Trushna - ajunahi atrupt - 1 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा - अजूनही अतृप्त - भाग १

सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून फिरणारी तिची लांबसडक बोट अचानक तिच्या निमुळत्या मानेपाशी थबकली. तिने बोटानेच मानेचा भाग चाचपडला. मानेतून एक सौम्यशी कळ उठली... त्यानेही तिच्या डोळ्यात पाणी आल आणि काल रात्रीचा तिच्या नवऱ्याचा प्रताप तिला आठवला.

हे काल रात्रीपुरतच मर्यादित नव्हतं. सहा महिन्यापूर्वी तीच लग्न झालं तेव्हापासून तिच्या रात्री ह्या अशाच होत्या. आई वडिलांनी अगदी खूप श्रीमंत आणि चांगल्या घरातील मुलाशी तिचा विवाह करून दिला होता. तिच्या नवऱ्याची स्वतःची कंपनी होती. खूप मोठा बंगला, दिमतीला नोकर चाकर, दाराशी उंची गाड्या सर्वांच्या दृष्टीने सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेत होती. परंतु.... ती श्रीमंत नवऱ्याच्या शोकेस मधली बाहुली होती हे कोणाच्या लक्षातच नाही आल कधी. त्याच्या व्यस्त जीवनातील जे काही दोन तास हिच्या वाट्याला येत ते ही त्याला तिच्यासोबत घालवावेसे वाटत नसत. कधी पहावं तेव्हा तो तिच्यापासून अंतर ठेवूनच राहत असे. ती किती आशाभरल्या डोळ्यांनी त्याची प्रतीक्षा करत असे.... तो कधीतरी येऊन जवळ घेईल.. आपल्यावर प्रेम करेल.. पण कसच काय... सगळ स्वप्नच बनून राहील. त्याला वाटेल तेव्हा त्याच्या कामापुरता तो जवळ घेई. त्यानंतर काय घडायचं ते कधीच तिला आठवायच नाही आणि तिला आठवण्याचा प्रयत्नही करायचा नसे. कालही असच काहीस घडल होत. त्याच्याच खुणा आता जखम बनून ठसठसत होत्या. नुसत्या आठवणीनेच तिच्या तोंडून हलका उसासा निघाला.

आपल्या ओलेत्या अंगाभोवती मऊ टॉवेल लपेटत ती आरशासमोर उभी राहिली. बऱ्याच दिवसांनी आज ती स्वतःला अस न्याहाळत होती. तिची गोरीपान सोनेरी चमक असणारी कांती मागच्या काही महिन्यांत बऱ्यापैकी निस्तेज पडली होती. तिच्या चेहऱ्यावर सदैव विलासणार टवटवीत हास्य कुठल्या कुठे गायब झालय. तिच्या टपोऱ्या तांबूस झक असणाऱ्या डोळ्यातील स्वप्न चक्काचूर झाली होती. तिचे मऊ गुलाबी ओठ सततच्या चाव्याने काळपट पडलेत.... शी.... तिने आपला चेहरा तळव्यांमध्ये झाकला. तिला कधीच स्वतःला अस बघायची इच्छा नव्हती. निदान नव्या नवरीचे नवलाईचे दिवस असताना दिवसेंदिवस उमलायच सोडून तिच्या तारुण्याची पानगळ चालू होती... आरश्याकडे पाठ फिरवत तिने तसच स्वतःला कालच्याच चोळामोळा झालेल्या बेडवर झोकून दिलं... हेच आयुष्य पाहिजे होत का..?.. लग्नानंतर केवळ वासनापूर्तीच साधन तेवढीच एका बाईची ओळख उरते का..?.. आणि भले तेवढीच ओळख असुदे पण निदान माणुसकी तरी अपेक्षित असतेच ना... बऱ्याच उलटसुलट विचारांत ती गुरफटून गेली... अचानक तिला आठवण झाली त्याची.... तिच्या नजरेसमोर तीच पूर्वायुष्य येताच ती थबकली... तिच्या आठवणीच्या ठेवीतल्या सर्वात मधुर आठवणी होत्या त्या... एखाद्या तरुणीने तारुण्यात प्रवेशताच ज्या गोष्टी केवळ स्वप्नात पाहत समाधान मानावे ते अविट गोडीचे सुख तर तिने आधीच चाखले होते.. तो हलकासा शहारे आणणारा स्पर्श.. ते श्वासात गुंफत जाणारे श्वास.. ती अंगातून लहरणारी बिजली... डोळ्यांना न दिसणाऱ्या त्या शक्तीने तिला सर्व काही दिलं होत... तिच्या तारुण्याचे क्षण न क्षण फुलवले होते. तिच्या शरीराच्या गंधातून ते क्षण दरवळले होते.परंतु तिला सुखावणारी ती शक्ती अमानवी होती म्हणून गुरुजींच्या तंत्रमंत्रच्या शक्तीने तिच्यावर विजय मिळवला होता... तिने ओठ कोपऱ्यात वाकडे केले... म्हणे अमानवी शक्ती वाईट असतात... तिला गुरुजींचा रागच आला होता. हा माणूस येऊन बघा जरा ज्याच्यासोबत लग्नाच्या दावणीला बांधलंय... अस पशूसारखं वागवतो.. त्यापेक्षा ती अदृश्य शक्तीच चांगली होती...

