Moksh - 21 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 21



२१


महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!



..कथा सुरु....


देवपाडा स्मशानभूमी .

दुपारच्या वेळेस तळपत्या उन्हात स्मशानभूमीत घुम्या जाधवाच्या पोराच मयत जळत होत.

चितेतून चार फुट उंचीच्या ज्वाला वर उडून आक्रोश करत होत्या.



त्याच आगीतून चट,चट आवाज येत होता.


चितेत जळणा-या लाकडातून निघणारे निखारे वर ऊडून ,काहीवेळातच सफेद राखेत रुपांतरीत होत होते .


जळणा-या प्रेतातून -मांस जळालेचा करपट वास स्मशानात घुमत होता -


स्मशानातल्या झाडांवर येऊन कावळे बसले होते.


" कांव, कांव, कांव!" अभद्र आवाजात मृत्युच गाण गात होते.

स्मशानात गावातली मांणस जमली होती -
तेरा वर्षाचा भागो , ज्या मुलाला अजुन दुनिया पाहायची होती - त्याचा हा असा अचानक विकृत अंत झाला होता.

वेळे आधी मौत आली होती -पन इतकी निघृण?नियती इतकी कठोर पाषाण ह्दयी झाली होती ? की त्या हस-या खेळत्या मुलाच आयुष्य एका क्षणात संपवून टाकल होत.

स्मशानाला चारही बाजुंनी गावातल्या लोकांनी वेढ़ा घातला होता - आणि त्या गोळ वेढ्या मधोमध भागोची चित्ता जळत होती.

भागोचा बाप घुम्या छातीबदडवत होता.
त्या बापाचा हा दयनिय आक्रोश पाहून आजुबाजुच्या लोकांच्याही डोळ्यांत अश्रु जमा झाले होते.

उभा जनसमाज हाताची घडी- आणि नजर खाली झुकवून शोक व्यक्त करत होता. तसंही त्या व्यतिरिक्त ते काय करू शकत होते?

" काय रे ? " एक माणुस त्याच्या बाजुला उभ्या साथीदाराला म्हंणाला.

" मईत इतक्या दुपारीच का जाळलं?एकूलता एक पोरगा होता ? अजुन बॉडी एवढी डेंंजर अवस्थेत भेटली, मग पोलिसांना सांगाला नको का ? पोस्टमॉर्टम केल असत ना ? तपास करुन आरोपी पकडला असता ना ? " तो पहिला माणुस खुसपुसत्या स्वरात म्हंणाला.

" पोस्टमॉर्टम ? पोलिस केस ? " त्या दूस-या मांणसांने कसतरीच त्या पाहिल्या मांणसाकडे पाहिल.

" अरे तुला माहीती न्हाई का ? "

" काय?" तो दुसरा माणुस उत्साहीत होऊन बोलला.

" आर पोस्टमॉर्टम करून , आरोपी पकडायला तो आरोपी जिवंत तर असायला हवा !"

त्या पहिल्या मांणसाने फक्त मान हळवली.
" इथ खून करणारा खुद्द सैतान आहे - सरपंच नामदेव आबा -आणि उपसरपंच सु-याभौ दोघांच्या खूनाची केस ज्या पोलिसाला दिली होती ना ?"

" हा हा !" तो दुसरा माणुस उत्सुकतेने म्हंणाला.

" त्याचा पन काटा काढला ना ! थोबाड चेचलय संमध , पार चपटा पाषाण बनवून ठेवलाय थोबाडाचा"
त्या दुस-या मांणसाने खिश्यातून तंबाखू काढली- हातावर तंबाखू आणि त्यावर चुना टाकून ती मळू लागला.

" इथंच , मसणाच्या मागच्या बाजुला पडल होत मय्यत, हा वास सुटला होता - फुगला होता रेड्यावाणी नुस्ता माशा घोंघावत होत्या अंगावर." तो दुसरा माणुस तिखट मसाला लावून सांगत होता.
आणी तितक्याच उत्सुकतेने तो पहिला माणुस मान हळवत लक्ष देऊन ऐकत होता..

" काय सांगतो काय? च्यायला म्हंजे केस भेटली त्याचाच गेम वाजवला !" तो दुसरा माणुस.

" हा मंग , सैतान काय पन करू शकतो लगा ! "
त्याने तंबाखू ओठांत भरली. आणी पुढे सांगू लागला.
" आता उद्यापास्न नवरात्र सुरु होइल ?
आणी एकदा का उद्या देव बसले - की गावात हे असल मईत बीईत पडलेल चांगल दिसणार न्हाई. अशुभ होइल ना संमद. आणी गावात संध्याकाळी म्हंण त्या हवेलीतून कायतरी बाहेर येत्ंय, ज्याने मूडदा पाडायला घेतलाय समद्यांचा ! पहिले सरपंचआबा, दुसरा उपसरपंच सु-याभौ, आणी वाड्यात पहारा देणारे ते दोन पहारेकरी, वापस मंदिरातला पुजारी बाबा ,तो पोलिस आणी हा सातवा भागो ! सात मूडद तर पडलंत ! आता पुढचा नंबर कुणाचा ? माहीत नाय!"

तो दुसरा गावकरी म्हंणाला.

त्याच्या त्या वाक्यावर त्या पहिल्या मांणसाने फक्त मान हळवली.

...

XXXXXXXXXX

पंतांची हवेली .

हॉलमध्ये ड़ायनिंग टेबलपुढे असलेल्या खुर्चीवर रिया बसली होती. तिच्या पूढे टेबलावर रिकामा चहाच कप होत.

रियाच्या मागे वीस पावळांवर देवीचा देव्हारा दिसत होता.

12x12 ची खोली होती - देव्हा-यातल्या चारही भींत पिवळ्या रंगाच्या होत्या.

मधोमध एक मोठ टेबल होत - टेबलावर लाल कापड अंथरलेल - आणी त्याच टेबलावर तुळजाभवानी मातेची मुर्ती होती.

