Pillar of Shivshahi books and stories free download online pdf in Marathi

शिवशाहीचे आधारस्तंभ

शिवाजीचे आधारस्तंभ

मनोगत

शिवरायांचे आधारस्तंभ नावाचे पुुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही माझी साहित्य विश्वातील एकोणसाठवी पुस्तक आहे.
शिवरायांबद्दल सांगायचं झाल्यास शिवराय महान होवून गेले हे तेवढंच खरं आहे. तसंच त्यांना स्वराज्यही स्थापन करता आलं तेही खरं आहे. परंतू हे स्वराज्य काही त्यांना एकट्याच्या भरवशावर स्थापन करता आलेले नाही. त्यासाठी त्यांचे जे सवंगडी होते, सरदार होते, त्यांना हाताशी धरावं लागलं. त्यांनीही स्वामीनिष्ठा बाळगून व त्यांना धनी मानून त्यांच्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. ते नसते तर शिवरायांना स्वराज्य स्थापनच करता आलं नसतं. हे करीत असतांना काहींनी आपल्या मुलांचे विवाहसोहळे मागे टाकले तर काहींनी आपला परीवार. यात तानाजीचा उल्लेख आवर्जून येतो. फक्त शिवरायांसाठी शत्रूूवर जरब बसविणे हेच ध्येय मनाशी बाळगून ते लढत राहिले शेवटच्या श्वासापर्यंत. जीवा महाला सारख्या व्यक्तीनं शिवरायांवर आच येवू नये म्हणून आपला हात सुद्धा अर्पण केला नव्हे तर शिवबा वाचला पाहिजे म्हणून शिवा काशीदनं आपल्या प्राणाची बाजी लावली. शिवरायांनीही त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना अंतर दिलं नाही.
आज असे वीर योद्धे मिळत नाहीत. कारण काळ खराब आलेला आहे. आजच्या काळात ज्या नेत्यांसाठी कार्यकर्तेे तो निवडणूक जिंकला पाहिजे असं वाटत असतांना म्हणून दिवसरात्र मेहनत करतात. त्या कार्यकर्त्यांनाही आजचे नेते निवडणूक जिंकताच अंतर देतात. त्यामुळं आज शिवरायांच्या काळात जसे कार्यकर्ते झाले. तसे कार्यकर्ते आज दिसत नाहीत.
महत्वाचं म्हणजे यात एकुण तेवीस शिवरायांच्या काळात होवून गेलेल्या. कार्यकर्त्यांची माहिती आहे. ह्या माहितीचा मी लेखक नाही. मी एक संकलक आहे. शिवरायांच्या काळात केवळ तेवीसच कार्यकर्ते झाले नाही. अनेक झाले. परंतू जे महत्वाचे झाले. ज्यांच्यामुळंं स्वराज्य बनवता आलं. ते मुख्य पात्र यात आहेत. आपण फक्त वाचावं व आपल्याला त्यांची माहिती व्हावी म्हणून हा माझा प्रयत्न. आपण वाचावं व माहिती जाणून घ्यावी हा उद्देश. मात्र वाचून झाल्यानंतर एक फोन मला अवश्य करावा. जेणेकरुन मला प्रेरणा मिळेल.
आपला अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०

१} तानाजी मालुसरे

तानाजी त्याचं नाव. त्याच्या मुलाचं नाव रायबा. रायबा विवाहायोग्य झाला होता. आता त्याचा विवाह करावा असा विचार तानाजीनं केला. तशी सुंदर स्वरुप मुलगी सापडताच तानाजीनं आपल्या मुलाचा साखरपुडा आटोपला आणि विवाहाचं निमंत्रण घेवून तो शिवरायांकडे आला. जिथे शिवराय आपल्या आईसोबत बसून कसल्यातरी मोहिमेचा बेत आखत असलेले दिसले. त्यांच्या चेह-यावर भयंकर वेदना दिसत होत्या.
तानाजीच्या मुलाचा विवाह जुळताच शेलारमामाला सोबत घेवून ते शिवरायांकडे आले खरे. परंतू त्यांना शिवराय व जिजामाता चिंतेत दिसले. शिवरायांनी तानाजीला पाहिलं. त्यानं आणलेलं निमंत्रण स्विकारलं व म्हटलं,
"तानाजी, चिंता करु नका. आपण माझ्यासाठी पुष्कळ केलं. हे राज्य माझं नसून आपलंच आहे. माहित आहे. रायरेश्वरावर आपण कोणती प्रतिज्ञा घेतली होती ती."
तसा तानाजी म्हणाला,
"हो, आठवतंय आणि हेही आठवतंय की आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं की आच येईल ती आम्ही झेलू. परंतू तुम्हाला काहीही होवू देणार नाही."
तशी मधातच जीजाबाई बोलली,
"अरे तानाजी, आम्ही रायबाच्या विवाहाला येवू शकणार नाही. मात्र आशिर्वाद तुमच्या पाठीमागं आहेतच. तुम्ही विवाह उरकवावा."
ते जीजामातेचे शब्द. तानाजीला ते शब्द आश्चर्यजनक वाटले. तसा त्यानं आवंढा गिळला व म्हणाला,
"का बरं नाही येणार माह्या बाळाच्या विवाहाला? रायबा, माझा एकुलता एक मुलगा अान् तुम्ही नाय येत म्हणताय."
"तानाजी, समज या सगळ्या गोष्टी. ह्या सर्व गोष्टी स्वराज्यासाठी करायच्या आहेत. तुम्ही अजूनही नादान आहात."
"नादान म्हणजे? मासाहेब, आम्ही रायरेश्वराच्या देवालयात प्रतिज्ञाच केली की ताना मरेल, परंतू शिवबावर कोणतीही आच येवू देणार नाही. आपण विश्वास ठेवा. मी प्रसंगी रायबाचा विवाह मागे टाकेल. परंतू तुम्हाला काहीही होवू देणार नाही."
"हो, पण ताना विवाहही महत्वाचा ना."
"हो, परंतू स्वराज्यही तेवढेच महत्वाचे आहे. तुम्ही बोला, काय समस्या आहे ते सांगा. आम्ही तयार आहोत स्वराज्यासाठी अजून लढायला. अजुनही रग आहे आमच्या मनगटात."
"हो, माहित आहे ताना. परंतू........"
"परंतू गिरंतू काही नाही. आम्हाला फक्त हुकूम करा म्हणजे झालं." तानाजी बोलून गेला.
तानाजी वीर गडी. लहानपणापासूनचा शिवरायाचा मित्र. तो शिवरायाचा मित्र. द-याखो-यात हिंडणारा. त्या द-याखो-या पाहतांंना अगदी मजा वाटत होती. वाटत होतं की स्वराज्य येईल. आपलं स्वतःचं राज्य. ती आसंच शिवरायांनी लहानपणापासून दाखवली होती. म्हणूनच ती आडवळणे, त्या चोरवाटा शिवराय त्या मावळ्याच्या मुलांसोबत शोधत होते तासन् तास. आज त्याचा फायदा होत होता.
जिवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, हंबीरराव मोहिते, कोंडाजी फर्जद, तानाजी मालुसरे, सुर्याजी काकडे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, मुरारबाजी देशपांडे, हिरोजी इंदलकर, शिवा काशीद, बाजी पासलकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, फिरंगोजी नरसाळा, रामजी पांगेरा, कान्होजी आंग्रे, लायजी सर पाटील, प्रयागजी प्रभू, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मदारी मेहतर इत्यादी मंडळी हे शिवरायाचे मित्र. काही बालपणातील सवंगडी तर काही स्वराज्याचे काम करीत असतांना मिळालेले रस्त्यातील भटकंती प्रवासी. याच मुठभर मित्रांंना शिवरायानं आत्मस्वाभीमानी बनवलं होतं. त्यांना स्वराज्याबाबत स्वप्न दाखवलं होतं. त्या मावळ्यांच्या मुलांच्या घरी जेव्हा शिवराय जात, तेव्हा ते त्यांची कांदाभाकर आवडीनं खात. त्यांना आपल्याघरचं राजसी जेवन चारत. त्या मावळ्यांच्या झोपड्या शिवबाला राजमहालच वाटत असे.
ते मावळे.........द-याखो-यात राहात होते. त्यांची घरं ताट्यातुट्यांची होती. त्यांच्या जाती भिन्न होत्या. त्या जातीत कोणी मराठा होते, कोणी चांभार तर कोणी महार होते. कोणी रामोशी तर कोणी भंगीही होते. तसेच कोणी मुसलमानही. शिवरायानं कोण्याच मावळ्यासोबत भेदभाव दर्शवला नाही.
शिवराय जीजाबाईच्या आज्ञेत वागत असत. ते त्यांच्या आज्ञेत वागत असतांना माताा जीजाऊही त्याला भेदभाव शिकवीत नव्हती वा शिवबानं मावळ्याच्या मुलासोबत राहू नये असंही म्हणत नव्हती. आताच्या आया गरीब मुलांसोबत जर त्यांच्या मुलाची मैत्री असेल तर भेदभाव करीत असतात. अमक्याशी मैत्री कर. तमक्याशी करु नको असे म्हणत असतात. मात्र जीजाबाई अशी स्री की जिनं लहानपणापासूनच शिवरायांना थांबवलं नाही. त्याच्या आत्मनिर्भरतेला भरारी दिली. त्यातच शिवबा जेव्हा शिक्षण शिकत असे, तेव्हा त्या शिकलेल्या गोष्टी आपल्या सवंगड्यांनाही शिकवीत असे. त्यांच्या मनात स्वराज्याचं उच्च ध्येय होतं. ते साकार करण्यासाठी त्या मावळ्याच्या मुलांनाही लढाईचे डावपेच शिकवणं भाग होतं. तेच डावपेच शिवबा त्या मावळ्याच्या मुलांना लहानपणीच शिकवीत होता. तसेच जीजाबाई ज्याही गोष्टी शिवबाला सांगत असे. त्या त्या गोष्टी शिवबा मावळ्याला सांगत असे. त्या रामक्रिष्णाच्या, कर्णाच्या, पांडव कौरवांच्या गोष्टी सांगून ते रणांगणांवर कसे लढले याचे वर्णनही मावळ्यासमोर कथन करतांना शिवबा थकत नसे. जणू विरश्रीच संचारली होती त्यांच्यात.
शिवबा, लहानपणापासूनच आईच्या प्रेरणेनुसार माणसं ओळखण्यात पटाईत होते. कोण जीवाला जीव देवू शकतो. कोण बांधकाम करु शकतो. कोण चांगली हेरगीरी करु शकतो. हे शिवरायांना चांगलं कळत होतं. त्यामुळं की काय, त्याचा पुढील जीवनात त्याचा मोठा फायदा झाला. त्यांचा स्वराज्याच्या कामी शिवरायांनी चांगला उपयोग करुन घेतला.
जीजामाता त्या गडाकडे एकटक पाहात राहायची. तिला काय वाटत होतंं माहित नाही. परंतू तिला त्या किल्ल्याबाबत बरंचसं वाटत असावं असं नक्कीच जाणवत होतं. शिवबाही ते पाहात होता. तसं त्याला त्यांच्या गुप्तहेरानंही सुचना दिली होती. तसा एक दिवस ती त्या किल्ल्याकडे पाहात असतांना शिवबा म्हणाला,
"आई, काय बघतेस एवढी टक लावून? दिवसेंदिवस तुझं शरीर थकत चाललय. परंतू तुझी चिंता थकत नाहीय. काय कारण आहे? जरा आम्हालाही कळू द्या."
नुकताच पुरंदरचा तह झाला होता. त्या तहात शिवरायांचा बालपणाचा सवंगडी मुरारबाजी मरण पावला होता. तो पुरंदरचा किल्ला लढवितांना एकशे एक स्वराज्याच्या कामी येणारे वीर शिवरायांनी गमावले होते. त्यातच मुरारबाजीही.........
मुरारबाजी स्वामीभक्त व्यक्ती......... तो पुरंदरचा किल्लेदार होता. त्या किल्यावर बादशाहानं आक्रमण करण्यासाठी दिलेरखानाला पाठवलं होतं आणि दिलेरखानही आपली उत्तूंग फौज घेवून पुरंदरवर चालून आला होता. त्याला वाटत होतं की पुरंदरची तुटकी फौज. विखूरलेला दारुगोळा. आपल्याला पुरंदर सहज जिंकता येईल. परंतू तसे घडले नाही. पुरंदरचा वीर गडी मुरारबाजी तो किल्ला वीरश्रीनं लढत होता. एकामागून एक सपासप सैन्य कापत होता. ते सर्व दृश्य दिलेरखान पाहात होता. तो हत्तीवर आरुढ होता आणि अंबारीत बसला होता.
अंबारीतून ते दृश्य पाहात असलेला दिलेरखान मुरारबाजीला म्हणाला,
"हे मुरारबाजी, मी आजवर तुझ्यासारखा समशेर बहाद्दर पाहिला नाही. तू आमच्या बाजूने ये. कौल घे. मी बादशाहा सलामत औरंगजेबाकडे तुझी शिफारस करतो. आमचा बादशाहा दयाळू आहे. तो तुला असंच ठेवणार नाही. तुला सरदारकी देईल. जहांगीरी देईल."
ते दिलेरखानाचे शब्द. त्यातच मुरारबाजी स्वाभीमानी. तसा मुरारबाजी म्हणाला,
"आम्ही शिवरायांची माणसं. तुझ्या बादशाहाची जहांगीरी हवी कोणाला? आम्हाला आमच्या राज्यात काय कमी आहे. तूम्ही तुमची सरदारकी तुमच्या जवळच ठेवा. तुम्हालाच त्याची कमी आहे." असे म्हणून पुन्हा अजून त्वेषानंं मुरारबाजी लढू लागला खानाच्या फौजेशी.
दिलेरखान ते सर्व पाहून व ते ऐकून क्रोधीत झाला. तसा त्यानं अंबारीतून एक बाण काढला. तो मुरारबाजीच्या दिशेनं रोखला. तो बाण.......तो बाण येवून मुरारबाजीला लागला व मुरारबाजी धराशाही झाला. मुरारबाजीनं मरणं पसंत केलं. परंतू तो दिलेरखानाचा गुलाम झाला नाही.
आपली माणसं मरत आहेत हे पाहून शिवरायांनी बोध घेतला. त्यातच त्यांनी पुरंदरचा तह केला होता. त्या तहात त्यांनी तेवीस किल्ले व चार लक्ष होनाचा मुलूख खानाला देण्याचे मंजूर केले नव्हे तर ते किल्ले दिले. त्यातीलच एक किल्ला होता कोंढाणा.
कोंढाणा अभेद्य असा किल्ला होता. तो किल्ला जास्त काळ मुघलांच्या ताब्यात राहणे बरोबर नव्हते. तो किल्ला म्हणजे राज्याचं संरक्षण करणारा किल्ला होता. म्हणूनच की काय, जीजाबाई त्या किल्याकडे बारकाईने पाहात होती व विचार करीत होती.
"मासाहेब, आपण आम्ही असतांना चिंता करायची गरज नाही. आपण निश्चींत राहा. आधी लग्न कोंढाण्याचं करु. मग रायबाचं करु." असं म्हणून तानाजी उठला. तो उमरठे गावी पोहोचला. उमरठे गावी पोहोचताच तानाजी कोंढाणा सर करण्यासाठी योजना आखू लागला.
ते उमरठे गाव. त्या उमरठे गावात तानाजीनं योजना तयार करताच ती कार्यान्वीत करण्यासाठी तो त्या अंधा-या रात्री आपल्या सवंगड्यासोबत कोंढाण्याची वाट चढू लागला होता. त्यातच तो घोळपळीच्या साहाय्याने कोंढाण्याची बिकट वाट चढत होता.
तानाजी मालुसरे........छत्रपती शिवाजी राजाचे बालपणचे मित्र. ते मित्रच नव्हते तर स्वराज्य स्थापनेेपासून महत्वपूर्ण घडामोडीत शिवाजीसोबत मित्रता टिकवून होते. ते सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गोडोली गावचे रहिवासी होते. त्यांनी अफजलखान स्वारीवेळी शिवरायासोबत जावून उत्तूंग कामगीरी केली होती. कोकण स्वारीवेळीही संगमेश्वर ताब्यात घेवून त्या ठिकाणी शिवरायांनी तानाजी व पिलाजी यांना ठेवले होते. त्यातच सुर्व्यांनी अचानक हल्ला करताच पिलाजी पळाले. परंतू तानाजी तेथेही विलक्षण शौर्यानं लढले होते. त्यातच तानाजीच्या या पराक्रमानं सुर्व्यांचा हल्ला मोडून निघाला.
ते हल्लेखोर. कोकणात राहणारे हल्लेखोर. रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावावर हे हल्लेखोर हमले करीत. त्या हल्लेखोराचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही शिवरायांनी तानाजीवर सोपवली. त्यावेळीही शिवरायांनी त्या हल्लेखोरांना वठणीवर आणले. त्यावेळी तानाजीनं आपलं जन्मजात गाव सोडलं आणि आता ते उमरठे गावात राहायला आले होते. पुढे ते या उमरठे गावातच स्थायीक झाले. पुढे या गावात राहून येथील लोकांना स्वराज्याच्या कार्यात सहभागी व्हा असे सांगून त्यांचा उपयोग स्वराज्याच्या कामी करवून घेतला.
तानाजी मालुसरे....... छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते. शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता. जे काम कोणाकडून शक्य होत नसेल ते केवळ तानाजींच करु शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती. एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली, जेव्हा तानाजीला ही जबाबदारी समजली, तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. महाराजांचा संदेश मिळताक्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं. तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्या देत महाराजांसमक्ष प्रस्तूत झाले. महाराजांनी सांगितले की आता कोंढणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जगहसाई होता कामा नये. तेव्हा तानाजींनी चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. 'आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे' हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत. गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येवून पोचले.
ती भयाण काळोखी रात्र. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा शक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला. त्यानंतर मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली. तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे वृत्त दुसर्‍या दिवशी जेव्हा छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले, तेव्हा त्यांना समजले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले. तानाजी गेले त्या जागेवर स्मारक बांधून ठेवले.
**********************************************************

२} मुरारबाजी देशपांडे

मुरारबाजी देशपांडे...........महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजीचे जन्मस्थान होते.
मुरारबाजीचा मृत्यू १६ मे १६६५ ला झाला. ज्यावेळी जावळीच्या मो-यांचा बंदोबस्त शिवरायांना करायचा होता. त्यावेळी त्यांना मुरारबाजीचा प्रत्यय आला. जावळीच्या मो-यांशी लढतांना शिवरायांना मुरारबाजीनं जी चुणूक दाखवली. त्यावरुन वाटलं की आपण मुरारबाजीला पुरंदरचा किल्लेदार बनवावं. त्यावरुन पुरंदरचा किल्लेदार बनताच त्यांनी शिवाजीच्या विश्वासाला तडा जावू दिला नाही. आपली स्वामीनिष्ठा जपत पुरंदर किल्ल्यावर मरण पत्करलं. परंतू शरणागती स्विकारली नाही.


