Dracula - 33 - Last part in Marathi Horror Stories by official jayesh zomate books and stories PDF | ड्रेक्युला - भाग 33 - अंत चाप्टर

ड्रेक्युला - भाग 33 - अंत चाप्टर

झोमटे क्रीएशन ⭐⭐⭐⭐⭐ स्टार स्टोरीज प्रस्तुत.

चाप्टर # 1



मराठीतली पाहिली वाहिली भयकादंबरी..


॥ ड्रेक्युला ॥ ...चाप्टर #1...अंत ...

भाग 33
धमाकेदार..आंतिम एपिसोड...


........ चाप्टर #1 अंत .....





" युवराज !" महाराजांनी प्रथमच आपल्या लेकाला युवराज म्हंणुन हाक मारली! महाराज युवराजांसमोर आले. मागे राहाजडची सेना उभी होती.महाराजांनी आपले दोन्ही हात युवराजांच्या खांद्यावर ठेवले व म्हणाले.
" आज ह्या युद्धात आम्ही जगु! की नाही "
" बाबाश्री काय बोलत आहात तुम्ही हे!" युवराज मध्येच म्हणाले महाराजांनी एक हात दाखवत त्यांना थांबवल ! बोलूद्या आम्हाला युवराज! " युवराज गप्प राहून ...
एकटक त्यांच्याकडे पाहत बसले.
" आज ह्या युद्धात आम्ही जगु की नाही! हे आम्हाला ठावुक नाही ,म्हंणुनच आमच्या मनातली एक गोष्ट सांगतो ! ..ऐका! इतकी वर्ष आमच्या मनात एक विचार यायचा! जर आम्हाला काही झाल तर राहाजगडच्या गादीवर कोण बसेल? ह्या राहाजगडच्या प्रजेकडे कोण लक्ष देईल?..
युवराज तुम्ही कधीच, आमच्या आवडीने वागला नाहीत! म्हंणुनक्ष आम्हाला वाटायचं..की तुम्ही , राहाजगडच्या गादीवर बसण्या लायकच नाही आहात! परंतु आज! आम्हाला आम्ही केलेले विचार चुकीचे होते ते कळाल.. आमच्या विचारांना -तुम्ही साफ खोट ठरवल आहे ! आणि आमच्या विचारांना खोट ठरवल्याचा आम्हाला विल्कूल पश्चाताप होत नाहीये ! उलट आमची छाती अशी गर्वाने फुगून आली आहे! आणि परमेश्वराची इच्छा असली,तर लवकरच युद्ध संपल्यावर तुमच विवाह त्या मुलीशी लावुन देईन! म्हंणजे राहाजगडच्या गादीवर तुम्हाला बसता येइल! " महाराजांनी आनंदाने पाणावलेल्या डोळ्यांनी,दोन्ही हात युवराजांन पुढे पसरले! तसे दोघा माय लेकांनी एकमेकांना कडकडुन मिठी मारली.

अस म्हंणतात ! कुछ अच्छा हो जाये तो मीठा तो बनता है !
पन माझ्या मते ..वाईट घडन्या अगोदर नेहमी चांगल होत असत !
आहे की नाही?
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
रघुबाबा X मायाविनी...
खास युद्ध..दोन अद्भूत शक्तिंचा..


राहाजगडच्या मसनाला चारही बाजुंनी भल मोठ कंपाउंड घातलेल दिसत होत..आणी मधोमध असलेला भलामोठ्ठा दोन झापांचा गेट अस्तव्यस्थपणे तुटलेला दिसत होता. त्या तूटलेल्या गेटच्या लोखंडातुन आताच काहीक्षणापुर्वी कोण्या जादूई शक्तिच्या वाराने तुटल्याप्रमाणे वाफा निघत होत्या. गेटपासुन पुढे लाल मातीचा खाली घेऊन जाणारा उतरणी सारखा रस्ता दिसत होता. त्यापुढे खाली लाल मातीच्या जमिनीवर असंख्य मातीच्या कबरी दिसुन येत होत्या.ज्या कबरींच्यात प्रेत अखंड निद्रेत.. झोपली होती. परंतु वाईट गोष्ट अशी, की मायाविनी ह्या सर्वांची झोप मोडायला आलेली-त्या सर्वांना..आपल्या झोपेतुन उठवायला आलेली. आणी जर तिच हेतु साध्य झाल तर राहाजगडच्या प्रजेच रक्त मांस -हि पिशाच्चवळ लुचनार होती! चारही दिशेना आकाशात हडकंप माजणार होता.आणि हे सर्वकाही मायाविनीच्या हाती होत.
दुर-दुर पर्यंत लाल मातीच्या कबरी दिसत होत्या. त्या कबरींवर मृतकाच्या नातेवाईकांना छोठ-मोठी झाड लावली होती. मसनात चौहीदिशेना मातीच्या कबरांवरुन पांढरट धुक खुळ्यासारख दात-विचकत फिरत होत. एक काला कपडा,त्या कपड्याला थोडस चिकटद्रव लागलेल..तो कपडा लाल मातीच्या कबरांवरुन हळू-हळू पुढे सरकतांना दिसत होता.त्या कपड्यावरुन पुढे पाहील्यास तो एका मानवी आकृतीच्या कपड्याचा भाग आहे अस दिसत होत.आणी ती काले कपडे घातलेली आकृती , मसनातल्या प्रत्येक कबरीजवळुन फिरत होती. त्या आकृतीच्या कपड्यांच वर्णन..! पुर्णत अंगावर एक काळा कपडा-त्या काळ्या कपड्यावर चिपचिपीत चिकटद्रव चिकटलेल..दिसत होत. दोन्ही खांद्यांवर डाव्या-उजव्या- बाजुला
कपड्यांवर टोस्कूले काचांचे तुकडे चिटकवलेले की उगवून आलेले माहीती नाही!परंतु आरशासारखे दिसणारे ते काटे, चंदेरी रंगाने चमकत होते.काळ्या कपड्यांना लागुन फुल बाह्या होत्या-त्या बाह्यांच्यातुन..
तिचे हाडकुळे पांढरट रक्त शोषल्यासारखे दोन हात बाहेर आलेले.तिच्या एका हातात एक वाकडी तिकडी सापासारखी काठी होती. जी की तो आकार चालताना जमिनीला टेकवत,ठक-ठक आवाज करत चालत होता.
" मायाविनी!" एक मोठा आवाज आला. त्या मसनात पसरलेल्या मसान शांततेत तो आवाज चौही दिशेना घुमला..त्या आवाजाने ती आकृती चालायची थांबली ! काठीचा ठक ठक आवाज थांबला .
त्या आकृतीने गर्रकन आपली मान मागे वलवली. सुरकुत्यांनी वेढलेला चेहरा, नपटा नाक, मोठाले कान-आण बारीकसे पातळ भुवयांचे पिवळे डोळे. ते डोळे रघुबाबांवर रागाने खिळले गेलेले.

" कोण हाई रं! आं.....?"

त्या किन्नरी आवाजने शेवटच्या (आं)शब्दावर जरा जास्तच जोर दिला .समोर एक जाडसर शरीराची ,खाली काळ धोतर , डोक्यावर टक्कल पडलेल्या डोक्याची,एक म्हातारी आकृती ऊभी होती.


" कोण हाई रे तु ढभ्बु! आंऽऽऽऽऽऽ? कोण हाई...?"
समोरुन प्रथम वाक्याला दुजोरा न मिळाल्याने मायाविनी खेकसत म्हणाली.

"म्या रघु! संमदी मले रघुबाबा म्हंणत्यात !" " रघुबाबा एकदोन पावळ चालुन तिच्या जवळ येऊ लागले! तिच्या स्ंपर्काने तिच्या जवळ येताच रघुबाबांच्या नाकांत उग्र अस दर्प गेला, त्यांना काहीसेकंद उबल आल्यासारख झाल..त्यानी आपली पाऊले लागलीच मागे वळवली.

" तु तोंच कां रे ढभ्बू ! त्यो कवच लावुन बसलेला! " मायावीन काहीवेळ थांबुन पुढे म्हणाली"ह्या गावालें मदत करणारा मसीहा! हिहिही...आं? हिहिही....आं? बोल-बोल बोल..?"


" व्हिई म्याच त्यो... ह्या गावास्नी मदत कराया आलोय!"


" ए ढब्बू! मदत गेली उडत! तुला तुझा जीव प्यारा नाय का?.आंऽऽऽऽऽ?"


" जिव तर प्यारा हाईच ! पन कस आहेना! एकदा का मी कोणत काम
घेतल नव्ह ! ते पुर केल्याशिवाय राहात नाय !"
रघुबाबा मंद स्मित हासले.
" अंस हाई काय! म्हंजी तु माह्यासंग युध्द करणार व्हिई? ! आं ऽऽऽ?" मायाविनीचे पिवळसर डोळे चमकले, व पाहिल्यांदाच तीचा जबडा वासला, व ती जोरजोरात (खिखिखिखी)हसतांना
तिचे ते कालसर दात त्यातुन निघणारा कालसर द्रव रघुबाबांना दिसला.

" हे हे हे! माह्यासंग युद्ध करणार हा ढबबु! " मायावती जोर जोराने हसु लागली.

" कधी-कधी दिसत नसत मायाविनी! " रघुबाबा मध्येच म्हणालें

" आर ए गप्प बैस! "
मायावतीचा किन्नरी आवाज चढला." कुणासमोर उभ राहुन बोलतोयस मायीतीये का तुला ,आं ऽऽऽऽ? जीव प्यारा असल तर गपगुमान, निघ इथून! नायतर तुला जालाया हाड बी भेटणार न्हाईत!"

मायावती अस म्हंणतच पुढे चालु लागली. रघुबाबाही हळुच माघारी वळले ! मायाविनीला हे कळताच तिचे काळसर दात बाहेर आले ! ती पुन्हा खुद्दकन हसली. रघुबाबा गेटजवळ आले , समोर दोन झापांच गेट तुटून पडल होत. त्यांनी आपल्या हातातली दंड गोल काठी हळुच त्या तुटलेल्या गेट पुढे केली. एक चमचमता गोल प्रकाश त्या काठीच्या
दांड्यावर स्फटीकासारखा तीन सेकंदासाठी चमकला ! जणु उर्जासाठवली असावी! आणि पुढच्याक्षणाला त्या दंडगोल काठीतुन एक सोनेरी रंगाचा मायावी शक्तिचा उद्रेक बाहेर पडला.एक सोनेरी रंगाची जाडसर रेष त्या गेटच्या लोख्ंडावर स्पर्शली गेली! ते गेट त्या मायावी शक्तिने बिना आधाराशिवाय श्वास मिळणा-या मानवासारख तडफदु लागल! त्या लोखंडाच (तड,तड,त्तड) आवाज होऊ लागल.
कंपणे निर्माण होऊ लागली. पुढे जे घडल अविश्वासणीय होत.
तो निर्जीव गेट बिना सजीव आधाराशिवाय हवेत उभा राहीला ! ..
त्याचा आघाती भाग ठिक झाला, हुक, नट जे काही होत ते पाहिल्यासारख फिट झाल, आणि तो गेट पुन्हा एकदा वापरण्या लायक झाला! रघुबाबांनी हलकेच आतली कडी लावली! आणि पुन्हा एकदा चढण उतरुन खाली मसनात आले.