तुळजाभवानी मातेची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजेची होती - तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली होती. पाठीवर बाणाचा भाता धारण केला होता..
युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप होते ...तरीही भक्तांसाठी ते अद्भूत- विलोभनीय होते.

मातेच्या समोर निषाबाई उभ्या होत्या - समईतल तेल संपत आल होत - निषाबाईंनी बाजुला असलेल्या काचेच्या लहान जग मध्ये असलेल तेल समईमध्ये टाकल - तेळ मिलताच समईतली मंदपणे जळणारी वात शक्ति मिळाल्यासारखी लक्ख पणे उजळून निघाली होती. -
समईच उजेड आईच्या मंद स्मित हास-या चेह-यावर पडल होत - तिच्या त्या चेह-याकडे पाहताच अस वाटत होत की ती जणू आपल्याकडेच पाहत आहे.

" आई ! " निषाबाईंनी साडीच पदर डोक्यावरून घेत हात जोडले.

" काही दिवसांपासून खुप विचीत्र घटना घडत आहेत ! सतत काहीतरी वाईट होणार आहे अशी मनाला धाकधूक लागून राहिलेली असते! आणी आज !" निषाबाईंनी डोळे मोठे केले.

" आज तर आईंना चक्कर आली! दवाखान्यात घेऊन गेलेत- फोन आल होत मगाशी वहिनींच म्हंणाल्या ठिक आहेत आई - आज हॉस्पिटल मध्येच राहतील आणि उद्या डिस्चार्ज मिळेल . " निषाबाई तुळजाभवानी मातेशी लहान मुलीसारख्या बोलत होत्या. तसही भगवंतासाठी सर्वजन समानच असतात ! लहान ,मोठे, वृद्ध,सर्वच त्या विधात्या कर्वे एकसमान रेषेतले आहेत - ही मतभेदाची पोकळी तर ह्या कलियुगातल्या मानवांनी जन्माला घातलीये .नाही का?


" आई तुझ्या कृपेने आयुष्यात सगळ भेटल मला , कसलीही , कश्याचीही कमी पडून दिली नाहीयेस --पन आज मी तुझ्याकडे ( निषाबाईंनी साडी झोळीसारखी आईसमोर पसरली) काहीतरी मागते आई - आमच्या कुटूंबावर जर काही संकट चालून आलं तर माझ्या कुटूंबाची रक्षा कर . तुझा आशिर्वाद माझ्या कुटूंबांवर सदैव असुदे !"


मनोभावे केलेल्या प्राथनेच फळ देव देतो !
ख-या भक्ताला देव आपली प्रचिती दाखवतो .
म्हंणूनच तर या विधात्याला तारणहार म्हंणतात.
देवीच्या डोक्यावर एक भगव्या रंगाच फुल ठेवल होत. न जाणे कस ? की दैवी चमत्कारच घडल - एक हलकासा अदृश्य स्पर्शत्या फुलाला झाला आणि ते फुल देवीच्या डोक्यावरून खाली पडल जात निषा बाईंच्या साडीच्या झोळीत पडल...

हे सर्व दृष्य पाहून निषाबाईंचे डोळे भरून आले चेह-यावर एक हसू पसरल. ती साडीची झोळी मिटुन
भरलेल्या डोळ्यांनी आणि हस-या चेह-याने निषाबाईंनी आईसमोर हात जोडले.

इकडे ड़ायनिंग टेबलवर स्मार्टफोन हातात घेऊन बसलेल्या रियाच स्मार्टफोन अचानक हेंग झाल..


" अरे ह्या फोनला काय झालं? " रिया फोन स्क्रीनवर टच करत होती - परंतु स्क्रीन मात्र स्टॉप झाली होती- नियतीचे फासे त्या परमार्थाने उमटले होते.

कोणते रहस्य कधी? कसे खूळतील सर्व त्याच्याच हाती होत.

अचानक स्क्रीनवरची गैलरी एप्प ऑन झाली -
आणी आज सकाळी शुट केलेली पितृपक्षच्या वेळेसची ती व्हिडीओ स्क्रीनवर प्ले झाली.

स्मार्टफोनच्या स्क्रीनवर नैवेद्यासमोर तो कावळा
बसलेला दिसत होता . व्हीडीओ स्क्रीनवर रनिंग टाईम सुरु होत. तो काळ्या रंगाचा कावळा आपली चोच हळुच नैवेद्यावर टेकवणार होता तोच अचानक त्या कावळ्या पुढे एक काळ्या रंगाचा धुर अवतरला.
कस ?कोठून ? काहीच समजल नाही !
स्क्रीनवए चार फुट उंच कालसर धुर ज्यातून लाह्या बाहेर पडत होत्या. जशी -जशी व्हिडिओ पुढे सरकत होती.त्या काळ्या धुराची हालचाल होती -ती हालचाल पाहता असं वाटत होत . की जेव्हा जेव्हा तो कावळा ते नैवेद्य खायला आपली चोच खाली नेहत होता - त्या त्या वेळेस तो काळा धुर , हालचाल करून त्या कावळ्याच्या अंगावर धाव घेऊ पाहत होता.
भूतांच्या गोष्टी, पिक्चर पाहिल्याने रियाला एवढतरी कळलं होतच की हा धुर म्हंणजे अमानविय नेगेटीव लहरींपासून तैयार झालेली दुषित आत्मा आहे..जी ते नैवेद्य खाण्यापासून कावळ्याला अडवते आहे..
मानवाच्या नैसर्गिक नजरेला जे दिसू शकत नाही-
ते यंत्राद्वारे दिसू शकत - पैरानानॉर्मल एक्टीव्हीटीज
पुस्तकात रियाने वाचल होत.

पाहता पाहता जस जस रियाला कल्पना येऊ लागली तस तिच्या अंगावर निवडुंगाचे काटे फुटले-
छातीतली धड धड वाढली, सर्रकन अंगावर काटा उभा राहिला..