**********************************************************

३} बाजी पासलकर
बाजी पासलकर........हे मोसच्या मावळखो-यातील ववतनदार होते. त्यांच्या वतनदारीत चौ-यांऐंशी खेडी होती. अत्यंत शूर असलेला बाजी न्याय देण्यातही पटाईत होता.
छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेस सुरुवात करताच त्यांनी शहाजी राजांना मिळालेली पुुण्यातील जहांगीरी सांभाळण्यास सुरुवात केली. त्यातच शिवरायांनी आपल्या आईच्या मार्गदर्शनानं एकएक किल्ला काबीज करणे सुरु केले. त्यातच विजापुरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या बातम्या धडकू लागल्या. त्यातच शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहानं सन १६४८ सुमारास फतेखानास शिवरायांवर पाठवले.
फतेखानाने बेलसर इथे आपला तळ ठोकला व तो लोकांना त्रास देवू लागला. त्यातच शिवरायांनी युक्तीनं जिंकलेला सुभानमंगळ किल्ला हल्ला करुन आपल्या ताब्यात घेतला.
शिवराय तसेच मराठ्यांचा पहिलाच पराभव. ही तर सुरुवात आहे.,शिवराय विचारात पडले. काय करावं ते सुचेनासं झालं. त्यातच शिवरायांनी कावजी मल्हार यांना सुभानमंगळ गडावर चालून जाण्यास सांगीतले.
कावजी मल्हार हा हुशार गडी. शिवरायाचा आधारस्तंभच होता तो. तो सुभानमंगळ भुईकोटावर चालून गेला. त्यानं एका रात्रीतच गड सर केला. तसेच फत्तेखानानं जिथं तळ ठोकला होता. त्या फत्तेखानास धडा शिकवावा असे शिवरायांना वाटले व शिवरायांनी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप यांना बेलसर च्या छानणीवर चालून जाण्यास सांगीतले. त्यांनी जावळीजवळील या बेलसरच्या छावणीवर हल्ला केला व त्यांनी खानाच्या सैन्यांची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानाने आपला सरदार मुसेखानाला पुरंदरवर पाठवलं. त्यातच पुरंदरला खानाचा वेढा पडला. किल्ला निकराईनं लढविण्यात आला. त्यातच मराठे व खान यांच्यात तुंबळ युद्ध. खानाची फौजही काही ऐकत नव्हती. त्यातच बाजी पासलकर, कान्होजी जेधे व गोदाजी जगताप यांनी खान सैन्यांची अक्षरश कत्तलच केली. गोदाजी जगतापने तर मुसेखानाच्या छातीत आपली समशेर खुपसली व खानाला आडवे पाडले. परंतू याच लढाईत बाजी पासलकर धारातिर्थी पडला. त्यास गनिमांनी पंचवीस पंचवीस जखमा केल्या.
बाजीच्या छातीत फतेखानाने तलवार खुपसताच व बाजी मरण पावल्याची पुष्टी होताच फतेखान आपले सैन्य घेवून पळून गेला. परंतू बाजी काही मरण पावले नव्हते. त्यांच्यात अजुनही धगधग सुरु होती. ती धगधग शिवरायांना भेटण्याची होती. त्यांना वाटत होते की कधी शिवरायांना भेटतो आणि कधी मरण पावतो. तसं पाहता ते तेव्हाच प्राण सोडणार होते. जेव्हा शिवरायांसोबत बोलणार होते.
कावजी मल्हारला हे समजताच तो सासवडला गेला. त्यानं बाजीचं शरीर त्याच्या यशवंती नावाच्या घोडीवर लादलं, त्यातच ते शरीर आणि ती घोडी शिवरायांच्या दिशेनं धावू लागले. काही वेळातच शिवराय त्या शरीर लागलेल्या घोडीकडं धावले. त्यांनी बाजीचं डोकं मांडीवर घेतलं. जे काही बोलायचं ते बोलले व बाजीनं २४ मे १६४९ मध्ये शिवरायांच्या मांडीवरच डोकं ठेवत प्राण सोडला.
स्वराज्याचा पहिला रणसंग्राम. तो जिंकला होता. परंतू बाजी गेला होता. शिवराय आज गहिवरले होते. ते त्यांना आज आठवत होतं. तानाजी, बाजी, मुरारबाजी एकाहून एक शुरवीर माणसे आज स्वराज्यानं खोवली होती.
राज्य व्हावे ही श्रीची म्हणजे त्याच्या आईची इच्छा होती. आज १६७४ मोठ्या दिमाखानं उजळला होता. परंतू ते पाहायला आज ते वीर पुरुष नव्हते. ते वीर पुरुष केव्हाच ही धरणी सोडून दूर निघून गेले होते.

***********************************************

४} बाजीप्रभू देशपांडे

शिवरायांना पुन्हा आठवलं त्या दुस-या बाजीप्रभूबद्दल. जो बाजी पावनखिंडीत मरण पावला होता. बाजीप्रभू देशपांडे.........मराठ्यांच्या इतिहासात त्याचे महत्वपूर्ण स्थान होते. बाजीची शुरता पाहून शिवरायांनी त्याला महत्वपूर्ण स्थान दिले होते.
बाजीचे वडील हे हिरडस येथे कुलकर्णी पदावर होते. बाजीनं शिवरायासोबत राहून पुरंदर, कोंढाणा आणि राजापूरचे किल्ले जिंकण्यास मदत केली होती. ते शिवरायापेक्षा वयानं मोठे होते. त्यांचा जन्म इस १६१५ ला झाला होता. त्यांनी पुरंदर, कोंढाणा व राजापूर पाठोपाठ रोहिडा आणि आसपासच्या किल्ल्याला मजबूत केलं. त्यातच त्या कामगीरीमुळे बाजीचं कार्यकौशल्य आसपासच्या गावात निर्माण झालं. इस १६५५ मध्ये बाजीनं बाजीनं अनेक किल्ल्याच्या बांधकामात शिवरायांना सहकार्य केले. त्यातच १६५९ मध्ये बाजीनं अफजलखान मृत्यूनंतर पार नावाच्या जंगलात आदिलशाही छावणीला नष्ट केलं. त्यामुळं मोगल बाजीला कसा धडा शिकवता येईल याची संधी पाहात होते. शेवटी ती संधी चालून आली.
पन्हाळा किल्ला......ज्याला पन्हाळगडही म्हणत. अफजलखान मृत्यूचा बदला घेण्यासाठी शिवराय पन्हाळगडावर असतांना मुघल, आदिलशाहा व सिद्धी जौहर यांनी पन्हाळ्याला वेढा दिला. तशी आतमध्ये जाणारी रसदही बंद केली. आता मरणाशिवाय काही पर्याय नाही असा विचार करुन शिवराय युक्तीनं पन्हाळा लढण्याचा विचार करु लागले. त्यातच त्यांनी सिद्धीला एक निरोप पाठवला. 'आपण तुमच्या वेढ्याला त्रासलो असून मी लवकरच आपल्याला शरण येईल.'
सिद्धीचे सैन्य ते ऐकताच फार खुश झाले. बाहेर तसाही पाऊस सुरु होताच. त्या पावसात तसाही पहारा देतांना ते त्रासले होतेच. शेवटी ती रात्र उजळली. या रात्रीत सगळं सिद्धीचं सैन्य गाफिल राहिलं व शिवराय पन्हाळा गडावरुन शिताफीनं निसटून विशालगडावर निघाले.
सिद्धीचे सैन्य जे गाफील होते. त्या सैन्याला थोड्याच वेळात शिवराय निसटल्याची सूचना मिळाली. तसे ते सैन्य शिवरायाच्या मागे लागले.
सिद्धीचे सैन्य शिवरायाच्या मागे लागल्याचे कळताच बाजीला वाटलं, ' आपण मरण पावलो तरी चालेल. परंतू शिवराय मरायला नको. त्यामुळे की काय, ते शिवरायांना म्हणाले,
"शिवबा, अर्धी तुकडी माझ्याजवळ ठेवा. अर्धी तुम्ही न्या. मी गनिमांना याच पावनखिंडीत रोखतो. तुम्ही खुशाल पोहोचा विशालगडावर आणि जेव्हा विशालगडावर पोहोचाल, तेव्हा तोफेचा बार उडवाल. तेव्हापर्यंत मी मरणार नाही. मी तुमच्यापर्यंत या गनिमांना जीवंत असेपर्यंत कधीच पोहोचू देणार नाही."
ते शब्द....... ते शब्द शिवरायांसाठी दुधारी तलवार बनले. शिवरायांनी बाजीचा पुरता निरोप घेतला व ते निघाले.
शिवराय निरोप घेवून निघताच बाजीनं आपल्याजवळील सैन्याचे चार गट बनवले. त्यांना त्या भयाण रात्री दगडं गोळा करायला लावलीत. त्यांचे ढीग करायला लावले. तसं त्यांच्यात मरणाबाबत आत्मविश्वास भरला व म्हटलं की एक तुकडी मरण पावताच दुसरीनं सज्ज व्हायचं. आपण लढून मरण पावलो तरी चालेल. परंतू आपल्या पुढील पिढींच्या सुखासाठी शिवराय महत्वाचा आहे. तो जगणं महत्वाचं आहे.
ती घोडखिंड. लहानशी तिही बिकट वाट होती. त्यातच काही वेळानं शत्रू आला. तसा बाजी समोरच उभा राहिला. तसा तो म्हणू लागला, 'हाणा, मारा. गनिमांना वर जावू देवू नका.' त्यातच त्यांच्या म्हणण्याबरोबर ते सैन्य गनिमांवर त्या अंधा-या रात्री दगडाचा वर्षाव करु लागली. त्यातच गनीमही दगड वर्षाव करु लागले. या दगड वर्षावाच्या चेंगराचेंगरीत बाजी घायाळ झाला. रक्तबंबाळच जणू. तसं गनीम ते पाहून पळून गेलं. परंतू बाजी काही प्राण सोडत नव्हते. त्यांचं लक्ष त्या शिवरायांच्या तोफेच्या दारुगोळ्यावर लागलं होतं. तो आवाज ऐकणे म्हणजे शिवराय सुरक्षीत आहेत याची पुष्टी होणार होती.
पहाट झाली होती. सगळीकडं शांतता पसरली होती. किलबिल किलबिल पक्षाचा आवाज येत होता. परंतू तोफगोळ्यांचा आवाज आला नाही. तीनचार तासाचं ते घनघोर युद्ध. या युद्धात बाजीचा एक भाऊ फुलाजीही मारला गेला. पुष्कळ सैन्यही मरण पावलं. परंतू बाजी प्राण सोडेल तेव्हा ना.
शिवाजी सतत चालत होते. ती अरुंद पायवाट. त्यांच्याही डोळ्याला डोळा नव्हता. पाय चालवत नव्हते त्यांचे. विश्राम करावासा वाटत होता. तरीही ते चालत होते त्या बाजीसाठी. कारण त्यांना ते सुरक्षीत आहेत हे बाजीला कळवायचं होतं.
थोड्याच वेळात शिवाजी विशालगडावर पोहोचले. तसं त्यांना आठवलं. आपल्याला तोफगोळ्यांचा आवाज करायचा आहे. तो तोफगोळ्यांचा आवाज.
शिवाजीनं तोफगोळ्याचा आवाज केला. तो आवाज बाजीनं ऐकला. त्यातच १३ जुलै १६६० मध्ये बाजीनं ऐन पहाटेस प्राण सोडला. त्यातच त्यांच्या या मृत्यूनं घोडखिंड पावनखिंड बनली. आजही ही घोडखिंड इतिहासात पावनखिंड म्हणून ओळखली जाते.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील मावळातील सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातले २०-२२ तास काम करूनही न थकणार्‍या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली. महाराजांपेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या बाजीप्रभूंच्या मनात महाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभाव होता आणि वडीलकीच्या नात्याने काळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूने वेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातून सुटका करणे, महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे, या भूमिका निभावताना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे तर प्राण पणाला लावला. ही घटना स्फुरण चढवणारी, स्वराज्याविषयीचा अभिमान आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे. बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षित राखण्यासाठी आपला देह अर्पण केला नव्हे तर वीरमरण पत्करले. यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातील पुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येवून विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील पावनखिंडीतील लढाईकडे पाहून समजते. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी व फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्‍यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच आहे.