आज ती खूपच रागात होती. तिला स्वतःच्या अश्या आयुष्याचा राग येत होता. अस तीळ तीळ तुटत जाण्यापेक्षा मरून गेलेल्या चांगलं. तिने आपला डावा हात चाचपडला. मनगटावर तीन वेढ्याचा लाल रंगाचा दोरा होता. त्या पूजेनंतर काही काळासाठी संरक्षण म्हणून गुरुजींनी मंतरलेला धागा तिच्या हातात बांधला होता. परंतु त्या धाग्याकडे पाहून तिच्या जुन्या आठवणी रोजच ताज्या होत.. त्या शक्तीला विसरण्याऐवजी तिच्या आठवणीत ती बऱ्याचदा स्वतःलाच विसरून जाई.. आता अजुन नाही... स्वतःच्या शरीराचा असा छळ तिला अमान्य होता.. तीच घाटदार, सोनेरी झळाळी असलेलं शरीर, ज्याची कोणालाही भुरळ पडावी.... परंतु ते ज्याला लाभलं त्याने धसमुसळेपणाने केवळ वापरावं.. त्या शरीराच्या काही इच्छा असतीलच ना.. त्या तर कित्येक महिने अपूर्णच आहेत... हव्याहव्याशा स्पर्शासाठी ते कधीपासून तडफडतय... तिने पुन्हा उसासा सोडला. तिच्या गरम श्वासाला जोर चढला. काहीतरी ठरवून तिने हातातील दोऱ्याची गाठ खेचली.. अचानक खिडकीची काच वाजल्यासारखी वाटली... तिची खोली थोडीशी अंधारली गेली... एक थंडगार वाऱ्याची झुळूक हळूच तिच्या गालाला स्पर्शून गेली... हे बदल तिच्या ओळखीचे होते.. मिटलेल्या तिच्या ओठांवर किंचित हास्य पसरल.. ती एकेक वेढा सोडवत होती.. आणि तिच्याभोवती थंडगार धुक जमत होत.... तेवढ्याशा थंडीने छोट्याश्या टॉवेलमध्ये कसबस गुंडाळलेला तिचा देह थरथरला... सुटलेला धागा एव्हाना काळा पडला होता... जळल्यासारखा.... तिने तसाच त्याला कोपऱ्यात फेकून दिला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू अजुनच रुंदावल.. एक जुना परिचित गंध पुन्हा दरवळला... ती सुखावली. तिच्या आतील जाणीवा पुन्हा एकदा बधीर झाल्या. थंडीने गारठून थरथरणाऱ्या तिच्या शरीराला प्रेमाची ऊब हवी होती. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले... तिला ते सगळे क्षण पुन्हा अनुभवायचे होते... त्याच्या स्पर्शाला तिच्या तहानलेल्या शरीराने साद दिली.... त्यांच्यातील टॉवेलचा अडसर कधीच गळून पडला होता. हलक्या मोरपिसासारखा एक स्पर्श तिला अंगभर जाणवत होता. त्याच्या स्पर्शाने तीच यौवन सुखावत होत. अंगभर सुखाचे झरे पाझरू लागले होते. आपल्या अनावृत्त देहाला गोंजारत ती पुन्हा पुन्हा तीच धुंदी अनुभवू लागली.

------------------------------------------------------------------------

" हे भगवन..." त्याने खाडकन डोळे उघडले. पद्मासनात असलेलं त्याच बळकट शरीर थरथरू लागल. अचानक समाधी भंग झाल्याने त्याला किंचितशी भोवळ आली. एका हाताने आधार घेत तो मृगजिनावर लवंडला. आता त्याने जे पाहिले होते ते त्याच्या कल्पनेपलीकडे होते. आताच्या काळात अस काही घडेल ह्याची त्याला अपेक्षाच नव्हती... आजकाल माणसचं जास्त भयानक असतात ना..