" आई..आई...आई...!" रियाने निषाबाईंना जोर जोरात हाकामारायला सुरुवात केली.

" अंग काय झाल!" निषाबाईंनी तुळजाभवानी मातेला हात जोडले आणि देव्हा-यातून बाहेर पडणार तोच रिया धावतच देव्हा-या आत आली.

" रिया अंग काय झाल? किती ओरडतेस , आणि इतक घाबरलेस का ? ठिक आहेस ना बाळा!"
रियाच्या घामेजलेल्या चेह-याला पाहून निषाबाई म्हंणाल्य.

" आई ,आई..! मी ठिक आहे तू आधी हा व्हीडीओ बघ!" रियाने फोन स्क्रीनवर पुन्हा तीच व्हीडीओ प्ले केली.
. .

दोघीही मायलेकी त्या व्हीडीओ पाहून भीतिने थरथर काफत होत्या- अंगावर एकापाठोपाठ भीतिप्रद शहारे उमटत होते.

" आज सकाळची व्हीडीओ आहे ही! जेव्हा जेव्हा तो कावळा नैवेद्य खाण्याचा प्रयत्न करतोय ती काळी सावली त्या कावळ्याला खाऊ न देण्याचा प्रयत्न करतीये, आणी ह्याच अर्थ एकच होत आई..!"
रियाच्या वाक्यावर निशाबाईंनी आश्चर्य, भीति,नवल ह्या सर्व भावांना चेह-यावर आणत विचारल.

" काय? काय अर्थ होतो ह्याच."

" आजोबांचा आत्मा ह्या हवेलीत आहे- त्यांच्या आत्म्याला अद्याप मुक्ति मिळाली नाहीये.आणी हे खुपच भयंकर आहे आई.! मला तर वाटतंय आज्जीला हे ठावूक आहे की..आजोबांच्या आत्म्याला मुक्ति मिळाली नाहीये..म्हंणूनच त्यांची तब्येत बिघडली असावी.."
रिया एकादमात म्हंणाली.

तिच्या त्या तर्कांचा कुठेतरी मेळ जुलत होता- वाकडे तिकडे विखरून पसरलेले धागे , आता जुडायला सुरुवात झाली होती. रहस्य उलगडायला सुरुवात झाली होती.


" बापरे रिया ! हे तर खुपच भयानक आहे ! आता काय करायचं आपण ? "
" आई! सगळ्यात अगोदर आपण बाबांना फोन करूयात !" रियाने फोनवर एकदोन वेळा क्लिक केल.
आणी फोन कानाला लावला.


फोनची रिंग वाजत होती -परंतु फोन उचल्ला जात नव्हता. देवीची माया होती की नियतीचा करिश्मा
ज्या सुत्रधाराने हा रक्तरंजित खेळ सुरु केला होता..त्यालाच सत्य सांगायला रिया निघाली होती-
अजाण असलेले हे दोन सावज ख-या धोक्यापासून
पुर्णत अनभिज्ञ होते.

सावज खुद्द शिका-याच्या जाळ्यात फ़सायला निघाला होता - परंतु काळाचा धनीच जर सोबत
असेल तर तो काळही काय घंटा वाकड करणार ?

" कॉल नाही उचलत आहेत बाबा ! "

रघुवीरराव हवेलीतल्या तिस-या मजल्यावरच्या कॉरीडॉरमधुन चालत येत होते- फोनची रिंग वाजू लागली तस त्यांनी फोन.खिशातून काढला..आणी रिसिव्हर ऑन करणार ..तोच फोन कट काढला..

" बाबा बिझी आहेत वाटत !" रियाने निषाबाईंकडे पाहिल.

" आनिषाला कॉल लावते"

" रिया !" रघुवीररावांनी अस म्हंणतच
कॉल बैक केल. आणी इकडे त्याचक्षणाला
रियाने आनिषाला कॉल केल होत. ( प्रसंग अगदी विधीलिखीत लिहिल्यासारख फटाफट घडत होत)

" तुम्ही डायल केलेला नंबर सध्या दुस-या कॉलवर व्यस्त आहे कृपया थोड्यावेळाने पुन्हा कॉल
करा !" फोन मधून एका स्त्रीचा आवाज आला.

" ही का फोन करत असेल ?"
रघुवीरराव प्रश्नार्थक नजरे पुढे पाहत म्हंणाले.

" लागला कॉल? " निषाबाई पटकन म्हंणटल्या.

" हो लागतोय!" रिया अस म्हंणालीच होती की फोन उचल्ल गेल.

" हेलो ! " आनिषाचा आवाज आला.

Xxxxxxxxxxx


भ्रतांर ...

खाली जमिनिवर वाळवंटासारखी सोनेरी वाळू चौहीदिशेना पसरलेली दिसत होती.

आकाशातल्या सुर्याच्या उष्णतेचा पारा इतका चढला होता- की वातावरणात वाहणा-या हवेत उष्णतेची धग जाणवत होती-

वा-याच्या प्रत्येक झुळूकेत अंगावर एक चटका बसतच होता.
तीन तीन फुट उंचीच सोनेरी गवत वा-याच्या तालावर नाचत- डुलतांना दिसत होत.

तीन आकृत्या भ्रतांरच्या वाळवंटातून
पुढे पुढे जातांना दिसत होत्या.

त्या तिन्ही आकृतींच्या पाऊळांच्या ठश्यांची ,
मागे सुटलेली लांबच्या लांब रांग सुद्धा दिसत होती.


पहिली आकृती समर्थांची होती- दुसरी मेनका आणि चौथा गबलू.

" कृणाल ..! अजुन किती लांब जायचं? मला खुप तहाण लागले - मी नाही चालू शकत आता अजुन पुढे!" गबलू अस म्हंणतच अवसान गळून गेल्यासारख खाली वाळूवर बसला.

तोच खालची गरम झालेली वाळू त्याच्या बंबला झोंबली.

