Moksh - 9 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 9


9

थरथराट कालोख्या रात्रीचा

नोट - ह्दयाचा त्रास असणा-यांनी ह्या पुढचे भाग बिल्कुलंच वाचू नका !🙏


सीन 1


काळ्या रंगाच एकाच जागेवर स्थिरावलेल पाणि होत ते , त्या पाण्यात वरच्या काळया आकाशाची हुबेहूब छ्वी उमटली होती.

पुढच्याक्षणाला पाण्यावर ' धप्प ' असा आवाज होत एक चांदेरी रंगाची बालदी पाण्यात पडली.

बालदी पाण्याने भरताच ज्याने ती फ़ेकली होती ..तोच वर वर खेचू लागला.

बालदीच्या कडीला बांधलेल्या दोरीसहित ,काळ्या खडकांवर घासत ती बालदी वर जातांना दिसत होती.

बालदी कठड्यावर पोहचताच एक बलदंड बाहूचा हात आला.

त्याने ती बालदी हातात पकडली, खाली ठेवली.
मग दोन्ही हातांची ओंजळ बनवून , त्या ओंजळीने पाणि हातात घेऊन चेह-यावर मारल..

तो भिंग-याचा जोडीदार होता, त्याच नाव होत - शंकर उर्फ शंक्या ..!

दोन वेळा अजुन चेह-यावर पाणि मारून त्याने कपड्यालाच तोंड पुसल.

आता त्याला जरा तरतरी आली होती ..
त्याच्या कमरेला एक प्लास्टीकची पिशवी बांधलेली, त्यात खायची तंबाखू होती- त्यातच एक चुन्याची ड्बी सुद्धा होती.

पिशवी काढून ती खोलून त्याने चिमूटभर तळहातावर ठेवली - ड्बीतला चुना तर्जनी मार्फत वर काढुन तोच तळहातावरच्या तंबाखूत बुडवल..आणि तीच मळु लागला..

आजूबाजूला अवतीभवती मिनमिनता अंधार होता ,
अंगाला थंडी लागत होती, रातकिड्यांचा आवाज कानांत खिदळत होता.

त्या खुल्या विहीरीला असलेला तो गोलसर भगदाड़ जणु कोण्या दैत्याचा आ-वासल्या सारखा भासत होता..

त्यात असलेली ती अंधाराची पोकळी वाकून पाहता अस भासत होत -की त्या काळ्याशार शाहीच्या स्ंथ एका जागेवर स्थिरावलेल्या पाण्यातून आताच काहीतरी बाहेर येऊन गळा आवळेल आणि मग कायमचंच हे शरीर गोठून जाईल मृत पावेल..

त्याच्या बाजुलाच साडे तीन फुट गोल कठड्याची ती विहीर होती.

तर त्याच्या मागे दोन केळीची झाडे होती,
आणी त्या झाडांपूढे दहापावळांवर पांढरट भिंतीच कंपाउंड होत..

आणी खाली कंपाउंड पासुन ते विहीरी पर्यंत पसरलेल चार इंचाच बाजरी गवत होत -

शंकरची ही नेहमीची जागा असल्याने भीती वाटण्यासारख काही कारण नव्हत.

ही सद्या तरी त्याच्या मनाची समजूत होती.
पुढे काय घडेल हे नियतीच ठरवेल !

हिम्मतीच चिलखत - भीतीच्या धारधार भाल्यासमोर
कितीकाळ तग धरून राहू शकत ?

या पाहूयात !

तंबाखू मळून झाली होती , त्याने बारीक झालेली तंबाखू चिमटीत पकडली- आणि बाकीचा उर्वरीत कचरा खाली सोडला आणि चिमटीतली तंबाखू तोंडात टाकली..मग हळकेच ओठांवरून जिभ फिरवली.

आणी वाड्यात जायला निघाला तोच मागे गवतात सळसळ झाली..

शंकर सावध होता - त्याने गर्रकन वळून मागे पाहिल ..
सहा पावळांवर गवतातून काहीतरी काळसर सापासारख सरपटत गेल होत.

" ही त्याच्या आईला , हे साप रांxxxचे किती घुसत्यात आत? थांब तुझ्या आईची पुंगी वाजिवतो आता !"

