nate bharale premache - 3 in Marathi Love Stories by Reshma N books and stories PDF | नाते बहरले प्रेमाचे - 3

नाते बहरले प्रेमाचे - 3


विक्रांतने आरोहीला रुममध्ये आणलं.. आणि व्यवस्थित तिला बेड वर ठेवलं.. तिला त्याने गळ्याला हात लावून चेक केलं तेव्हा त्याला चटका लागल्यासारखा तिचा आंग गरम वाटला खुप तापाने फनफनली होती आरोही..

काजल डॉ मिसेस पाटील यांचा नंबर दे मला लवकर.. " विक्रांत ने काजल कडून डॉ पाटील यांचा नंबर घेऊन त्यांना फोन लावला..

डॉ यायला वेळ होता म्हणून त्याने तिच्या कपाळावर लागलेली जखम स्वच्छ काॅटनने साफ करून त्यावर Ointment लावून त्यावर पट्टी लावली..

काही वेळातच डॉ पाटील आल्या त्यांनी आल्यावर आधी आरोही ला चेक केलं..

काय झालं आरोहीला डॉ मिसेस पाटील ? ... " आईसाहेब काळजीने बोलल्या

यांना आताच Admit करावं लागेल.. खुपच अशक्तपणा आहे आणि ताप पण खुप आहे.. . " डॉ पाटील

आणि तुम्ही घरीच अॅडमीत करु शकता.. डॉ पाटील आईसाहेब यांना बोलल्या.. आणि ह्या आहेत कोण .. " डॉ पाटील आरोही कडे बोट दाखवून बोलल्या

ही विक्रांतची बायको आहे.. आणि लग्नाला आठ दिवस झाले ... " आईसाहेब त्या डॉ पाटील यांना सांगत होत्या कारण डॉ पाटील ह्या सोरते परिवाराच्या जुने आणि फॅमिली डॉक्टर होत्या

हम्मम तर असं आहे.. म्हणूनच आरोही ला असं होतय.... " डॉ पाटील बोलल्या

म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला.... " विक्रांत मोठ्या आवाजात बोलला

तेच जे लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीसोबत होते... म्हणजे नविन असतात तर त्यांना तिथे adjust व्हायला थोडा वेळ लागतो ना मी हे म्हणत होते.. तुला काय वाटलं विक्रांत ? ... " डॉ मिसेस पाटील हसून😂 बोलल्या

काय कुठे काय❓ मला काहीच वाटलं नाही.. " विक्रांत


मग डॉ मिसेस पाटील ह्यांनी आरोही ला सलाईन लावली.. मला वाटते तुम्ही सर्वांनी बाहेर जायला हवं.. मग सर्व बाहेर गेले.. पण विक्रांत तिथेच होता..

रात्री पण झोपतांनी विक्रांतने आरोहीला ताप आहे का चेक केलं नंतर आणि बाहेर गेला ... थोड्या वेळाने परत आला तर ओरडलाच..

नर्स..😡 .. तुमचं लक्ष कुठे आहे.. आरोही ला लावलेली सलाईन संपली आणि तुम्ही छान झोपा काढत आहात.. How careless you are 😡.. " विक्रांत त्या नर्स वर ओरडून बोलला..

नर्स पण बिचारी घाबरलीच.. तिने पण मग आधी लावलेली सलाईन काढून दुसरी लावली.. आणि तिथेच आरोही च्या बाजुला बसली..

Do you need an invitation to go out ❓... " विक्रांत त्या नर्स ला रोखून पाहत बोलला.. ती नर्स पण तिथून सटकलीच...


त्याने आणखी एकदा तिला ताप आहे का चेक केलं आणि.. तिथेच बाजूला सोफा होता तिथेच झोपला..

सकाळी आरोही उठली तरी तिला खुप चक्कर सारखं वाटत होतं.. तरी ती बेड वरच पडून होती... विक्रांत तर सकाळी आधी उठतो आणि जिम💪 त्याचं नेहमी सकाळची सुरवात जिमनेच व्हायची..

आरोही उठत होती तर भाग्यश्री आली..

ताई मला बाथ घ्यायचं आहे.. माझे कपडे द्याना त्या बॅग मधूउ..माझी मदत करा ना.. " आरोही
अगं त्यात इतकं काय.. मग भाग्यश्री ने कपडे काढले.. आरोहीने बाथ घेतला कसं तरी तिला साधं उभ पण राहून होतं नव्हतं तरीही तिने बाथ घेऊन रेडी झाली.. भाग्यश्री ने तिचे केस व्यवस्थित करून ती पण निघाली..

विक्रांत रुममध्ये आला तेव्हा आरोही लेटूनच होती.. त्याने तिच्या कडे पाहिलं आणि मनात. ..