"आं.आं ..आं ..आं..आं !"
गबलू वेड्यासारखा किन्नरी स्वरात ओरडत चटकन जमिनिवरून उठला.

मेनका त्याच्या ह्या अवस्थेतवर तोंडावर हात ठेवून हसत होती.

समर्थांनी आपल्या खिशात हात घातला - खिशातून एक पिवळ्या रंगाची - लिंबूची एक कापलेली फोड बाहेर काढली.

" गबलू , ह्या लिंबाच्या फोडीच रस पी - लिंबाच्या रसाने तुझ तोंड सुकणार नाही - काहीवेळाचंच प्रश्ण आहे... आपण पोहचलोच आहोत , काहीवेळातच तुला भरपेट पाणी प्यायला मिळेल."
समर्थ म्हणाले.

गबलूने समर्थांच्या हातून लिंबूची फोड घेतली- आणी ती तोंड उघडून त्या फोडीतले चार पाच थेंब तोंडात टाकले- लिंबाच्या त्या आंबट रसाने गबलूच तोंड कसतरीच वाकड-तिकड झाल.

मग ते तिघे पुन्हा वाटेला लागले..

रणरणत्या उन्हात खालची सोनेरी वाळू विस्तवासारखी तापली होती - हवा उष्णतेची धग आपल्यासमवेत घेऊन फिरत होती.


" घ्या पोहचलो आपण!" समर्थ म्हंणाले.

त्या तिघांच्या समोर एक पडक दगडांच घर होत -मधोमध त्या घराचा चौकोनी उघडा तुटका मुटका दरवाजा दिसत होता -

आजुबाजूच्या दगडाच्या भिंती तूटल्या होत्या- हो म्हंणायला कमरे इतक्या दगडांची भींत शाबूत होती. पन वरच छप्पर खाली कोसळल होते..

" आं...हे ! " गबलू कसतरीच पुढे पाहत म्हंणाला.

" हा तर एक जुन्या घराचा तुटलेला सांगाडा आहे ! इथ कय मिळणार आपल्याला?" गबलू म्हंणाला.

" गबलू कधी कधी दिसत नसत ! माझी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव !" अस म्हंणतच समर्थांनी त्या उघड्या दरवाज्याच्या दिशेने पाऊल वाढवली.

गबलू मेनका दोघेही समर्थांना पुढे जातांना पाहत होते.

समर्थांनी त्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश केला ..त्यांच शरीर जस त्या दरवाज्यातून आत गेल ..
तस ते अदृश्य झाले - समोर पाहता फक्त उन्हाच्या पिवळसर उजेडाने उजळून निघालेली चौकोनी दगड दिसत होते.

आणी ती दाराची चौकट ज्या चौकटीतून समर्थांनी आत प्रवेश केला होता.... ती लक्खपणे चंदेरी रंगाने उजळून निघाली होती.

" अद्भूत..!" मेनकाच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला.

गबलू विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरच ते दृष्य पाहत होता.-

" गबलू ,मेनका? " त्या चंदेरी रंगाने ऊजळलेल्या चौकटीतून समर्थांचा अदृश्य गुंजणारा आवाज आला.

" तुम्ही दोघेही आत या !"


गबलू मेनका दोघांनीही एकमेकांकडे हसत पाहिल.

प्रथम गबलू त्या द्वारातून आत गेला -मग त्या नंतर मेनका.

त्या द्वारातून आत प्रवेश करताच एक
हलकासा आरामदायक थंडावा अंगाला सुखावून गेला.
सुखावत होता !

गबलू - मेनका दोघेही आजूबाजूचं दृष्य डोळ्यांत साठवून घेत होते- कारण ते दृष्य अद्भूत, अतर्कनीय होत. कितीही पाहिल तरी मन न भरणार होत.

वर अथांग काळशार आसमान पसरला होता.
त्या आसमनांत पिवळ्या, लाल, आकाशी, पोपटी, चौकलेटी आशा विविध रंगाच्या चांदण्या चकाकत होत्या.

त्याच आकाशात फटाके फुटल्यावर जसे रंगीबेरंगी धुळीकण बाहेर पडतात तशी धुळीकण
दर एक - एक मिनिटांनी आकाशात उजळून निघत होती.

गबलू - मेनका दोघांपासून तीन फुट हवेत रंगीबेरंगी फुलपाखर त्यांचे पंख फडफडवत उडत होते -त्यांच्या फडफडणा-या पंखांतून रंगीबेरंगी
चमकीली लहानसर धुळीकण बाहेर पडत होती.

खाली दोन इंचएवढ़ा हिरवशार गवत होत.
हिरव्याशार गवताची जणू पुर्ण दिशेला चादरच अंथरली होती - कारण जिकडे नजर जाईल तिथे फक्त जमिनिवर गवतच होत .

हवेत एक अद्भूत अंगाला थंडावा देणारा सकाळसारखा गारवा पसरला होता.

गबलू मेनका दोघांची नजर समोर गेली..
समर्थ एका जागेवर पाठमोरे उभे होते - आणी त्यांच्यासमोरच दहा पावलांवर एक चौकलेटी रंगाच्या खोडाच म्हातार झाड उभ होत . झाडावर एकही पान नव्हत -फक्त काटकूल्या फांद्या होत्या.

मेनका -गबलू दोघेही समर्थांजवळ चालत आले.
गबलूचा गळा सुकला होता तहाण लागली होती.
गबलूजवळ अंधांतरी हवेत तरंगत एक काचेचा सोन्याचा ग्लास आला.

"आंsssss!" गबलू त्या सोन्याच्या ग्लासाला अस हवेत तरंगत येताना पाहू घाबरला आणि समर्थांच्या मागे लपला.

" गबलू तुला तहान लागलीये ना ? घे पाणि पी."

गबलूने जरा भीतच तो सोन्याचा ग्लास हाती घेतला.