शंकरने सोबत आणलेली काठी हातात घेतली..
हळुच वाढलेल्या गवतावर पाय ठेवल.

धुक्याने थंड आणि द्रवबिंदूने भिजलेल्या गवताचा स्पर्श अंग शहारून गेला होता.

पन तो शहारा भीतीचा नव्हता !

गवतात पुन्हा सळसळ जाणवली. लहानसर गवत वाकड तिकड हळल.

डोळे बारिक करून शंकरने एक कटाक्ष खाली गवतात टाकला.

हातातली काठी(दांडूक) गच्च पकडली..

"फुस्स फुस्स्स.खिस्स..खिस्स..हिस्स.हिस्स्स..हिहिहिही..

खीखी!"

प्रथम सापाचा फुत्कार , आणि मग हळकेच एक टिंगळ,टवाळी केल्यासारखा हसू !

शंकरच्या कानांत तो फुत्कार , आणि ते हसूच आवाज साफ ऐकल होत...

त्याने प्रश्नार्थक भाव चेह-यावर ठेवून आजुबाजुला पाहिल...एकवेळ मागे सुद्धा पाहिल

" ए भिंग-या?.." शंकर पाच सेकंद थांबला .
भिंग-याच प्रतिउत्तर काही आल नाही ! तसा तो जरा मोठ्यानेच म्हंणाला.

." आई घाल्या , मजाक करतो का रांxxच्या माझी ! हं? "

शंकरपासुन डाव्या बाजुला सोळा फुटांवर तीन सळई असलेली एक उघडी चौकोनी खिडकी दिसत होती.


त्या खिडकी पल्याड नामदेव आबांची खोली होती.
खोलीत दोन खुर्च्यांवर टिंग होऊन सुर्यकांतराव आणि खुद्द नामदेव आबा दारू पित बसले होते..

त्याच दोघांच्या कानांवर हा आवाज पडला..

" का हो आबा , ह..ह..आवाज कसला.?"
सुर्यकांतराव डोक बैलासारख हळवत तर तोंड वाकडातिकड करत बोल्ले .

" हो हो , मी पन ...ऐकल ...ना , म्हातारा झालो.. असल तरी काय झालं .., बहिरा नाहीये मी !" नामदेव आबा म्हंणाले.

" चला बगू चला !" सुर्यकांतराव जागेवरून उठले..
नामदेवआबा सुद्धा उठले आंणि दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागले तर सुर्यकांतराव खिडकीच्या दिशेने जाऊ लागले..

" ओ आबा ?" सुर्यकांतरावांनी आबांना दरवाज्यातून बाहेर जातांना पाहून आवाज दिला..

" हं काय?" त्यांनी मागे वळून पाहिल..

" ह्या खिडकीतून बघू या , कश्याला..बाहेर जायचं ?या !"

" हो..हो..! .खिडकी आहे व्हय खोलीत , इसरलोच होतो मी ! "

" दारू जाम वाईट गोष्ट मित्रांनो , ..जाम वाईट गोष्ट
स्वत:च्याच खोलीतली खिडकी विसरतो माणूस !"
सुर्यकांतराव आपल्या सर्वाँकडे पाहत म्ह्ंणाले.

मग त्यांनी हळुच वळून खिडकीतून बाहेर पाहिल...

मिनमीनत्या निळसर ,काळसट उजेडात त्यांना

त्यांना विहिरीपासून पूढे हातात काठी घेऊन उभा शंकर दिसला..

" ओ आबा शंक्या हाई , शंक्या..!" सुर्यकांतरावांनी मागे वळून पाहिल, आबा अद्याप खिडकीपाशी पोहचले नव्हते.

हातात दांडूक घेऊन शंकर कुठे साप दिसतो का ते पाहत होता.

" हिस्स...हिस्स..खिस्स..खिस्स..खिखिखी..ही
इही!..हिहिही..खीखी..." पुन्हा तोच फुत्कार आणि ते हसू आल...

त्या आवाजाची दिशा गवतातून येत होती..म्हंणजेच खालून...

शंकरने एक दोन वेळ डोळे चोळले आणि नीट निरखून गवतात पाहिल..

