतो का त्यांना..."
सिस्टर " हो पण जास्त टेन्शन नका देऊ त्यांना आणि जास्त वेळ नका बोलू सध्या त्यांना आरामाची जास्त गरज आहे..."
कल्पना " हो..."
एवढ बोलून सिस्टर आपल्या कामाला निघून गेल्या...
सहज कल्पनाच लक्ष आध्या कडे गेलं , तिला सिस्टर आणि त्यांच्या आवाजाने जाग आलेली ती त्यांचं बोलणं ऐकत होती तिचे बाबा शुद्धीवर आले ऐकुन तिला हायस वाटल...
कल्पना आध्या ला " बाळा चल भेटून येऊ बाबांना..."
आध्या " नको आई तू जा..."
कल्पना " का ?... "
आध्या " आई त्यांनी मला बघितल तर राग येईल मग आणि परत काही तरी होईल..."
कल्पना " काही नाही होणार चल मी आहे ना..."
आध्या " आई नको प्लीज तू जा भेटून ये त्यांना..."
कल्पना " अग पण..."
आध्या " आई प्लीज..."
कल्पना " ठीक आहे येते मी त्यांना भेटून..."
कल्पना विश्वास ना भेटायला आत गेल्या...
कल्पेश आईला आत आलेलं बघून तो बाहेर निघून गेला....
आध्या ला अस बाहेर बसलेल बघून तो तिच्याजवळ जात " व्वा या महाराणी इथे आरामात बसल्या आहेत , हिला आपल्या बाबांचं काही पडलेलं नाही आहे... माहीत नाही ह्या खरच त्यांची मुलगी आहे का नाही की कुठून बाहेरून आणली अस वाटतं आहे..."
कल्पेश च बोलण ऐकून आध्या ला खूप राग आलेला...
आध्या रागात " कल्पेश तोंड सांभाळून बोल मी तुझी बहिण आहे मोठी... तू लहान आहे , तुला कोणी बोलत नाही म्हणून जास्त जीभ नको चालवू समजल..."
कल्पेश जोरजोरात हसतच " खर बोलल्यावर बघा कसं राग येतोय..."
कल्पेश अस बोलताना त्याला कोणीतरी आपल्याकडे वळवून त्याच्या जोरात एक कानाखाली मारत आणि कल्पेश तसाच मारल त्या गालावर एक हात ठेऊन त्या व्यक्तीला बघतच राहतो...
आध्या कल्पेश ला एवढ्या जोरात मारलेल बघून ती तोंडावरच हात ठेवून त्या व्यक्तीला डोळे मोठे करून बघते...
क्रमशः
© भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी.....