Maharashtra To Karnataka - 3 books and stories free download online pdf in Marathi

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ३

संध्याकाळची वेळ होती. मी बेडरूममध्ये बसून संगणकावर माझं खाजगी काम करत होतो. बेडरूमच्या दरवाजाला कडी लावली होती. कामात व्यस्त असताना मला रियाचा फोन आला. आता कोणते काम निघाले ?
"नमस्कार ! मी काय सेवा करू तुमची ?" काही क्षणापूर्ती मला जणू मी कष्टमर केअरमध्ये कार्यरत असल्यासारखे भासवले.
मी जेमतेम वीस मिनिटे तिच्याशी गप्पा मारीत होतो अचानक माझ्या बेडरूमच्या दरवाजावर धाडsss धाड असे ढोकले. तिला निरोप देत मी पटकन फोन ठेवला. दरवाजा उघडला. 'मिस्टर फादर' होते, ते कंबरेला टॉवेल गुंडाळून होते. हे ऑफिसहून केव्हा आले ? मला देखील समजले नाही.
"काही काम....?"
"काम आहे थोडं बोलूया आपण ! चालेल ना तुला ?" ते बेडवर बसले.
"हो हो का नाही"
"उद्याचा तुझा प्रोग्राम काय आहे ?" त्यांनी डावा पाय उजव्या पायावर घेतला.
माझ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे होते. आता उद्या माझा काय प्रोग्राम असावा ? सकाळी उठावं नि कॉलेजला निघावं. पण हे असे प्रश्न का बरं विचारत आहे ? काही उफाळून तर घेत नाही ना ?
"माझा उद्या प्रोग्राम असा काही नाही ! उद्या उठाव आणि कॉलेजला जावं"
"तसं नाही कोणाला वेळ वगैरे तर दिला नाहीस ना"
"मुळीच नाही"
"बरं मग एकदा उद्या ऑफिसला ये आपण जरा महत्वाच्या कामावर बोलूया म्हटलं, बरं. ... तुझं लिखाण कुठपर्यंत आलं"
"सध्या सुरू आहेच पूर्ण झालं की तुम्हाला नक्की सांगेनचं"
"ते तर मी पाहतो आहेच"
मम्मा ने बेडरूममध्ये प्रवेश केला. तिच्या चेहऱ्यावरून मला असे वाटले की मी काही कुठे गोंधळ केला की काय ?
"आता काय गोंधळ घातला ?" मम्मा ने त्यांना विचारले.
" हे बघ लक्ष्मी हा माझा मुलगा आहे 'माधव राणे' जे तू गोंधळ वगैरे म्हणत आहेस तशातल्या हा मुलगा नाही"
"होय काय ? तुमच्या मुलाला तुम्ही सोनं समजू नका शहाणा शहाणा बोलून तुमच्या हातावर तोरी नाही दिली म्हणजे झालं" ती राग व्यक्त करत म्हणाली,
ती स्वयंपाकाच्या दिशेने वळली.
"माधव नक्की ना पोरींच्या नादाला लागत तर नाही ना ?"
"'मिस्टर फादर' मी कॉलेजमध्ये मुलींसोबत असतो."
"मुलींसोबत राहणं चुकीचे आहे असं म्हणत नाही पण वाईट मार्गाला जाऊ नकोस"
"तुम्ही अजून खूप जुन्या विचाराचे आहात तुम्हाला लेटेस्ट व्हावं लागेल"
फादर हसू लागले.
सकाळची वेळ होती. साधारणतः दहा वाजले होते. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावले होते.'मी फारसा वेळ न काढता तातडीने रियाला कालच फोन करून आज न येण्याचे सांगितले होते. तिने काय करावे ?
"मी पण येते तुझ्यासोबत !"
"नक्की ये पण माझी अशी एक अट आहे की तुझा पोशाख आज बदलायला हवा एकदम सादेपणा असायला हवा."
"येस लव्हली....येते घालून" तिने चिडत फोन ठेवला.
