1 Taas Bhutacha - 4 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 4

The Author
Featured Books
Categories
Share

१ तास भुताचा - भाग 4

4

सत्यघटनेवर प्रेरित....

सूड- भाग 2

" निता...! नितू......! कोठे आहेस ...तु ...?"

... " अहो मी किचनमध्ये आहे ...!"
निताबाई मंदस्मित हास्य करत म्हणाल्या .
कारण हा आवाज विलासरावांचा होता .

" काय ...ग ! काय...करतेस ...?"
विलासराव किचनमध्ये येत म्हणाले ."

" जेवण बनवतिये...! आणी आज तुम्ही लवकर आलात ...? "

" ..हो ...थोड बर वाटत नाही आहे! म्हणून लवकर घरी आलो ...!"
विलासराव आपल्या डोक्याला हात लावत म्हणाले .

" बर...! तुम्ही आराम करा ...! " तो पर्यंत मी जेवन बनवते..!मग जेवन झाल की येते सांगायला ..! मग जेवन करुन झोपा...!

" ठीके ...! "
अस म्हणतच विलासराव निघुन गेले. निताबाई पुन्हा आपल्या कामाला लागल्या.

" बापरे....! येवढ आकाश कधी भरुन आलं...!"
निताबाई किचनच्या खिडकीतून बाहेर पाहत म्हणाल्या .
काहिवेळा अगोदर दिसणारा सुर्याचा प्रकाश आता ह्या क्षणी काळ्या ढगांनी रोखुन धरला होता .वातावरणातली उब जाऊन त्या उबेची जागा अनैच्छिक थंडीने घेण्यास सुरुवात केली होती. काहीक्षणातच बदललेल्या वातावरणाच हे रुप काहीतरी अमंगळ घडणार आहे ह्याची मानवी मनाला चुणूक लावुन जात होत.मणुष्याच्या आकळन क्षमतेच्या पलिकडचे दृश्य होते है..किंवा एक फसवा देखावा....जो किंतू ... निताबाईच पाहु शकत होत्या. काहिवेळाने त्या काळ्या ढगांमधुन पावसाने सुद्धा रप, रप , करायला सुरुवात केली . त्यासोबतच जोराच्या मनभेदरवणा-या विजा एकापाठोपाठ फटाके फोडावे अश्या कडाडू लागल्या. दुर इकडे आकाशातुन एक विज वेडे - वाकडे आकार घेत..... येत.... ...खाली ...जमिनीवर आदळली .काहिक्षण एक भयंकर कानठळ्या बसवणारा आवाज चौहुदिशांस घुमला गेला . त्या आवाजाने तर एकवेळ निताबाईंच्या छातीत कळच उठली.. व त्यांनी पुन्हा एकदा खिडकी बाहेर पाहिल ...आणि त्यांच्या नजरेस पुन्हा एकदा ती काळी साडी नेसलेली बाई दिसली!तोच पांढराफट्ट कसलेही भाव नसलेला चेहर ! तीच काळ्या रंगाची साडी व भर पावसात ती स्त्री ऊभी राहून एकटक निताबाईंकडे पाहत होती.ह्या वेळेस मात्र निताबाईंना भितीच वाटली ...दातखिळीच बसली त्यांची तस त्यांनी विलासरावांना आवाज देण्यासाठी तोंड उघडल परंतु आवाज काही केल्या बाहेर येत नव्हत जणू स्वर घशात अडकले जात होते .पाउले उचलावी तर चिखलात रोवल्या सारखी अवस्था झाली होती .इकडे त्या स्त्रीने आपला एक हात निताबाईंच्या दिशेने केला . पाचही बोट एका विशिष्ट पद्धतीने फिरवत म्हणाली.

