Indraza - 15 books and stories free download online pdf in Marathi

इंद्रजा - 15

भाग - १५




पूर्ण कॉलेज आज शांत होता.....सगळीकडे भयानक शांतता पसरलेली....कारण आज होत लास्ट इयर चे रिजल्ट आणि त्यांचा प्रोग्राम.....सगळे आत होते...जिजाला खूप टेन्शन आलेलं..... आणि तोवर प्रिन्सिपल नी अनाउंसमेंट केली...


प्रिन्सिपल - आणि आता वेळ आहे यावर्षीच्या आपल्या प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी च्या नावाचं...आपल्या कॉलेज मधून प्रथम आलेली आहे...
जिजा शिवराज प्रधान....!


तसेच टाळ्यांचा गडगडाट झाला......शांतता भंग झाली.....जिजा स्टेज वर गेली.....सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच रोखल्या गेल्या होत्या....


शिक्षक - जिजा तुला काही चार शब्द बोलायचेत का?



जिजा - हो मॅम..
सर्वांना नमस्कार! पहिले तर हे प्रमाणपत्र हे मेडल मला मिळालं म्हणून मी खूप खूप आनंदी आहे....हे सगळं माझ्या आई बाबा मुळे शक्य झालं....त्यांनी मला कायम स्पोर्ट केला....नेहमी मला हिंम्मत दिली....
त्याच्याच बळावर आज मी उभी आहे....माझ्या बाबांना नातेवाईक म्हणायचे....अरे तुला दोन मुली? अजून एकदा संधी घे,एक मुलगा व्हायला हवा....वंश पुढे कोण वाढवील..? चितेला अग्नी कोण देईल? मुलगा हा हवाच...पण माझे बाबा नेहमी म्हणायचे..मुलगा काय मुलगी काय दोघ सारखीच... माझाच अंश...आणि राहिला प्रश्न माझं वंश न वाढण्याचा मग नको वाढू दे आणि माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलीच देणार मला माझ्या मुलीचं पुरेषा आहेत नको मला मुलं...मला दोन वाघिणी आहेत मग वाघाची गरजच काय? माझ्या मुलीचं माझी मुलं आहेत....कन्यादान यासारखे पुण्य जगात नाही....आणि त्याची दोनदा संधी मला मिळाले...मी भाग्यवान आहे....याच मतावर ठाम राहून त्यांनी आज आम्हाला उत्तम प्रकारे संस्कार देऊन शिक्षण देऊन मोठं केला...आज ते इकडे उपस्थित नाही...पण आज ते जास्त खुश होणारच आहेत...हे माझ्या आई बाबा साठी...Thankuhh!




मनाली - ये...अभिनंदन जिजा...



निलांबरी - Congress जिजा...



अभिजीत - अभिनंदन मॅडम....



अजिंक्य - लई भारी काम झालं बग..लई लई अभिनंदन...



जिजा - थँक्यु थँक्यु...



अजिंक्य - आता आम्हाला पार्टी हवी..



जिजा - हो हो देणार..पण यार आज बग ना नाही आई बाबा नाही इंद्रा...कोणीच उपस्थित नाही राहील..



निलांबरी - हो यार..पण तू नको उदास होऊ आता लगेच घरी जा आणि त्यांना ही न्यूज दे....



जिजा - हो चला चला निघूया...



मनाली - हो हो चला...
.
.
.
जिजा - हाय तारा...



तारा - अरे वा दिदा तूच फस्ट आलीस ना कॉलेज मधून... I know it....



जिजा - हो बाळा...
अग पण आई बाबा कुठे आहेत...



तारा - माहिती नाही..त्यांना एक कॉल आला मग बाबा जात होते तर सोबत आई पण गेली....



जिजा - अच्छा..बर जा तू स्टडी कर..
कुठे गेलेत हे तिघे....कोणीच फोन नाही उचलत आहे...मला त्यांना ही न्यूज द्यायची आहे...खूप आनंदी होतील सगळे....इंद्रा पण फोन उचलेना....




जिजा बराच वेळ वाट पाहते......कोणाचा ही फोन लागत नाही......काहीवेळाने तिचा फोन वाजतो......नंबर वेगळाच होता.....