त्यांना असे अद्यायावत झालेले पोशाख मुळीच आवडत नाही विशेषतः मुलींसाठी. मी दादर स्टेशनजवळ येऊन थांबलो होतो. पाऊण तासात येणारी मुलगी अजून तिचा पत्ता नव्हता. अकरा वाजायला आले होते. पाऊस पडण्याचा बेत दिसत होता. चेहऱ्यावर थोडा घाम फुटत होता. आजूबाजूला रस्त्यावरून चालणारी वर्दळ पाऊस पडायच्या अशी पशार होण्याचे पाहत होते.
एक टॅक्सी माझ्या पुढत येऊन थांबली. टॅक्सीचा दरवाजा उघडत डावे पाऊल जमिनीला टेकवले. बाहेर आली. टॅक्सी वाल्याचे बिल चुकते करत माझ्याजवळ आली.
"चलो मिस्टर लव्हली..."
ती माझ्या समोर उभी होती. पायाच्या बोटापासून मी तिला निरखून पाहत होतो. ती काळ्या पंजाबी पोशाखात खूपच छान दिसत होती. मेकअप तर मुळीच नव्हता केला. अगदी साध्या रुपात.
"मिस्टर लव्हली ? लव्हली इथपर्यंत ठीक आहे"
"मग काय झालं...तुला कुठे टोचले का बोलल्यावर ?" ती हात पकडून पाऊले उचलत म्हणाली,

संवाद साधत आम्ही तिकीट काउंटरवर पोहोचलो. भली मोठी रांग पाहून विना तिकिटाचे गेलेले बरे. ह्या रांगेत आम्हाला किमान अर्धा तास तरी थांबावे लागणार होते. पण करायचं काय? मी रांगेत थांबलो होतो.
"अरे एवढा वेळ तू रांगेत थांबणार आहेस का ? चल विना तिकिटाचे जाऊ, नाहीतर एवढ्या भशाड गर्दीत आपल्याला तिकीट कोण विचारणार आहे."
"रुल्स मिन्स रुल्स ! आपल्याला 'अंधेरी' तिकीट काढायची आहे"
तिने कपाळाला हात लावला. इकडे तिकडे पाहू लागली. बाजूला इ वी एम मशीन होत्या. त्यावर
माणसे तिकिटे काढत होती. तिचे डोके काय चालले कुणास ठाऊक ती त्या इ व्ही एम मशीन जवळ गेली. साधारणतः साठ वर्षांची व्यक्ती तिकीट काढत होती. त्यांना विनंत्या करून दोन तिकिटे काढली. स्वतःकडचे पैसे त्या साठ वर्षाच्या व्यक्तीला दिले.
"चल तुझ्याने ही कामं नाही होणार" कपाळावर आलेले केस मागे सरत म्हणाली,
रांगेतून तिने मला बाहेर खेचले. माझ्या मागे उभी असलेली व्यक्ती मला पाहून हसत होती. पण मी ना ती माझ्या परिचयाची. 'प्लॅटफॉर्म' क्रमांक एक' भराभर पाऊले उचलण्यास सुरुवात केली.
"एवढ्या रांगेत तू कसा काय उभा राहिला असतास ?" ती माझ्या सोबत पाऊले उचलत म्हणाली,
"काही पर्यायच नाही आणि तुझ्यासारखं हे कृत्य मी नाही करू शकत"

आता तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊन मी कंटाळलो होतो. प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आम्ही पोहोचलो. माणसांची वर्दळ भरपूर होती. सामान्य डब्याजवळ आम्ही उभे होतो. परिस्थिती पाहून धक्का बुक्की होणार होती हे मला आधीच माहीत झालं होतं. जो तो प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा बेतात होता. मी दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवून उभा होतो . ट्रेनचा गती धीमी होत गेला तसे प्रवासी सैरावैरा आत शिरले. कसेबसे आम्ही चेंगरा चेंगरीतून आत शिरलो. आतमध्ये कुठेही मोकळी जागा माझ्या नजरेस पडली नाही. सगळ्या सीट तुडुंब भरलेल्या होत्या. कदाचित उभ्याने प्रवास करावा लागेल. मोठा आवाज करत ट्रेन पुढे सरली.
