mazya dharmawishayichya kalpana books and stories free download online pdf in Marathi

माझ्या धर्माविशायीच्या कल्पना

आम्ही शाळेत असताना आम्हाला दररोज प्रतिज्ञा घेतली जायची की सर्व धर्म समान आहेत .आपला भारत विविधतेने नटलेला आहे.तरीही भारतात विविधतेमध्ये एकता आहे .पहिलीपासून ते दहावीपर्यंत तेच ऐकले होते .नंतर कॉलेज मध्ये गेल्यावर त्याचा प्रत्यय आला .मित्रमैत्रिणी वाढत गेले .आणि वेगवेगळ्या जातीमधील आणि धर्मामधील अनेक जणांचा गोतावळा वाढला .

इतकंच नव्हे तर मी शालेय विश्वातून जशी बाहेर आले तसे मला अनेक जाती पंथातले लोक भेटले.तेही सर्वसामान्य माणसांसारखेच होते .मला काही त्यात विशेष वावगे वाटले नाही . फ़क़्त थोडा वेगळेपणा होता तो त्यांच्या भाषेमध्ये आणि पोशाख आणि खाद्यपदार्थांमध्ये .आणि तसंही आम्ही सर्व सगळे मिळून खात असल्याने एवढे काही वावगे वाटण्यासारखे नव्हते मुळी.हे झालं आमच्या म्हणजे कुमारवयीन मुलांच्या भावविश्वातील समाजाचे रूप.

हेच जर अलीकडच्या म्हणजे आपल्या आईबाबांच्या पिढीला समजवायला गेले तर त्यांचे अजून ‘ पिढीजात ’ विचार आहे तसेच आहेत .ते आपल्या ‘जाती’ ला सोडून कुठेही जाणार नाहीत .भलेही ती जात कशीही असो , कितीही वाईट परंपरा असो पण ते त्यांच्या डोक्यातून जाणार नाहीत .अगदी कालचाच दाखला द्यायचा झाल्यास काल माझ्या पदव्युत्तर शिक्षणानंतरचे बेत सांगून झाल्यावर माझ्या लग्नाचा विषय निघाला .तर मी माझे मत स्पष्ट केले . मला प्रेमविवाह करायचा आहे आणि मी तसाच विवाह करणार.तर माझ्या घरामध्ये जणू तिसऱ्या महायुद्धासारखे वातावरण तापले .सर्वांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागल्या .सर्वांची तोंडे लांबट आणि आंबट झाली .आणि मग फैराफैरी झाली ती जात आणि कुलाविषयीच्या चर्चेची.

मग आमचे कुल कोणते ,कुलदैवत कोणते इथपासून ते मुलाची जात आणि कुलदैवाताशी मोठीच्यामोठी रांगच लागली .चर्चेचा सारांश असा निघाला की मला घरच्या परवानगीशिवाय लग्न करतं येणार नाही .म्हंटलं , हे काय माझ्या मानासारखे घडणारे नाही .तर माझी याला परवानगी नसेल .