**********************************************

५} नेताजी पालकर

नेतोजी पालकर यांना नेताजी सुद्धा म्हणत असत. ते शिवरायांसोबत जुळले. तेव्हापासूनच त्यांना प्रतिशिवाजी देखील म्हटलं जाई. कारण ते मुख्यतः शिवरायांसारखेच दिसायचे.
नेताजीचे मुळ पुण्यातील असून ते शिरुर या गावी राहात होते. अफजलखानाच्या हत्येच्या वेळी खानाच्या सेनेला नेताजीनं चांगलाच धडा शिकवला होता. त्यामुळे शिवाजीचा प्रचंड विश्वास होता नेताजीवर. परंतू पुरंदरच्या वादाच्या नंतर नेताजी दूर लोटले गेले होते. त्यातच त्यांचा फायदा घेवून मुघलांनी त्याला आपल्याकडे नोकरीस लावून घेतले. एवढेच काय, परंतू बदल्यात त्याला त्यांनी मुसलमानही बनवलं होतं. त्यांना त्यावेळी कुल्लाखान संबोधलं जायचं.
पुढे त्यांना पश्चाताप झाला व तब्बल नऊ वर्षानं नेताजी पुन्हा स्वराज्यात परत आले. स्वराज्यात परत येताच त्यांनी स्वधर्मात परत घेण्याविषयीची विनंती शिवरायांना केली. त्यातच शिवरायांनी ती विनंती मान्य करुन यथोचित पंडीताकरवी त्यांचे शुद्धिकरण करुन त्यांना स्वधर्मात परत घेतले.
पुरंदरचा तह झाला. त्यात तेवीस किल्ले व चार लक्ष होनाचा मुलूख त्यांनी खानास दिला. परंतू त्या तहानंतर शिवराय, मिर्झाराजे जयसिंग, नेताजी पालकर व दिलेरखान विजापुरवर चालून गेले. परंतू तेथे सर्जाखान नावाच्या शुरवीर आदिलशाही सरदारामुळं अपयशी होताच त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवर फोडताच शिवराय निराश झाले. ते विजापूरवरुन परत आले व त्यांनी रात्रीच बदल्याच्या भावनेने पन्हाळगडावर छापा घातला. कारण महाराजांना वाटले की आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल. परंतू तो सावध होता. तसेच नेताजींनी यावेळी ऐन वेळेवर महाराजांना रसद पोहोचवली नाही. त्यामुळं महाराजांचा पराभव झाला. तसेच हजार माणसे विनाकारण मरण पावली.
हे सर्व ऐन वेळेवर आपल्याला नेताजींनी कुमक न पोहोचविल्याने घडलं अशी महाराजांची खात्री झाली व ते नेताजीवर चिडले. त्यांनी त्यांना खरमरीत पत्र लिहिलं. त्या पत्रानं सरळ नेताजीला बडतर्फ केलं अर्थात नोकरीवरुन काढून टाकलं.
नेताजींना शिवरायांनी आपल्या नोकरीवरुन काढून टाकताच ते आदिलशाहाला मिळाले व त्यांची चाकरी करु लागले. पुढे मिर्झा राजे जयसिंगला वाटले. नेताजीसारखा शुरवीर आदिलशाहाकडे असणे बरे नाही. शेवटी त्याने नेताजीशी प्रेमाने वाटाघाटी करुन त्याला मुघलांकडे वळवले व तो मुघलांकडे आला.
शिवराय आग्र्याच्या कैदेतून सुटताच बादशाहा औरंगजेबानं फर्मान जारी केलं की एक शिवाजी सुटला. प्रतिशिवाजी सुटायला नको. त्याला अटक करा. यावेळी ते मोगलांच्या बीड येथील धारुरच्या छावणीत होते. तेथेच २४ आक्टोंबर १६६६ ला त्यांचे काका कोंडाजी व त्यांना अटक केली व दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.
आग्र्याला असतांना धर्मांतरासाठी नेताजीचे अतोनात हाल झाले व त्यानंतर नेताजींनी धर्म बदलवला. त्यावेळी २७ मार्च १६६७ हा दिवस होता. त्याला मोहम्मद कुलिखान असं नाव देण्यात आलं.
नेताजी मुसलमान बनताच त्यांना काबूल, कंदाहारच्या मोहिमेवर पाठविण्यात आले. तिथे ते नऊ वर्ष राहिले. त्यांनी एकदा तेथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. परंतू ते अपयशी ठरले.
शिवराय हे शुर होते. हुशार होते. त्यांच्यासमोर औरंगजेबाची डाळ शिजत नव्हती. त्यावेळी त्यांना नेताजीची आठवण झाली व त्यांनी नेताजी पूर्णतः मुसलमान बनले असे समजून त्याला दिलेरखानासोबत मे १६७६ मध्ये महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवले. त्यावेळी मुसलमान झालेले नेताजी दिलेरखान छावणीतून पळून थेट रायगडावर आले. त्यावेळी त्यांनी शिवरायांसमोर सत्य परीस्थीती कथन केली. त्यावेळी शिवरायांना दया आली व त्यांनी १९ जून १६७६ मध्ये नेताजींना पुन्हा हिंदू धर्मात परत घेतले.

***********************************************

६} प्रतापराव गुजर; शिवरायांचे सरसेनापती

शिवरायांना क्षणोन् क्षण आठवत होता. राज्यभिषेकानंतर त्यांनी कसं नेताजीला आपलंसंं केलं याचा अतीव आनंद त्यांना झाला होता.
आयुष्याचा तो शिवरायांचा शेवटलाच काळ. ते तंजावरला होते. तसं पाहता ते तंजावरला आपल्या सावत्र भावाची भेट घ्यायला गेले होते. वाटत होतं की व्यंकोजीची मदत स्वराज्य सांभाळण्याच्या कामात होईल. परंतू झाले उलटेच. व्यंकोजींनी महाराजांना उलट खडे बोल ऐकवले. शिवरायांचा भ्रमनिराश झाला. ते चिंताग्रस्त झाले.
शिवराय चिंतेत असतांना त्यांना प्रतापराव गुजरची आठवण झाली. प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे तिसरे सेनापती होते. त्यांचे नाव कुडतोजी होते. परंतू त्यांनी केलेल्या महान कामगीरीमुळं शिवरायांनी त्यांना गुजर व प्रतापराव अशा पदव्या दिल्या. त्यामुळं त्यांना प्रतापराव गुजर नावानेच लोकं ओळखायला लागले होते.
कुडतोजी जाधव..........त्यांनी गुजरातच्या आसपासच्या प्रदेश लढविण्यात मोठा पराक्रम केला. तसं पाहता महाराष्ट्रात राहणारे मराठा व गुजरातला राहणारे गुजराती. याचाच अर्थ असा की गुजरातला राहून ज्यानं पराक्रम केला. तो प्रतापराव गुजर.
छत्रपती शिवबा जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले. त्यानंतर स्वराज्याचे सेनापती असलेल्या प्रतापराव गुजर व मोरोपंत पिंगळे यांनी पुरंदरच्या तहात गमावलेले किल्ले आपल्या पराक्रमाने परत घेणे सुरु केलेे होते. त्यातच साल्हेर किल्ल्याच्या वेळी केलेली कामगीरी अतूलनीय होती. त्यांनी साल्हेर किल्ला जिंकतेवेळी समोरासमोरच्या लढाईत इखलास खान व बहलोल खान यांचा पराभव केला होता.
प्रतापरावाचं जे गाव होतं. त्या गावात मुघलांचे अत्याचार वाढत असल्याचे निदर्शनास येत असतांना ते अत्याचार प्रतापरावांना सहन झाले नाही. त्यामुळं की काय, ते मुघलाांविरुद्ध चिथावून उठले.
मुघल सल्तनत ही शिवरायांचीही शत्रू होती. तशी प्रतापरावांनी. शिवराय व प्रतापराव यांचे विचार जुळून आले व शेवटी मुघलांच्या विरोधात प्रतापरावही तयार झाले. त्यातच एके दिवशी ते रागाच्या भरात मिर्झाराजे जयसिंगवरही चालून गेले होते.
मिर्झाराजे जयसिंगाने त्यांना मुघलांकडे या. तुम्हाला सर्वकाही मिळेल असे सुचवताच प्रतापरावांनी ताड्कन उत्तर दिले. 'आम्हाला आमचं स्वराज्य प्रिय आहे.'
मिर्झाराजेच्या या गैरबोलण्यावरही मिर्झाराजेवर न रागावता प्रतापरावांंनी त्यांना अगदी सहजपणे सोडून दिले. तेव्हापासूनच ते प्रतापराव नावाने ओळखले जावू लागले.
बहलोल खान औरंगजेबाचा विश्वासू सरदार होता. तो नेहमी स्वराज्यावर आक्रमण करीत असे. हिंदूची देवळे पाडणे, विनाकारण गाईंची कत्तल करणे. इत्यादी त्यांच्या गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या. त्यामुळं की काय, शिवरायांनी प्रतापरावांना म्हटलं, ' आता पुरे झालं. आता बहलोलखानाचा वध करा.'
शिवाजी महाराजांचा आदेश ऐकताच प्रतापरावांनी गनीमी काव्याने बहलोलखानास सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या ठिकाणी उमाराणीच्या डोन नदीपात्रात जावून बहलोलखानास होणारा नदीचा पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळं खानाबरोबर युद्ध झालं. त्या युद्धात बहलोलखानाचा पराभव झाला व तो शरण आला.
प्रतापराव दयााळू होते.युद्धात शरण आलेल्यांना मारु नये हा त्यांचा कडक नियम होता. त्यामुळं त्यांनी बहलोलखानावर दया दाखवली. त्यातच त्यांनी बहलोलखानास सोडून दिले. परंतू ही वार्ता जेव्हा शिवरायांना कळली तेव्हा शिवराय अतिशय निराश झाले.. त्यांना वाटले की ज्या माणसानं रयतेला त्रास दिला. येथील निरपराध पशूपंक्षी कापले. विनाकारण देवळे पाडली. त्यांना जीवंत सोडायचं नव्हतं. प्रतापरावांनी त्याला जीवंत सोडायला हवं नव्हतं. त्यातच त्यांना राग आला व त्यांनी प्रतापरावांची कानउघाडणी म्हणून त्यांना खरमरीत पत्र लिहिले. 'बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तुमचं तोंडही दाखवू नका.'
प्रतापरावांना ते पत्र मिळालं. ते पत्र त्यांनी वाचलं. त्यांना बहलोलखानाला सोडून देण्याबाबत पश्चाताप झाला. तशी ती त्यांना शिक्षाच वाटली.,शेवटी काय करु, काय नाही असा विचार करीत असतांना ते खानाचा शोध घेवू लागले. अशातच बहलोलखानाच्या सैन्याचा तळ एके ठिकाणी पडलेला दिसला. त्यावेेळी ते शिकारीला गेलेले होते.
ते शिकार करीत असतांना त्यांच्या जवळ एक दूत आला. त्यानं बहलोलखान जवळच असल्याचं सांगीतलं.
प्रतापरावाला माहिती मिळाली की बहलोलखान समोरच्या डोंगरापलिकडं आहे. त्यातच वेळ न दवडता व सैन्याची वाट न पाहता प्रतापराव बहलोलखानाला ठार करण्यासाठी एकटाच सरसावला. त्यावेळी ते अवघे सात मराठे वीर होते.
कृष्णाजी भास्कर, विसाजी बल्लाळ, विठ्ठल पिलाजी अत्रे, दिपाजी राऊत, सिद्धी हिलाल,विठोजी शिंदे व प्रतापराव असे ते सात वीर. परंतू त्यांची महत्वाकांक्षा उत्तूंग होती. आपण मृत्यूकडे जात आहोत याचं त्यांना भय नव्हतं. तसेच त्या पंधरा हजार सैन्यापुढं आपण टिकाव कसा धरु? असाही प्रश्न त्यांना पडला नाही.
ती पंधरा हजाराची फौज. त्यातच त्या पंधरा हजार सैन्याच्या छावणीवर सात विरांनी केलेला हमला. परंतू त्यांच्यात शिवरायांमुळं महत्वपूर्ण महत्वाकांक्षा कुटकूट भरली होती. मग काय, हमला करताच त्या पंधरा हजार सैनिकांपुढं प्रतापराव व त्या सातही जणांंचं काहीही चाललं नाही. ते त्वेषानं लढले अगदी हिंमत न हारता. त्यांनी ते सात असूनही कित्येक सैनिकांना यमसदनी पोहोचवले. त्यातच या सातही जणांना वीरमरण आलं.
महाराजांना हे माहित होताच त्यांना पश्चाताप झाला. वाटलं की आपण प्रतापरांवाना असं म्हणायलाच हवं नव्हतं. आपल्या अतीव महत्वाकांक्षेनं आपण त्यावेळी सातही जणांचे बळी घेतले होते. ही लढाई १५ एप्रिल १६७३ मध्ये झाली. ही लढाई उंबराणीची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

************************************************

७} शिवा काशीद ; प्रतिशिवाजी

कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले होते. त्यातच त्यांना कर्नाटक मोहिमेची दगदग जाणवत होती. परंतू स्वराज्याचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे की काय, महाराजांनी जंजि-याची आरमारी मोहिम काढली. कारण जंजि-याचा सिद्धी महाराष्ट्राला जास्त त्रास देत होता.
ही सततची दगदग आज सहन होत नव्हती. आज महाराज पन्नास वर्षाचे झाले होते. जवळपास पस्तीस वर्ष त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी दगदग केली होती. अपार यातना सहन केल्या होत्या. अतीव कष्ट शोषले होते.
महाराज जेव्हा एकटे राहायचे. तेव्हा त्यांना त्यांच्या स्वराज्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेत जे-जे मरण पावले. त्यांचे बलिदान आठवायचे. त्यावेळी त्यांना अतिशय गहिवरुन यायचं. कारण जी माणसे मरण पावली होती. त्यांचा मरतांना अजिबात स्वार्थ नव्हता. केवळ आणि केवळ स्वराज्याचे ध्येय होते. जे ध्येय त्यांना स्वप्नातही दिसत असे. जे ध्येय त्यांना प्रतापराव गुजरच्या रुपानं दिसलं होतं. प्रतापराव गुजर असा व्यक्ती की पुरेसे सैन्य सोबतीला नसतांना बहलोलखानाशी लढायला स्वराज्याचे ध्येय घेवून सोबत केवळ सहाच माणसं घेवून गेला होता आणि तिही माणसं गेली होती. कारण तिही स्वराज्याच्या ध्येयानं वेडी झाली होती.
आपली माणसं अाठवत असतांना शिवाजी महाराजांना अचानक आठवला तो वीर. ज्याचे नाव होते हंबीरराव मोहिते.
खरं तर हंबीररावाचं नाव होतं हंसाजी. ज्यावेळी १६७४ ला शिवरायांचा राज्यभिषेक पार पडला. त्यावेळी त्यांनी हंसाजीला हंबीरराव हा मानाचा किताब दिला. तसेच त्याला सैन्यदळातील प्रमुख सेनापती म्हणून पदही दिले.
हंबीरराव हे शिवरायांची दुसरी पत्नी सोयराबाई हिचा भाऊ होता. तसेच महाराणी ताराबाई ही हंबीररावाची मुलगी होती. जी महाराजांनी आपला पुत्र राजारामासाठी मागीतली होती.
महाराजांच्या जीवलगामध्ये केवळ हिंदूच होते असे नाही. तर महार, मांग, चांभार आणि मुसलमानही होते. त्यातील शिवा काशीद एक.
शिवा काशीद हा शिवरायांचा सरदार होता. त्याने शिवरायावर आलेले संकट स्वतः झेलले व त्या संकटाचे निवारण करतांना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणूनच शिवाजी सिद्धी जौहरच्या वेढ्यातून सुखरुप निसटले आणि ते विशालगडावर पोहोचले.
शिवा काशीद हा हुबेहूब शिवरायांसारखा दिसत होता. त्याचाच फायदा शिवरायांना झाला.
विशालगडावरुन निसटतांना शिवरायांनी आपल्या हुबेहूब दिसणा-या शिवा काशीदला शिवाजी बनवून पन्हाळगडावर ठेवले. त्यातच सिद्धी जौहरला वाटले की हाच तो शिवाजी असावा. त्यांनी त्यालाच शिवाजी समजून पकडले. त्यातच काही वेळातच सिद्धी जौहरला तो शिवाजी नाही असे समजले. तेव्हा सिद्धी जौहर शिवा काशीदला म्हणाला,
"हे शिवा, आता तू मरण पत्कर."
सिद्धीनं बोललेले शब्द. शिवाच्या कानात बाणासारखे शिरले. त्याला सिद्धीचा राग आला. तसा तो बोलला,
"हे सिद्धी मरणाला कोण घाबरतं. भीती एवढीच आहे की तुझ्यासारख्या बुजगावण्याच्या हातातून मरण यायला नको. अन् आता तर मला मरणाचीही भीती वाटत नाही. कारण आमचा शिवाजी राजा केव्हाच तुमच्या वेढ्यातून निसटला आणि आतापर्यंत ते विशालगडावर पोहोचलेही असतील. आम्ही शिवरायाची माणसे. आम्ही आमच्या शिवरायांसाठी हजारवेळा मरणास तयार आहे."
सिद्धीनं शिवा काशीदच्या तोंडून शिवाजी बाबतचे गुणगान ऐकताच त्याचा राग अनावर झाला व त्यानं एका झटक्यात म्यानातून तलवार काढून शिवा काशीदचं मस्तक धडावेगळं करुन टाकलं.
शिवा काशीद मरण पावला खरा. परंतू त्याचे बलिदान हे आजही शिवाजीला आठवत होते. काशीदसारख्या मावळ्याच्या बलिदानानं शिवाजीला स्वराज्य साकार करता आले होते.
आज शिवा काशीदची समाधी जी पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहे. ती साक्ष देते की तो होता म्हणूनच शिवबा वाचला.
शिवा काशीद हा महाराजांचा न्हावी होता. तो महाराजांसारखा हुबेहूब दिसायचा. त्यामुळं त्याला पाहून सिद्धीलाही तो शिवाजी असल्याचा भाष झाला होता.
शिवा काशीद मरणापुर्वी दोन पालख्या निघाल्या होत्या पन्हाळगडावरुन. एक विशालगडाकडे निघाली होती व दुसरी सिद्धीकडे. विशालगडाकडे निघतांना शिवरायानं शिवा काशीदला म्हटलं,
"शिवा, आता तू मरणार आहेस. तुला भय वाटत असेल." त्यावर शिवा काशीद म्हणाला,
"महाराज, मला मरणाचं भय नाही. मला उलट मी शिवाजी म्हणून मरणार याचा आनंद आहे."
ते ऐकून शिवाजीला गहिवरुन आले व ते म्हणाले,
"शिवा, तुझ्यासारखा व्यक्ती पुन्हा कधी स्वराज्यात होणे नाही. हा इतिहास तुला वेळोवेळी आठवेल. म्हणेल की शिवा काशीद असाही व्यक्ती होवून गेला. ज्याने शिवाजीसाठीच नाही तर स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली."
शिवा काशीद मरणाच्या दारात हसतहसत गेला. कारण त्याचा राजा काही का होईना, काही अंतर शत्रू सिद्धी जौहरपासून दूर जाईल.