त्याने सोन्याच्या ग्लासात पाहिल- आत पुर्ण ग्लासभरून सोनेरी रंगाच चमचमत पाणी होत - गबलूने एकाच घोटात सर्व पाणी संपवल. पाण्याची चव गोड होती.- आणी पाणीही माठातल्या पाण्यासारख थंड होत. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर त्याने ग्लासात पाहिल - हा एक आश्चर्यचकित धक्का होता..की त्या ग्लासात अद्याप तेवढच सोनेरी रंगाच पाणी शिल्लक होत.

" हा जादूई ग्लास आहे गबलू - ह्यातलपाणी कधीच संपत नाही." मेनका म्हंणाली. तिने हे कुठेतरी ग्रंथात वाचल होत.

गबलू दात विचकत हसला -आणि त्याने तो सोन्याचा ग्लास त्याच्या काळसर बरमुड्याच्या खिशात कोंबला.

" बिस्लेरीचे पैशे वाचतील!" गबलू दत विचकत हसत म्हंणाला.

त्याच्या त्या वाक्यावर मेनकाने हा नाही सुधारणार अशी नकारार्थी मान हळवली.

" मेनका ?"

" जी समर्थ !"

" हे शस्त्रवृक्ष आहे ! योद्ध्याच्या अंगी असलेल्या चांगल्या, चतूर, हुशार, बुद्धीमय गुणांना ओळखून त्यांस शस्त्र बहाल करत ! " मेनकाने होकारार्थी मान हळवली. गबलूही लक्ष देऊन ऐकत होता.

" मेनका !ह्या शस्त्रवृक्षासमोर जाऊन उभी रहा ! त्याच्या खोडावर हात ठेव , आणी डोळे बंद कर !"
समर्थांच्या वाक्यावर मेनकाने होकारार्थी मान हळवली.

चालत ती त्या म्हाता-या झाडापाशी आली.
जेमतेम नऊ फुट उंचीच ते झाड होत -
झाडाच्या फांद्यांना एकही पान नव्हत -
सुकलेल झाड होत ते -पन सामान्य झाडासारख
नव्हे - मुळीच नव्हे ! ह्या झाडात एक विशिष्ट प्रकारची शक्ति होती जो कोणी ह्या झाडास हात लावत असे..

तस त्या झाडाला समोरच्या मानव- अमानवीय सर्वाँच्या अंगी असलेले - वाईट- चांगले गुण समजुन येत , आणी मग हा शस्त्रवृक्ष त्यानुसार समोरच्या रक्षकाला शस्त्र- अस्त्र देत असे.


" मेनका !" समर्थांनी मागून आवाज दिला.

" जी समर्थ!"

" तू खोडावर हात ठेवशील तेव्हा एक हलकीशी
वेदना होइल -पन ती वेदना काही सेकंदापुर्तीच असेल , त्यामुळे विचलीत होऊ नकोस !"
समर्थांच्या वाक्यावर मेनकाने एक मोठा श्वास आत घेतला आणि होकारार्थी मान हळवली.
गबलू- समर्थ एकटक मेनकाच्या कृतीला पाहत होते.


मेनकाने हळकेच आपला उजवा हात वाढवला झाडाच्या त्या खोडावर ठेवला ...दोन्ही डोळे हळकेच ब्ंद केले..


मेनकाच्या बंद डोळ्यांआड काळ्या पडद्यांवर अंधार दिसत होता .

कानांवर (स्पेस साऊंड)अंतराळातला विशीष्ट ध्वनी ऐकू येत होता.

सर्व शरीर कापासासारख हलक झाल होत .
मनात कसलेच कोणतेही विचार येत नव्हते.
ही बेशुद्धीची अमळ चढली होती.


दहा सेकंद -वीस सेकंद -तीस सेकंद पाहता पाहता .दहा मिनीटे होऊन गेली होती.

आजुबाजुला असलेली शांतता गुढमय भासत होती . समर्थ पापणी न लवता गंभीर चेह-याने मेनकाच्या पाठमो-या आकृतीला पाहत होते.

गबलू थकून खालच्या गवतावर बसला..होता.

" कृणाल..अजुन..!" गबलू बोलत होता पन मध्येच समर्थांनी त्याला अडवल.

" शश्श्श्श, शांत रहा ! काहीतरी विळक्षण घडत आहे.!" समर्थ हळु आवाजात म्हंणाले.
त्यांच्या बोलण्याचा रोख गबलूला समजला नाही
पन समर्थ बोलत आहेत म्हंणजे नक्कीच काहीतरी खास असायल हव!

मेनकाने आपला हात त्या झाडाच्या खोडावर ठेवला होता - कितीतरी उशीर झाल होतं - ती पुतळ्यासारखी स्तबध उभी होती.

अचानक तीच्या सर्वदेहाला एक झटका बसला -सर्व शरीर हादरल.

त्या सुकळेल्या झाडाच्या भुगर्भाखाली
झाडाची वाकडीतिकडी लहानसर मुळ लाल- हिरव्या, निळ्या रंगाने चमकून उठले होते.

सुप्त अवस्थेत असलेली शक्ति पुन्हा एकदा सक्रिय झाली होती.

ती चमकणारी मुळे हळू हळू वळवळत वर येऊ लागली- भूगर्भातून बाहेर आली- झाडाच्या खोडावरून ती लाल ,निळ्या, पिवळसर, चकाकत्या रंगाची ती मुळे सापासारखी वाकडी तिकडी फिरत वर येत होती.

समर्थांच्या चेह-यावर मंद स्मित हास्य पसरल..
गबलू डोळे मोठे करून समोरच दृष्य पाहत होता.
हा चमत्कार होता- निसर्गाच्या रहस्यमयी अजुबांमधला हा ही एक अजुबा होता.

सामान्य माणसाला कधीही न दिसणारा हा एक अद्भूत, अतर्कनीय दृष्य होता.

नऊ फुट उंचीच्या त्या झाडावर सगळीकडे ती चमकती लाल- निळी, पिवलसर, हिरवी मुळ पसरली होती.