XXXXXXXXXXXXXXXXXX

" युवराज !" महाराजांनी मीठी सोडली, डोळे पुसले
" आम्ही काय सांगतो ते निट ऐका?" युवराजांनी होकारार्थी मान हलवली.
" इश्वराच्या कृपेने आपल्याकडे, तीनशे सैनिक आहेत! आणि बाकीच्या सैनिकांना वीरमरण आल आहे ! " महाराज काळजावर दगड ठेऊन म्हणाले.
" आता दोनशे सैनिक घेऊन तुम्ही राहाजगडच्या दिशेने जा ! रघुबाबांनी युवराज्ञी बदल आम्हाला सर्वकाही सांगितल आहे! तिची रक्षा करायला हवी ! काहीही झाल तरी माझ्या लेकीला त्या सैतानाच्या हाती लागु देऊ नका ! " महाराज ..
"बाबाश्री ! विश्वास ठेवा आमच्यावर! आम्ही जो पर्यंत जिवंत आहोत ..
तो पर्यंत आमच्या रुपाच्या केसालाही त्या सैतानाच धक्का लागु देणार नाही!"
" आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती! युवराज! !आता तुम्ही घाई करा ! दोनशे सैनिकांना घेऊन राझगड महाल गाठा!"
" जी बाबाश्री ! " बाजुलाच महाराजांचा घोडा घेऊन एक सैनिक उभा होता." चला कोंडूबा!" महाराज गर्रकन वळत त्या सैनिकाकडे पाहत म्हंणाले! कोंडूबाच नेहमी महाराजांचा घोडा घेऊन तैयार रहायचे ! व आज सुद्धा नेहमीप्रमाणे महाराजांच्या मुखातुन आवाज निघालाच.परंतु कोंडूबा, तर आता कालाच्या पडद्याआड विलीन झालेले. हे जेव्हा महाराजांना समजलं, नुकतीच त्यांची नजर त्या पांढरट कपड्या कडे गेली. महाराज हळुच आपल्या घोड्यावर बसले- बाकीच्याही वीस एकवीस सैनिकांसाठी घोडे होते तर बाकीचे धावत मागे येणार होते.
महाराज तिथून आपले शंभर सैन्य घेऊन निघुन गेले. घोड्याच्या पावलांच (तबडक,तबडक) आवाज हळू-हळू कमी होत गेला.
" चला सैनिकहो ! राझगड गाठूयात!"
यूवराजांचा आवाज...

XXXXXXXXXXXXXXXXXXX


" मायाविनीच्या हाती असलेल्या त्या सर्पासारख्या वाकड्या तिकड्या काठीमार्फत , तीने मसनामधोमध लालमातीवर एक वर्तुळ काढलेला,आणि त्या वर्तुळात एक चांदणी सुद्धा काढलेली.
मायविनीने वर आकाशात पाहील!
" प्रकाश निर्बंध!" किन्नरी आवाजात ती इतकेच म्हणाली.
तिने आपल्या डोळ्यांची हालचाल केली पिवळे डोळे वर जाऊन बुभळांचा रंग पांढरट झाला, कालपट लाल तोंडातुन बाहेर येऊन विचीत्र असमंज कारक मंत्र बाहेर पडू लागले. त्या मंत्राच्या उच्चाराने वरचा
प्रकाशमय आकाश , लाईटचा दिवा उडाल्यावर जशी लाईट डीम व्हावी तसा आकाशातला प्रकाश काजळीफासल्या सारखा कमी होऊ लागला.
" ए माया! थांबीव हे ?" रघुबाबा मायाविनीच्या मागे येऊन थांबलेले , त्यांनी खड्या आवाजाने मायाविनीला आदेश दिला हे सर्व थांबवण्यासाठी परंतु मायाविनीच्या मुखातले मंत्र काही थांबले नाहीत! उलट त्यांचा उच्चार वाढला.
" ए माया ! थांबीव हे म्हंटल ना?" रघुबाबा पुन्हा मोठ्याने बोलले.
परंतु तिच्या मुखातुन निघणारा आवाज बाबांच्या प्रत्येक वाक्यासरशी कमी होण्या ऐवजी वाढतच चाललेला.
" ही बया अशी ऐकणार नाय!" बाबा स्व्त:शीच म्हंणाले.त्यांनी हातातील दंडगोल काठी कडे पाहिल." आता जे व्हील ते व्हील!" त्या दंडगोल काठीचा पुढचा भाग रघुबाबानी हळकेच मायाविनीच्या दिशेने झुकवला.
तसा त्या काठीच्या पुढच्या भागातुन एक विद्युतशक्तिधारी गोळा वेगाने बाहेर पडला-त्या गोळ्याचा रंग फिकट आकाशी असुन त्यात वाकड्या तिकड्या विजा सापासारख्या फिरत होत्या. मायविनी डोळे बंद करुन मंत्र पठण करण्यात व्यस्त झालेली की तेवढ्यात विद्युतशक्तिधारी गोळा धाडकन मायाविनीच्या पाठीवर बसला! काळ्या कपड्यांवरुन वाहणा-या त्या पातळसर चिकटद्रवाचा स्पर्श जसा त्या गोळ्याला झाला जागेवरच चीरफाळ्या उडाल्या त्या गोळ्याच्या ! मायविनीला अक्षरक्ष साध खरचटलही नाही !
" असंभव हाई हे ! हा तर महाकवच हाई ! जो प्राप्त कराला शंभर वरीस लागतात! " रघुबाबा मायाविनीच्या काळ्या कपड्यावर असलेल्या त्या पातळसर चिकटद्रवाकडे पाहत म्हणाले.
" आता तर म्या इचाव हमला बी करु शकत न्हाई !" रघुबाबा दोन्ही डोळे डाविउजवीकडे फिरवत विचार करु लागले. तेवढ्यात त्यांच्या चेह-यावर हसु उमटल.
" हा , आता एकच पर्याय हाई!" रघुबाबा हसले त्यांनी मायाविनीकडे पाहिल.
" ए माया? " काहीही उत्तर आल नाही!" ए माया !" दुस-या हाकेलाही कसलच प्रतिउत्तर नाही!
" ए मायाविनी ! म्हातारी झाली का ग ? कवा पास्न आवाज देतुया ? ऐकुन येत न्हाई व्हिई!" बाबांनी तिच्याकडे पाहिल, " बहिरी झाली वाटत
ही मायाविनी ! काय तर म्हंने विश्वातली सर्वश्रेष्ट जादुगारीण हाई ही!" रघुबाबा जरासे थांबले, मायविनीच्या चेह-याकडे पाहिल..चेह-यावर आता बदल झाल होत , ओठ जरासा नाकापर्यंत वर उंचावलेला रागाने
एक दात दिसत होत.बाबांच हेतु सफल होत-होतं.
" ए म्हातारे , बघ की माह्याकड! घाबरलय व्हिई मले! विश्वातली सर्वश्रेष्ठ जादुगारीण मले घाबरली! हाहाहाहा !" बाबांनी पुन्हा एक कटाक्ष तिच्या चेह-यावर टाकला! ओठ रागाने o आकारात बदलले,भुवया जराश्या ताणल्या गेलेल्या.
" आता एकच उपाय हाई!" बाबा मनात उच्चारले.
" अंग ए मायाविनी ! तु भेकड हाई का ग? भेकडच हाईस ! नाहीतर माझ्यासंग युद्ध कराला घाबरली नसतीच ना ? मला तर वाटत तुझी औकातच नाही माझ्यासमोर ! " मायाविनीनेचे डोळे झपकन खाली आले!तिचा अहंकार -गर्विष्टपणा वर उफाळून आला.ती गर्रकन वळाली.
" भ्याड नाय म्या! समजले का रे हxxxखोर ! मायाविनी हाई म्या मायाविनी! मांझ नाव ऐकुन सर्गातले देव बी थर-थर कापत्यांन आंऽऽऽऽ!"
" मंग माझ्याशी युद्ध कर की ग म्हातारे? " बाबा तीला अजुन चेव चढवत म्हणाले.
" ए म्हातारी-म्हातारी काय लावले रे तु? आंऽऽऽऽ!"
" अंग मग तुला बघुन काय समजाव आता ! दिसतयच ये की!"
रघुबाबा.
" ए गप्प ! म्या बी जवानच हाई, फ्क्सत मांझी एक इद्या पालटली ! ज्यामुळ मले म्हातारी व्हाव लागल!" रागाच्या भरात मायाविनी अस काही म्हणाली.की ज्याने बाबांचे कान टवकारले.भुवया ताणल्या गेल्या.
" क..काय..ग माया अशी कोणती इद्या व्ह्ती ग ती?" रघुबाबा अदबीने म्हणाले. त्यांचा स्वर जरासा खालावला. ते एकटक मायाविनी आता पुढे काय बोलेल हे जाणुन घेण्यासाठी बेताब झाले.
" अले तीच ती, कर्म!" मायाविनीचे पुढील शब्द जिभेवरच थांबले .
" कर्म काय ग? मायाविनी ! " बाबा उत्सुक झालेले ती विद्या काय अहे हे जाणुन घेण्यासाठी!
" तुला काऊन सांगुन रे मी ? " मायाविनी खेकसली ." निघ इथून..
न्हाईतर जिता गाडीण! आं ऽऽऽऽऽ"
" अंग तस नाय ग म्हंजी माझी काय मदत झाली तर बघु की तुला !"
" हिहिही! तु, मले मदत करणार व्हिई! मायाविनीला मदत करणार! हिहिहिही! मंग एक काम कर , ह्या राहाजगडला संपव ! आणि माझ्या चेळोला बाहीर काढ!"
" कोण चेळा!" वाबा जरासे थांबुन म्हंणाले"तो येहूधी का?"
" व्हिई! " मायाविनी अस म्हंणतच पुन्हा माघारी वळली.
" मंग ! मले बी तुझा चेला बनव की ? म्या तुझी इद्या जाणुन घेईल ना!
" जाणुन काय करशील? " मायाविनीने तिरकसपणे मागे पाहील.
रघुबाबांच्या चेह-यावर हे वाक्य ऐकुन एक हास्य झळकल.त्यांनी हातातली दंडगोल काठी घट्ट पकडून धरली व म्हणाले.
" तुला कैद करीन!" रघुबाबांनी हा वाक्य उच्चारताच, आपल्या हातातली काठी मायाविनीच्या दिशेने भिरकावली-रघुबाबांच्या हातून जशी बोटांच दोन इंच अंतर सोडत ती दंडगोल काठी सुटली, त्या काठीला पुर्णत आकाशी रंगाच्या विद्युतप्रवाहाने उजळून टाकल, आकाशी रंगाच्या विजा त्या काठीवर खालून वर पर्यंत सळसल करु लागल्या. जमिनीवरुन जेमतेम तीनफूट उंचावरुन ती काठी खालची माती हवेत उडवत, एका धारधार भिंगरीप्रमाणे गोल-गोल भिंगत मायाविनीच्या दिशेने निघालेली .रघुबाबांच्या मुखातुन निघालेला आवाज, त्याशिवा मायाविनीच्या लांबलचक कानांना विशिष्ट प्रकारचा हवेचा (व्हू-व्हू-व्हू) आवाज सुद्धा कानांवर ऐकू आला.तिने वळून मागे पाहिल. गिरकी घेताच तिच्या डोळ्यांसमोर बुभळांच्यात एक दृष्य दिसल. एक मोठी गोलदंड काठी जी की आकाशी रंगाने चमकत असुन त्यावर खालून वर वेगाने विजा सळसळत आहेत! आणि पुढच्याचक्षणाला त्या काठीचा फटका मायाविनीच्या जबड्यावर बसला ! वार शक्तिशाली-वेग तिप्पट असलेल्या त्या काठीच्या फटक्याने मायाविनी थेट हवेत वीस फुट मागे उडाली जात थेट आंबोच्या घरावर पडली. तिच्या वजनाने कवल तुटली
गेली.
XXXXXXXXXXXXXXXXXXXXX