**********************************************

८} जिवा महाला; होता जिवा वाचला शिवा

उमरठे हे गाव. तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव. गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा. आज गावची यात्रा भरली होती.. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनच होती. मिशी फुटायची होती, त्यावेळचे मित्र होते ते.
आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर आणि त्याच्याबरोबर लढणारा होता, तो भिकाजी ढेरे. हा हिरडस मावळातला. वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल. वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार? लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते असे नाही. परंतू पुण्यात राहात असतांना त्यांनी सुसाट सुटलेल्या रानडुकरांचा व लांडग्याांचा बंदोबस्त लावला होता. तसेच चोरांंवरही जबरदस्त रोक बसवली होती.
मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले. राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता.
कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला तलवार बांधली होती शिवरायांनी. जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते ते.
राजे खाली उतरले. तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली. तितक्यात खबर आली की, 'बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला. वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली. मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने.' हे ऐकून मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.
आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते.
तसं आयोजकानं दवंडी पिटवली, "मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही. या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल? असेल तर समोर या.'' ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली. तसा एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येतच होता. तितक्यात त्याला पााहून सर्व लोक जोरात ओरडत होते. राजश्री तेे सर्व पाहत होते. तितक्यात कोणीतरी किंचाळला.
''आरं आला रं जिवा आला ''
शिवाजी महाराजांनी चौकशी केली तानाजीरावांपाशी. तेव्हा तानाजी म्हणाले,
''राजं, ह्यो जिवाजी, आपल्यास हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय. याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं. निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला. तेनच याला तयार केलाय."
राजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.
कुस्तीची सलामी झडली. भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला, पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.
भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्नष केला, पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली. भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला. सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले. तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे येत होते. पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे जाम खुश झाले होते. राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले आणि विचारले..
"जिवा काय करतोस?"
जिवा उद्गारला,
''काय नाय, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.''
राजे हसले आणि म्हणाले,
''येशील आमच्या सोबत? पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमांच्यासोबत. आहे का कबूल?"
जिवा हसला. होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला आणि हाच तो जिवा महाला ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
जिवा महाला..........हा महाराजाचा अंगरक्षक होता. तो महाराजांना कसा आठवणार नाही. म्हणूनच म्हटलं आहे की होता जिवा म्हणून वाचला शिवा.
तो अफजलखानाच्या वधाचा प्रसंग शिवाजी महाराज त्या प्रसंगाला अद्यापही विसरले नव्हते. तो प्रसंग क्षणोन् क्षण महाराजांच्या आठवणीत होता.
आज महाराजांना अस्वस्थ वाटत होतं. ते तसे बिछाण्यावर पडले होते. त्यांच्या मनात आई गेल्याचंं दुःख अगदी कुुटकुट भरलं होतं. आपण मरणार की काय, असं आजारपणात वाटत होतं. तसा त्यांंना जिवा आठवला. हा देह म्हणजे त्याचच ऋण होय असं शिवरायांना वाटायला लागलं होतं.
जिवा महाला.........एक हुशार गडी. त्याचं मुळ गाव कोंडवली बुद्रूक. हे गाव वाई तालूक्यात होतं. कोणी म्हणतात की जीवा महार समाजाचे होते. तर कोणी त्यांंना न्हावी म्हणून ओळखतात. त्यांचे वडील पहलवान होते. त्यांनी जीवालाही पहलवान बनवलं होतं. त्यातच त्यांचे वडील शहाजीच्या सेवेत होते. युद्धाच्या वेळी त्यांनी आपला एक पाय गमावला होता.
अफजलखानाची ती भेट अविस्मरणीय होती. या भेटीच्या वेळी शिवरायांनी जीवाला सोबत नेलं होतं. आपला एक अंगरक्षक म्हणून. ज्यावेळी अफजलखान भेेट झाली. त्यावेळी त्यानं शिवरायांवर बिचव्याचा वार केला. परंतू तो वार हुकवत शिवरायांनी खानाच्या पोटात कट्यार खुपसली व त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यावेळी ते पाहात असलेला सय्यद बंडा याने शिवरायांवर वार केला. परंतू तो वार शिवरायांनी चाणाक्ष नजरेनं टिपत तो वार जीवानं आपल्या हातावर झेलला. प्रसंगी यात त्यानं शिवरायाचे प्राण वाचवले. त्यावेेळी ते अवघे पंचवीस वर्षाचे होते.
दांडपट्टा चालविण्यात महाले परीवार पटाईतच असतांना जीवाही दांडपट्टा चालवायचा. सय्यद बंडा वाराच्या वेळी दांडपट्ट्यानेच त्यानं सय्यदला खाली पाडले.
असा हा महापराक्रमी जीवा महाला इस १७०७ मध्ये मरण पावला आणि त्यांची समाधी रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी बांधण्यात आली. तो जेव्हा मरण पावला. तेव्हा ते पाहायला शिवरायही हजर नव्हते. ते तर त्याच्या मरणाच्या कितीतरी पुर्वीच या जगातून इहलोकात गेले होते.

**********************************************
९} कान्होजी जेधे

कान्होजींच्या आयुष्यात देखील असाच जाच सहन करावा लागला. श्रीकृष्णाला कंस मामा ने मारण्याचा प्रयत्न केला इथे वतनासाठी स्वतःचे चुलतेच जीवाचे वैरी बनले होते.
स्वराज्याच्या कामात बाजी पासलकरांच्या निधनानंतर सर्वात जास्त महत्त्वाचे कार्य आणि आदिलशाहीत राहून थोरल्या महाराजांप्रमाणेच महाराजांवर वडीलधारी आधार कान्होजींचा होता. पुढे स्वराज्यात संभाजी राजांच्या काळात वतनासाठी गद्दारी करणारे भरपूर होते. पण कान्होजी जेधे म्हणजे स्वराज्याच्या कामासाठी वतनावर पाणी सोडलेले एक स्वराज्यनिष्ठ वतनदार. ते बेईमान झाले नाही. त्यांनी स्वराज्यासमोर वतनावर पाणी सोडले.
रायरेश्वराच्या पायथ्याशी वसलेले कारी गाव म्हणजे निजामशहा च्या अधिपत्याखाली असलेले एक समृद्ध गाव. परंतू भाऊबंदकी ही नावलौकिकाला सर्वात जास्त घातक असते हे खरे. जेधे परिवारातील जेष्ठ पुत्र नाईकजी जेधे आणि त्यांच्या पत्नी अनुसया आपल्या कारी येथील वाड्यात राहात होते. निजामशहाने रायरेश्वराच्या पायथ्याशी असेलेल्या कारी व आंबवडे गावांची देशमुखी जेधेना दिली होती.
देशमुखी मोठ्या भावाकडे असणे हे सोनजी व भिवजी यांना मान्य नव्हते. दोघांनी मिळून नाईकजीचा खून केला आणि जणू काही असे दाखवू लागले की त्यांनी काही केलेच नाही. कारीचा वाडा रक्ताने नाहला होता, अनुसया म्हणजेच कान्होजींची आई, देवजी महाले या सेवकाने यांना वाचवले आणि अशाच परिस्थितीत कान्होजींचा जन्म झाला. देवजी महाले, आई अनुसया, कान्होजी आणि एक दासी व तिचा मुलगा या वाड्यात राहात होते. एक दिवशी भिवजी आणि सोनजी यांनी पुन्हा हल्ला केला, दासीने अनुसया कडून कान्होजीना घेतले आणि कान्होजीना देवजी कडे देवून देवजी मागच्या दरवाजाने पळत सुटले, डोंगरदर्यांतून कान्होजीला घेऊन जात होते. याच वेळी अनुसयेला भिवजी व सोनजी ने मारले, पाळण्यात असलेल्या कान्होजीना म्हणजेच त्या दासीच्या मुलाला देखील मारले व त्या दासीचीही हत्या केली. कारीचा वाडा पुन्हा रक्ताने धुतला गेला, त्या दोघांच्या मते आता नाईकजीचा वंश संपला. भिवजी व कावजी ने मिळून लोकांवर जुलूम करणे सुरु केले आणि कारी प्रांत पुन्हा दुःखाच्या सागरात बुडाला.
देवजी कान्होजीला घेऊन डोंगरदर्यांमधून फिरत होता, मांढरगावचे कान्होजींचे आजोळ तिथे देखील देवजी कान्होजीना घेऊन गेले, परंतू मांढरे मामांनी त्यांना भिवजी व सोनजीना घाबरून आसरा देण्यास नकार दिला. परंतू देवजी घाबरले नाहीत. अथवा डगमगले नाहीत, आता आशेचा एकच किरण होता तो म्हणजे बाजी पासलकर. संपूर्ण मावळ प्रांतात सर्वात जास्त चर्चा होती ती बाजींच्या दिलदारपणाची, त्यामुळे देवजी मोसे खोऱ्यात बाजी पासलकरांच्या आश्रयाला आले.
बाजींनी देवजीला निजामाच्या दरबारात नाईकजीसोबत निजामशहाच्या दरबारी पाहिले होते. बाजींनी कान्होजीना आसरा दिला व त्यांना पुढे घरातील एक सदस्यच माणू लागले. पुढे बाजींनी कान्होजीना घोडेस्वारी, शस्त्रविद्या शिकवली. पुढे त्यांनी आपली मुलगी सावित्री सोबत कान्होजींचा विवाह लावून दिला.
बाजींनी कान्होजीना त्यांच्या चुलत्यांविषयी आणि घटनांविषयी सांगितले. त्यानंतर कान्होजी व बाजी यांनी काही काळानंतर कारीवर स्वारी केली. बाजींच्या नावाला घाबरूनच हे युद्ध संपले होते. कान्होजीनी भिवजी व सोनजी यांना पकडून त्यांना शिक्षा दिली. कारी परिसरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण पसरले. त्यानंतर आदिलशहा कडे असताना कान्होजी रनदुल्लाखानाच्या सोबत होते. शहाजी राजांचा असफल निजामशाहीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुघल व आदिलशहाने माहुली गडाला दिलेल्या वेढ्यात तहाची बोलणी होऊन राजे आदिलशाहीत रुजू झाले. शहाजीराजे कर्नाटक जहागिरीवर निघाले तेव्हा त्यांनी कान्होजीना आपल्या सोबत घेतले व कान्होजी शहाजीराजांचेच झाले. शिवरायांच्या स्वराज्याला विरोध म्हणून आदिलशहाने शहाजी राजांना अटक केली. तेव्हा त्यांच्या सोबत कान्होजी व दादाजी कृष्ण लोहोकरे यांना देखील अटक झाली. जिंजीच्या कैदेत हे सर्व सोबत होते. शिवाजी महाराजांनी खेळलेल्या चालीनंतर यांची सुटका करण्यात आली. कैदेत असताना स्वराज्याने बाजी पासलकर गमावले होते. त्यामुळे आता स्वराज्याला एका वडिलधाऱ्या योद्ध्याची गरज होती. शहाजी राजे हे जाणून होते. त्यामुळे त्यांनी स्वराज्याच्या कामासाठी कान्होजीना शिवाजी महाराजांकडे पाठवले.
स्वराज्याच्या कार्यात असताना कान्होजीना कारी गावची देशमुखी देखील होती. अफजलखानाच्या हल्ल्यावेळी अफजलखानाने सर्व देशमुखांना महाराजांविरोधात जाण्याचे आवाहन केले व बक्षीस रकम देखील जाहीर केली. खंडोजी खोपडे सारखे काही वतनदार देशमुख खानास मिळाले देखील. कान्होजीनी या वेळी आपल्या वतनावर पाणी सोडले आणि कान्होजी स्वतः त्यांच्या पाच मुलांसमवेत स्वराज्याच्या कामात रुजू झाले. इतकेच नाही तर आपल्या प्रांतातील सर्व देशमुखांना महाराजांसोबत राहण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला मान देत कानंद खोऱ्यातील झुंजारराव , पौंडचे ढमाले, मुठाचे मारणे हे देशमुख महाराजांसोबत आले. अफजलखानाच्या वधाच्या वेळी कान्होजीनी खूप मोठी कामगिरी केली होती. कान्होजींचे पुत्र बाजी देखील पराक्रमी होते. यासोबतच पन्हाळा सुटकेच्या वेळी कान्होजीनी बरीचशी मदत ही महाराजांना झाली. अफजलखानाच्या वधाच्या वेळी केलेल्या मोठ्या कामगिरीमुळे कान्होजीना तलवारीचे पहिले मानाचे पान मिळाले होते. कान्होजींचा मुलगा बाजी यास सर्जेराव हा किताब मिळाला.
पन्हाळा सुटकेच्या वेळी बांदलांनी मोठा पराक्रम केला. यानंतर एका सभेत महाराजांनी बांदलांना मानाचे पहिले पान जाहीर केले. बांदल आणि जेध्याचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले वैर. हे सर्व विसरून कान्होजीनी त्यांच्या पराक्रमाची दाद देत हे पान त्यांना देऊ केले. महाराजांचा वैर थांबण्याचा एक अनोखा प्रयत्न येथे यशस्वी झाला.
शेवटचा तो काळ......कान्होजी हे बराच काळ आजारी होते. महाराजांना ते सल्ला देत. पण आपल्या कारी गावातील वाड्यातूनच. आजारपणाने कान्होजीना कारी येथील त्यांच्या वाड्यातच मरण आले. स्वराज्याचा एक आधार हरपला. परंतू तोपर्यंत स्वराज्याचा खूप भक्कम पाया रचला गेला होता. आजही कारीत असलेला त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते. आंबवडे येथे कान्होजींची समाधी आहे. प्रत्येकजण त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास आंबवडेस येतात. तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येतो.
शिवबाला कान्होजी जेधे सुद्धा आठवत होते. कान्होजी जेधे हे सुरुवातीपासूनच शिवरायांचा सोबत होते. त्यांनी तर घरावर तुळशीपत्रच ठेवलं होतं. ते वतनदारी पेक्षा स्वराज्याला महत्वपूर्ण स्थान देत असत.
जेधे हे मावळातील भोर प्रांतात देशमुख या पदावर कार्यरत होते. त्यातच जेव्हा अफजलखान वाईस आला, तेव्हा आदिलशाहानं मावळातील देशमुखांना अफजलखानाच्या बाजूला उभे राहण्याचा इशारा दिला. त्यावेळी जेधेंनी सा-या वतनदार व देशमुखांना एकत्र केले व त्यांना समजावून सांगीतले की अफजलखान वाईट विचारांचा असून त्यांच्याकडे कोणीही जावू नये. तरीही खंडोजी व खोपडे अफजलखानाच्या बाजूनं गेले. परंतू त्यांनाही जेधेनं परत आणलं. शेवटी शिवरायांची माफी मागण्यासाठी प्रयत्न केला. परंतू ते शक्य झालं नसलं तरी शिवराय दरबारी पहिला मान जेध्यांचाच होता. एवढे शिवराय जेध्यांना मानत असत. ते केवळ कान्होजीमुळंच.

