Tree knows Real Truth books and stories free download online pdf in Marathi

झाड आहे साक्षीला

अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे वाटे ठरलेलें असायचे, अगदी वरच्यापासून खालच्यापर्यंत. त्या रस्त्यावरच्या काळवंडलेल्या धूरात नुसता पैसा दिसायचा त्याला, कामावरुन सुटटी अशी कधी घेतलीच नाही, सतत आपलं ट्रॉफिक, अपघात, रस्ते, हप्ते, जमवलेले पैसे, त्यांचे हिशोब, जमीन-जुमला, पैसा, व्हवहार यातचं डोकं आणि मन गुतंलेलं. कुंटूबासाठी तो पार ‘वाल्या’ कोळीच होता. माया, वेळ, आपुलकी, जिव्हाळा यांसाठीची जी काही म्हणून गुंतवणूक करायची असते ती त्यांने कधी केलीच नाही, रोज सकाळी उठून कामाला जाणं आणि रात्री उशीरा येणे एवढचं जगणं त्यांच्या घरच्यांच्या वाटयाला यायचं, पैशानेच फॅमिली खूश राहते असं मानायचा. कामावरची कुठलीच हकीगत घरी सांगायाचीचं नाही, अशी जणू शपथ घेतल्यासारखा, आणि तरीदेखील कधी काळी सांगितलं तर एखादं दुसरीच…. फारच जुजबी गोष्ट बायकोला सांगायचा. पण बायको ध्यानात धरुन होती की इतक्या पगारात दर सणवाराला दागिने, चैनीच्या वस्तू, नवनवीन लेटेस्ट मॉडेलच्या फ्रीज, वॉशिग मशीन, टीव्ही येणं शक्य नाही, ती या बाजारी दुनियेत वावरली नव्हती पण दुनिया समजत जरुर होती, पगार तिच्याच हाती जाई पण ही एवढी कमाई कुठून कशी आली असं तिने कधी विचारलं नाही, मुकाटयाने संसार करत आली, नातेवाईक, माहेर हा निव्वळ सण आणि लग्ना-समारंभापुरताच. याव्यक्तिरिक्त आणखी असलेल्या वरकमाईचा खरा आकडा तिला कधीच कळला नाही, रामनाथने बायकोला दिलेल्या सरकारी पगारानंतर उरलेल्या वरकमाईत ठाण्याला दोन फ्लॅट अगदी मोक्याच्या जागी असलेल्या पॉश एरियात घेतलेयत, त्यापैकी एक फ्लॅट भाडयाने लावला होता. तो आणि फ्लॅटचा व्हवहार करणारे सोडले तर इंतराना काही यांची खबर नाही. रामनाथला वाटे सगळ्या बायका ‘या हलक्या’ कानाच्या असतात त्यांना काही सांगितलं की मग ते गुपित राहत नाही. आणि त्यांला अजून एक भीती होती जर का कामावर कधीतरी ‘कुणाचं’ ’काहीतरी’ बिनसलं साधारणत जे वरती टॉपला बसले होते त्यांच्यापैकी ’कुणाचं’ तर, हया वरकमाईच्या पैशातून आलेल्या प्रॉपर्टीचं लफडं बाहेर पडेल. कारण त्यांला माहित होतं असं काही झालं की मग आपला हिस्सा घेण्यासाठी माणसाला माणूस न मानारी ही जमात अशावेळी पहिलं टारगेट फॅमिलीला करते, रामनाथला एक मुलगा आणि एक मुलगी, एक सातवीला आणि एक नववीला शिकतोय. वरकमाईच्या हव्यासामुळे अविरत काम, आणि कामाच्या अश्या गुंतून घेण्यामुळे त्यांच्या शरीरांची मात्र प्रंचड हेळसांड झाली, सारखं तिथं उन्हा-तान्हात राहून सततचा गाडयांचा धूर फुप्फुसात जाऊन आतून शरीर गंजत चाललं होतं, अधूनमधून शरीर त्याचा सुगावा वेदनेच्या रुपात त्याला देत होतं. पण रामनाथ या सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत होता. तो हायवेच्या रस्त्याला पण कधी तोंडाला मास्क लावायचा नाही त्यामुळे छातीचा त्रास वाढत चाललायं. शेवटी व्हायचं तेच झालं रामनाथ हॉस्पिटलात एडमिट झाला आणि काय होणार सलग पंधरा दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती. त्याअगोदर काही दिवस निवडणुका आटपल्या होत्या महानगरपालिकेच्या. त्यावेळी काही गाडयामधून बेनामी पैशाचा साठा असलेल्या गाडया सापडल्या होत्या, संगळ कुरघोडीचं राजकारण होतं, त्यातं मिडीयाला सांगितलेली रक्कम अर्थातच कमी होती. रामनाथ आजारी पडला म्हणून तब्यतीची विचारपूस करण्यासाठी पाहुणी रावळी येऊन गेली हॉस्पिटलात आणि मग कोण बरं आलं, तर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर सुरेश रामकोडें रामनाथला भेटायला, पार फुंलाचा गुच्छ भेट म्हणून दिला…. तेव्हा तिथं कुणीच नव्हतं ना नातेवाईक आणि कुंटूबातलं कुणी, आणि त्या हॉस्पिटलचं त्या रामनाथवाल्या रुमचं दार लावलं गेलं. बंद दाराआड काही तरी गुफतगू झाली. काही वेळाने दार उघडलं, महापौर भडकलेले दिसत होते. रामनाथने त्यांना गंडवलं होतं…. सध्यातरी महापौर साहेबांचा विश्वास बसला होता पण रामनाथ काहीतरी लपवतोय हे त्यांना कळत होतं. काही तासापूर्वी सगळं काही आटोक्यात असणारी शारिरिक आणि मानसिक अवस्थतेतील एकूण शरीरीप्रकिया आता विस्कळीत झाली होती…… रामनाथचा ब्लडप्रेशर हाय झाला…… बायको बिचारी चिंतेत होती. अजून तरी रामनाथने धीर सोडला नव्हता. तो काही देखील बायकोला सांगणार नव्हता. त्याला विश्वास होता की असं काही तो लगेच जग सोडूंन जात नाहिय. डॉक्टर आहेत, औषध आहेत…. काही नाही होणारं…. पण आता नाईलाज होता. त्यानें लोकशाहीच्या निवडणुक प्रकियेदरम्यान एकटयानेच एक मस्त दिमाग चालवतं एक साधारण दहा लाखाच्या आसपासची सोय केली, स्वतःपुरती, थोडक्यात पैसे लंपास केले होते, पैसे त्यानें त्या वरकमाईच्या कमाईतून घेतलेल्या रिकामी फ्लॅटवर ठेवले होते. इकडे असं हॉस्पिटलमध्ये सलाईन लावून झोपलेल्या अवस्थेतेत असताना आता त्याला सतत वाटत होतं की नियमित व्यायाम करायला हवा होता, तोंडाभोवती ट्राफिक सिग्नलवर असताना मास्क घ्यायला हवं होतं, जास्त मासं, मच्छी, तेलकट, तूप खायला नको होतं. पण आता काय. तो स्वतः काही उठून तिकडे रिकाम्या फ्लॅटवर जाऊ शकत नव्हता. बायकोला सांगाव का खंर त्यांच्या मनात सारखं येतं होतं. साल्या या महापौराशी आता खोटं बोललो की मिडियाला सांगितले तेवढेच पैसे सापडले गाडीत, परत यांने माणसं लावली तर बायकोच्या मागे. हे पोलिस काय गप्प बसणार नाय. उगाच भांडे फोंड व्हायची. काय करायचं. बाजूला चालू असलेल्या एसीच्या हवेमुळे त्यांचं दिमाग शांत व्हायच्या ऐवजी तापत होतं, डाराडूर घाम फुटत होता, तिथलें डॉक्टर पण थकले नेमकं काय औषध दयायचं ते त्यांना पण कळत नव्हतं.