जिजा - हॅलो..... 📲



प.व्यक्ती - हॅलो स्वीटी..आज तुझा सत्कार झाला आणि तुझे घरचे नाहीत...so sad...... 📲



जिजा - कोण बोलतंय....? आणि तुम्हाला कस माहिती.... 📲



व्यक्ती - त्याने काय फरक पडतो..तुझे आई बाबा आणि इंद्रा...MG Road ला आहेत जाऊन भेटून घे तुझ्या आई बाबा ची कदाचित शेवटची संध्याकाळ आहे आज...बाय बाय........📲



जिजा - what???? हॅलोहेलो...
आ तारा मी आले जाऊन हू..तू घरातच राहा..लॉक कर आतून दरवाजा...मी आल्याशिवाय ओपन नको करू...



तारा - काय झालं पण?




जिजा - अग मला काम आलंय...आलेच मी हू...



तारा - ओके...
.
.
.
जिजा पळत पळत जाते.....रिक्षा पकडते....ती खूप घाबरते......आता मात्र तो फोन ती मनावर घेते....मनात नको ते विचार येतात......काहीवेळात ती MG रोड ला पोहोचते.....तिकडे सर्वत्र घोळका जमलं होत....जिजा त्याला पार करतं पुढे गेली.....
समोरच दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन हळली.....शिवराज आणि दिव्या रक्तबंबाळ होऊन पडलेले.....जिजा त्यांच्या जवळ पळत गेली....



जिजा - आईsssssss
बाबाssssss
आई बाबा काय झाला तुम्हाला....😭बाबा उठा ना आई...अरे कोणीतरी ऍम्ब्युलन्स बोलवाsss...आई बाबा काय झालं तुम्हाला....? उठा ना प्लिज....
😭😭



इंद्रजीत - जिजा?
(मागून येत )



जिजा - इंद्राssss 😭😭 आई बाबा ना बग काय झाला.....?



इंद्रजीत - शिवराज काका...दिव्या काकू...? क क काय झाला यांना जिजा.....



जिजा - माहित नाही इंद्रा 😭



इंद्रजीत - जीवाssss उचल यांना लवकर हॉस्पिटल ला घेऊन चल.....



जीवा - हो भाऊ..मल्हार लवकर ये....



सगळे गाडीत बसून निघून जातात......त्यांचे रडून बेहाल झालं होता......जिजा तर ओरडून ओरडून रडत होती.....
.
.
.

डॉकटर - मिस्टर भोसले.....



इंद्रजीत - आ ड डॉकटर काय झाला दोघ बरे आहेत ना?



डॉक्टर - सॉरी....मी यांच्या आई ना नाही वाचवू शकलो...आणि यांच्या बाबा ना शुद्ध आले पण ते..... मी माझे पूर्ण प्रयत्न केलेय..... पण...दोघांना सुद्धा रॉड ने हल्ला केलाय....तुमच्या आई त्यामुळे जागीच मरण पावल्या......पण बाबा जिवंत आहेत.... मी गॅरेंटी नाही देऊ शकत.... माफ करा.... जाऊन भेटून घ्या तुम्ही....



जिजा - अअअअअअअअअअ आई ssssss 😭😭




इंद्रजीत - जिजा......जिजा.......
आत चल त्यांना भेटूया.....




जिजा - हं बा....
बाबा.....



शिवराज - आ आ हं ज जिजा..जिजा बाळा...रडू नकोस....



जिजा - बाबा...



शिवराज - तारा? आणि दिव्या?



जिजा - बाबा त तारा घरी आहे आणि आई...? आई नाही राहिली बाबा 😭😭😭😭




शिवराज - काय.... 😭
जिजा आता मी ही जास्त नाही राहणार...माहिते मला..दिव्या आणि मी सोबत जगणं मरण्याच्या शपथ घेतल्यात...आम्ही असं एकटं एकटं नाही राहू शकत...



जिजा - बाबा असा नका बोलू ना माझं आणि तारा च काय? बाबा तुम्हाला माहिते मी मी आज फस्ट आले...graduated झाले....बाबा मला तुम्हाला ही आनंदाची न्यूज द्यायची होती पण....असा झालं 😭 आई बाबा 😭



शिवराज - गुड जॉब बाळा....असच यश मिळव....जिजा माझी आता वेळ झाली....
एकच सांगतो...इंद्रा ची साथ कधीच नको सोडूस...खूप शिक नोकरीं कर....संसार कर....माझ्या तारा वर लक्ष ठेव....तिला पोलीस बनायचंय.... ते बनव....
वचन दे?



जिजा - हो हो बाबा 😭वचन देते....



इंद्रजीत - काका तुम्ही असं काही बोलू नका आम्हाला तुमची गरज आहे....



शिवराज - नाही इंद्रा...मला तू सुद्धा वचन दे...माझ्या इंद्रा आणि तारा ला कधीच दुरावा नाही देणार....त्यांना जप..त्यांना संभाळ....