तिथे एक गोळसर बिळ होता.

" हिथ लपलाय काय? थांब तुझ्या तर आईच्या !"
शंकरने ती काठी, तीच पुढच टोक वेगाने बिळात घुसवल..

" अहाअहंन्ंं...आह्ह्ह्ज!"
एक घोग-या खर्जातल्या आवाजातली विव्हळ फुटली.

जस की कोणीतरी वेदनेने ओरड़ाव.

ह्या झालेल्या कृतीची अपेक्षा शंकरने केलीच नव्हती..
साधारणश्या पाच इंचाच्या त्या बिळातुन मांणसासारखा ओरडणारा आवाज यावा?

शंकरच्या हातातली काठी सुटली..
मनात भीतिने जराशी धडकीच भरली..

दोन पावळ तो मागे सरला .

तस त्याची पाठ कशाला तरी घासली गेली..मागे उभ्या त्याचा
तो स्पर्श अगदी प्रेतासारखा थंड होता..

कुबट, घाणेरड्या ,आम्लियुक्त, मळ मुत्राच्या
वासाची एक झुळुक त्याच्या नाकात गेली..

त्याने वळून मागे पाहिल..! तस त्याला ते ध्यान दिसलं


साडे सहा फुट उंच काठ्या-कुड्यांचे पातळसर हात -
त्याच एका हातात धारधार काल्या पातीचा कोयता -अंगात चिंध्या झालेला फुल बाह्यांचा पांढरट कुर्ता, सुकलेल्या लाकडी पायांच्यात काळसर पायजमा, वी - आकाराचा एक पेंढ़ा भरलेला मुखवटामय चेहरा -ज्यावर वटारलेले डोळे चित्तारलेले..जे की पिवळ्याजर्द रंगाने चकाकत होते त्यात एक मण्याएवढ़ा काळसर टिपका होता..जबडा विचकलेला त्यातून काळसर भाल्यासारखे दात लोंबत होते..

हे असले भयाण दृष्य पाहून , शंकरचे डोळे मोठे झाले..तोंड वासल , परंतु पुढच्याक्षणाला त्याला फिट येणार तोच त्या ध्यानाच्या हातातला कोयता एका लयीत वेगाने ..शंकरच्या मानेजवळ आला..आणि पूढच्याक्षणाला..
शंकरच धड विरहीत प्रेत खाली जमिनीवर कोसळल..आणि त्याच धड त्या बिळात खोचलेल्या काठीत घुसल...


नामदेव आबा खिडकीजवळ आले..
सुर्यकांतरावांनी सुद्धा समोर पाहिल...

" कोण आहे रे सू-या? "

बाहेर कोणीच नव्हत. विहीर ,केळीची झाडे सर्वकाही शांत उभे होते.

शंकरच बिनधडाच प्रेत विहिरीच्या मागे पडल होत -जे की ह्या दोघांना दिसत नव्हत.

नामदेव आबांच्या वाक्यावर सुर्यकांतरावांनी बैलासारखी

मान हळवत.... खिडकीत पाहिलं

" काय माहीत ? कुठ गेला,! आज जरा जास्तच झालीये वाटत ! काय बी दिसतय - बस्स करूयात आता !"

वाड्याच्या उघड्या दारात ते ध्यान हातात रक्ताळलेल कोयत घेऊन उभ होत.

आत्माहरण करण्यासाठी खुद्द सैतान आला होता..
यमाची जागा त्याने घेतली होती.

वाड्यातल्या देवघराच दरवाजा हळकेच आपोआप कर्र कर्र आवाज करत ब्ंद झाल..

'ऊ..ऊ..ऊ..हू..हू...हू..ऊ...!" गावातल गल्ली बोलात हिंडणार कुत्र आकाशाकडे तोंड करून विव्हळ फोडु लागल होत..

तो आवाज पुर्णत देवपाडा गावात घुमला..

त्या ध्यानाने एक कटाक्ष दरवाज्यावर टाकल.
तिथे शुभ x लाभ अस नाव लाल रंगात लिहीलेल्या पट्टया होत्या .