"इतका वेळ आपण उभा राहणार आहोत का ?"
ती इकडे तिकडे पाहत म्हणाली,
"धीर धरावा लागेल आपल्याला"
तिला बाजूला उभे करून तिच्या समोर मी उभा होतो. तिने माझ्या कंबरेला पकडून ठेवले होते.
एक विवाहित व्यक्ती आम्हाला पाहत होती. तो असा आम्हाला का पाहतोय ? जणू आम्ही कोणती चोरी केली आहे. पुढचे स्थानक येताच प्रवासी जीव तोडून धक्का मारीत बाहेर जात होते. त्यात तीन जागा रिक्त झाल्या तसे आम्ही तिकडे जाऊन विसावलो.
तिने सुटकेचा सुस्कारा सोडला.
"एवढ्या गर्दीतून येणे म्हणजे खूप धोकादायक" ती ओढणी सावरत म्हणाली,
शाळा- कॉलेज चे तरुण तरुणी ट्रेनमधून प्रवास करीत होते.
" बाय द वे ! आपण कोणत्या कामासाठी चाललो आहोत ?"
"माझ्या खाजगी कामासाठी"
"मला सांगू शकत नाही का ?"
"इथे नाही सांगू शकत"
मी तिच्याशी बोलण्याचे खूप टाळत होतो. कारण समोर बसलेल्या प्रवाशांची तीव्र नजर आमच्यावर खिळत होती. त्याचे तिला काहीच वाटत नव्हते पण मला विचित्र वाटू लागले होते.
पाऊण तास आमचा प्रवासात गेला. 'अंधेरी' स्थानक येताच आम्ही लगबगीने उतरलो.
इथे तशी गर्दी नव्हती. रिक्षा स्टँड गाठले. 'सुमित पार्क' म्हणताच त्याने रिक्षा चालवायला सुरुवात केली.
"आपल्याला कोणी तिथे काही विचारपुस तर करत राहणार नाही ना"
"डोन्ट व्हॅरी ! आपल्याला 'मिस्टर फादरांना' भेटायला जायचंय ऑफिसच्या मालकाला नव्हे."
तिला कोणाचातरी फोन आला ती शिवीगाळ करत बोलायला सुरू झाली. रिक्षा चालक आरशातून तिला पाहत होहत तिचे बोलणे ऐकत होता. कन्नड भाषा ह्या वाहन चालकाला काय समजतेय ? तिचा सुर तीव्र होत चालला होता. तिच्या खांद्याला मी मारत ' हळू बोल ' असा इशारा केला. डोळ्यासमोर गाड्यांची गचाड गर्दी दिसू लागली.
"आपण पोहोचायचे केव्हा ?" ती फोन कट करत म्हणाली.
"मॅडम जी सिग्नल लगा है !" रिक्षा चालक मान फिरवीत म्हणाला,
गाड्यांचा कर्कशssss आवाज ऐकून माझ्या कानाचे पडदे हलू लागले होते. रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला पुढे जायची घाई. सिग्नल सुटला. गाड्या वेगाने धाव घेऊ लागले. अवघ्या दहा मिनिटात 'सुमित पार्क' जवळ आम्ही पोहोचलो. रिक्षा चालकाला चाळीस रुपये हातावर टेकवले. पार्क भलं मोठं उंच होते. निळ्या काचाने भरलेले होते. जणू आकाशच खाली आले होते. प्रवेशद्वारावर पहारेकरी प्रत्येक व्यक्तीची कठोर तपासणी करत होते. आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो.
"लेडीज उजव्या बाजूने......" एक पहारेकरी महिला उजव्या दिशेने निर्देश करीत म्हणाली,
"कुठे जायचे आहे ?" एक पहारेकरी मला म्हणाला,
"फ्लोअर नंबर सेकेंड ! रूम नंबर 205"
त्याने मान हलवत माझ्या शरीराला एक मशीन लावली.
मी आत शिरलो. परंतु रियाला पहारेकरी आत शिरायला देत नव्हते.
"एक्सक्युज मी ! ती माझ्या सोबत आहे सोडा तिला" तिचा हात पकडून आत घेत म्हणालो.