==============================

पोलीसचं ते…….. आपलं काम करणारचं……..

==============================

त्या रिकामी फ्लॅटच्या बाहेरच्या दरवाज्यापाशी एका कुंडीत ती वनस्पती लावलेली होती. जेव्हा केव्हा रामनाथ तिथं यायचां त्या झाडाला पानी जरुर घालायचा. सूर्यप्रकाशाची कमी गरज असलेल्या झुडपांच्या कुंडयाची साध्या बाजारात खूप चलती आहे. मोठमोठाल्या घरातून आजकाल शोभेसाठी आणि इकोफ्रेडली टच येण्यासाठी यांचा वापर करतात. मस्त छान दिसतात, घरालगत एक झाड असल्याचा शौक होतो आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा फील येतो. चांगल आहे. तिथं त्या इमारतीत पाय-याने कोणी चालत येत नाही सगळेच जण येण्याजाण्यासाठी उदवाहकाचा वापर करतात, ते साधन फारच सोयीस्कर होतं.

==============================

आता परिस्थिती सुधरत होती, येत्या दोन-तीन दिवसात तो हॉस्पिटलातून बाहेर येणारं होता, आता इतक्या वर्षाच्या अनुभव असूनदेखील रामनाथची अशी कुणीही खास अशी जरुर विश्वासातील माणसंचं नव्हती….

==============================

बाकी की कुणी काही ही लॉजिक देवो…… खूनी शोधायचा प्रयत्न करो…. त्या मुक्या वनस्पतीला सगळं काही माहिती पडलंय, ते एकमेव झाडं सजीव असूनदेखील साक्ष देण्यास असमर्थ होतं. ते जे सत्य त्या झाडापाशी होतं ते खरचं आजूबाजूच्या लोंकाना पेलवणारं होत का याबदल जास्तीच शंका आहे.