त्याच पट्टयांकडे डोळे वटारून त्याने पाहिल तसा त्या क्षणार्धात त्या दोन्ही पट्टयांनी लाल रंगाच्या आगीसहित पेट घेतला..

" हिहिही .खीखी..खीखी! " अशुभ डावा पाय त्याने दरवाज्यातून आत टाकला...

देवघरातल्या देवांच्या काचेच्या तसबीरीवर काळी कोळश्याची झळ चढु लागली.. ! देवांच्या तसबीरींवर काळी बुरशी चढु लागली...! दिव्यात असलेली ती वात काळी झाली , त्यातल थोडस तेळ खरपूस वास सोडू लागल...

देवांनी सुद्धा साथ सोडली की काय ? हे शक्य आहे का? हं!

पुर्णत वाड्यात घाणेरडा वास सुटला.
थंडीने भिंती गारठल्या, स्वयंपाक घरात असलेल पाणी खराब झाल -कारण घरात दोन मांणस मय्यत जी पावणार होती..त्यात तुळस पडली असती तर पाणि वाचल असत !

हिडिस फिडीस हास्य करत ते जिन्याच्या पाय-या एक एक करत वर चढत होत.

जिन्याच्या लाकडी पाय-या त्या अवाढव्य ध्यानाच्या पाऊलांच्या वजनांनी चरकू लागलेल्या..त्यांचा तो आवाज
वाड्यात दूमदूमत होता. तेरा चौदा पाय-या त्याने घाई घाईत चढल्या आणि आबांच्या खोलीपर्य्ंत पोहचताच तो दरवाजा अदृश्य धक्क्याने आपोआप उघडला..आणि त्याचा कोयता असलेला हात हळुच वर आला..आणि..

XXXXXXXX

सीन 2

बहादूर कमळ केशी वय (49) , परिवारात कोणीच नाही , तो एकटाच होता. जेमतेम सव्वीस सत्तावीस वर्षांपासून तो पंतांच्या हवेलीत बागकाम करायचा! आताही करत होता . , इतरही काही काम सांगितल तर ते ही तो करायचा ,
महिन्याला भेटणा-या पगारातून त्याच उदरर्निवाह चालायचं ! आणि त्यातच तो खुषही होता.
आज सकाळीच तो नेहमीप्रमाणे बागेला पाणी देत असतांना त्याला ललिताबाईंनी बोलावल आणि तिस-या मजल्यावरची , कोणत्या खोलीची खिडकी वगेरे उघडी राहिली आहे का ते पाहून यायला सांगितली होत , पन काही कारणास्तव तो ते काम विसरला आणि रात्री झोपताना त्याल ते काम आठवल.. तसा तो लागलीच तिस-या मजल्यावर ते काम पुर्ण करायला निघाला होता.

...आता पुढे ...

बहादूर जिन्यामार्फत तिस-या मजल्यावर पोहचला होता.
तिस-या मजल्याजवर कोणीच राहत नव्हत ! म्हंणूनच तिथली लाईट दिवस रात्रभर ब्ंद असायची.
फ़क्त आठवड्यातून एकदा दहा - बारा नोकरांचा ताफा सकाळी सर्व खोल्या झाडलोट करण्यासाठी तिथे जात असायचा बस्स , मग त्यानंतर मात्र तिथल सर्वकाही
निर्जीव होऊन जायचं .

काचेच्या खिडक्या सजीव हाळचाल पाहण्यासाठी तरसायच्या..! ब्ंद खोल्यांत कोंडलेली हवा - खिडकीवाटे बाहेर पडण्यासाठी पस्तावात असायची

....


लांबच्या लांब सरळ पसरलेली ब्ंद दरवाज्यांच्या खोल्याची ती कोरिड़ॉर , रात्री भक्कास वाटत होती .
त्यातच निर्जीव शांततेत बहादूरच्या पावळांत असलेल्या चामडी चपलांचा 'ट्प,ट्प,ट्प ' आवाज तिथे घुमत होता.
भिंतींवर आदळून तो आवाज बहादूरच्या कानांच्या पडद्यांतून थेट काळजावर हातोडीने खिळे बदडावे तसा घाव घालत होता.