राझगड महालासमोर दोनशेसैनिकांची पलटन ऊभी होती.त्यांच्या समोर
युवराज हातात तलवार घेऊन उभे राहीलेले. वरच आकाश थोडस कालवंडल गेलेल, जेमतेम प्रकाश खाली धरतीवर बरसत होता.
" सैनिकांनो मी काय सांगतो ते निट ऐका!" युवराजांनी सर्व सैनिकांवर
एक कटाक्ष टाकला. त्या सर्वांच्या माना सरळ ताठ उभ्या होत्या.
" आपल्याकडे दोनशे सैनिक आहेत त्यातले पन्नास सैनिक महालात दुस-या मजल्यावर पहारा देतील !" दोनशेमधले पन्नास सैनिक बाजुला तुडकी करुन उभे राहीले
"दिडशे मधले पन्नास सैनिक महालाच्या बाहेर पहारा देतील . " अजुन पन्नास सैनिक बाजुला तुकडी करुन उभे राहिले.
"आता उरले शंभर सैन्य ! त्यातले साठ सैनिक राहाजगड गावात जातील,आणि सर्व प्रजेला सुखरुप महालात घेऊन येतील. आता उर्वरीत पन्नास सैनिकांनो ! मी काय सांगतो ते निट ऐका! स्वयंपाक घरात जा ! आणि लसणाचे जितके पोते असतील! तेवढे सर्व बाहेर घेऊन या! " युवराजांच्या वाक्यासरशी दहा सैनिक महालात पोहचले.
काहीवेळातच सर्व पोती लसुन तिथे आणल गेल.
" फोडा ह्या पोत्यांना! " सैनिकांनी सर्व पोती फ़ोडली.
" ह्यातले अर्धे लसुन राझगड महालाभोवती एका रिंगणाप्रमाणे ओता. समजल?
" हो युवराज !" सैनिकांचा होकार आला ! सर्वजन कामाला लागले.
पोत्यातील लसुन राझगड महालाबाहेर गोल रिंगणाप्रमाणे ओतल गेल.मग अर्धे सैनिक महालातल्या दुस-या मजल्यावर निघुन गेले, बाहेरच्या गैलरींमध्ये , महालात उभे राहीले. तर दुसरे पन्नास सैनिक रिंगणाच्या आत महालाबाहेर उभे राहीले, आणि बाकीचे राहाजगड गावात निघुन गेले.
"युवराज !" महाराणी महालातुन बाहेर आले.
" काय चालु आहे इथे? महाराज कुठे आहेत? आणि तुम्ही तर ..!"
" थांबा आईसाहेब ! आम्ही सर्व सांगतो तुम्हाला ! परंतु रुपाला काहीही सांगु नका! " यु.ज्ञी: रुपवती महालाच्या दारातुन बाहेर येतच होती..की हा वाक्य ऐकुन ती जागीच थांबली दाराला पाठटेकवुन ती सर्वकाही ऐकु लागली.महाराजांनी प्रथम कवचापासुन ते युद्धाच्या अंतापर्यंतचा सर्वच्या सर्व थरार त्यांना कळवला.त्यांच्या प्रत्येक वाक्यासरशी महाराणींच्या चेह-यावरचे भाव भीती, राग,दु:ख , ह्या सर्व मिश्रित भावनांनी उजळून निघाल.रुपवतीने तर तोंडावर हातच ठेवला.
" काय?म्हंणजे त्या सैतानाला आपली रुपा हवी आहे ? "
" हळु! हळु बोला आईसाहेब ! रुपवतीला हे कळता कामा नये! नाहीतर इतक्या लोकांच जिव गेल ते - ती आपल्या मुळे झाल अस समजायची!.."युवराज म्हणाले. त्यांच वाक्य ऐकुन महाराणींनी होकारार्थी मान हलवली.
" नाही यु:ज्ञी: रुपवतीला ह्यातल काहीही कळणार नाही! "
" आईसाहेब आता तुम्ही महालात जा ! आणी वाटलच तर तुम्ही रुपा दोघीच आमच्याच खोलीत रहा! तेवढीच मेघालाही साथ! "
" युवराजांच्या वाक्यावर महाराणींनी फक्त होकारार्थी मान हलवली व त्या तडक महालात जाऊ लागल्या.रुपवतीने महाराणी येत आहेत हे पाहुन दरवाज्या बाजुला आपल शरीर लपवुन घेतल, महाराणी पुढे जाताना दिसल्या- निघुन गेल्याही .
तसे इकडे यु:ज्ञी: रुपवती मात्र विचारात गुंतल्या.
XXXXXXXXXXXXXXXXXXX

रघुबाबांची दंडगोल काठी त्यांच्यापासुन जेमतेम चाळीस मीटर अंतरावर खाली पडलेली. रघुबाबांनी त्या काठीकडे पाहत आपला हात
हवेत धरला , नी काय चमत्कार घडला ! ती काठी भुकंप आल्याप्रमाणे थर-थरु लागली, त्या काठीतुन चार पाच लहान विद्युत विजाही हलक्याश्या बाहेर येत सळसळ करत वळवळू लागल्या-आणि ती काठी जमिनीवरुन हलकेच कोणीतरी उचलल्याप्रमाणे तीस इंचांपर्यंत वर उचल्ली गेली! अद्भूत चमत्कार ! मग ती काठी वेगाने हवेतुन ते चाळीस मीटरच अंतर काहीसेकंदांत पार करुन बाबांच्या हातात पोहचली. क्रिकेट मध्ये श्रेत्ररक्षकाने जसा वेगवान चेंडू एका हाताने झेलावा, तशी ती दंडगोल सहाफुट काठी रघुबाबांनी आपल्या हातात झेलली. लागलीच एक कटाक्ष वर आकाशात टाकला. काळसर वातावरण झाल होत आकाशात. ह्याचा अर्थ मायाविनीची क्रियासफल होत आलेली.अंधार केव्हाही झाला असता! जर रघुबाबांनी त्यांच शस्त्र उगारल नसत. रघुबाबांनी पुन्हा एकदा आपला सहा फुट दंडगोल काठीचा हात वर आकाशाच्या दिशेने केला.त्या दंडगोल काठीतुन वरच्या दिशेने पुन्हा एकदा शक्तिशाली प्रकाश आकाशात झेपावला.रघुबाबांच सर्व लक्ष काठीतुन निघालेल्या त्या आकाशी रंगाच्या विद्युत प्रवाहाकडे होत जे की अगदी वेगाने आकाशाच्या दिशेने चाललेल. इकडे आंबोच्या झोपडीतुन कालसर धुळीकन हळूवार गतीने बाहेर पडू लागली. सर्वप्रथम एक त्रिकोणी आकाराची टोपी बाहेर आली, मग हळू-हळु काळ्या कपड्याचा छातीचा भाग,दोन हात एका हातात वाकडी काठी होती.
मग खालचे दोन हाडकुले पांढरेफट्ट पाय! तो आकार थेट हवेत-वर वर जाऊ लागला मग काहीवेळाने हवेत थांबला. मायाविनीने गर्रकन
हाडांचा कट आवाज होत मान वळवून रघुबाबांकडे खुनशी पणे पाहिल.
तिचे पिवळसर डोळे आता बारीकश्या लाल मण्यांप्रमाणे चमकत होते.
घशातून घर्र,घ्रर बाहेर पडत होती. तीने आपल्या उजव्या हातात
धरलेली वाकडी-तिकडी सर्पासारखी काठी हळकेच पुढे झुकवली.
त्या काठीतुन एक काळसर गोळा अगदी वेगाने बाहेर पड़ला-रघुबाबांच्या रोखाने निघाला. रघुबाबांच्या हाती असलेल्या काठीतुन एक आकाशी रंगाची रेष निघालेली जी की पुन्हा एकदा आकाशाला स्पर्शुन उजळून टाकणार होती. की तेवढ्यात असावधानतेने
रघुबाबांच्या हातात असलेल्या काठीवर एक काळा गोळा येऊन धडकला..! त्या गोळ्याचा स्पर्श काठीला होताच तो फुटला-काळसर धूळी कणांचा स्फोट झाला-रघुबाबांच्या हातातली काठी दुर उडाली, बाबाही त्या काठीच्या विरूद्ध दिशेले उडाले . त्या गोळ्याचा प्रहार बाबांना अगदी घातकपणे एका विषाच्या डंखासारखा सोसावा लागला. पुर्णत शरीर काहीक्षण लकवामारल्या प्रमाणे अक्रियनिंत झाल गेल- शरीराचे अवयव निकामे झाले ..डोळ्याच्या पापण्या जड झाल्या! अंधुक दिसु लागल. मायाविनी शरीरातुन काळसर धुर बाहेर सोडत , हवेतुन उडत हळुच खाली आली. तिच्या थोडपुढे लालमातीवर दहा फुट गोल वर्तुळाकार
, आणि आत एक मोठी चार पातांची चांदणी काढ़लेली.
मायाविनीने तिरकसपणे एक कटाक्ष रघुबाबांकडे टाकला.ते डोळे बंद केलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले, त्यांची काठीही लांब उडाली गेलेली. मायाविनीने आपली वाकडी तिकडी काठी हळुच जमिनीवरुन दहा इंचापर्यंत उचल्ली, आणि पुन्हा वेगाने जमिनीवर आपटली.
काठीच्या खालच्या दंडाचा स्पर्श जमिनीला होताच-समोरचा तो गोळ वर्तुळाकार -ती चांदणी हिरव्या रंगाने चमकुन उठली. त्या वर्तुळाच्या प्रकाशातुन
काहीसा हिरवाप्रकाश मायाविनीच तोंड उजळून जात अर्धा प्रकश खाली बाजुला जमिनीवर पडू लागला. मायाविनीने हळुच आपले डोळे पुन्हा बंद केले.तो लालसर मण्यांचा उजेड आता बंद झाला.
तोंडातुन मंत्र बाहेर पडू लागले.
" भुमाआस्म ! भुमाआस्म! भुमाआस्म! भुमाआस्म!" मायाविनीचा चिरकस किन्नरी आवाज विचित्रपणे बाहेर पडून -चौहीदिशेना गुंजू लागला. तिच्या प्रत्येक वाक्यासरशी त्या हिरव्या गोळवर्तुळाकारत असलेल्या चांदणीच्या चार पातांवर एक-एक स्फटिकासारखा निळ्या रंगाचा प्रकाशीत गोळा प्रगट होऊ लागला. काहीवेळात तिथे चार गोळे
दिसु लागले. मायाविनी त्या गोळ्यांकडे पाहत कुत्सिक हसली.
" उघडणार, तिमीराचा दरवाजा आता उघडणार ! कालोखाची सेना झोपेतुन उठणार हिहिहिही!"
" परंतु त्या अगोदर माझा सामना करावा लागेल!" मायाविनीच्या मागुन एक आवाज आला.
" कोण हाई रं आता? आं ?" मायाविनीने गर्रकन मागे वळून पाहिल.
तिच्या समोर राहाजगडचे महाराज: दारासिंह -आणि त्यांच्या मागे शंभर सैनिक उभे होते. मसनाचा लोखंडी गेट उघडा पडलेला..
" कोण रे तु? आं ? ..आणी युद्ध सोडुन पळून आलास व्हिई! हाहाहाहा !" मायाविनीच्या स्व्त:च्याच वाक्यावर हसत सुटली.तिच ते हसण पाहुन महाराज ही मान नकारा र्थी हलवत हसु लागले.
" युद्धातुन पळून नाही! तर तुझी कालोखी सेना मातीत मिसळून आलो आहोत! आणि आता तुझाही अंत करु!" महाराज ..
" ए ! तु आण माझ अंत करशील? त्यो ढभ्बु बघ कसा मरुन पडलाय ते !
जर माझ्या रस्त्यात आला ना , त्याच्या सारखी अवस्था होईल तुमची.. एक-एकाला मातीत मिसळीन निघा...निघा... इथुन !" मायाविनी चा स्वर उंचावला..
" सैनिकांनो !" महाराजांनी मायाविनीकडे पाहील. " आक्रमण!"
महाराज कड्या आवाजाने म्हणाले. त्यांच्या ह्या वाक्यासरशी .....! मागुन सेना पुढे मायाविनीच्या रोखाने निघाली! पावलांचे, ओरडण्याचे आवाज घुमू लागले ! हातातले भाले तलवारी हवेत नाचवत सेना मायाविनीला चिरड़ायला निघाली !
जर कोणी सामान्य मानव असता तर त्या सैनिकांना पाहून पळाला असता ! स्व्त:चा जिव त्याने वाचवला असता ! परंतु मायाविनी मानव
नव्हती! मानवाच दुसर रुप -अमानवी होती ती! हिंस्त्र,अमाणुष, अ-दया
अ-प्रेम भावनेंनी नढलेली दृष्ट जादूगारीण होती ती! असीम शक्तिचा ठेवा असलेली-लाखो,करोडो विद्या अवगत असलेली विद्याविनी होती ती! भले तिच्या सामने त्या शंभर सैनिकांचा काय निभाव लागणार.
तिने आपल्या हातातली काठी हलकेच वर घेऊन पून्हा वेगाने जमिनीवर आदळली-तसा मायाविनीच्या समोरुन पांढरट धुराचा लोट उडाला जात
त्या सैनिकांवर पडला ,सफेद पानावर पेन्सिलचा डाग खोडरबरने पुसून जसा पुन्हा चकचकीत व्हावा ! त्याचप्रकारे पुढील श्ंभर सैनिक न जाणे त्या धुरात कोठे गायब झाले? जमिनीत गाडले गेले? की हवेत विरुन गेली? नक्की काय घडल काहीच कळाल नाही ? अक्षरक्ष मती गुंग झाली महाराजांची हे दृष्य पाहून! तरीसुद्धा त्यांनी हातातली तलवार
गच्च पकडली. अंगात हिम्मतीचा साठा वाढवुन वेगाने मायाविनीच्या दिशेने धाव घेतली. मायाविनीने हळकेच डोळे बंद केले.
" भस्मांहिंत देहम !" मायाविनीने हलकेच आपल्या काठीची पुढील टोक
खाली झुकवली! त्या वाकड्या तिकड्या काठीतुन एक लालसर,तांबडा मिश्रित रंगाचा स्फटिकासारखा गोळा वेगाने महाराजांच्या दिशेने निघाला. तो गोळा महाराजांचा मृत्यु बनुन अगदी वेगाने त्यांच्या दिशेने चाललेला, एकदा का स्पर्श शरीराला झाल की असंख्य वेदना आणि क्रूर मृत्यु मिळणार होत त्यांना ! मायाविनी अगदी छद्मीपणे हसत त्या गोळ्याला महाराजांच्या दिशेने पुढे- पुढे जाताना पाहत होती.कोणत्याही क्षणी तो गोळा महाराजांचा घात करणार , शरीरावर आदळणार , असंख्य वेदना होणार ! की तेवढ्यात ..हवेतुन तांबड्या रंगाचे बारीकसे दहा रुद्राक्ष अगदी वेगाने तापलेल्या जळत्या निखा-यांप्रमाणे सर,सर हवेला कापत त्या गोळ्याचे दिशेने आले...
बर्फावर लाव्ह्याचा गरम स्पर्श व्हावा , वाफा -धुर ,फस्स आवाजासहित बाहेर मिश्रित होत निघाव्या. सेमहूबेहूब त्या दहा तप्त रुद्राक्षांनी ,त्या लाल-तांबड्या गोळ्याला ! (फस्स,फस्स) आवाज करत चिकटायला सुरुवात केली. महाराज आपल्या जागेवरच थांबले ! पुढुन येणा-या गोळ्यावर काहीतरी तांबड्या प्रकाशित रंगाच लहान-लहान दगडांसारख येऊन त्या गोळ्याला चिटकत आहे अस महाराजांना दिसल गेल. पुढुन येणारा गोळा पाहुन महाराजांनी दोन्ही हात चेह-यावर धरले.
शेवटचा एक रुद्राक्ष येऊन त्या गोळ्याला चिटकला - दहा रुद्राक्षांची शक्ति जशी मिळाली गेली, त्या गोळ्यावर एक संरक्षित कवच तांबड्या रंगाच्या जाळ्यांसहित निर्माण झाल- जणु त्या गोळ्याला चारहीबाजुंनी त्या कवचाने घेरल . नी त्याचवेळेस त्या गोळ्याचा महाराजांपासुन ठीक पन्नासमीटर अंतर राखून हवेत स्फोट झाला. परंतु त्या स्फोटातली आग,निखारे धुळ जे काही होत ते त्या रुद्राक्षांच्या आतच राहील, जणु पचवल गेल रुद्राक्ष कवचात.
" महाराज !" महाराजांना त्यांच्या मागुन एक ओळखीचा आवाज आला.त्यांनी वळुन मागे पाहील. समोर समर्थ उभे होते. अंगावर
फिकट भगवा फुल बाह्यांचा कुर्ता ,खाली एक सफेद पेंट पायांत कोल्हापुरी चप्पल ! आणि त्यांच्या मागोमाग सप्तरंगी द्वार उघडलेला दिसत होता-जो की आता पापणी बंद केल्याप्रमाणे बंद झाला.
" समर्थ ! " महाराज समर्थांजवळ धावत आले !
" तुम्ही आलात !"
" होय! महाराज ! " समर्थ इतकेच म्हणाले.त्यांचा चेहरा थोडा उदास वाटत होता.
" समर्थ मग मिळाल का मार्ग ? ही दृष्ट जादूगारीण भलतीच ताकदवर आहे ! तिने शंभर सैनिकांना , एका क्षणात न जाणे कोठे कस गायब केल कुणास ठावुक ! आ..आ..आणि तिने रघुबाबांना न जाणे काय केल कुणास ठावुक !" महाराजांनी बाजुलाच एका मातीच्या कबरे बाजुला पाहिल, जिथे रघुबाबा डोळे बंद करुन निपचीतपने पडले होते.
" काय झाल त्यांना ?" समर्थांनी बाबांच्या दिशेने धाव घेतली.
काहीवेळातच ते तिथे पोहचले ही. मायाविनीने त्या तिघांकडे जास्त न पाहता! आपली पाऊले त्या हिरव्या रंगाने चमकणा-या गोल वर्तुळालाकाराकडे वाढवली. त्या हिरव्या प्रकाशात वर्तुळ-चांदणी तिच्या चार पातांवर गोल स्फटीका सारखे निलसर गोळे हवेत तरंगताना दिसत होते.
" बाबा ! " समर्थांनी रघुबाबांना आवाज दिला..त्यांचे गाल हलके थोपटले.रघुबाबांनी हलकेच डोळे उघडायला सुरुवात केली..समोर
नेत्र उघडताच समर्थांना पाहुन त्यांना आनंद झाला. ओठांवर मंद स्मित हास्य आल.
" समर्थ आलात व्हय तुम्ही! भेटल का उपाय ?" रघुबाबांच्या वाक्यावर समर्थांचा चेहरा पडला,डोळे खाली जमिनीकडे झुकले. त्यांचे हे भाव पाहुन बाबांना कळून चुकल.
" बाबा, मी सप्तद्वारातुन आत प्रवेश केला आणि पुढे!" अस म्हंणतच
समर्थांनी सर्व हकीकत महाराज -रघुबाबांना कळवली.
चांदणीच्या चार पातांवर चार स्फटिकासारखे निलसर गोळे दिसत होते
आणि चांदणीच्या मधोमध एक गोल वर्तुळ होता.मायाविनीने आपल्या वाकड्या तीकड्या काठीकडे मग त्या चांदणीतल्या वर्तुळाकारात पाहिल..हळुच काठी असलेला हात पुढे सरसावुन ..त्या काठीचा खालचा भाग त्या चांदणीच्या वर्तुळात खोचला..!
टाळ्यात चावी घुसवावी तसा घुसवुन ती थोडीशी गोल फिरवली नी जशी ती काठी फिरली. वर आकाशातला थोडाफार उजेडही नाहीसा झाला..संमंद जग अंधारात बुडाल. राहाजगड बाहेर असलेले सैनिक, युवराज, सर्वांनीही विस्फारलेल्या नजरेने वर आकाशात पाहिल !