माझ्या मुळे आहे का असं.. तिचा चेहरा कीती निस्तेज झालाय ुओठ तर पार सुकून पांढरे पडले आहे.. " विक्रांत बोलून बाथ घ्यायला गेला.. आणि बाहेर आला तर आरोही उठून फोन घ्यायचं प्रयत्न करत होती .. तिच्या अंगात त्रान नव्हत काही.. नाही बरोबर झोप आणि जेवनाकडे पण दुर्लक्ष.. आरोही पडणार त्या आधीच ती विक्रांत च्या मिठीत गेली.. तिचा लक्ष गेला त्याच्या कडे.. नुकताच आंघोळ करून आला होता आणि फक्त टाॅवेल वर होता.. त्यात त्याचे उठून दिसणारे सिक्स पॅक ओल्या केसांचा पाणी त्याचा बाॅडीवर ठिबकत होता.. त्यात तो खुपच सेक्सी दिसत होता.. आरोहीची नजर पण काही केल्या हटत नव्हती.. तिला उगाच ऋदयात तिचा हार्ट जोरजोरात उड्या मारत होता... असं आरोहीला वाटून गेली..

तुला काही लागलं तर सांगु शकते ना.. की तुला बोलायला जड जाते.. " विक्रांत चिडून पण थोडा काळजी ने बोलला आणि तिला बेड पर्यंत जायला मदत केली..

मग विक्रांत पत ऑफ़िसला जायला रेडी झाला.. म्हणजे होत होता..


आंटी मी येऊ का आत.. " समीर

मी नाही ओळखलं तुला.. आपण ओळखता का ❓आम्हाला.. " आईसाहेब

नाही तुम्ही नाही ओळखत मला पण मी ओळखतोय..आपल्याला... " समीर

बरं सांगाल आता... "

मी आरोहीचा फ्रेंड आहे समीर गोखले. ...

अच्छा म्हणजे तु आहेस आरोहीचा फेवरेट भोपळा.. 😀😂😂 मला सांगितल आरोहीने तुझ्या बद्दल.. चल ये आणि बस..

म्हणजे आंटी तुम्हाला पण सांगितल तिने.." समीर

हो मग मी पण तिचीच मैत्रीण आहे मग ती मला सांगणारच ना.. हो की नाही.. " आईसाहेब

हो आंटी पण आहेत कुठे मॅडम ? .. " समीर

अरे मी विसरलीच.. तु जा तिच्या रुममध्ये आणि स्वत बघ.. " आईसाहेब

मग समीरला तिथल्या एका स्टाफने... विक्रंतची रुम दाखवली..

विक्रांत स्टडी रूममध्ये गेला होता त्यामुळे काही प्राॅब्लेम नव्हतीच.. .

आरोही बेड वर बसून बुक्स रिड करत होती..

हाय आरो.. " समीर आरोही ला आरो बोलायचा..

ओ माय गॉड.. भोपळा कसा काय आला.. " आरोही

🙃😶😖 आरोही मार खाशील.. " समीर

आणी हे काय झालं तुला तु ना आरो आधी पासूनच केयरलेस् आहेस..." समीर काळजीने बोलला आणि आरोही ला मिठी मारली.. आणि नेमकं त्याच वेळी विक्रांत रुममध्ये आला.. पण काही न बोलता चार्जिग ला लावलेला फोन घेतला आणि गेला..

यार कीती रूड आहे हा तुझा नवरा.. आणि तु कशी राहते याच्या रुममध्ये.. " समीर

तुझं काम कर ना तु.. " आरोही

चल जाऊदे आणि हे घे 🍲सूप पी... . " समीर आरोही सामोरं सूपचा बाउल पकडत बोलला..

तुला माहिती आहे.. मला नाही आवडत सूप.. तरीसुद्धा मी का पिउ.. मी नाही पिणार.. " आरोही लहान मुलांसारखी हट्ट करत बोलली..

मला नाही काही प्राॅब्लेम.. पण तुझ्या नवर्याला माहिती झालं ना.. त्या कुक ची पुर्ण वाट लावेल तो.. त्यानेच हे तुझ्या साठी करायला लावलं
. आणि तु पिणार नाही तर तो त्या कुक ला त्याच्या जाॅब वरुन काढून टाकेल.. मग आता तु कर डिसाईड.... " समीर

मग काय बिचारी आरोही हीने नाक तोंड वर करुन खाल्लं.. आणि समीर काय नवरा नवरा लावून ठेवलं आहे.. विक्रांत आहे त्यांच नाव.. " आरोही चिडून बोलली..

ओके आहे तर ना तुझा पतिदेव.. " समीर

समीर खुप वेळ पर्यंत तिथेच बसला होता.. थोड्याच वेळात नर्सने येऊन सलाईन काढली.. आणि ती वापस गेली ..

समीर पण थोडं विक्रांत च्या फॅमिली ला भेटून निघून गेला..

आरोही ला बोर होतं होत.. तीने आभाला फोन केला थोडा वेळ बोलून ती.. झोपी गेली ..