"कुठे जायचे आहे सर तुम्हाला ?" एक दुसरी महिला म्हणाली,
"आम्हाला सेकंड फ्लोअरला जायचे आहे रूम नंबर 205"
"ठीक आहे ! त्या काउंटरजवळ जाऊन तुमचे नाव नोंदवा मग तुम्ही जा"
"आम्ही काउंटरवर पोहोचलो आमचे छायाचित्रण काढून त्यांनी नाव नोंदवले.
"तुम्ही जाऊ शकता" काउंटरवरचा एक तरुण म्हणाला,
पहारेकरी शिस्तबद्ध होते. चोराला आत यायचे म्हटले तर त्याला दहा वेळा विचार करावा लागेल. लिफ्ट मध्ये शिरलो.
"काय च्युतीयाचा बाजार आहे हा ती सिक्युरिटी मला फ्लोअर नंबर विचारतेय" ती हसत म्हणाली.
"नो ! ते त्याची ड्युटी करत आहेत"
लिफ्टमधून बाहेर आलो. रूम नंबर 205 हुडकू लागलो. डाव्या बाजूला चौथी रूम.
"थांबा थांबा ! कोण तुम्ही ? कोणाला भेटायचे आहे ?"
तिने कपाळाला हात लावला.
"अहो आम्ही...."
"अ.....आम्हाला सुयश सरांना भेटायचे आहे"
मी तिचे बोलणे रोखत म्हणालो,
"काय काम आहे तुमच्याकडे काही अपॉइंटमेंट लेटर आहे का ?"
मला खरंच काही कळत नव्हते. मी स्वप्न तर पाहत नाही ना ? कमाल आहे. स्वतःच्या जन्मदात्यांना भेटायलासुद्धा अपॉइंटमेंट लेटर ?
"हे पहा आमच्याकडे असं काहीही नाही"
त्यांच्या शेजारी एक काळा कोट घालून तरुण होता. देहाने दणकट होता. भली मोठी दाढी. गोल चेहऱ्याचा, स्थिर नजरेने मला पाहत होता. तो जागेवरून उठला नि माझ्याजवळ चालत आला.
"तुमचे नाव सांगा ?"
"मी माधव......."
"अहो...संपूर्ण नाव सांगा"
"माधव साने"
रिया विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागली.
"बरं दोन मिनिटे मी त्यांना फोन करतो"
बाजूला लांब लचल लाकडी टेबल होता. त्यावर दोन टेलिफोन होते.
"सर.... माधव साने नावाचे कोणी तुम्हाला भेटायला आले आहेत" तो काही क्षण तसाच स्तब्ध होता. माझे आडनाव खोटे सांगितले.
"सॉरी मी तुम्हाला आत नाही पाठवू शकत ते म्हणत आहे आज अपॉइंटमेंट अशी कोणत्याच व्यक्तीची नाही"
हे मला काही सोडण्यातले नाही. खिशातला फोन काढून त्यांना फोन केला.
"सर....!"
मी त्या प्युनकडे फोन दिला. तो कावराबावरा झाला.
"जा तुम्हाला बोलावले आहे. चला मी तुम्हाला घेऊन जातो"
त्यांच्या मागोमाग आम्ही चालत होतो.
"अरे हा काय प्रकार आहे ?" तिला प्रश्न पडला.
"सगळं सांगतो....." मी खालच्या स्वरात म्हणालो,
आम्ही केबिनजवळं पोहोचलो. त्या प्युननी दरवाजा ढकलला. फादर आत कॉम्प्युटरवर बसले होते.
"सर....! तुम्हाला गेस्ट भेटायला आले आहेत"
त्याची दृष्टी माझ्यावर पडली.
"गेस्ट ? अरे बबन हा माझा मुलगा आहे, ह्याला तू गेस्ट बनवलंस ? कसं होणार रे तुझं ?"
"सर सॉरी मी तुमच्या मुलाला पाहिले नव्हते कधी" ते चाचपले.