त्या काठीच्या टोकातुन एक गुलाबी रंगाची वाकडी तिकडी विज सरपटत तीव्र वेगाने आकाशात झेपावली.
काळ्या ढगांच्यात शिरुन मग सापासारखी बागुलबुवाचा गडगडाटी आवाज सोडत गरजली..! तसा त्या गोल वर्तुळाकाराचा हिरवा रिंगन भुकंप आल्याप्रमाणे तड-तड करत फुटू लागला.! त्या गोल रिंगणाला एक भगदाड पडल...तिची काठीही त्या गोल खड्डयात पडली.
" बापरे काय करत आहे ही?" महाराज वर आकाशात पाहत म्हणाले.
आकाशातले ढग एका जागेभोवती एक वादळ निर्माण करत फिरत होते..क्षणा-क्षणाला त्यात एक विज कडाड़त होती.
" उघडला ! शेवटी त्या चेटकीणीन तिमीराचा द्वार उघडलाच !
" काय ?" समर्थांनी चमकुन मायाविनीकडे पाहिल..हाता पायांची विशिष्ठ प्रकारची हालचाल करत ती भयान नृत्य करत होती.
तिच्या पायांसमोर एक काळ्या रंगाचा गोळ वर्तुळाकारातला खड्डा दिसुन येत होता.समर्थांची नजर त्या खड्डयात स्थिरावली.
त्या गोल भगदाडात न मापीत अंधार भरला होता- ज्या अंधारात पाहताच जणु ते संमोहिंत करत होत पाहणा-याला..समर्थांनी एक दोन वेळा डोळे मिचकावले ! तसा पुढुन त्या भगदाटून वारुळातुन पिसाळलेल्या मुंग्याची सेना बाहेर पडावी-तश्या काळ्या रंगाच्या सावळ्या-तोंडातुन ओरडत,विव्हळत,हसत,हेळ काढत वेगाने बाहेर पडल्या. काहीक्षण हवेत इकडून तिकडे फिरल्या..मग त्या लाल मातींच्या कबरात घुसु लागल्या.
तिमीराच्या कालोखी जगात मोक्ष प्राप्त न झालेले हे ,अतृप्त ,वासनांधीश,अघोरी आत्मे होते. ज्यांना मोक्ष प्राप्ती न झाल्याने ..पुन्नरजीवन मिळन असंभव होत.म्हंणूनच तिमीराच्या द्वारापाशी घुटमळत राहणारे आत्मे ! मायाविनी मार्फत जसा तिमीर द्वार उघडल गेल -ते बाहेर पडले,समोर जे जे निर्जीव देह होते त्यांत घुसु लागले.
" हा द्वार बंद कराव लागल समर्थ !" रघुबाबांनी समर्थांचा हात अगदी गच्च धरला ! अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी समर्थांकडे पाहिल.
" नाही बाबा ! तुम्ही तस करु शकत नाही ! तो मार्ग धोकादायक आहे " समर्थांनी त्यांच्या हातावर हात ठेवला
" नाय समर्थ ! दुसरा पर्याय शिल्लक नाही ! "
" मग मी आहेना ! मी देइन माझे प्राण, आणि बंद करेल हा द्वार! परंतु तुम्ही"
" नाय समर्थ !" रघुबाबांनी त्यांना आडवल " तुम्हाला माझी शप्पथ हाई ! ह्या तिमीर द्वाराला बंद करायच असल , तर द्वार उघडणा-यांस्नी म्हंजीच मायाविनी , आण द्वार मला बंद करायच हाई ! म्हंजी मी ! ...
आण दोघांस्नी त्या खड्डयात उडी घ्यावी लागल! तव्हाच हा द्वार बंद व्हील ..! आणि हाच नियम हाय ह्या तिमीराचा ! बळी देऊन सुख घेई!"
रघुबाबा जागेवर उभे राहिले.त्यांनी समर्थांकडे पाहिल.
" अहो समर्थ! माझ वय झालंय आता ! " बाबा जरासे हसले -त्या हसण्या मागे खुप . दुख दडल होत." आज ना उद्या म्या मरणारच हाई की ! अव माझ्यापेक्षा तुमची गरज आहे ह्या राहाजगडला !" रघुबाबा हस-या चेह-याने म्हणाले.समर्थांचे डोळे पाणावले गेलेले - दात ओठांखाली दाबले होते.रघुबाबा हळकेच समर्थांचे आशिर्वाद घेण्यासाठी झुकले -समर्थांनी ह्यावेळेस सुद्धा त्यांचे खांदे पकडले.
" अव समर्थ ! म्या महाकाल ला लेय मानतो बघा! आण म्या अस ऐकलय! की समर्थांच्या वंशांमध्ये महादेवांच रुप असत ! म्हणुणच आज मला तुमचे हे चरण स्पर्श करु द्या , आयुष्यभरात काही चूका घडल्या असतील तर त्या माफ होतील." रघुबाबांनी ह्या वेळेस समर्थांचे चरण स्पर्श केले -समर्थांनीही त्यांना रोखल नाही. मोठ्या दुख यातनेंनी हा वेळ सरला! शेवटी वेळ आलीच. रघुबाबांनी काहीतरी खुसुर पुसुर करत
समर्थ -महाराजांना पुढील युद्धाची रणनिती कळवली.
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
राझगड महालात दुस-या मजल्यावर खोल्यांच्या बाहेर गैलरीमध्ये
चार सैनिक हातात भाले घेऊन उभे राहीलेले.त्यातल्याच एका सैनिकाने कमरेला खोवलेली कापडी पिशवी उपसून काढली-तंबाखू खायची तल्ल्प झालेली- चुकुन त्याच्या हातातुन ती लाल कापडी पिशवी खाली पडली, ती त्याने कंबर वाकवुन हळूच एका हाताने उचल्ली उभा राहीला , तेवढ्यात त्याची नजर हळूच पुढे गेली. न जाणे त्याने पुढे काय पाहिल? कोणास ठावूक? त्याचे डोळेच विस्फारले ! तो मोठ-मोठ्याने ओरडू लागला.
" सैतान, सैतान आला ! पळा "
राझगड महालाच्या दिशेने समोरुन हवेतुन एकुण तीन वटवाघळू उडत येताना दिसत होते! दोन वटवाघळू काळ्या रंगाचे तर त्या दोन वटवाघळुं मध्ये जो वटवाघळू होता, त्याचा आकार जेमतेम दोन फुट असुन अंधारात तो वटवाघळू लाल रंगाने चमकत होता -त्याचे दोन पिवळसर डोळे दुरुन अंधारात लकाकताना दिसत होते. जणू खुन्नस देत आहेत.
त्या सैनिकाचा ओरडण्याचा आवाज ऐकुन बाकीचे सैनिकही सतर्क झाले. सर्वजन पुढुन येणा-या त्या लाल वटवाघळूला पाहुन काहीक्षण अक्ल्प्निय विचाराने ग्रासले गेले.
" हे वटवाघळू काय तरी भलतच प्रकार दिसतंय, जा युवराजांना जाऊन
कळवा !" एक सैनिक म्हणाला.त्याच्या ह्या वाक्यावर बाजुला उभा असलेला दुसरा सैनिक लागलीच महालात घुसला , युवराज हॉलमध्येच होते ! त्या सैनिकाने बाहेर आलेल्या विचित्र वटवाघळुं बदल युवराजांना कळवल तसे ते "काय?" म्हंणतच महालातुन बाहेर पडले.
महालातल्या दाराची चौकट जशी युवराजांनी प्रथम पावलासरशी ओलांडली नी पुढे पाहिल, त्यांच्या पुर्णत शरीरावरचा एक केस नी केस ताठरला गेला -डोळ्यांतली बुभळ विस्फारली! अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
" युवराज!" युवराजांना निरोप देण्यासाठी आलेला तो सैनिक युवराजांच्या विस्फारलेल्या डोळ्यांच्या -भयग्रस्त चेह-याला जरा आश्चर्यकारक पणे पाहत म्हंणाला.मग त्यानेही हळूच पुढे पाहील.
अतर्कनीय ,अविश्वासनीय देखावा ! विलक्षण-अमानवीय शक्तिची कमाल जणु पाहायला मिळावी असा देखावा! तो सैनिक तोंडाचा
आ-वासुन हळू,हळू पुढे जाऊ लागला.काहीक्षणापुर्वी ! हो काहीक्षणापुर्वीच तर तो सैनिक महालात युवराजांना निरोप देण्यासाठी गेलेला-तेव्हा पुर्णत महालाभोवती एका कवचाप्रमाणे सैनिक बाहेर जिवंतपणे उभे होते! हो जिवंतपणेच मित्रांनो ,कारण आता ह्याक्षणी
महालापुढे त्या सैनिकांची छिन्नविच्छिन्न झालेली प्रेत सताड उघड्या डोळ्यांनी जमिनीवर कत्तल केल्याप्रमाणे मरुन पडली होती. कोणाच धड तीनशे वीसच्या अंशात फिरवल गेलेले(320°) तर कोणाच हात पाय,कान,डोळे,नाक उपटून त्याच्याच तोंडात कोंबल होत.
कोणाच्या अंगावर कपडे काढुन त्याच्या नग्ण शरीरावर नखांचे ताजे ओरबडे दिसुन येत होते.( त्याच नग्ण शरीरावरच्या प्रेतांचे लिंग तोडून त्यांच्या तोंडात टाकल होत) कीती ती अमानविय शक्तिची विकृती म्हणायची ही! न जाणे कोणत पाश्वी आनंद मिळाल असेल हे सर्व करुन त्यांना.
" को,को...! कोन आहे ? " महालाची पायरी उतरुन तो सैनिक हळकेच गोल वर्तुळाकारात ओतलेल्या त्या लसणांच्या पाकल्यांजवल आला ! त्याने खाली वाकुन पाहिल -किड लागल्यासारखे सडून गेले होते ते लसुन - काळे-निळे झाले गेलेले.
" यु..युवराज , अव लसुण तर खराब झाल हाईत ! " त्या सैनिकाने अस म्हंणतच मागे वळुन पाहिल ! की तेवढ्यात वेगाने पुढील दृष्य घडल..
एक काळ्या कपड्याची सातफुट आकृती ,काळ्या पेंटची-चकचकीत बुटांची, अगदीवेगाने हवेतुन खाली त्या सैनिकाच्या पुढ्यात झेपावली-नी युवराजांच्या डोळ्याची पापणी लवण्या अगोदर ती आकृती पुन्हा एकदा त्या सैनिकाला घेऊन हवेत उडाली - युवराजांच्या समोर वर एक त्रिकोणी छप्पर होत ! ज्याने ती आकृती वर गेल्यानंतर दिसली नाही !
फुललेल्या श्वासांसहित युवराज हळू-हळू पाय-यांवरुन खाली उतरु लागले ! मानवाची उत्कंठा किती धोकादायक आहे हे ह्या दृश्यावरुन समजत ! कारण पुढील घटना स्व्त:च्या जिवावर बेतणार हे युवराजांना ठावुक असताना ही ते हळू-हळू त्या त्रिकोणी छप्परापुढे जायला निघाले.तोच हवेतुन अगदी वेगाने तो सैनिक रक्तबंबाळ अवस्थेत खालची माती हवेत उडवत खाली पड़ला . युवराज मोठे डोळे करत-तोंडाचा आ वासुन एकटक त्या सैनिकाकडे पाहत होते मोठ्या कष्टाने त्या सैनिकाने मानवर केली-रक्ताळलेला थरथरणारा हाताचा पंजा उभ करुन इतकेच म्हणाला.
" प..प...पळाऽऽऽऽ!!!"
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