कॉलेज मध्ये असतानाच खरंतर मी ठरवलेले की मला करायचा आहे तर प्रेम विवाह करायचा आहे .मग माझ्या मनासाखा जोडीदार मिळेपर्यंत वाट बघायला लागली तरीही चालेल .मला जे करायचे आहे ते त्याच्यासोबत करायचे आहे .मला शिकवणी घेऊन आणि कराटे शकून , शिकावायचेसुद्द्धा आहे .आणि माझ्या आजूबाजूच्या स्त्रीवर्गाला सजग करायचे आह.(प्रेम करताना आपण कधी जातीला किंवा धर्माला महत्व नाही देत .प्रेमामध्ये फ़क़्त एकमेकांना समजून घेण्याची कला आणि दोघांमधील विश्वास हे महत्त्वाचे असते .बाकी सर्व गौण ठरते .मी माझे कार्यक्षेत्र निवडताना मला माझा जोडीदार मिळाला .म्हणजे झाले असे की मी कराटे शिकत असताना माझ्यामध्ये जो लाजरेपणा आणि बुजरी वृत्ती होती ती कुठच्या कुठे नाहीशी होऊन माझा मार्ग शोधण्याची प्रेरणा निर्माण झाली.आणि मी ठरवले की माझ्या जीवनाचा जोडीदार हाच असणार .पण झाले असे की त्याचा धर्म होता मुस्लिम आणि मी हिंदू .जर मी हे घरात सांगितले असते तर घरात महाभारत झाले असते अशी मी माझ्या मनाची तयारी करून घेतलेली होती कारण ,माझ्या घरातले वातावरण हे थोडे जुन्या वळणाचे आणि परंपरांचे होते . आणि यानुसार जर मला घराबाहेर न पडता मला घरात डांबून ठेवण्यात आले असते किंवा मग मला फोन वापरण्यास बंदी केली गेली असती आणि त्यानंतर माझा मूळ उद्देश की लोकांमध्ये धर्मनिरपेक्षतेची भावना जागृत करणे सफल झाले नसते ..घरी मी माझ्यापरीने कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही ते त्यांच्या समजण्याच्या अलीकडे होते .कारण माझ्या घरातल्यांच्या डोक्यात जुन्या रीतीरिवाजांची पाळेमुळे इतक्या खोलवर रुतली गेलेली आहेत की ती कितीही उपटून काढण्याचा प्रयत्न केला गेला तरीही ती समूळ नष्ट करणे कठीण आहे .दुसरी गोष्ट अशी की आपण त्यांना जितके समजावणार तितके ते आपल्याला उलटपक्षी अजून प्रश्नांनी बेजार करणार .आणि मग प्रश्न सुटण्यापेक्षा अजून मोठे मोठे न सुटणारे प्रश्न निर्माण होणार .)

मी माझ्या धर्माविषयीच्या कल्पना माझ्या जोडीदारासोबत शेयर केलेल्या .तेव्हा माझ्या जोडीदाराचे म्हणणे सुद्धा हेच होते की धर्मापेक्षा माणूस मोठा असतो.धर्म हा माणसाने बनवला आहे .त्यामुळे धर्माच्या किती आहारी जायचं किंवा धर्माच्या कोणत्या आणि किती गोष्टिंचे पालन करायचे ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे .जर कोणत्या रूढी परंपरांमुळे काही वाईट गोष्टींची बिजं रोवली जात असतील आणि त्यामुळे माणसाला त्रास सहन करावा लागत असेल तर त्या रितीसाठी परंपरा जपण्याचा काही अर्थ उरत नाही .अश्या गोष्टींचा त्याग करणे बरे .किंवा त्या गोष्टींचा स्वीकार न करणे केव्हाही चांगले .उदाहरणदाखल जर कोणाला कावीळ झाली असेल आणि ती उतरवण्यासाठी आपण कोणत्या भोन्दुबाबांकडे वगैरे गेलो तर याला मानवाची मूर्खता म्हणने योग्य ठरेल .त्याऐवजी जर त्या व्यक्तीवर योग्य दावाकखान्यात आणि योग्य वेळेत उपचार झाले तर त्या व्यक्तीचे आयुष्य सुधारण्याची किंवा आयुष्य अजून जगण्याची चिन्हे आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो किंवा त्याच्या जीवनामध्ये आनंद आणू शकतो.