इतरांसमोर जरी बहादूर आपण मोठा हिम्मतवर असल्याच दाखवत असला तरी आता मात्र त्याची चांगलीच पळता भुई थोडी झाली होती.

सव्वीसवर्ष ? सव्वीसवर्ष हवेलीत राहीलेला बहादूर
त्याच्या कानांवर कधी हवेलीत घडलेल्या पाश्वी कृत्यांचा
थरार पडला नसेल का ? त्या भयानक गोष्टी हवेसारख्या असतात ,कोंडून राहतील पन बाहेर पडणारच !

गावात गेल्यावर , बाजारात - उभ्या दोन तीन जणांच्या
संवाद चर्चेत हे भुताखेतांचे विषय म्हंणजे पंचपक्वानच ..? नाही का ? मग जो तो त्यात कस आवडीने मीठ मसाला टाकेल...आणि ते चटपटीत बनवण्याच प्रयत्न करून दुस-या सांगेल त्याच काहीच नेम नाही!

अश्याच खुपसा-या अभद्र गोष्टी बहादूर ने ऐकल्या नव्हत्या. काही गोष्टी ऐकून त्याला एक वेगळीच मज्जा आली होती , तर काही ऐकून भीतीचा सर सरता काटा अंगावर डसला होता.

आणी जी भीती एकदा मेंदूत जाते , ती कायमस्वरूपीच
आत दडली जाते - काळ्या शाहीसारखी चिकटून बसते -

पंतांच्या वाड्यात म्हंणे पंतांनी सैतान पाळला आहे.
अमावास्याच्या श्रापीत काळ्या रात्री तो मानवी रक्त मांसाच्या शोधाने बाहेर पडतो ! त्याची उंची म्हंणजे सहा फुट उंच ! त्वचा राखाडी , डोळे पिवळेजर्द , कंगव्यासारखे मोठाले , चौकलेटी रंगाचे धारधार दात , अंगात काळा झगा ...
..ते मांणसाला मारून खात ! ..

बहादूरच्या डोक्यात तेच तेच विचारचक्र वेगाने सूरू होते.

अंधारात पाहताच कल्पना शक्तीने त्या अंधा- या काळ्या कागदावर त्या सैतानाचा चेहरा डोळयांसमोर उमटून येत होता.

तशी त्याची चांगलीच फाटत होती.

तोंडातून एकापाठोपाठ राम - रामचा जप सुरु झाला होता.

त्याच्या हातात असलेला कंदील त्याच्या अवतीभवती गोल तांबड्या रंगाच प्रकाशित कवच त्याला प्रदान करत होत.
जे अंधाराला दूर ठेवत होत.

" अरे बापरे एवढ्या खोल्या आहेत इथ ! आता एवढ्या बघाला रात्र निघुन जायची ..आण , रात्रीतच माझ काम तमाम व्हायच !"

बहादूरने एक आवंढ़ा गिळला.

सर्व खोल्यांची दार उघडून, तो दरवाज्यात उभ राहूनच कोणत्या खोलीची खिडकी उघडी आहे का ते पाहत होता..आणि जर खोलीतल्या खिडक्या ब्ंद असतील तर लागलीच तो दरवाजा लावून घेत होता.

प्रत्येक खोलिचा दरवाजा उघडतांना , कडीचा होणार कुई..कुई..आवाज त्या शांततेत घुमत होता.

मग जस कर..कर्रत दरवाजा उघड़ायचा बहादूरला खोलीत साठून असलेला अंधार दिसायचा , त्याच्या हातातला क्ंदील सुद्धा खोलीआत दडून असलेल्या अंधाराला भेदत नव्हता. जणु काळ्या रंगाचे कॉटणचे पडदेच टांगले होते.
ज्या पडद्यांवर प्रकाश रोखला जात होता.

त्या अंधारात पाहायची बहादूरची हिम्मत होत नव्हती , मनाचा धीर पक्का होत नव्हता - न जाणे त्या जहरी विवरात पाहताच आत जे काही दडलेल असेल , त्याची नजरा नजरा व्हावी ? आण पांढुरक्या चेह-यावरच्या काळपट जबड्यातून एक विषारी आंतिम हसू बाहेर पडाव ? आणि मग ते आपल्या दिशेने वेगाने सरसावाव , सरपट तर कधी उड्या मारत..आणि मग एक हलकिशी वेदना , आणि सर्व शरीर कस थंड ...अगदी म्हढ़ासारखा थंड पडाव..!

