maat - 7 in Marathi Moral Stories by Ketki Shah books and stories PDF | मात भाग ७

मात भाग ७

रेवती सध्या वेगळ्याच मनस्थितीत होती.. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता..

तिला कळत होते की तिचे प्रतीकशी बोलणे झाल्याशिवाय.. या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाल्याशिवाय तिला काही चैन पडणार नाही..

रेवतीने बराच विचार करून.. जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवून.. आणि हिंमत एकवटून.. मनाशी काहीतरी निश्चित केले..

"रेवती, जरा शांतपणे बोल.. घाई करू नकोस.. प्रकरण तुला वाटले होते त्यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.." ती स्वतःशीच संवाद साधत होती..

घडलेल्या प्रसंगांची साधारण मनाशी उजळणी करत करतच तिने प्रतीकला फोन लावला..

"काय म्हणतोयस? कसा आहेस?.. मला तुला जरा तातडीने भेटायचे आहे"

स्वतःला शांत राहण्यास बजावूनही.. एकंदरीत सगळ्या घटनाक्रमामुळे तिला स्वतःच्या वागण्यावर ताबा ठेवता आलेला नव्हता..

रेवती एकादमात सगळे बोलून.. विचारून मोकळी झाली..

प्रतीकला हे सगळे अनपेक्षित होते..

३-४ सेकंद फोनवर अस्वस्थ शांतता होती.. तिचा भंग करण्यासाठी दोघांपैकी कोणीतरी बोलणे गरजेचे होते..

प्रतीक बोलू लागला..

"मी एकदम मजेत.. तू कशी आहेस..? मी प्रतीक आहे बरे का.. चुकुन सुहास तर समजत नाही आहेस ना मला..?”.. असे म्हणून तो हसला.. अस्वस्थता कमी करण्याच्या हेतूने प्रतीकने केलेला छोटासा प्रयत्न होता तो..

पण रेवतीला त्यात अजिबात रस नव्हता.. त्यामुळे तो प्रतीकचा प्रयत्न फोल ठरला होता.. तिने प्रतीकच्या विनोदाकडे साफ दुर्लक्ष केले होते.. कारण ती वेगळ्याच मनस्थतीत होती.. आणि तिला फक्त आणि फक्त सत्य जाणून घ्यायचे होते..

"हा बोल लवकर.. कधी आणि कुठे भेटूया?" रेवती

प्रतीकला साधारण अंदाज आला होता की त्याने आणि सुहासने सुरू केलेला हा लपंडावाचा खेळ बहुधा आता संपवण्याची वेळ जवळ येत चालली आहे.. सुहास आणि त्याने एवढे प्रयत्न करून जाणीवपूर्वक.. प्रसंगी वाईटपणा पत्करून रेवतीला या सर्व प्रकारणा पासून दूर ठेवले होते..

पण आजचा तिचा फोनवरचा सूर काही निराळाच होता.. आणि या वेळेस नाही म्हणण्याचा पर्याय देखील रेवतीने प्रतीक समोर ठेवला नव्हता..

रेवती ठरलेल्या ठिकाणी.. ठरलेल्या वेळेच्या आधी १५ मिनिटं येऊन बसली.. तिला हॉस्टेलवर अजिबात बसवत नव्हते.. म्हणून ती तिथून लवकरच निघाली होती..

प्रतीक ठरलेल्या वेळेत बरोबर तिथे पोहोचला..

५ मिनिटं इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर.. प्रतीकने  रेवतीला एवढे तातडीने आणि अचानक भेटायला बोलावण्याचे कारण विचारले.. रेवती काही सेकंद त्याच्याकडे बघत होती.. प्रतीकने खूप प्रयत्नांति निर्विकार चेहरा ठेवला असला तरी त्याच्याही मनात कालवाकालव सुरू होती..

रेवतीने विषयाला हात घातला.. तिने प्रतीकला काल घडलेला प्रकार सांगितला.. "आणि इथून पुढे तरी कमीतकमी मला सत्य कळेल अशी आशा मी बाळगण्यास तुझी काही हरकत नसावी असे मला वाटते प्रतीक.. तुला काय वाटते? गेल्या काही दिवसांपासून तुमच्या दोघांचे काय चालू आहे?आणि तुम्ही दोघे काल हॉस्पिटलमध्ये काय करत होता?

हॉस्पिटलचे नाव ऐकून प्रतीकच्या निर्विकार चेहऱ्यावर निरनिराळ्या हावभावानी गर्दी करायला सुरुवात केली..

"हिला कसे माहिती हॉस्पिटल.. अरे देवा.." प्रतीक

“प्रतीक खरे खरे सांग.. माझ्या पासून काहीही लपवू नकोस.. तू ठीक आहेस ना.. सुहास ठीक आहे ना. तुम्ही दोघे हॉस्पिटलमधे काय करत होता”.

“बोल रे. माझा जीव बसतोय इकडे. बोल बोल..”

प्रतीककडे आता कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता.. त्यामुळे त्याने तिला सर्व सांगितले..

ती जोरात काय म्हणत उभी राहिली.. तिला आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत याचेही भान राहिले नाही.. 

तिच्या भावनांचा बांध फुटला होता आणि तिच्याही नकळत डोळ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता..

आता तिच्या डोक्यात प्रकाश पडला की सुहास एवढा तुटक का वागत होता.. भेटायचे का टाळत होता.. काही विचारले तर उडवा उडवीची उत्तरे का देत होता.. तिच्या पायाखालची जमीन सरकल्या सारखी तिला जाणवत होती.. बधिर झाली होती ती जागेवर बसल्या बसल्या..

Rate & Review

Mukta punde

Mukta punde 3 years ago

manasi

manasi 3 years ago

Surekha

Surekha 4 years ago