" ये .......................ये .......! .......इकड...ये........! "

असंभव मनाला न पटनार दृश्य .150-200 मीटर वर ऊभी असणारी ती स्त्री तिचा आवाज मात्र आपल्या पुढ्यात उभ राहून बोलल्यासारख साफ -साफ ऐकू येत होता . तिचा आवाज कोण्या-सामान्य मनुष्याप्रमाणे नव्हता .एका रोग्याचा ज्याप्रमाने खोळवर गेलेला आवाज असतो त्याच प्रकारे हा आवाज होता . जो ऐकताक्षणीच निताबाईंच्या उरात धडकी भरून आली ...दुपारची वेळ जणू पालटली गेली रात्रीचा ..अंधार पसरला कधीही न पाहिलेले न विचार केलेले दृष्य डोळ्यांसमोर तरळू लागले. एकक्षण तर निताबाईंच्या किचन ची खिडकी जणू , टीवीवर दाखवल्या जाणा-या चित्र-विचित्र भयंकर sci-fi 3d क्लायमेक्स चे सीन दाखवत आहे असच वाटून गेल . निताबाईंच लक्ष अद्याप सुद्धा खिडकीबाहेरच होत , परंतु अंधार काजळीफासल्या सारखा इतका पसरला होता . की पावसाच्या आवाजा व्यतिरीक्त नजरेस काहीही दिसत नव्हत . निताबाईंनी हलकेच आपला शरीर थोड खिडकीच्या दिशेने झुकवल . बाहेर अंधारात काही दिसतय का हे पाहू लागल्या
त्याक्षणीच आकाशात एक विज कडाडली सर्व काही काहीक्षणापुरता का असेना उजळून निघाल आणि पुन्हा निताबाईंना त्या स्त्रीच दर्शन झाल. ज्यासरशी विजेचा प्रकाश नाहीसा झाला गेला तस पुन्हा एकदा काळाकुट्ट कालोख पसरला गेला . इकडे निताबाईंची अवस्था घाबरगुंड्या सारखी झाली होती. भीतिने श्वास घ्यायला जमत नव्हत. भेदरलेल्या नजरेनेच त्या खिडकीबाहेर पाहत होत्या .तस पुन्हा एकदा आकाशात विज कडाडली, सर्व काही ठरल्याप्रमाणे घड़ल
अंधार बाजुला सारल जात तो विचित्र गुलाबी रंगाचा प्रकाश पसरला . पुढच दृष्य पाहुन निताबाईंची अशी काही पाचावर धारण बसली की आ वासूनच त्या पुढच दृष्य एका स्टेच्यु सारख्या थिजल्या जात पाहु लाग्ल्या ती काळ्या रंगाची साडी घातलेली स्त्री हवेत उडतच निताबाईंच्या दिशेने येत होती वेग अमानविय , अफाट, कल्पनेच्या आवाक्याबाहेरच होत ...मणुष्यप्राण्या आकळन क्षमतेच्या पलिकडच होत. पुन्हा एकदा कालोख पसरला सर्व काही अंधारमय झाल पावसाचा आवाज काय तो सुरु होता निताबाई आपल्या छातीवर हात ठेवून उभ्या होत्या, काहीक्षण काहीही झाल नाही , तस पुन्हा एकदा निताबाई खिडकीबाहेर पाहू लागल्या . व त्यांना एक ओळखीचा आवाज त्या कालोखातून ऐकू येऊ लागला .

" निता.....! .....निता .......! "
कोणीतरी प्रेमाने हाकमाराव असं आवाज होतं हे ..!
" ......निता ....कशी आहेस पोरी .....!"
पुन्हा एकदा तो प्रेमळ लाडीगोडी लावून बोलनारा आवाज आला आणि ह्या आवाजासरशी निताबाईंच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले.

" आ....आ..... आई....कू.....कू...कुठे आहेस तु ........?"

