Rang he nave nave - 11 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | रंग हे नवे नवे - भाग-11

रंग हे नवे नवे - भाग-11

'मैथिली उद्या एका पेंटिंग च्या एक्सिबिशन मध्ये जायचं आहे'. आता मैथिली चे पाऊले थांबली. 'काय म्हणालास एक्सिबिशन!!' तिचा चेहरा एकदम आनंदून गेला.आणि तिचा राग कुठच्या कुठे पळाला 'कस जमत रे विहान!''तुला माझ्या कडून हो कस म्हणून घ्यायचं'! 'मी आहेच असा तू कितीही ठरवलं तरीही, मला नाही म्हणू शकणार नाही मैथिली'. तो बोलून गेला. 'काय म्हणाला' 'काही नाही','चल निघायचं ना?' विहान म्हणाला.
मैथिली आणि विहान दुसऱ्या दिवशी एक्सिबिशन मध्ये गेले दोघेही रंगांच्या विश्वात रंगून गेले. असेच पुढचे काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या ह्या दिवसांमध्ये त्यांनी एकमेकांना अधिक चांगल ओळखलं पण मैथिली च्या डोक्यात अजूनही त्या मुलीचाच विचार होता.एका संध्याकाळीअसेच दोघेही जण एकांतात भेटले, 'मैथिली मी परवा जाणार!'विहान म्हणाला. 'हो माहिती आहे' मैथिली म्हणाली. 'तुला काही बोलायच नाही मग ?' तो म्हणाला. 'नाही आता मला नाही वाटत काही बोलायच राहील,' 'आणि कदाचित आजची आपली शेवटचीच भेट,' मैथिली म्हणाली. का तू परवा येणार नाही मला सोडायला? तो म्हणाला. मी का येऊ ? काय संबंध आपला? तू 10 दिवस मागितले मी दिले आणि असाही माझा परवा पेपर आहे. 12:30 पर्यंत. 'पण माझी flight 1:15 ची आहे', तो म्हणाला. 'हो पण नाही जमणार माझं'. आणि विहान ला कळतच नव्हतं की मैथिली अशी का वागतीये.'आणि तसही तुझी ती येणार असेल ना काय नाव आहे तीच ?' तुला आवडलेली. मैथिली रागातच म्हणाली. 'अच्छा अच्छा तर त्याचा राग आहे हा.. ओह माय गॉड मैथिली'!!!'तुझ्या अजून पण लक्षात आहे ते'आणि तो हसायला लागला.' म्हणजे ??'मैथिली ला त्याचा हसण्याचा अर्थ च कळत नव्हता. 'अग मैथिली तुला कोण आहे ती मुलगी तिचा फोटो नाही पाहायचा?' तो म्हणाला. 'दाखवणार तू?' ती म्हणाली. 'का नाही 'आणि त्याने त्याचा मोबाइल काढला. आणि मैथिलीचाच फोटो दाखवला. मैथिली ने फोटो पाहण्यासाठी जवळजवळ त्याच्या हातून फोन हिसकावूनच घेतला. 'बघू 'ती म्हणाली. 'विहान ही काय मस्करी आहे', आता हा माझा फोटो आहे 'तुला नसेल दाखवायचं तर तस सांग'. ती थोडं चिडूनच म्हणाली.'आणि एक मिनिटं हा फोटो कधी काढला तू' आणि तिने त्याचा फोन चेक केला त्यात तिला तिचेच बरेच फोटो दिसले. 'अरे काय प्रकार आहे हा विहान ?'ती चिडूनच बोलली. 'आधी तो डोक्यावरचा राग खाली काढ', म्हणजे मी काय बोलेल ते कळेल तुला. अग मैथिली तुला अजूनही कळत नाही का ?इतकी कशी मंद आहेस तू? 'मला आवडणारी ती मुलगी दुसरं कोणी नसून तू आहेस वेडे!' विहान म्हणाला. काय!!! विहान काय बोलतोय तू कळतंय का तुला !मैथिली म्हणाली. 'हे बघ, मैथिली म्हणजे आपली पहिली दुसरी भेट त्यात गैरसमजच जास्त झाले पण नंतर आपण जस जसे भेटत गेलो तशी तशी आवडायला लागली तू मला', 'छान वाटत तुझ्या सोबत time spend करायला', 'म्हणजे कळतच नाही वेळ कसा जातो', आता पर्यंत खूप मुली बघितल्या पण जिचा शोध घेत होतो ती तूच आहेस मैथिली! 'आणि मी तुझ्यासाठी कितीही दिवस थांबायला तयार आहे', 'माझ्या आयुष्यात पुन्हा नव्याने रंग भरशील?' 'करशील माझ्याशी लग्न?' विहान ने तिला विचारले. मैथिलीला काहीही सुचत नव्हते खर तर तिला विहान मनापासून आवडत होता पण तिला सध्या लग्नाच्या बंधनात अडकायचे नव्हते.आणि विहान ने तिला अचानक अशी लग्नाची मागणी घालणं तिला अगदी अनपेक्षित होत. 'विहान हे बघ तुला अस वाटत नाही आहे का तू घाई करतोय?''म्हणजे मी असा कधी विचार केला नाही' 'आणि लग्न वगैरे तर मुळीच नाही', 'आणि मला वाटलं नव्हतं,तुझ्या डोक्यात अस काही असेल'. मैथिली थोडस रागाने आणि चिडूनच बोलली.

Rate & Review

Manjusha Salunkhe
Ujwala Nadkarni

Ujwala Nadkarni 3 years ago

HEMLATA DAREKAR

HEMLATA DAREKAR 3 years ago

Ashu

Ashu 3 years ago

Vrushali

Vrushali 4 years ago