बेटा खरंच मनापासून तुझी माफी मागते.. माझ्या मुळे तुला ह्या लग्नाच्या बंधनात अडकवा लागलं.. पण विक्रांत पण चांगला आहे ग पण तो लग्ना सारख्या जबाबदारीत त्याला काही इंन्ट्रेस्ट नाही आहे..पण विक्रांत तरी कीती दिवस एकटा राहणार कोणीही असो बाई कींवा पुरुष यांना त्याचा लाईफ पार्टनर ची गरज असतेच.. एक नवरा किंवा बायकोच तर असते जे आपण त्यांच्या कडे हक्काने मन हलकं करु शकतो..त्यांच्या वर हक्क दाखवून त्यांच्या सुखात दुखात साथ देऊ शकतो... " आईसाहेब आरोही च्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून बोलल्या.. आरोही शांत झोपली होती पण आईसाहेब यांचा हात डोक्यावर आहे समजल्यावर आरोही चुळबुळ करत उठली..

आई तुम्ही केव्हा आलात आणि उठवलं का नाही मला.. " आरोही

तु ना चाची झोपली होती तेव्हा खुपच क्युट दिसत होती.. म्हणून तुला आजीने उठवलं नाही.. " आरुष

ओ माय गॉड माझा क्युटी पाय् तु केव्हा आला.. ये बस इथे.. " आरोही

मी आता आलो चाची. मी मगाशी पण आलो होतो पण तु झोपली होती.. " आरुष

आणि माझ्या कपाळावर ओल्या पाण्याचा पट्टया कोण ठेवल्या.. ? ... " आरोही

चाची तुला ताप आहे ना म्हणून मी माझी छोटी रूमाल ओली करून तुझ्या कपाळावर ठेवली.. " आरुष

आईसाहेब आरुष कडे कौतुकाने पाहत होत्या कारण आरुष वयाच्या मानाने खुप समजदार होता..

आरुष च्या गोष्टी ऐकून तर आरोही ला राहवलंच नाही आणि तिने आरुष ला मांडीवर घेऊन त्याच्या गालाच्या दोन तीन पप्पी घेतल्या..तो होताच तसा त्याचा लाड करणार नाही असं होणारच नाही..

थोडा वेळ बोलून आईसाहेब पण गेल्या..

**************************************


आरोहीने जेवन केलं आणि तिचा स्टडी करत बसली.. 10 वाजून गेले होते.. पण विक्रांत यायचा होता.. कारण त्याला पार्टी चं invitation होतं.. तो तिकडेच गेला होता..

रात्रीचे बारा वाजले होते.. विक्रांत आला तर खरं पण तो अस्वस्थ होऊन चालत होता.. आरोही जागीच होती पण ती त्याला काही बोलली नाही.. आरोही ला समजून गेलं की विक्रांतने ड्रिंक केली आहे.. पण तीला कसतरीच वाटतं होतं.. विक्रांत आरोही जवळ आला..

तब्येत कशी आहे तुझी.. " विक्रांत

बरी आहे.. " आरोही हळु आवाजात बोलली..

ओके.. त्याने कपाळावर आणि गळ्याला हात लावून ताप आहे का चेक केलं आणि बाजूला होत होता त्याची नजर तिच्या गुलाबीसर ओठांवर पडली..

हे अशे का पाहत आहेत माझ्या कडे.." आरोही मनात भितीने बोलली

तो हळूहळू तिच्या जवळ सरकला.. तिच्या ओठांवर ओठ ठेवणार त्या आधीच तो बाजूला झाला... आणी तिथून धाडकन उठून स्टडी रुममध्ये गेला..

आरोहीला तर कसं तरीच होत होतं.. तीला झोपच येत नव्हती.. तिला वाटलं नव्हतं विक्रांत असा वागेल..

स्टडी रुममध्ये गेल्यावर त्याने आपला हात तिथे असलेल्या काचेच्या टेबलावर जोरात आपटला.. हातातून रक्त पण येत होता..

अस कसं माझा स्वतवरचा कंन्ट्रोल जात होता.. शीट.. तिला काय वाटलं असेल.. माझीच चुकी होती ड्रिंक केल्यानंतर मला नको जायला पाहिजे होतं रूममध्ये.. मी काय करणार होतो.. Oh god.. काय करु मी ... Dammit 😡 ... " विक्रांत ला त्याच्या वागण्यावर स्वतःचा राग आला...

दुसर्या दिवशी ....


आरोहीने विक्रांत ला साफ इग्मोर केलं होतं.. तिला रात्री त्याचा रागच आला.. असा कसे वागु शकतात हे.. तिने ह्या गोष्टी कडे साफ दुर्लक्ष केलं आणि खाली गेली रेडी होऊन.. कारण तिला आजपासून काॅलेज ला जायचं होतं..क्रमशः

भाग वाचून सांगा कसा आहे तर 😊


Rate & Review

Vaishali Kamble

Vaishali Kamble 8 months ago

I M

I M 8 months ago

Dheeren

Dheeren 8 months ago

interesting 👌🏻

Dipali Bakale

Dipali Bakale 8 months ago