निताबाई हूंदके देत आजूबाजूला रडतच पाहत म्हणाल्या..! निताबाईंच्या ह्या वाक्यासरशी अंधार थोडाफार कमी झाला गेला . खिडकीबाहेरुन सफेद रंगाच गडद धुक वाहू लागल .त्या धुक्यात निताबाईंना आपल्या 2 वर्ष्यापुर्वी वारलेल्या माताश्री दिसल्या हिरव्या रंगाची साडी, कपाळावर रुपया येवढा लालभडक कुंकू नाकात नथ , गळ्यात सोन व एक मंगळसूत्र मरणा अगोदर सजवळ्या सारख्या सेम-हुबेहुब तशाच दिसत होत्या परंतु मेलेला मणुष्य कधी परत येतो का... नाही ना...!....मग हे काय होत - हे मात्र निताबाईंना कळायला हव होत .परंतु आई ह्या नावात एक अशी मायेची उब आहे जी मेल्यावर सुद्धा कमी होत नसते. निताबाईंना आपल्या माताश्रींणा पाहुन भावना आणावर होऊ लागल्या, डोळ्यांतुन अश्रूच्या धारा लागो -लाग वाहू लागल्या .एक -एक पाऊल वाढवत निताबाईंच्या मातोश्री नितांबाईंच्या जवळ-जवळ येऊ लागल्या , त्यांच्या वाढणा-या पावलांसरशी त्या कालोख्या रात्री पायांत असलेल्या पैजंणाचा छन, छन, आवाज होत - होता . ज्याने जणू एक भयानक मृत्यूगीत वातावरणात गायल जात होत .दोन -तीन पाऊलांसरशी निताबाईंच्या मातोश्री लेकी जवळ म्हणजेच खिडकीपाशी पोहचल्या, धुक वाढु लागल होत . पाउस पडला होता ह्याची चिन्ह मात्र काडीचीही दिसून येत नव्हती , जणू सर्व काही फेक -खोट, बनावट होत सर्व काही .
" आ...आ...! आई.....क..क...कशी..आहेस तु....! "
डोळ्यांतुन अश्रू गाळतच निताबाई म्हणाल्या.

" मी ठिक है...! तु बाहेर येणा ... मला तुझ्याशी काहीतरी
बोलायचय...?"
निताबाईंच्या मातोश्री म्हणाल्या . निताबाईंनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता होकार दर्शवला.
" हो..! हो ...! आई थांब हं ...मी आलेच...!"
निताबाई अस म्हणतच किचनमधुन बाहेर आल्या .15 -16 पावल चालून झाल्यावर त्यांना बाहेर जाण्याचा दरवाजा दिसला त्यासरशी निताबाई डोळ्यांतले आनंद अश्रू पुसुन दरवाज्यापाशी पोहचल्या आणि एकाहाताने दाराची कडी उघडू लागल्या .परंतु ती कडी सुद्धा उघडायला तैयार नव्हती जणू बाहेर जाऊ नकोस , तुझ्या जिवाला व तुझ्या न जन्मलेल्या बाळाच्या जिवास धोका आहे हे ती सांगत होती.निताबाई पुर्ण शक्तिनिशी दाराची कडी उघडू पाहत होत्या परंतु कडी काही उघडली जात नव्हती. त्या कडीचा फक्त आणी फक्त एक विशिष्ट प्रकारचा आवाज होत-होता .
की तोच पाठीमागुन पुन्हा एक ओळखीचा आवाजा आला ,

" निते...! कुठ चाललीस...? बाहेर ...जाऊ ..नकोस....!"

पाठिमागुन आलेल्या ह्या आवाजासरशी...निताबाईंनी कडीवरचा हात काढुन घेतला व एक गिरकी घेत मागे वळुन पाहील .तस त्यांना देवघरात आपल्या माताश्री दिसून आल्या .
" अंग तुच बोलावस ना....मला बाहेर.."
निताबाई म्हणाल्या...

" निते ...! येड्यासारखी..वागु नकोस...ती मी नाय ...! मेलेला माणूस कधी परत येत नसतो....! आण तुझ्या पोराची काळजी घे...! आणि हो त्या सटवी...पासून काही खाऊ पिऊ नकोस...!"