म्हणून तर धर्माला शास्त्राची जोड आली तरच आजच्या पिढीला आपण धर्माची खरी व्यक्ख्या समजून देऊ शकतो .नाहीतर पुढची पिढी ही मोकळ्या विचारांची असल्याने धर्मापालनाबद्दल तिच्या मनात आस्था आणि आत्मीयता राहणार नाही .मी आणि माझा जीवनसाथी जेव्हा भेटलो तेव्हा मी त्याची जात बघून प्रेम केले नव्हते किंवा त्याचा धर्म बघून प्रेम केले नव्हते तर मी त्याच्यातील माणुसकी आणि त्याच्यातील आनंदी वृत्ती बघुन प्रेम केले होते .समोरच्याशी त्याचे वागणे कसे आहे, समोरच्या व्यक्तीचा कसा आणि कधी आदर करायचा हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे तसे ते आपल्या स्वतःच्या वागणुकीवर पण अवलंबून आहे ,म्हणूनच जेव्हा आपण कोणत्या धर्माविषयी बोलतो तेव्हा आपल्याला त्या धर्माविषयी पूर्ण माहिती असंणे गरजेचे आहे .त्या धर्माचा पाया,इतिहास ,प्रसिद्ध व्यक्ती आणि धर्मशिकवण ही सर्व धर्मामध्ये सारखी आहे फ़क़्त फरक एवढाच आहे की धर्म काही बाबतीत एकमेकांपासून वेगळे आहेत .आणि त्या वेगळ्या गोष्टिंचे महत्त्व जर आपण समजून घेतले तर आपण धर्मनिरपेक्षता साधू शकतो आणि ह्या जगाला अपुलकीची शिकवण देऊ शकतो.

जसे हिंदू धर्मामध्ये उपवास सांगितले आहेत तसे मुस्लिम धर्मामाध्येही सांगितले आहेत आणि जैन धर्मातसुद्धा .पण उपवासाचे शास्त्रीय कारण कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केला आहे; एका ,किंवा कोणालातरी वाटले का आपण उपवास ठेवून कोणता देव प्रसन्न होऊन आपल्यावर सुखांची बरसात करेल. हे सर्व ध्यानात घेण्यापेक्षा आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा त्यादिवशीचे अन्न हे जगातल्या इतर भागातील कोणीतरी खाल्ले असेल आणि तो तृप्त झाला असेल .दुसरी शास्त्रीय बाब म्हणजे जर आपल्या शरीरात काही बिघाड झाला असेलं तर दिवसभर काही न खाल्याने आपले शरीर अश्या काही क्रिया घडवून आणते त्यामुळे शरीरातील साठवलेल्या उर्जेचे रुपांतर इतर कामांसाठी होते .त्या काळात आपल्या शरीरातील विषारी द्र्व्ये बाहेर टाकली जातात आणि आपल्या लहान आणि मोठ्या आतड्यांना आराम मिळतो.कारण काही न खाल्ल्यामुळे पोट शांत असते आणि त्यामुळे पचनासाठी लागणारी उर्जा दुसऱ्या कामात खर्ची होते .तर ही सर्व शास्त्रीय महिती जाणून घेऊन उपवास करणारे माझ्यालेखी थोर आहेत . नावाखाली , जुन्या समजुतींपायी उगाच च्या उगाच फ़क़्त दाखवण्यापुरती उपवास करणारे लोक म्हणजे निव्वळ पण उगाच नावासाठी आणि धर्माच्या नावाने दिखावा करणरे आहेत असे मी मानते.जे काही कार्य करायचे आहे त्याच्या मागची भावना आणि महिती जाणून घ्या .असं नाही की जे चालत आले आहे तेच पाळत राहायचे आणि पुढच्या पिढीवर जबरदस्ती लादायचे.

धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पनांमुळे कित्येकदा आपला आवडता जोडीदार निवडण्याची मुभा आपल्याजवळ नसते .कित्येकदा उच्च-निचतेमुळे अनेक भावी संसार घडतच नाही .कित्येकदा चुकीच्या समजुतींमुळे आणि धार्मिक वैमनस्यांमुळे एका धर्माबद्दल अढी बसून राहते ती कायमची आणि मग तेच आपण पुढच्या पिढीवर लादतो.या उलट सर्वांनी धर्मनिरपेक्षता सांभाळून माणुसकीचा धर्म समजून घेऊन सर्वांप्रती आदराची भावना निर्माण झाली पाहिजे आणि लाखो सुखाचे संसार उत्पन्न झाले पाहिजे जेणेकरून कोणीही धर्माच्या नावाखाली कोणतेही चुकीचे कृत्य करणार नाही .

हे बोलत असताना माझा आणि सुहासचा वेळ कसा गेलं ते कळलंच नाही .

©काजोल मधुकर नम्रता शिराळकर