समर्थ ,महाराज, रघुबाबा तिघेही एकसाथ उभे राहीले . त्यांच्या पुढे चाळीस मीटर अंतरावर मायाविनी पाठमोरी ऊभी राहून सैतानी नाच करण्यात व्यस्त होती. काहिवेळा अगोदर तिच्या पायांसमोर एक रिंगण होत ज्या रिंगणाला तडे जाऊन तिथे एक गोल भगदाड पडलेल , ज्या भगदाडातुन एकापाठोपाठ काळ्यासावळ्या बाहेर पडून -एक दोन मिनीट हवेत हेल काढत , चिरक्या आवाजात ओरडत उडत होत्या..मग नंतर मसनातल्या लाल मातीच्या ढीगांच्या कबरेत घुसत होत्या.
" समर्थ ! म्या सांगितलेल लक्षात हाईना !" रघुबाबांनी आपला दुसरा हात हवेत धरला - तस बाजुला असलेली ती जादूई काठी हवेला कापत वेगाने रघुबाबांच्या हातात आली .
" वा.. काय आहे हे?" समर्थांनी आश्चर्यकारक नजरेने त्या गुळगुळीत गोलदंड काठीला पाहील. त्यांच्या ह्या वाक्यावर रघुबाबा म्हंणाले.
" बेल वृक्षापासुन बनवली आहे ही काठी! आणी ह्या काठीत शक्ति निर्माण करण्यासाठी..जी विधी असते ती पुर्णत तीस वर्षाची आहे!आणी ह्या काठीच नाव शौर्या आहे ! "
" वा अप्रतिम आहे! " समर्थ त्या काठीकदे म्ंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे पाहत म्हणाले. जे की रघुबाबांच्या नजरेतुन सुटले नाही !
" तुम्हाला हवीये ही !" रघुबाबांनी ती काठी हलकेच समर्थांच्या दिशेने केली.
" नाही , नाही ! माझ्याकडे अप्पांचे रुद्राक्ष आहेत ! " समर्थांनी आपल्या दोन्ही हातात पाच पाच असे दहा मिळुन दोन रुद्राक्षेंचे कडे घातलेले दाखवले ! " अप्पा म्हंणयाचे की हे रुद्राक्ष पुर्णत तीन हजार वर्षांपुर्वीचे असुन साक्षात महादेवांच्या गळ्यात होते."
रघुबाबा-महाराज दोघांनीही चमकुन त्यावर त्या रुद्राक्षांकडे पाहील.
समर्थांनी त्या दोघांनाही अस पाहताना जरा वेगळच वाटल.
" महाराज !"
" ह ..ह हो!" समर्थांच्या वाक्यावर महाराज म्हणाले.
" तुमच्या ह्या तलवारी बदल सांगणार नाहीत!" समर्थ म्हणाले.
" हो नक्कीच सांगेल ! मला आठवत , मी नुकताच आठराव्या वर्षात पदार्पण केल होत ! तेव्हाही तलवार शमशेरा नाव आहे हीच आमच्या बाबाश्रींनी आम्हाला भेट म्हंणुन दिली होती आणि म्हणालेले ! ही शमशेरा तुझ्यात नेहमीच हिंम्मत वाढवत राहिल ! ज्या-ज्या युद्धात तु ही तलवार वापरशीलत्या ते युद्धात तु कधीही हरणार नाहीस ! " महाराजांनी हलकेच डोळे पुसले
" आणि आजचा युद्ध ही आपणच जिंकणार !" महाराजांनी एक क्रोधहिंत कटाक्ष पुढे मायाविनीवर टाकला -हातातली शमशेरा गच्च पकडली , समर्थ , महाराज, रघुबाबा तिघांनीही एकमेकांकडे आळीपाळीने पाहत होकारार्थी मान हलवली. व निघाले मायाविनीच्या दिशेने .
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
राझगड महालात युवराजांच्या खोलीतल्या खिडक्या बंद दिसत होत्या.
आत कोणीही नसल्यासारख अंधार पसरलेल ! बंद खिडकीपासुन पुढे युवराजांच्या खोलीचा सताड उघडा दरवाजा दिसत होता. कैमेराचा झुम वाढला जावा तसा हळू हळू दृष्य पुढे सरकु लागल- दोन झापांचा उघडा दरवाजा जवळ-जवळ येऊ लागला ...नी अचानक दोन पांढरिशिफ्ट धार-धार नखांची पाऊले त्या दारात आली. खोलीत जरी रिकामी दिसत असली ..! जरी पलंगावर कोणी नसल..तरी पलंगाखाली मात्र तीन आकृत्या लपलेल्या दिसत होत्या.
महाराणी,युवराज्ञी,मेघा .त्या तिघीही
चेह-यावर भ्यायलेल भाव घेऊन , एकटक त्या पाऊलांकडे पाहत राहीलेल्या. पांढ-या शिफ्ट त्वचेचे आणि धारधार कालपट नखांचा पाऊल होता तो. कोणी सामान्य मानवाचा मुळीच नव्हता हा पाय.
" युवराज्ञीऽऽऽऽऽऽऽ!" एक प्रेमळ हाकेसरशी दरवाज्यात उभ्या पिशाच्चीन शलाकाने त्या खोलीत पाहत आवाज दिला. त्या आवाजासरशी त्या तिघींच्याही ह्दयात धडकी भरली. " यु...व..रा ..ज्ञी!" ती पाऊले हळूच पुढे आली ! पलंगाच्या दिशेने आली.
" कुठे आहात तुम्ही महाराणी? " पलंगाखाली ह्या तिघिही लपल्या आहेत हे शलाकास ठावुक होत, परंतु विकृत अमानविय बुद्धी नेहमीच अशे अघोरी खेळ खेलत असते. ज्यात सावजाची नेहमीच टिंगल-टवाली ठरलेलीच असते. धाडदिशी एका हाताने शलाकाने तो जाडजुड सामान्य मानवाला लाजवणारी कृती करत .. पलंग एका हाताने वर उचल्ला. तश्या खाली लपलेल्या ह्या तिघी किंचाळत ..
दरवाज्याच्या दिशेने धावले व बाहेर पडणार की तोच मध्ये....
पिवळेजर्द डोळ्यांची-धार धार सुळे उगवलेली पिशाच्च रिना दारात मधोमध वाट अडवुन ऊभी राहीली.

