Bodhkatha - 1 in Marathi Philosophy by मच्छिंद्र माळी books and stories PDF | बोधकथा - 1

बोधकथा - 1

*बोधकथा:-*


*भाऊबंदकी, भावावरला राग*
*****************************

(*कोर्ट- कचेरी :-रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण --*)

*एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* -

*नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.., सगळ्याच जमीनीवर, इस्टटीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल?*

*मी त्यांना बसायला सांगितलं.*

*ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्या कडून माहीती घेतली.*

*अर्धा पाउण तास गेला.*
*मी त्यांना सांगितलं. , मी अजून कागदपत्रे पाहतो. तुमच्या केसचा विचार करू या. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या.*

*४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले.*

*मग मीच बोलायला सुरूवात केली. मी तुमची कागदपत्रे पाहीली. तुम्ही दोघे भाऊ. एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले.*

*तुमच शिक्षण ९ वी पास. धाकला भाऊ M.A.B.ed. तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी शाळा सोडली. रानात लंगोटी वर राबला. नेवरा दाजीच्या विहीरीवर दगड फोडली. सदाबापूच्या उसात स-या पाडल्या. पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही.*

*एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याला शिंग लागली, संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. तुंम्ही खांद्या वरून त्याला बोरगावला नेलं. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं....फक्त कळती माया होती..आई बापाच्या मागं यांचा मीचआई बाप ही भावना होती...*

*तुमचा भाऊ B.A ला गेला. उर भरून आलं. तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. दवाखानं केल..बाहेरचं केलं. पण, गुण आला नाही..शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली. तुंम्ही तुमची किडनी दिली. ऑफिसर झाल्यावर खुप फिरायचं आहे.. नोकरी करायची आहे..तुला आमच्या पेक्षा लय त्रास.. आंम्ही रानातली माणसं.आंम्हाला एक किडनी असली तरी चालतय. तुम्ही बायकोच सुध्दा न ऐकता किडनी दिली.*

*भाऊ M.A ला गेला. होस्टेल वर रहायला गेला. गावात मटण पडलं..डबा नेवून द्यावा. शेतात कणसं आली..कणस नेवून द्यावी. कुठला सण आला..पोळ्यांचा डबा द्यावा. घरा पासून हॉस्टेलचं अंतर २५ की.मी. पण तुंम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला. भावाला नोकरी लागली. तुंम्ही गावात साखर वाटली.*

*३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..झालं म्हणजे त्यानंच केलं. तुंम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता..*

*भावाला नोकरी लागली. भावाच लग्न झालं..आता तुम्हाला आणि बायका पोरांना सुख लागणार होतं; पण झाल उलटंच....लग्न झाल्या पासुन भाऊ घरी येत नाही. बोलावलं तर म्हणतो; मी बायकोला शब्द दिलाय. घरी पैसा देत नाही. विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे. गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारल तर म्हणतो, कर्जकाढून घेतलाय..!!*

*सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो नंतर म्हणालो, आता तुमचं म्हणणं आहे की त्याने घेतलेल्या मिळकती वर स्टे लावायचा ?*

*तो पटकन म्हणाला; हो बरोबर.*

*मी म्हणलं; स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकती मधला हिस्सा पण मिळेल. पण......*

*पण तुंम्ही दिलेली कीडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही. आणि मला वाटतयं, या गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शुन्य आहे. त्याची नियत बदलली. तो त्याच्या वाटंनं गेला. तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा. तो भिकारी निघाला, तुंम्ही दिलदार होता, दिलदारच रहा. तुम्हाला काहीएक कमी पडणार नाही.!! उलट मी म्हणेन वडीलो पार्जित मिळकती मधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक राहु द्या. कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना शिकवा. शिकुन तुमचा भाऊ बिघडला ; म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.*

*त्यान १० मिनीटं विचार केला, सगळी कागद पिशवीत कोंबली, डोळं पुसत म्हणाला, चलतो सायेब... !! "*

*या गोष्टीला १० वषॅ झाली.*

*परवा तो पक्षकार अचानक ऑफीसला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसली तरी पिशवी.*

*मी म्हटले बसा..*

*तो म्हणाला, बसायला न्हाय आलो सायेब, पेढं द्यायला आलोय, .हा माझा पोरगा. न्युझिलॅंन्डला असतो. कालच आलाय. आता गावात ३ मजली घर हाहे , ८-९ एकर शेत घेतलय. तुंम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटला लागू नका. मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली.*

*मला भरुन आलं, हातातला पेढा हातातच राहीला.*

*रागाला योग्य दिशा दिली तर, पुन्हा रागवायची वेळ येणार नाही.*

*कितीही कमवा पण, कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर, ऱाजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,*
बोधसुत्र
*आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घ्या व जीव लावा, हाक तुमची साथ आमची असं असावं*
*रागाला योग्य दिशा दिली तर, पुन्हा रागवायची वेळ येणार नाही.*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
मच्छिंद्रनाथ माळी छत्रपती संभाजी नगर.

CP

Rate & Review

मच्छिंद्र माळी

एक छान बोधकथा.

Jambu Varale (Baba)
Madhavi Marathe

Madhavi Marathe Matrubharti Verified 2 months ago

SHRAWANI MORE

SHRAWANI MORE 3 months ago

Share