मृत्यु हा शब्दच असा आहे , ज्याला उच्चरतांना सुद्धा
ह्दययात भीतीची जाणिव होत असते !

आणी बहादूर त्याच परिस्थीतून जात नव्हत का?
ह्या श्रापीत हवेलीतल्या ह्या तिस-या मजल्यावर त्या विचीत्र ,कप्टी-पाश्वी सावजाच ठाण होत - त्याच आस्तित्व होत. त्याला हाताळणा-या मालकाची विधी ह्याच तिसल्या मजल्यावर कोणत्या तरी खोलीत सूरू होती ना ?

सर्व खोल्या तपासून झाल्या होत्या -आंतिम उर्वरित एक शेवटची खोली तेवढी पाहायची बाकी होती- बस्स !

सर्व खोल्या उघडून पाहिल्या होत्या पन संशयास्पद - काहीतरी वेगळ तिथे जाणवल नव्हत . ज्याने बहादूरला थोडासा धीर आला होता.

उर्वरीत शिल्लक राहिलेल्या त्या खोलीच्या दरवाज्या समोर बहादूर उभा होता.

हातातल्या कंदीलाचा तांबडसर प्रकाश त्या

दरवाज्यावर पडला होता.

सहा फुट उंच दोन झापांचा पांढरट रंगाचा तो दरवाजा होता.

त्या दरवाज्याकडे पाहताच , बहादूरला एक गोष्ट खटकली , ती म्हंणजे इतर दरवाज्यांच्या कड्या ब्ंद होत्या.

पन ह्या दरवाज्याची कडी मात्र उघडी होती.

" अरे बाबा आत कोण हाई का काय ?"
बहादूरने आवंढ़ा गिळला.

दरवाज्याबाजुला एक साडे तीन फुट उंचीच टेबल होत ..त्यावर फुलदानी ठेवली होती.

तीच त्याने एकाने हाताने उचल्ली आणि उलटी धरली.

चोर वगेरे असला तर ? पन जर तसं कही असल तर?
भुताखेतांवर हे असले वार करून त्यांना इजा पोहचतील का?
क्षणात त्याच्या मनात विचार आला.

तरीसुद्धा त्याने दरवाजा उघडला.
उघडण भाग होत! ह्या घराच ह्या मालकाच मीठ जे खाल्ल होत.

सहा फुट उंचीचा तो दरवाजा हळुच कर्र कर्रत उघडला.
तसा त्याचक्षणी आतून त्याच्या अंगावर तो झेपावला..

तसा बहादूरने क्षणात डावा हात , ज्या हातात फुलदाणी होती तो चेह-यासमोर आणला..

तस हवेच झोत त्याला स्पर्शून दारावाटे बाहेर पडल.
समोर उघडी खिडकी होती..
बहादूर ने चेह-यासमोर धरलेला हात खाली आणला.
कंदीलाच प्रकाश खोलीत पसरलेल त्याच कंदीलाच्या प्रकाशात खोलीतल द्रुश्य दिसत होत.

समोर एक मोठा बेड होता ! पूढे एक काचेचा आरसा होता...आणि

बेड डाव्या बाजुलाच एक चौकलेटी रंगाची झुळणारी घोडाखुर्ची होती. आणि त्या खुर्ची मागे भिंतीवर एक उभी साडे चार फुट उंचीची मोठी पेंटिंग लावली होती.

त्या पेंटींगला पाहताच त्याला ही खोली कोणाची आहे ते समजल !

" नरहर पंत " भीतीने त्या आवाक बसला.

ह्या सर्व भयानक कारस्थानांची सूरूवात ज्याने केली होती. त्याच्याच खोलीत मध्यरात्री आपण उभे आहोत हा विचारच त्याचा अर्धाजिव मरून गेला होता.

ती पेंटिंग साकारणारा चित्रकार सुद्धा भीतच तो चित्र कोरून गेला असावा अस साफ साफ दिसत होत.