" कोण...! सटवी...आई....! "

" तिच तुझी...व...."
निताबाईंच्या मातोश्री पुढे काही बोलणार की तोच त्यांच्या शरीराच्या आकृतीची सफेद रंगात राख उडाली. व त्या नाहिस्या झाल्या परंतु त्या जे काही सांगणार होत्या ते मात्र कोडच राहिल .

" आई...!आई ....आई ! ....."
आई च्या नावाने मोठ्याने हाका मारत निताबाई आक्रोश करु लागल्या, रडू , विव्हळू लागल्या . निता बाईंचा आवाज ऐकुन विलासराव धावतच रुम मधुन बाहेर आले तस त्यांना
देव्हा-याच्या दिशेने विचित्र हातवारे करत बोलणा-या निताबाई दिसून आल्या .त्यासरशी विलासरावांनी आप्ल्या पत्नीच्या काळजीपोटी निताबाईंच्या दिशेने धाव घेतली व विलासराव निताबाईंना मोठ -मोठ्याने आवाज देऊ लागले ..परंतु निताबाईंच्या मनापर्यंत तो आवाज काहीकेल्या पोहचत नव्हता. तस विलासरावांनी निताबाईंचे दोन्ही खांद्याना गदा-गदा हलवत त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला .त्यासरशी निताबाईंना एकझटका बसला जणू त्या आपल्या तंद्रीतुन किंवा संमोहीत क्रियेतुन बाहेर आल्या असाव्यात . परंतु ज्यासरशी त्या तंद्रीतून बाहेर आल्या गेल्या त्याच क्षणी त्या बेशुद्ध झाल्या .त्याकाळी एम्बुलेंस सारखे साधन गावात येत नव्हते .नाही गावात डॉक्टर होते . परंतु प्रत्येक गावात एक वैद्य असायचा ज्याच्याकडे गावठी उपचार असायचे विलासरावांनी बेशुद्धावस्था मध्ये असलेल्या निताबाईंना उचलून रुम च्या खोलीत असलेल्या खाटेवर ठेवल .त्याकाळी लोक जास्त खाटच वापरत असत...निताबाईंना खाटेवर झोपवुन ते आपल्या घरचे दिशेने गेले .घरातल्यांना घडलेला प्रकार न सांगता बेशुद्ध पडली इतकेच सांगितल .मग विलासरावांच्या घरातली माणसं व गावातले वयस्कर वैद्य सुद्धा विलासरावांच्या नव्या घरी पोहचले काहिवेळ तपासणी झाली.
" काही नाही....! होत असत ह्या अवस्थेत "
अस सांगून व काही गोळ्या देऊन वैद्य पैसे घेऊन निघुन गेले. त्यादिवशी निताबाईंना बेशुद्धावस्था मधुन जाग काही आली नाही .
विलासराव त्या दिवशी निताबाईंच्या काळजीने झोपू शकले नाहीत .
दुस-या दिवशी निताबाईंना जाग आली त्या वेळेस मात्र निताबाईंनी विलासरावांच्या मागे एकच तगादा लावला .
" मला माझ्या माहेरला जायचंय ! एकक्षण ही ह्या घरात
नाही रहायचंय मला!"
2 वर्षाच्या संसारात कधीही एका शब्दाने उलट न बोललेली बायको आज अशी बोलत आहे म्हणूनच विलासराव सुद्धा जास्त काही बोलले नाहीत तसही गर्भधारणेसाठी निताबाईंना माहेरला पाठवायचच होत .तिस-या दिवशीच विलासराव निताबाईंना त्यांच्या माहेरी सोडुन आले .त्या रात्री विलासराव नव्या घरात एकटेच होते , तो दिवस होता 28 -11- 1995 चा , विलासराव एकटेच आपल्या घरातल्या आराम खोलीत खाटेवर डोळे मिटुन शांत पहुडले होते ...की तोच..................


क्रमशः
🙏🏾😊