"बरं जा आणि चहा पाणी घेऊन ये ! " "तुम्ही बसा !" ते आम्हाला म्हणाले,
"खोटी ओळख का बरं सांगितली ?"
"असंच ते मला ओळ्खतायत की नाही हे पाहण्याकरिता !"
आम्ही त्यांच्या समोर असलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. ते रियाला निरखून पाहत होते. मी तिच्याकडे पाहून त्यांच्याकडे पाहिले.
"तुझी मैत्रीण का ?" ते माझ्याकडे मान वळवत म्हणाले.
"हो हो.... वेगळा अर्थ काढू नये म्हणजे झालं"
"मी असं काहीच म्हणालो नाही"
प्युन क्षणभरात दोन काचेच्या ग्लासातून पाणी घेऊन येताच आमच्या समोर ठेवले.
"पाणी घ्या मग बोलू"
ग्लास उचलून दोन घोट घेत ग्लास खाली ठेवला. तिने अख्खा ग्लास रिता केला.
"फादर आपण महत्वाच्या विषयावर येऊया का ?"
"बरं.... ! आमच्या ऑफिसमध्ये 'रतन बर्वे' नावाचे एक कर्मचारी आहेत त्याचे मित्र प्रकाशन आहेत' तर कदाचित तुला त्यांच्याकडून काही मदत झाली तर...." हाताजवळ असलेली बेल वाजवली,
तातडीने प्युन आत आले.
"सर...!"
"बबन जरा रतन बर्वेना बोलवा"
"ठीक आहे सर"
ते बाहेर जाऊन त्यांना निरोप देऊन आले. 'रतन बर्वे' आत आले. तरुणच होते. तीस पस्तिशी वयातले असावे. त्यांनी सफेद शर्ट आणि राखाडी पॅन्ट घातली होती. उजव्या हातात चमकदार घड्याळ होतं. रंगाने सावळे होते. दोन्ही हात मागे घेऊन सावधान अवस्थेत उभे होते.
"रतन... !"
"जी सर...!"
"हा माझा मुलगा माधव !"
"नमस्कार सर !" मी त्यांना उठून हस्तांदोलन केले.
"जरा सहकार्य करा !"
"हो सर...."
फादरनी मला जाण्याचा इशारा केला. मी त्यांच्या सोबत केबिनच्या बाहेर पडलो. आता मला एक चिंता सतावत होती की नेमके हे काय सांगत आहेत ? मला ते तळ मजल्यावर घेऊन आले. खाली एक प्रचंड मोठे उपहारगृह होते. साधारण बारा टेबल असावेत. वेटर आपल्या पोशाखात होते. प्रथम बाकावर ते बसले, मीही त्यांच्यासमोर बसलो.
"तुझे बाबा मला म्हणत होते की तू लेखन करतोस"
"होय मी लेखन करतो सध्या मी एका कादंबरीच्या कामात आहे"
"बरं माझे एक मित्र आहे ते तुला ह्या बाबतीत नक्की मदत करतील व मी त्यांना तसे सांगूनही ठेवले आहे. "
"फसवणूक...?"
"छेssss छेssss तसं अजिबात करणार नाहीत, आमच्यावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल पण बाबांवर तर नक्की ठेव"
वेटर आमच्या जवळ आला.
"साहेब काय देऊ ?"
"तू काय घेणार ! त्यांनी मला विचारले ?"
"नाही सर मला काहीही नको"
"ठीक आहे एक चहा द्या त्यात दोन करा"
वेटर मान डुलवत गेला.
"तू लिहितोस ठीक आहे पण मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते"
"कोणत्या गोष्टीबद्दल ?"
"तुझे वय खूपच लहान आहे रे म्हणजे तू लिहितोस ह्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही".
"साहेब चहा !" वेटर टेबलावर ग्लास ठेवत म्हणाला,
त्यांनी चहा घेण्याचे मला फर्मावले. त्यांच्या आग्रहाखातर मी चहा घेतला.त्यांनी त्यांच्या मित्राचा मला फोन नंबर दिला. माझी सर्व माहिती त्यांनी आपल्या मित्राला सांगितली होती.