त्या पेंटिंग मधले नरहरपंत जणू जिवंत भासत होते.

उभट चेहरा ,जाड भुवया आणि घारे बारिकसे डोळे,
टोकदार नाक , आणी त्यांखाली काळ्याशार मिश्या..

डोक्यावर चौकलेटी रंगाची गांधी टोपी.

अंगात सिल्कचा पांढरा सदरा ..आणी त्यावर चौकलेटी कोट , आणी खाली पांढरट धोतर ..पायांत चामड्याच्या चपली..

चेह-यावर शुन्य भाव , जणु जिवंत वाटत होती ती पेंटिंग ..जणु आताच पेंटिंग मधून ते बाहेर येतील..

बहादूरने आवंढ़ा गिळला..पाय लटलट कापत होते ...तसाच तो खिडकीजवळ पोहचला..

त्याच्या उजव्या बाजुला चौकोनी आरसा होता..आणि त्या आरश्यातून ती रिकामी पेंटिंग दिसत होती..आणी त्या पेंटिंग खाली असलेल्या खुर्चीत नरहरपंत दात विचकत हसत
बहादूरकडे पाहत बसले होते...त्यांच्या चेह-यावर तो निळ्सर रंगाचा प्रकाश पडला होता.

बहादूरने खिडकीच्या झापा लावल्या ..आणी डाव्या बाजुला झपकन वळून पाहिल .. तस त्याचे डोळेच विस्फारले ..कारण पेंटींग रिकामी होती...

तोच अंधारातून अचानक नरहरपंत हवेत उडत आले..आणि त्यांनी बहादूरचा गळा आवळला...गळा आवळताच ...

बहादूरच्या तोंडून " अं !" असा उचकी निघाल्यासारखा आवाज झाला..

आणी तो लागलीच ह्दयाच्या झटक्याने गतप्राण झाला....



XXXXXXXXX


मंदिराच्या एका खांबाला उस्मान काकांना पाठीवर टेकवून बसवल होता.

त्यांच्या पुढ्यातच पुजारी बाबस हातात तांब्या घेऊन दोन पायांवर खाली वाकून उस्मान काकांकडे पाहत होते.

पुजारी बाबांनी हळुच तांब्यातल पाणी उस्मान काकांच्ज्या चेह-यावर शिंपडल..

दोन तीन वेळा अस केल्यावर ते शुद्धीतून बाहेर येऊ लागले.

झड झालेल्या डोळ्यांच्या पापण्या हळकेच उघडल्या गेल्या.

" अह्ह्ह्ह!" उस्मान काकांनी डोक्याला हात लावल..
डोक तीव्र वेगाने ठणकत होत.

तरी सुद्धा ते बोलू लागले..

" बाबा ..बाबा !"

" होय होय , इथेच आहे मी !"
पुजारी बाबांनी उस्मानकाकांच्या खांद्यावर हात ठेवला.

उस्मान काकांनी त्रास सहन करत डोळे उघडले.

" काय सांगू बाबा ! पंतांच्या हवेलीतून वापस आ रहा था , तर रसत्यात है अनहोनी घडने लगी ! अजिब अजिब वहम होने लगे , जैसे कोई मेरा पिच्छा कर रहा है ! मेरे साये के साथ खेटून खेटून चल रहा है ! तीन बार पीछे मूडकर देखा मैने पर काहीच नही था. फिर अचानक से "

उस्मान काकांचा गळा सुकला होता. कपाळावर घामाच्या रेषांचा धबधबा वाहू लागला होता.

भीतिने डोळे खोबण्यांतून बाहेर येतील येवढे मोठे झाले होते. अंगावर काटा फुटत होता. छातीत कळा येत होत्या..
धड धड छातीतले ठोके ढोल पिटावे तसे वाजत होते.

अंधारातून कुत्र्यांच्या रडण्याचा , तर कधी अदृश्य हसण्याचा आवाज येत होता.

" हे घे ...पाणी पी ! आणि मग आरामात सांग !"
पुजारी बाबांच्या हातातला तांब्या घेऊन तो उस्मानकाकांनी गटा गटा नरड्याखाली उतरवला..