************************************************
१०} सुर्याजी काकडे
सुर्याजी काकडे शिवरायांचे बालपणीचे मित्र. रोहिडा व जावळी जिंकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशीच सुर्याजीची एक गाजलेली युद्धमोहिम शिवरायांना आठवत होती.
शिवरायांनी बागलाण मोहिम काढली व साल्हेर जिंकला. ही वार्ता दिल्लीच्या बादशाहाला मिळाली. तसा बादशाहा म्हणाला,
शिवरायांबाबतीत काय उपाय करावा. ते कळत नाही. लाख लाख घोडे पाठवले. परंतू तेही मरण पावले. काय करावं सुचेना. एवढ्यात इखलासखान व बहलोलखान म्हणाला,
"आम्ही जातो शिवरायांवर चालून आणि त्याला दाखवून देतो जहापनाह. दिल्ली भी क्या चीज है."
बादशाहानं होकार दिला. तसा इखलासखान सैन्य घेवून सााल्हेरला वेढा देण्यास निघाला. त्याने साल्हेरला वेढा दिला.
सुर्याजी काकडे.......छत्रपती शिवरायांचा लहानपणचा मित्र. शिवरायांनी साल्हेरच्या मोहिमेेवर सुर्याजी काकडेंनाच पाठवले. तसा सुर्याजी इखलासखानाला जबाब देण्यासाठी साल्हेरला निघाला.
ते रणमैदान. त्या रणमैदानावर दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. शेवटी सुर्यराव पडला. परंतू किल्ला जिंकता आला. तो दिवस होता २ जानेवारी १६७१.
शूर जीवलग बालपणीचा मित्र जेव्हा मारला गेला. तेव्हा शिवरायाच्या तोंडून सहज उद्गार निघाले.
'माझा सुर्याभाऊ पडला. जसा महाभारतातील कर्णासारखा'
सरदार सूर्यराव काकडे , पांगारे, ता.पुरंदर, जि. पुणे, सुर्यराव हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली, साल्हेर जिंकून घेण्यासाठीच्या आखणीप्रमाणे एकीकडून सरनौबत प्रतापराव गुर्जर, सरदार सुर्यराव काकडे तर दुसरीकडून मोरोपंत पेशवे यांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला आणि साल्हेर जिंकून घेतला. तो दिवस २ जानेवारी १६७१.
साल्हेरच्या युद्धात विजय मिळाला , पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेवूनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता , शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले , ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता. '
महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा आहे , तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेर किल्ल्याचा आहे.
प्रमाणित प्रदेश. हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृध्द झालेला प्रदेश आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली ते एकून पातशहा कष्टी झाला आणि म्हणाला,
‘काय इलाज करावा, लाख लाख घोड्याचे सुभे रवाना केले, ते बुडवले. नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे,’ तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जीवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’ असा विचार केला आणि इखलासखान व बहलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी साल्हेरला रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले. तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले, ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेहलोलखानास धरून चालविणे, आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे. असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे.’ अशी पत्रे पाठविली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून मोरोपंत पेशवे, उभयता सालेरीस आले आणि मोठे युध्द झाले.
बखरीत लिहिलं आहे की चार प्रहर दिवस युध्द जाहले. मोगल, पठाण, राजपूत, तोफांचे, हत्ती, उंट घालून युध्द जाहले. युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोश औरस चौरस, आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले. पूर वहिले, रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये दुःख जाहले, असा कर्दम जाहला."
मराठ्यांनी इखलासखान आणि बहलोलखानाचा पाडाव केला. युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. मुघलांच्या एक लाख २० हजार सैन्याच्या तुलनेत महाराजांचे फक्त अर्धे सैन्य होते. दोन्ही बाजूने १० हजारच्या आसपास माणसे मरण पावली. घोडे, उंट, हत्ती तसेच खजिना, जडजवाहीर, कापड. अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सरदार सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले.
"सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे. महाभारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला."
आपल्या बालसवंगड्याच्या जाण्याने राजे कष्टी झाले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला. पातशहा असे कष्टी झाले. देवानं मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिली असेही त्याला वाटले. आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यू येईल तर बरे, आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही असेही ते म्हणाले.
मोगलांच्या सैन्याशी महाराजांना विजय प्राप्त झाला होता. साल्हेरचा विजय महाराजांच्या राजवटीत सर्वात मोठा विजय होता. त्यापूर्वी एवढा मोठा विजय आणि एवढी मालमत्ता कुठेच मिळाली नव्हती. या विजयामुळे महाराजांची किर्ती सगळीकडे पसरली आणि त्यामुळे महाराजांचा दबदबा आणि दरारा पण वाढला. साल्हेरनंतर लागलीच त्याच्या समोरील मुल्हेर किल्ल्यावर हल्ला करून मराठयांनी तो पण जिंकला. यामुळे सर्व बागलाण प्रांतावर शिवरायानं आपला शह बसविला. सुरतेत तर अजूनच शह निर्माण झाला होता.
या युद्धाचे दुःख एवढेच की शिवरायांचा बालपणीचा सवंगडी, ज्याला शिवरायांनी कर्णाची उपमा दिली, तो सुर्याजी काकडे यास एका लहान तोफाच्या गोळ्याचा मारा लागून देह ठेवावा लागला होता. त्याच्या जाण्याने तानाजीनंतर रायगडावर आणखी शोककळा पसरली होती.

***********************************************

११} कोंडाजी फर्जद

आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यात तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली. त्याच पराक्रम शिलेदारांपैकी एक होते “कोंडाजी फर्जंद.”
अवघ्या ६० मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा स्वराज्याला समर्पित केला.
म्हणतात की घोडेस्वार धावत किल्ल्यावर आला होता. आलेला स्वार पायउतार होऊन राजांना मुजरा करुन म्हणाला,
"महाराज, साल्हेरच्या किल्ला आपण जिंकलो. परंतू सूर्यराव पडले.
शिवाजी महाराज आनंदी झाले. तेवढेच दुःखी पण झाले. साल्हेर किल्ला मिळाल्याचा आनंद होता तर पुन्हा एक मावळा गमावल्याचे दुःख होते. ही अवस्था गड आला पण सिंह गेला अशी होती. परंतू स्वराज्य आणायचं तर असे बलिदान होणारच असा विचार तरुण महाराजांनी तोफखान्याला वर्दी दिली, किल्ल्यावर साखर वाटली व आनंद केला. तसे ते पुन्हा पुढच्या मोहिमा ठरवायला बसले होते, सोबत अनाजी दत्तो, मोत्याजी खेळकर, कोंडाजी फर्जंद सगळेच होते. राजे बोलू लागले.
"अनेक दुर्ग व मुलुख परत स्वराज्याला मिळाले. परंतू एक दुःख अजूनही मनात तसेच आहे, अगदी आजही."
सर्वांनी राजांकडे आश्चर्य कारक नजरेनं पाहिले, तसे अण्णाजी दत्तो म्हणाले,
"राजे, कोणाबद्दल बोलताय?"
"पन्हाळ्याबद्दल...... आपण अजुनही पन्हाळा घेतलेला नाही."
साहजीकच अमात्यांनाही तसंच वाटलं होतं. राजे सुद्धा ‘हो’ म्हणाले होते, तसा शिवारायानं लगेच पुढचा प्रश्न टाकला,
"कोण घेईल पन्हाळा?"
"सर्वांनी एकसोबतच आवाज दिला,
"मी. मी घेणार पन्हाळा."
तसं शिवाजी नं कोंडाजीकडे मान वळवली व म्हणाले,
"कोंडाजी, जाशील तू पन्हाळा घ्यायला?"
कोंडाजीनं मुजरा करून ‘हो’ म्हटलं.
तसे शिवराय म्हणाले,
"कोंडाजी, तुला मरणाची भीती नाही ना वाटणार! शिवा काशीद गेला. बाजीप्रभू गेला. मुरारबाजी, तानाजी सारेच गेले. अन् आता सुर्यराव. तरीही तू हो म्हणतोस?
तसे कोंडाजी म्हणाले,
महाराज इथे मरणाची भीती आहेच कोणाला. अहो असंही मरण येणारच हाये. तवा असं मरण्यापक्षा युद्धावर शत्रूंशी लढतांना आलेलं मरण बरं. ते मरण सिंहासारखं असन. अन् असं मरण! असं मरण कुत्र्याईसारखं. मले असं कुत्र्याईसारखं मरण नगं. वीरमरण पाह्यजे सिंहासारखं." तसे शिवराय विचार करु लागले.
मागील अनेक दिवस दक्षिणेचा दरवाजा असणारा हा पन्हाळगड आदिलशहाच्या ताब्यात होता. मागे एकदा हल्ला करूनही जिंकता आला नव्हता व युद्ध सोडून पळावे लागले होते. तो पन्हाळा घ्यायला कोंडाजी निघाला. मोहिमेसाठी २००० सैनिक तरी त्याने मागणं अपेक्षीत होतं. पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे किती सैन्य मागावं त्याने?
कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं.
"राजे, मला फकस्त ३०० गडी द्या."
शिवराय अचंबित झाले. तसे ते म्हणाले,
"कोंडाजी फक्त ३००? पुरतील का?"
तसा कोंडाजी म्हणला,
"राजे, साठच पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३०० सांगितलं."
शिवरायानं तिनशे सैन्य कोंडाजीला दिले व कोंडाजीने मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती तिकडं जायला निघाला, राजांनी त्याला वापस बोलावले, तो लगेच वळला, विचारलं,
"जी महाराज! बोलावलंत आपण ?
"होय."
"कशाबद्दल?"
राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं, कोंडाजी खुश झाला. येसाजी म्हणाला,
"महाराज, मोहिमेच्या आधी इनाम?"
"होय. तो इनाम घेण्याच्याच लायक आहे."
महाराज शांत झाले व कोंडाजीला आज्ञा दिली. अवघे ३०० स्वार घेऊन स्वारी राजापूरला गेली व किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली.
तो किल्ला.......त्या किल्ल्यावर पहारा होता. तोही पहारा कडक होता. तसा कोडाजीनं वेष बदलवून किल्ल्यावर जावून त्या किल्ल्याची खडान् खडा माहिती मिळवली. त्या किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत? तशी नेमकी माहिती मिळाली,
गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे, जिथं तटबंदी विरळ आहे व पहारे सुद्धा कमी असतात.
आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले, ठरलं तर, इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५, ३ मार्च, १६७३.
कोंडाजी ३०० मावळे घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपला. अनाजी दत्तो यांना सांगितलं,
"पंत आपण हितच थांबा, मी ६० जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या."
पंत २४० स्वार घेऊन तिथंच थांबले, कोंडाजी पुढं निघाले. त्यांनी सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते. तो नियोजनाचा भाग होता. गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले. अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये, अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले. पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.
तसा इशारा झाला आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. घोषणा, आरडाओरडा… सगळ्यांनी एकदाच आवाज धरला. तसा किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. निळोजी सबनीस म्हणून किल्ल्यावर होता. त्याला वाटलं इतके कर्णे वाजत आहेत. म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे. तो ओरडत पळू लागला. सोबत अनेकांना सांगू लागला, “सैन्य खूप आहे.जीव वाचवा.पळा. गनीम संख्येने फार आहेत.”
हे ऐकून अजून ४०० -५०० लोक पळू लागले, येवढं वजा जाता देखील किल्ल्यावर १२०० माणसं बाकी होती. ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होती, मराठे सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. तो नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.
किल्लेदार पडला. ती बातमी. सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला. मग काय? सगळे सैन्य कच खाऊन पळू लागले. बघता बघता किल्ला घेतला गेला. पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती, तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला.
गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले, तोफांना बत्त्या दिल्या. त्याही मराठ्यांच्या किर्तीचे गाणे गात धडाडू लागल्या. एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला. तो किल्ल्यावर गेला. तो दिवस चैत्र शु प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा होता. ही बातमी शिवाजी महाराजांना समजली आणि मग काय विचारता, राजे भारावून बोलू लागले,
"तोफा द्या, साखर वाटा, सरनोबत आपल्या हुजूरातीची तयारी करा. आपल्याला आज पन्हाळ्यास निघायचे आहे."
शिवराय पन्हाळ्यास गेले व त्यांनी कोंडाजीचे भरभरुन कौतूक केले व त्यांचा यथोचित सत्कार केला. कारण कोंडाजीनं ज्या किल्ल्याला अजुनपर्यंत जिंकता आलं नव्हतं. तो किल्ला जिंकून दाखवला होता.

************************************************

१२} येसाजी कंक

येसाजी कंक........येसाजीचं नाव घेताच भल्या भल्याला थरकाप सुटत होता.
त्यांच्या बाबतीतील एक प्रसंग म्हणजे त्यांनी कापलेली हत्तीची मान. येसाजीनं तलवारीच्या एका झटक्यात हत्तीची मान उडवली होती. एवढी ताकद होती येसाजीच्या बाहूदंडात. येसाजीबाबत सांगायचं झाल्यास त्यांनी गोवळकोंड्याचा बादशाहा अबुलहसन कुतूबशाहा याच्या मदमस्त हत्तीला आपल्या पराक्रमानं लोळवले होते.
येसाजी शिवरायांचे जवळचे मित्र होते. अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले. त्यांचे नाव ऐकताच सर्व शत्रूंना छातीत धडकी भरत असे. त्यांनी शंभूराज्यांच्या काळातही पोर्तूगीजांना धूळ चारली होती.
येसाजीचा जन्म हा रायगडाच्या पायथ्याशी भोर इथे झाला. त्यांच्या वडीलाचे नाव दादोजी. तसं पाहता ते गनिमी काव्यात पारंगत होते. प्रतापगडाच्या लढाईत त्यांनी केलेली कामगीरी अतूलनीय अशीच होती. गोव्याच्या पोर्तूगीजासोबत झालेल्या रणसंग्रामात येसाजी मरण पावले होते.
येसाजीबाबत सांगायचं झाल्यास त्यांची शरीरयष्टी बलदंड स्वरुपाची होती. शंभर हत्तीचं बळ असलेला माणूस अशी त्यांना उपाधी होती.
१९७६ साली राज्यभिषेक साजरा झाल्यानंतर महाराज दक्षिण ताब्यात घेण्यासाठी जेव्हा दक्षिणेतील मोहिमेवर निघाले, तेव्हा त्यांनी अत्यंत विश्वासू माणसे आपल्यासोबत घेतली होती. त्यात येसाजीचा समावेश होता.
यामध्ये दादमहालात शिवाजीनं प्रवेश करताच त्याचं महाराज कुतूबशाहानं जोरदार स्वागत केलं. तसा तो विचारात पडला. महाराज शिवाजीचं एवढं मोठं सामर्थ्य आणि यांच्या सैन्यात हत्ती नाहीत. तसं शिवरायांना स्थानापन्न होताच बादशाहा कुतूूबशाहानं तो प्रश्न शिवरायांना विचारला. म्हटलं,
"राजे, तुम्ही एवढे बलशाली आणि तुमच्या सैन्यात हत्तीचा समावेश नाही. जहापनाह, याबाबत आश्चर्य वाटतं."
त्यावर शिवाजी महाराज म्हणाले,
"आमचा एक एक योद्धा एका हत्तीच्या बरोबरीचा आहे."
"म्हणजे?"
"तुम्हाला प्रचिती पाहायची आाहे का?"
बादशाहाला शिवरायांंच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. तसा तो म्हणाला,
"जहापनाह, मला समजलं नाही."
"माझा प्रत्येक शिपाही तुमच्या हत्तीशी लढाई करु शकतो. प्रचिती पाहायची आहे का?"
शिवरायांचं वाक्य ऐकताच बादशाहा भलताच बावचळला. तसा तो म्हणाला,
"माझ्या दरबारातील कोणत्याही हत्तीशी लढेल काय?"
"होय."
शिवरायांनी असं म्हणताच कुतूबशाहानं आव्हान स्विकारलं. त्यानं एक मदमस्त हत्ती मैदानात आणला.
तो मदमस्त हत्ती. त्या हत्तीशी लढायला येसाजीचीच निवड कुतूबशाहानं केली होती. कारण त्यानंच कुतूबशाहाच्या डोळ्यात डोळे टाकून पाहिले होते.
येसाजी जेव्हा हत्तीशी लढायला आला, तेव्हा हत्तीच्या चालीला चुकवत येसाजीनं त्याला चांगलंच खेळवलं. त्यामुळं सततच्या धावण्यानं हत्ती चांगलाच थकला. शेवटी तरीही हत्तीनं हार मानली नाही. त्यानं त्याला सोंडेत पकडलं. त्यातच ऐन शेवटच्या समयी हत्तीनं कुतूबशाहाला तोंडात बोटेे घालायला लावले. त्यानंं हत्तीवर प्रहार केला. तो असा केला की एका वारात हत्तीची पूर्णतः मान धडावेगळी झाली होती.
हत्तीवर येसाजीला विजय मिळाला होता.. तो त्याचा विजय नव्हता तर ती कुतूबशाहाला दिलेली चपराक होती. शिवरायांना अंतिम समयी तोही प्रसंग आठवत होता. तो शेवटचा प्रसंग शिवरायांच्या डोळ्यातून अभिमान पेरीत होता. ह्याच प्रसंगाने कुतूबशाहा प्रभावीत झाला व त्याने शिवरायांशी हातमिळवणी केली व शिवरायांना मुघलांचा अंत करता आला.
***********************************************
१३} हिरोजी फर्जंद

सन ११ जून १६६५ च्या तहानुसार छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबास भेटण्यासाठी आग्र्यास रवाना झाले. औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त औरंगजेबाच्या दरबारात ते हजर झाले. पण औरंगजेबाने दरबारात राजांचा अपमान केला, तसेच त्यांच्या निवासस्थानाभोवती फौलादखानाचे पहारे बसविले. स्वत:छत्रपती शिवराय, युवराज संभाजीराजे कैदेत अडकल्यामुळे स्वराज्यावर मोठे संकट उभे राहिले होते.
छत्रपती शिवरायांनी आपल्या चतुराईने संभाजीराजेंना मोघलांची मनसबदारी मिळवून दिली. त्यामुळे संभाजीराजे मुक्तपणे संचार करू शकत होते, तसेच हिरोजी व मदारी मेहतर यांस राजेंनी आपल्या सोबत ठेवून आपल्या सोबतच्या इतर मावळ्यांना बाहेर पाठविले. जीजामातेनं राजेंच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू केले. त्यांनी मावळ्यांना आग्र्याच्या बाहेर ठिकठिकाणी तैनात ठेवले. छत्रपती शिवरायांनी आजारी पडण्याची युक्ती करून आपली तब्येत चांगली व्हावी म्हणून आग्र्यातील मंदिर, मशिदी, गोरगरीब जनतेला मिठाईचे पेटारे पाठवावयास सुरूवात केली. सुरूवातीस फौलादखानाचे सैन्य पेटारे काळजीपणे तपासत होते. पण नंतर ते पेटारे तपासण्यास कुचराई करू लागले. अखेरीस संधी साधून दि १७ ऑगस्ट १६६६ ला राजें वेशांतर करून पेटा-यात बसून निघून गेले. (राजें आग्र्यातून कसे निसटले याबद्दल इतिहासकारांमध्ये वादविवाद आहेत).
राजेंच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद छत्रपतींचे कपडे घालून झोपला. हे सिद्ध करणारे विधान सभासद बखरीत आहे.
'हिरोजी फर्जंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला. चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात, तो राजे शेला पांघरून निजलेले. एक पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले? पोर म्हणतो की, 'शीर दुखते' ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तो प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन, आपली पांघरूणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारास पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मना करणे. आपण औषध घेऊन येतो. म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरिला.'
मुख्यतः हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर यांच्यामुळे राजे सुखरूप औरंगजेबाच्या तावडीतून निसटले. असे म्हणायला काहीही हरकत नाही.