इंद्रजीत - तुम्हाला वचन देतो काका...मी त्यांना कायम सोबत ठेवेन त्यांची काळजी घेईन....



शिवराज - हं..आता मी निवांत जाऊ शकतो...एकच सांगतो जिजा माझ्या आणि दिव्याच्या दिलेल्या संस्कारा वर चाल....आणि माझ्या एक कट्टर शत्रू पासून सावध राहा....
मी मी येतो....गणपती बाप्पा....मोरया...अअअ




जिजा - नाही...बाबा...बाबा...आईssss बाबाssss😭😭😭
😭😭😭😭



इंद्रजीत - जिजा संभाळ स्वतः ला....😭




जिजा - इंद्रा आता मी काय करू? कोणाकडे बघू इंद्रा 😭😭मी मी पोरकी झाले 😭 ताराला काय उत्तरं देऊ मी...😭आई बाबा का असा झालं माझ्यासोबत 😭देवा...😭आम्हाला तरी का जिवंत ठेवलं....😭




इंद्रजीत - जिजा.... बाळा....



जीवा - इंद्रा भाऊ...मी माहिती काढली काही माणसं वॅन मधून उतरली आणि काका काकू ना रॉड नी मारायला लागले...मग त्याच वॅन मधून ते पळून गेले....सगळं इतक्या पटकन घडलं कोणीही नीट नाही पाहिलं..



इंद्रजीत - हम्म ज्याने कुणी काका काकू ना मारलंय त्याला मी सोडणार नाही....😤😠😠
.
.
.

(काही महिन्या नंतर )



शिवराज दिव्याच्या अचानक झालेल्या मृत्यू मुळे जिजा खूप खचली होती.......तारा तर रोज त्यांच्या आठवणीत रडायची.......त्यांच्या सगळ्या विधी झाल्या......तस सगळे पाहुणे निघून गेलेत.....पूर्ण घरात फक्त तारा आणि जिजाच रहायच्या......बरेच महिने झाले जिजा आणि तारा थोड्या सावरल्या......याकाळात इंद्रा ने तिला खूप आधार दिला....आणि अजूनही देतं होता...त्याच्याच आधाराने दोघी उभ्या होत्या.....यालाच प्रेम म्हणतात!❤️



इंद्रजीत - हॅलो माय लेडीज....!!



तारा - हाय इंद्रा...



जिजा - ये बस...



इंद्रजीत - बसायला नाही तुम्हाला घेऊन जायला आलोय मी....



जिजा - आम्हाला कुठे??



इंद्रजीत - हे बोलला पाहिजे की नको हेच समजतं नाही आहे.....ही योग्य वेळ नाही आहे i know....पण आज तुला बोलतोय....जिजा मी आणि घरच्यांनी ठरवलंय की आपल लग्न व्हावं याच वर्षी....



जिजा - इंद्रा...अरे पण....



इंद्रजीत - हो हो ऐक ऐक...मला. माहित आहे काका काकूंचा असं झालंय...मी पण आनंदाने नाही बोलत आहे पण जिजा मी आता तुम्हाला एकटं नाही सोडू शकत...आपल लग्न झालं की तू आणि तारा आमच्यासोबत वाड्यात राहायचं...आपण दोघ मिळून सगळं बघायचं ताराचं...तुला जे काही करायच असेल ते तू माझी पत्नी म्हणूनच कर....



जिजा - हो पण ताराचं...मला ते बरोबर नाही वाटतं...तुझ्यावर सगळं?



इंद्रजीत - जिजा तू पण त्यावेळी तिकडे होतीस ना जेव्हा काका नी तुमची काळजी घेण्याचा संभाळ करण्याचा वचन घेतलं...त्यामुळे प्लिज आता तुझा माझं नको करुस...मला माझं कर्तव्य पार पाडू दे...आणि तुमचं एकटं राहणं खतऱ्याच आहे...आणि यात तुझा काय माझं काय? जे काय आहे ते आपल आहे समजलं....



जिजा - हम्म....
थँक्यु इंद्रा....😭❤️तुझ्यासारखा जोडीदार मला लाभला खरंच किती करशील आमच्यासाठी......
(मिठी मारून )



इंद्रजीत - मी आहे तोवर सर्व काही करणार....तारा चालेल ना तुला??



तारा - हो चालेल ना मला.... माझ्या दिदा आणि इंद्राचं लग्न.....🤩🌈



इंद्रजीत - 😃♥️



जिजा - ❤️😃



क्रमश :
Do Comments!!
Do Share!!
Keep Supporting Friends!!