KONDHAJI FERJAND - PART 2 books and stories free download online pdf in Marathi

कोंढाजी फर्जंद - भाग २

शंभू राजे काही न बोलता तडक आपल्या शामियान्यात निघून आले..झालेल्या प्रकाराने ते पार दुःखी झाले होते त्या दिवशी त्यांनी धड जेवण पण नाही घेतले..दिवस जात होते पण शंभू राजे ना धड मोहिमेवर लक्ष देत होते..ना जंजिऱ्यावर हल्ला करायचा आदेश देत होते..आणि तिथे कोंढाजी बाबा मात्र जंजिऱ्यावर सिद्दी खैरतचा पाहुणचार झोडत होते..सकाळ संध्याकाळ जंजिऱ्यावर फेरफटका मारत होते..आणि रात्री नाच गाण्यात आणि मुजऱ्यात जात होत्या..सिद्दी खैरत पण खुश होता एक मोठा मराठा सरदार त्यांच्या आश्रयाला आला होता आता काही दिवस मग हा वेढा उठणार होता आणि पुन्हा एकदा तिथल्या बाया मुलांना गुलाम म्हणुन विकून बक्कळ पैसा मिळवता येणार होता...

कोंढाजी बाबांना आता कशाहि देणे घेणे नव्हते त्यांनी तिथे जंजिऱ्यावर एक दासी पण कोंढाजी बाबांच्या सेवेला दिली होती ..स्वराज्य काय थोरले महाराज काय सर्व सर्व विसरले होते..स्वराज्यावर अजून एक घाला पडला होता..

१५ ते २० दिवस सर्व असेच चालले होते..शंभू राजे फक्त दुःखी नजरेने जंजिऱ्याच्या दिशेने पाहत होते..सर्व सैन्य गोधळले होते..उघड उघड स्वराज्यद्रोह होता..आणि त्याला एकच शिक्षा मृत्यूदंड..पण शंभू राजे असे का शांत होते..कोणाला त्यांच्या मनाचा ठाव लागत नव्हता..आणि जास्त दिवस जंजिरा मोहिमेवर अडकून राहणे पण शक्य नव्हते..औरंगजेब कधीही दख्खन मोहिमेवर उतरणार होता..आणि एका रात्री शामियान्याबाहेर झालेल्या गडबडीने शंभू राजे बाहेर आले...काही मावळे आपल्यापैकी एका मावळ्याला पकडून आणत होते.. त्याच्या हातात कसलेले एक बोचके होते..शंभू राजांनी ओळखले तो कोंढाजी बाबाच्या विश्वासु माणसांपैकी एक होता.. आणि काही कळायच्या आत त्याने शंभू राजांच्या पायांवर लोळण घेतली..आणि हातात असलेलं बोचकं राजांच्या हाती सोपवत धाय मोकलून रडू लागला..शंभू राजांनी मनावर दगड ठेवून ते बोचके उघडले तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली..त्यात कोंढाजी बाबाचे मुंडके होते.. शंभू राजे आणि कोंढाजी बाबाने जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा काढायचा डाव फसला होता..

मावळा बोलू लागला " सर्व काही योजनेप्रमाणे होत होते..जंजिराचे चोर दरवाजे, पहारा ,गस्त किती तोफा, दारुगोळा ची कोठारे सर्व काही माहिती कोंढाजी बाबा आणि त्यांचे मावळे काढत होते..सर्व काही तयारी झाली होती..जंजिऱ्यावरचे सर्व दारुगोळ्याची कोठारे आता काही वेळात अस्मानात उडणार होती.. सुरुंग पेरले गेले गलबत तयार होते..पण ऐनवेळेला कोंढाजी बाबाची दासी सुद्धा बरोबर निघाली पण तिचा आग्रह होता तिला एका आपल्या मैत्रिणिला बरोबर घेण्याची इच्छा व्यक्त केली...कोंढाजी कडे वेळ नव्हता त्यांनी पटकन होकार दिला..मात्र ती दासीची मैत्रिण कपडे आणायच्या निम्मिताने सरळ सिद्धीच्या महाली गेली आणि तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंढाजी बाबा आणि जंजिऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले..मी मात्र कोंढाजी बाबांचे मस्तक घेऊन जंजिराच्या भुयारामार्गे समुद्राजवळ खडकांत लपून बसलो आणि आत रात्र झाल्यावर जीव वाचवून पळून आलो..

राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले...कोंढाजी बाबा शंभू राजांच्या फार जवळचे होते..पण राजाला भावनाविवश होऊन चालत नाही..त्याला नाती गोती काही नसतात..पण कोंढाजी बाबाचे बलिदान असे व्यर्थ जाऊ द्याचे नाही..हा हा म्हणता हि खबर सर्व तळावर पसरली..आदेश सुटले..आणि मग विजेप्रमाणे कडाडला मराठ्यांचा तोफखाना ...किनाऱ्यावरून आग सोबतीला पद्‌मदुर्ग पण बरसत होता त्याचा आडोश्याला इतके दिवस लपून बसलेले मराठा आरमार आत आपली खरी ताकत दाखवत होते...जिभल्या चाटत चाटत मराठा आरमार जंजिऱ्याच्या दिशेने त्याचा घास घेण्या निघाले होते...सिद्धी चा शिशेंमहाल पार चक्काचुर होऊन पडला होता..कयामत आली होती जंजिऱ्यावर..पण ऐनवेळेला समुद्र मदतीला आला..समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले.. पण शंभू राजे ऐकतील ते कसले...त्यांनी किनाऱ्यापासून जंजिऱ्यापर्यंत सेतु बांधायला घेतला..जंजिऱ्यावरून तोफांचा मारा होतच होता..सोबतीला खवळलेला दर्या..कित्येकवेळा सकाळी बांधलेला सेतू दुपारी वाहून जात होता..पण ऐकतील ते मराठे कसले...

तिथे औरंगजेबाला हि खबर कळली शंभू राजे जंजिऱ्याचा घास घेणारच..आणि एकदा का जंजिरा मराठयांचा हातात आला कि तो कोणालाही जुमानणार नाही पण मग मात्र औरंगजेबाने डाव टाकला , औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर ४० हजार मोगली सैन्यासकट चाल करून पाठवले. हसन आली कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.

मग मात्र नाईलाजास्तव जंजिरा मोहीम अर्धवट सोडून शंभू राजे रायगडाच्या दिशेनं परत फिरले...

समाप्त