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


" आक्रमण!" महाराज , रघुबाबा , समर्थ तिघेही एकसाथ ओरडले.
तो आवाज ऐकुन मायाविनीने वळून माघे पाहिल. हे तिघेही पुन्हा वार करण्यासाठी येत आहेत हे पाहुन , तीच्या रागाचा पारा चढला..तीने आपले दोन हात हवेत फाकवले , त्या फ़कवलेल्या हातांच्या पंजाच्या आतुन धार धार पोलादी नख बाहेर आली.
" या..या !" मायाविनीने त्या तिघांनीही जोरदार आवाहन केल. रघुबाबांनी हातातली काठी गच्च पकडली -धावता धावताच एकपाय पुढे टाकत पुर्णत शरीर वर हवेत दहाफुटापर्यंत वर झोकून दिल..हातातली काठी थोडीवर हवेत मागे नेली त्या काठीत विद्युतपुरवठा जमा झाला विजा सळसलु लागल्या , समर्थांनी धावता -धावताच दोन्ही हाताच्या मुठी पोटात पंच मारल्याप्रमाणे पुढे केल्या
तसे त्यांच्या हातुन ते दहा रुद्राक्ष तांबड्या रंगाने तप्त कोळश्यासारखे चमकुन अगदी वेगाने बंदूकीच्या गोळ्याप्रमाणे मायावतीच्या दिशेने निघून गेले.महाराज अगदी वेगाने धावत मायाविनीजवळ पोहचले...होते की धावता-धावताच त्यांनी अचानक आपले दोन्ही गुढघे वाकवले ज्याने ते स्लिप होत ..पुढे निघून गेले -महाराजांनी तेवढ्या वेळेतच आपली हातातली शमशेरा , मायावतीच्या पोटावर घासत ते पुढे निघुन गेले.
हवेतुनच रघुबाबांनी शौर्याला (जादूई काठीला) मायाविनीच्या दिशेने भिरकावल , विजांच्या सळसलत्या शौर्याने-तिला जोड म्हंणुन विस्तवासारख्या ज्वलंत रुद्राक्षांनी एकसाथच मायाविनी च्या छाताडावर प्रहार केला - त्या दोन असीम शक्तिंच्या मिळणासहीत मायाविनीच्या कवचावर प्रथमच प्रहार झाला , तो कवच मायाविनीच्या छातीवर निल्या रंगाचा व्रण सोडत चमकु लागला. त्या प्रहाराने मायाविनी हात विशिष्ट प्रकारे हळवत -" आ,आ,आ!" विव्ह्ळु लागली. महाराजांनी आपल्या
हातातल्या शमशेराकडे पाहिल! तीची पात तुटली होती..हो तुटली होती पात..मायाविनीच्या कवचाला फक्त दैवी शक्तिंचा प्रहार होनच संभव होत.शमशेरा त्या लायकीची नव्हतीच .
रघुबाबा हवेतुन उडी खात जमिनीवर आले त्यांनी " महाराज ! " म्हंणून आवाज दिला. तसे ठरल्याप्रमाणे महाराज मायाविनीच्या पुढुन धावत बाहेर यायला निघाले. महाराज येत आहेत हे पाहून रघुबाबांनी एक कटाक्ष समर्थांवर टाकला, होकारार्थी मान हलवली.
0:25 x.
.mode on..
स्लोमोशन सीन ..

" जय महाकाल..!" रघुबाबांच्या मुखातुन जस आवाज निघाला , त्याचक्षणी त्यांनी वेगाने मायाविनीच्या दिशेने धाव घेतली. दहा-बारा पावला चालताच त्यांचा वेग तिप्पट झाला. मायाविनीच्या छातीवर असलेला निळा व्रणही तेवढ्यातच नाहीसा झाला गेला .तिने झटकन आपले पिवळेजर्द डोळे उघडले . परंतु रघुबाबांनी त्या डोळ्यांकडे न पाहता
डोक थोडस खाली झुकवल -आणि धावत्या अवस्थेतच तिच्या कमरेभोवती दोन्ही हातांचा विळखा घातला ! तिच सर्व शरीर बाबांनी
उचलून घेत दोन्ही पायांनी उडी घेतली..की तेवढ्यात मायाविनीच्या क्प्टी नजरेने पुढुन जाणा-या महाराजांनाही मागुन ओढून घेतल..
युद्धाची रणनीती सपशेल अपयशी ठरली गेली.एकसाथ महाराज,रघुबाबा, मायाविनी त्या तिमीराच्या द्वारात पडले.
" महाराऽऽऽऽऽऽज!" समर्थांच्या मुखातुन एक आर्तकिंकाळी बाहेर
पडली जात ते त्या खड्डयाच्या दिशेने धावले.
तसे त्यांना त्या खड्डयावर एक हात धरुन लटकलेले महाराज दिसले..परंतु ते एकटेच नव्हते ! त्यांच्या पायाला धरुन मायाविनीही होती.
" महाराज हात द्या?" समर्थांनी आपला हात महाराजांच्या दिशेने वाढवला..की तेवढ्यात ..मायाविनी एका कोळ्यासारखी महाराजांच्या पायांत नखे रुतवत त्यांच्या शरीरावरुन वर वर येऊ लागली .
डोळ्यांतुन अश्रु गाळत महाराजांनी समर्थांकडे पाहिल.
" माफ करा समर्थ ! " महाराज इतकेच म्हणाले.त्यांनी आपला हात
अलगद सोडला..! बिन आधाराने महाराज ,आणी त्यांच्या पाठिवर असलेली मायाविनी दोघेही खाली-खाली जात तिमिराच्या प्रकाशात नाहीसे झाले..व तो गोल वर्तुळाकारीत खड्डा पुन्हा एकदा पुर्वरीत होऊन जमिनीत बदल्ला .
" काय केलत तुम्ही हे महाराज ! काय केलत!" समर्थ त्या लालमातीवर जोर-जोरात मुठ मारत म्हणाले. तिमीराचा दरवाजा अचानक बंद झाल्याने जे आत्मे बाहेर येऊन कबरीत घुसलेले ..त्या कबरी लाल-माती हवेत उडवत बार फुटाव्या तश्या फुटू लागल्या.आतीशबाजी जणु शेवटच्या युद्धाची सुरु झाली.समर्थ हलकेच जमिनीवरुन उठले.
त्यांनी लागलीच डोळे बंद केले. बंद डोळ्यांच्या कालोख्या,टिंम-टिंमणा-या चांदण्यांमध्ये त्यांना हसणारे रघुबाबा , महाराज -मग कोंडूबा, आणि शेवटला अप्पा दिसले.
" बदला !" समर्थांनी इतकेच म्हंणत आपले दोन्ही हात हवेत धरले - तसे त्यांच्या मागुन वेगाने तप्त निखा-यांचे रुद्राक्ष येऊन त्यांच्या दोन्ही हातांत कड्याप्रमाणे फिट बसले.


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


राझगड महालात

दरवाज्या बाजुला भिंतीला पाठटेकवुन युवराज लपले होते.
डोळे जरासे विस्फारले गेलेले-श्वासांची नाडी वाढली गेलेली.
दोन झापांच्या त्या उघड्या दारातुन एक सावली येऊन ऊभी राहीली-ज्या सावलीला पाहुन युवराज अजुनच सतर्क झाले.
समोरुन येणारा शत्रु मानविय नाहीच-अमानविय आहे.
हे युवराजांना कळून चुकल होत. म्हणूनच जे काही करायचं असेल
ते शांत डोक्याने करायला हव .युवराज त्या आकृतीकडे एकटक पाहत होते. तेवढ्यात त्या आकृतीची हालचाल झाली-ती आकृती पुढे-पुढे येऊ लागली. चालताना तिच्या बुटांचा टक-टक आवाज होत-होता.
अमानविय ,अंधकारराजक , पिशाच्चसम्राट
द्रोहकालने हळूच महालाची चौकट ओलांडून आत प्रवेश केला.
प्रवेशकरताच युवराजांना त्या सैतानाची सात फुट देहाची आकृती, अंगावार एक काल-लाल कापड,मानेभोवती एक ताठ कॉलर,आणि पायांत चकचकीत बुट दिसले ,ज्यांचा आवाज त्या महालात गुंजत होता. द्रोहकाल पाठमोरा उभ राहून संपुर्णत महाल नजरेखालून घालत होता. युवराज एकटक त्याच्याकडेच पाहत होते-की तेवढ्यात त्यांना बाजुलाच एक तलवार पडलेली दिसली. युवराजांनी एकवेळ तलवार मग द्रोहकालकडे पाहिल-मग पुन्हा तलवारीकडे पाहुन हळूच तिला आवाज न करता उचल्ल. मग हळू-हळू युवराज पाठमो-या द्रोहकालला जराशीही चुणूक न लागु देता त्याच्या दिशेने निघाले-मागुन वार करण्यासाठी. द्रोहकालच्या डाव्याबाजुला अंधार दिसत होता-त्या अंधाराचा आणि तिथे असलेल्या टेबल, खुर्च्यांचा आधार घेऊन , नोकर -गडी मांणस लपून युवराजांना हाती तलवार घेऊन जाताना पाहत होती.
युवराजांनी हलकेच हातातली तलवार हवेत उंचावली ,
" आऽऽऽऽऽऽऽ!" युवराज आरोळी ठोकत द्रोहकालच्या अंगावर प्रहारण्यासाठी ती तलवार आणणार होतेच ! पन हे काय , कोणीतरी
ती तलवार मागुन धरुन ठेवली आहे! युवराजांनी गर्रकन वळुन मागे पाहिल. पांढरफट्ट V आकारा चेहरा,लाल ओंठ, पातळसर भुवया,लहान डोळे, डोक्यावरचे काळे केस मागे चोपुन बसवलेले, अंगात एक काला कोट,आत पांढरा शर्ट, कोटला जोडून खांद्यावरुन एक काळा-लाल मिश्रित फडका खाली ,काळ्या पेंट ते चकचकीत काळ्या बुटांच्या पायांपर्यंत लोंबत होता.
" ए कोण आहेस तु? सोड ती तलवार ?"
युवराज तावातावाने म्हणाले. तेवढ्यात मागुन आवाज आला
" सोड रे तलवार !" युवराजांनी त्या आवाजासरशी वळुन पुढे पाहिल-पुढे पाहताच त्यांना एक धक्का बसला..कारण तलवार धरुन ठेवलेला माणुस-आणि मागे असलेला तो माणुस दोघेही सेम-टू-सेम दिसत होते. त्या दुस-या आकृतीने युवराजांच्या हातातली तलवार हिसकावुन घेत.. जिन्याजवळ फ़ेकली.
" ए ! को..को ..कोण आहात तुम्ही ?" युवराज मागे मागे जाऊ लागले
"मी द्रोहकाला !" पुढील त्या दोन सेमहूबेहुब दिसणा-या आकृत्या हसु लागल्या" हा हा हा,हा हा हा हा !" ते भयंकर खर्जातल हसु कानांवर-भीतीचा पगडा घट्ट करत होत. हसता-हसताच त्या दोन्ही आकृत्यांमधली एक आकृती धुराच लोट उडवत नाहीशी झाली.
" तु? तोच का ! ज्याने आमच्या राहाजगडमधल्या निष्पाप मातेच्या मुलांचा,आणि प्रजेचा बळी घेतलस?"
युवराज स्वर वाढवुन म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर द्रोहकाल फक्त छद्मी हसला. जे हास्य पाहुन युवराजांच्या रागाचा पारा चढला. ते द्रोहकालच्या अंगावर धावुन गेले . परंतु द्रोहकाल कोणी सामन्य मानव होता का? जो युवराजांशी युद्ध करेल? द्रोहकालने आपल्या पांढ-या फट्ट हातांनी युवराजांचा गला आवळला, त्यांना जमिनीवरुन जेमतेम एक फुटांवर उचल्ल .श्वास न मिळाल्याने युवराजांचे पाय पुढे मागे हलु लागले..
" तु..? तु ....मारणार मला ? मूर्ख मानवा ? ह्या अंधाराला आव्हान दिलस तु? तुझी लायकी तरी आहेका माझ्या पुधे ऊभी राहण्याची ?"
द्रोहकालचे डोळे विस्तवासारखे तापले , त्या डोळ्यांतुन वाफा निघु लागल्या. जबड्यातून दोन सुळे बाहेर आले.
" सोड़ा त्यांना ,सोडा आमच्या दादासाहेबांना !"
मागुन एक आवाज आला! तो आवाज ऐकुन द्रोहकालची मूठ हलकेच सुटली-निआधाराने युवराज खाली जमिनीवर कोसळले , त्यांच्या कोसळलेल्या देहापाशी मेघा धावत आली. तो आवाज ऐकुन द्रोहकालचे विस्तवासारखे डोळे थंड झाले-जबड्यातले दात आत गेले.
जणु तो आवाज -जणु तो आवाज ओळखीचा होता-त्या आवाजातली
धार ओळखीची-आवडीची होती.जो आवाज ऐकण्यासाठी तो आसुसला गेलेला, बधीर झालेला.द्रोहकालने मागे वळून पाहिल..
मागे रुपवती ऊभी होती.
" मेनका !" द्रोहकालचा स्वर खालावला ! त्यच्या डोळ्यांतुन लाल रक्तासारखे अश्रु बाहेर पडले.
" मेनका ! " द्रोहकाल रुपवतीजवळ आला,
" मेनका किती वाट पाहीली मी तुझी ! " द्रोहकालने आपला पांढराफट्ट
हात रुपवतीच्या खांद्यावर ठेवला . त्या सैतानाच्या हाताचा स्पर्श जसा रुपवतीच्या खांद्याला झाला ,! त्याच्या हातातुन वाफा निघाल्या , मुळाच्या देठापासुन तो सैताना ओरडला ..त्याच्या आर्तकिंकाळीने
संमद महाल , राहाजगड दणाणुन उठल. समर्थ महालाच्या दिशेने येत होते की तेवढ्यात त्यांनी हा आवाज ऐकला.
" आ..आ...आ...हा..हा..!" खर्जातल्या आवाजात तो सैतान विव्हळला..
धन्याच्या काळजीपोटी रिना-शलाका दोघीही त्याच्या जवळ पोहचल्या.
त्याचा भाजलेला पांढराफट्ट हात हातात घेऊन रुपवतीला धारधार दात , पीवळे डोळे दाखवून घाबरवु लागल्या.
" न्हाई , तिला काही करायच नाही!" द्रोहकाल रिना शलाकाला मागे सारत म्हणाला." मेनका ! तुझ्या गळ्यात काय आहे ? काढ ते? काढ!"
द्रोहकालने रुपवतीच्या गळ्याकडे पाहिल. लाल-पिवळ्या दो-यात गोल सुर्यांशी लॉकेट अडकवलेला होता.
" मेनका काढ तो लॉकेट! हे बघ मी तुला नेहायला आलोय ना ! मग काढ पाहू तो लॉकेट !" द्रोहकाल अगदी प्रेमाने खालच्या स्वरात बोलु लागला-बोलता बोलता त्याच्या डोळ्यांच्या कडा लाल मण्यासारख्या चमकल्या , त्या लाल डोळ्यांमधोमध पाहता रुपवती संमोहिंत झाली..
तीचा हात इच्छा नसतानाही यंत्रवत हालचाल करत गळ्याभोवती जाऊ लागला.त्याच वेळेस " रुपाऽऽऽऽऽ! तो लॉकेट काढू नकोस ! "
युवराज मोठ्याने ओरडून बोलले.त्या आवाजाने रुपवतीचा संमोहीताचा पगडा तुटला.
" मेनका , काढ तो लॉकेट हे बघ त्याचा ऐकू नकोस !"
" नाही ! " रुपवतीने नकार दर्शवला." मेनका नाही ..माझ नाव रुपवती आहे ! कळल ..! आणी मी हा लॉकेट कधीच काढणार नाही!" रुपवती आपल्या मतावर ठामपने ऊभी राहीली.
" नाही काढणार!" द्रोहकाल थंड स्वरात उच्चारला.त्याने हलकेच तिरकसपणे मागे उभ्या रिनाकडे पाहिल. तशी रिना कुत्स्कि हसली .
तिने आपल्या शरीराची झटपट वेगवान हालचाल केली. मागे वळुन पाहिल..मागे पाहताच तिच्या शरीरावरची सर्व त्वचा गळून खाली पडली.आता समोर एक आठफुट गोल चकचकीत डोक्याच,टपो-या लालसर डोळ्यांच,वाकडया नाकाच,वासलेल्या जबड्याच-ज्यातून चार सुळे दिसत होते,आणि हाता-पायाची नख अगदी पौलादी सारखी वाढलेली असुन तपकीरी शरीराच्या हातांखाली दोन मोठी पंख दिसत होती. समोर असल आवाक्या बाहेरच दृष्य पाहुन,मेघा किंचाल्ली.
" आऽऽऽऽऽऽऽऽ!" तिची किंकाळी ऐकून रिना धारधार दात दाखवत हसली,तिचे लालसर डोळे चमकले जात-तिने आपल्या धारधार नखांच्या हातात मेघाचा हात धरला व दोन्ही पंखामार्फत वर हवेत उडाली..मग महालाची वरची भिंती धाडकन एक मोठ भगदाड पाडत तिला बाहेर घेऊन गेली.
" मेघाऽऽऽऽऽऽऽऽऽ!" युवराजांची किंकाळी...
"
" हा आवाज तर युवराजांचा वाटत आहे!" समर्थ महालापासुन जेमतेम पन्नास मीटर अंतरावर होते . की हा आवाज ऐकून ते महालाच्या दिशेने धावलेच.