माझं काम तर झालं पण आता पुढची प्रक्रिया काय असावी हे मला मुळीच माहीत नव्हते. मी फादरांना निरोप देण्याकरिता पुन्हा त्यांच्या ऑफिसला गेलो.
"अच्छा ! आम्ही निघतो आता" मी खुर्चीवरची बॅग उचलत म्हणालो.
ती खूप कंटाळली होती. असे तिच्या चेहऱ्यावरचे हाव-भाव मला सांगत होते. तिने फादरांना हात परस्पर जोडून नमस्कार करत हास्य केले. ते हसले.


"तू काय घेणार ?"
आम्ही आफिसच्या शंभर मीटरवर असलेल्या एका डोमिनोजमध्ये बसलो होतो. टेबलांचा आणि खुर्च्यांचा आकार विचित्र गोलाकार पद्धतीत होते. फार तर मला तिथे तरुणीच काम करताना दिसत होते. तरुणांची संख्या कमी होती. निळे टी- शर्ट आणि राखाडी पॅन्ट असा त्यांचा पोशाख होता. डोक्यावर टोपी होती.
"व्हॉट डु यु वॉन्ट ?" एक तरुणी आमच्या पुढ्यात आली.
"मेनू...." मी म्हणालो,
दुसऱ्या टेबलावर असलेला मेनू तिने आमच्या टेबलावर ठेवला.
"चिकन पिझ्झा " ती सरळ बोलून गेली.
ती घड्याळाकडे पाहत होती. एक वाजला होता. ही आमची घरी जायची वेळ असते.
"तू नोव्हेल्स लिहीत आहे ?"
"हो...."
"व्वाव यार मी तुला तर अडाणी समजत होती"
त्यावर मी तिला कोणता प्रतिसाद दिला नाही.
"सर... पिझ्झा !" वीस मिनिटाने पिझ्झा टेबलावर आला.
तिने 'थंड पेय' आणण्यास सांगितले.
"तुला लेखक का बनायचं आहे ?" ती पिझ्झाचा तुकडा मोडत म्हणाली.
"मला लिहण्यास खूप आवडतं ! आय लाईक रायटिंग"
"ही नोव्हेल्स कोणावर आधारित आहेस ?"
"सत्य घटनेवर......!"
तिचे तोंड उघडे झाले. ती विचारात पडली. माझा वर्ग मित्र आहे आणि मी त्याची खरी घटना लिहिली आहे हे फक्त त्याला नि मलाच माहीत आहे. तो एक 'मॉडेल, गायक आहे.
"सत्य घटना... ! रोमँटिक वगैरे आहे का की फक्त रडगाणं आहे"
"मला नाही माहीत जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा तू वाचू शकतेस"
तिने दुसरा पिझ्झाचा तुकडा उचलला.
ती पिझ्झा इतक्या हळू वेगाने खात होती की मला आता इथे बसून कंटाळा आला होता.
"तुझ्या करिअरबद्दल काय ठरवलं आहेस ?" मी डावा पाय उजव्या पायावर घेत म्हणालो,

"ओन्ली मॉडेलिंग" ती हातवारे करीत म्हणाली,
"ओssss मग तर तुला आतापासून श्रम घ्यावे लागतील, मी तुला एक संदर्भ देतो तू समनशी बोलून बघ तो एक मॉडेल आणि गायक आहे कदाचित तो तुला ह्यात सहकार्य करू शकतो"
"समन.....! ठीक आहे मी त्याला ओळखते पण अजून त्याच्याशी अशाबाबतीत चर्चा केली नाही"
मी डावा पाय खाली केला.
'तुझं सौन्दर्य फार छान आहे आणि तुझ्या पोशाखावर ते फारउठून दिसते ! आपण निघुया"
"अरे बस कुठे घरी जाऊन तीर मारणार आहे"
"बरं मी तुला कशी वाटते" ती केस व्यवस्थित करून ऐटीत बसत म्हणाली,
"तू मला एक जणू माझ्या समोर प्रकट झालेली भूत वाटत आहेस" मी थट्टेत म्हणालो,
"शट अप !" ती चिडली.