त्यांची अवस्था पुजारी बाबा समजु शकत होते , कारण त्यांनी सुद्धा हे सर्व काहिवेळा अगोदरच अनुभवलं होत ना ?

अनुभव असणाराच दुस-याच्या भावना समजू शकतो , हेच खर ! नाही का?

पाणि पिऊन झाल्यावर उस्मान काकांनी तांब्या पुजारी बाबांकडे सोपव आणि बोलू लागले.

" मैने पीछे मूड के देखा ! तो पुरे रास्ते में सफेद कोहराम छा गया था ! मेरे मन मे सवाल उठे?" उस्मान काकांनी पुजारी बाबांकडे पाहिल. बाबांनी फक्त होकारार्थी मान हळवली

" मै उस शबनम(धुक) को गोर से देख रहा था ! की उसी वक्त अंदर से जोर से एक शैतानी साया मेरी तरफ तेजी से हवामे में उडते आया और मुझे एक धक्का दे दिया , उस धक्के से में जामिन पी गिरा , दर्द से मी ओरडत होतो , तेवढ्यात तो शैतान मेरे चेहरे के सामने आके !"

" बस्स !" मध्येच पुजारी बाबा म्हंणाले.

" मला सगळ समजल आहे ! आता पूढे सांगू नकोस , अन्यथा तुला त्रास होईल ! तू आजची रात्र इथेच थांब "

" नही नही बाबा, माझ्या पोरी घरी आहेत. मै उनको अकेले नही छोड सकता..अगर वह शैतान माझ्या घरी गेला आणि माझ्या पोरींना त्यान काही केल तर , न्ही नही मुझे !"

" उस्मान त्यांना काहीही होणार नाही ! हे बघ आता तू इथून बाहेर पड़ण खुप धोक्याच आहे कारण तो सैतान
अजुनही गावातच आहे. " पाहायचं तुला !

बाबांनी बाजुच्या तांब्यातल पाणी उजव्या हातात घेतल आणि मंदिराच्या पायरीवर उभ राहून ते अंधारात भिरकावल..

तसा काळ्या अंधारात एका ठिकाणी

हिरव्या, लाल, तांबडसर रंगाच्या ठिंणग्या उडाल्या ...

आणि एक विचीत्र ओरडणारा आवाज घुमला..

" अह..रघर...र्ह्ह्र घर ..र्ह्ह्र..,भट्या भट्या...रांxccच्या ...वाटोळं होवो वाटोळं होवो तुझं..! "

अंधारातून काहीतरी काळ्या रंगाच मोठ मोठ्या ढेंगा टाकत पळत जातांना त्या दोघांनाही दिसत होत... ते दूर दूर पळत जात नाहीस झालं ! पन ते पुन्हा येणार नाही कशारून

ते जे काही होत त्याचा आकार म्हंणजे काळ विवर होत..जणु अंधार चिकटलेला,

भ्रष्ट अमानविय शक्तिने अंधारापासूनच बनलेल्या काळ्या बाहुल्यांसे सैनिक ह्या दोघांवर लक्ष म्हंणून ठेवल्या होत्या.. ज्यांना बाबांनी हाकलून लावलं होतं.

हा प्रकार पाहून उस्मान काकांची हालत खराब झाली.


" कोणाच्या तरी जिवावर उठला आहे तो!"
बाबा इतकेच म्हंणाले.

" मग बाबा तुम्ही उसको थांबवत का नाही आहात ! "

" उस्मान माझ्याकडे तेवढी शक्ति असती तर मी नक्कीच ते केल असत रे ! पन मी त्या श्रेणीत मोडत नाही ,
पन एक आहे ज्याला मी ओळखतो , जो त्या श्रेणीत मोडतो ! ज्याच्या मस्तकावर दैवी शक्तिचा आशिर्वाद आहे. , आणि मला खात्री आहे की तो नक्कीच आपली मदत करेल."


" कोण है वो फरिश्ता बाबा?" उस्मानकाकांनी मोठ्या आशेने बाबांकडे पाहिल..तसा बाबांच्या चेह-यावर एक मंद हसू उमटल व ते म्हंणाले..

" समर्थ कृणाल !"


क्रमश : .


XXXXXXXXXX