************************************************
१४} मदारी मेहतर

ते आग्र्याचं ठिकाण. महाराज शिवाजी आग्र्याला नजरकैदेत पडले होते. त्याचं कारणही तसंच होतंं. ते कारण म्हणजे पुरंदरचा तह.
पुरंदरला मुरारबाजी जांबाज मावळा वीर, स्वाभीमानी मावळा मरण पावला होता. त्यातच कित्येक मावळ सैनिक मरण पावत चालले होते. शेवटी तह करण्याशिवाय उपाय नव्हता. त्यामुळं तह केला गेला.
पुरंदरच्या तहानुसार चार लक्ष होनाचा मुलूख व तेवीस किल्ले बादशाहाला दिले गेले व बादशाहाची भेटही घ्यायचे ठरले.
ठरल्याप्रमाणे बादशाहाच्या भेटीसाठी शिवराय आग्र्याला गेले. तिथे बादशाहाचा पन्नासावा वाढदिवस होता. त्यावेळी शिवराय महाराष्ट्राचे राजे असूनही त्यांना बादशाहानं दुस-या रांगेत उभे करुन प्रथम त्यांचा अपमान केला. त्यातच त्यांनी कुरकूर केली असता त्यांना कैदेतही टाकलं. तिही नजरकैद. तब्बल एक दोन दिवस नाही तर काही महिने.
या ठिकाणीही पन्हाळगडाची पुनरावृत्ती झाली. तिथे पन्हाळगडावरुन सुटतांना शिवा काशीद मरण पावला तर इथे मदारी मेहतर व हिरोजी.
आग्र्याहून सुटतांना शिवाजीनं एक युक्ती केली. ती म्हणजे आजारी असल्याची. आपला आजार बरा व्हावा म्हणून ते साधू, मौलवींना मीठाईचेे पेटारे पाठवू लागले. त्यातच ते मीठाईचे पेटारे तपासणी होवूू लागले. हेच मीठाईचे पेटारे काही दिवस तपासले जावू लागले. परंतू ते तपासणी करतांना काही दिवसानं शिपाईही निराश झाले. त्यातच एक दिवस शिवराय व संभाजी एका मिठाईच्या पेटा-यात जावून पसार झाले. ते ज्यावेळी पसार झाले. त्यावेळी त्यांचं रुपांतर करुन मदारी मेहतर व हिरोजी यांनी शिवाजीचं वेषांतर केलं. त्यातच त्यांना पुढे फौलादखान याने पकडले व हिरोजींना त्यांचं मस्तक उडविण्याची शिक्षा मिळाली.

************************************************
१५} बहिर्जी नाईक

शिवाजी महाराजांना गुप्तहेराची पारख होती. लहानपणच ते. त्या लहानपणात त्यांनी बहिर्जी नाईकाला ओळखलं होतं. त्यामुळंं त्यांनी बहिर्जी नाईकला आपल्या गुप्तहेराचं प्रमुख बनवलं होतं. ते गुप्तहेर खात्याचे गुप्तहेर व कमांडर होते.
बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख होते. त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भुपाळगड येथे आहे. त्यांचा जन्म शिंगावे नाईक ता. नगर जि. अहमदनगर इथे झाला.
बहिर्जीचं सुरुवातीचं जीवन हे मोहिमा आणि साहसांनी भरलेलं आहे. बहिर्जी त्यांच्या मोहिमांच्या प्रत्येक पैलूबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते. तसेच छत्रपती शिवाजीच्या अनेक आश्चर्यजनक पराक्रमामध्ये बहिर्जीचा सिंहाचा वाटा आहे.
बहिर्जी कुठल्याही प्रकारचं वेषांतर करण्यात पटाईत होते. ते कधी वासूदेव, फकीर, कोळी, भिकारी, संत बनत असत. फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या तोंडचे शब्द चोरण्यात पटाईत होते. ते त्यांचं चातुर्य होतं. ते विजापूरच्या आदिलशाहाच्या दरबारात तसेच दिल्लीच्या बादशाहाच्या दरबारात वेषांतर करुन जात असत. तसेच त्यांच्या दरबारातील खडान् खडा माहिती घेवून येत. त्यांच्याबाबत ते हेर असल्याचा जरी संशय आला तरी त्या बादशाहांनी एकदाही बहिर्जींना पकडले नाही वा पकडू शकले नाहीत.
छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर होते. ते सर्व गुुप्तहेर बहिर्जींनी विजापूर, दिल्ली, पुणे, कर्नाटक इथे पसरवले होते. चुकीची माहिती देणा-यास जबर शिक्षा दिल्या जात. गुप्तहेर पद्धतीची एक सांकेतिक भाषा त्यांनी तयार केली होती. ती भाषा केवळ नाईक व गुप्तहेरांनाच माहित होती. त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाई. ही भाषा शिवराय व संभाजींना कळत होती.त्यात पक्ष्यांचाही व प्राण्यांचाही आवाज होता. कुठलाही संदेश हा त्या भाषेतच दिला जाई. महाराज शिवाजी हे कोणत्या मोहिमेवर जाणार आहेत हे आधी बहिर्जींना माहित असायचे. कधी कधी शिवाजी महाराजांच्याही दरबारात बहिर्जी वेषांतर करुन आलेले असायचे. ते फक्त शिवरायांना माहित असायचे. इतरांना नाही.
ते केवळ गुप्तहेरच नाही तर लढवय्येही होते. तलवारबाजी व दांडपट्ट्यात ते माहिर होते. कारण गुप्तहेरांच्या जीवावर कोणता प्रसंग केव्हा बितेल हे त्यांना चांगलं माहित होतं. ते कोणत्याही घटनांचा बारकाईनं विचार करीत. तसेच शत्रूूंच्या गुप्तहेराची माहिती बहिर्जींना होती. शत्रूंना चुकीची माहिती पुरविण्याचेही काम ते आपल्या गुप्तहेरांकडून करवून घेत.
बादशाहाच्या पन्नासाव्या वाढदिवसाबद्दल जेव्हा शिवराय आग्र्याला गेले. तेव्हाही बहिर्जीनं दिल्लीची माहिती मिळवली होती. त्यासाठी दिल्लीच्या कानाकोप-यात त्यांनी जवळपास पाचशे गुप्तहेर पसरवले होते. हे कार्य त्यांनी महिनाभर केले होते.
शिवरायांच्या सर्व घटनेत बहिर्जीचा समावेश होता. अफजलखान वध, शायीस्तेखानाची बोटे कापणे, पन्हाळ्यावरुन सुटका, पुरंदरचा वेढा, सुरतेची लुट. अशा प्रत्येक घटनेत बहिर्जींनी उत्कृष्ट कार्य केले.
महाराजही आपल्या मोहिमेची पावले टाकतांना त्यांच्या सल्ल्याचा वापर करीत असत. सुरतेची लुट सुरु असतांना टिपलेल्या इंग्रजांच्या दस्तऐवजात बहिर्जीचा उल्लेख आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास शिवाजी महाराजांची हेरव्यवस्था मजबूत होती. त्याचे श्रेय बहिर्जींनाच जाते. बहिर्जीजवळ कुशाग्र बुद्धिमत्ता होती. तसेच समयसुचकताही त्यातच साहसही. त्याच भरवशावर बहिर्जींना शिवाजी महाराजांच्या काळात उत्कृष्ट कामगीरी करता आली.
बहिर्जी नाईक शिवरायांसोबत कसे जुळले याचाही इतिहास आहे. ज्यावेळी शिवराय पुण्यात आले. तेव्हा त्यांनी लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्यांना मारुन त्यांचे शेपूट आणून दाखवल्यास शिवराय इनाम देत. तेव्हा बहिर्जींनी सर्वात जास्त शेेपट्या आणल्या होत्या. तसेच होळी या सणाच्या वेळी बहिर्जी करीत असलेली वेगवेगळी सोंगे शिवरायांच्या मनात ठसले. त्यातूनच शिवरायांंनी बहिर्जीची गुप्तहेर म्हणून आपल्या स्वराज्याच्या कामात नेमणूक करुन मदत घेतली नव्हे तर यथायोग्य उपयोग करुन घेतला.
शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत अफजलखानासारख्या बलाढ्य माणसाचा वध करुन नावलौकीक मिळवला. त्यांना ठार करता आले, त्याचे कारण बहिर्जी. बहिर्जी महिनाभरापासून अफजलखानाच्या सैन्यात सहभागी झाले होते. त्यातच खानाचे सैन्य किती? दारुगोळा किती? घोडदळ, पायदळ, अश्वदळ किती? त्यांच्या जवळचे लोक किती? त्याची दिनचर्या कशी? त्यांच्या सवयी कशा? ही सर्व माहिती बहिर्जींनी शिवरायांना पुरवली. म्हणूनच कपटी खानावर विजय मिळवता आला. तसेच खान शिवरायांना जीवे मारु पाहात आहे हेही बहिर्जींनी शिवरायांना सांगीतले होते. त्यामुळं बहिर्जींनी दिलेल्या सुचनेनुसार महाराजांनी आपली व्युहरचना पुर्णपणे बदलली. त्यातच शिवराय घाबरले ही देखील अफवा खानानं पसरवली. तसेच खानानं चिलखत घातले नसल्याचीही माहिती बहिर्जींनी दिली. त्यातच सय्यद बंडा किती धोकादायक आहे हेही सांगीतले होते. त्याचाही फायदा शिवरायांना झाला. तसेच पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांनी सुखरुप सुटका करण्याचे श्रेय ज्याप्रमाणे बाजीप्रभू आणि शिवा काशीदला जाते. तसेच बहिर्जी यांच्याकडेही जाते. शायीस्तेखानाची बोटे कापतांना तेथील सर्व माहिती बहिर्जींनी पुरवली.
शायीस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखींडीत खानाच्या वीसहजार सैनिकांचा खानानं धुव्वा उडवला. तसेच त्याला शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्यांचे हेर खानाच्या सैन्याच्या आजुबाजूला राहात असत. खान बोरघाट मार्गानं कोकणात येईल असे वाटत होते. परंतू खानानं उंबरखींडीचा मार्ग निवडला हेही बहिर्जीनं शिवरायांना सांगीतलं होतं. त्यानुसार शिवरायांनी उंबरखींडीत सुरुंग पेरुन ठेवला होता. त्यातच खानाचे सैन्य खींडीत शिरताच दोन्ही बाजूंनी त्यांच्या सैन्याची शिवरायांनी नाकाबंदी करुन त्याच्या सैन्याचा पाडाव केला.
सुरत लुटतेवेळी बहिर्जीनं दिलेल्या माहितीनुसार सुरतला शिवरायांनी बदसुरत केले. ही परमुलखात काढलेली पहिलीच मोहिम होती. ही योजना तीन चार महिण्यापासून सुरु होती. यावेळी बहिर्जी अगदी भिका-याच्या अवस्थेत सा-या सुरतभर फिरले व तेथील खडान् खडा माहिती आणली. त्यामुळं सुरतच्या वेशीवरच सुरतचा सुभेदार इनायतखानास जे शिवरायांनी पत्र दिले. त्या पत्रात चक्क हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम या धनिकांचीही नावे टाकली. त्यातच एवढ्या दुरुन आलेल्या शिवरायांना आपली नावे कशी माहित झाली याचं आश्चर्य त्या लोकांना वाटलं.त्यांची तर भीतीनं भंबेरीच उडाली.
शिवरायांनी सुरत लुटली. परंतू त्यांनी सुरतमध्ये गरीब, लाचार, अपंग, दानशूर, मिशनरी यांना त्रास दिला नाही. ही मोहिम यशस्वी झाली. कारण यात बहिर्जीचे योगदान फार मोठे होते. तसेच आग्र्यावरुन सातशे मैलाचे अंतर पार करुन शिवाजी आले. तेव्हा ते केवळ बहिर्जीमुळंच सुखरुप पोहोचले. त्यातच शिवाजीला नवीन हवेलीत पाठवून त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न हा देखील बहिर्जीमुळंच सिद्धीस गेला व शिवाजी नवीन हवेलीला न जाता मथुरेस गेले. तसेच ते अलाहाबाद, बुंदेलखंड, खानदेश, गोंडवन, गोवळकोंडा असा वेडावाकडा प्रवास करीत शेवटी राजगडावर पोहोचले होते. यातून असं कळतं की ज्या ठिकाणी पराजय मिळणार होता. तेही क्षण विजयात रुपांतरीत झाले. हे केवळ आणि केवळ बहिर्जीमुळं शक्य झाले. बहिर्जी कोणतेही रुप घेवून शत्रूच्या खामियानात वावरत असे. शिवरायांनी १६७४ मध्ये जेव्हा आपला राज्यभिषेक रायगडावर साजरा केला. त्यावेळी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. त्यात त्यांनी हेरखात्याचाही प्रमुख बनवला व हेरखात्याचे महत्व लक्षात घेता त्याला स्वतंत्र्य स्थान दिलं. तसेच बहिर्जीला सरदार बनवलं होतं. हेरखात्यास पैसाही दिला. कारण हेरखात्याची माणसं जीवावर उदार होवून शत्रूच्या गोटात शिरुन माहिती आणत असत. अशावेळी त्यांच्या जीवालाही विशेषत्वाने धोका असे.
बहिर्जी भुपाळगडावर मरण पावले. तेथील एका लढाईतच हेरगीरी करतांना मृत्यू आला. ते त्यावेळी लढाईत जखमी झाले होते. तेव्हा ते भुपाळगडावर येवून तेथील महादेवाच्या चरणी त्यांनी प्राण सोडला होता. त्यांची समाधी बाणूरगडावर आहे.महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात. जेथून सोलापूर जिल्ह्याची सुरुवात होते.
बहिर्जीबद्दल सांगायचं झाल्यास एवढंच म्हणता येईल की बहिर्जी नसता तर कदाचित शिवरायांनाही स्वराज्य स्थापन करता आलं नसतं. त्यांना तर केव्हाच शत्रूंनी चित केले असते.
बहिर्जी, बाजीप्रभू, तानाजी, बाजी पासलकर, शिवा काशीद, मदारी मेहतर हिरोजी फर्जद अशी कितीतरी माणसं की ज्यांनी शिवरायाचे प्राण वाचावे म्हणून स्वतःचे प्राण दावणीस लावले. परंतू शिवरायांना किंचीतही इजा होवू दिली नाही. ते होते, म्हणूनच शिवाजीला राज्य स्थापन करता आले व आपल्या आईची इच्छा नव्हे तर जनतेची इच्छा पूर्ण करता आली असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही.