ओम त्याच नाव.. कला शाखेचा विद्यार्थी आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक चित्रे रेखाटण्याचा असलेला छंद म्हणून बराच भारत त्याने पिंजून काढला होता.... मागे अशाच कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एखाद्या नवीन विषयाच्या शोधात त्याने कोण्या नव्या गावाची वाट पकडली होती. सोसायटीतील एका आजोबांनी आपल्या बालपणीच्या आजोळच्या गप्पा सांगताना एका गावाच्या संस्कृतीचा उल्लेख केला आणि बाजूनेच घरी जायच्या धांदलीत धावणाऱ्या ओमचे कान टवकारले गेले. गावाचं नाव समजायचा अवकाश... ओमच तर जायचं प्लॅनिंग तयार असत. आई वडिलांच्या हो-नाचा प्रश्नच नव्हता. त्यांना तो प्रश्न विचारण्याएवढा वेळही कधी दिला नाही त्याने. प्रवास चालू झाल्यावर अमुक ठिकाणी जातोय एवढीच सांगायची काय ती तसदी घ्यायचा.. बास्स... तेव्हाही तेच केलं होत त्याने. फरक इतकाच होता की तो अशा एका गावात येऊन पोचला होता की ज्याचं नावसुद्धा गुगल मॅप वर नव्हत. खूप धाडसाने केलेल्या ह्या प्रवासात त्याला नुसती त्या गावाची संस्कृतीच नाही समजली तर त्यावर आधारित चित्राने त्याला कलेच्या दुनियेत वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्या प्रवासादरम्यान एक अशी चमत्कारिक गोष्ट घडली की कोणा भल्या पुरुषाच्या हातून दैवी उपासनेची दीक्षाही मिळाली. हे सगळं इतकं वेगात घडल की त्याला त्यावर विचार करायची साधी उसंतही मिळाली नव्हती. दीक्षादानाच्या नियमाप्रमाणे त्याला रोज काही वेळ ध्यान करणं आवश्यक होत. दैवी शक्ती बाळगण्यासाठी शरीरासोबत मनही मजबूत लागत. मोह, माया आणि सगळ्या विकारांपासून दूर राहण्यासाठी मनावर संतुलन ठेवण तर अत्यावश्यक असत. आणि मनाची चंचलता केवळ एकाग्र ध्यान दूर करू शकत. त्याच्या साधनेला पूरक ह्या उद्देशाने त्याला हे खास मृगजिन आशीर्वाद म्हणून देण्यात आल होत. काहीतरी वेगळं करून बघुया म्हणून त्यानेही मजेतच दीक्षा घेतली होती. हे ध्यान साधना केवळ मनशांती पलीकडे अजुन काही उपयोगाची नाही अस त्याच ठाम मत होत. पण तरीही योगा म्हणून आपल्या दिवसातील एक तास तो ह्या साधनेला देई.

परंतु आज त्याला काहीतरी जाणवलं. नजरेआड काहीतरी भयानक घडतंय व ते सत्य असू शकत ह्या विचारानेच त्याचा थरकाप उडाला. दीक्षा देतेवेळी गुरुजींचे शब्द त्यावेळी नीटसे लक्षात आले नव्हते. पण त्याचे मनपटलावर उमटलेले ठसे त्याला आठवण करू द्यायला पुरेसे होते. काहीतरी विचित्र शब्दांची गुंफण करून एक बिजमंत्र उच्चारला होता जे शब्द त्याने कदाचित कधीच ऐकले नव्हते. दीक्षादानानंतर त्याच्या मनात बऱ्याच प्रश्नांनी गोंधळ माजवला होता. त्याला सगळ्याची उत्तरं हवी होती परंतु ' योग्य वेळी सगळ ज्ञात होईल ' बोलून गुरुजी कुठे गायब झाले त्याला समजलच नाही. तेव्हापासून आजपर्यंत तो नित्यनियमाने साधना करत होता. दर दिवशी साधनेनंतर त्याला काही ना काही आवर्तने जाणवत. कसल्याशा अलौकिक शक्तीची अनुभूती होई आणि त्याच मन प्रसन्नतेने भरून जाई.

आजच्या साधनेनंतर झालेल्या जाणीवा मात्र अशुभाची चाहूल देत होत्या. त्याला कोणाचीतरी चाहूल लागली होती. धुक्यामध्ये अस्पष्ट वेडावाकडा दिसणारा आकार... जो पसरत पसरत सगळीकडे कब्जा करू पाहत होता... त्याच्या छायेखाली आलेलं सगळच क्षणार्धात उद्ध्वस्त होऊन जात होत... त्या आकाराला ना चेहरा होता ना शरीर... होता तो केवळ धुक्याचा आभास...

-----------------------------------------------------------------------