" काढ तो लॉकेट मेनका ! काढुन टाक! हे बघ मला ह्या सर्वांशी काहीही घेण देन नाही, मला फक्त तु हवीयेस ! " रुपवतीची चलबिचल सुरु झालेली -ती कधी द्रोहकाल कडे तरी कधी त्या बाजुला अंधारात उभ्या चाकर गडी मांणसांकडे पाहत सुर्यांशी लॉकेटवरची पकड गच्च धरुन ठेवत होती." काढ तो लॉकेट मी सर्वांना सुखरुप सोडून देईल ! काढ..!:" द्रोहकाल ने ह्यावेळेस शलाकाकडे पाहिल , त्याचा तो इशारा समजुन शलाकाने अमानवीय वेगासरशी -रुपवतीच्या मागे असलेल्या महाराणींना पकडल.
" आं!" महाराणींच्या देहाला शलाकाच थंड स्पर्श झोंबला.
" बस्स झाल आता प्रेमाने समजावन ! काढ तो लॉकेट? नाहीतर ती म्हातारी संपली समज ! " द्रोहकालचा स्वर उंचावला. शलाकाने हलकेस
आपला जबडा वासल.त्यातुन चार सुळ्यासारखे दात बाहेर आले जात महाराणींच्या मानेत घुसले -एक थंड आस्वाद ,नी मग महाराणींची शेवटची एक किंकाळी घुमली.
" आऽऽऽऽऽऽऽऽ!"
" आईसाहेब !" महाराणींचा निर्जीव देह जिन्यावरच्या पायरींवरुन ..
घरंगळत खाली आला.सर्वकाही अगदी सेकंदाच्या काट्या गणिक घडल.
" शलाका , किती ती घाई! जरा थांबली असतीस तर !"
" काय करु नाथ ! ह्या म्हातारीच आणि माझ खुप जून वैर होत.! ना!"
रुपवतीच्या पायांजवळ सताड उघड्या डोळ्यांनी तिच्याकडे एकटक पाहानार महाराणींच प्रेत पडलेल , रुपवती हलकेच खाली बसली, तिने डोळे बंद केले , त्या बंद डोळ्यांतुन एक अश्रु हळकेच बाहेर आला
आपल्या मातेच अंत झाल ! हे अस? एका क्षनिक, साध शेवटची भेट सुद्धा न होऊ शकली ? हा असा भयानक अंत? तो ही शलाकाकडुन?एकेकाळी ज्या मुलीला महाराणींनी आपल्या मुलीसारखी वागणूक दिली होती-त्या शलाका कडून?रुपवतीचा क्रोध उफाळून आला, काय कुठली मैत्रि ! विसरुन गेली ती की शलाका माझी आवडती जवळची मैत्रिण होती. शलाका आपल्या बोटांना लागलेल -रक्त चाटत एक-एक पायरी उतरत खाली येऊ लागली. दोन पाय-या सोडून तिस-या पायरीवर महाराणींच्या प्रेताजवळ रुपवती खाली मान घालुन बसलेली. एक-दोन -मग शेवटी तिस-या पायरीवर शलाकाने पाऊल ठेवल - तोच खाडकन रुपवतीने आपले डोळे उघडले , संतापुन उठलेल्या लाल बुंद डोळ्यांना बाजुलाच एक तलवारी खाली पडलेली दिसली- रुपवतीने अगदी वेगाने
ती तलवार हाती घेत हवेच्या वेगाने जागेवर ऊभी राहत ,तलवार असलेला हात वेगाने मागे घेऊन जात तिप्पट वेगाने पुढे आणत शलाकाच्या पातळसर पांढरट कमरे मधोमध असलेल्या पोटात घुसवली..ही सर्व घटना इतक्या जलद गतीने घडली, की काहीक्षण द्रोहकालच्याही अंगावर सर्रकन काटा उभा राहीला. तलवार पोटात जाताच शलाकाच्या तोंडातुन कालसर रक्ताची गुलनी बाहेर पडली. त्यातच रुपवतीच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे तीच सर्व शरीर सेक्ंदात राखेत रुपांतरीत झाल .
" शलाकाऽऽऽ ! " द्रोहकाल मोठ्याने ओरडला.
" हे काय केलस तु मेनका? तुझ्या बहिणीला मारलस !"
" नाही , ही माझी बहिण नाही ! सैतान आहे ! आणी तु ही एक सैतान आहेस !"
" हो आहे मी सैतान , पन माझ खुप प्रेम आहे तुझ्यावर ! हे सर्व मी तुझ्यासाठीच तर केल ना !" द्रोहकाल ..
" माझ्यासाठी! " रुपवती काहीक्षण थांबून पुढे म्हणाली."माझ्यासाठी म्हंणू नकोस क्रुर चांडाळा, तु पापी आहेस ...मी नाही ! तुझ जर माझ्यावर प्रेम होत ? तर मग ह्या बाकी मांणसांचा काय दोष होता ज्यांना तु मारलस? माझ्या आईसाहेबांची काय चुकी होती?
माझ्या भावाची पत्नी तिची काय चुकी होती? सांग मला ? " रुपवतीच्या प्रश्नांवर द्रोहकालही काहीक्षण गप्प राहीला-साक्षात सैतान, अंधकारराजक गार झाला -एका स्त्रीपुढे.
" तु..हे सर्व माझ्यासाठी केलस ना ?" रुपवतीच्या डोळ्यांतुन घळाघळा अश्रु बाहेर पडले, गळ्यात काही अटकल्यासारखे शब्द अटकू लागले .
" मी हवीये ना तुला .अं..हा ? माझ्यासाठी तु माझ्या आईचा जिव घेतलस ना ! हा? माझ्यासाठीच ना ! " रुपवतीच्या हातातील तलवार
तिने दोन्ही हातांत पकडली-
" हे सर्व माझ्यामुळे झाल? इतक्या सर्व मांणसांचा बळी, माझ्या भावाच सुख सर्वकाही मझ्यामुळे हिरावल गेल !" रुपवतीने हलकेच हातातली तलवार वर नेली-तलवारीची पात तिच्या पोटाच्या दिशेने होती..पुढे काय होईल?रुपवतीच्या मनात काय आहे हे सर्व द्रोहकाल-युवराजांना कळाल गेल.
" रुपा नाहीऽऽऽऽऽऽ!"
" नाही मेनकाऽऽऽऽ !" खाली पडलेले युवराज द्रोहकाल दोघेही एकाचक्षणी ओरडले .रुपवतीच्या हातातली तलवार अगदी वेगाने पुढे येऊ लागली-कोणत्याही क्षणी विषारी डंखमय पात रुपवतीला ड़सणार की तोच द्रोहकालने तिच्या प्रेमापोटी अक्षरक्ष अमानविय झेप तिच्या दिशेने..घेतली ! इकडे महालाच्या दारात उभे असलेल्या समर्थांनी हे पाहिल! मित्रांनो दिसत तस कधीच नसत ही म्हंण इथे लागु होते ! कारण समर्थांना तो सैतान रुपवतीला मारण्यासाठी जात आहे अस वाटल. त्यांनी आपल्या हातातील ते रुद्राक्ष अगदी वेगाने त्या सैतानाच्या दिशेने सोडले . रुपवतीच्या हाती असलेली तलवार पात पोटाला इजा करणार की द्रोहकालने मध्येच ती रोखली , परंतु तेवढ्याच त्याचक्षणि
त्यावेळेत द्रोहकालच्या पाठिवर मागुन येणा-या रुद्राक्षांचा वार झाला..
रुद्राक्षांच्या शक्तिशाली वाराने द्रोहकालच्या सर्व शरीरास धक्का बसला जात रुपवतीच्या पोटात तलवारीची पात अगदी वेगाने घुसली..!
" आं..!" रुपवतीच्या तोंडून लाल रक्त बाहेर पडल , सेकंदा गणिक
शरीरातल प्राण निघून गेल, सर्व शरीर कस-जड जड झाल ..निर्जीव
वस्तुप्रमाणे! रुपवतीच्या प्राण नसलेल्या शरीराला द्रोहकालने हलकेच स्पर्श केला - तेवढ्या वेळा पुरता न जाणे का परंतु साक्षात देवाच सुरक्षा कवचही अक्रीत पावल. सुर्यांशी लॉकेट असुन सुद्धा-द्रोहकालने रुपवतीला स्पर्श केल. रुपवतीची काडीचीही हालचाल होत नव्हती..
तलवारीची पात विंचवासारखी डंख मारुन आपल काम फत्ते करुन गेली होती.
" मेनका ! मेनका !" द्रोहकालने रुपवतीचे गाल हलकेच थोपटले..परंतु कसलेही प्रतिउत्तर येत नव्हते.
" रुपा-रुपा !" आपल्या बाहिणीच्या काळजीने युवराज तिच्या जवळ पोहचले , परंतु द्रोहकालने त्यांना एक अमानविय धक्का दिला, त्या धक्क्याने ते थेट मागे उडून हॉलच्या फरशीवर पड़ले.
द्रोहकालने हलकेच एक गिरकी घेतली , समोर समर्थ उभे होते.
" तु...? तुच ! तुझ्याचमुळे माझी मेनका मरण पावली! " द्रोहकालच्या डोळ्यांत रक्तासारखा लाल रंग उमटू लागला.हाता-पायांचा आकार वाढु लागला कोट,काळी पँट-चकचकीत बुट फाटले गेले ! आता समोर काहीतरी वेगळच उभ होत . एका मानवा ऐवढ वटवाघळुच केसाल डोक,नाक आत गेल होत, लांब मोठे सशासारखे कान , लाल रक्त निखा-यांसारखे रागाने वटारलेले डोळे,जे पाहताच पाहणा-याच्या च्या मनात भय निर्माण होईल, जबडा रक्ताच्या लालसेने वासलेलाच होता त्या जबड्यातुन त्या सैतानाचे सुळ्यासारखे चार धार धार दात दिसत होते.खालच शरीर हात-पाय- सर्व काही बलदंड फुगीर असुन त्यावर काळ्या रंगाचे केस उगवलेले, हातांवर पोलादासारखी धार असलेली नख होती जणु सावजाच काळीज उपटून खाईल.आणि पाठीमागे डावी-उजवीकडे दोन मोठे काळ्या रंगाचे पंख उघडलेल्या अवस्थेत दिसत होते.
" तु हरामखोर ! " द्रोहकालचा खोल खर्जातला आवाज! संम्ंद महाल थरथरुन उठला ! भिंती शहारल्या गेल्या -" तु मध्ये आलास ! तुझ्यामुळे माझी मेनका मरण पावली माXxxxxत! तुझा जिव घेईल मी ! हरामखोर !" द्रोहकालने आपल्या बदलेल्या रुपासहित पंखामार्फत हवेतुन उडत समर्थांच्या छातीवर एक धक्का दिला...त्या प्रहाराने समर्थ वीस मीटर मागे असलेल्या हॉलच्या भिंतीवर जाऊन आदळले. पाठीचा मणका तूटला गेला. अखंड वेदना झाल्या . द्रोहकाल अमानविय वेगाने
समर्थांजवल पोहचला-आपल्या धारधार नखांच्या केसाळ पंजाने त्याने समर्थांची मान धरली ! भिंतीला पाठ घासवत समर्थांना जमिनीपासुन
पाचफुट वर हवेत उचलल. त्या अखंड ताकदवान मुठीने त्यांच श्वास रोखला गेला-समर्थ आपले पाय आपटू लागले.-की तेवढ्यात समर्थांनी
आपल्या हाताच्या दोन्ही मुठी गच्च आवळल्या-तसे त्या मुठींमध्ये एका पाठोपाठ रुद्राक्ष कड्याप्रमाणे येऊन बसले . समर्थांनी तेवढ्या वेळेतच आपल्या हातांची वेगवान हालचाल केली , बंद मुठींच्या दोन जोरदार पंच द्रोहकालच्या वटवाघळू चेह-यावर चढल्या , पन त्या वाराने तो सैतान अजुनच चवताळला. लोखंड घासावा तशी घशातुन घरघर्र बाहेर पडू लागली.त्या सैतानाने समर्थांना आता हॉलच्या उघड्या दारातुन अलगद बाहेर फेकल .मातीतुन , दगड-गोट्यातुन सरपटत समर्थ बाहेर पडले, ते थेट बागेतल्या हिरवळीवर !
" उठ, उठ ..भटूरड्या उठ! " महालाच्या चौकटीत उभ राहून तो सैतान समर्थांना बोलु लागला-अखंड वेदनारहिंत असुन सुद्धा! समर्थांनी एक कटाक्ष त्या सैतानावर मग हळूच थोडवर आकाशात टाकल..सुर्याची किरणे उभा आसमंत डोकावून पाहत होती .समर्थांना एक युक्ती सुचली.
कसबस हात पाय टेकवुन समर्थ ऊभे राहीले.चेहरा माती आणी रक्ताने माख्ला गेलेला. समर्थांनी आपला एक हात उंचाऊन हाताची पाचही बोट विशीष्ट प्रकारे हलवुन त्या सैतानाला आवाहन केल
ज्याने तो सैतान चवताळुन उठला .
" आ...!" क्रोधहिंत होत त्या सैतानाने दारातुन अक्षरक्ष एक अमानविय उंच झेप घेतली. हवेतच त्याचा जबडा वासला,वटारलेल्या डोळ्यांतुन
आग बरसली, हाताचा पंजा समर्थांचा काळिज उपटून काढण्यासाठी..
पुढे झाला. समर्थांनी हलकेच डोळे बंद केले -कोणत्याही क्षणी मरण निश्चित असल्याप्रमाणे-परंतु अचानक वेळेची मिती पलटली, राझगड
महालाच्या वरुण गोल भगव्या रंगाचा ,सूर्यभान अक्षरक्ष धावून भक्ताच्या मदतीला आला -सेकंदाच्या गणिक वेगेलाही लाजवेल अस वेग घेऊन सुर्याच्या किरणांनी त्या सैतानाला हवेतच गाठल....एक जोरदार धडक ,त्रिकाल शक्तिशाली धडल -द्रोहकालला बसली..
चट,चट आवाज करत सर्व देह भाजून निघाल -केस करपुन जळाले..दुर्गंध पसरला-हाता पायांच्या त्वचेने पेट्रोल ओतल्याप्रमाणे पेट घेतल!
" आ,आ , आ ,आ, ...! तु मध्ये आलास ..आ,आ,आ,..! तुझ्य्यामुळे माझी मेनका ! मला मिळाली नाही! आ,आ,आ,.
मी परत येईन! दोनशे वर्षांनी मी परत येईन ! पुन्हा हाच दिवस उगवेल..! तेव्हा पाहू? कोण-कोणावर भारी...पडत?
माझी मेनका ..पुन्हा पून्नरजन्म घेईन ..! मी येईन ..मी..परत येईन..समर्थ