************************************************
१६} हिरोजी इंदुलकर

हिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकामाचे प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत असे केले होते. आत्ताच्या कोणत्याही बांधकाम इंजिनिअरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. जेव्हा सिधुदुर्ग बांधावयाचा होता. तेव्हा वडार समाजातीलच सुमारे ५०० पाथरवट लोकांनी सिधुदुर्गाचे बांधकाम केले. अगदी पुरातन काळापासून वडार समाज बांधकामध्ये, दगड फोडण्यामध्ये, दगडावरील नक्षीकामामध्ये कारागीर म्हणून प्रसिद्ध होता आणि सध्याही आहे. हिरोजी इंदूलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले.
शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते. तसेच त्याची जबाबदारीही सोपविली होती. गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग, प्रासाद, उद्याने, राजपथ,स्तंभ, गजशाला, नरेंद्रसदन, बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी राजे फारच खुश झाले आणि त्यांनी हिरोजीला सांगितले की या गडावर कोणत्याही एका ठिकाणी तू तुझे नाव लिहावे आणि तुमच्या स्मृती जतन कराव्यात. म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले की हिरोजी इटाळकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल.
या आपल्या शिलालेखात त्यांनी "सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर…. … " असे म्हणून आपण महाराजांचे निस्सीम भक्त आणि सेवक आहोत हेच दाखवून दिले.
कधीकधी शिवराय आपल्या मोहिमेत व्यस्त राहात. तेव्हाही बांधकामे सुरु असत. पैसा कमी पडायचा. तेव्हा प्रत्येक किल्ल्यावरील बांधकाम करतांना कधीकधी इंदूलकर आपल्या जवळील पैसा वापरत. असेच एका किल्ल्यावरील बांधकाम करतांना हिरोजीनं आपली शेती विकून टाकली होती. त्यातच ते बांधकाम पूर्ण केले होते. परंतू किल्यावरील बांधकाम अडू दिले नाही.
२५ नोव्हेंबर १६६४, मालवण जवळील कुरटे बेट. स्वतः महाराज या बेटावर आले होते. स्वतः शिवराय या बेटावर का आलेत असा प्रश्न सर्वांसमोर उभा होता. तसं पाहता शिवराय तेथील जागा पाहायला आले होते. या खडकावर शिवरायांनी गणेशमुर्ती व सुर्यचंद्र कोरुन त्यांची शिवरायांच्या हस्ते पुजा करण्यात आली. किल्ल्याची जागा शिवरायांना आवडली व त्यातच हिरोजी इंदूलकरांनी आखलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम करण्यात आले.
हिरोजींनी नकाशा बनवला. तशी तीस फूट उंच आणि बारा फूट रुंद अशी दोन मैल तटबंदी उभारण्यात आली. त्यातच त्याच्या पायाभरणीत शिशे ओतण्यात आले. ठिकठिकाणी बावीस बुरुज उभारण्यात आले. तिथं असलेल्या रखवालदारासाठी शौचकुपाचीही व्यवस्था करण्यात आली.नागमोडी वळणाच्या खिंडीतून दुर्गाचा मुख्य दरवाजा लपविण्यात आला. तसेच तीन गोड्या पाण्याच्या विहिरी उभारण्यात आल्या. या किल्ल्याला पूर्ण बांधकाम करतांना एक कोटी रुपये खर्च होणार होता. परंतू शिवराय औरंगजेबाच्या कैदेत खितपत पडले होते. काय करावं सुचत नव्हतं. तरीही इंदूरकराचे किल्ला बांधकाम सुरुच होते आणि तीन वर्षानंतरच्या प्रदिर्घ कालावधीनंतर म्हणजे १६६७ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी किल्ला बांधून पूर्ण झाला. सिंधूदुर्गामुळं आता स्वराज्याकडे डोळे टाकायची हिंमत कुणाचीही होत नव्हती.
शिवरायांनी किल्ला पाहिला. ते पाहून ते अतिशय खुश झाले. त्यातच इंदूलकरांना शिवराय म्हणाले,
"मागा, तुम्हाला काय हवं ते. आम्ही आपल्या बांधकामावर फारच खुश आहोत." त्यावर हिरोजी म्हणाले,
"दुर्गावर येणा-या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमच्यासाठी आपण दिलेले बक्षीस असेल."
शिवराय काय समजायचं ते समजले व त्यांनी सिंधुदुर्गावर आपली स्वतःची चरणकमलं कोरण्यास सांगीतले.
वरील संवादावरुन असं दिसून येते की इंदूरकर एवढे शिवरायांवर प्रेम करायचे की ते स्वतः कोणताच मोबदला घ्यायचे नाहीत. कधीकधी विना मोबदलाही काम करायचे.
रायगडाचेही बांधकाम झाल्यावर शिवराय खुश होवून म्हणाले,
"माग, तुला काय हवं ते माग."
त्यावरही इंदूरकर म्हणाले,
"महाराज, माझे नाव या खालच्या पायरीवर कोरण्याची परवानगी द्या. जेणेकरुन तुमचे पाय त्या पायरीवर पडताच मी धन्य होईल."
शिवरायांनी होकार दिला व त्यांनी आपले नाव गडावरील जगदीश्वर मंदीराजवळ कोरले. असे होते हिरोजी इंदूरकर. स्वराज्यासाठी कोणताही मोबदला न घेता केवळ आणि केवळ सेवा देणारे. याच लहान लहान शुल्लक वाटणा-या परंतू अर्थपुर्ण गोष्टीमुळं स्वराज्य उभं राहिलं असं म्हणायला काहीही हरकत नाही.

***********************************************
१७} रामजी पागेरा

स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवरायांना अनेक शूरवीरांनी साथ दिली. त्यातीलच एक महत्त्वाचे रणधुरंधर शूरवीर म्हणजे रामजी पांगेरा होय. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातील किल्ले कण्हेरगडाच्या पायथ्याशी मोगल सरदार दिलेरखान व त्याच्या ३० हजार सैन्याचा रामजी पांगेरा व त्यांच्या ७०० मावळ्यांनी साफ धुव्वा उडवला. मात्र यात रामजी पांगेरा व त्यांचे काही सहकारी मावळे कामी आले. इतक्या मोठ्या पराक्रमाची दखल इतिहासालाही घ्यावी लागली. मात्र रामजींचे कार्य व त्यांच्या पराक्रमापासून अनेक जण अनभिज्ञच राहिले. रामजी पांगेरा यांचा वैभवशाली इतिहास व दुर्लक्षित कण्हेरगडाची पराक्रमी गाथा.
तीन हजार ५८२ फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील अजंठा सातमाळा डोंगररांगेतील ट्रॅकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. अजंठा सातमाळा रांग म्हणजे नाशिक आणि गुजरातच्या सीमेवरील तटबंदी होय. याच आडवाटेवर असलेला कण्हेरगड इतिहासप्रसिद्ध असा हा किल्ला आजमितीस बराच दुर्लक्षित आहे. दिलेरखान सुमारे ३० हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हानपूरहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी काबजात घेतले होते. त्यातीलच कण्हेरगड हा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान कण्हेर घेण्यासाठी सुसाट सुटला. दिलेरखान हा अत्यंत कडवा सरदार होता. कण्हेरच्या परिसरातच सपाटीवर शिवाजी महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या ७०० मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. या तुकडीचा नेता होता रामजी पांगेरा. हा रामजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफजल खानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. त्याने पराक्रमाची शर्थ केली, तो हा रामजी पांगेरा कण्हेरपाशी होता. दिलेरखान गडावर चालून आला असता रामजीने त्याच्या ७०० मावळ्यांसह दिलेरखानवर हल्ला चढवला व सैन्याला पळवून लावले. मात्र यावेळी झालेल्या लढाईत रामजी पांगेरा कामी आला. असा उज्ज्वल इतिहास या किल्ल्याला लाभला आहे.
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे खडकात खोदलेला बुरुज आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढ दिसते. गडमाथ्यावर पाण्याची सहा ते सात हौद आहे. महादेवाची पिंड, तुळशी वृंदावन आहे. तसेच अनेक वाड्यांचे पडके अवशेष आढळतात. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल, अशी एक गुहा या ठिकाणी आहे. यात पाच ते सात लोकांच्या मुक्कामाची सोय होते, तर जेवणाची व पाण्याची सोय आपणच करावी लागते. किल्यावर बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. मात्र वाढलेले शेवाळ व गाळ यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही. जाण्यासाठी हिवाळा व उन्हाळा उत्तम पर्याय आहे.
गडावर जाण्याच्या वाटा नाशिक-कळवणमार्गे ओतूर गाव गाठावे. ओतूरमधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणाऱ्या कण्हेरवाडी गावात यावे. कण्हेरवाडी गावातून गडावर जाण्यासाठी खिंडीत जावे लागते. त्या खिंडीतून एक सोंड उतरते. त्या मार्गाने एक तासाच्या खड्या चढणीनंतर गडमाथ्यावर पोहचता येते. वाट मुरमाची व निसरडी आहे. त्यामुळे पायाबरोबरच हाताचाही वापर करावा लागतो. त्यामुळे जरा जपूनच जावे लागते.
स्वराज्य प्रतिष्ठानची मागणी हा सर्व इतिहास दुर्लक्षिला गेलेला आहे. कण्हेर गडाच्या परिसरातील कण्हेरवाडी सदाडविहीर आदी गावातील नागरिक इथल्या इतिहासाविषयी अनभिज्ञ आहेत. तसेच हिमशिखरे सामाजिक संस्थेतर्फे परिसरातील शाळा व गावात याविषयी जनजागृती केली जात आहे. याठिकाणी गडाच्या पायथ्याशी रामजी पांगेरा यांचे स्मारक व्हावे व किल्ल्यावरील वस्तूंचे जतन व्हावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात पर्यटन विकास निधीतून निधी उपलब्ध होऊन ऐतिहासिक कण्हेरगड किल्ल्याचे जतन व्हावे, असे वाटते. जाणारी वाट निसरडी असल्याने स्मारक किल्ल्याच्या पायथ्याशी व्हावे व त्यांचे कार्य जगासमोर येण्यासाठी प्रयत्न व्हावे.

************************************************
१८} फिरंगोजी नरसाळा

चाकणचा भुईकोट किल्ला आजही फिरंगोजीच्या इतिहासाची साक्ष देतो आहे. फिरंगोजीने लेकराप्रमाणे हा किल्ला मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच आणि साडेतीनशे वर्षांंपासून संवर्धनाच्या व जतनाच्या प्रतीक्षेत आहे.
पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर आहे. चाकणमध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास अवघ्या काही अंतरावर भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे.
शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी स्वराज्यात येताना चाकणसारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामीलच करून घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला.
शायीस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसे अगदी मातीचे छोटेसे ढेकूळ. तरीही शायीस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल ५६ दिवस लागले. फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकणच्या किल्ल्याचा एक टक्का उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खान नाराज झाला. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल, अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.
शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार असा हा चाकणचा दुर्ग आहे. बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्तेखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला. या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला. या दुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता. त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे. आधीच तो स्थलदुर्ग. पण खंदकाने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खंदकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते. २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शायीस्तेखानाने भुयार खणून सुरूंग ठासण्याची आज्ञा केली. ताबडतोब कामाला सुरूवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरूंग नाकाम करता आले असते. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा, मालुजी मोहिता, भिवा दूधावडा, बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० - ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला. मुघलांनी सुरूंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे भिवा दूधावडासह सव्वाशे मावळेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघली सैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहसपर्व कडू घोट घेत संपले.
त्यानंतर संग्राम दुर्गाच्या दुरवस्थेचे सुरू झालेले फेरे अद्यापही कायम आहेत २०१४ च्या फेब्रुवारीपासून या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. राज्य शासनाने या किल्ल्याच्या जतनाच्या व दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता देत राज्याच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करून दोन वर्षे लोटली होती तरी दुरुस्तीच्या व संवर्धनाच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात झाली नव्हती. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि चाकणकर नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष वेगाने सुरूवात झाल्याने किल्ल्याच्या दुरवस्थेचे फेरे आता संपुष्टात येणार असून चाकणच्या संग्रामातील या साक्षीदाराची संवर्धनाची प्रतीक्षा आता संपली आहे. मात्र संपूर्ण किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि तटबंदीसाठी आणखी निधीची गरज असून, हा निधी केंव्हा उपलब्ध होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

***********************************************
१९} लायजी पाटिल

मराठ्यांचं स्वराज्य स्थापन होणं हे पोर्तूगीज, इंग्रजांना पटण्यासारखं नव्हतं. कारण ते त्यांच्या डोळ्यात खुपत होतं. या बलाढ्य शत्रूसोबत आणखी एक शत्रू होता की ज्यानं पश्चिम किनारपट्टी आपल्या ताब्यात घेतली होती. तो शत्रू म्हणजे आफ्रुकेतून आलेला हबशी जमातीचा सिद्धी. या सिद्धीनं जंजि-यासारख्या बलाढ्य सागरी किल्ल्याला ताब्यात घेवून अरबी समुद्रात कायमची दहशत पसरवली होती.
या समुद्रावर जर आपण आपलं वर्चस्व निर्माण केलं तर इंग्रजापासून तर पोर्तूगीजापर्यंत सर्वच जण वठणीवर येतील हे शिवरायांना चांगलं ठाऊक होतं. कारण मुघलांच्या पाठींब्यावर सिद्धीचा उपद्रव देखील वाढलेला होता. यासाठी जंजि-याचा बंदोबस्त देखील करावा लागणार होता.
शिवरायांनी मुरुडच्या किल्ल्याजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमीनीवरील हालचालींना नियंत्रीत केले होते. तसेच मुरुंडजवळ कासा बेटावरही एक किल्ला बांधायचा निर्णय शिवरायांनी घेतला. जेणेकरुन त्याचे समुद्रावरील वर्चस्व कमी होईल. त्यातच सर्व पाथरवट, गवंडी, लोहार कासा बेटावर पाठविण्यात आले व युद्ध पातळीवर किल्ल्याचं बांधकाम सुरु झालं.
किल्ल्याचं बांधकाम सुरु होताच सिद्धी अस्वस्थ झाला. कारण याच किल्ल्यामुळं त्याच्या समुद्रातील हालचालींवर नियंत्रण येणार होतं. त्याने आरमार घेवून कासा बेटावर लढाईची तयारी सुरु केली होती. परंतू शिवरायांनी आधीच दयासारंग दौलतखानला सज्ज करुन ठेवले होते. कारण त्यांना तशी कल्पना होतीच.
किल्ल्यासाठी लागणारी रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपविण्यात आले. केळशी बंदराजवळ ही रसद दौलतखानाला मिळणार होती. परंतू दौलतखान वाटत पाहात राहिला. रसद आलीच नाही. सिद्धीनं सगळी गडबड केली होती.
जिवाजीनं केलेली गडबड. शिवरायांना त्याचा प्रचंड राग आला. त्यांनी त्यांचा राग म्हणून सुभेदाराला खरमरीत पत्र लिहिले. तसं पाहता महाराजांनी त्या सुभेदाराला बडतर्फ केले.
शिवरायांचं बांधकाम अपूर्ण राहिलं नाही. किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होताच सिद्धीचं स्वप्न मात्र अपुर्ण राहिलं. रात्रीचा दिवस करीत महाराजाच्या सेवकांनी किल्ला पूर्ण बांधला. त्यातच जंजि-याच्या तोडीमोडीचा दुसरा दुर्ग तयार झाला. त्याला पद्यदुर्ग नाव देण्यात आले व त्याचा किल्लेदार सुभानजी मोहितेंना बनविण्यात आले होते. पुढे १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी जंजि-यावर हल्ला करण्याची मोहिम आखली.त्यांनी त्यासाठी आसपासच्या सोनकोळ्यांची मदत घ्यायचे ठरवले. हा किल्लाही त्यांनीच बांधला होता. त्यामुळे या किल्ल्याबाबत त्यांना खडान् खडा माहिती होती. जंजिरा भक्कम आणि मजबूत असून त्याच्या आजुबाजूला समुद्र होता.याशिवाय पश्चिम तटावर पाचशे बहात्तर तोफा होत्या.
मोरोपंतांनी मचव्यावरील तोफावरुन या किल्ल्यात गोळाफेक करायचे ठरवले.परंतू तो प्रयत्न फसला. कारण ती तटबंदी बलाढ्य व मजबूत होती. त्यानंतर मोरोपंतांनी जंजि-याच्या तटाला शिड्या लावायच्या. परंतू प्रश्न पडला की त्या शिड्या लावणार कोण?
याच गोष्टीसाठी पुढे आले ते लायजी पाटील. त्यांनी मोरोपंतांना सांगीतलं की आम्ही शिड्या उभ्या करतो. तुम्ही मागवून लष्कर आणून शिड्यावर चढवा.
ठरल्याप्रमाणे मध्यरात्री लायजीच्या काही होड्या जंजी-याच्या तटापाशी उभ्या केल्या. त्यावर शिड्या उभ्या केल्या. त्यातून मावळे जंजी-याच्या तटबंदीवर चढले. त्यांचं शिड्या चढणं यशस्वी झालं होतं. कारण तो अंधार होता. त्या अंधा-या रात्री काहीच दिसलं नाही.
लायजी पाटील शिडी चढून तटावर बसले. दुुर समुद्राकडं त्याचं लक्ष होतं. ते मोरोपंताच्या येवू घातलेल्या कुमकेची आतूरतेनं वाट पाहू लागले. परंतू मोरोपंतांचे सैन्य आले नाही.
पहाट होत आली होती. सकाळी उजेडात मराठ्याचा डाव हबश्यांच्या लक्षात येणार होता. त्यातच समस्या. मग किल्लाा घेता येणार नव्हता. शेवटी त्यानं तटबंदीवरच्या शिड्या काढून घेतल्या व निराश मनानं ते पद्यदुर्गाकडे जावू लागले.
लायजी पाटलाची ही धाडसाची बातमी काही दिवसात शिवरायांना समजली. त्यातच त्यांनी त्याला रायगडावर बोलावून घेतले. त्यांना पालखीचा मान दिला. परंतू लायजी पाटलांनी तो पालखीचा मान नाकारला. कारण तो स्वतः द-याखो-यात राहात होता.
लाय पाटलांना एक गलबत बांधून दिलं व त्याला पालखी नाव दिलं व ती पाटलाच्या स्वाधीन केली. या व्यतिरीक्त राजांनी लाय पाटलास छत्री, वस्र, निशाण व द-या, किनारीची सरपाटीलकीही दिली. असे हे लायजी पाटील शिवरायांचे आधारस्तंभच ठरले.