त्यातलीच तीन हिरवी,लाल, निळ्या रंगाची तीन मुळ मेनकाच्या हातावर चढली- हातावरून सळसळत
हाताला गोल वेढ़ा घालत - उज्व्या हाताच्या खोडापर्यंत गोल विळखा घातला .

मेनकाच्या श्वासांची गती वाढली.
बंद डोळयांच्या पापण्यांवर समुद्र लहरींप्रमाणे हलकेसे तरंग उठू लागले - चांदण्यांसारखे आकार दिसू लागले - ह्या पुर्णत मानवी देहात एक विचीत्र बदल जाणवत होत - नसा नसा अणूउर्जेचा गरम साठा तैयार होता..

बंद डोळ्यांआड काळया पटलांवर दृष्य दिसू लागली -

नरकातली ती लालभडक लाव्ह्याची आग दिसत होती- मरण यातना भोगणा-या पापी आत्म्यांचा चित्र- विचीत्र कर्णकर्णकश, आवाजात चित्कारण्याचा विव्हलण्याचा आवाज कानांवर ऐकू येत होता.

त्या लाव्ह्यात नरक यातना भोगणारे काळ्या देहाचे आत्मे कृमी,अळ्या,सर्प ,हे दिसल जात मृत्युची भिक मागत हात पाय हलवतांना दिसत होते -

नरकात पापी आत्म्यांना शिक्षा देणारे राक्षस मोठ मोठ्या झ-यांनी आत्म्यांना कढईत तळत होते.
शेकडो आत्म्यांना तिथे वेगवेगळ्या रुपात शिक्षा दिली
जात होती- .

एक तांबड्या आगीच्या ज्वालेचा भडका उडाला आणि ते दृष्य बदल्ल.- दुसर दृष्य दिसू लागल.

नरकातल्या एका ज्वालामुखीच डोंगर दिसल ..
त्यात बुड बुड आवाज करत तांबडसर रंग असणारा लाव्हा उकळत होता..आणी त्याच ज्वालामुखीच्या डोंगराच्या कड्यावर एक पायघोळ झगा घातलेला पाठमोरा आकार उभा होता -सहा फुट उंच त्रिकोणी टोपी , अंगावर काळसर झगा घातलेला .

त्याच्या हातात एक चार फुट उंचीची काठी होती- काठीला एक कंदील अडकवला होता - त्या कंदीलातून हलकासा लाल प्रकाश बाहेर येत होता. कंदीलाच्या थोडवर कू-हाडीची धार धार पात होती- पातीवर दोन मोठाले काळ्या धाग्यात घुंगरू बांधले होते.

मेनकाच्या बंद डोळ्यांना तो सहाफुट उंचीचा आकार पाठमोरा ज्वालामुखीच्या कडेवर उभा दिसत होता .

त्याने हळकेच हातातली ती पातळसर चार फुट उंचीची काठी ज्वालामुखीच्या कडेवर आपटली ..
घुंगरांचा छम,छ्म आवाज झाला.

मेनकाच देह भ्रतांर वर पन आत्मा नरकात होती. हे दृष्य तीची आत्मा पाहत होती.

काठी आपटताच " धडाड ssssss!" एक विस्फोटक आवाज झाला.

ज्वालामुखीच्या गर्भातून लाव्ह्याचे गोळे वर आकाशात उडाले.

समोर उभ्या त्या आकाराने हळके हळके मान वळवून मागे पाहील.. जणू त्याला मेनकाच आस्तित्व जाणवलं असाव.

क्षणाक्षणाला मेनकाच्या छातीतली धडधड वाढ होती- ती उंची तो काळसर पायघोल झगा , ती छम-छम आवाज करणारी घुंगरांची काठी..
सर्व दृष्य पटपट घडत होत.

त्या आकाराने पुर्णत वळून मेनकाकडे पाहिल.
काळया पायघोळ झग्याची त्रिकोणी टोपी - त्या टोपीत त्या ध्यानाच चेहरा दिसत नव्हता होता तो फक्त कालोख- कालोखाची जणु सुरुवात होत...होती.. इतका तो अंधार भरला होता आत -

त्या अंधारात पाहता जणू आपण डुंबत आहोत- दलदलीत फसल्यासारखे खोळात आत आत जात आहोत

. अशी एक अनामिक- असुरक्षिततेची भावना जाणवत होती.

मेनका त्याच खोळ गर्तेत बुडाली होती- तो काळशार अंधार तीच्या डोळ्यांतल्या पांढरट बुभळांना शाही पुरवत होता..तीचे बुभळ काळसर रंगात परावर्तित झाले होते.

तोच दोन निखा-यांसहम चेंडू एवढे बिंदू त्या..आकृतीच्या त्रिकोणी टोपीतल्या अंधारात चमकले- जणू त्या आकाराने आपले विस्तवासारखे डोळेच उघडले असावेत.

त्या डोळ्यांत पाहताच मेनकाच्या ख-या आयुष्यात बंद डोळयांतून गरम वाफ बाहेर येऊ लागली..

" आह्ह्ह्ह्ह..आह्ह्ह्ह.अह्ह ....!" मुळाच्या देठापासून ती कर्णकर्शश्य आवाजात ओरडली.

तिच्या देहातून सोनेरी रंगाच्या झळ्या बाहेर पडू लागल्या.

केस सुटून नागासारखे हवेत उडू लागले..
पुर्णत देहातून सोनेरी रंगाची धुळीकण बाहेर पडत होती.

तीच्या देहातून निघणा-या सोनेरी कणांना जणू
अणूउर्जेची शक्ति होती की काय ? समर्थ - आणि गबलू दोघांच्याही शरीरावर ती सोनेरी किरण पडताच .. कमालीची उष्णताचा जाणवत होती- हळके हळके चटके बसत होते.

" मेनका ..!" गबलू काळजीच्या सुरात ओरडला..