आ,आ,आ,..! बदला ,बदलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" शेवटचा स्वर कमी-कमी होत गेला..!



चट,चट..निखारे उडवत त्या सैतानाची चिता जळुन राख झाली!
समर्थांनी सर्व शरीर खाली झोकून दिल.कारण-कारण त्या द्रोहकालची एक धार धार नांगी ..! समर्थांच्या ह्दयाला फाडून त्यात घुसली होती..

" समर्थ! " युवराज त्यांच्या जवळ आले!
" मी ठिक आहे ! " समर्थ जरासे हसले. " त्या सैतानाच अंत झालय , आता राहाजगड मुक्त आहे गावक-यांनो ! आनंद साजरा करा ..!"
समर्थ म्हणाले! समंद राहाजगड गावचे लोक महालाभोवती जमलेले..
.त्यांच्या चेह-यावर हे वाक्य ऐकुन आनंद जणु उफालून वर आला.
" पन समर्थ , तो म्हणाला की!" युवराजांचा हे वाक्य ऐकून समर्थांनी त्याचा हात घट्ट पकडला.
" युवराज दोनशे वर्षाची चिंता आता कशाला ! " समर्थ पुन्हा हसले..
" जर तो आलाच तर आम्ही ही तैयार असू! पन आता ते सोडा..!
आपल्या पित्याच स्वप्न पुर्ण करा ! ह्या राहाजगड गादीवर तुम्ही बसा ! "
" म्हंणजे बाबासाहेब !" युवराजांना ह ऐकुन सुद्धा असहनीय यातना झाल्या.
" युवराज! जे झाल ते एक स्वप्न म्हंणुन विसरुन जा! महाराणी, युवराज्ञी, सर्वांची समाधी इथे बांधा , चिंकीच्या बाजुला ! " समर्थांच्या मागे बागेत एक गोल काळ्या रंगाच पोर्टल तैयार झाल.. ! त्या पोर्टलमधुन ..समर्थांन सारखी भगवे कपडे परिधान केलेली मांणस बाहेर पडली.
" चला मित्र युवराज ! आमच्या निघायची वेळ झाली! " समर्थांनी हलकेच आपला हात त्यांच्या कपाळावर ठेवला ..! डोळे बंद केले..व काहीवेळाने उघडले..नकळत समर्थांनी तो सैतान दोनशे वर्षांनी परत येइळ आणि मेघाची ही स्मृती काढुन घेतली .
समर्थांना आधार देत दोन शिष्यांनी त्यांना उभ केल.
" चला युवराज ! येतो ..! तुमच्या लग्नाच निमंत्रण..द्यायला विसरु नका हं!" समर्थांनी युवराजांकडे हसून पाहिल मग मागे उभ्या ....प्रजेला हात दाखवत..ते पोर्टलच्या दिशेने निघुन गेले .. व तो पोर्टलही बंद झाला ..


महाराजांच्या इच्छेनुसार युवराज राहाजगडची गादी सांभाळु लागले दोन वर्षानंतर त्यांनी समर्थांना आमंत्रण देऊन लग्नही केल.
युवराजांचा स्वभाव चांगला असल्याने प्रजाही सुखी राहू लागली..
................
आणी अशाप्रकारे
.
चाप्टर # 1 अंत...झाल...



समाप्त ..





XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
चाप्टर #2 ड्रेक्युला बदला ...

झळक...2024....


.आज ..वर्तमानकाळ...

" हुश्श्श! वाचुन झाली बाबा ही कांदबरी एकदाची "
अस म्हंणतच ती लायब्रेरीतुन ..उठली! अंगात एक ब्लैक टी-शर्ट..खाली ब्लैक जीन्स पेंट, काळे केस ..! पांढरट दुधाल शरीर-आणि गोल चेह-यावरच्या पाणिदार डोळ्यांवर एक काला स्टाईलिश..चष्मा

आणी ती हुबेहुब युवराज्ञी रुपवतीसारखी दिसत होती.
टिंग,टिंग ,टिंग आवाज करत तिचा मोबाईल वाजला...

" आं..! आले मम्मे..! आलीच बस्स निघतेच ना !" अस म्हंणतच तिने..
तो पुस्तक उचल्ल..व लायब्रेरीतुन बाहेर पडली..



trailer...






तर मित्रांनो आज ...आताह्याक्षणी चाप्टर 1 संपल आहे..!
ह्या कथेला सुरुवाती पासुन कंमेट करणा-या
सर्व ..वाचकांच मनापासुन आभार मानतो.

Rate & Review

Swati Irpate

Swati Irpate 2 weeks ago

Santosh Awasthi

Santosh Awasthi 4 months ago