==============================

रामनाथचा मृत्यु झाला, अपघातात, हायवेपासून संमातर सर्विस रोडच्या बाजूला भरधाव वेगाने येणा-या वाहनाने त्याला उडवलं, त्या रस्त्याला कोणताही सीसीटीव्ही फुटेज नाही, काही लोकांनी हॉस्पिटलला नेलं पण त्याअगोदरच जीव गेला होता. बिचारी ती विधवा झाली, पोरं बाळाची अजून शिक्षण बाकी आहेत.

==============================

पोलीसांनी तो रिकामा फ्लॅट गाठला, दरवाज्याचं लॉकही तोडलं, ती दहा लांखाची रोकड सापडली, महापौर साहेबांना फोन गेला, पोलिस आदेश मानन्यात तत्पर होते, ते पैसे परत वापस दुस-या एका येणा-या निवडणुकीसाठी लागू करण्यासाठीचा आदेश होता, शिवाय रामनाथबाबत काही खास मत सांगितली गेली. आजूबाजूला त्या इमारतीत कुणी बाजूच्या रुममध्ये काही करतय यांचा पत्ता नसायचा, तेव्हा ही सामसूम होतं, रामनाथ रिकाम्या फ्लॅटपाशी आला आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे दरवाजा उघडा होता, तो घाबरला, आतून अंधार होता जसा लाईट लावला, त्यांच्या काळजात चरर झाली, पोलीस होते, महापौर होते.

==============================

त्या तिथल्या कुंडीतल्या वनस्पतीला आज पहिल्यांदा फ्लॅटच्या आतमध्ये येण्यांचा मोका मिळाला, कुणीतरी जोरात कुंडी उचली आणि टाकली कुणाच्यातरी डोक्यात. सतत खूपवेळ हे चालू राहिलं. त्या फिकट पिवळ्या रंगाच्या कुंडीवर आता रक्ताचे मोठमोठाले डाग दिसून येत होते. रोज वनस्पतीला पाणी घालणारा आज पाण्यासाठी तडफडत होता. शेवटची सीमा पार झाली रामनाथ दिंगतरास पोचला. सगळे दाराबाहेर आले, कुंडी जागच्याजागी ठेवली गेली. काहीतरी गोणीत भरुन नेलं. त्या वनस्पतीसाठी भयानक अनुभव होता. त्या कुंडीतल्या झाडालासुदधा आता गाडीत टाकलं.

==============================

रामनाथच्या बायकोने आपल्या नवराच्या अपघाती मरणाला जबाबदार असलेल्या त्या भरधाव गाडी चालवणा-या चालकास कधी कधी सुख होणार नाही असा शाप दिला, ती बिचारी धायमोकलून रडत होती.

================================================================

गोष्ट समाप्त पंरतु…..

==============================

काही वर्षानंतर….. तेच महापौर सध्याच्या सरकारमध्ये रस्ते वाहतुक हायवेचे मंत्री आहेत, रामनाथच्या बायकोला अनुकंपातत्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी कोसोशीने प्रयत्न झाले पण पुढे काही झालं नाही, सध्या त्यांची फॅमिली पेंशनवर गुजराण होतेय. त्या दोन्ही फ्लॅटपैकी एक पक्षबांधणीसाठी तडीपार गुंडासाठी वापरलं जात तर दुस-यामध्ये पक्षाच्या खाजगी बैठका होतात. तो भरधाव गाडी चालवणारा चालक सुटला सहा महिन्यानंतर बेलवर. त्या वनस्पतीचं आता मोठं झाड झालयं त्यांची मूळ पार जमिनीत गढून गेलीयत. ती वनस्पती रामनाथ यांच्या शहराबाहेरच्या फार्म हाऊसच्या बागेत लावलीयं…

==============================

ती हतबल आहे, ती कुणाला कोणत्या तोंडाने सांगणार की तिच्या नव-याने वरकमाईतून फ्लॅट कमवलायं, तीला जागा माहिती होती, ती एक-दोनदा त्या फ्लॅटपाशी जाऊन आली, तिथं कुणीतरी माणसं अगोदरपासून होती, तीचा धीर झाला नाही आतमध्ये जात विचारपूस करायची. काही गोष्टी कळत होत्या. काही कळत नव्हत्या. रामनाथने हास्पिटलमध्ये असताना महापौर गेल्यावर सगळ्या फ्लॅटबदलच्या गोष्टी बायकोला सांगितल्या आणि तो डिस्चार्ज मिळाल्यावर ताबडतोब फ्लॅटच्या दिशाने निघाला.

==============================

=========== विचार करण्यासाठी गोष्ट सुरु झाली ============

-लेखनवाला