तो तिच्या दिशेने जाणार होता तोच ..समर्थांनी त्याला अडवल..
.
" थांब गबलू , तिची शक्ति तिला मिळतीये..!
आता जर तिच्या शरीरास कोणिही स्पर्श केल तर तो मानव- किंवा आत्मा - जागीच जळुन काख होइल! "
समर्थ ईतकेच म्हंणाले.

गबलू हतबल होऊन तिथेच थांबला.

मेनकाच्या बंद डोळ्यांआड

समोर उभा तो पायघोळ झगा घातलेला अनोळखी आकार त्याचे ते दोन चेंडू एवढे दोन निखारे सारखे डोळे अद्याप चकाकत तिच्याकडे पाहत होते..

तोच एक घोगरा ,चिरकस आवाज आला.

" मी कंडार तुला माझ शक्ति अंश देतोय मुली-!" त्या कंडारने आपली हातातली काठी वर हवेत धरली..

नरकातल्या भगव्या आकाशात फेसाळत्या भगवट रंगाच्या विजा एक भयान गडगडाट मृत्युनांद वाजवत कडाडल्या.. आकाशातून वाकड्या तिक्ड्या खाली जमिनीच्या दिशेने येत ... त्या काठीच्या वरच्या भागावर - कू-हाडीच्या पातीवर येऊन आदळल्या..

तशी ती पात भगव्या विस्तवाप्रमाणे चकाकून तापून उठली.

काठीच्या पृष्ठभागावर कू-हाडीच्या पातीमध्ये ती शक्तिस्तोत्र जमा होऊ लागली होती.आणी त्याच काठीच पुढील टोक कंडारने मेनकाच्या दिशेने केल..क्षणार्धात त्या काठीतून
विद्युत सळसळती शक्तिअंशस्तोत्र बाहेर पडली..
मेनकाच्या छातीमधोमध आत घुसली...

ख-या आयुष्यात मेनकाच्या तोंडून येणारा आवाज अजुन कर्णकर्कश्य झाला..होता.आता तर
समर्थांनाही मेनकाची काळजी वाटू लागली होती.

कंडारच्या काठीतून निघणा-या शक्तिस्तोत्राची शेवटची पातळी जशी - मेनकाच्या शरीरात घुसली..

ख-या आयुष्यात झटकन तीचे डोळे उघडले-
तीचे दोन्ही डोळे निखा-यासम विस्तवासारखे चकाकात होते.

शस्त्रवृक्षाची मुळ- हळु हळु पुन्हा गर्भात जाऊ लागली .

मेनकाच्या देहातून निघणारी सोनेरी धुळीकण तिच्या शरीरात सामावली गेली.

आणी पुढच्याक्षणाला तिच सर्व देह निर्जीवपणे जमिनिवर कोसळल.

" मेनका ...!" गबलू तिच्या दिशेने धावला..
समर्थही तिच्या दिशेने पोहचले.

गबलूने तोच पाण्याचा सोनेरी रंगाचा जादूई ग्लास बाहेर काढला .

समर्थ दोन पायांवर खाली बसले त्यांनी मेनकाचे डोळे उघडले.

दोन्ही डोळ्यांचा रंग काळा , आणी त्यात लहान लहान निखारे दिसत होते.
" असंभव !" समर्थ हळुच पुटपुटले.
त्यांच्या चेह-यावर गंभीर, आश्चर्यकारक भाव होते.

गबलूने ग्लासातल पाणी तळहातावर घेतल आणि तेच मेनकाच्या तोंडावर मारणार तोच समर्थांनी त्याच हात अडवल.

" थांब !" समर्थांच्या वाक्यावर गबलूने तो हात जागेवरच थांबवला

समर्थांनी हाताची मुठ झाकली.तोंडावाटे कसल्यातरी मोडी भाषेतल्या मंत्राचा उच्चार केला..ती
बंद मुठ शुभ्र-धवल रंगाने चकाकून उठली.
समर्थांनी तोच हात तिच्या कपाळावर ठेवण्यास घेऊन जायला सुरुवात केली तोच अचानक एक गुंजणारा आवाज ऐकू आला.

" नियती पुढे कोणाचही काहीही चालत नाही! जे गुपित तू त्या युवतीपासून ईतके वर्ष लपवतोयेस ते कधी ना कधी समोर येईलच ! ही त्याची सुरुवात आहे असंच समज ! जस सुरु आहे तस सुरु राहूदे नियतीच्या रस्त्यात ढवळाढवळ करण चांगल नाही."

समर्थांनी बाजुला पाहिल.शस्त्रवृक्षाच्या खोडावर
एक गोळसर पिवळ्या रंगाचा प्रकाश चकाकत होता.
त्या प्रकाशातूनच आवाज आला होता.


पन त्याचा अर्थ नक्की होता तरी काय? समर्थ नक्की काय लपवत होते का? नक्की काय गुढ होत ते?

त्या शब्दांचा प्रभाव समर्थांवर जाणवला.
ती बंद हाताची चमकणारी मुठ हळू हळु आपला प्रकाश कमी करू लागली- आणी एकदाचाच हातातला.प्रकाश पुर्णत निमुळता झाला.

" कृणाल ?"
गबलूने समर्थांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल.

समर्थांनीही त्याच्याकडे पाहील त्याच्या नजरेत पाहता त्याना कळून चुकल की तो गुंजणारा आवाज तो प्रकाश- गबलूला काहीच जाणवल नव्हत.

गबलूच्या वाक्यावर समर्थ काहीच म्हंणाले नाहीत..फक्त मानेनेच त्यांनी गबलूला होकार दर्शवला.

गबलूने हातातल्या ग्लासातल पाणी पुन्हा तळहातावर घेतल आणि मेनकाच्या चेह-यावर मारल.

दोन तीन वेळा पाणी मारून झाल्यावर तिला शुद्ध आली.