**********************************************
२०} प्रयागजी प्रभू

मोगल साम्राज्य म्हणजे एक भोंगळ साम्राज्य होतं व त्याचा कर्ता धरता होता बादशाहा औरंगजेब. दख्खनचा प्रदेश जिंकण्यासाठी तो चालीवर चाली चालत होता. लाखो माणसे सैनिक म्हणून त्याच्याजवळ होते. काही सहखुशीनं आले होते तर काही बळजबरीनं. अमाप धान्य, दारुगोळा, हत्ती, घोडे, खजिना त्याचेजवळ होता. परंतू अक्कलशुन्य असेल कदाचित. कारण तो मराठ्यांचा नादच सोडायला तयार नव्हता.
तो सातारा व परळीचा भाग. त्या भागाचा अंमल एक कणखर छातीचा, व विलक्षण निष्ठा असलेला व्यक्ती पाहात होता. त्याचं नाव होतंं प्रयागजी प्रभू. त्याचं नाव होतं प्रयाग अनंत फणसे. परंतू लोकं त्यांना प्रयागजी प्रभू किंवा सुभेदार म्हणत असत.
प्रयागजी प्रभू हे शिवरायांचे बालपणीचे मित्रच. ते बालपणापासूनच स्वराज्याचे काम करीत होते. महाराजांनी शक्तीयुक्तीची लगबग उभ्या हयातभर पाहिली होती. वय वर्ष सत्तर होतं. परंतू मान बुलंद होती. डोक्यावर टक्कल पडलेलं होतं. नजर रागीट होती.
सातारा जिल्ह्याकडे बादशाहाची फौज फिरताच प्रयागजी ताबडतोब किल्यावर पोहोचले. चहूबाजूंनी किल्ल्याला मोर्चे बांधणी झाली. त्या मोर्च्यात खुद्द बादशाहा औरंगजेब सुद्धा होता. शबजादा अमजद गडाच्या पश्चीम भागात शहापूर येथे फौज घेवून होता. औरंगजेबाचा एक सरदार तबियतखान गडाच्या पुर्वेस तर दक्षिण भागास शिरजीखान होता.
हा वेढाच होता औरंगजेब बादशाहाचा. तो वेढा एवढा जबरदस्त होता की आतील माणूस बाहेर व बाहेरचा माणूस आत येवू शकत नसे. प्रयागजी गडावरुन ही परिस्थीती पाहात होते. त्यांनी भराभर तोफा गडावर चढवल्या. गडावर गस्त वाढवली. त्यावेळी गडावर फक्त पाचशेच सैनिक होते.
मोगलांचे हल्ले सुरु झाले. तोफा गर्जू लागल्या. वर डोंगर छाती काढून तोफांचे वार झेलत होता बिचारा. वेढ्याला दोन महिने झाले तरी प्रयागजी ढळले नव्हते. परंतू गडावरचा धान्यसाठा कमी कमी होत होता. परशुराम त्रिंबक हे सज्जनगडावर मुक्काम ठोकून होते. गडावरील परीस्थीती पाहून गड लवकरच खाली करतो असे म्हणून प्रयागजीनं आपला मुतालिक, शहजादा आजींकडे पाठवला व काही धान्य मागून घेतले.
शहजादा आजींकडे तीन महिने पुरेल एवढं धान्य मागीतलं. त्यातच गड आता खाली होईल, उद्या खाली होईल असा विचार करीत औरंगजेबाचे सैन्य चूप बसले. परंतू पुरेशा खाण्यापिण्याची व्यवस्था होताच प्रयागजीनं अजीमच्या छावणीवर अचानक हल्ला चढवला. त्यातच त्याचे प्रत्यूत्तर दिल्यानंतर अंजीमनं सुरुंग खोदण्यास सुुरुवात केली. ते सुरुंग पाहायला बादशाहा औरंगजेब स्वतः आला. वाती पेटवण्यात आल्या व तीन वातीपैकी एक वात झपाट्यानं पेटली. पहिला सुरंग स्फोट झाला. त्यातच तटावरचे काही मावळे उंच फेकले गेले. प्रयागजी मातीच्या ढिगा-यावर उडाले. त्यातच खालच्या सुरुंगाच्या दोन्ही वाती पेटल्या व ज्या खिंडारावर मोगल सैनिक हमल्यासाठी उभे होते. ते सैनिक पटापट मृत्यूच्या दारात पोहोचले.
भयंकर हाहाकार. डोंगरावरील दहा हजार मोगल केवळ त्यांच्याच करकृत्यानं मरण पावले. तशी मोगलसेना मागे फिरुन पळून जावू लागली.
प्रयागजी सुखरुप होते. ते पाहात सगळे मावळे एकत्र झाले. त्यांनी घाई करुन शिळा उचलल्या. त्या दबलेल्या शिळेतून प्रयागजीला बाहेर काढलं. त्यांनी परिस्थीती लक्षात घेवून मोगलांवर मराठ्यांना तोफेचा मारा करण्यास सांगीतले. शेवटी मोगलसेना अशी पळत सुटली की मागे ती परत आली नाही. औरंगजेब बादशाहा आपल्या मुक्कामावर परतला. अंजीम शर्मून गेला. आपली करामत आपल्याच अंगलट आली असंही त्याला वाटलं. शेवटी कसंही करुन हा गड मिळवावा लागेल. नाहीतर आपली अब्रू जाईल असंही त्याला वाटलं. शेवटी त्यानं प्रयागजींना पैशाची लालच दाखवली.
तो तोफेचा मारा. त्यातच गडावरचं धान्य संपलं होतं. गडावर काहीच शिल्लक नव्हतं. गडाच्या काही भींतीही तोफेचा मारा सहन करु शकलेल्या नव्हत्या. मावळेही कमी झालेले होते. शेवटी प्रयागजीनं हा किल्ला विकायचे ठरवले. त्यातच त्यांनी अंजीम येताच अंजीमशी वाटाघाटी केल्या. बोलणी केली व मनात इच्छा नसतांना प्रयागजीनं अजिंक्यतारा किल्ला औरंगजेबाला विकून टाकला होता. शेवटी अंजीमनं गड मिळवला. म्हणून त्या किल्ल्याचं नाव अजीमतारा ठेवण्यात आलं. कारण औरंगजेब बादशाहाला किल्ला मिळविण्याचा फार आनंद झाला होता.
(संदर्भ- मुज-याचे मानकरी)
************************************************
२१} दौलतखान दर्यासारंग

मालोजीराव शिवाजीचे आजोबा. त्याचे सुफी संत शाह शरीफ याचेवर प्रेम होते. त्याला मान देण्यासाठीच शहाजीनं आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी ठेवले होते.
शिवाजी शहाजीचा मुलगा. त्यानं अनेक हिंदू लोकांना सरदार बनवले होते.
तसेच काही मुसलमान लोकांनाही सरदार बनवले होते. राजा जयसिंंग हा औरंगजेबाचा मांडलिक झाला होता. त्यानं अनेक किल्ले शिवाजी महाराजांशी केलेल्या तहात जप्त केले होते.
राजा जयसिंग औरंगजेबाच्या दरबारातील एक उच्च सरदार होता. शिवरायांनी मानवता धर्म जोपासता येत होते. त्याच्या सैन्यात वेगवेगळ्या धर्माचे लोकं होते.
दौलतखान दर्यासारंगवर भारतीय सैन्यात महाराजांच्या नौसेनेची धुरा होती. दर्यासारंग याने शिवकाळात भारतीय आरमार व्यवस्था चोख ठेवली होती. स्वराज्याला हातभार लावला होता. त्यातच शिवरायांच्या आरमार सैन्यात मुस्लीम लोकांचाच भरणा जास्त होता. ज्यांना सामुद्रीक गोष्टीची जास्त माहिती होती. शिवाजी महाराज हे आपले सैन्य प्रगतिशील बननिण्यासाठी तत्पर होतेे. त्यांनी शस्रागार प्रमुख म्हणून इब्राहीम खानाला बनवलं होतं.
दर्यासारंग कुमक घेवून इंग्रजाबरोबर आरमाराच्या लढाईसाठी सन १६७९ ला तत्पर झाला. कारण तिथे मायनाक भंडारी यांचेशी इंग्रजांचे युद्ध सुरु होते. हंटर, रिवेंज आणि तीन लढावू जहाजे खांदेरीला वेढा घालून उभे होते. दौलतखानानं तिथे जाताच इंग्रज अधिकारी केग्विनचा पाडाव केला. माईनाय भंडारी ला रसद पोहोचती केली आणि पुन्हा रसद घेण्यासाठी परत आला.
ज्याचे आरमार सशक्त त्याचे राज्य सशक्त म्हणत शिवरायांनी आरमाराची उभारणी करण्याचे धोरण अवलंबले. सन १६५७ मध्ये ते कोकणात उतरले. त्यांनी आरमार जवळून पाहिले. त्यावेळी आरामारात जंजि-याचा सिद्धी, पोर्तूगीज, इंग्रज हे परकीय शत्रू आघाडीवर होते. यापैकी तिघांचा पश्चिम किना-यावर मोठा धाक होता. या तिघांंना कर दिल्याशिवाय कोणाच्याही नौका समुद्रात पाऊल ठेवू शकत नव्हत्या. मराठ्यांच्या व्यापाराला अडथळा होता हा फार मोठा. त्यामुळं की काय, त्यांंनी समुद्रात तीन गुराब बांधले.
मराठ्यांनी बांधलेल्या या छोट्याशा बोटी इंग्रजांनी पाहिल्या. गुराब म्हणजे तोफा ठेवण्याचे एक लहानशे जहाज. तारवे आणि गलबतं ही जलद चालणारी जहाजं होती. शिबाड ही व्यापारी प्रकारची जहाजं होती. त्यांनी अत्यंत शिताफीनं जहाजं समुद्रात आणली. ती जहाजं आता पश्चिम समुद्रात विहार करु लागली. पुढे या जहाजाची संख्या चारशेवर गेली. त्यातच त्यांनी समुद्रावर दरारा निर्माण करण्यासाठी जे अधिकारी नेमले. त्यात मायनाक भंडारी, दर्यासारंग, इब्राहीम खान. त्यांच्याच भरवशावर शिवरायांनी आरमार वाढवले. तसेच समुद्री भागात दरारा निर्माण निर्माण केला. पुढे खोल समुद्रात नौकाही बांधल्या गेल्या. इराण, बसरा, मक्का या भागात व्यापारास सुरुवात झाली.
शिवरायांनी आरमार सशक्त बनविण्यासाठी पद्यदुर्ग, सिंधूदुर्ग व विजयदुर्ग बांधले. पद्यदुर्गच्या बाजूला राजापुरी बांधला. असे हे किल्ले बांधून त्यांनी भारतीय आरमाराचा विदेशातही डंका मारला. हे सर्व शक्य झालं दौलतखान दर्यासारंगमुळं. दर्यासारंगला विलक्षण बुद्धिमत्ता असल्यामुळं जगात भारतीय आरमारात वचक निर्माण झाला होता. हे तेवढंच खरं आहे.

************************************************

२२} सिदोजी निंबाळकर

शिवरायांनी पन्हाळा घेतल्यामुळे विजापूरचा सुलतान भयंकर चिडला व त्यानं मराठ्यांवर बहललोलखानाला पाठवलं. परंतू ही बातमी वा-यासरशी बहिर्जी नाईकांनी शिवरायांना पाठवली व शिवरायांनी ताबडतोब त्यावर अंमल करीत प्रतापराव गुजरला पाठवले. त्यामुळे खानाचे सैन्य थोडे विचलीत झाले. परंतू तेही न डगमगता ते युद्धास तयार झाले व युद्ध सुरु होवून कापाकापी सुरु झाली. यातच सिद्धी हलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, आनंदराव असे वीर कामी आले. त्यातच पुढच्या फळीत त्वेषाने लढणारे सिदोजी निंबाळकर मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडले होते.
मराठे त्वेषाने लढत आहेत हे पाहून बहलोललखानानं हत्तींना समोर केलं व ते मदमस्त हत्ती मराठ्यांना पायदळी तुडवीत आकांत माजवीत असतांना सिदोजीनं माहूताकरवी पिसाळलेल्या जनावरास जेरीस आणले.
सायंकाळ झाली होती. तोच तो माजलेला हत्ती जेरीस आला होता. अशा माजलेल्या हत्तीस सिदोजीनं शिवरायांपुढे उभे केले. या सिदोजीच्या कामामुळे शिवराय खुश झाले व त्यांंनी त्या सिदोजीला सैन्यात बढती दिली.
शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालण्याची स्वारी. यामध्ये संगमेश्वर येथे मोगली सैन्य घेवून खान जेव्हा चालून आला. तेव्हा त्याची गाठ संताजी घोरपडे व सिदोजी निंबाळकरांशी पडली. यावेळी रणमस्तखानाला सिदोजीनं पाच हजार सैन्यानिशी झुंजवले. सतत तीन दिवस हा लढा सुरु होता. अखेर याच रणभुमीत सिदोजी मरण पावले होते.
जालना शहर अति श्रीमंत होते. या शहरातून अनंत हत्ती, घोडे महाराजांना मिळाले. अगणित मालमत्ताही सापडली. ह्यावेळी सिदोजी जर नसते तर ही मालमत्ता शिवरायांना मिळाली नसती. सिदोजी मरण पावले ती तारीख होती २२ नोव्हेंबर १६७९. असे एकेक वीर पुरुष शिवरायांना स्वराज्य स्थापन करीत असतांना कामी आला होता. म्हणून स्वराज्य बनले होते.

************************************************
२३} झुंजारराव मरळ

तोरणा गड. हा एक प्रचंड किल्ला होता. सर्वप्रथम शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला. त्याचं पुढं बांधकाम केलं. हे बांधकाम करीत असतांना त्यांना या किल्ल्यावर प्रचंड धनसंपदा सापडली. ती धनसंपदा त्यांना अनेक किल्ल्याची बांधकामं करण्यात कामी आली. हा किल्ला शिवरायांनी १६४६ च्या दरम्यान घेतला होता. परंतू पुरंदरच्या तहात म्हणजे १६६५ मध्ये हा किल्लाही औरंगजेबाला दिला. तो किल्ला पुन्हा १६७१ मध्ये परत घेतला. हाच झुंजारराव मरळ शिवरायांपुर्वी तोरणा किल्ल्याचा किल्लेदार होता. पुढे तोरणा जिंकल्यावर तो स्वराज्यात सहभागी झाला होता. अनेक लढायात त्यानं शिवरायांना मदत केली होती. तसंच स्वराज्य उभं करतांना त्याचीही स्वराज्याला मदतच झाली होती.

**********************************************