Why they don't want Gandhi? books and stories free download online pdf in Marathi

गांधी यांना का नको आहेत?

#गांधींचे_मारेकरी__कोण? 

गांधींमुळे हिंदुराष्ट्र निर्माण झाले नाही म्हणून गळे काढणाऱ्या व गांधींचा पराकोटीचा द्वेष करणारे लोक हेतुपुरस्पर गांधींविरुद्ध खोट्या बातम्या गेली 70 वर्षे पसरवीत आले आहेत. कारण या मूठभर लोकांच्या हाती शिक्षणाच्या आणि प्रसारमाध्यमांच्या नाड्या आहेत. परशुरामाला बाप मानणाऱ्या या नासक्या औलादी आहेत. विकृत नथुरामचे समर्थन करणारे हे विकृत आहेत. गांधींवर यांनी साहित्यातून खोटे आरोप केले, गांधींवर अश्लील विनोद पसरवले. 
ते हेच लोक आहेत ज्यांचं आणि त्यांच्या बापजाद्याचं स्वातंत्र्य लढ्यात काडीचंही योगदान नाही. तरीही त्यांना स्वातंत्र्यानंतर देशाची सत्ता भोगायची होती आणि इथल्या कष्टकरी बहुजनांना पूर्वीप्रमाणेच गुलाम ठेवायचं होत.
हे ते लोकच आहेत ज्यांच्या बापजाद्यांनी  हजारो वर्षात कधी कष्ट केले नाहीत. बहुजनांच्या कष्टावर यांची पोटे गोल गरगरीत झाली,चिरेबंदी वाडे उभे राहिले. बहुजनांना यांनी अशिक्षित अडाणी ठेवण्यासाठी धर्मग्रंथ तयार केले. खोटे देव व त्यांच्या भीतीचा बागुलबुवा तयार केला. हजारो वर्षे यांनी बहुजनांना वेठ बिगार म्हणून वापरले. तरीही खडकाची छाती फाडत ज्याप्रमाणे एखादा अंकुर बाहेर पडतो व त्याचा वृक्ष होतो. असे बहुजन नेतृत्व उदयास येत राहिले. पुन्हा बहुजनातून नेतृत्व उदयास येऊ नये म्हणून यांनी निर्माण झालेल्या नेतृत्वाला देवत्व बहाल केले व लोकांना नशिबात असेल तेच मिळते अश्या तत्वज्ञानाचे डोस हजारो वर्षे पाजले. हे तेच लोक आहेत ज्यांनी तथागत गौतम बुद्ध व त्यांच्या तत्वज्ञानाला संपविण्याचा असफल प्रयत्न गेली हजारो वर्षे करत आले आहेत.  हे तेच लोक आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. हे तेच लोक आहेत ज्यांनी मनुस्मृतीतील शिक्षा संभाजी महाराजांना सुनावल्या व त्यांना हाल हाल करून मारले.  हे तेच लोक आहेत. ज्यांनी कोड बिलाला विरोध केला व स्त्रियांच्या उन्नतीच्या मार्गात अडथळे निर्माण केले. हे तेच लोक आहेत. ज्यांनी बहुजनांना शिक्षणाची कवाडे बंद केली होती. हे तेच लोक आहेत ज्यांनी सतीची प्रथा स्वतःच्या फायद्याकरिता सुरू केली होती. हे तेच लोक आहेत जे बहुजनांना ते हिंदू आहेत म्हणून खोट सांगतात आणि बहुजन डोळे झाकून त्यावर विश्वास ही ठेवतात. हे तेच लोक आहेत जे बहुजनांनी दान केलेल्या मंदिरांमधील पैशावर ऐश करतात. गांधींना मारणारे हेच लोक आहेत ज्यांनी गांधींचा उदोउदो करत सत्तेचा सोपान चढले.

#गांधींना_त्या_लोकांनी_का_मारले_?

त्या लोकांची योजना ही होती की भारतात शिक्षित लोक तेच आहेत. ब्रिटिशांनी सत्ता सोडली की देशाचा राज्यकारभार यांच्या हातात येईल आणि मग पुढील हजारो वर्षे हे लोक ऐशआरामात जगातील. त्यासाठी यांना हिंदुराष्ट्र निर्माण करायचे होते. एकदा हिंदू राष्ट्र निर्माण झाले की यांना स्वतःच्या प्रगतीसाठी कारखाने काढून त्यात घाम गाळावा लागणार नाही, किंवा शेत जमीन नांगरावी लागणार नाही. हिंदू राष्ट्र निर्माण झालं की हवी तेवढी मंदिर बांधता येतील आणि बसून मिष्टान्न खाता येईल. बहुजनांचे शिक्षण बंद करून त्यांना वेठ बिगार म्हणून स्वतःच्या प्रगतीसाठी वापरता येईल.
 पण झाले उलटेच एक साधारण दिसणारा गांधी नावाचा माणूस या देशात जन्माला आला. त्याने इंग्रजांविरुद्ध बाजनांना सोबत घेऊन रान पेटवले. लाखो बहुजांना सोबत घेऊन त्याने सत्याग्रहाचा लढा उभारला. सत्याग्रहाच्या लढ्यातून बहुजनांतील नेतृत्व उदयास आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनासमितीत सर्व समाजस्तरातील नेत्यांना स्थान मिळाले. हजारो वर्षे अस्पृश्य म्हणून हिनवल्या गेलेल्या समाजातील एका नेत्याने आपल्या बुद्धीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर जगातील सर्वात मोठी राज्यघटना तयार केली.  राज्यघटनेनुसार सार्वत्रिक निवडणुका देशात झाल्या आणि अनेक बहुजन नेत्यांनी घवघवीत यश संपादन केले आणि ते खासदार बनून शासनकर्ते झाले. 
जे लोक इंग्रज गेल्यानंतर सत्ता आपल्या हातात येईल या भ्रमात होते. त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्याचा दोष त्यांनी गांधींना दिला. कारण गांधींमुळे बहुजन समाजात नेतृत्व उदयास आले होते व त्यांनी सत्ता ही काबीज केली होती. आता जो पर्यंत राज्य घटना आहे तो पर्यंत त्यांना सत्ता भोगायला मिळणार नव्हती. त्यांना ही आता इतर बहुजनांप्रमाणे कष्ट करावे लागणार होते. त्यामुळे गांधीजी यांच्या स्वप्नांचा खातमा करणारे खलनायक ठरले. यांच्यापैकीच एका विकृत माणसाने निशस्त्र वृद्ध गांधींवर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. या अतिरेक्यांच्या पाठीराख्यांनी गांधीजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम गेली 70 वर्षे इमानेइतबारे केले. जेणेकरून बहुजन समाज गांधींचा द्वेष करेल आणि यांचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल आणि बहुजनांना यांना पुन्हा गुलाम करता येईल.
पण या मूर्ख लोकांना हे कळत नाही की माणूस संपवता येतो पण त्याचे विचार कधीच संपवता येत नाहीत.
गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

#मिलिंद_शिवशरण