डोक जरास ठणकत होत -पन शरीरात एक अद्भूत, अनोळखी नवा बदल जाणवत होता.
अंतइंद्रिय , चेताक्षमता, शारीरीक अवयव सर्वकाही
जणु एका अल्टीमेट्रीक्स नवि शक्ति मिळाल्या प्रमाणे भासत होते.

शरीरात वाहणा-या रक्तप्रवाहामध्ये एक रसरसत्या शक्तिच संचार जाणवत होत.

" मला काहीतरी वेगळंच जाणवतंय ! नक्की सांगता नाही येत आहे -पन एक अलैकीक शक्ति संचारल्यासारखी वाटतीये."

" मेनका ! " गबलू बोलत होता." तुला तुझी शक्ति मिळालीये - "

" काय ? खरच !" मेनकाला किती आनंद झाला.

" मेनका तु डोळे बंद केल्यावर काय पाहिलस ?"

समर्थांच्या वाक्यावर मेनकाने आठवायला सुरुवात केली. पन हे काय? तिला काहीच आठवत का नव्हत ? ती आठवण जणू कोणितरी तिच्या मेंदूतून काढून घेतली होती ! किंवा काही ठाराविक वेळेपूर्ती
ती पुसली- नाहीशी गेली होती.

" नाही समर्थ , मला तर फक्त मी ह्या शस्त्रवृक्षा जवळ गेले होते तेवढच आठवतंय- त्यानंतर मी जे डोळे मिटले ते... आता उघडलेत..!"
मेनका म्हंणाली.

" का काय झालं समर्थ ? काही प्रोब्लेम आहे का? "
तीच्या त्या वाक्यावर समर्थ जरासे हसले...

" नाही तसं काही नाहीये..!" मग जरा थांबून समर्थ पूढे म्हंणाले.

" चला ...आपल्याला निघायला हव! जास्त वेळ इथं थांबण योग्य नाही." समर्थ तो विषय तिथेच थांबवत म्हणाले- मेनकाने अजुन काही और विचारायला नकोच हा त्या मागचा हेतू होता.

मेनका आपल्या जागेवर उभी राहिली.
तिघेही त्या अदृश्य द्वारातून बाहेर आले.

परतीच्या वाटेला लागले - काहीवेळातच दिव्य द्वाराची चौकट प्रथम ज्या जागेवर उघडली होती- तिथे चालत आले.

उन्हाचा पिवळसर प्रकाश चौहीदिशेना पडला होता.

दिव्य द्वाराला जशी ह्या तिघांची चाहूल लागली- तस जमिनीतून ते पुन्हा एकदा वर आल.

प्रथम पाण्यासारख्या पारदर्शक आकाराची चौकट हवेत तैयार झाली -मग त्यातून लक्ख असा डोळे दिपवणारा पांढरा शूभ्र चकाकता प्रकाश बाहेर पडला.

" आपण तिघांनीही एकदाच आत प्रवेश करायचं!"
समर्थ म्हंणाले.

मेनका - गबलू दोघांनीही होकारार्थी मान हळवली.

व तिघेही आत शिरणार तोच गबलूच्या सश्यासारख्या कानांवर एक आवाज पडला..

" खच्च खच्च खच्छ !"
कूदल फावड्याने माती उकरावी तसा आवाज होता हा . एकाचवेळेस कितीतरी जण माती उकरत होते.

" गबलू? चल!" मेनकाने मागे वळुन पाहिल .
गबलू जागेवर थांबला होता.
. " मला कसलातरी आवाज येतोय!" गबलूचा किन्नरी स्वर.

" आवाज ? कसला?" मेनका.

" खुपसारी लोक माती उकरतायत असा"

" काय?" समर्थ गंभीर झाले.

" गबलू कोठून येतो आहे आवाज."
गबलूने आपले डोळे मिटले. बंद डोळ्यांच्या काळ्या पटलांवर दृष्य दिसू लागली- कानांवर आवाजाची दिशा - समजत होती..

डोळयांच्या काळ्या पटळांवर चित्र दिसत होते..

मार्ग दिसत होता... एक बार लावून फोडलेली दगडाची खाण दिसत होती- त्या खाणीत मधोमध अंगात पायघोल झगे घातलेले पाच- सहा सैतानाचे मजुर लोक हातात पाषाणी कुदळ- फावडे घेऊन खालच्या खाणीत माती ऊकरतांना दिसत होते .

गबलूने बंद डोळयांआड बोलायला सुरुवात केली.

" पाच -सहा लोक आहेत! अंगात काळे झगे आहेत. हातात फावडे कूदळ आहेत -इथून वीस मिनीटांवर एक पडीक खाण आहे- तिथेच त्यांच हे काम सुरु आहे !" गबलूने अस म्हंणतच झटकन डोळे उघडले.

गबलूच्या अंगी ही दिव्य दृष्टिची शक्ति होती.
दिव्य दृष्टिच्या शक्तिने तो दुरचही पाहू शकत होता- एका अद्यात स्थळी काहीसेकंदातच पोहचू शकत होता. परंतु त्याच्या ह्या शक्तिला काही मर्यादा होत्या..
आठवड्यातून एकदाच तो ही शक्ति वापरू शकत होता.

" हे प्रकरण नक्कीच धोकादायक आहे.ही सैतानाची मांणस नक्कीच काहीतरी भयानक , अमानवीय सैतानी विधीची सामग्री शोधत अशणार!"

" मग समर्थ आपण त्यांना थांबवायला हव का?"
मेनका.

" होय! आपण त्यांना थांबवायलाच हव ! कारण हे सैतानी आतंकवादी जे काही करतील त्याचा दुष्परिणाम पृथ्वीलोकावरच तर होणार आहे. चला , युद्धास सुरुवात करुयात."

" हो समर्थ, होऊनच जाऊदे!"
मेनकाने कडकड आवाज करत बोट मोडली.
ति तिच्या नव्या शक्तिला वापरण्यासाठी उत्सुक होती.

क्रमश :






"

××××××××××××××































xxxxxXXXXXX